मायबोली Statistics

Submitted by HH on 28 April, 2010 - 16:24

मायबोलीवरील विषयवार यादी मधे कविता विषयावर केलेले हे (रिकामटेकडे) संशोधन

कविता या विभागाखाली आज २८-०४-२०१० दिवशी पर्यंत पोस्ट झालेल्या कविता : ४०००

यात सर्वात जास्त संख्येने कविता लिहीणारे टॉप ५ कवी खालील प्रमाणे आहेत.

Harish_dangat- २०७ कविता
अज्ञात - १९६ कविता
कौतुक शिरोड्कर -१८३ कविता
विशाल कुलकर्णी - १३७ कविता
बासुरी - ९९ कविता

यात आणखी एक नमूद करण्या सारखी गोष्ट ही की जवळ जवळ सर्व कवींना मायबोली वर सदस्यत्व घेऊन साधारणपणे सरासरी १ वर्ष ३० आठवडे ईतका काळ झाला आहे. (अपवाद कौतुक शिरोडकर यांचा त्यांचा सदस्यत्व कालावधी २ वर्ष + आहे.)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हहने स्टॅट्स तर दिलेत फक्त.
>> जेव्हा लोक 'छान शालजोडीतले मारलेत' असं वगैरे म्हणाले तेव्हा नाही आला हा मुद्दा! त्यांनाही सांगायचं ना हे फक्त स्टॅट्स आहेत! Happy

असो, मला जे वाटलं ते मी आधीच मांडलं आहे, असं मला वाटतं.. त्यामुळे आता आवरतं घेते!

त्याचं असं आहे, हे कवी जर वय अगदी लहान वगैरे असते तर मग त्यांच्यावर हसणारे लोकं खरच अन्याय करतायत असं म्हणता आले असते. त्यांच्या बुद्धीची वाढ अजुन व्हायची आहे त्यामुळे परखड काही न लिहीता पुलेशु तरी लिहीलं असतं. इथे तो प्रश्न नाहीये. इथे पुलेशु लिहीलं तर हे त्यांच्या पोतडीतुन मण भर फुटाणे सांडावेत असे कविता/लेख सांडतील. कोणी सांगितलेत नसते लफडे!

नानबा टेक इट इझी Happy Light 1
स्टॅट्स मध्ये मला पण काही कुजकापणा दिसला नाही , उलट मी तर हह चे आभार मानेन ,तिने आपला बहुमुल्य वेळ दवडुन येवढी माहीती गोळा केली , नाहीतर कोणाला कळलंही नसतं की किती कविता पोस्ट झाल्यात.

१. खूप कविता दिसल्याने कुणाला त्रास होत नाही
२. माबो ही कुणाची खाजगी मालमत्ता नाही तेव्हा दुसर्‍याला तू एव्हडे लिहू नकोस असे सांगणे चूक
३. माबोवर प्रत्येकाला कितीही लिखाण करण्याचे स्वातंत्र आहे

आता वरच्या तीन गोष्टी झाल्या 'हक्क' (Rights). हक्काबरोबर दुर्दैवाने जबाबदारी येते. जबाबदारीचे पालन हे स्वतःवर असते (voluntary). तर ह्या हक्कांना जोडून असलेल्या जबाबदार्‍या कुठल्या वाटतातः
खुले व्यासपीठ असल्याने आपल्या सर्वोत्तम कलाकृती इथे सादर केल्या जाव्यात ज्यायोगे गुलमोहर हे एक दर्जेदार कलाकृतींचे एकत्रीकरण ठरेल.
खुले व्यासपीठ असल्याने वाचकांना उत्तम कलाकृती चटकन उपलब्ध व्हाव्यात.

आता खूप कविता आणि त्यातल्या बर्‍याच दुय्यम आल्याने काय झाले आहे की बरेच वाचक गुलमोहर कविताविभागापासून दूर गेले. त्याने काय झाले? तर चांगल्या कलाकृती वाचकांच्या नजरेस पडल्या नाहीत. लिहिणार्‍यांना चांगल्या टिकाकारांकडून प्रतिक्रिया आल्या नाहीत. नुकसान, लिहिणार्‍यांचे आणि वाचणार्‍यांचे, असे दोघांचेही झाले.

