ऑगस्ट महिन्यातील सर्वोत्तम कविता

Submitted by Admin-team on 26 October, 2009 - 01:18

ऑगस्ट महिन्यातील सर्वोत्तम कवितांची निवड
सर्वप्रथंम ऑगस्ट महिन्यातील सर्वोत्तम कवितांची निवड करायला खूपच उशीर झाला त्याबद्द्ल मनापासून क्षमायाचना!कारणे वैयक्तिक व अपरिहार्य होती.पण त्याचबरोबर सर्व कविता वारंवार वाचणे
हेहि तितकेच आवश्यक तसेच दुसरे परीक्षक श्री.गिरीश कुलकर्णी हे परदेशात असल्याने संपर्कासाठीही
वेळ गेला. असो.
कवितांची निवड करतांना सर्वांत आधी शुद्धलेखन,कवितेचा परिणाम (इम्पॅक्ट) व आशय व तद्नंतर रचनाकौशल्य, गझल सारख्या रचनेत तांत्रिक बाजू अर्थात वृत्ताची (मीटर) अचूकता इत्यादिंबाबतचा विचार निवड करताना केला आहे.आम्हां दोघांच्या मते खालील ३ कवितांची सर्वोत्तम म्हणून निवड
केली आहे. कविता चांगली असून शुद्धलेखन नसेल तर ती बाद ठरवली आहे.

सुरवंट (कौतुक शिरोडकर)
या कवितेत आशय, परीणाम व रचना लक्षणीय आहेत. जास्त सांगत नाही.ही कविता मुळातूनच वाचावी.

ती (सुनील पाटकर)

ही एक छोटी,साधी पण विलक्षण निरागस कविता. दीर्घकाळ मनात रेंगाळणारी.

न्यास (क्रान्ती)

ही गझल तंत्रशुद्ध तर आहेच पण गझलच्या इतर अंगानीसुध्दा परिपूर्ण आहे.

इतर चांगल्या कवितामध्ये:
अजब (उत्साह), अनुराधा म्हापणकर (व्हू केअर्स), हरीश दांगट (शेतकर्‍याची व्यथा) देवदत्तजी (भेट)
गिरीश कुलकर्णी (आयुष्य),उमेश कोठीकर (पाऊस्,अर्पणपत्रिका), विशाल कुलकर्णी (आईच्यान सांगतु), कौतुक शिरोडकर(मल्ह्रारसांज,क्षेत्र) क्रान्ती (जोगवा,पुन्हा, नकोशी) लिमयेपरेश (उशीर) मानस६(घायाळ हरिणी..) वैद्य (उशीर,नको नको,तू)
पूजा दिवाण (दंश) पुलस्ति (माळ) राधा कुलकर्णी (संवेदना) वेदनगंधा(बांध) ह्या उल्लेखनीय आहेत.
त्या जरूर वाचाव्यात.
सर्व कवींचे अभिनंदन व आभार.
तसेच 'मायबोली' चे आभार.
आपलेच,
जयन्ता५२ , गिरीश कुलकर्णी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

'सर्वोत्तम कविता'च का? कथा, ललित, प्रकाशचित्र, रंगीबेरंगी का नाही?
आणि सर्वोत्तम 'प्रतिसाद' का नाही? (खरा खुरा भाबडा प्रश्न.)

अ‍ॅडमिननी निर्णय घेतलाच आहे, पण हा उपक्रम पुन्हा सुरू करू नये, ही माझ्याकडून विनंती.

जे चांगले असते, ते सर्वांना आवडते, तसे प्रतिसादही येतात. तसे प्रतिसाद नाही आले, तरी ते लिखाण 'चांगले' असू शकते. उल्लेखनीय किंवा उत्तेजनार्थ मध्ये नाही आले तरीही ते चांगले असू शकते. मग हा सारा खटाटोप कशासाठी? आणि त्यासाठी स्पर्धा कशाला?

