Submitted by माणूस on 16 November, 2009 - 14:08
ईतिहासा बद्दल प्रश्न मंजुशा
जुने लेखन ईथे वाचता येईल
http://www.maayboli.com/hitguj/messages/34/40.html
कृपया प्रश्न लिहीताना तो बोल्ड करुन लिहीत जा, म्हणजे प्रश्न आणि उत्तरे शोधायला सोपे जाईल
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दुसर्या प्रश्नाचे उत्तर -
दुसर्या प्रश्नाचे उत्तर - राजा हरिश्चन्द्र.
अहो, मि विचारलेला प्रश्न अजुनहि अनुल्लेखितच हे. चान्गले हे, अनुल्लेखाचा "गिनेस रेकॉर्ड" होणार
माझ्या मते दुसर्या प्रश्नाचे
माझ्या मते दुसर्या प्रश्नाचे उत्तर नल-दमयंति मधला नल राजा.
बरोबर - दुसर्या प्रश्नाचं
बरोबर - दुसर्या प्रश्नाचं उत्तर नलराजा.
पहिल्या प्रश्नाचं उत्तर देता येणार नाही, पण तर्क करता येऊ शकेल. पहिलं द्यूत कपटाने खेळल्याबद्दल तसंच त्याचा उपयोग पांडवांना पीडा देऊन राज्यप्राप्तीसाठी केल्याबद्दल जनमत कौरवांच्या विरुद्ध होतं. यात सामान्यजन आले तसेच भीष्म, विदुर इ. घरचे ज्येष्ठही. वनवास (आणि अज्ञातवास) संपेतोवर पांडवांचं राजकीय बळ बरंच वाढलेलं होतं. द्रुपद, श्रीकृष्ण (यादव), विराट हे सगळे त्यांचे हितचिंतक झाले होते. अशा परिस्थितीत पुन्हा द्यूत म्हणजे राजकीय आत्महत्या ठरली असती. खुद्द धृतराष्ट्रानेसुद्धा त्याला संमती दिली नसती. (पहिल्या द्यूताच्या शेवटी त्यानेच - घाबरून का होईना - द्रौपदीला तीन वर देऊ केले होते.)
पहिल्या प्रश्नाचं उत्तर देता
पहिल्या प्रश्नाचं उत्तर देता येणार नाही, पण तर्क करता येऊ शकेल.>>मला नीट आठवत नाही पण जरासंधाच्या हाडांपासून बनवलेले manipulated फासे बहुधा नव्हते ?
दुसर्या प्रश्नाचं उत्तर
दुसर्या प्रश्नाचं उत्तर नलराजा हे बरोबर आहे.
नलाच्या शरीरात कलीने प्रवेश केला आणि त्याच्या प्रभावाखाली नल द्यूतामध्ये त्याच्या भावाकडून हरला आणि देशोधडीला लागला.
========================
पहिला प्रश्न:
जरासंधाच्या हाडांच्या फाशांची गोष्ट मी सुद्धा ऐकली आहे. पण ती पहिल्या द्यूतासंबधी आहे. ती गोष्ट खरी आहे की नाही काही कल्पना नाही.
शकूनी द्यूतासाठी खास जरासंधाच्या हाडाचे फासे बनवून आणतो. आणि द्यूताला सुरवात होते, तेव्हा प्रत्येक वेळी फासे टाकताना भीम जोरात गर्जना करतो. त्यामुळे फासे घाबरतात आणि शकूनीच्या विरुद्ध पडायला लागतात. शकूनीला वशीकरण विद्या येत असते, आणि असे असून फासे त्याच्या विरुद्ध पडायला लागतात. म्हणून मग तो भीमाच्या गर्जनेला आक्षेप घेतो आणि मग भीमाला गर्जना करण्यास बंदी घालण्यात येते (युधिष्ठीरामुळे). त्यानंतर फासे बरोबर पांडवांच्या विरूद्ध पडायला लागतात.
=====
पहिल्या प्रश्नाचे उत्तरः पांडव वनवासात असताना एक ऋषी त्यांना भेटायला येतात आणि युधिष्ठीराला अक्षविद्या शिकवतात. ही विद्या म्हणजे नक्की काय माहित नाही पण ही विद्या येणारा माणूस द्यूतामध्ये हरू शकत नाही. ही विद्या गणितासंबंधी असावी कारण ह्या मुळे झाडाची पाने, फुले, फळे किंवा कळपातले प्राणी किती वगैरे लगेच सांगता येते.