आता चांगली कलाकृती कुठली हे कलाकारास आतून नक्की कळते. आरती प्रभूसारख्या अतिशय वरच्या दर्जाच्या कवीने एकूण ३ कवितासंग्रह प्रकाशित केले. सर्व मिळून त्या तिन्ही कवितासंग्रहात २५०च्या वर कविता नसाव्यात (प्रत्येकी ७० कविता दर संग्रहात सरासरी आहेत बहुदा). विंदांनी ५ कवितासंग्रह प्रकाशित केले. आता ह्या कविंनी आयुष्यात एव्हड्याच कविता लिहिल्या असतील का? बहुतेक नाही. खूप लिहिल्या असतील. पण सगळ्या छापल्या नाहीत. असेच एक उत्तम उदाहरण म्हणजे जी.ए.कुलकर्णी गेल्यावर त्यांचे अप्रकाशित साहित्य सोनपावले नामक संग्रहात सामाविष्ट केले गेले. हे पुस्तक वाचल्यावर जीएंनी ते साहित्य का प्रकाशित केले नसेल हे कळते.

प्रत्येक कलाकाराची प्रत्येक कलाकृती दर्जेदार नसते आणि अनेक निकृष्ट कलाकृतींमधून तयार होत होत एक उत्कृष्ट कलाकृती निर्माण होते (प्रचंड गिफ्टेड अपवाद सोडून देउ). ती उत्कृष्ट कलाकृती लोकांपर्यंत पोचवण्यात जी मजा आहे तीच मजा दुय्यम-निकृष्ट कलाकृती लोकांपर्यंत पोचवण्यात आहे का? हा प्रश्न प्रत्येक कलाकाराने स्वतःला विचारावा व उत्तर शोधावे.

दुसर्‍या कुणाचा अनुभव मी इथे मांडूच शकत नसल्याने स्वतःचाच अनुभव लिहून ही लांबलचक पोस्ट संपवतो (ही रिक्षा नाही Happy मला आतून वाटले म्हणुन लिहितोय.). मी माबोवर जे काही तुरळक लिहिले आहे ते मी मला स्वत:ला ते वाचल्यावर समाधान वाटल्यावरच मग पोस्टले. मग न पोस्टलेले बरेच इकडे-तिकडे चिठोर्‍यांवर, डोक्यात पडलेले असते. पण 'अरे आता एक शब्दपण बदलता येणार नाही, इथे 'मात्र' नको, त्या जागी 'पण' किंवा 'देखील' बरा वाटतोय, एखाद्या विशेषणाच्या जागी दुसरे एखादे अधिक योग्य विशेषण 'घावणे', वाक्याची बदललेली रचना असं दुसर्‍या-तिसर्‍या-सहाव्या खर्ड्यात कुठेतरी 'जमून येणं', this is what I can achieve, I am drained' ह्यासारख्या भावना आतून एखादी कथा (वा इतर काही) लिहून झाल्यावर जेव्हा येतात तेव्हा पोस्टण्यात खरी मजा वाटते. 'आता जमलं हं' असं न वाटतासुद्धा पोस्टलेली मग एखादी कथा मला जाचत राहते. भले मी ती पोस्टली तेव्हा मला त्यात अजून काहीच बदलता येईना, पण म्हणुन ती कम-अस्सल झाली आहे अशी बारीक कुठेतरी टोचणी राहतेच. आणि ती तशीच पोस्टून मी चूक केलेली आहे. अश्याच एका कथेत मला पोस्ट केल्यावर सिगरेटचा 'पफ' च्या ऐवजी सिगरेटचा 'झुरका' हा शब्द चपखल बसला असता ही बोच आजही जाणवते. असो.

आता चांगली कलाकृती कुठली हे कलाकारास आतून नक्की कळते. >>>>>> इथेच लफडं आहे टण्या. बरं आतुन नाही कळलं तर बाहेरुन लोकं सांगतायत तर त्यांचं ही ऐकत नाही. आता बोल?

सॉरी, या अमुल्य संशोधनाकडे दुर्लक्ष झाल त्याबद्दल. एचएच, तुमच्या या मेहनतीमुळे निदान प्रजननदर तरी कळला. बाकी मान्यवरांच्या अमुल्य प्रतिक्रिया फार वाचनीय आहेत. जो घ्यायला हवा तो बोध नक्कीच घेतलाय. धन्यवाद !

.

