मूगडाळीच्या चकल्या

Submitted by डॅफोडिल्स on 15 October, 2009 - 05:58
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मूगडाळ १ वाटी
मैदा ३ वाट्या
पांढरे तिळ, ओवा, जिरं आवडी प्रमाणे
लाल मिर्ची पावडर, मिठ चवीप्रमाणे
तळण्यासाठी तेल

क्रमवार पाककृती: 

कुकरच्या एका डब्यात मूगडाळ साधारण वरणाला पाणि घालतो तितके पाणि घालून लावावी.
व कुकरच्या दुसर्‍या डब्यात ३ वाट्या मैदा (सुका) अजिबात पाणि न घालता घट्ट झाकण लाउन ठेवावा. (तलम मलमलच्या कापडात पुरचुंडी बांधून मैदा ठेवला तरी चालतो.)
नेहमीप्रमाणे वरणभाताचा कुकर लावतो तेव्ढ्या वेळ कुकर ठेवावा.
कुकर थंड झाल्यावर मूगडाळ घोटून घ्यावी.
मैदा चाळून घ्यावा. म्हणजे वाफेने गुठळ्या झाल्या असल्यास निघून जातात आणि हलका होतो.
मैद्यात चवीप्रमाणे मीठ, तिखट, ओवा, पांढरे तिळ, आवडत असल्यास खरबरित वाटलेले जिरे टाकावे व दोन चमचे गरम तेलाचे मोहन घालून नंतर मुगाच्या शिजवलेले वरण टाकून पिठ घट्ट्सर भिजवून घ्यावे.

सोर्‍याला तेलाचा हात लाऊन पिठ भरून साधारण दोन किंवा तिन वेढ्यांच्या एकसारख्या चकल्या कराव्या व तळाव्यात.

chakli.jpg

अधिक टिपा: 

चकली तळताना तेल चांगले तापवून मग मंद आचेवर चकल्या तळाव्यात.
एक्दम प्रखर आचेवर चकल्या तळल्याने त्या लवकर तळल्या जाउन नंतर थंड झाल्यावर मउ पडतात.
पिठात तेलाचे मोहन जास्त झाले तर चकल्या तेलात तळताना हसतात. विरघळतात.:)
पिठ भिजवताना हळद वापरू नये. चकली तळल्यावर काळी दिसते.

माहितीचा स्रोत: 
जुन्या मायबोलीवरचे माझे पोस्ट. :)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अखेरीस आज केल्या! Lol पहिलाच प्रयत्न म्हणून अर्धी वाटी मूगडाळीच्याच केल्या! मस्त झाल्या. मैदा असल्यामुळे हसणे बिसणे प्रकार नाही. आता पुढच्या आठवड्यात दिवाळीसाठी ह्याच करणार. थँक्स डॅफो Happy

रोज बघते हि रेसीपी. पण हसणे -फसणे प्रकार झालेत आधी उकडीच्या चकल्यात.
कराव्या का ह्यावेळेला?(विचारात.. )

चकली बिघडली की पदरी निराशा येते मग घरच्या इतर प्राण्यांना थालीपीठ वगैरे मिळतात २-३ दिवस त्याची, तोंडी लावायला माझी निराशा पुराण. Proud

मी ह्या चकल्या करायचा प्रयत्न केला काल पण फसल्या. प्रमाण सांगितल्या प्रमाणेच घेतले होते. पिठ थोडेसे पुरीच्या पिठासारखे मळले तर चकली पाडायला फारच जड जात होते. थोडे पिठ पातळ पण करुन बघितले पण नाहिच झाल्या चकल्या. माझे काय चुकले Sad

वीसेक झाल्या असतील अंदाजे.

कूकरमध्ये वाफवण्याबद्दल डॅफोडिल्सनेच लिहीले आहे मागच्या पानावर- असे केल्याने मैदा हलका होतो, त्यामुळे चकलीही हलकी होते, तिला भाजणीच्या चकलीप्रमाणे नळी पडते आतून.

धन्स पौर्णिमा.. भराभर वाचल्याने मधल्या २-३ पोस्टी मिस्ल्या त्यातच डॅफोडिल्सचीसुद्धा..

मोहनाचे तेल दोन चमचे म्हन्जे नक्की किती आणि कसे प्रमाण घ्यायचे? मापाचा चमचा पोह्याचा घ्यायचा की त्याहून मोठा?
कारण वर कोणाच्या तरी चकल्या फसल्या आहेत, टीप मधे लिहिलेलेच आहे की मोहनाचे प्रमाण जास्त झाले तर चकल्या फसतात. Sad

बापरे चकली पुन्हा वर आली Happy

निंबुडा तु वाटी कोणत्या आकाराची घेतेस.. चकल्या किती मोठ्या करतेस.. दोन वेढ्याच्या तीन वेढ्याच्या.. त्याप्रमाणे किती नग ते ठरेल.. वरील प्रमाणात तीन वेढ्याच्या मध्यम आकाराच्या ६५-७० चकल्या होतात. Happy
मैदा तलम मलमलच्या कापडात ठेउन वाफवुन घेउन मग गार झाल्यावर चाळून घ्यायचा.. म्हणजे तो हलका होतो. चकली मस्त खुट्खुटीत होते.. वातड .. कडक वगैरे होत नाही.