तर युधिष्ठीराला अक्षविद्या आत्मसात झाल्याचे अर्थातच शकूनीला कळते. त्यामुळे पुन्हा द्यूत खेळून त्यांना हरवणे अशक्य होते आणि म्हणून पुन्हा द्यूत होत नाही.
नलराजाच्या गोष्टीत नल ही विद्या एका राजाकडून शिकतो. नल वेषांतर करुन बाहुक या नावाने ह्या राजाकडे राहात असतो. नल त्याला अश्वविद्या शिकवतो आणि त्याच्या बदल्यात अक्षविद्या शिकून घेतो. पुढे परत जाऊन अक्षविद्येच्या जोरावर तो आपल्या भावाला पुन्हा द्यूत खेळून पराभूत करतो आणि आपले राज्य पुन्हा प्राप्त करतो.
स्वाती_आंबोळे: तुम्ही
स्वाती_आंबोळे: तुम्ही लिहिलेल्या पांडवांचं राजकीय बळासंबंधी:
माझ्या माहिती प्रमाणे पांडव वनवासात असताना कौरवांचे राजकीय बळ प्रचंड वाढते. ह्याची कारणे अशी:
१. पांडवांनी राजसूय यज्ञाच्या वेळी पुष्कळ राजांना पराभूत केले आणि खंडणी वसूल केली. अर्थात हे सर्व राजे त्यांना पाण्यात बघत आणि कौरवांच्या बाजूने वळले.
२. राजसूय यज्ञाच्या वेळी इंद्रप्रस्थामधे अफाट संपत्ती पांडवांनी गोळा केलेली होती. ही सर्व संपत्ती कौरवांना आयतीच मिळाली.
३. पांडव वनवासात जाताना कफल्लक होते.
४. कौरवांना १३ वर्षे युद्धाच्या तयारीसाठी वेळ आणि पैसा होता आणि तो त्यांनी पुरेपुर वापरला.
५. वनवासात असताना पांडवांच्या बाजूने फक्त कृष्ण आणि द्रुपद होते. अज्ञातवासानंतर अभिमन्यू - उत्तरा विवाहानंतर विराट त्यांच्या बाजूला आला.
वनवासात असताना युधिष्ठीर ह्या सर्व गोष्टींमुळे अत्यंत चिंतीत होता आणि म्हणूनच त्याने अर्जुनाला दिव्य अस्त्र प्राप्तीसाठी जायला सांगितले.
ह्यामुळेच महाभारतात कौरवांकडे ११ अक्षौहिणी तर पांडवांकडे ७ अक्षौहिणी सैन्य होते.
नविन प्रश्न: अक्षौहिणी म्हणजे
नविन प्रश्न: अक्षौहिणी म्हणजे किती सैन्य?
३बू : तुमच्या प्रश्नाचे उत्तर
३बू : तुमच्या प्रश्नाचे उत्तर माहित नाही. तुम्हीच उत्तर द्या.
१ अक्षौहिणी रथ - २१८७० हत्ती
१ अक्षौहिणी
रथ - २१८७०
हत्ती - २१८७०
घोडदळ - ६५६१०
पायदळ - १०९३५०
वरील माहिती wiki मधुन
विकि वापरन्यात काय मजा हे ?
विकि वापरन्यात काय मजा हे ? च्यामारि, नलराजा आनि हरिश्चन्द्र ह्येन्च्यात गोन्धळ झाला
रविशेखर तुम्च्या विनन्तिला मान देउन उत्तर हे 'अन्धक'.
म्हणून मग तो भीमाच्या
म्हणून मग तो भीमाच्या गर्जनेला आक्षेप घेतो आणि मग भीमाला गर्जना करण्यास बंदी घालण्यात येते
>>>>>>
आरं तिच्या बायली मी..
म्हंजी आस्ट्रेलिया सध्या जे स्लेजिंग करतय त्याचा उगम हित्त हाय व्हय..
