पुण्यात घर घ्यायचय?

Submitted by नानबा on 16 May, 2010 - 10:33

ह्या धाग्याच्या मूळ उद्देशात मी गृप बूकिंगसाठी लोक जमतात का हे पहायचं असं लिहिलं होतं..
पण काही प्रतिसादांमधे असे गृप ऑल्रेडी आहेत आणि त्यांना अनुभवही आहे असे प्रतिसाद आले - त्यांचं म्हणणं पटल्यानं आणि चर्चेचं मूळ स्वरूप हळूहळू बदलून "पुण्यातल्या चालू प्रोजेक्ट्सची/लोकेशन्सची माहिती/घर विकत घेताना लक्षात घ्यायच्या गोष्टी" - असं झाल्यानं माझं हे मुळच पोस्ट मी बदलतेय.
--- पुण्यात घर विकत घेऊ इच्छिणार्‍यांना शक्य ती माहिती मिळावी - म्हणून हा बाफ!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाणेरलाच का घर घ्यायचे पण? थोडे MH14 कडे सरका. पिंपळे सौदागरला ६५ / ६८ +/- मध्ये मोठा २ बीएचके (रिसेलचा) मिळेल. अर्थात MH14 शाप वगैरे वाटत असेल तर गोष्ट वेगळी.

बावधनला मिळू शकेल. मला काही स्कीम्स माहीत आहेत तिथे तसेच पिरंगुट सा ईडला ही खूप चांगल्या भावात चालू आहे सध्या.

बाणेर हल्ली खूप जास्त ओव्हर हाईप्ड आहे.
ज्याना नवी घरे घ्यायची आहेत त्यांनी पिंपळे सौदागर ला या एम एच १४ चालत असेल तर, परांजपे चा पण रहाटणी ला प्रोजेक्ट चालू आहे.
रॉहू नी सांगितलेले रेट आणि सर्व्हिस खूप माज वाटला.

मिथिला नगरीची बाजू(हायवेची दुसरी बाजू) इथे रेट अजून ठिक आहेत.
सर्वात जास्त रेट कुणाल आयकॉन रोड आणि जवळ च्या भागात असतात.

सकाळमधे मागच्या आठवड्यापासुन औंध, बाणेर, बालेवाडी ची क्षेत्र निहाय विकासासाठी निवड झाल्याची बातमी आहे.

या विषयी मला जास्त माहिती हवी आहे. कोणी देऊ शकेल का?

अतरंगी,

मध्यंतरी बालेवाडी, बाणेर इ. साठी आमदार मेधा कुलकर्णी आणि लोकल नेता अमोल बालवडकर यांनी आंदोलन मोर्चा इ काढला होता. त्याचे पुढे काय झाले माहित नाही. विकासासाठी निवड झाल्याची बातमी तर आली आहे पण बरोबरच इतर काही नगरसेवकांनी बालेवाडीच का कोथरुड का नाही अशी कुरबुर सुरु केल्याचेही कानावर आले आहे.
सगळ्यात शॉकर म्हणजे बाबुराव चांदेरे हे लोकल नेते महानगर पालिकेत स्थायी समितीचे अध्यक्ष असुनसुद्धा त्यांनी ते राहतात तो विभाग सोडुन इतर भागांकडे ढुंकुनही लक्ष दिले नाही. (स्वतःच्या घराबाजुचा परिसर मस्त चकाचक करुन घेतला)
सो इन जनरल, घोषणा झालेली आहे पण प्रत्यक्षात काम किती होइल (होइल किंवा नाही हेही) स्पष्ट नाही.
आय होप की काहीतरी होइल.

धन्यवाद मनस्मि.

पण क्षेत्रनिहाय विकास करणार म्हणजे नक्की काय करणार आहेत. विकसाचा आराखडा आधीच आहे. तो बदलणार का? १००० एकर विभाग विकसित करणार म्हणे. पण सलग १० ०० एकर आहे कुठे ?

फार विषयांतर होत नाही ना ????

माहिती हवी आहे...

