मुलांसाठी खेळणी /गेम्स इत्यादी

Submitted by मेधा on 2 December, 2009 - 12:29

एच ओ आकाराच्या ट्रेन सेटबद्दल माहिती लिहा बरं कोणी तरी - कुठला घ्यावा, कुठे स्वस्त मिळतात, सुरवातीला मिनिमम काय काय भाग असावेत , त्यात हळू हळू भर घालायची असेल तर कुठले भाग घ्यावेत ?

( मॉडेल ट्रेनच्या मापांबद्दल ( गेज व स्केल) बद्दल माहिती इथे आहे
http://en.wikipedia.org/wiki/Rail_transport_modelling_scales

http://en.wikipedia.org/wiki/H0_scale )

वेगवेगळ्या वयाच्या मुला मुलींकरता वी , एक्स बॉक्स, पी एस २ , डीएस गेम्स कुठले चांगले तेही लिहा.

याशिवाय फिशर प्राइस, व्ही टेक यांची खेळणी, ब्लोकुस सारखे बोर्ड गेम्स याबद्दलची तुमची, मुलांची मतं/ अनुभव लिहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेधा, स्वाती, मवा, रैना, टुनटुन, धन्यवाद. Happy

मेधा, स्वाती, इथे ती पाटी नाही मिळाली तर मी तुम्हाला कळवतो आणण्यासाठी. अनेक धन्यवाद. Happy

खेळण्यांचे अप्रुप आपल्याला आहे, कारण आपण कधी पाहिली नाहीत. पोरांना कुठलीही खेळणी तितकीच आवडतात. <<< अनुमोदन. Happy

http://www.nytimes.com/2013/11/14/technology/personaltech/with-apps-chil...

मी यातले अ‍ॅप्स ट्राय केले नाहीत अजून.

बार्क्या हे वापरतो मधून मधून
https://itunes.apple.com/us/app/everyday-mathematics-baseball/id42520167...

सध्या मुलांकडे आयपॅड मिनि , डीएस आय, अन वी ( जुना , वी यू नव्हे) आहेत.
नवा पीएस ४ अन नवा एक्स बॉक्स याच्या जाहिराती सतत दिसत आहेत. या दोन पैकी एकच घ्यायचा असेल तर कुठला घ्यावा ? का?

http://www.amazon.com/MightyMind-Regular-Edition-Mighty-Mind/dp/B00000K3XI

साधारण ३-४ वर्षाच्या मुलांकरिता मस्त आहे.

एक बेअर फॅमिली गेम म्हणून आहे.
http://www.melissaanddoug.com/bear-family-dress-up-puzzle
यावरून मुले सोप्या गोष्टी तयार करून सांगायला शिकतात.

५-६ वर्षांच्या मुलांना शाळेत नेता येतील असे टॅब्लेट्स कोणाला माहित आहेत का? खूप महाग नकोत,दणकट हवेत.आयपॅड वगैरे सारखे महाग टॅब्लेट्स शाळेत द्यायला नको वाटतात.

५-६ वर्षाच्या मुलांना शाळेत टॅब्लेट कशाकरिता लागतात ? जेन्युन प्रश्न आहे. इथेही १-२ दा कानावर आलंय म्हणून.

शाळेत पहिल्या यत्तेपासून आयपॅड द्यायचं इकडे पण खूप सुरू आहे. आमच्या इथे दोन शाळा टेकसॅव्ही म्हणून निवडल्या आहेत. त्या शाळांमध्ये पहिल्या यत्तेतल्या मुलांना प्रत्येकी एक आयपॅड डिस्ट्रिक्ट एजुकेशनकडून मिळालेत. लेटेस्ट ओएस वगैरे. पालकांचे मुलांना आयपॅड द्यावे आणि मुलांना आयपॅड द्यायची काही एक गरज नाही असे दोन गट पडलेत. सार्ख्या मीटिंगा होतात. भांडणं होतात. सुदैवाने आमची शाळा यात नाही. तरी मिडिया सेंटरमध्ये देतातच आयपॅड्स. शिवाय तुमचे जुने, वापरात नसलेले आयपॅड्स शाळेला द्या अशा ईमेली पीटीए कडून येतात. दोन-दोन/तीन-तीन मिलियनच्या घरात राहाणारी जनता उदार आहे. वीसेक तरी आयपॅड डोनेशन्स आली आतापर्यंत.

आमच्या शाळेत बी वाय ओ टी (ब्रिंग योर ओन टेक्नॉलॉजी) नामक प्रकार सुरु झाला आहे.अभ्यासासाठी ठराविक दिवशी शाळेत टॅब्लेट आणता येतात.मुलाला आम्ही अजून डिव्हाईस शाळेत नेऊ देत नाही.तो शाळेत असलेले डिव्हाईस/क्लासमधला पीसी वापरतो. कंपल्सरी नसलं तरी पियर प्रेशरमुळे मुले मागे लागतात.म्हणून जरा रिसर्च चालू आहे.

पण आयपॅड revolutionary product आहे.. मुलं काय शिकतात गोष्टी फटाफट.. i'm totally amazed..

आमच्या शाळेत मॅथ / रीडिंग क्लासमधे शाळेतर्फे आयपॅड वापरायला दिले जातात .
पंधरा दिवसातून एकदा फन फ्रायडे म्हणून इलेक्ट्रॉनिक्स किंवा रेनबो लूम किंवा पझल्स वगैरे आणायला देतात. इलेक्ट्रॉनिक्स साठी पालकांची परवानगी लागते. कधी कधी डीएस नेत असत.

