Submitted by मेधा on 8 June, 2010 - 17:49

प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३ दिवस
लागणारे जिन्नस:
वाटीभर मूग
दोन तीन पाकळ्या लसूण ठेचून
नारळाचं दूध किंवा ओलं खोबरं
२ चमचे मालवणी मसाला
२-३ कोकम
एक मोठा लाल कांदा बारीक चिरून
हळद, हिरवी मिरची, जिरं, तेल, मीठ
७-८ काड्या कोथिंबिर
क्रमवार पाककृती:
मूग भिजवून , मोड काढून, सालं काढून तयार करून घ्यावेत.
मुगामधे थोडी हळद , ठेचलेली लसूण, मीठ अन मालवणी मसाला नीट कालवून घ्यावा.
थोड्या तेलावर जिरं, हिरवी मिरची घालून परतून मग कांदा घालून परतावे
कांदा मऊ झाला की मूग घालावे, थोडे पाणी घालून झाकण ठेऊन शिजवावे.
शिजत आले की नारळाचे दूध घालावे व बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी
( कधी नारळाचे दुध काढायचा कंटाळा आला की ओला नारळ अन कोथिंबीरीच्या काड्या मिक्सर मधून भरड वाटून घालते मी )
वाढणी/प्रमाण:
खाणार्यावर अवलंबून .
अधिक टिपा:
सिंडरेलाच्या वाढदिवसानिमित्त तिच्यासाठी कृती !
माहितीचा स्रोत:
इकडून तिकडून वाचून अन स्वतःचे प्रयोग
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मालवणी मसाल्यात असं काय विशेष
मालवणी मसाल्यात असं काय विशेष असतं? व्यंजन कुठले असतात? >>
व्यंजन पदार्थ / घटक या अर्थाने मराठीत वापरतात का ? मी कधी ऐकलं नाही. जिन्नस, साहित्य घटक पदार्थ हे शब्द ऐकलेत.
वर मी मालवणी मसाला नसल्यास काय वापरता येईल ते दिलंय. बहुतेक तेच घटक असतात. गूगल केलं तर मालवणी मसाल्याच्या बर्याच कृती सापडतील.
कृपया हे पहावे :
कृपया हे पहावे : http://www.maayboli.com/node/16995
हे तिरफळ अगदी रिठ्यासारखं
हे तिरफळ अगदी रिठ्यासारखं दिसतंय ना?
शोनू मस्तय रेसिपी.
ज्ञाती, तिरफळ बरंच लहान असतं
ज्ञाती, तिरफळ बरंच लहान असतं रिठ्यापेक्षा. पांढर्या वाटाण्याइतकं असेल साधारण.
ओह फोटोत पाहिल्यामुळे बहुतेक
ओह फोटोत पाहिल्यामुळे बहुतेक मला मोठे वाटले ते.
मी कालच या पद्धतीने बिरडं
मी कालच या पद्धतीने बिरडं करून बघितलं. छान झालं होतं चवीला. पण ती सालं काढायची म्हणजे प्रचंड वेळखाऊ काम, व सालं फेकून देतोय त्याचं वाईट वाटत होतं ते वेगळंच. मेधा, साहित्यात कोकमं लिहिलीएस मग ती शिजतानाच घालायची कां? मी विसरले घालायला काल.
तिरफळ हे मी तमिळ लोकांच्या
तिरफळ हे मी तमिळ लोकांच्या वथकुळंबन मधे पाहिले आहे. त्यात काळ्या रंगाच्या बिया असतात. चवीला तिरफळ खूपचं छान लागतं.
तिरफळ नक्की कसं वापरायचं?
तिरफळ नक्की कसं वापरायचं? अख्खं?
व्यंजन पदार्थ / घटक या
व्यंजन पदार्थ / घटक या अर्थाने मराठीत वापरतात का ? मी कधी ऐकलं नाही. जिन्नस, साहित्य घटक पदार्थ हे शब्द ऐकलेत.
>> विदर्भात मी घटक ऐवजी व्यंजन हाच शब्द ऐकला आहे. Ingradients = व्यंजन. पुढे सिंगापुरात आल्यानंतर पुण्यातून इथे विकायला येणारे सकसचे पाकिट त्यावर मग मी घटक हा शब्द वाचला.
http://www.flickr.com/photos/
http://www.flickr.com/photos/10597800@N05/page22/
ही लिंक कुणी दिली माहिती नाही पण माझे २ तास सत्कारणी लागले. केवढा उरक आणि उत्साह असतो काहीजणांमधे खरचं! धन्य!!!
काही दिवसांपूर्वी मुगाला मस्त
काही दिवसांपूर्वी मुगाला मस्त मोड आले होते आणि आदल्या दिवसाच्या कालवणा वापरलेलं नादू उरलं होतं, तेव्हा ही पद्धत वापरून भाजी/उसळ केली होती. सालं कांढायची हौस नाही म्हणून मूगच फोडणीवर टाकले. नादू ची छान चव येते. मालवंणी मसाल्याचा तिखपणाही कमी होतो.
आणि हा १०१ वा प्रतिसाद
Pages