स्वा. सावरकरांचे आजवर वाचलेले साहित्य, आंतरजालावर उपलब्ध माहिती आणि इतरही काही संदर्भ वापरुन हा लेख संकलीत केला होता. अर्थात त्यामुळे हा लेख मी लिहीलाय असे म्हणता येइल की नाही कुणास ठाऊक. पण स्वातंत्र्यवीरांचे विचार संकलित करण्याची मेहनत मी जरुर घेतली आहे. हा लेख माबोच्या दिवाळी अंकासाठीदेखील पाठवला होता. पण कुठल्याशा कारणाने (नियमात बसत नसल्याने असेल कदाचित) तो तिथुन साभार परत आला. तेव्हा तो इथे टाकत आहे. धन्यवाद.
..............................................................................................................................................
"आसिंधु सिंधु पर्यन्ता, यस्य भारतभूमिका ।
पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत: I I "
सिंधुस्थान ही ज्याची केवळ पितृभूमी नव्हे, तर पुण्यभूमीही आहे तो हिंदू! सिंधुपासुन सिंधुपर्यंत, अर्थात सिंधुनदीपासुन ते सिंधु म्हणजे सागरापर्यंत पसरलेली ही भुमी म्हणजे हिंदुभुमी आहे आणि प्रत्येक व्यक्ती ,जो कुणी या भुमीला केवळ आपली पितृभुमीच नव्हे तर पुण्यभुमीही मानतो तो हिंदु!मग तो कुठल्याही जाती धर्माचा असेना का! मुळात हिंदु हा केवळ एक धर्म नाहीच आहे, तर ती एक जिवनप्रणाली आहे. 'हिंदुधर्म' हे नाव कोणत्याही एका विशिष्ट धर्माचे वा पंथाचे विशेष नि अनन्य नाव नसून ज्या अनेक धर्मांची नि पंथांची ही भारतभूमी हीच पितृभूमी नि पुण्यभूमी आहे त्या सार्यांना समावेशिणार्या धर्मसंघाचे हिंदुधर्म हे सामुदायिक अभिधान आहे.!
हे आमचे एकजीवन आज ज्या एकाच शब्दात नवीन व्याख्येप्रमाणे व्यक्तविता येते तो अनन्य शब्द आहे 'हिंदू' ! या शब्दाच्या 'हिंदू' या दोन अक्षरांत अगस्तीच्या अंजलीत महासागर तसे तीस कोटी लोकांचे राष्ट्रचे राष्ट्र सामावलेले आहे.किती सार्थ आणि योग्य शब्दात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदु या शब्दाची महती, त्याचा योग्य अर्थ सांगितला आहे. हिंदु या संकल्पनेची व्यापकता, तिचा विस्तार केवढ्या समर्पक शब्दात मांडले गेल आहे इथे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मते आपल्या वंशाच्या मूळ पुरुषांनी आपल्या राष्ट्राला व आपल्या लोकांना देण्याकरिता जे पहिले आणि जवळ जवळ पाळण्यातले नाव निवडले ते सप्तसिंधू अथवा हप्त हिंधू आहे. सिधु नदीच्या समृद्ध खोर्यात राहणारे ते सिंधू. आणि इतर जगातील जवळ जवळ सर्व राष्ट्रे आपणांस ह्याच सिंधू किंवा हिंदू याच नावाने ओळखत असत. बर्याचदा असे म्हणले जाते की हिंदु हे नाव किंवा हा शब्द आपल्याला अरबांकडुन मिळाला. पण सावरकरांच्या मते हिंदू हा शब्द आपणांस अरबांनी दिलेला नाही. प्रेषित महंमदाच्या जन्मापूर्वी, नव्हे अरब हे एक 'लोक' म्हणून ओळखले जाण्यापूर्वीदेखील हे प्राचीन राष्ट्र आपणांकडून व इतरांकडून सिंधू वा हिंदू ह्या स्वाभिमानी नावाने ओळखले जात होते. अरबांनी सिंधू नदीचा शोध लावला हे म्हणणे जितके खरे तितके अरबांनी ह्या शब्दाचा शोध लावला हे म्हणणे आहे
हिंदुत्व, हिंदुधर्म, हिंदुजगत्
हिंदू चळवळीची विचारप्रणाली समजण्याकरिता ह्या तीन शब्दांचा अर्थ नीट समजावून घेणे अत्यावश्यक आहे. हिंदू या शब्दापासून इंग्रजीमध्ये 'हिंदुइझम' (हिंदुधर्म) हा शब्द बनविला आहे. त्याचा अर्थ हिंदू लोक ज्या धर्ममतांना वा मार्गांना अनुसरतात ती धर्ममते वा मार्ग. दुसरा शब्द हिंदुत्व हा त्यापेक्षा अधिक संग्राहक शब्द आहे. हिंदुधर्म ह्या शब्दाप्रमाणे हिंदूंच्या केवळ धार्मिक अंगाचा त्यात समावेश होत नसून त्यात हिंदूंच्या सांस्कृतिक, भाषिक, सामाजिक व राजकीय अंगांचाही समावेश होतो. 'Hindu Polity' ह्या इंग्रजी शब्दाशी तो जवळ जवळ समानार्थी शब्द आहे. त्याचे जवळ जवळ तंतोतंत भाषांतर Hinduness ह्या शब्दाने करता येईल. हिंदू जगत् Hindudom ह्या तिसर्या शब्दाचा अर्थ संकलितपणे हिंदू म्हणून संबोधिले जाणारे सर्व लोक. ज्याप्रमाणे इस्लामने मुसलमानी जगताचा किंवा ख्रिश्चनडम ह्या शब्दाने ख्रिस्ती जगताचा बोध होतो त्याप्रमाणे ह्या शब्दाने हिंदुजगताचा सामुदायिक बोध होतो.
स्वातंत्र्यवीर अगदी ठामपणे प्रतिपादन करतात की हिंदुत्व हा केवळ एक शब्द नव्हे, तर तो इतिहास आहे. ते मनापासुन समग्र हिंदु बांधवाना आवाहन करतात की अग्निहोत्री ब्राह्मण ज्याप्रमाणे यज्ञकुंडात अग्नी प्रज्वलित ठेवतो त्याप्रमाणे तुम्ही हिंदुत्वाच्या भावनेचे स्फुल्लिंग जतन करुन ठेवा. योग्य वेळ येताच त्याला फुंकर घालून भरतखंडभर हिंदुत्वाचा डोंब उसळून दिला की काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत हिंदुत्वाच्या भावनेने जनता भारली जाईल
हिंदुत्व का हवे? त्याचा आपल्याला काय फायदा होवु शकेल हे विषद करताना स्वातंत्र्यवीर सावरकर सांगतात कीं असा एक दिवस जरुर उगवेल किं समग्र मनुष्यजातीस ह्या शक्तीस (हिंदुत्व) तोंड द्यावे लागेल .हिंदुस्थानाला पितृभूमी व पुण्यभूमी मानणारे, असा इतिहास असणारे व समान रक्त व संस्कृती ह्यांनी बांधलेले कोट्यावधी लोक सर्व जगाला आपले म्हणणे अधिकारवाणीने सांगू शकतील. स्वातंत्र्यवीर एका आंतरिक अभिमानाने सांगतात की ज्यावेळी हिंदू लोक जगाला काही सांगण्याच्या स्थितीत असतात तेव्हा त्यांचे सांगणे गीतेच्या वा बुध्दाच्या उपदेशाहून फार वेगळे असत नाही हेही तितकेच खरे आहे. हिंदू जेव्हा हिंदू राहत नाही तेव्हा तो अत्यंत उत्कटपणे हिंदू असतो व शंकराप्रमाणे सर्व पृथ्वी वाराणसी मानतो. वाराणसी मेदिनी ! मानतो किंवा तुकारामाप्रमाणे 'आमुचा स्वदेश ! भुवनत्रयामध्ये वास ! ' असे उद्गारतो. हे बंधूंनो ! विश्वाच्या मर्यादा - तेथे माझ्या देशाच्या सीमा आहेत !
हिंदुस्थानात सुखाने नांदत असणार्या अनेक - नानाविध धर्मांविषयी बोलताना सावरकरांचा कंठ भरुन येत असे. त्यावेळी त्यांच्या चेहर्यावर एक अलौकीक असे तेज, एक समाधान पाहायला मिळे. विश्व हिंदु परिषदेच्या एका सभेत बोलताना स्वातंत्र्यवीर म्हणाले होते.