नानबाशी १००% सहमत.
जे हा दावा करताहेत की आम्ही स्वतःला वाचून समाधान झाल्यावरच पोस्टलं, तासतास टाइप करून अप्रकाशीत ठेवलं वगैरे, त्यांनी बाकी लेखक/कवि हे करत नाहीत असा (गैर)समज का करून घेतला? तसेच असे लिखाण मायबोलीवर उच्च अभिरुचिचे आहे, पण समग्र मराठी साहित्यात उच्च दर्जाचे आहे असा तुमचा दावा आहे का? ("तुमचा" हे संबोधन इथे ज्यांना हे stats शालजोडीतले वाटतात आणि विशिष्ट लेखकच मायबोलीवर लिहिण्यायोग्य वाटतात त्यांच्यासाठी)
हे stats शुद्ध हेतुने दिले असतील तर अर्थहीन आहेत, नसतील तर कुजकेच आहेत.

सिंड्रेला यांनी स्वतःची पोस्ट एडिट केली, ज्यात तासतास टाइप करुन न पटल्याने अप्रकाशीत ठेवल्याचा उल्लेख होता, त्याचा उल्लेख मी वर केलाय. टण्या ते तुमच्यासाठी नाही, गैरसमज नसावा.

विशिष्ट लेखकच मायबोलीवर लिहिण्यायोग्य वाटतात >>>> असं कोणीही बोललेलं नाहीये. वर ज्यांची नावं आहेत त्यांचे साहित्य वेळोवेळी नावाजले गेले आहे, ते इथे नवीन असताना सुद्धा. उगीचच नसते निष्कर्ष काढू नका.

वंदना पार्ट्ली पटली हं तुमची पोस्टं. तुम्ही कित्येक कागदांचे बोळे करुन फेकले तरी त्यानंतर फायनल केलेलं लेखन खुप चांगले आहे किंवा वाचनीय आहे असं काही नाही. शेवटी लेखन कसं आहे हे त्याच्यावर दिलेल्या चांगल्या प्रतिक्रियांनी ठरतं (एखाध्या ठराविक गृपनी दिलेल्या प्रतिक्रियांनी आजिबात नाही).
स्टॅट्सचं म्हणाल तर त्यात शालजोडीतलं काहीच नाही.

क्वालिटी कितीही सर्वोत्तम असली तरी क्वांटीटी महत्वाचीच.त्यामुळे कोणी मला श्रीखंड आवडतं म्हणून रोज तेच वाढलं तर मी अन्नत्यागच करीन.
त्यामुळे नानबा, वंदना पॉईंट समजून घ्या. कोणीही विरोधासाठी विरोध करत नाही इथे मायबोलीवर.

टण्या, सिंडी मस्त रे.

लेखनाच्या दर्जा बाबतीत , जो पर्यंत तुम्ही स्वतःला फसवणं थांबवत नाहीत तोपर्यंत दर्जेदार लिहूच शकत नाहीत. लिखाणाच्या दर्जाबाबत असे काही पूर्णांक-अपूर्णांकात तुलनात्मक गुण देणे शक्य नसले तरी आपले गुण प्रत्येकाला माहितच असतात.

आणखी एक लिहावेसे वाटते, इथल्या बहुतेक सगळ्याच कथा, कविता ह्या केवळ मानवी स्वभावाच्या संवेदनशीलतेला हाक, धक्का तंत्र, विपर्यास, रोजच्या दिवसातले अनुभव ह्याच खांबाच्या अवतीभवती फिरत असतात. मग सकाळ मधलं मुक्तपीठ आणि मायबोली वाचण्यात फार काही फरक वाटत नाही. कापूस थोडा सरकी जास्ती असा काहीसा प्रकार.

पुन्हा तेच शब्द, तीच वाक्यरचना तेच हे आणि तेच ते असेच आपण सातत्याने लिहित असू तर परिक्षेत लिहिलेल्या उत्तरपत्रिकेत आणि इथल्या कथा, कवितांमध्ये काय फरक राहणार? गठ्ठा येणार आणि गठ्ठा जाणार. कंटाळा येत नाही का लिहितांनाही?

विषय फक्त कवितांचाच आहे खरा पण तरी मुद्दा कथांनाही लागू होतोच.

