मूगडाळीच्या चकल्या

Submitted by डॅफोडिल्स on 15 October, 2009 - 05:58
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मूगडाळ १ वाटी
मैदा ३ वाट्या
पांढरे तिळ, ओवा, जिरं आवडी प्रमाणे
लाल मिर्ची पावडर, मिठ चवीप्रमाणे
तळण्यासाठी तेल

क्रमवार पाककृती: 

कुकरच्या एका डब्यात मूगडाळ साधारण वरणाला पाणि घालतो तितके पाणि घालून लावावी.
व कुकरच्या दुसर्‍या डब्यात ३ वाट्या मैदा (सुका) अजिबात पाणि न घालता घट्ट झाकण लाउन ठेवावा. (तलम मलमलच्या कापडात पुरचुंडी बांधून मैदा ठेवला तरी चालतो.)
नेहमीप्रमाणे वरणभाताचा कुकर लावतो तेव्ढ्या वेळ कुकर ठेवावा.
कुकर थंड झाल्यावर मूगडाळ घोटून घ्यावी.
मैदा चाळून घ्यावा. म्हणजे वाफेने गुठळ्या झाल्या असल्यास निघून जातात आणि हलका होतो.
मैद्यात चवीप्रमाणे मीठ, तिखट, ओवा, पांढरे तिळ, आवडत असल्यास खरबरित वाटलेले जिरे टाकावे व दोन चमचे गरम तेलाचे मोहन घालून नंतर मुगाच्या शिजवलेले वरण टाकून पिठ घट्ट्सर भिजवून घ्यावे.

सोर्‍याला तेलाचा हात लाऊन पिठ भरून साधारण दोन किंवा तिन वेढ्यांच्या एकसारख्या चकल्या कराव्या व तळाव्यात.

chakli.jpg

अधिक टिपा: 

चकली तळताना तेल चांगले तापवून मग मंद आचेवर चकल्या तळाव्यात.
एक्दम प्रखर आचेवर चकल्या तळल्याने त्या लवकर तळल्या जाउन नंतर थंड झाल्यावर मउ पडतात.
पिठात तेलाचे मोहन जास्त झाले तर चकल्या तेलात तळताना हसतात. विरघळतात.:)
पिठ भिजवताना हळद वापरू नये. चकली तळल्यावर काळी दिसते.

माहितीचा स्रोत: 
जुन्या मायबोलीवरचे माझे पोस्ट. :)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आम्ही नेहमी अशाच चकल्या बनवतो खूप छान होतात. अजून तरी फसल्या नाहीत, आणि डाळ वरणाच्या इतकी शिजवली असली तरी चकली खराब होत नाही. अगदी पंधरा दिवस आरामात टिकेल, पण हा एवढे दिवस तुमच्या घरातच नाही टिकणार. :D:-D

Pages