वर्षाविहार २०१० (यू.के.'ज रिसॉर्ट) : वृत्तांत आणि प्रतिक्रिया

Submitted by ववि_संयोजक on 19 July, 2010 - 05:23

DSC01541-compressed.JPG

वर्षाविहार-२०१० यशस्वी केल्याबद्दल सर्व उपस्थितांचे तसेच संयोजन समिती आणि सांस्कृतिक समितीच्या सदस्यांचे आभार.
वर्षाविहार-२०१० चे फोटो, वृत्तांत आणि प्रतिक्रिया इ. साठी हा धागा सुरू करत आहोत. जास्तीत जास्त लोकांनी (विशेषतः वर्षाविहारास प्रथमच हजेरी लावलेल्या मंडळींनी) वृत्तांत लिहावेत अशी आग्रहाची विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>> ते आल्यावर बस पळवून त्यांना थोड धावायला लावल <<<<< Lol
कुणाकुणाला पळायला लावले???? जरा नजरेसमोर चित्र उभे करुन पुन्हा हसुन घेऊदे की! Proud
चान्गले लिहिलय रे असुदे! Happy

शैलजा बिचार्‍या मामांनी नाही काही पळवली बस. वो कल्पना किसी और की थी Proud लेट लतिफना आणायला आनंद केळकर गेलेला. आम्ही बस पळवली तेव्हा त्याचा जो चेहरा झालेला तो बघण्यासारखा होता Proud

परेश मुंबईच्या बसमधून पण आला???
>>
वर्च्युअली होता मंजे तो तिथे.

मी काल घरीपण सांगितलं ते गाणं बहिणीला.

असुदे,मस्त वृत्त्तांत रे...

मला वाटत ह्या वविला आलेल्यात सर्वात दूरवरुन आलेली वर्षू_नीलच असेल...>>> श्यामली पण होती रे दुबईहुन आलेली...

लेट लतिफ कोण हे जाणून घ्यायची उत्सुकता लागून राहिली आहे ...... कोण कोण बसच्या मागून पळत आले, त्यांनी हात वर करा पाहू Proud

मंजे , कविता, अम्या, इंद्रा, किर्‍या, गुब्बे.. तुमचे वृतांत बास झाले बरं का..

आता राधा, सानू, येषा यांच्या बोबड्या शैलीतून मस्तपैकी एखादा वृतांत येवूदेत.

>>>> मला वाटत ह्या वविला आलेल्यात सर्वात दूरवरुन आलेली वर्षू_नीलच असेल...>>> श्यामली पण होती रे दुबईहुन आलेली...
अरे फॉण्ट वाले किरण अन अमृता पण होते, दुसर्‍याच दिवशी परत यूएसला जाणार होते

छे! आता मात्र वृत्तांत लिहायलाच हवा... Proud

वर्षाविहारानिमित्त सर्वांनी एकत्र येणं वगैरेबद्दल मागच्या वर्षी मला जो सुखद धक्का बसला होता त्याबद्दल मी तेव्हाच लिहिलं होतं. त्या धक्क्याने पुन्हा एकदा नव्याने आपलं अस्तित्त्व दाखवून दिलं असलं तरी यंदाच्या एका निराळ्याच धक्क्याचा उल्लेख सर्वप्रथम केल्याविना मला राहवत नाही आणि तो धक्का म्हणजे ’आगाऊ’ या आय-डीचं प्रत्यक्ष दर्शन! विशाल कुलकर्णीने त्याच्याशी माझी ओळख करून दिली आणि ’हा’ आगाऊ हे कळल्यावर मी कपाळावर हातच मारून घेतला. नंतर आम्ही गप्पा मारल्या, फोटो काढले, ते झालंच, पण दिवसभर तो जेव्हा जेव्हा समोर येत होता तेव्हा प्रत्येक वेळी माझा चेहरा ’हा आगाऊ?? हा???’ असा होत होता. Lol त्या धक्क्यापायी मी शेवटपर्यंत त्याचं प्रत्यक्षातलं नावही विचारलं नाही.

