मुलांसाठी खेळणी /गेम्स इत्यादी

Submitted by मेधा on 2 December, 2009 - 12:29

एच ओ आकाराच्या ट्रेन सेटबद्दल माहिती लिहा बरं कोणी तरी - कुठला घ्यावा, कुठे स्वस्त मिळतात, सुरवातीला मिनिमम काय काय भाग असावेत , त्यात हळू हळू भर घालायची असेल तर कुठले भाग घ्यावेत ?

( मॉडेल ट्रेनच्या मापांबद्दल ( गेज व स्केल) बद्दल माहिती इथे आहे
http://en.wikipedia.org/wiki/Rail_transport_modelling_scales

http://en.wikipedia.org/wiki/H0_scale )

वेगवेगळ्या वयाच्या मुला मुलींकरता वी , एक्स बॉक्स, पी एस २ , डीएस गेम्स कुठले चांगले तेही लिहा.

याशिवाय फिशर प्राइस, व्ही टेक यांची खेळणी, ब्लोकुस सारखे बोर्ड गेम्स याबद्दलची तुमची, मुलांची मतं/ अनुभव लिहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यू ट्यूब वर जिंगलटून्स च्या गोष्टी आहेत. त्या झाल्या का सांगून. ईसापनिती, तेनालीराम,पंचतंत्र मधल्या गोष्टी आहेत.

तुमचा मुलगा जर पाच वर्षांचा असेल तर त्याला बेड टाइम स्टोरी सांगण्यापेक्षा त्याच्याबरोबर रोज एक दोन पुस्तके वाचत जा. इथे ४-७ वर्षाच्या मुलांसाठी उपयुक्त अशा काही पुस्तकांची नावे आहेत . http://www.maayboli.com/node/4271

खूपच छान list आहे.ह्यातली काहि पुस्तके वाचलेली आहे..जवळ्च्या library त जाउन लिस्ट मध्ल्या आण्खिन आहेत त्या शोधून आणतो..
शिवाय तो फ्रेन्च शाळेत जात असून शाळेतल्या पुस्तकालयात्न सुद्धा फ्रेन्च गोष्टीच्या पुस्तक आणत असतो..आम्हि ते सुद्धा वाचतो..पन आपण लहानपणी ऐक्लेल्या गोष्टित्ल्या काहि सान्गित्ल्या कि त्याला खूप मज्जा वाट्ते..तो त्याचा कल्पनशक्तिने कहानि मे थोडा twist सुद्धा आनायचा प्रयत्न करतो..म्हन्जे ते एकुण थोड interactive झाल्या सारख होत..पण वर नमूद केलेलि लिन्क खरच छान लिस्ट आहे..this is gonna help too.

>>>>>>>>>माझे बाळ ९ महीन्याचे आहे तिचे बाबा खुप खेळणी आणतात ,
पण संध्याकाळी मी घरी घेल्यावर पोट भरले आसेल तरी मागे मागे येते ,
ति एका ठिकाणी बसुन खेळेल आशि खेळनी पाहिजेत>>>>>

प्रितीभुषण बाळ मागे मागे येतय कारण त्याला खेळण्यांची नाही तुमच्या सहवासाची गरज आहे म्हणुन.आणि घरी आल्यावर घरची काम असल्यामुळ , तुम्हाला पण तिला घेवून बसायला जमू शकत नसेल. कुठतरी सुवर्णमध्य काढता येतो का बघा. संध्याकाळची काम एकतर बाबाच्या मदतीने करुन घ्या. जेणेकरुन तुम्हा तीघांनाही एकमेकांसाठी वेळ मिळेल.

माझ्या सात वर्षाच्या मुलीसाठी रामायण,महाभारत घ्यायचं आहे. तीच्या वयाच्या मुलांना समजेल अशा भाषेत असलेलं तसच लहान लहान गोष्टींच्या स्वरुपात असलेलं पुस्तक कुणी सुचवु शकेल का?

आमच्या मुलीचा आवडता खेळ... कांदे आणि बटाटे फेकत बसणे, पुन्हा एकत्र करणे, पुन्हा फेकणे.

मुलगी अगदी लहान म्हणजे जेमतेम वर्षाची असताना : स्वयंपाकघरात कडधान्य ठेवलेल्या अर्धा लिटरच्या पर्लपेटच्या प्लॅस्टिकच्या एकसारख्या आणि पारदर्शक बरण्या असतात, त्या धान्यांसकट घट्ट झाकण लावून खेळायला देत असे. एकतर त्या हलवल्या की मस्त आवाज येतात. आतील धान्याच्या कमीजास्त प्रमाणामुळे, आणि आकारांमुळे आवाज वेगवेगळे येतात. शिवाय विविध कडधान्यांचे विविध रंग असतात त्यामुळे या बरण्या आकर्षक दिसतात. या बरण्या एकमेकांवर ठेऊन छानसे टॉवर्स बनवता आणि पाडता येतात. बरण्यांच्या तोंडाचे व्यास मोठे असल्याने अगदी लहान मुलांना झाकणं उघडता येत नाहीत. तरीही सावधगिरी म्हणून आपण अशावेळी उपस्थित असलेलेच बरे (अगदी कामवाली ताईही नको). थोडेफार ज्ञानही देता येते - उदा. रंग, आवाजातला फरक इ.