सारीका हो पोह्याचा चमचाच..
डायेट फ्रेक लोकांनी मोहनाच्या मोहात नाही पडले तरी चालेलच Wink
मी मोहना शिवायही करून पाहिल्या आहेत. Happy

पेरू फसल्या म्हणजे काय झाले ? Uhoh

डॅफो, पीठ भिजवून घेतले की ताबडतोब चकल्या करायच्या अशी टीप जुन्या माबोतल्या रेसिपीत आहे. मी त्याप्रमाणेच नेहमी केल्यात, कधी फसल्या/हसल्या नाहीत. पीठ भिजवून ठेवून दिल्याने फसत असतील का?

चकली पाडायला खुप जड जात होती. खुपच ताकद लावावी लागत होती म्हणुन मग पीठ पातळ करुन बघितले तर खुपच चिकट पिठ झाले आणि चकली पण नीट पडली नाही.

मोहन टाकले नाही तरी चकल्या छान होतात असं आईने सांगितलं आहे.. ती कधीच मोहन टाकत नाही या चकल्यांमधे..

मी आजच केल्या चकल्या Happy
पिठ मळताना एकही थेंब वरुन पाणी न घेताही थोडे पातळच झाले, मग थोडा मैदा टाकून पुन्हा मळले.
चकली खुप खुसखुशीत नाही झाली पण चव मात्र एकदम झकास झाली आहे. मी पीठ मळताना मोहन टाकले नाही.

मी हि केल्या आताच. छान झाल्या. (एकाच पदार्थात पेशन्स संपून आता उद्याला काय ते करेन).

मी तेल न घालता(एकही थेंब नाही) व तांदूळ पिठी वापरली. मला वाटते तेल न घातल्याने काही बिघडत नाही. कुरकुरीत व खुसखुशीत झाली.
तेल ज्यास्त पडले, कमी पडले हि कटकटच नाही.
धन्यवाद डॅफोडिल्स!

डॅफो, मस्त झाल्यात ह्या चकल्या. थँक यू.
मी तांदुळाची पीठी वापरली-ती वाफवली नाही. शिजवलेल्या वरणात मिक्स केले. सासुबाईंनी प्रमाणासाठी गाईड केले Happy
आता 'गाभा' तोच असल्यामुळे नवीन रेस्पी लिहीली नाही. Proud (चला मी पळते आता, नैतर आजोबा येतील काठी उगारायला. तसं वयोमानापरत्वे सगळीकडं फिरत नाहीत ते, फक्त काही नातवंडं आवडतात त्यांना! :दिवे:) बाप्रे, पळा!

डॅफोडील्स, तुला ह्या रेसिपीसाठी हज्जारो लाखो थँक्स! तंतोतंत फॉलो केली आणि कुरकुरीत चकल्या बनल्या! Happy

या चकल्या करताना पहिले दोन घाणे नीट निघाले आणि आता चकली टाकली तेलाला फेस येतोय. दूध कसं वर वर येतोय तसं यायला लागलंय. तरी पण मंद आचेवर एक दोन तळल्या आणि तळण बंद केलं. त्या नंतरच्या चकल्या सुरुवातीला कडक होत्या पण नंतर मऊ पडल्या. काय चुकलं? आणखी पीठ आहे पण आता धीर नाही आहे करायला. पीठ खूप घट्ट झालं आहे असं वाटतंय कारण डाळ घट्ट शिजली होती. मी थोडं पाणी घालून पुन्हा मायक्रोवेव्हला गरम केली तरीपण पीठ घट्ट झालंय. नंतर पाणी लावून मळलं तर चालतं का?

वेका,
चकलीचं पीठ नीट मळून घे. पीठ फार घट्ट नको. मायक्रोवेवला गरम करायची गरज नाही. तसंच तेल बदल. बाकी जाणकार सांगतीलच.

वरण गरम केलं होतं पातळ करून. तेल कालच आणलं आहे, कनोल ऑइल. इतरवेळी ऑऑ असतं. त्यामुळे घरातच नव्हतं. आता ते उरलेलं पीठ पुन्हा मळू म्हणतेस?

फार घट्ट नसेल तर नको मळूस. चकली सोर्‍यातून न तुटता, सहजपणे पडत असेल तर पीठ ठीक आहे. नाहीतर पाण्याचा हात लावून सारखं करून घ्यायचं.
तेल बदल म्हणजे कढईत न तळलेलं, कॅनमधलं तेल टाक :). तसंच तेलाचं टेंपरेचर पण नीट मेंटेन्ड करणं गरजेचं आहे.

Pages