जे हा दावा करताहेत की आम्ही स्वतःला वाचून समाधान झाल्यावरच पोस्टलं, तासतास टाइप करून अप्रकाशीत ठेवलं वगैरे, त्यांनी बाकी लेखक/कवि हे करत नाहीत असा (गैर)समज का करून घेतला? तसेच असे लिखाण मायबोलीवर उच्च अभिरुचिचे आहे, पण समग्र मराठी साहित्यात उच्च दर्जाचे आहे असा तुमचा दावा आहे का? ("तुमचा" हे संबोधन इथे ज्यांना हे stats शालजोडीतले वाटतात आणि विशिष्ट लेखकच मायबोलीवर लिहिण्यायोग्य वाटतात त्यांच्यासाठी) >>>>> वंदना, तसं असेल तर तुम्ही नंतर माझ्या नावाने मुद्दाम पोस्ट टाकली आहे त्याला काही अर्थच नाही (त्यात खास हे टण्यासाठी नाही असेही नमूद केलेय). हे स्टॅट्स शालजोडीतले आहेत असे मी कुठेही म्हंटले नाही आणि काही ठरावीक लेखकच मायबोलीवर लिहिण्यायोग्य आहेत असेही मी कुठे म्हंटले नाही. स्वतःचे समाधान झाल्याखेरीज छापायचे नाही हा मुद्दा टण्याने आधी मांडला आणि तुम्ही त्यालाच ह्यातुन वगळता हे हास्यास्पद आहे.

खरं तर काही विशिष्ठ लेखक माझे आवडते आहेत आणि त्यांची पुस्तकं निघावीत इतक्या उच्च प्रतीचं/योग्यतेचं ते लिहितात. पण इथे तो मुद्दाच नाही.

असो, हेमाशेपो.

सिंडरेला - तुम्ही पोस्ट काढ्लीत ना, म्हणून तो उल्लेख कुठून आला याचं स्पष्टीकरण होत ते.
स्वतःचे समाधान झाल्याखेरीज छापायचे नाही हा मुद्दा टण्याने आधी मांडला आणि तुम्ही त्यालाच ह्यातुन वगळता हे हास्यास्पद आहे>> त्याला ह्यातून नव्हे, "अप्रकाशीत ठेवले" या उल्लेखातून वगळले. तस लिहिलय की स्पष्ट.

<टिपी मोड ऑन>
नंतर येऊन सिंड्रेलाला बोलण्यापेक्षा आधीच विचारायचे ना, " सिंड्रेला, तू स्वतःला काय समजतेस?" Proud
<टिपी मोड ऑफ>

चमन, नानबा, वंदना, टण्या- मस्त पोस्ट. पटो न पटो, पोस्ट आवडल्या.
चमन- तुझ्या त्या यादित स्मृतीरंजनाचे कढही घाल बाबा.
आणि स्टॅटिस्टिक्स कसले ?, मी सरळ स्पुफ म्हणुन वाचले आणि हसले. बाकी काही नाही. केवळ कवींवरच स्पुफ नाही तर सर्व्हे रिपोर्टवरही.

हे इथे होणार, हे माहितीच होते. फक्त 'कधी' एवढाच प्रश्न होता.

अज्ञात आणि कौतुक यांच्या स्वागतार्ह प्रतिक्रिया सुखद आहेत. (कौतुक, तुझ्या सुंदर लेखनावर माबोकरांनी दिलेल्या प्रतिक्रिया दुर्लक्षित करता येणार नाहीत, ही गोष्ट लक्षात घे कृपया, लोकांना नेहेमीच कुत्रे चावलेले नसते. संयत वेगाने पोस्ट केलेले लिखाण कौतुकास पात्र ठरते, हे निराळे सांगायची गरज नाही).

या दोन-दोनशे कवितांतल्या सार्‍याच कविता अत्यंत वाईट आहे, असे म्हणणे नक्कीच धाडसाचे ठरेल. पण एकाच नवीन लेखनाच्या पानावर नेहेमी त्याच त्याच कवीच्या पुन्हा पुन्हा, कधी तर एकाखाली एक अशा अनेक कविता दिसल्यावर वाचकांनी काय करावे? मतदानाच्यावेळी चीड मनात ठेऊन कुणाला तरी मतदान करावे, तशा प्रतिक्रिया द्याव्यात, अशी अपेक्षा आहे काय?

कविता पोस्ट करण्यास जसा प्रशासनाने निर्बंध लादलेले नाहीत त्याच प्रकारे त्या कवितांवर प्रतिक्रिया देण्यावर आणि त्यांचा सांख्यिकी अभ्यास करण्यावरही नाही- हे वैद्यबुवांचे म्हणणे जसे पटते त्याच प्रमाणे 'या कवींनी आता आहे त्याच्या बर्‍याच कमी प्रमाणात आपल्या कविता पोस्ट केल्या असत्या तर आता घेतले आहे, त्याच्या कित्येक पटीने वाचकांनी त्यांना गांभीर्याने घेतले असते' हे अरभाट ने लिहिलेलेही पटते.

