वर्षाविहार २०१० (यू.के.'ज रिसॉर्ट) : वृत्तांत आणि प्रतिक्रिया

Submitted by ववि_संयोजक on 19 July, 2010 - 05:23

DSC01541-compressed.JPG

वर्षाविहार-२०१० यशस्वी केल्याबद्दल सर्व उपस्थितांचे तसेच संयोजन समिती आणि सांस्कृतिक समितीच्या सदस्यांचे आभार.
वर्षाविहार-२०१० चे फोटो, वृत्तांत आणि प्रतिक्रिया इ. साठी हा धागा सुरू करत आहोत. जास्तीत जास्त लोकांनी (विशेषतः वर्षाविहारास प्रथमच हजेरी लावलेल्या मंडळींनी) वृत्तांत लिहावेत अशी आग्रहाची विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इंद्रा Lol
मंजे, नन्या Happy

काल मा़झा पहिला व.वि. होता. बस मधे चढल्या चढल्या सासरी आल्यावर नववधुला कसं सारखं नाव घे, नाव घे करतात तसं ह्या मंडळींनी मला ह्याचं नाव सांग, हिचं नाव सांग , ह्याला/हिला ओळख चालु केलं Happy आणि कोणालाही ओळखल्यावर तो/ती होSSS म्हणुन मीच तो/ती करत होता/ती. पैकी योडीला तिच्या साईझ वरुन आणि वैभवला त्याच्या ढोलकी वरुन मी लगेच ओळखलं. कवीने ती योडी असल्याचं सांगुन मला फसवण्याचा प्रयत्न केला पण तिच्या गळ्यातल्या मंगळ्सुत्राने तिची ट्रीक फसवली Proud किरुने मला तो लिंबु-टिंबु असल्याचं सांगितलं. दुपारच्या जेवणाच्या वेळेस दक्षीने मला खरे लिंबु-टिंबु दाखवुन दिले, तोपर्यंत मी किरूलाच लिंबु-टिंबु समजत होते Happy
रीसॉर्ट ला पोहणे, रेन डान्स, मेधाच्या पाठीत आणि अस्मादिकांच्या थोबाडावर बसलेला बॉल, मग एक से एक गेम्स, शेवटुन दुसरा आलेला आमचा गट Proud भ्रमणध्वन्यांची देवाणघेवाण, दुपारनंतर व.विच्या नावाची लाज राखणारा पाऊस, नंतर बस मधली धम्माल गाणी, मधेच उतरुन पावसाच्या रिमझिम मधे घेतलेला चहा आणि तोष्दाची भरपुर खायला मिळालेली चॉकलेट्स हा आनंद ज्यांनी मिसला त्यांना टुकटुक Happy

तीन वर्षांपासुन मा.बो वर असुन, एकदाही व.विला गेले नव्हते मी. पण ह्यापुढे एकही व.वि मिसणार नाही हे १००% Happy

तीन वर्षांपासुन मा.बो वर असुन, एकदाही व.विला गेले नव्हते मी. >>> डोंट टेल मी :आश्चर्यचकित बाहुली:

दुपारच्या जेवणाच्या वेळेस दक्षीने मला खरे लिंबु-टिंबु दाखवुन दिले, तोपर्यंत मी किरूलाच लिंबु-टिंबु समजत होते >>> Lol

खरे लिंबु-टिंबु दाखवुन दिले >>> एखाद्या तिर्‍हाईताला वाटेल लिंबू आणि टींबू कुणी भाऊ आले होती की कॉय! Lol

>>>> एखाद्या तिर्‍हाईताला वाटेल लिंबू आणि टींबू कुणी भाऊ आले होती की कॉय!
हर्‍या-नार्‍या सारखे??? की सन्तासिन्ग्-बण्टासिन्ग सारखे???? Lol
पण हिची चूक नसावी, दक्षीने दाखवले म्हणजे मी खात्रीने सान्गतो, तो उभाहे तो लिम्बू, त्याच्या बाजुला त्याचा टिम्बू असेच तिने दाखवले असेल, आय बेट!

लले, लिंबु-टिंबु Lol

नाही हो...लिंबु-टिंबु..मी उलट तिच्याशी वाद घालत होते किरू कडे बोट दाखवुन..अगं तेच लिंबु-टिंबु आहेत..तिने मला लहान मुलाला सांगतात तसं सांगितलं.."गप ए बावळट..ते बघ काठी घेऊन फिरताहेत ना.ते लिंबु-टिंबु आहेत" Proud

हा वर्षा विहार यशस्वी पद्ध्तीने पार पाडल्याबद्दल संयोजन समितीचे अभिनंदन आणि आभार. Happy सांस्कृतीक कार्यक्रम छान होते.

