Submitted by HH on 28 April, 2010 - 16:24
मायबोलीवरील विषयवार यादी मधे कविता विषयावर केलेले हे (रिकामटेकडे) संशोधन
कविता या विभागाखाली आज २८-०४-२०१० दिवशी पर्यंत पोस्ट झालेल्या कविता : ४०००
यात सर्वात जास्त संख्येने कविता लिहीणारे टॉप ५ कवी खालील प्रमाणे आहेत.
Harish_dangat- २०७ कविता
अज्ञात - १९६ कविता
कौतुक शिरोड्कर -१८३ कविता
विशाल कुलकर्णी - १३७ कविता
बासुरी - ९९ कविता
यात आणखी एक नमूद करण्या सारखी गोष्ट ही की जवळ जवळ सर्व कवींना मायबोली वर सदस्यत्व घेऊन साधारणपणे सरासरी १ वर्ष ३० आठवडे ईतका काळ झाला आहे. (अपवाद कौतुक शिरोडकर यांचा त्यांचा सदस्यत्व कालावधी २ वर्ष + आहे.)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लिंबुभौ.. _/\_
लिंबुभौ.. _/\_
मग बक्षिस किती मिळाले त्यांना
मग बक्षिस किती मिळाले त्यांना ..!
आयला, काय धुरळा उडालाय
आयला, काय धुरळा उडालाय इथे!
हे स्टॅटीस्टीक मजेने घेउन सोडून द्यायचे आहे.पण तसे झाले नाही काहींना त्यामुळे 'कशी जिरवली' टाईप्स आनंद झाला हेही खरेच.
टण्याची ओरिजिनल पोस्ट पटली.माबोवरच एकदा 'केशवसुतांचे नविन कवींना पत्र' प्रकाशित झाले होते.गरजूंनी ते जरुर वाचावे.
पण हा प्रश्न केवळ कवितांच्या बाबतीतच आहे असे नाही सध्या माबोवर प्रवासवर्णनांचा सुकाळ आहे,तो उन्हाळा/सुट्ट्या संपेपर्यंत कायम राहील.त्यातही हाच प्रकार दिसतो.मला तर काही वेळा लोक माबोवर लेख टाकता यावा म्हणून फिरायला जातात असा संशय आहे!
तोच प्रकार ललित लेखांच्या बाबतीत आहे,आला अनुभव की लिही लेख असा दंगा चालला आहे.तो अनुभव जरा पचवून,जिरवून काढा की जरा आणि मग पहा कसा फरक पडतो ते.
लिहू द्या हो लोकाना . मायबोली
लिहू द्या हो लोकाना . मायबोली ही लिखाणाची प्रयोगशाळा आहे.बर्याचदा आपल्याला सलग , दुसर्याला आकलन होईल असे लिहिता येते की नाही ते कळत नाही. लिहायला व्यासपीठेही राहिली नाहीत. जसे रंगमंचावरची पहिली एन्ट्री, पहिले भाषण, पहिले गाणे ,पहिले लेखन हे दुसर्यांच्या दृष्टीने बाळबोध अनुभव असला तरी त्या व्यक्तीच्या जीवनाला वळण देणारी , आत्मविश्वास वाढविणारी घटना असू शकते. इथले पहिले लिखाण अगदी' दभिं' च्याच चष्म्यातून पाहिले पाहिजे असे काही नाही. पुलंच्या काळात मायबोली असती अन त्यानी मायबोलीपासून लिखाणाला सुरुवात केली असती तर ते लेखक म्हणून केव्हाच खल्लास केले असते इथल्या लोकानी. (अर्थात त्यानी एखादा बायकी गट जॉईन केला असता तर गोष्ट वेगळी.). जे पुण्यात चालते ते जगात स्वीकारले जाते असे (फक्त पुण्यातच)म्हणतात तसे जे पार्ल्यात चालते तेच मायबोलीवर टिकवले जाते असे म्हणायला हरकत नाही. त्यामुळे दोन समीक्षका आधीच असताना तू कशाला रे आगावा आणखी?