या पार्श्वभुमीवर काहींनी या प्रकरणाला दिलेला फालतू 'मेलोड्रामाटिक टर्न' अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांचा मुद्दा खूप विचार करूनही समजावून घेता येत नाही. त्यांनी तो सबळ कारणे देऊन सर्वांना समजावून सांगितला, तर फार बरे होईल. Happy

टण्याचा मुद्दा काही लोकांच्या बाबतीत बरोबर आहे, कारण एक चांगला वाचक, लिखान करताना नक्कीच त्याचे लिखान तपासून पाहतो. पण जर साहित्यीक जाणीवांच तेवढ्या नसतील तर आपले कुठलेही लिखान कितिदाही वाचले तरी चांगलेच वाटणार ! स्वतःच स्वःतच्या लेखांना / कवितेला परखडपणे पाहणारे खूप कमी असतात. (जीए किंवा आरती प्रभू सारखे).
नवोदित लेखकांकडून ती अपेक्षा कशी बाळगणार? त्यासर्वांसाठी हे परिक्षण वाचकांकडून केले जाते / होऊ शकते. आणि म्हणूनच जेंव्हा लैच टुकार टाईप लेखन समोर ठेवले जाते तेंव्हा पट्टीचे वाचक त्याकडे दुर्लक्ष करतात. येणार्‍या प्रतिक्रियांवरुन लेखकाला ते कुठेनकुठे कळत असतेच ! तरी हा रतिब का? तर त्याकडे पाहने किंवा दुर्लक्ष करने हे नक्कीच वाचकांच्या हाती आहे. जो पर्यंत मायबोली अ‍ॅडमिन अश्या लेखकांना, "अहो आता बास" असे म्हणत नाही तो पर्यंत कुठल्याही वाचकाने तुम्ही फार कविता टाकू नका असे म्हणने चुकच ! जे इथे मागेही झालेले आहे.

स्टॅट काढन्यात काहीच चूक नाही ! हहने कुठलेही निष्कर्ष दिलेले नाहीत !

पण आलेल्या प्रतिक्रियांवरुन (स्टॅटच्या वैयक्तीक निष्कर्षांहून ) मात्र टवाळी झाल्यामुळे कविंना काय वाटेल ह्याचा विचार नानबा करत आहे आणि तो सर्वांनीच थोडाफार करावा. कारण आयडी पाठीमागे एक व्यक्ती असतेच. तिला वाईट वाटू शकते. शिवाय तुम्ही माझ्या कविता वाचाच हे आमत्रंन प्रत्येक वेळी कोणी दिलेले नाही.

रिक्षा प्रकरण इथे नको!

त्याच त्या चर्चा. नेहमीच्या.

मी वरती लिहीले आहे तसे रिकाम्या वेळेत केलेला हा उपदव्याप आहे. आकडे ईन्टरेस्टींग वाटले म्हणून पोस्ट केले. त्यातून ज्याला जसा अर्थ घ्यायचा तसा त्यांनी घ्यावा. मी फक्त आकडेवारी दिली आहे. कुठलीही टिप्पणी वर केलेली नाही आणि इथे करणारही नाही.
धन्यवाद.

शेवटी आली का गाडी मूळपदावर... Happy

जेव्हा जेव्हा (यदा यदा ही कवितस्य... ग्लानिर्भवती मायबोली) हा संख्या वि.दर्जा वि.जबाबदारी वि. लेखनस्वातंत्र्य वि. प्रतिक्रीयास्वातंत्र्य वाद बळावला तेव्हा अ‍ॅडमिनन नी प्रत्त्येक वेळी "ईथे फक्त मराठी लिहायला प्रोत्साहन देणे हा हेतू आहे" हे ठळक अक्षरात लिहीले आहे. मग ऊगाच वाद कशाला?