यावर्षी स्पॅनिश क्लासमधे घरुन टॅबलेट आणून त्यावर स्पॅनिश डिक्शनरी, भाषांतर इत्यादी शिकणे हे आहे म्हणे करिक्युलम मधे. परवानगीच्या फॉर्मवर डिव्हाइस आयडी, पाल्याला नेटवर्क पासवर्ड कसा घालायचा हे येतं की नाही असे दोन आयटेम्स आहेत.

आमच्याही शाळेत पहिली ते पाचवीच्या सर्वांना आयपॅड्स दिलेत. मलाही वाटलं होतं सुरुवातीला की एवढ्या बार्क्यांना काय गरज त्याची पण आता त्याची उपयुक्तता समजली आहे. आपल्या मुलाण्ची पिढी ही डिजिटल लर्निंगच जास्ती करणार आहेत. त्याचे फायदे खरच खूप आहेत. शिवाय इतकं सतत शाळेत अभ्यासासाठी अयपॅड वापरून पण त्याची नॉव्हेल्टी संपते आहे आणी घरी आल्यावर गेम्स खेळण्यासाठी वापर जितका होइल असं वाटत होतं तितका खरच होत नाही.

सर्वांनी एक डिजिटल आर्ट करून आणून त्याचं प्रिंट आउट आणून पालकांना त्या आय्-आर्ट चॅलेंज साठी पण बोलावलं होतं.
क्लास मधली प्रोजेक्ट प्रेझेंटेशन पण हायकू डेक नावाच्या अ‍ॅपवर केलं परवा थोरलीने.

शुम्पी अगदी. बरोबर.
आमची ISD सहावी पासून देते वापरायला IPAD वगैरे. पण मला वाटतं काही हरकत नाहीये मुलांना सुरुवातीपासून टेक्नॉलॉजी हाताळायला द्यायला. Because that's the future.
आमच्या मुलीने परवा शाळेच्या प्रोजेक्ट मध्ये स्वतःच स्वतः वर्ड . पॉवर पॉईंट शिकून ले आउट वगैरे तयार करुन टेक्सास कोस्टल एरियावर मॅगेझिन तयार केलं. माहीती अर्थातच गुगल वापरून मिळविली. अगदी विकतच्या मॅगेझीन सारख झाल आहे मॅगेझीन.

शिवाय इतकं सतत शाळेत अभ्यासासाठी अयपॅड वापरून पण त्याची नॉव्हेल्टी संपते आहे आणी घरी आल्यावर गेम्स खेळण्यासाठी वापर जितका होइल असं वाटत होतं तितका खरच होत नाही.>>हे जास्त महत्वाचं आहे.आयपॅड हाताळू देण्याबद्दल किंवा त्याच्या उपयोगाबद्दल काहीच दुमत नाही.माझा मुलगा ५ वर्षांचा आहे.अजून त्याला कुठे थांबायचे ते कळत नाही म्हणून तो गेम्स खेळताना/अ‍ॅप्स वापरताना लगाम खेचून रहावे लागते.वयाप्रमाणे ही समज वाढते का?

समजेचं माहित नाही, वाढत असावी, पण लगाम अधून मधून लावावा लागतोच. फक्त वाटलं होतं तितकं रणकंदन होत नाही Happy

ब्लॉक्स नंतर हा गेम खुप वेळ लेक एकटी खेळते. Magnet Pattern Blocks फ्रिजवर चिकटतात व छान छान हवे ते आकार बनवता येतात. (अडीच वर्षाची असताना घेतला होता.)
रंग, भुमिती आकारांची सहज ओळख होतेच . line of Symmetry, Fractions, Patterns पण खेळताना शिकवता येतात.
मेमरी गेम पण छान आहे.
http://pbskids.org/
http://www.sproutonline.com/

नुकताच अ‍ॅनिमल साऊंड्स या मोबाईल अ‍ॅपचा शोध लागला.
स्टोअरमध्ये शोधल्यावर अशी दोन तीन अ‍ॅप्स येतात (रेटींगनुसार डाऊनलोड करू शकता. मोफत आहेत.) शंभरेक प्राण्यांचे आवाज त्या प्राण्यांच्या फोटोसह आहेत. मुलांना मजा येते. शिवाय प्राणी आणि त्यांचे आवाजही ओळखीचे होत आहेत. काही प्राण्यांचे आवाज हेडफोन लावल्यावर जास्त स्पष्ट ऐकायला येतात.

Happy
आमच्याकडे सध्या लई फेमस झालेय हे. आवाजांची नक्कल करायचाही प्रयत्न केला जातो.
एकाने या मोबाईलातून हा आवाज काढला की दुसरा दुसर्‍या मोबाईलातून तो आवाज काढणार.
किंवा मग तोंडानेच ट्राय मारणार. Proud
धमाल.

आत्ताच डोक्यात एक बल्ब चमकला.
हापिसात कंटाळवाण्या सभेत प्रस्तूत वक्त्याला सूचीत करण्यासाठी हळूच एखादा आवाज वाजवता येऊ शकेल. (आपल्या जबाबदारीवर ट्राय मारावा. :खोखो:)

Pages