तरी म्हनलं गोरी ज्ये करत्यात त्ये आमच्या पुरानात कसं नाय? इकेटच्या मागं इकेटकीपेर बोम्ब मारतेत त्यानी फटकं चुकतेत आन आउट होतेत. स्लेजिंग पुरान्काळापाहुन आमचाकडे हे, आन त्ये आमीच शिकिवलय जगाला.... आन आता आमालाच येत नाय त्ये मंग हारतुय हारतुय...
३बू: अजून काही माहिती द्या की
३बू: अजून काही माहिती द्या की ह्या गोष्टीबद्दल.
मी असे वाचले आहे की कॅसिनो हा शब्द शकूनी ह्या शब्दापासून तयार झाला आहे.
अजून एक विचार करण्यासारखी गोष्टः
डॉ. प. वि. वर्तकांच्या "स्वयंभू" नावाच्या पुस्तकात त्यांनी म्हटले आहे की भीम हाच खरा महाभारताचा नायक होय. पांडवांच्या लहानपणापासून भीमानेच त्यांना प्रत्येकवेळी संकटातून सोडवले. उदा. लाक्षागृह, हिडिंबवध. तसेच त्यानेच बकासूर, जरासंध, कीचक वगैरेंचा वध केला. एव्हढेच नव्हे तर सर्वच्या सर्व कौरवांना त्यानेच उडवले. पण प्रत्येकवेळी त्याला त्याच्या पराक्रमाचे श्रेय मिळाले नाही. युधिष्ठीर मोठा म्हणून आणि अर्जून सर्वश्रेष्ठ धनुर्धर तसेच कृष्णाचा सखा म्हणून ज्यास्त मोठे झाले. तसे बघितले तर महाभारत युद्धात अर्जुनाने कर्णाशिवाय कोणत्या महारथीचा पराभव केला? भीष्मांच्यावेळी शिखंडी, द्रोणांसाठी धृष्ट्द्यूम्न होते. कर्णाला सुद्धा संपूर्णपणे प्रतिकूल परिस्थितीत मारण्यात आले.
शिवाय अर्जूनाने एकलव्याच्या बाबतीत जे केले ते चूकच होते. तसे असून अर्जुन "हीरो" कसा काय? आणि भीमाला असे डावलण्यात का येते?
च्यामारि माहिति द्यायचि राहुन
च्यामारि माहिति द्यायचि राहुन गेलि. हे प्रभु म्हणजे श्रीशन्कर आणि डोळॅ झाकणार्या देवि पार्वति.
तरिसुध्दा पान्डवान्मधे सर्वात श्रेश्ठ भिम हि थेअरि नवि नाहि. इरावतिबाइन्निसुध्दा मान्डलि हे.
महाभारतात कोणि एक "हिरो" नाहि. साक्षात भगवन्तसुध्दा हिरो नाहि बरे. अहो असलि एकपदरि स्टोरि ल्ह्याहायला व्यासमुनि म्हणजे हिन्दि सिनेमाचे स्क्रिप्टरायटर न्हवते
युधिष्ठिर = गांगुली,
युधिष्ठिर = गांगुली, (कर्णधार, नेता)
अर्जुन = तेंडुलकर, (सर्वात जास्ती इन फोकस, वलयांकित)
भीम = द्रविड (कायम उल्लेखनीय कामगिरी करूनही उपेक्षित)
जसे गांगुली, तेंडुलकर आणि द्रविड हे तिघेही श्रेष्ठ आहेत आणि त्यांच्यात कंपॅरिझन करणं योग्य नाही तसंच युधिष्ठिर, अर्जुन आणि भीमही श्रेष्ठच आहे आणि त्यांच्यातही कंपॅरिझन करू नये...
अर्जुनाच्या रथावर मारूती कसा
अर्जुनाच्या रथावर मारूती कसा काय ? सांगा पाहू.
हनुमान आणि भीमाची कथा आहे.
हनुमान आणि भीमाची कथा आहे. हनुमान एक म्हातारा माकड बनुन भीमाचा रस्ता अडवतो. त्यावेळी जेव्हा भीमाला जेव्हा त्याचे खरे रुप कळाल्यावर त्याची पुजा करतो. हनुमान तेव्हा त्याला मदत करायचे आश्वासन देतो.. युद्धाच्यावेळी भीम हनुमानाची प्रार्थना करतो म्हणुन हनुमान अर्जुनाचा रथावर असे काहीतरी अर्धवट लक्षात आहे. अर्जुनाच्याच का वगैरे माहीत नाही.