*
*
पुन्हा तेच! मायबोली हे काही
पुन्हा तेच! मायबोली हे काही साहित्याचे व्यासपीठ नाही. ते अनुभवांचे, सामजिकीकरणाचे व्यासपीठ आहे.
त्यामुळे केवळ प्रवास वर्णन लिहिण्यासाठी लोक जात असतील फिरायला तर त्यात गैर काय? आलेले अनुभव लिहिल्याने काय वाईट होते. ? पाचकळ खाण्याच्या गप्पा, सिनेमांचे आणि फॅशनांचे , आणि फडतूस नट नट्यांचे गॉसिप्स पेक्षा केव्हाही अर्धे कच्चे अनुभव चांगले....
>>च्यामारी, त्या नन्दिनीच्या
>>च्यामारी, त्या नन्दिनीच्या गोष्टीत मार खाणारी सून स्त्री, मारणारी सासूही स्त्रीच, अन सासुला दम भरणारी सुनेची आई देखिल स्त्रीच, आता या तिन स्त्रीयान्च्या कर्मकहाणीस स्त्री विरुद्ध पुरुष हे वळण कसे लागले हे काय सान्गता येत नाहीये का?
लिंबूकाका, तुम्हाला साष्टांग दंडवत __/\__
लिम्ब्या लेका, ते वळण लावायचे
लिम्ब्या लेका, ते वळण लावायचे आधीच ठरलेले असते . हात लेका , इतके दिवस मायबोलीवर फुका टोणग्यासारख्या पखाली वाहिल्यास तू ...
. पालथा घडा तो पालथा घडाच अखेर !!!
>>>च्यामारी, त्या नन्दिनीच्या
>>>च्यामारी, त्या नन्दिनीच्या गोष्टीत मार खाणारी सून स्त्री, मारणारी सासूही स्त्रीच, अन सासुला दम भरणारी सुनेची आई देखिल स्त्रीच, आता या तिन स्त्रीयान्च्या कर्मकहाणीस स्त्री विरुद्ध पुरुष हे वळण कसे लागले हे काय सान्गता येत नाहीये का?


लिंब्या, मा.बो. च्या इतीहासातील ही तुझी मुद्देसूद पोस्ट!
बासुरी १०० वी कविता करुन
बासुरी १०० वी कविता करुन टाका. म्हणजे वेळ देऊन सुंदर कविता लिहा.
ते अनुभवांचे, सामजिकीकरणाचे
ते अनुभवांचे, सामजिकीकरणाचे व्यासपीठ आहे.>> म्हणजे काय हो भाऊ?
त्यामुळे केवळ प्रवास वर्णन लिहिण्यासाठी लोक जात असतील फिरायला तर त्यात गैर काय? आलेले अनुभव लिहिल्याने काय वाईट होते. ?>>> लिहील्याने वाईट काहीच होत नाही तर वाईट लिहील्यावर येणार्या प्रतिक्रिया चांगल्या पद्ध्तीने स्वीकारता न आल्याने वाईट होते.
कुणाला काहीही लिहायला बंदी आहेच कुठे? पण मग त्या लिखाणावरच्या रिस्पॉन्सलाही बंदी नसावी.
आणि मीच काय पण माबोवरचा प्रत्येकजण हा क्षणकाळचा वाचक व अनंतकाळचा समिक्षक आहे.:-)
http://www.maayboli.com/node/1070
कंसिस्टंसी... तेच वाद घालुन
कंसिस्टंसी...
तेच वाद घालुन लोक थकत कसे नाहीत?
हह.. कुजबुज चालेना म्हणुन खुसपुस बरी नाही हां...:)
मेला.. शोधायला काय गेलो आणि
मेला.. शोधायला काय गेलो आणि सापडल काय...
मी काय म्हणतो, कुठेतरी "आज काय वाटल" असा एक बाफ काढाना... आज माबोवर चक्कर मारली, तर सध्या हळवेपणाच नविन फॅड आहे.. लिखाण हळव प्रतिक्रिया हळव्या अस काही तरी. असा एक बाफ काढावा तर जागा सापडत नाही आणि हहला बरे मोकळे रान मिळते? निषेध!!!
Pages