"बहुसंख्य हिंदूंच्या धर्माला सनातन धर्म किंवा श्रुति-स्मृति-पुराणोक्त धर्म अथवा वैदिक धर्म ह्या प्राचीन व मान्य संज्ञांनी संबोधिता येते. इतर हिंदूंच्या धर्मांना त्यांच्या त्यांच्या मान्य नावांनी जसे शीख धर्म किंवा आर्यधर्म किंवा जैन धर्म किंवा बुध्द धर्म संबोधिता येईल. जेव्हा ह्या सर्व धर्मांना एकत्रित नाव देण्याची आवश्यकता येईल तेव्हा हिंदुधर्म असे व्यापक नाव देणे उचित होईल. ह्यामुळे अर्थहानी होणार नाहीच, परंतु तो अधिक अचूक व नि:संदिग्ध होईल व आपल्या लहान समाजातील संशय व मोठया समाजातील राग दूर करुन आपला समान वंश व समान संस्कृती दर्शविणार्या आपल्या प्राचीन ध्वजाखाली पुन्हा एकदा सर्व हिंदूंना एकत्र करील..
इतर धर्मांप्रमाणे (उदा. मुस्लिम - कुराण, ईसाई- बायबल) हिंदुधर्माचे एक धर्मपुस्तक नाही हे चांगलेच आहे. कारण यामुळे आपला धर्मविकास थांबला नाही. आमचे धर्मतत्वही कोणत्या पुस्तकाच्या दोन पुठ्ठयात सामावू शकणार नाही. ह्या विश्वाच्या दोन पुठ्ठयांमध्ये जितके सत्य नि ज्ञान विस्तृत पसरलेले आहे तितके आमचे धर्मपुस्तक विस्तृत होईल.
हिंदुधर्म क्लैब्याची गाथा नाही. हिंदुधर्म नि:संशय सात्विक, क्षमाशील आहे. हिंदुधर्म क्रोधशीलही आहे. 'क्लैब्यं मा स्म गम: पार्थ' ही हिंदुधर्माची गर्जना आहे. 'अहिंसा परम धर्म:' ही ज्या हिंदुधर्माची व्याख्या आहे त्याच हिंदुधर्माची अगत्याची व तेजस्वी आज्ञा आहे की 'आततायिनमायान्तं हन्यादेवाविचारयन्' आणि त्या दोन्ही आज्ञांचा समन्वय, हिंदुधर्मच उत्तम प्रकारे लावू शकतो काही झाले तरी बुध्दिवादाच्या दृष्टीनेही एकंदरीत पाहता धर्मांत ग्राह्यतम धर्म असेल तर तो हिंदुधर्म होय !"
आपल्या हिंदुत्वाच्या कल्पनेबाबतीत सावरकर अतिशय स्पष्ट आहेत. योग्य ते बदल स्विकारण्याची त्यांची तयारी आहे. त्यासाठी प्रसंगी आपली रुढी-परंपरा यांच्या चौकटी मोडायला देखील ते तयार असत हे त्यांच्या आचार विचारातुन ठामपणे स्पष्ट होत असे. रत्नागिरीतील पतित पावन मंदीर हे याचे स्पष्ट उदाहरण आहे. मानवाच्या, मानव्याच्या भल्यासाठी आपल्या रुढी परंपरा मोडायची, चौकटी तोडायची त्यांची नेहेमीच तयारी असे. धर्म आणि राष्ट्रधर्म या संकल्पना स्पष्ट करताना सावरकर सांगतात किं हिंदीधर्म हा कुठल्याही रुढी परंपरांमध्ये, तथाकथीत चौकटीत अडकुन राहणारा नाही. बदलत्या समाजाला पोषक होइल अशा पद्धतीने आपले स्वरुप बदलत राहणे हा हिंदुधर्माचा स्वभावच आहे. पण फक्त तुम्ही आमच्याकडुनच जर बदलण्याची अपेक्षा करत असाल तर ते सर्वस्वी चुकीचे आहे. जर मुस्लिम , ख्रिश्चन वा इतर बांधव त्यांची मुसलमानत्व, ख्रिश्चनत्व इत्यादी 'त्वे' सोडीत असतील तर माझे हिंदुत्वही मानुषकेत विलय पावेल.
अगदी याच पद्धतीने माझे राष्ट्रीयत्वही - हिंदीपणही मानवराष्ट्रात तेव्हा विलय पावेल जेव्हा इंग्लिशपण, जर्मनपण इत्यादीपणा लुप्त होऊन फक्त मानवता, मनुष्यपणा तेवढा जगात, मनुष्यमात्रात सुखेनैव नांदू लागेल ! आज देखील जो खरा मनुष्यवादी (humanitarian) असेल त्याच्यापुरते त्याच्याशी देखील मी सर्व भेदभाव सोडून वागेन.
स्वातंत्रवीर सावरकरांनी भविष्यकाळाचाही विचार करुन ठेवलेला आहे. ते म्हणतात कि एखाद्या भविष्यकाळी हिंदू हा शब्द केवळ हिंदुस्थानचा नागरिक वाचक होऊ शकेल. जेव्हा सर्व सांस्कृतिक व धार्मिक दुराग्रह आक्रमक गर्विष्ठपणाशी वचनबध्द असलेल्या शक्तीचे विसर्जन करतील व धर्म 'वाद' म्हणून न राहता ज्या समान पायावर मानवी राज्य ऐश्वर्याने व दृढपणे उभे राहील अशा पायाच्या मुळाशी असलेल्या चिरंतन तत्वांचा केवळ समान संचय म्हणून राहतील, तेव्हा हा दिवस उगवेल. भक्तिभावाने इच्छा करावी अशा ह्या सिध्दीची पहिली रेखासुध्दा क्षितिजावर दिसत नसताना कठोर वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करणे मूर्खपणाचे ठरेल. जोपर्यंत धोकादायक युध्दघोषणांकडे झुकणार्या मतांचा त्याग इतर प्रत्येक वादाने केलेला नाही तोपर्यंत एकजीवता व सामर्थ्य निर्माण करणारी बंधने विशेषत: समान नाव व समान ध्वज ही बंधने शिथिल करणे कोणत्याही सांस्कृतिक वा राष्ट्रीय एकांकाला परवडणार नाही.
"हिंदुस्थान" या नावाबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकरांना अतिव आदर, अभिमान होता. ते अभिमानाने सांगत की आपल्या देशाचे सर्वात प्राचीन नाव, ज्याविषयी आपणापाशी आधार आहे, ते सप्तसिंधू वा सिंधू आहे. भारतवर्ष हे नावसुध्दा नंतरचे अभिधान आहे. आणि त्याचे आवाहन व्यक्तिविषयक आहे. मनुष्य कितीही महान् असो, जसजसा काळ जातो तसतसा त्याचा गौरव कमी कमी होत जातो.संस्कृतमधील सिंधू शब्दाने सिंधू नदीचाच नव्हे तर समुद्राचाही ,दक्षिण द्वीपकल्पाला परिवेष्टणार्या समुद्ररशनेचा बोध होत असल्यामुळे हा एक शब्द आपल्या देशाच्या जवळ जवळ सर्व सीमा दर्शवितो. हिंदुस्थान ह्या शब्दाने मुख्य राजकीय व सांस्कृतिक विधेय जितके वक्तृत्वपूर्णपणे प्रकट होते तितके आर्यावर्त, दक्षिणापथ, जंबुद्वीप आणि भारतवर्ष ह्या शब्दांनी होऊ शकत नव्हते.
