पुण्यात घर घ्यायचय?

Submitted by नानबा on 16 May, 2010 - 10:33

ह्या धाग्याच्या मूळ उद्देशात मी गृप बूकिंगसाठी लोक जमतात का हे पहायचं असं लिहिलं होतं..
पण काही प्रतिसादांमधे असे गृप ऑल्रेडी आहेत आणि त्यांना अनुभवही आहे असे प्रतिसाद आले - त्यांचं म्हणणं पटल्यानं आणि चर्चेचं मूळ स्वरूप हळूहळू बदलून "पुण्यातल्या चालू प्रोजेक्ट्सची/लोकेशन्सची माहिती/घर विकत घेताना लक्षात घ्यायच्या गोष्टी" - असं झाल्यानं माझं हे मुळच पोस्ट मी बदलतेय.
--- पुण्यात घर विकत घेऊ इच्छिणार्‍यांना शक्य ती माहिती मिळावी - म्हणून हा बाफ!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाणेर तेही डोंगरास लागून. सेलेबल एरिया ( ही एक नवी शिवी आहे या क्षेत्रात ) १०४८ , त्याचा कार्पेट ६८० किंमत ८०.

महेशराव तुम्हाला रहायला घ्यायचे आहे का गुंतवणुक म्हणुन?

सिंहगड रोडवर राजाराम पुलाच्या पलीकडे कृपया जाऊ नका. रोज संध्याकाळचे ट्रॅफिक बघुनच घाबरेघुबरे होते आहे.

सिंहगड रोडवर राजाराम पुलाच्या पलीकडे कृपया जाऊ नका. रोज संध्याकाळचे ट्रॅफिक बघुनच घाबरेघुबरे होते आहे.>>> हे सकाळसाठी गणेशमळ्याला लागु होते. आनंदनगर ते गणेशमळा सकाळी आणि विठ्ठलवाडी ते आनंदनगर संध्याकाळी - किती वेळ लागेल ते सांगता येत नाही.

हम्म्म.
एकेकाळी मी बसने अलकापर्यंत २० मिनीटात येत होते हे मलाच खरे वाटत नाही.
असो. विषयांतर पुरे झाले.
बाकीचे रडगाणे सिंहगड रोडचा बाफ वर काढुन गाऊया Proud

महेश,

डेक्कन/ स्वारगेट पासुन किती किमी चा परिघ कोअर म्हणून ठरवला आहे ?

सदाशिव, शनिवार, भुसारी, महात्मा मधे एखादा रिसेल चा मिळू शकेल. संयम ठेवावा लागेल.
पैसे तयार असतील किंवा एखाद्या बँकेकडून लोन प्रीअ‍ॅप्रुव् ड असेल तर निगोसिएशन मधे फायदा मिळू शकेल.

गुरुवार, शनि वार, रविवारी सकाळच्या छोट्या जाहिरातीत रिसेलचे खूप ऑप्शन्स असतात . अर्थात नवे आणि रिसेलमध्ये ५०० रु चौ फू च्या पलिकडे फरक नसतो आताशा.

घर घेताना आधी त्या एरियाची शासनाची ठरवलेली आधारभुत किंमत किंमत विचारून बघा.
कुठे बिल्डरची जास्त असते तर कुठे शासनाची किंमत जास्त असते. यावरून रजिस्ट्रेशनची किंमत ठरवली जाते.
तसेच बिल्डअप एरिआ मधे कटींग किती % आहे हे आधीच आवर्जुन विचारून घ्या. २००८-१० आधी बिल्डअप एरिआ मधून २०% वजा केले तर कारपेट एरिआ मिळत असे परंतू जेव्हा पासून सुपरबिल्डअप ही सिस्टीम बंद केली आणि पार्किंग एरिआ विकण्यावर शासनाचे निर्बंध आले त्यानंतर बिल्डअप एरिआ २०% वरून ३०/ ४०/ ४५ असा % मधे वाढीव धरून सांगितला जातो. ७५० स्वे. चा बिल्डअप एरिआ सांगितला आणि कटींग ३५ % धरली तर कारपेट एरिआ ४९० च्या आसपासच मिळतो. सगळी मोकळी घरे मोठीच वाटतात Happy एकदा वस्तु भरल्यावर कळते किती कारपेट एरिआ मिळाला आहे..

महेश, मी राहतोय त्या सोसायटीत (झिग्रेट) काही मोजकेच रेडी पझेशन फ्लॅट शिल्लक आहेत.... हायवे टच आहे.... नवले पुलाजवळ.... तुमच्या बजेटमध्ये नक्की मिळेल
शिवाय त्यांच्या अजुन दोन नवीन फेज होतायत

कुठे बिल्डरची जास्त असते तर कुठे शासनाची किंमत जास्त असते. यावरून रजिस्ट्रेशनची किंमत ठरवली जाते? ???