काल माझ्या टीमचे दहा मार्क्स मी हकनाक (मूर्खासारखे) घालवले त्याचा मला भयानक खेद होतोय >> राहू दे रे लिंब्या पुढच्या वर्षी जिंकू आपण.. Happy सारखं डोकं आपटत बसलास तर पुढच्या वर्षी यायला नाय मिळणार Proud

वविच्या धावपळीला सकाळच्या गजरापासूनच सुरुवात झाली होती. आमची तयारी झाली नव्हती आणि सहा वाजता येणार्‍या ललिता-प्रीती आणि मेधा२००२ चक्क वेळेत उगवल्या. (कस काय बरोब्बर जमत बुवा यांना देव जाणे) . साधारण त्याच सुमारास अश्विनी_के अवतीर्ण झाल्या. सव्वा सहा वाजता मुलूंडच्या दिशेने निघायचा बेत अखेर साडेसहा वाजता प्रत्यक्षात आला. एव्हढ्या सगळ्या बायका वेळेत तयार होउन आल्या हेच एव्हढ मोठ यश होतं की निघायला झालेला किंचित उशीर हा त्यापुढे काहीच नव्हे. गाडीत चार बायका असताना मला तोंड उघडायला मिळायचा चान्स तर नव्हताच पण अपेक्षा पण नव्हती Proud

आजचा दिवस वेगळा होता. घडणार्‍या आश्चर्याची पहिली चुणूक किरूच्या फोनने दिली. आम्ही स्पॉटवर पोहोचायच्या पाच मिन्ट आधीच बस पोहोचली होती. बस नंबर जाहिर न करण्यामागच खरं कारण संयोजकांनाच ठाउक होतं. आदल्या दिवशी संध्याकाळी मालक भिड्यांनी ४९ ऐवजी ५४ सीटरची सोय करुन दाखवली होती. त्यामुळे रात्रीच सगळ्यांना समस पाठवून बस नंबर कळवला गेला होता. त्या "५४ खणी"ला बॅनर आणि झेंड्याने नटवून होईपर्यंत सगळे बसमध्ये स्थिरस्थावर झाले होते. घारुअण्णांनी आपल्या सराईत नजरेने सगळं व्यवस्थित असल्याची खात्री करुन घेतली आणि गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात बस मुलूंडवरुन मार्गस्थ झाली.

फॅमिली पॅक मध्ये मालक विनय भिडे, किरु, ईंद्रा, अण्णा, मी, चॉकलेट हिरो आशुतोष ७११, कविता नवरे, मनिषा लिमये, प्र-साद, मोदक फ्यामिली असे खंदे वीर होतो तर फुटकळमध्ये आलेल्यात आनंदसुजू, आनंदमैत्री, मेधा २००२, यो रॉक्स, योगमहे उर्फ योडी, वैभव आयरे अश्या प्रभृती होत्या. (मिसलेल्यांनी नाव अ‍ॅडून घ्या रे आपापली. रात्री बारा वाजता टाईपतोय हे. Happy व्यसन वाईटच Wink )

घरातून लवकर निघाल्यामुळे मंडळी भुकेली असतील हे ओळखून आणलेले चिमूटभर भूक लाडू वाटप झालं आणि खालेल्या खाउला जागून एकेकाने गळे काढायला सुरुवात केली. आनंदद्वयीने एक बाजू लावून धरली होती तर मालक (पावसाळा असल्याने बहुतेक) लावणीच्या मागे होते.अस्तित्वात असलेल्या आणी नसलेल्या जवळ जवळ सगळ्या लावण्या म्हणूनही यो.रॉक्सने अजूनही आपल्या नृत्यकलेचा तिसरा डोळा उघडला नव्हता. त्या हलत्या बसमधे तो नुस्ता उभा राहिला असता तरी नाचल्यासारखा वाटला असता हि गोष्ट वेगळी. नॉर्मल गाणी नॉर्मल पद्धतीत म्हणून होत असतानाच चाल बदलायची टूम आली. निगाहे मिलाने को जी चाहता है च्या चालीवर सदासर्वदा योग तूझा घडावा ? लावणीच्या चालीवर भूपाळी आणि कव्वालीच्या चालीवर भजन म्हंटल गेल्यावर दुसरं काय होणार होतं ? गाडी साहजिकच लोकल मध्या लोकल कलाकारांच्या लोकल अदाकारीवर आली. मुंबईकर सुट्टीच्या दिवशीही ट्रेन्सना विसरु शकत नाहीत. पर्रद्येशी पर्रद्येशी जाणा णही.. मुज्ये चोडखे म्युजे चोडखे.... आनंदसुजू व्याकुळतेने नकलत होता.... त्याला अर्थातच अभिनयाचीही जोड होती. गाण्याची गाडी शेवटी क्येशव्हा...माधव्हा वर येउन लागली आणि बस रिसॉर्टच्या आवारात शिरली.

गाडिला स्टार्टर बसल्यापासून ते गाडीतून उतरेपर्यंत वैभव आयरेंची ढोलकी इमाने इतबारे बज रही थी. त्याचा खास उल्लेख झाल्याशिवाय हा प्रवास पूर्ण झाल्यासारखा वाटणारच नाही.