कुणी अंकाच्या संपादकांना चॅलेंज करतेय, तर कुणी कविता निवड समितीच्या सदस्यांना! भारीच मज्जा चाललीये. या गदारोळात चांगले लेखन कोणते, नि वाईट कोणते- हे सारे ढगात!!

साजिर्‍या, "सर्वोत्तम" कवितेचा उपक्रम का सुरु केला ह्याची कारणमिमांसा स्वातीने पहिल्याच सर्वोत्तम कवितेच्या वेळी केली होती. पण तू म्हणतोस तो प्रश्न मला पण पडला की सर्वोत्तम कथा, ललित, प्रकाशचित्र, विनोदी लेखन का नाही ?

कवितांमधुन निवड करायलाच वेळ होत नाही तर इतक्या प्रतिसादांमधून एक निवडणे म्हणजे अजिबात फिजिबल नाही Happy

ह्या सगळ्यापेक्षा ललित, कविता, कथा इ. सगळ्यातून 'उल्लेखनीय' किंवा 'वाचनीय' असे निवडता येईल का? आणि त्यांची यादी देता येईल का? मग १० कविता /लेख वाचनीय असले तरी त्यांची नावे अ‍ॅडमिन कमिटीला सुचवता येतील. जुन्या माबोवर अशी सोय होती ना बहुधा? आणि 'सर्वोत्तम' हे इतके सापेक्ष असते, की सर्वोत्तम कविता/लेख हा प्रकार नकोच.

ह्या सगळ्यावर रामबाण उपाय...लेखनमर्यादा...महिन्यातून फक्त दोनच साहित्यप्रकार प्रकाशित करण्यास परवानगी हवी. (आणि एक साहित्यप्रकार एकदाच). एका साहित्यप्रकारासाठी महिन्याभरात एकच संधी असल्याने जो तो स्वतःचे सर्वोत्तमच द्यायचा प्रयत्न करेल, चांगल्या लेखकांच्या साहित्याची आवर्जून वाट पाहिली जाईल आणि प्रतिसादही मिळतील.

उगीच रोज उठून काहीही मायबोलीकरांच्या माथी मारले असे होणार नाही.

कविता विभागात भाराभर कविता रोज दिसल्या की एकदम दडपल्यासारखे वाटते, ह्या उलट गझल विभाग. उत्तम गझलकार आणि मर्यादित रचना म्हणून अतिप्रचलित काव्यप्रकार नसूनही कवितेपेक्षा गझलेला सरासरी जास्तच प्रतिसाद मिळतात.

दिवाळी अंक दर महिन्याला प्रकाशित होऊ लागले तर कितीसे लोक त्याची वाट बघतील आवर्जून घेऊन वाचतील?

झक्कपैकी जमलेले कसदार जेवण पहिल्या दोन घासातच अतीव समाधान देऊन जाते.
आणि ताटात भरपूर मिळमिळीत पदार्थ असले तरी पोट भरून जेवायची आजिबातच ईच्छा होत नाही.

ही मर्यादा प्रशासनाने घालण्यापेक्षा ज्याची त्याने स्वतः स्वतःवर घालून घेणे जास्त योग्य आहे. गरजेचे आहे. प्रशासनाने मर्यादा घालणे म्हणजे कुठेतरी मुक्त व्यासपीठ संकल्पनेला स्वतःच छेद देणे असं होईल.
प्रत्येकाने स्वतःच मर्यादा स्वतःवर घालून घेणं हे प्रत्येकाने जबाबदारी उचलल्याचं लक्षण आहे.
IMO

नीधप, मुक्त व्यासपीठावर यामुळे मर्यादा येतेय असे मला वाटत नाही. यामुळे कोणावर 'तुम्ही इथे कथा प्रकाशित करू नका', 'कविता प्रकाशित करू नका', 'प्रकाशचित्र टाकू नका' असे बंधन नाही. हे सगळे प्रकार इथे प्रकाशित करायला सगळ्यांनाच मुभा असेल. पण त्यांच्या संख्येवर मर्यादा राहील. प्रत्येकाने स्वतःच हे अंगवळणी तर प्रश्नच नाही. पण होते असे की, माझी निर्मिती ही मला नेहमीच चांगली वाटते आणि ती दुसर्‍यांना केव्हा दाखवीन असे होते ना.