ऐकिव माहिती प्रमाणे, शासनाने ठरवून दिलेल्या दरा पेक्षा कमी दरामधे मालमत्ता विकता येत नाही.

आणि सोसायटी चार्जेस या नावाखाली दिड ते तीन लाखा पर्यंत उकळले जाते. ही एक नविन टूम निघाली आहे. ती रक्कम देखील लक्षात घ्यावी

इथे चर्चा सुरूच आहे म्हणून माझा प्रश्न विचारते. माझ्या बाबांना आमच गावाकडच घर विकायचं आहे,घरावर कोणत्याही प्रकारच कर्ज नाही . तर कुठली कागदपत्र ह्या प्रक्रियेत लागतील ह्याची माहिती कृपया सांगा ?

ऐकिव माहिती प्रमाणे, शासनाने ठरवून दिलेल्या दरा पेक्षा कमी दरामधे मालमत्ता विकता येत नाही.
>>

हे तुम्ही कुठे ऐकले. ? ::अओ:
तुम्ही मालमत्ता कोणत्याही दराने विकू शकता , अगदी फुकट देखील देऊ शकता. मात्र स्टॅम्प ड्युटी , सरकारी दराने जे वॅल्युअशन येते त्याच्या स्लॅबने भरावी लागते . एवढेच. हे व्हॅल्युअशन मार्केट रेटप्रमाणे बदलते, एरियाप्रमाणे बदलते इतकेच नव्हे तर एकाच एरियात रोड फ्रंटेज, आतील बाजू या प्रमाणेही बदलते. त्या त्या एरियातले वॅल्युअशन दरवर्षी जाहीर केलेले असते . ते पहायलाही मिळते. बहुधा ते नेटवरही असावे.

दिविजा, त्या घराची मालकी सिद्ध करणारे हकाचे पत्रक म्हणजे ७/१२ चा उतारा अथवा ग्रामपंचायतेच्या/ नगरपालिकेचा प्रॉपर्टी रजिस्टरचा उतारा. या पलिकडे काही लागत नाही.

नविन घराला सर्व्हिस टॅक्स लागतो तो वगळता, स्टॅंप ड्युटीचे रेट नविन घराला आणि रिसेलला सारखेच असतात का?

बरोबर रॉबीनहूड.
तुम्ही बाजारमूल्य दराबद्दल बोलत आहात. त्या विषयी कल्पना आहे.
नोंदणी व मुद्रांक विभागाच्या वेबसाईट वर ते दर आहेत.

मागच्या वेळेस एक प्रॉपर्टी घेताना वकिला ने सांगीतले. तेच वाक्य डोक्यात बसले होते.

मी इथे नवीन आहे.
सध्या १ बहकच्या शोधात आहे. माझी क्षमता अंदाजे ४० लक्ष.
मला राहण्यासाठी नको आहे. माझी अपेक्षा की घराचा ताबा २.५ - ३ वर्षानी मिळावा जेणे करुन कर्ज कमीत कमी घ्यावे लागेल.
परांजपे अभिनव परीसर, पुराणिक अबिटांटे किंवा लिजर टाउन(हडपसर) ही ठिकाणे विचारात घेतली आहेत.
कोणाला ह्यांबद्दल अधिक माहिती आहे का? कोणी काहि नवीन schemes सुचवु शकता का?

दुकानांच्या किमती काय आहेत सध्या? कोणांस काही माहिती आहे काय? चांगल्या एजंटाबद्द्ल माहीती असल्यासही देणेचे करावे कृपया....

ही पहा लूट..
एरिया: बाणेर पॅन कार्ड क्लबच्या पुढे डोंगरात. अजून पक्का रस्ता नाही. बांधकाम पूर्ण.
दर : ६२५० रु/ चौ फू.
फ्लॅट एरिया:१०४८ ( सेलेबल)
प्र्त्यक्ष कार्पेट : ६५०-६८० चौ फू.
फ्लॅट कॉस्ट : ७३,७०००० रु.
अधिकः
४४२२०० स्टॅम्प ड्युटी
३६००० रजिस्ट्रेशन
एकूण ७८,४८,०००.
पार्किंग कव्हर्ड प्रथम येईल त्याला.
जिम, कम्युनिटी हॉल ब्लाह ब्लाह ब्लाह ....

माहिती: हे घ्या ब्राऊचर आणि वाचा आणि माहिती करून घ्या. नो चर्चा.

Pages