सॅलाड/पास्ता सॅलाड ड्रेसिंग

Submitted by सायलीमी on 18 May, 2010 - 13:06
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

Extra Vergin Olive Oil ५ चमचे
आक्रोड - ४-५
लसूण पाकळया - २-३
रेड चिली फ्लेक्स - १ चमचा
बाल्सामिक व्हिनेगर -२ चमचे
मिरी पूड - १ चमचा
साखर चवीनुसार
मीठ चवीनुसार

क्रमवार पाककृती: 

१. आकोड ची जाडसर पूड करून घ्या.
२. लसूण बारीक चिरून घ्या.
३. एका काचेच्या भांड्यात ऑऑ + बाल्सामिक व्हिनेगर + लसूण आक्रोड + साखर + मीठ+ रेड चिली फ्लेक्स + मिरी पूड सगळ एकत्र करा
४. हे मिश्रण मावे मधे १ मि. गरम करा.
ड्रेसिंग तयार
IMG_0069.JPGIMG_0070.JPG

- हे ड्रेसिंग सॅलाडवर / पास्ता सॅलाड वर मस्त लागते.
- फ्रेंच ब्रेड/ बगेट स्लाईस करून त्यावर हे ड्रेसिंग घालून खाता येते. ब्रेड थोडा गरम करून त्यावर ड्रेसिंग घालायचं

वाढणी/प्रमाण: 
२ माणसांसाठी
अधिक टिपा: 

- आवडत असेल यात शॅलेट (shallot) घालता येतो.
- पार्टीसाठी एक अ‍ॅपेटाइझर किंवा BBQ च्या वेळी ग्रिल चालू होईपर्यंत खायला उत्त्म प्रकार.
- ड्रेसिंग १ दिवस आधी करून चालते आणी फ्रिजमधे करून ठेवले तर लागेल तसे वापरता येते सॅलाड साठी

माहितीचा स्रोत: 
स्वतःचे प्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> माहितीचा स्रोत: स्वतःचे प्रयोग

हाहा.. हे सही होतं.. आणि अर्थात फोटो आणि प्रत्यक्ष ड्रेसिंगही.. Happy

आत्ताच सलाड खाल्लं तुझं हे ड्रेसिंग घालून. अप्रतिम लागलं एकदम. नेहमीपेक्षा छान एकदम.. सावित्रीने धन्स सांगितलाय तुला.