व्हेज कबाब

Submitted by अंजली on 7 June, 2010 - 10:04
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

२ कच्ची केळी (plantains) उकडून आणि खिसून
२ मोठे बटाटे उकडून आणि खिसून
२ गाजर खिसून आणि वाफवून
२ मोठे कॉलीफ्लावरचे तुरे खिसून आणि वाफवून
१/२ वाटी मटार वाफवून
१/२ वाटी मक्याचे दाणे वाफवून
१ मध्यम लाल कांदा बारिक चिरून (असल्यास कांद्याची पात बारिक चिरून)
१ वाटी पनीर खिसून
१ मोठा चमचा आलंलसूण पेस्ट
मूठभर कोथिंबीर बारिक चिरून
मूठभर पुदिना बारिक चिरून
१ मोठा चमचा भरून हि. मिरची बारिक चिरून
१ टि. स्पून धने पावडर
१ टि. स्पून जीरे पावडर
१-२ टि. स्पून चाट मसाला
१ टि. स्पून बडिशेप भरड कुटून
१ टे. शानचा शीख कबाब मसाला (नसला तर गरम मसाला)
१/२ वाटी काजू तुकडे
लागतील तसे ब्रेडक्रम्स
चवीपुरते मीठ

क्रमवार पाककृती: 

वरील सर्व जिन्नस एकत्र करुन १/२ तास ठेवावे.
हवा तसा आकार देऊन (गोल चपटे किंवा शीख कबाब सारखे लांब) तळून घ्यावेत किंवा शॅलो फ्राय करावेत. कोळशाच्या ग्रीलवर ग्रील केले तर सुंदर चव येते. सर्व्ह करण्याआधी थोडा चाटमसाला भूरभूरावा.
कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, जीरे वाटून दह्यात कालवलेल्या चटणीबरोबर सर्व्ह करावेत. सोबत कांदा, लिंबाच्या चकत्या द्याव्यात.

वाढणी/प्रमाण: 
भरपूर होतात :)
माहितीचा स्रोत: 
वाह रे वाह डॉट कॉमचे संजय थुम्मा, पाककृतीची पुस्तकं, स्वप्रयोग
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कच्च्या केळ्याच्या ऐवजी काय घालता येइल? की बटाटेच जास्त घालुन बघु>>>> हो, नुसते बटाटे घेतले तरी चालतील. बटाट्यामुळे पीठ सैल पडलं तर ब्रेडचे स्लाईसेस घाल म्हणजे पीठ मिळून येईल.

Pages