आपल्या या पितृभुमीबद्दल सावरकर अतिव श्रद्धेने, आदराने स्पष्ट करतात की हिंदुस्थान आमची पितृभुमीच नव्हे तर पुण्यभूमी आहे. ही परम पावन भारतभूमी, हे सिंधुस्थान, सिंधूपासून सिंधूपर्यंतची ही भूमी आमची पुण्यभूमी आहे. ह्या भूमीत आमच्या धर्मविचारांच्या संस्थापकांना व ऋषींना वेदांचा साक्षात्कार झाला; वैदिक ऋषींपासून ते दयानंदापर्यंत, जिनापासून महावीरापर्यंत, बुध्दापासून नागसेनापर्यंत, नानकापासून गोविंदापर्यंत, बंदापासून बसवापर्यंत, चक्रधरापासून चैतन्यापर्यंत, रामदासापासून राममोहनापर्यंत आमच्या गुरुंनी व धार्मिक पुरुषांनी जन्म घेतला व ते वाढले. तिच्या मार्गातील धुळीत आमच्या प्रेषितांचे व गुरुंचे पदरव ऐकू येतात. तिच्या नद्या व तिची उपवने पवित्र आहेत. कारण चंद्रप्रकाशात त्यांच्या घाटावर किंवा सायंकाळच्या छायेत बुध्दाने किंवा शंकराने जीवन, मनुष्य, आत्मा, ईश्वर, ब्रह्म आणि माया ह्यांच्या गहन प्रश्नांवर वाद व चर्चा केली. प्रत्येक डोंगर व प्रत्येक वृक्षाच्छादित खोरे कपिलाच्या, व्यासाच्या, शंकराच्या व रामदासाच्या स्मृतीने भरलेले आहे. येथे भगीरथ राज्य करतो, येथे कुरुक्षेत्र आहे. वनवासाला जाताना रामचंद्राने पहिला विश्राम येथेच घेतला. तेथेच जानकीने सोनेरी हरिण पाहिला व त्याला मारण्याचा आपल्या प्रियकराशी प्रेमाने हट्ट घरला. ज्या बासरीने गोकुळातील प्रत्येक हृदय मोहनिद्रेत असल्याप्रमाणे एका लयीत नाचू लागेल अशी बासरी त्या दैवी गुराख्याने वाजविली. येथे बोधिवृक्ष आहे व येथे मृगवन आहे. येथेच महावीराला निर्वाण प्राप्त झाले. येथेच भक्तांच्या मेळाव्यात बसून 'गगन थाल रविचंद्र दीपक बने' ही नानकाने आपली आरती म्हटली. येथे गोपीचंद राजाने गोपीचंदजोगी होण्याची प्रतिज्ञा केली व भिक्षापात्र घेऊन मूठभर भिक्षेकरिता आपल्या बहिणीचे दार ठोठावले. येथेच हिंदू म्हणून मरण्याच्या अपराधाकरिता बंदा बहादुराच्या मुलाचे वडिलांच्या डोळयांसमोर तुकडे तुकडे करण्यात येऊन त्याचे हृदय वडीलांच्या तोंडात कोंबण्यात आले. येथील प्रत्येक दगड हौतात्म्याची कथा सांगू शकेल. हे माते ! तुझ्या भूमीचा प्रत्येक तसू यज्ञभूमी आहे. जेथे कृष्णसार सापडले तेथेच नव्हे तर काश्मीर ते सिंहल ही ज्ञानयज्ञाने पवित्र झालेली यज्ञीयभूमी आहे. म्हणून प्रत्येक हिंदूला, मग तो साधू असो वा संताळ ही भारतभूमी, हे हिंदुस्थान पितृभू आणि पुण्यभू आहे.
आपली हिंदुत्वाची व्यापक संकल्पना मांडल्यावर ते ठामपणे सांगतात की हिंदुस्थान हा हिंदूंचाच देश आहे. वस्तुत: जो समाज देशात बहुसंख्य असतो त्यांचाच तो देश मानला जाण्याची प्रथा सर्व जगात आहे. या नात्याने तर हिंदुस्थान हिंदूंचा आहेच; पण त्याशिवायही तो हिंदूंचा असल्याचे आणखी एक निश्चित गमक सांगता येईल. ते म्हणजे हिंदुस्थानच्या उध्दाराचा प्रयत्न कोणी केला ते पाहणे, हे होय. या देशाच्या स्वातंत्र्याच्या १८५७ पासून सुरु झालेल्या लढयात कोणी खरा त्याग केला ? - हिंदूंनी का मुसलमानांनी ?
ते पुढे स्पष्ट करतात की हिंदुस्थान ह्या नावाने अहिंदू बांधवांची मानहानी होत नाही, काही नुकसान होत नाही. चीनमध्ये कोटयावधी मुसलमान आहेत. ग्रीस, पॅलेस्टाईन इतकेच काय पण हंगेरी, पोलंडमध्येही त्यांच्या राष्ट्रघटकांत हजारो मुसलमान आहेत पण तेथे ते अल्पसंख्य, केवळ एक जाती आहेत. आणि त्या देशांना त्यांतील मोठया बहुसंख्येने असलेल्या वंशाची वसाहतस्थाने म्हणून रुढ असलेली प्राचीन नावे बदलण्यासाठी तेथे कोणी अल्पसंख्य जातीच्या अस्तित्वाचे कारण पुढे करीत नाही. तेथील मुसलमानांनी ही नावे विकृत केली नाहीत वा करण्यास धजले नाहीत. प्रसंग येताच पोलिश मुसलमान, ग्रीक मुसलमान , किंवा चिनी मुसलमान अशा नावांनी संबोधिले जाण्यात समाधान मानतात. त्याचप्रमाणे आपल्या मुसलमान देशबंधूंनी राष्ट्रीय किंवा प्रादेशिक दृष्टया आपला निर्देश करताना हिंदुस्थानी मुसलमान म्हणून करावा. तसे करण्यात त्यांच्या धार्मिक वा सांस्कृतिक स्वतंत्र अस्तित्वास बाधा येत नाही.
हिंदुस्थान ह्या आपल्या मातृभूमीच्या रुढ नावाने ऋग्वेद काळातील सिंधूपासून आपल्या पिढीतील हिंदू शब्दापर्यंत जी अखंड परंपरा व्यक्त होते तिचा उच्छेद वा तिच्याशी प्रतारणा हिंदूंनी करु नये. जर्मनांचा देश जसा जर्मनी, इंग्रजांचा इंग्लंड, तुर्कांचा तुर्कस्थान नि अफगाणांचा अफगाणिस्थान, त्याचप्रमाणे हिंदूंचा देश म्हणून हिंदुस्थान ह्या नावानेच आपले स्थान जगाच्या नकाशात चिरंतन खोदून ठेविले पाहिजे
आपल्या साहित्यातुन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी "राष्ट्र आणि हिंदुराष्ट्र" याबद्दलचे आपले विचारही खुप समर्पकपणे आणि पर्खडपणे मांडले आहेत. ते म्हणतात....
"जगातील मानवांनी एक व्हावे हीच आमची सदिच्छा आहे. जगातील मानवांनी एक होऊन त्यांचे एक मानवी राष्ट्र व्हावे असे आम्हांसही वाटते. आमचा वेदान्त तर याही पुढे जाऊन दगड नि मनुष्य हे सारखेच असल्याचे सांगतो. पण आपण परिस्थितीनुरुप व्यवहार केला पाहिजे. राष्ट्रवाद कालबाह्य नाही ,राष्ट्रवाद पाचशे वर्षे तरी जिवंत राहणार आहे. त्यानंतर काय होईल ते सांगता येत नाही. त्यानंतर पृथ्वी एक राष्ट्र होऊन मंगळ हे दुसरे राष्ट्र होईल. सिंधू ह्या शब्दाने व्यक्त होणारी कल्पना राष्ट्रवाचक आहे, केवळ भौगोलिक नाही
'हिंदू'शब्द मूलत: देशवाचक, राष्ट्रवाचक आहे. याचे मुख्य अधिष्ठान आसिंधु सिंधू अशी ही भारतभूमिका आहे. 'आसिंधु सिंधू' अशा त्या भारतभूमिकेत अत्यंत प्राचीन काळापासून ज्यांचे पूर्वज परंपरेने निवसत आले, ज्या राष्ट्रात प्रचलित असलेली सांघिक संस्कृती, घडलेला इतिहास, बोललेल्या भाषा, अनुसरलेले धर्म; ज्यांचे संस्कृती, इतिहास, भाषा, धर्म आहेत ते सारे हिंदु होत. त्या हिंदुराष्ट्राचे घटक होत. -
हिंदू हे केवळ एक राष्ट्र नसून ती एक जाती आहे. उत्पत्ती करणे ह्या अर्थाच्या जन धातूपासून जाती हा शब्द सिध्द झाला असून त्याचा अर्थ बंधुभाव, समान रक्त अंगात खेळत असलेला, एक उगम असलेला वंश असा होतो सप्तसिंधूतील लोक जसजसे हिंदुस्थानभर पसरत गेले तसतसे त्यांच्यात विविध वंशाचे मिश्रण, अनुलोम-प्रतिलोम विवाह इत्यादीमुळे झाले. जाती हा शब्द ह्या अर्थी वापरलेला आहे.राष्ट्रीय व वांशिक दृष्टिकोनातून पाहिले तर आपली तीर्थे सर्व हिंदू जातीचा समान वारसा आहे आपले सण, उत्सव, संस्कार व आचार समान असहेत. हिंदु कोठेही असो मग तो शीख, जैन, ब्राह्मण वा पंचम असे तो दसरा, दिवाळी, रक्षाबंधन आणि होळी ह्यांचे स्वागत करतो.ज्या तीर्थांचे, पर्वतांचे, नगरांचे व नद्यांचे स्मरण हिंदू करतात ती कोणाही एक प्रांतातील नाहीत. तर ती अखिल हिंदुस्थानातील आहेत.शीखांचे अमृतसर, वैदिकांची काशी, बौध्दांची गया ही सारी आम्ही हिंदूंची सामायिक नि सारखीच पुण्यक्षेत्रे होत कलाकृती वा वास्तू, मग त्या वैदिक वा अवैदिक विचारांच्या प्रतिनिधी असोत, आपल्या वंशाचा समान वारसा आहे हिंदू निर्बंध व त्यांची आधारभूत तत्वे ह्यांतील तपशिलांत वा आदेशांत काही ठिकाणी परस्पर विरोध भासत असले तरी त्यांचा इतका एकावयवी विकास झालेला आहे की काल व देश ह्या स्थितीतून ही त्यांची वैशिष्टये टिकून राहिली आहेत
हिंदु धर्मामधील विविध समाजरचना, तसेच वैचित्र्यांबद्दल बोलताना ते विशद करतात......