ह. ह. चे हे रिकामटेकडेपणाचे धंदे आहेत (याला शुध्ध मराठीत काड्या घालणे असेही म्हणतात) त्याला (माझ्यासारखी) बरीच रिकामटेकडी लोकं प्रतिसाद देत आहेत, ईतकच! Happy

ऊद्या एखाद्याने ह. ह. सारख्या जु.जा. सदस्याचे ईथले साहित्त्यीक योगदान (लिखाण. प्रतिक्रीया नव्हेत.. ) किती याची आकडेवारी दिली तर त्याकडेही ती निव्वळ स्टॅट्स म्हणूनच बघेल (होय ना?) Happy

योग.. पण आता परिस्थिती केवळ मराठी लिहायला प्रोत्साहन देण्याच्या गरजेची उरलीच नाहीये. (असे माझे मत आहे. अ‍ॅडमिनना काय वाटते मला माहीत नाही...) आता जिकडे तिकडे मराठी आरामात लिहीता येते. Happy माझ्यामते मायबोलीवर सर्वात जास्त लोकं येतात जगभरातून, सर्व मराठी साईट्सची तुलना केली तर. त्यामुळे दर्जा सुद्धा सुधारला तर अ‍ॅडमिनटीमला ते आवडेलच ना? (मी हे वरील पाचांबद्दल लिहीत नाहीये. क्वांटीटी वाढली की दर्जा खालावतो हे सत्य असले तरी.. )
प्रत्येकाने जर मनाशी तपासून पाहीले तर आवडते लेखक किती लिहीतात याचा चांगला विदा जमा होईल.. व्यक्तिशः मला आवडणारे लेखक जसे दाद,ट्युलिप,संघमित्रा,टण्या,चिनुक्स, साजिरा हे 'रतीब' टाकत नाहीत. (यांची नावे घेतली म्हणजे मी यांच्या कंपुत आहे वगैरे विचार करणार्‍यांना करूदेत! आय डोण्ट बिलिव्ह इन कंपु..)

बस्के तुझा मुद्दा क्वाँटिटी विरुद्ध क्लॉलिटी व मराठीची उपलब्धता हा मुद्दा ..

इंटरनेट सोडून प्रत्यक्षात मराठीत व इंग्रजी भाषेत य पुस्तकं दरवर्षी प्रकाशित होतात. त्यातील ८० टक्के टाकावू असतात. मग ती टाकावू आहेत म्हणून प्रकाशक प्रकाशीत करत नाहीत का? करतातच की. तसेच काहीसे मायबोलीचे. तसे नसते तर "वाचुच न शकलेली पुस्तके" व " मला न आवडणारी" पुस्तके असे बाफ निघाले नसते. Happy

आपण तिथे निवडकच होतो ना? निवडक लेखकांचे वा कोणी सुचवलेले पुस्तके आपण वाचतो. ( आणि त्यामुळेच प्रविण दवनेंना नावंही ठेवतो ! ) तसेच काहीसे इथेही नाही का?

चांगले लिहाणार्‍याचे बहुतांश ( ९५ टक्के) लिखान चांगलेच असते, जीएंनी त्यांचा कथा प्रसिद्ध केल्या नाहीत त्या, त्यांचा वैयक्तीक मता मुळे, पण ते लिखान प्रसिद्ध झालेले मला आवडेलच. कारण ते नविन काय प्रयोग करतात, तो वाचायला खूपजन तयार असतात. थोडक्यात असे म्हणत आहे की खूप क्वांटिटी असली म्हणजे सगळा कचराच असतो असे नाही. साहित्यीक विश्वात क्वांटिटी ही टर्म काहीच कामाची नाही. मग गदिमांनी तर य कविता लिहून ठेवल्यात त्यातल्या ९५ टक्के बाद आहेत काय? नाही ना.

आणि उलट म्हणजे कचरा लिहिणारा बहुतांश कचरात लिहीतो, त्याचे ५ टक्केच लिखान चांगले असते. उर्वरित अनुल्लेख करायचे. ( पुस्तक न वाचून किंवा इ लेख / कविता न वाचून)

अरे अरे केदार मी कुठेच नाही म्हटलेय की क्वांटीटी जास्त असणार्‍यांकडे क्वालिटीच नाहीये किंवा सगळा कचराच!! नेव्हर! वरच मी लिहीलेय की जरी सर्वोत्तम असले तरीही क्वांटीटी महत्वाची.. मलाही विशाल कुलकर्णी, कौतुक शिरोडकर याचे कथा/लेख, हरिश दांगटाच्या कविता आवडलेले आहेत!!
आणि जास्त झाले की अनुल्लेख किंवा निवडक वाचणे काय रे होतेच. मी कित्येक दिवसात कविता वाचलेल्या नाहीत. वर कोणीतरी म्हटल्याप्रमाणे नुकसान माझेही रादर माझेच(!) आहेच ना?

Pages