Megapolis - Hinjewadi बद्दल कु णाला काही माहिती आहे का? त्या एरियात कुणी घर घेतलंय का?

What information are you seeking? I had a 2bhk flat in smart homes, sold it last year.

मेगा पॉलीस ला एक दोन जणांची घरं आहेत.सध्या तिथे २बी एच के ५० लाखाचा अशी स्किम चालू आहे.सोसायटी जवळ पी एम टी स्टँड आहे.त्यांच्या शटल्स फेज १ पर्यंत जातात.
नोकरी फेज ३ मध्ये असल्यास आणि फारसा नातेवाईक गोतावळा पुणे कोअर इथे राहणारा नसल्यास/गाडी असल्यास घ्यायला हरकत नाही.हिंजवडी आता सध्या फक्त कंपन्या कंपन्या असली तरी येत्या ५ वर्षात तिथे चैनीची ठिकाणं वगैरे बरीच डेव्हलपमेंट अपेक्षित आहे.हिंजवडी स्थानिक लोकांनाही चांगली राहणी,चांगली दुकानं हवी आहेत.गेल्या ८ वर्षात तिथल्या दुकानांचा दर्जाही बराच सुधारलेला पाहिला.
कोलते पाटिल लाईफ रिपब्लिक पण बघून घ्या.

बावधनला पुराणिक अबिटांटे मधे १ बहक सदनिका घेण्याचे ठरले आहे.
कोणाला या स्किम बद्दल जास्त माहिती असल्यास सांगा.

नोकरी फेज ३ मध्ये असल्यास आणि फारसा नातेवाईक गोतावळा पुणे कोअर इथे राहणारा नसल्यास/गाडी असल्यास घ्यायला हरकत नाही>>>>>
परवाच चक्कर टाकुन आलो. गाडीशिवाय पर्याय नाही. तो एरीया चकाचक आहे पण हिंजवडी फेज १ पासुनही लांब आहे. चांगला एस्टॅब्लिश व्हायला किमान ३-५ वर्षे लागतील.

जुन्या कोथ्रुडापरेंत पानी बरे येते. बाकी सगळी बोम्ब आहे. लिहुण दिलेले अस्ते णा बिल्डरने आमी आमचे पान्याचे पाहु. पंपिण्ग करु. बोअर मारु .ट्यांकरच लाऊ तोही बाप्पू पठारेंचाच.तव्हा कुठे प्ल्यान पास हुतो. गिरायकं समद्या फ्याशिलिटी पगत्यात जिम है का, पव्हायचा पूल है का पण पान्याचं काय इच्यारीत नायीत. इच्यारलं तं उत्तर ठरल्यालं सोत्ताचं है आण कार्पोरेशनचं बी हय. कारपोरेशनच धा टक्के उरल्यालं ट्यांकर आन बोअर. न्हाय तं तुमी तुमच बिस्लेरीची क्यांडं मागवा. कारपोरेशनचं पानी बी डिशेंबरपरेन्त किंवा ट्यांकरवाले भाऊ ठरिवतील तितपातुर. त्यांकरवाले भाउ पैपलाईन टाकुणच देत नाहीत मुन्शीपाल्टीला. आन भाऊ म्युन्शिपाल्टीचच पानी सोत्ताच्या ट्यांकरनी इकितोय पुन्हा... भाऊनी भुसारी कॉलनीची तं टाकीच होउ दिली नाही धा वर्श. भौचं ट्यांकर म्हणजी अमृताचा कुम्भ. हाण सावळ्या गुळवणी.....

पाण्याचा प्रश्न पुण्यात भरपूर ठिकाणी आहे सध्या.
फेज ३ मध्ये भरपूर वर्षे नोकरी करणार हे पक्के असेल तर बिनदिक्कत घ्या मेगापोलीस ला फ्लॅट.

माझं टीसीएस चं ऑफिस मेगापोलीसला लागूनच आहे. मलासुद्धा घर बूक करायची इच्छा आहे, पण इथे असल्यामुळे जमेल असं वाटत नाही, शिवाय सगळी लूट/फसवणूक कशी टाळावी माहीत नाही. बघूया.

Pages