कोणताही समाज वा राष्ट्र एकजीव होऊन जे जगते आणि त्यांच्याव्यतिरिक्त एतर समाजांशी होणार्या संघर्षातुनही तग धरते त्या लोकांमध्ये आपसात वैषम्य असे मुळीच नसते म्हणून नव्हे. कारण कुटुंब म्हटले की कुटुंबात व्यक्तिवैचित्र्य नि मतभिन्नता असतेच. मग कोटी कोटी व्यक्तींच्या एकजीवी समाजाची वा राष्ट्राची गोष्टच बोलणे नको. एका साच्यात पाडलेल्या गणपतीच्या मूर्तीप्रमाणे त्या कोटी कोटी व्यक्ती एकसाची असणे अशक्यच. परंतु त्या समाजातील पक्षोपक्षांची ही अंतर्गत विषमता इतर कोणत्याही समाजाशी असलेल्या त्यांच्या विषमतेहून अगदी कमी असते. आणि त्या समाजातील अनेक पक्षांना एकजीव करणारी महत्वाची बंधने दुसर्या समाजाशी असणार्या त्यांच्या संबंधांपेक्षा आत्यंतिक आकर्षक नि बळकट असतात म्हणून ते समाज वा राष्ट्र तसे पृथक नि एकजीव राहू शकते.
हिंदुराष्ट्रातील विविध विभागांचे परस्पर धोरण काय असावे ? यावरही सावरकरांची मते खुप उद्बोधक आणि क्रांतिकारक आहेत.
संख्येचे, भौगोलिक किंवा वांशिक लाभ निसर्गत: व ऐतिहासिक दृष्टया ज्यांना लाभलेले नाहीत असे लोक इतरांबरोबर देवाण घेवाण करण्याचे प्रयत्न करीत आहेत. जन्मसिध्द अधिकारांनी प्राप्त झालेले लाभ ज्यांना माहीत नाहीत व त्याहूनही वाईट म्हणजे त्यांचाच तिरस्कार करतात अशांचा सत्यानाश होवो ! कागदाच्या कपटयांतून किंवा अडचणीत उत्पन्न झालेल्या बंधंनांनी नव्हे तर रक्ताच्या, जातीच्या, संस्कृतीच्या बंधनांनी झालेल्या प्राचीन, नैसर्गिक व एकजीवी एकीकरणापासून फुटणे व त्यालाच नाशिणे हे तुमच्यापैकी जैन समाजी, सनातनी , शीख वा कोणत्याही उपविभागाला परवडणार आहे का? असलेले बंध दृढ करा. ज्या भिंतीची उपयुक्ततता संपली आहे अशा भिंती, जाती, रुढी, विभाग मोडून टाका.आमच्या वैदिक, जैन, बुध्द, शीख, लिंगायत प्रभृती यच्चयावत् हिंदू बंधूंनी आपले मतभेद धार्मिक क्षेत्रापुरते काय ते ठेवून आपणा सर्वांना जी अनेकविध सामाजिक जीवनाची प्रिय बंधने आणि नात्यागोत्याचे स्नेहसंबंध आज शतकोशतके एकजीवी असे एक महान् राष्ट्र बनवीत आले आहेत, त्या स्नेहसंबंधांनाच शक्यतो जोपासीत राहावे, यातच आपल्या सगळयांचे कल्याण आहे
त्यांच्यामते हिंदुस्थानात हिंदू ही 'जात' होऊ शकत नाही. हिंदुस्थानात आम्हांस एक जाती म्हणणे मूर्खपणाचे आहे. जर्मनीत 'जर्मन' हे राष्ट्र आहे आणि ज्यू एक जात आहे. तुर्कस्थानात तुर्क हे एक राष्ट्र आहे. व अरब वा आर्मेनियन अल्पसंख्य जाती आहेत. त्याचप्रमाणे हिंदुस्थानात हिंदू एक राष्ट्र आहेत व अल्पसंख्य मुसलमान वा ख्रिश्चन या एक जाती आहेत
वैदिक काळापासून निदान पाच सहस्त्र वर्षे तरी आपले पूर्वज आपल्या लोकांचा धार्मिक, वांशिक, सांस्कृतिक नि राजकीय दृष्टया एकात्म असा गट घडवून आणीत होते. त्या क्रियेला स्वाभाविकपणे विकास पावता जे फळ आले ते म्हणजेच वैदिक काळातील त्या सिंधूचेच आज सबंध हिंदुस्थानभर पसरलेले आणि हिंदुस्थानालाच आपली एकमेव पितृभू नि पुण्यभू मानीत असलेले असे हिंदुराष्ट्र होय. कदाचित चिनी राष्ट्र वर्ज्य केल्यास जगातील दुसर्या कोणत्याही राष्ट्राला आपल्या हिंदुराष्ट्रासारख्या आपल्या जीवनाच्या नि विकासाच्या अखंड सातत्यावर अधिकार सांगता येणार नाही. हिंदुराष्ट्र हे काही पावसाळयातल्या कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे उगवलेले नाही. ते एखाद्या तहातून उत्पन्न झालेले नाही. ते निव्वळ कागदी खेळणे नाही. किंवा ते एखाद्या मागणीप्रमाणे घडविलेले नाही. अथवा ती एखादी चालचलाऊ सोय नाही. ते ह्याच भूमीतून वर आलेले आहे नि ह्या भूमीतच त्याची मुळे खोल नि दूरवर पसरलेली आहेत. मुसलमानांचा किंवा जगातील अन्य कोणाचा द्वेष करण्याकरिता म्हणून काही तरी लावलेला शोध नाही. तर आपली उत्तर सीमा सांभाळणार्या हिमालयाप्रमाणे ते एक भक्कम आणि प्रचंड सत्य आहे.
आपल्या आचारातुन, विचारातुन आपल्या साहित्यातुन स्वा. विनायक दामोदर सावरकर सर्वे हिंदुस्थानवासीयांना एक हृद्य आवाहन करतात.....
"आपल्या पितामहांनी मराठा व शीख हिंदु साम्राज्याच्या पतनाच्या वेळी जो तेथेच सोडून दिला तो आपल्या राष्ट्रीय जीवनाचा धागा आपण हिंदूंनी पुन्हा उचलून हाती धरावा. आत्मविस्मृतीमुळे क्षय झालेल्या आपल्या हिंदुराष्ट्राच्या जीवनाचे आणि विकासाचे आपण पुनरुज्जीवन केले पाहिजे, त्याला समाधीतून पुन्हा उठविले पाहिजे प्रामाणिक व भोळसट अशा हिंदूंच्या हे स्पष्ट ध्यानात आले पाहिजे की सर्वसामान्य राष्ट्रीय जीवनाशी मुसलमानांनी समरस होण्याचे नाकारले म्हणजे नकारात्मक दृष्टीने सुध्दा हिंदूंचे एक राष्ट्र उरते.
राष्ट्राचा मोठेपणा त्याच्या ध्येयातून व्यक्त होतो. राष्ट्राचे स्वरुप त्याने आपल्यापुढे ठेवलेल्या ध्येयावर अवलंबून असते. संकुचित ध्येयाच्या राष्ट्रांनी भूतकाळात चिरंतन मोठेपणा प्राप्त केलेला नाही. राष्ट्राला महानता व वैभव प्राप्त करुन देण्याकरिता उदात्त ध्येय असणे आवश्यक आहे...