दररोज कट्ट्यावर ’ळळे, णमस्कार. आज काय इसेस?’ अशी माझी चौकशी करणार्‍या जप्पान रिट्टर्न्ड कोल्हापूरकर केदार जोशीला प्रत्यक्ष भेटायची मला खूप उत्सुकता होती. ती पूर्ण झाली.
रिसॉर्टच्या मागच्या बाजूला असलेल्या हिरव्यागार शेताचा मी फोटो काढत असताना त्यानं ’पुणे-मुंबईकर जरा कुठे गवत दिसलं की फोटो काढत सुटतात’ असं म्हणून आपला कोल्हापुरी बाणा दाखवला. पण त्या वाक्याला दिलखुलास दाद देऊन मी माझा मुंबईकरपणाही लगेच सिध्द करून टाकला.

पूनम छत्रेच्या आणि माझ्या प्रत्यक्ष भेटीच्या पार्श्वभूमीची एक वेगळीच स्टोरी आहे. काही जणांनी त्याबद्दल आमच्या दोघींच्या विपुत वाचलंही असेल. (इतके दिवस नसेल वाचलं, तर आता वाचतील ;)) त्याबद्दल स्वतंत्र लिहिणार आहे.

बाकी, सकाळ-संध्याकाळच्या बसमधल्या धमालीत मी फारशी सहभागी होऊ शकले नाही. मला बसच्या पुढच्या भागात निमूटपणे बसून फक्त श्रोत्याची भूमिका बजावावी लागली. (येऽऽऽ मोशन-सिकनेस कब मुझे छोडेगा?? :() आनंद-द्वयी, विनय भिडे इ.ची एनर्जी खरंच वाखाणण्याजोगी होती. संध्याकाळी पनवेल-बेलापूर दरम्यान ट्रॅफिकमधे ऐकणार्‍याला वाटावं की नुकतीच ही मंडळी पिकनिकसाठी घरातून बाहेर पडलीयेत. परततानाही तोच जोश, तीच आवाजाची पातळी, तीच मस्ती! वैभवच्या ढोलकीने तर त्याला चार चांद लागले.

मुलुंडला उतरून अमितच्या गाडीतून त्याच्या घरी पोहोचल्यावर पुन्हा चहा घेता घेता तिथे आमचा गप्पांचा अड्डा जमला. (आमच्याही एनर्जीची वाखाणणी करा कुणीतरी :फिदी:)
शेवटी मेधाला न्यायला म्हणून आलेला तिचा नवरा पुरेसा बोअर झालाय याची खात्री पटल्यावर रात्री नऊनंतर आम्ही आपापल्या घराचा रस्ता पकडला.
गप्पांदरम्यान मयूरीने ’पुढच्या वर्षी तुम्ही पण याच’ म्हणून त्याला इतका आग्रह केला की ’ऍटॅक इज द बेस्ट डिफेन्स’ या नियमाने पुढच्या वविला तो हजेरी लावण्याची दाट शक्यता आहे याची नोंद घ्यावी. Wink

लले, आम्ही कुठेही अड्डा न जमवता ९ नंतरच आपापल्या घरी पोचलो.

’हा आगाऊ?? हा???’>>>>>> तुझ्या मनात आगाऊ ची इमेज कशी होती सांग ना सांग ना प्लीज Proud

आगाऊचा धक्का मला पण बसला लले. मी पण त्याला परत परत म्हणत होते तू आगाऊ वाटतच नाहिस. त्याच्याशी आणि मधुकरशीही गप्पा मारल्या मी Happy

नन्या १०, निंबुडा, आपण सगळे मुलुंड्चे आहात काय? मी सोबत नसल्याने आणि मुलगा लहान असल्याने ववि ला नाही येउ शकले. मुलुंड मधे गटग करणार असल्यास सांगा नक्की.

