ती

Submitted by sunil patkar on 17 August, 2009 - 07:21

सर्व जेवल्यानंतर
तू जेवायला बसतेस
रिकामी भांडी पाहून
खुदकन हसतेस

तुला सवय झालेय आता
त्या रिकाम्या भांड्यांची
आणि आम्हालाही सवय झालेय
तुझ्या अशा भरल्या प्रेमाची

कवि - सुनील पाटकर

गुलमोहर: 

खरचं छान आहे कविता. दुर्लक्षित झाली त्याबद्दल क्षमस्व आणि कविता निवड समितचे आभार.

हार्दिक अभिनंदन सुनील.
अगोदर वाचली होती; परंतु वाचल्यानंतर कुठेतरी गलबलले आणि तिला तशीच अलगद ठेऊन दिली, मनात.

अजून एक- संपूर्ण कविता जर "तू" ला संबोधून केली आहे, तर "ती" हे नाव विसंगत नाही का वाटत?
-सस्नेह.

सुंदर कविता..!!
अलकाजींशी सहमत.
कवितेत वर्णन आहे ती केवळ आणि केवळ आईच असू शकते.
आणि 'आम्ही' हा शब्द कवितेत आल्याने कविला पण तेच म्हणायचे असणार.