माझा हा वारसा मी तुम्हांस देत आहे
वटवृक्षाचे बीज मोहरीहून लहान असते पण त्या बीजात जी स्फूर्ती असते, जी वल्गना असते ती वाढता वाढता तिचा प्रचंड वटवृक्ष बनून त्याखाली गाईची खिल्लारे विसावा घेतात, उन्हाने श्रांत झालेल्यांना तो वटवृक्ष सावली देतो.
मलाही वल्गना करु द्या ! माझे गाणे मला गाऊ द्या !
या जगात आपणाला जर हिंदुत्वाचे मानाचे राष्ट्र म्हणून जगावयाचे असेल तर तसा आपला अधिकार आहे आणि ते राष्ट्र हिंदुध्वजाखालीच स्थापन झाले पाहिजे. या नाही तरी पुढल्या पिढीत ही वल्गना खरी ठरेल.
माझी वल्गना खोटी ठरली तर मी वेडा ठरेन. माझी ही वल्गना खरी ठरली तर मी प्रॉफेट ठरेन. माझा हा वारसा मी तुम्हाला देत आहे!
त्या महान द्वेष्ट्या समाजसुधारकाला, महान तत्वचिंतकाला, हिंदुत्वाचा खरा खुरा अर्थ समजलेल्या त्या महान देशभक्ताला माझे लाखो प्रणाम!
जय हिंद !
विशाल कुलकर्णी
संदर्भ : १. सहा सोनेरी पाने : स्वा. सावरकर
२. हिंदुत्व : स्वा. सावरकर
३. Savarkar & Hindutva : The Godse Connection by A.G. Durrani
४. www.savarkar.org
>> धर्माभिमानासाठी धर्मशिक्षण
>> धर्माभिमानासाठी धर्मशिक्षण मिळणं अत्यावश्यक आहे. जे मुस्लिमांच्या आणि ख्रिश्चनांच्या मुलांना अल्पसंख्य म्हणून शाळांतून मिळतं. तसं हिंदूंना मिळत नाही, कारण हे सरकार निधर्मी आहे ना! >>> न मिळायला काय झाले? हिंदुसाठी वेद आणिरामरक्षा शिकवणार्या शाळा/ गुरुजी आहेत की..
अशा शाळा अत्यल्प आहेत (उदा. घैसास गुरूजींची वेदपाठशाळा, आळंदीला नृसिंह सरस्वतींच्या समाधी मंदिरात असलेली कीर्तन व वेदपठण शिकविणारी शाळा) आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्यातील शिक्षणाला सरकारी मान्यता नाही. याउलट चर्च व मदरसे यांनी चालविलेल्या शाळांना व त्यातील शिक्षणाला (तिथल्या धार्मिक शिक्षणासहीत) सरकारी मान्यता आहे व त्यांना सरकारी अनुदान पण मिळते.
बाकी तुमचं चालू द्या!
स्वात्ट्त्र्य मिळून ६० वर्शे
स्वात्ट्त्र्य मिळून ६० वर्शे तर झाली आहेत.. आपल्या सरकारची अनुदाने आता सुरु झाली आहेत. पण त्याआधी या संस्था स्वतःच्या स्वतःच चालत होत्या... त्या काळात हिंदुनी अशा किती शाळा उघडल्या आणि चालवल्या? त्या शाळेत सगळ्या हिंदुना प्रवेश होता का?
<<हे काय संस्कृत आहे
<<हे काय संस्कृत आहे का?
बृहन्नारदी पुराण हे आज प्रथमच ऐकले.. १८ पुराणात हिंदुस्तानचा कुठे उल्लेख नाही.. या एकाच कुठेतरी कोपर्यात सापडलेल्या पुराणात मात्र हिंदुस्तान , इंडियन हे शब्द मिळाले ! आश्चर्यच नै!>>
अच्छा म्हणजे १८ पुराणे केवळ प्राचीन व बाकीची प्राचीन नाहीत का??
विष्णुपुराणात भारत असा उल्लेख आहेच की तसेच इतर ग्रंथात आर्यावर्त, जंबुद्वीप असेही उल्लेख आहेत, एकच उल्लेख सर्व ठिकाणी नाहीत कारण त्यावेळी सेक्युलर लोक कमी असतील बहुतेक.
भारत उल्लेख आहे हिंदुस्थान उल्लेख आहे व त्यावेळी भारत की हिंदुस्थान असे वादच नव्हते पण हल्ली हिंदुस्थान म्हटल की टीका होते, असे का? व हाच आमचा आक्षेप आहे, भारत शब्दाला विरोध नाही कारण तोही प्राचीन शब्द आहे पण म्हणून हिंदुस्थानला विरोध का??
सावरकरांनीही व्याखा करताना भारताचा उल्लेख केलाच आहे.
"आसिंधु सिंधु पर्यन्ता, यस्य भारतभूमिका ।
पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत: I I "
<<का हे खरे? का दोन्ही खोटे? हे आता हिंदुत्ववादीच जाणोत! Again the exact location of this verse in the Purana is missing, हे तिथे स्पस्श्टपणे दिलेले आहे.. श्लोक कुठल्या पुस्तकात , कुणी कधी लिहिला हे मात्र माहीत नाही, पण हिंदुत्ववाल्याना असा प्राचीन (! ) श्लोक मात्र किती सहजपणे मिळतो नै!! कोण बिंदुसागर म्हणतो , कोण हिंदुसागर म्हणतो!>>
तेच सांगायचा प्रयत्न करतोय की वेगवेगळे उल्लेख आहेत, पण केवळ 'हिंदुस्थान' शब्दाला विरोध का?
<<हा देश हिंदुस्थान आहे
<<हा देश हिंदुस्थान आहे म्हणे. पुरावा काय तर बृहन्नारदी पुराण !! .. आणि साक्ष कुणाची तर पाकिस्तानच्या क्रिकेट समालोचकांची ! हिंदुत्वाचा विजय असो!>>
आमच म्हणण आहे की ह्या देशाला हिंदुस्थानही म्हणत असत, 'केवळ हिंदुस्थान' असे नाही म्हणालो.
बरीच नावे होती त्यापैकी एक हिंदुस्थान.
मी सा़क्ष नाही दिली माझा मतितार्थ होता की आमच्या 'हिंदुस्थान' म्हणण्यात आत्मीयता आहे व त्यांच्या म्हणण्यात खोचकता.
आपण कितीही शिवाजी महाराज, मराठे, जाट, शीख ह्या लढवय्यांना सेक्युलर ठरवायचा प्रयत्न केला तरी पाकिस्तानच्या पुस्तकात त्यांचा उल्लेख हिंदू म्हणून व ते लढले हिंदुपदपादशाहीसाठी असाच असतो.
<<इथे 'धर्माधिष्ठीत' राज
<<इथे 'धर्माधिष्ठीत' राज आणायचे व ते तालिबान किंवा खोमेनीने आणले त्या पद्धतीचे आणायचे हीच तुमची आंतरिक ऊर्मी. यालाच लोक 'हिडन अजेंडा' म्हणतात.>>
अजिबात नाही, आमच म्हणण आहे की कोणालाही धर्माच्या नावावर विशेष अधिकार द्यायचे नाहीत, जे लिहिल आहे म्हणजे धर्मनिरपेक्ष राष्ट्र ते अमलात आणा इतकच म्हणण आहे. म्हणायचे धर्मनिरपेक्ष राष्ट्र व समान नागरी निर्बंधाला विरोध करायचा, सच्चर समिती स्थापून अजून विशेष अधिकार द्यायचे असा 'हिडन अजेंडा' नाही आमचा.
<<अन बादवे,
समजा, शाहबानो प्रकरणी काँग्रेसने खाल्ले शेण. तर वाजपेयीजींनी भाजपाच्या कारकिर्दीत का त्या तमाम घटनादुरुस्त्या केल्या नाहीत हो? ज्या नेहेमी डांगोरा पिटून सांगितल्या जातात - विशेषतः काश्मिर बाबत? हात बांधून ठेवले होते का?>>
आहो शहाबानोवेळी काँग्रेस बहुमतात होती, विक्रम होता मतांचा.....पण वाजपेयी काळात ते भाजपचे सरकार नव्हते म्हणजे भाजप बहुमतात नव्हते, NDA सरकार होत...बर्याच पक्षांची खिचडी होती.
<<यालाच म्हणतात शेजारचा
<<यालाच म्हणतात शेजारचा मुसलमान हा युक्तिवाद. या देशात जन्मलेले सर्व, या भारत देशाला पितृभूमी म्हणतात. अन हीच त्यांची (पुण्य)कर्म करायची भूमी असते.>>
तो हिंदुत्व प्रबंध नीट वाचा म्हणजे पुण्यभूचा अर्थ कळेल, पुण्यभू म्हणजे कर्मभू नव्हे.
