Submitted by तृप्ती आवटी on 28 December, 2009 - 12:41
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
१ मध्यम आकाराचा कोबी, १ वाटी ताजे वाटाणे किंवा भिजवलेली हरभरा डाळ किंवा एक मध्यम बटाट्याच्या काचर्या, ७-८ हिरव्या मिरच्या, ७-८ कडिपत्याची पानं, मीठ, फोडणीसाठी- १ डाव तेल, मोहरी, हळद. वरुन पेरायला भरपूर कोथिंबीर.
क्रमवार पाककृती:
कोबी एकसारखा, बारीक चिरुन घ्यावा. मिरच्या मिरची कटरमधुन काढाव्यात अथवा बारीक चिरुन घ्याव्यात. तेलात मोहरीची फोडणी चांगली तडतडली की कडिपत्ता आणि मिरच्या घालाव्यात. लगेचच कोबी आणि वाटाणे/ह डाळ/बटाटे घालावेत. भाजी चांगली हलवुन घ्यावी. मीठ घालावे. थोडी कोथिंबीर घालावी. झाकण न घालता मंद आचेवर भाजी शिजवावी. खाली लागु नये म्हणुन अधुन मधुन हलवत रहावी. फार सपक शिजवु नये, थोडा करकरीत राहु द्यावा कोबी. भाजी शिजली की उरलेली कोथिंबीर वरुन घालावी.
वाढणी/प्रमाण:
चार मोठे
अधिक टिपा:
_वाटाणे आणि बटाटे दोन्ही घातले तर छानच लागते भाजी.
_याआधी आलेल्या कोबीच्या भाजीच्या कृती इथे आहेत.
माहितीचा स्रोत:
आरती
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सिंड्रेला! तु ह्.डाळ आधी
सिंड्रेला! तु ह्.डाळ आधी भिजवुन ठेवते का? काहीवेळा डाळ शिजत नाही आणी कोबी शिजुन जातो.
सासरी ही भाजी मुग्-डाळ घालुन करतात.मला बटाटा,मटार घालुन आवडते.
हो, ह डाळ चांगली भिजली
हो, ह डाळ चांगली भिजली पाहिजे. मी बरेचदा ऑफिसला येतानाच पाण्यात टाकुन ठेवते.
तुरीचे हिरवे दाणे घालूनही ही
तुरीचे हिरवे दाणे घालूनही ही भाजि छान होते.
आमच्याकडेही अगदी ह्याच
आमच्याकडेही अगदी ह्याच पद्धतीने करतात. पाणी अजिबात घालत नाही मी शिजवताना. गरज पडलीच तर अगदी एक-दोन चमचे. वाफेवरच शिजवते.
वरुन कोथिंबिरीबरोबर खवलेलं ओलं खोबरं घालूनही छान लागते.
काही भागात कोबी अर्धाच
काही भागात कोबी अर्धाच शिजवतात. विदर्भात कोबी पुर्ण शिजवल्या जातो.
मी एकदा पानाकोबी आणि फुलगोभी एकत्र करुन भाजी केली होती
आईशप्पथ, भूक लागली... मस्त
आईशप्पथ, भूक लागली...
मस्त भाजी... तोंपासु...
तेल सुद्धा फक्त फोडणीपुरतं
तेल सुद्धा फक्त फोडणीपुरतं आणि मिरच्या तडतडण्यापुरतं एक चमचाच घालायचं, मीठ-साखरेच्या वाफेवर मस्त होते भाजी..आणि कोथिंबीर, ओलं खोबरं हवंच.
अहाहा, मस्त... आमच्याकडेही
अहाहा, मस्त... आमच्याकडेही अशीच करतात. हरभरा डाळ मस्ट आहे... मटार घालूनही छान होते.
मला कोथिंबीर + नारळ हे नुसतं
मला कोथिंबीर + नारळ हे नुसतं खायला सुद्धा आवडतं पण कोबीच्या भाजीवर मात्र अजिबात आवडत नाही
आमच्याकडे घरी तुरीच्या शेंगांची आमटी होते नेहमी. तुरिचे दाणे घालुन कोबी कधी खाल्ली नाही, आईला सांगते
आमच्याकडे ओले खोबरे, मिरची
आमच्याकडे ओले खोबरे, मिरची वाटून ते वाटण भाजीला लावतात. तेव्हा बटाटा नाही घालत. यम्मी!
मस्त पाकृ. तोपासु!
कोबीची मसूर घालून रस्सा भाजी
कोबीची मसूर घालून रस्सा भाजी पण छान होते. थोडा गरम मसाला व कांदा खोबरे भाजून घालायचे व लसूण फोडणीत टाकायची. मस्त होते.
कोबी फॅन क्लब तयार झाला का
कोबी फॅन क्लब तयार झाला का काय?
कोबीच्या भाजीत नेहेमी थोडसं
कोबीच्या भाजीत नेहेमी थोडसं आलं किसून टाकते. छान चव येते.
माझी पण हिच पद्धत आहे. पाणी
माझी पण हिच पद्धत आहे. पाणी अज्जिबात घालत नाही मी... कोबीच्या भाजीत आल नाही टाकल कधी. आता बघेन एकदा टाकुन.