मारूतीने अर्जुनाला बाणांचा
मारूतीने अर्जुनाला बाणांचा अभेद्य पूल (की भिंत?) बनवायचं आव्हान दिलं होतं. अर्जुनाने बनवलेला पूल मारुतीने सहज पाडून टाकला - असं काही वेळा झाल्यावर कृष्णाने त्यानंतर बनवलेल्या पुलाला सुदर्शनचक्राचा आधार दिला, आणि मग तो खरंच मारुतीसाठीही अभेद्य झाला. एकूण या प्रसंगामुळे अर्जुन आणि मारुती दोघांचंही गर्वहरण झालं. कृष्णही (रामासारखाच) विष्णूचा अवतार असल्याने मारुतीला तो स्वामीवत् होता. तसंच महाभारतयुद्धात पांडवांची बाजू न्यायाची असल्याची त्याला खात्री होती. या सर्वांचा परिणाम म्हणून त्याने युद्धात अर्जुनाच्या रथावरील ध्वजावर राहण्याचं आश्वासन अर्जुनाला दिलं.
वाह स्वाती, बरोबर, मी उद्या
वाह स्वाती, बरोबर, मी उद्या नंतर वेळ काढून लिहिणार होतो...
अफजल खाना चा कोथळा जरी शिवाजी
अफजल खाना चा कोथळा जरी शिवाजी महाराजानी बाहेर काढला असला तरी त्याला जीवे कुणी मारले?
महंमद कुलीखान हा
महंमद कुलीखान हा धर्मांतरापूर्वी कोण होता?
मला बरीच वर्षे पडलेला प्रश्न
मला बरीच वर्षे पडलेला प्रश्न - सप्त चिरंजीवांपैकी 'कृपाचार्य' चिरंजीव कसे आणि का? (बाकी सहा चिरंजीव आणि थोडक्यात कारणे )-
अश्वत्थामा - शाप,
बलि - वरदान,
व्यास - वरदान,
हनुमान - वरदान,
विभिषण - वरदान,
परशुराम - वरदान.
महंमद कुलीखान हा
महंमद कुलीखान हा धर्मांतरापूर्वी कोण होता?
महंमद कुलीखान म्हणजे नेताजी पालकर.
अफजल खाना चा कोथळा जरी शिवाजी
अफजल खाना चा कोथळा जरी शिवाजी महाराजानी बाहेर काढला असला तरी त्याला जीवे कुणी मारले?
अफझल खानाला संभाजी कावजीने मारले.
@स्वाती, दोन्ही उत्तरे अगदी
@स्वाती, दोन्ही उत्तरे अगदी बरोबर!
स्वाती दांडेकर आणि sulu,
स्वाती दांडेकर आणि sulu, संभाजी कावजीचे आडनाव कोंढाळकर होते का?
मकरध्वज हा हनुमानाचा पुत्र
मकरध्वज हा हनुमानाचा पुत्र मानला जातो, तर मारुतीराय ब्रह्मचारी कसे काय?
मारुतीराय ब्रह्मचारी कसे
मारुतीराय ब्रह्मचारी कसे काय?
>>> मला जे ठावूक आहे त्यावरून उद्या पर्यंत सविस्तर लिहितो...
आता हा धागा
आता हा धागा पेटणार................. अखिल ब्रम्हांडातील ब्रम्हचार्यांचे खरे नाही आता
एका मगरीने मारुतीचा घाम
एका मगरीने मारुतीचा घाम गिळल्याने तिला जो पुत्र झाला तो मकरध्वज. अशी कथा आहे.
एका मगरीने मारुतीचा घाम
एका मगरीने मारुतीचा घाम गिळल्याने तिला जो पुत्र झाला तो मकरध्वज. अशी कथा आहे. >> हो असे मि पण आइकले आहे.
पण मग मानसपुत्र असेल का? ... किंवा अजून काहि गोष्टी आहेत का?
Pages