सावरकरांच्याच शब्दात ह्याचे स्पष्टीकरण वाचा:
That is why in the case of some of our Mohammedan or Christian countrymen who had originally been forcibly converted to a non-Hindu religion and who consequently have inherited along with Hindus, a common Fatherland and a greater part of the wealth of a common culture—language, law, customs, folklore and history—are not and cannot be recognized as Hindus. For though Hindusthan to them is Fatherland as to any other Hindu yet it is not to them a Holyland too. Their holyland is far off in Arabia or Palestine. Their mythology and Godmen, ideas and heroes are not the children of this soil. Consequently their names and their outlook smack of a foreign origin. Their love is divided. Nay, if some of them be really believing what they profess to do, then there can be no choice—they must, to a man, set their Holy-land above their Fatherland in their love and allegiance. That is but natural. We are not condemning nor are we lamenting.
We are simply telling facts as they stand. We have tried to determine the essentials of Hindutva and in doing so we have discovered that the Bohras and such other Mohammedan or Christian communities possess all the essential qualifications of Hindutva but one and that is that they do not look upon India as their Holyland.
Ref: Hindutva, page 42-43
<<हे असे संकलित लेख वाचून
<<हे असे संकलित लेख वाचून नवख्याचे विचार अत्यंत प्रतिगामी, धर्मांध अन फॅसिस्ट बनायला मदत होऊ शकते. वरून जोग साहेबांसारख्या व्यक्ती या विचारास खतपाणी घालण्याचा प्रयत्न करतात..
म्हणूनच हा लेख परत पाठवल्या बद्दल माबो दिवाळी अंक संपादकांचे अभिनंदन केले मी.>>
आहो हिंदुत्व विचारात जे सांगितले आहे ते आंबेडकरांनी हिंदू कोड बिल लिहून व पास करून आज ते संविधानान्वये उपयोगात आहे, मग कुठे खतपाणी घालत आहे, जे संविधान आहे ते सांगत आहे...तुम्हीच तर संविधानाविरूद्ध जाऊ नका असे सांगताय व स्वतःच विसंगत वक्तव्य करताय????
सावरकरांनी हिंदू कोण ह्याची व्याख्या केली आहे व जे हिंदू नाहीत त्यांना हकला, कापा, आपला धर्म लादा असेही नाही म्हणाले उलट ते प्रवाही व सर्वसमावेशक ठेवले आहे मग ते कसे प्रतिगामी, धर्मांध अन फॅसिस्ट होतील?
<<त्या काळातले पुढारलेले विचार आजच्या काळाच्या चष्म्यातुन पाहुन 'त्यात काय?' असे म्हणणे योग्य नाही
त्याचबरोबर ते तसेच्या तसे आजच्या काळात वापरणेही उचित नाही.>>
अगदी योग्य, म्हणून तर हिंदुत्व प्रवाही ठेवल आहे..पण ह्याचा अर्थ केवळ हिंदूंनीच बदलायच इतरांनी नाही असा त्याचा अर्थ होत नाही...अखिल मानव जातीने काळानुसार बदलायला हवे.
क्रुपया एकदा तो प्रबंध वाचा.
<<पाकिस्तान प्रांतात
<<पाकिस्तान प्रांतात रहाणार्या मुसलमान लोकानी स्वतंत्र देशाची मागणी केली.. याचा अर्थ उरलेल्या भारतातील मुसलमानानीही जायचे हे तुम्ही कोण सांगणारे?>>
असे सावरकर कधीही म्हणाले नाहीत पण स्वातंत्र्या आधीच्या निवडणु़कीच्यावेळी मुस्लिम लीगने पाकिस्तान निर्माण करण्याच्या बोलीवर निवडणु़का लढवल्या व त्यांना बहुमताने जिंकून दिल....हे निवडणूकाच सांगत आहेत सावरकर/हिंदुत्ववादी नाही.
<<बरं, मुसलमानाना पाकिस्तानात घालवले... मग हिंदुस्तानात फक्त हिंदुच ठेवायला ख्रिश्चनाना तुमचे सावरकर आणि गोडसेबुवा कुठे जागा देणार होते?? अंदमानात का?>>
सावरकर म्हणत होते सर्वधर्मीय ह्या अखंड हिंदुस्थानात राहू देत, त्यांनी कोणालाही हकला असे सांगितले नाही.
<<एखाद्या प्रांतातईल बहुसंख्य लोकानी स्वतंत्र राज्य/ राष्ट्र यांची मागणी करणं यातही काही चूक नाही आणि त्यांची इच्छा पुरवली जाणं यातही काही चूक नाही. ते लोकशाहीला धरुनच आहे/होते.>>
लोकशाही??? त्या मागणीच्यावेळी लोकशाही होती??? आज भारतात हिंदू बहुसंख्य आहेत व त्यांनी बहुमतावर हिंदूराष्ट्राची मागणी केली तर चालेले तुम्हाला?? तेव्हा जातीय, फॅसिस्ट, नाझी, धर्मांध अशी विशेषण लावाल व ह्याच निर्बंधान्वये (नियमानुसार) विचार केला तर इस्रायलच्या बहुमताच्या जोरावर निर्माण झालेल्या राष्ट्राला का विरोध करता??
<<<उरलेल्या प्रांतातील लोकानी कुठे जायचे, कुठे रहायचे हे सावरकरानी किंवा गोडसेबुवानी ठरवायचे नसते, ते त्या त्या लोकानी ठरवायचे असते. >>>
ते ह्याविषयी बोललेच नव्हते कारण त्यांची अखंड हिंदुस्थानची मागणी होती उलट आंबेडकरांनीच त्यांच्या "Pakistan or the Partition of India" पुस्तकात फाळणी करून सर्व हिंदू खंडित भारतात व सर्व मुसलमान पाकिस्तानात अशी भूमिका मांडली होती.
<<<मुळात सावरकरानी ज्या वेळी ही व्याख्या केली त्यावेळी पाकिस्तान आस्तित्वातच नव्हता... मग असे असताना मुसलमान आणि ख्रिस्चन याना वगळून हिंदुत्वाची व्याख्या सावरकरानी का केली? सार्या भारतात रहाणारा तो हिंदु या वाक्याचा गर्भित अर्थ भारतात हिंदुनीच रहावं हाच होता,>>>
"सार्या भारतात रहाणारा तो हिंदु" हे वाक्य सावरकरांनी लिहिल्याचा पुरावा द्या.
त्यांनी हिंदू कोण?ची व्याख्या केली होती भारतात कोण राहू शकत ह्याची नाही..त्यांनी तो प्रबंध लिहला कारण तेव्हा हिंदूंना वाली उरला नव्हता, मलबारात भयानक दंगे उसळले होते, अल्पसंख्यांकांना विशेष अधिकार-लांगूलचालन चालू होते म्हणून हिंदू कोण सांगण्याची गरज होती.
पण हल्ली हिंदुस्थान म्हटल की
पण हल्ली हिंदुस्थान म्हटल की टीका होते, असे का?
कारण आजचे जग हे स्टँडर्डायजेशनचे जग आहे. कुणी कुठल्या श्लोकात भारत म्हणेल, कुणी कुठल्या कवितेत जंबुद्वीप म्हणेल, असे आज चालत नाही.. कुठला तरी अगम्य आउट्डेटेड भाषेतला श्लोक दाखवून कुणी हिंदुत्व म्हणा असा आग्रह धरेल, आणखी कुणीतरी मग भृषुंडी रामायणातला उतारा दाखवून आर्यावर्त म्हणा असे सगळ्या लोकाना सांगेल , त्यानंतर आणखी कुणीतरी कुठला तरी आदिवासी भाषेतला शिलालेख दाखवून जंबुद्वीपत्व म्हणा असे सांगेल.. हे आज अॅक्सेप्टेबल नाही.
या गोष्टीना ऐतिहासिक मूल्य आहे, पण व्यावहारिक मूल्य नाही.
या देशाच्या सीमा आखलेल्या आहेत. त्यामधील देशाला आज भारत म्हणतात. इथले सरकार भारत सरकार म्हणून शिक्का वापरते. जंबुद्वीप सरकार, हिंदुस्तान सरकार असे कुणी शिक्के पसपोर्टवर, रेशन कार्डावर किंवा अन्य कोणत्याही कागदावर वापरत नाहीत. असे असताना या देशाला हिंदुस्थान म्हणा, इथल्या नागरिकत्वाला हिंदुत्व म्हणा जंबुद्वीपत्व म्हणा असे कोणी येडा सांगायला लागला तर ते 'भारतातल्या भारतीय' लोकानी कशासाठी स्वीकारायचे?