दोनेक वर्षांची झाल्यावर आणखी एक प्रयोग केला होता. तो म्हणजे एक मोठी वाटी आणि बरोबर ६-७ छोट्या वाट्या घेऊन. त्यांची वेगवेगळी डिझाईन्स बनवायची आणि हे काय असू शकेल असा प्रश्न विचारून कल्पनाशक्तीला चालना द्यायची. म्हणजे मोठी वाटी मध्ये ठेऊन बाकीच्या वाट्या तिच्या भोवती गोल - फूल, सूर्य आणि त्याचे किरण इ. मोठी वाटी पुढे आणि बाकीच्या वाट्या ओळीत मागे - आगगाडी, शाळेतल्या टीचर आणि मुलं, कोंबडी आणि पिल्लं इ. असं. Happy

कुठे विचारु कळेना.
खेळणी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी कसा हातभार लावतात? म्हणजे मेंदुची वाढ ( डावी बाजु / उजवी बाजु), डोळे व हात यांचे कॉर्डीनेशन, डिसिजन मेकिंग व असे अजुन काही.
कोणी याबाबत मार्गदर्शन करु शकेल का?

माझ्या मुलीला पण प्ले डो
चादर पसरून आत घर घर.
लेगो ब्रिक्स
पझल्स
मेगा ब्लॉक्स
वॉटर कलर, क्रेयॉन्स ने कागदावर रंगवणे.
बीडस धाग्यामध्ये घालणे.
वेगवेगळ्या आकाराचे कागद चिटकवणे (आर्ट्स व क्राफ्ट ची सुरुवात )
जिंबोरी मध्ये नुकतेच २.५ वर्षाच्या मुलीला क्लास मध्ये टाकलेय. खुपच आवडलेय तिला.

Fisher-Price पाटी भारतात (मुंबईत) मिळते का? ऑनलाईन बघितले पण कुठे मिळाली नाही. जुन्या पाटीचा स्लायडर अडखळायला लागला आहे, म्हणून नवी बघत होतो. पण तशी कुठे सापडली नाही ऑनलाईन.

गजाभाऊ , मी येणार आहे मुंबैत पुढच्या महिन्यात. इथनं आणू का ?
लँडमार्क नावाचं दुकान आहे का कुठे मुंबैत? त्यांच्या बंगळुरुमधल्या दुकानात बरीच इथल्यासारखी खेळणी पाहिली आहेत .

गजाभौ-
firstcry या संकेतस्थळावर पहा. तिकडे लहानमुलांसाठीच्या बर्‍याच वस्तु /खेळणी असतात.
फिशरप्राईस मला एकुणातच भारतातल्या किमतींसाठी फार महाग वाटते. पाटी मात्र झकास आहे.

स्मार्ट गेम्स चे खेळ निव्वळ अप्रतिम आहेत. उत्कृष्ट क्वालिटी आणि डोके चालवायला उद्युक्त करणारे तरीही मजेमजेचे असे त्यांचे लॉजिकल्/स्ट्रॅटेजी गेम्स आहेत. साधारण तीन वर्षांपासून ते ९९ वर्षांपर्यंतच्या सगळ्या वयातल्या बालगोपाळांना आवडतील असे. माझ्याकडे यातले बरेचसे गेम्स आहेत आणि ते आम्ही प्रवासात खास घेऊन जातोच. हे खेळ एकट्याने किंवा तीन्-चारजण मिळूनही खेळू शकतात.

यातले खास निवडक :

कॅमेलॉट ज्यु. (यातली मला न आवडलेली गोष्ट म्हणजे यात प्रिन्सनं ब्रिज बांधून प्रिन्सेसपर्यंत पोहोचणे हे ध्येय आहे. ते वैताग आहे. पण ती प्रिन्स्-प्रिन्सेसची प्यादी काढून टाकली तरी खेळात काही बाधा येत नाही. बाकी खेळ अति-उत्कृष्ट आहे.). हा गेम भारतात मिळत नाही. पण हा अगदी आवर्जून मिळवाच.

कॅसललॉजिकही असाच असावा असं वाटतंय. माझ्याकडे नाहीये.

कॅमोफ्लाज - यात दोन तीन व्हरायटी आहेत. कोणताही घ्या. भारी आहे.

हाईड अँड सीक - यातही दोन व्हराईटी आहेत.