तुमचं म्हणणं बरोबर आहे जिडी पण
>>पण होते असे की, माझी निर्मिती ही मला नेहमीच चांगली वाटते आणि ती दुसर्‍यांना केव्हा दाखवीन असे होते ना.<<
हा जो मुद्दा आहे ना त्यासाठीच हे मुक्त व्यासपीठ आहे ना मग त्यावर संख्येची मर्यादा घातली जाणं ह्याने मूळ हेतूलाच बाध येतो.

हा प्रश्न वेगळ्या प्रकारे सोडवण्याचा प्रयत्न इथे केला आहे.

माझी आवडती १० पानं

ज्याना ज्याना कवितांचे रसग्रहण करायचे असेल, ते जमेल तेंव्हा, जमेल तितका यात भाग घेऊ शकतात.

इथे आवर्जून हा उपक्रम कसा चांगला करता येईल याच्या नवीन सूचना देणार्‍या सर्वाना धन्यवाद.

आलेल्या बहुतेक सगळ्या कल्पना या ज्याला Scalable म्हणता येतील अशा नव्हत्या. म्हणजे ३००-४०० कविता (आणि याच गतीने वाढ होत राहिली तर ६००-८०० कविता) प्रत्येक महिन्याला वाचून त्या वर अभिप्राय देणे, या करता लागणार्‍या व्यक्ती आणि लागणारा वेळ याचा ताळमेळ जमत नव्हता. या आधी हे काम मनापासून करणार्‍या सगळ्यानाच या कामाचा आवाका आणि देता येणारा वेळ यातली तफावत जाणवली होती.

सगळ्यानाच नावाजलेल्या कवींकडून आपल्या कवितेची दखल घेतली जावी, शाबासकी मिळावी असं वाटतं. पण थोडा त्यांचाही विचार करा की. Happy आणि त्यांनी त्यांचा वेळ या निवडीमधे, रसग्रहणामधे घालवण्यापेक्षा नवीन कविता करण्यात घालवला तर आपल्याला सगळ्यानाच २-४ चांगल्या कविता जास्त वाचायला मिळतील. (आणि हो जसं खूप स्वयंपाक केल्यावर एखाद्या आचार्‍याची भूक कमी होते तसं महिनों महिने खूप कविता वाचल्यावर एखाद्याची कविताच करायची हौस गेली तर... Happy )

"आवडते १०" ही तांत्रिक सुविधा वापरून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठल्यातरी मंडळीनी एकत्र येऊन, त्याना वेळ झाल्यावर ठरवण्यापेक्षा तुम्ही प्रत्येक जण स्वतःच याच निवडीत भाग घेऊ शकता. "आवडते १०" ची घोषणा करताना लिहिल्याप्रमाणे तुमच्यापैकी उत्साह असलेले काहीजण आपले "आवडते १० कवितांपुरते" मर्यादित ठेवू शकता.

पण इथे या उपक्रमासाठी उत्साहाने सूचना देणार्‍या फारच थोड्या लोकांनी स्वतः या निवडीत भाग घ्यायला सुरुवात केली आहे. ज्या उत्साहाने हा उपक्रम चालू रहावा, ज्या उत्साहाने हे मायबोलीला कसे सुधारता येईल असे तुम्ही सुचवले त्याच उत्साहाने तुम्ही स्वतः यात भाग घेऊन हे सुधारण्यात मदत कराल अशी आशा आहे.