या देशाला काय म्हणायचे, त्यातील लोकानी कसे रहायचे, आपले धर्म कसे पाळायचे हे सगळे दोन पुठ्ठ्यांच्यामध्ये आज प्रचलित असलेल्या भाषेत लिहून ठेवलेले आहे. दोन पुठ्ठे हा आजचा नियम आहे. कुठली तरी सहा पाने, पुराणाचे अर्धवट भूर्जपत्र, शिलालेख यावर आज देश चालत नाही!
>>>> दोन पुठ्ठे हा आजचा नियम
>>>> दोन पुठ्ठे हा आजचा नियम आहे. <<< तुमचा असेल, तुम्हाला कुराण वा बायबल अभिप्रेत असेल तर जरुर घ्या ते नियम! मला ते मान्य नाहीत
बाकी चालुद्या. तुम्च्या निमित्ते मला अक्षय/मास्तुरे इत्यादिक लोकान्च्या अभ्यासपूर्ण पोस्ट्स तरी वाचायला मिळताहेत, त्याबद्दल तुम्हाला धन्यवादच द्यायला हवेत!
<<मुघलांच्या इंग्रजांच्या
<<मुघलांच्या इंग्रजांच्या काळात सक्तीने धर्मपरिवर्तन झालेही असेल, पण आज जे धर्मपरिवर्तन होत आहे, ते हिंदु धर्मातील कंटाळलेल्या व सुखी नसलेल्या जनतेकडून स्वेच्छेने होत आहे.. ही पाळी समाजावर का आली याबाबत सावरकरानी काय किंवा इतर कुणीच काहीही विचार केलेला नाही....>>
स्वेच्छेने होत आहे ह्याचा पुरावा द्या.
आजकाल धर्मांतर होते ते मुख्यत्वे वनवासींचे तेही फूस लावून, आमीष दाखवून...वाटल्यास नियोगी कमिटीचा रिपोर्ट वाचा.
सावरकरांनी 'जात्युच्छेदक निबंधात' ह्याविषयी भूमिका मांडली आहे, ते वाचा म्हणजे त्यांनी काय काय केले ते कळेल.
<<धर्म वाढवण्याचा अधिकार सर्वानाच आहे की! मुसलमान आणि ख्रिस्चन आपले हिंदु बांधव पळवतात म्हणून बोंब मारण्यापेक्षा तुम्ही काही मुसलमान, ख्रिस्चनाना हिंदुधर्मात आणून दाखवा की. तुम्हाला कोण अडवले आहे?>>
हिंदूधर्माची ती शिकवणच नाहीये, दुसर्या धर्माला नावे ठेवून, त्यांच्यापेक्षा आम्हीच श्रेष्ठ, इथे तुम्हाला इतके लाभ मिळतील वगैरे सांगून आपल्या धर्मात ओढायला. म्हणजे तुम्हाला असे म्हणायचे आहे का की हिंदू ह्या फसवणूकीत कमी पडताता?? खरच धन्यवाद तुम्हाला, हिंदू अशी फसवणूक करत नाहीत असे अप्रत्यक्षरित्या मान्य केले म्हणून.
<<आपल्यातील काही लोकांचे धर्मांतर होईल आणि धर्म खिळखिळा होईल ही भीती फक्त हिंदुनाच का बरे वाटते? जैन, पारसी, बौद्ध हेही अल्पसंख्यच आहेत, पण त्यांच्यामधील लोकांचे का बरे धर्मांतर होत नाही? म्हणजे हिंदु धर्म व्यवस्थेतच काहीतरी दोष आहे, उगाच मुसलमानाना ख्रिश्चनाना का नावे ठेवायची?>>
कारण धर्मशिक्षण नाही व लोकशाहीत संख्याबळ महत्वाचे असते म्हणून. कारण कालचा बहुसंख्य हिंदू काश्मीरात आज हिंदू अल्पमतात गेला आहे, ईशान्येकडे पण तिच स्थिती आहे व ह्या दोन्ही ठि़काणी आज ३७० सारखी (ईशान्येत ३७० नाही पण अशाच प्रकारचे वेगळे कलम आहे. आता क्रमांक आठवत नाहीये) वेगळी कलमे लागू आहेत जी भारतीय संविधानाशी काही प्रमाणात विसंगत आहे म्हणून. निदान भारतीय संविधानाच्या संरक्षणासाठी तरी अशी भिती नाही जागरूकता आवश्यक आहे.
For though Hindusthan to them
For though Hindusthan to them is Fatherland as to any other Hindu yet it is not to them a Holyland too.
कायद्याची तशी कुणाकडून अपेक्षाही नाही.. तुम्ही मक्केकडे तोम्ड करा नाहीतर रोमकडे करा नाहीतर रामाच्या सेतुकडे करा... कायदा त्यात आडकाठी आणत नाही.. भारतीय म्हणून प्रेमाने रहा आणि देशाचे कायदे पाळा, एवढ्याच कायद्याच्या अपेक्षा आहेत.
Their mythology and Godmen, ideas and heroes are not the children of this soil. Consequently their names and their outlook smack of a foreign origin.
परत तेच ! देशात भारतीय म्हणून प्रेमाने रहा, मग तुम्ही महाभारत वाचताय का इलियड वाचताय, याच्याशी या देशाच्या कायद्याला काही देणं घेणं नसते. . तुम्ही कुठलेही नाव ठेवा, कुठलेही कपडे घाला...( आज हिंदु मुस्लेम ख्रिश्चन सगळे पँट शर्टच घालतात. हिंदु तर लग्नात सूट बूट आणि टाय घालतात! तुम्ही कसले कपडे घालता जोगसाहेब? शर्ट पँट घालता का धोतर आणि उत्तरीय घालता?
सगळ्यांचाच आउअट्लुक आज फॉरिन झाला आहे!
) विशिष्ट एक हिंदु पेहराव घालणारेच या देशात रहावेत, त्यानी दाढ्या वाढवू नयेत., बायकानी नऊवारी वापरावी.. .. नागरिकत्वाच्या व्याख्येत असले चित्रविचित्र आग्रह धरणे म्हणजे मॉडर्न हिंदु फॅसिझमच झाला की ! म्हणूनच तर हिंदुत्व म्हटले की टीकेचा विषय होतो ! 
<<<सर्व धर्मातल्या लोकाना
<<<सर्व धर्मातल्या लोकाना भारतीय म्हणून मान्यता देणे म्हणजे हिंदु धर्मावर अन्याय असे अजिबात नाही, हे तुमच्यासारखे हिंदुत्ववादी कधी लक्षात घेणार?>>
अन्याय नाहीच पण त्यात हिंदू धर्माचा आदर करणे गरजेचे आहे.
<<न मिळायला काय झाले? हिंदुसाठी वेद आणिरामरक्षा शिकवणार्या शाळा/ गुरुजी आहेत की.. पण तिथे सगळ्या हिंदुना प्रवेश नसतो. फक्त ब्राह्मणाना असतो.. मग बाकीच्या शूद्र लोकाना कधी धर्म शिक्षण मिळूच शकले नाही, तर ते संधी मिळताच बाहेर गेले, हा त्यांचा दोस्श आहे का?>>
अगदी योग्य व सहमत आहे ह्या मताशी, ह्यात चूक ब्राह्मणांचीच आहे पण त्याचे प्रायश्चित आताचे ब्राह्मण घेत आहेत तेही मान्य करा व सांगा ना. आजकालच्या वेदपाठशाळेत ब्राह्मणेतरांना प्रवेश असतो.
<<मुळात मुसलमान आणि ख्रिस्चन भारतात येऊन १००० तर वर्षे झाली आहेत.. मग त्यापूर्वीच्या काळात सर्वाना धर्म शिक्षण देऊन समान संधी द्यायला हिंदुत्ववाल्याना कुणी अडवलं होतं का?>>
येथे मात्र असहमत आहे, अर्वाचीन काळी ही चूक होती पण प्राचीन काळी नव्हे.