बाकीही खेळ बघून घ्या. माझ्याकडे अजूनही ३-४ आहेत. पण ते मी फारसे खेळले नाहीये. आता या खेळांच्या ट्रॅव्हल-व्हर्जन्सही उपलब्ध आहेत. हॅमलीज, लँडमार्क सारख्या ठिकाणी भारतात उपलब्ध. अमेरीकेत ऑनलाईन मागवू शकता.

*************

थिंकफन चा 'रश आवर' ही असाच एक क्लास गेम. ट्रॅफिकमधून जागा करून आपली गाडी शिताफीनं बाहेर काढणे हे या खेळातलं ध्येय. मग बाकीच्या गाड्यांच्या किती आणि कशा ठेवल्या गेल्या आहेत यावरून खेळाची काठिण्यपातळी वाढत जाते. माझ्याकडे यातली 'रश आवर सफारी' व्हर्जन आहे तर अतिउत्कृष्ट. कारण यातल्या ठोकळ्यांच्या आकारात अधिक विविधता आहे. अप्रतिम क्वालिटी.

मागे मला भेट देण्याकरता म्हणून ५-६ रश आवर सफारी हवे होते त्यावेळी लँडमार्कनं मिळवून खास घरपोच आणून दिले होते. आता सध्या भारतात मिळत नाहीत (बहुतेक).

**************

टॉय-क्राफ्टचे बोर्डगेम्स - व्हिज्युआलॉजिक १' आणि 'व्हिज्युआलॉजिक २' फार छान आहेत. याठिकाणी व्हिज्युआलॉजिक २ कमी किंमतीत उपलब्ध आहे. Happy

मामी,

कॅमोफ्लाज, हाईड अँड सीक हे दोन गेम्स तुम्ही दिलेल्या साईट वर पाहिले.

कॅमोफ्लाज मधे चार चॅलेंज कार्डस आणि एका कार्डला एकच सोल्युशन आहे. तर हा गेम चार पाच वेळा खेळला तर कार्डच्या जागा लक्षात रहातील ना? मग खेळातली गंमत संपत नाही का?
तसेच हाईड अँड सीक बद्दलही.
( कि माझ्या समजण्यातच चुक झालीये? )

सावली, ४०+ चॅलेंजेस आहेत प्रत्येकी.

कॅमोफ्लाजची माहिती वाचलीस का?
Arrange the six transparent puzzle pieces so that the animals are camouflaged in their correct environments. But watch out--animals may not overlap people!

With 48 challenging arctic puzzles to choose from, you’ll be thawing out your logical-reasoning skills to solve these multi-leveled puzzles.

ते सहा पीसेस खेळताना वापरायचे आहेत. चॅलेंजेस छोट्याश्या पुस्तकात दिलेली आहेत. प्रत्येक पानामागे त्याचं सोल्युशन आहे.

कॅसललॉजिकही असाच असावा असं वाटतंय. माझ्याकडे नाहीये. >> कॅसललॉजिक जरा लहान मुलांचा आहे. त्यात फक्त दिलेल्या ठोकळ्या आणि टॉवर्स मधून एकेक आकार करायचे आहेत त्या त्या लेवल च्या चॅलेंजेस प्रमाणे. बॅलन्स जमायला लागतो आणि आकारानुसार कुठला ठोकळा / टॉवर कुठे ते कळायला हवं. गेम मस्त आहेच अर्थात.

भारतात दीड वर्षापूर्वीच इतकी सही सही खेळणी मिळत होती की बस. आता तर अजून मिळत असणार नक्की. खूप चाम्गले गेम्स मिळायचे बंगलुरु मधे. लँडमार्क वगैरे मधे तर होतेच, शिवाय अ‍ॅपल ऑफ माय आय, सपना बुक स्टोअर, सफायर टॉइज या सगळ्या ठिकाणि अतिशय चांगली खेळणी, गेम्स, पझल्स, पुस्तकं, सगळंच मिळायचं. :). मला तरी इथे आल्यावर फार काही फरक वाटला नाही. इवन भारतात लोकल बँड्स चे पण काही खेळ फारच एंजॉय करायच्या माझ्या मुली. त्या खेळांची नावं आठवली तर देईन इथे नक्की.

इवन भारतात लोकल बँड्स चे पण काही खेळ फारच एंजॉय करायच्या माझ्या मुली. >> +१

खेळण्यांमध्ये गंमत नाहीये, ती कोणासोबत तरी खेळण्यात आहे. ३ वर्षांच्या आतल्या मुलांना तर वाटीचमचे,डब्बे असली खेळणी भारी आवडतात. माझी मोठी नणंद नेहमी म्हणते ' खेळण्यांचे अप्रुप आपल्याला आहे, कारण आपण कधी पाहिली नाहीत. पोरांना कुठलीही खेळणी तितकीच आवडतात.' मला पटते ते.

खेळण्यांमध्ये गंमत नाहीये, ती कोणासोबत तरी खेळण्यात आहे. >> क्या कही.
धाकटीला कितीही चांगला गेम काढून दिला तरी ती म्हणते, तू पण ये खेळायला. Happy

Pages