उतरल्या उतरल्या लिंबूदांच दर्शन घडलं. त्याच्या हेअरस्टाईलमुळे मला आधी ते घारुअण्णांचे थोरले भाउच वाटले होते. लिंबूंबरोबर त्यांचा टिम्बूपण होता. त्याला नंतर आम्ही उचलून पाण्यात टाकलं.

खादाडी आटपून पोहोण्याचे कपडे चढवले (म्हणजे बाकिचे उतरवले ) आणि पूलवासी झालो. जलक्रिडांना खरा रंग आणला तो दगडू यो च्या जल॑बिन मछली नृत्यबिन बिजली स्टाईल लावणीनृत्याने. नंतर कुणीतरी मला तो ते नृत्य म्युझिकशिवाय पण करु शकतो असं सांगितलं... ख.खो.यो.जाणे..... योला, रिसॉर्टकडून परफॉर्मन्सच्या आणि प्रेक्षकांकडून शिकवणीच्या ऑफर्स आल्यात असे समजते. यो, वविसमितीकडे रॉयल्टी जमा करुन जाणे Wink

सगळे एकमेकांत इतके मिसळले होते की ना बाफ वेगळा सांगता येत होता ना शहर. मला नेहमी पडणार कोड यावेळीही छळत होतचं. एव्हढी सगळे डांबरट, खेवशे लोक अचूक एकत्र कसे आले मायबोलीवर ? ( दिवे घ्यालच सगळे) एकाची कमी भासू नाय देत दुसरा. तरी काही न येउ शकलेल्यांना मिसून झालं, नीट फोटो आणि वृत्तांत टाकून त्याना जळवण्याच काम करण्याच्या आणाभाका घेतल्या गेल्या....

मला वाटत ह्या वविला आलेल्यात सर्वात दूरवरुन आलेली वर्षू_नीलच असेल.... तसा जपानी केदार होता पण तो आता पुणेकर झालेला आहे.

पाण्यात खेळून भुकेलेले जीव जेवून सांसंच्या तावडीत सापडले. लांबून लांबून एकत्र आलेल्यांचे चार कंपू पाडून त्याना कंपूबाजीच पद्धतशीरपणे शिक्षण देण्यात आलं. मला धो-धो मध्ये अ‍ॅडमिट करण्यात आलं. जमेल तेव्हढ्या स्पर्धा आम्ही जमेल तेव्हढ्या रितीने एन्जॉय केल्या. फक्त पोट भरलेल असल्याने मी उ-खाण्याच्या कार्यक्रमावेळी पळून गेलो. प्रत्येक स्पर्धकाला चिडव (मग तो आपल्याच टीमचा का असेना), प्रत्येक अनाउन्समेंटला संयोजकाना बुचकळ्यात टाकणारे प्रश्न विचार, मध्येच लहान मुलीच्या आवाजात बोलून सगळ्याना फसवणार्‍या अश्विनीला रुमच्या हरवलेल्या चाव्या , हरवलेल्या पालकांची बालकं शोधायला लाव.. असे अनेक उद्योग आम्ही करत असताना आमचा टिमनायक हताश होऊन आमच्या लीला बघत होता. पण अशेच उद्योग करत असताना आनंदसुजूला अचानक स्पर्धेतला खजिना सापडला. तो त्या गोळ्या एकटाच खाउन टाकणार होता कारण खजिन्याच्या मार्कांपेक्षा कॅडबरीच्या गोळ्या कधीही श्रेष्ठ असं त्याच ठाम मत होतं. शेवटी आम्ही खजिना त्याच्यापासून वाचवून आम्ही परत सांसंच्या हाती दिला आणि त्याच बक्षिस म्हणून आम्हाला विजेते घोषित करण्यात आलं. त्या शंभर मार्कांपैकी १० खजिना शोधण्याचे आणि ९० तो खजिना केळकरांपासून वाचवण्याचे असल्याच आम्हाला आम्च्या अविश्वसनीय सूत्रांकडून कळ्ळय....

अखेर माबोकरांच्या हुल्लडबाजीला घाबरुन रिसॉर्टवाल्यांनी अतिशय आनंदाने आमच्या बसला दरवाजा उघडून दिला आणि आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.....

सगळ्यांचे वृत्तांत सही आहेत. आणि पहिल्याच वेळेस वविला आलेल्यांनीही मजा केली, वृ लिहीले हे वाचून खूप छान वाटलं!

परेश ची दोन विडंबनात्मक गाणी (खास पुणे बसमधली)
>>
ह्यातलं एक गाणं मुंबईच्या बसमध्ये देखिल झालं.

जाम धम्माल आली वविला. Happy

डोंट वरी योडे परेश दर ट्रिप ला तिच दोन गाणी म्हणत असतो Proud

असुदे मामा, लय भारी लिवलयस Happy लेट लतिफांवर थोडासा राग काढण्याचा प्रकार म्हणून ते आल्यावर बस पळवून त्यांना थोड धावायला लावल ते लिहायला विसरलास पण Proud

Pages