>>>>> पण इथे या उपक्रमासाठी उत्साहाने सूचना देणार्‍या फारच थोड्या लोकांनी स्वतः या निवडीत भाग घ्यायला सुरुवात केली आहे. <<<<<<

काय बोलणार या वर? असो, काळावर सोडून द्यावे सगळे! होईल हळू हळू

(मी तर बोवा कवितान्च्या वाटेला जात नाही, मला काही समजत नाही त्यातल, पण टॉप टेन मधे जर कविता/लेख्/गप्पान्चे पान अशा स्वरुपात काही एक विभागणि आपोआप झाली तर अधिक मजा येईल असे वाटते! )

मी तर बोवा कवितान्च्या वाटेला जात नाही, मला काही समजत नाही त्यातल >> हा साक्षात्कार नुकताच झाला का? का तुझं पण त्या आचार्‍या सारखं झालं? कारण हितगुजवर आल्या आल्या कविता कर करून बोर केल्याचं आठवतय. Happy

>>>>> पण इथे या उपक्रमासाठी उत्साहाने सूचना देणार्‍या फारच थोड्या लोकांनी स्वतः या निवडीत भाग घ्यायला सुरुवात केली आहे. <<<<<<
थोडासा वेळ द्या अ‍ॅडमिन, सुविधा समजून घेऊन, आपण ती कशा प्रकारे वापरणार नक्की यावर विचार करून ती वापरायला वेळ लागेल ना.

कित्ती शार्प मेमरी तुझी! Wink
लिम्बीच्या वाटेला जायच होत म्हणून ज्या र ला ट जोडत बनवलेल्या कवितान्च सहाय्य घेतल होत लिम्बीला इम्प्रेस करायला, त्या कवितान्चा कार्यकारणभाव सम्पल्यावर इथे टाकुन दिल्या होत्या, त्या तुला बोर म्हणुन आठवत अस्तील! Lol
त्यानन्तर मी कध्धी कध्धी कविता केल्या नाहीत हो! Happy (बहुधा म्हणुनच तर लिम्बी टिकून आहे इकडे, माहेरी गेली नाही Proud )

थोडी प्रस्तावना: ऑगस्ट महिन्यातील सर्वोत्तम कवितांच्या निवडीसंदर्भात जो वाद झाला त्यामुळे दुखावल्यामुळे मध्यंतरी काही काळ मी मायबोली वर न लिहण्याचा निर्णय घेतला होता. परंतु दरम्यानच्या काळात अनेक मायबोलीकरांनी प्रतिसादाद्वारे,फोन करून व वैयक्तिक भेटीतून मला माबो वर परत येण्याची मनापासून विनंती केली. हे त्यांच्या प्रेमाचे,स्नेहाचे प्रतीक आहे. मी स्वतः माबो पासून दूर झाल्याने व्यथित होतोच. कविता लिहायला,वाचायला व प्रतिसाद द्यायला कुठल्याही कारणामुळे झालेला प्रतिबंध यासारखे दु:ख नाही. साहित्यिक वादात आपले मत मांडताना संयम सुटू देऊ नये ही खबरदारी सर्वांनीच घेणे आवश्यक आहे. जसा शेवटी पुन्हा लिहायचा निर्णय घेतांना आनंद होत आहे तसेच काही काळ मी मायबोली वर न लिहण्याचा निर्णयही त्यावेळी योग्यच होता हेही नम्रपणे नमूद करावेसे वाटते. माझ्या मनात कसलाच किंतु नाही व इतर कुणाच्याही मनात नसेलच याची खात्री आहे.असो.(..."तुम मुझे दिलसे पुकारके तो देखो मै कोई गया वक्त नही जो लौटके न आऊंगा... अशा अर्थाचा एक शेर आठवतो आहे.)
नवी गझल पेश करीत आहे. परखड दाद यावी.
जयन्ता५२
माबो अ‍ॅडमिनला विनंती.
या पुढे मला कुठल्याच परीक्षण मंडळावर घेऊ नये ही विनंती.
जयन्ता५२

Pages