मी पण त्याला परत परत म्हणत होते तू आगाऊ वाटतच नाहिस. त्याच्याशी आणि मधुकरशीही गप्पा मारल्या मी...>>>अश्विनी, मधुकर तरी मधुकर वाटला ना?:फिदी:

हो मयुरेश, मधुकर हा मधुकरच वाटला. पण स्वभावाने अ‍ॅग्रेसिव्ह वाटला होता तसा नाही निघाला तो. खूप सौम्यपणे बोलत होता Happy

मी आगाऊला अजून असं पण म्हटलं की मला वाटलेलं तू खूप मोठा असशील, तू तर खूप लहान आहेस. तर शेवटी त्याने त्याचं वय सांगितलं आणि म्हणाला अजून किती मोठा होऊ? Lol

आगाऊ, मला ही 'तूच तो' ही माहिती परतीच्या प्रवासात कळाली. तुझ्याशी बोलायचे राहून गेल्याचे जरा वाईट वाटले. तुझी पर्सनॅलिटी एकदम आदरणीय वगैरे वाटली त्यामुळे तुला आगाऊ म्हणताना पंचाईतच झाली असती. Proud Happy

तुझी पर्सनॅलिटी एकदम आदरणीय वगैरे वाटली त्यामुळे तुला आगाऊ म्हणताना पंचाईतच झाली असती. >>> अगदी अगदी. माझं पण हेच झालं. एकदम शांत, डीसेंट वगैरे वाटला तो (आय. डी. च्या उलट).

तुझी पर्सनॅलिटी एकदम आदरणीय वगैरे वाटली>>> बोंबला, बायकोने हे वाचले तर पुन्हा कधी वविला नाय जाऊ देणार ती Happy
मी आगाऊला अजून असं पण म्हटलं की मला वाटलेलं तू खूप मोठा असशील, तू तर खूप लहान आहेस.>>> त्वचा से मेरी उम्र का पताही नही चलता Happy
वविला जशी धमाल होते असे ऐकून होतो तशीच ती झाली. एकेक नग आहेत सगळे.
आम्हाला 'किमया' समोर हुबे र्‍हावा असे सांगून संयोजकांनी बस विरुद्ध बाजूला उभी केली त्यावर 'प्रश्न तत्वाचा आहे' वगैरे भंकस करत मी आणि परेशने रस्ता क्रॉस केला. सक्काळसक्काळ ज्याम भूक लागलेली, कुठे फुटकळ चिवडा, बिस्किट असं करत करत खोपोलीपरेंत तग धरली. दरम्यान काय वाट्टेल त्या गाण्यांच्या भेंड्या झाल्या (चुकीची ऐकू आलेली गाणी सारखी ववित चुकीची म्हणलेली गाणी असा बाफ उघडता येईल!).
केदार जोशी कोल्हापूरचा निघाल्याने वेगवेगळ्या ठिकाणचा 'तांबडा-पांढरा' याचा तौलनिक अभ्यास झाला. तो, मी, मल्ली असे आम्ही काही पाण्यात न गेलेले कोरडे वीर.
मीच आगाऊ हा धक्का पब्लीकला बसणार याची खात्री होतीच, ते ही भरपूर एंजॉय केले!
सांस्कृतीक कारेक्रम ब्येष्टच, खासकरुन त्या भौमितिक आकारावरुन चित्रे काढण्याच्या राउंडमधे आमच्या ग्यँगचा परफोरमन्स अद्वितिय होता. घारुआण्णांनी (व्यक्तिमत्वाइतका समर्पक आयडी दुसरा नाही!) कात्रीचे भौमितिक वर्णन - 'एकमेकाला क्रॉस करणारे दोन समद्विभुज त्रिकोण, ३०-६०-९०' या शब्दात केले. त्याचे जे काही स्वरुप पल्लीने काढले ते आकाशकंदिलासारखे कायतरी आले.
थोडक्यात काय तर आपण 'उत्तम गुणांच्या मंडळी'त आहोत याचे समाधान वाटले!

समद्विभुज त्रिकोण, आकाशकंदील >> Lol अगदी रे. 'त्रिकोण जिथे एकमेकांना छेदतात तिथे दोन बाजूंना अर्धवर्तुळे काढा' असे घारुआण्णांनी सांगताच, दोन त्रिकोण एकमेकांना तीन बिंदूत छेदतात; त्यातल्या कोणत्या दोन बाजूंना कोणत्या दिशेला तोंड करुन अर्धवर्तुळे काढू? असा सिन्सिअर प्रश्न पल्लीला पडल्याचे मला मागूनही जाणवले. तरी तिने निषेधार्थ तीन हळूवार उड्या मारुन फळ्याखाली अर्धवर्तुळ काढले! Proud

Pages