अज्ञात जातीच्या गंगेशी शंतनूने लग्न केले. त्याचा मुलगा भींम, अभिषेकार्हय क्षत्रिय झाला. पुढे शंतनूने, तिची जातगोत माहित असूनही उघडपणे एका कोळ्याच्या मुलीशी, सत्यवतीशी विवाह करून तिला पट्टाभिषिक्त राणी केली तरी शंतनूची जात गेली नाही. इतकेच नाही, तर त्या कोळ्याच्या मुलीचे मुलगे चित्रांगद व विचित्रवीर्य दोघेही भारतीय ब्राह्मणांचे शास्त्रोक्त सम्राट झाले. पुढे त्या कोळ्याच्या मुलीचे मुलगे विचित्रवीर्याने, अंबिका व अंबालिका या क्षत्रिय राजकन्यांशी लग्ने लावलीं.
महाभारतकार व्यास हे ब्राह्मणश्रेष्ठ पराशरपुत्र पण त्यांची पत्नी कोळीण व पराशरचे पिता अस्प्रुश्य श्वपाक. त्या अस्प्रुश्याचा पुत्र पराशर ब्राह्मणश्रेष्ठ झाला. स्वत: मनु हा क्षत्रिय होता, ब्राह्मण नाही.
अर्वाचीन काळातील भारतीत सम्राट चंद्रगुप्त हाही अस्प्रुश्य होता.
(संदर्भः जात्युच्छेदक निबंध प्रुष्ठ ५२ )
<<स्वात्ट्त्र्य मिळून ६०
<<स्वात्ट्त्र्य मिळून ६० वर्शे तर झाली आहेत.. आपल्या सरकारची अनुदाने आता सुरु झाली आहेत. पण त्याआधी या संस्था स्वतःच्या स्वतःच चालत होत्या... त्या काळात हिंदुनी अशा किती शाळा उघडल्या आणि चालवल्या? त्या शाळेत सगळ्या हिंदुना प्रवेश होता का?>>>
वेदपाठभवन भरपूर आहेत व तेथे सर्वांना प्रवेश असतो.
<<<कारण आजचे जग हे स्टँडर्डायजेशनचे जग आहे. कुणी कुठल्या श्लोकात भारत म्हणेल, कुणी कुठल्या कवितेत जंबुद्वीप म्हणेल, असे आज चालत नाही.. कुठला तरी अगम्य आउट्डेटेड भाषेतला श्लोक दाखवून कुणी हिंदुत्व म्हणा असा आग्रह धरेल, आणखी कुणीतरी मग भृषुंडी रामायणातला उतारा दाखवून आर्यावर्त म्हणा असे सगळ्या लोकाना सांगेल , त्यानंतर आणखी कुणीतरी कुठला तरी आदिवासी भाषेतला शिलालेख दाखवून जंबुद्वीपत्व म्हणा असे सांगेल.. हे आज अॅक्सेप्टेबल नाही. या गोष्टीना ऐतिहासिक मूल्य आहे, पण व्यावहारिक मूल्य नाही.
या देशाच्या सीमा आखलेल्या आहेत. त्यामधील देशाला आज भारत म्हणतात. इथले सरकार भारत सरकार म्हणून शिक्का वापरते. जंबुद्वीप सरकार, हिंदुस्तान सरकार असे कुणी शिक्के पसपोर्टवर, रेशन कार्डावर किंवा अन्य कोणत्याही कागदावर वापरत नाहीत. असे असताना या देशाला हिंदुस्थान म्हणा, इथल्या नागरिकत्वाला हिंदुत्व म्हणा जंबुद्वीपत्व म्हणा असे कोणी येडा सांगायला लागला तर ते 'भारतातल्या भारतीय' लोकानी कशासाठी स्वीकारायचे?
या देशाला काय म्हणायचे, त्यातील लोकानी कसे रहायचे, आपले धर्म कसे पाळायचे हे सगळे दोन पुठ्ठ्यांच्यामध्ये आज प्रचलित असलेल्या भाषेत लिहून ठेवलेले आहे. दोन पुठ्ठे हा आजचा नियम आहे. कुठली तरी सहा पाने, पुराणाचे अर्धवट भूर्जपत्र, शिलालेख यावर आज देश चालत नाही!>>>
पण आम्ही कुठे आग्रह केला आहे की केवळ हिंदुस्थान म्हणा?? पण हिंदुस्थान म्हटल की टीका होते म्हणून आक्षेप आहे. त्याला व्यावहारिक मूल्य नसले तरी भावनिक मूल्य नक्कीच आहे व अजून तरी ह्या देशात भावनांना महत्व-मूल्य आहे.
जामोप्या तुम्हाला हिंदूत्व
जामोप्या तुम्हाला हिंदूत्व विरोधाच्या भुताने जबरदस्त पछाडले आहे असे दिसते.
हिंदूत्वाला मान्यता देणे म्हणजे वर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे लगेच वेष बदलणे, आणखी काही विशेष बदल करणे असे कोणी म्हणले आहे का ? बाकी धर्मांच्या लोकांना त्यांच्या धर्ममार्तंडांनी अशा प्रकारच्या बंधनात रहाण्याच्या सवयी लावल्या आहेत, त्यामुळे तुम्हाला असे वाटणे साहजिक आहे. उगाचच नाही त्या शंका कुशंका काढू नका. या अशा गोष्टींबाबत हिंदू धर्म लवचिक आहे हे सर्वांना माहिती आहे. आता लगेच जातीभेद, शिक्षण, इ. बाबतीत का नाही असे म्हणू नका, कारण पुर्वी काय होते त्यापेक्षा आता काय आहे आणि येथुन पुढे कसे चांगले करता येईल त्याचा विचार करूया.
कारण धर्मशिक्षण नाही व
कारण धर्मशिक्षण नाही व लोकशाहीत संख्याबळ महत्वाचे असते म्हणून.
हिंदुना धर्मशिक्षन घ्यायला सरकारने कुठे आडकाठी केली आहे का? मी माझा धर्म, त्यातल्या उपासना पाळतो, देवळात जातो, घंटा बडवतो. कापूर जाळतो, मोदक करुन खातो, नदीत निर्माल्य सोडतो, दिवाळीला फटाके फोडतो, चकली खातो, महत्वाच्या सणाना सरकार सुट्टी देतं,, सगळं व्यवस्थीत सुरु आहे की! .. ! उगाच सरकारला कशाला नावे ठेवायची?
दोन पुठ्ठे हा आजचा नियम आहे
दोन पुठ्ठे म्हणजे त्या विशिष्ट कामासाठी सरकारमान्य असणारे कोणतेही पुस्तक. कायद्याचे पुस्तक, टेक्स्टबुक, गीता , कुराण, बायबल .. असं कोणतेही.. ( * गीता फक्त न्यायालयात शपथ घेण्याच्या कामी मान्य आहे ! चातुर्वण्या मया सृष्टीं साठी नाही, हे ध्यानात आले असेलच !
) . देशाचं नाव, नागरिकत्व यासाठी कायद्याचं पुस्तक मान्य
हिंदूत्वाला मान्यता देणे
हिंदूत्वाला मान्यता देणे म्हणजे वर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे लगेच वेष बदलणे, आणखी काही विशेष बदल करणे असे कोणी म्हणले आहे का ?
Consequently their names and their outlook smack of a foreign origin. हे तुमचे/ सावरकरांचे तर वाक्य आहे !
<<कायद्याची तशी कुणाकडून
<<कायद्याची तशी कुणाकडून अपेक्षाही नाही.. तुम्ही मक्केकडे तोम्ड करा नाहीतर रोमकडे करा नाहीतर रामाच्या सेतुकडे करा... कायदा त्यात आडकाठी आणत नाही.. भारतीय म्हणून प्रेमाने रहा आणि देशाचे कायदे पाळा, एवढ्याच कायद्याच्या अपेक्षा आहेत.>>
अगदी बरोबर, ह्याला विरोध नाहीये पण वरील वाक्य हे 'हिंदू कोण?' ह्यासंदर्भात आहे, निर्बंध (कायदा) काय ह्यासंदर्भात नाही.
<<परत तेच ! देशात भारतीय म्हणून प्रेमाने रहा, मग तुम्ही महाभारत वाचताय का इलियड वाचताय, याच्याशी या देशाच्या कायद्याला काही देणं घेणं नसते. . तुम्ही कुठलेही नाव ठेवा, कुठलेही कपडे घाला...( आज हिंदु मुस्लेम ख्रिश्चन सगळे पँट शर्टच घालतात. हिंदु तर लग्नात सूट बूट आणि टाय घालतात! तुम्ही कसले कपडे घालता जोगसाहेब? शर्ट पँट घालता का धोतर आणि उत्तरीय घालता? सगळ्यांचाच आउअट्लुक आज फॉरिन झाला आहे! ) विशिष्ट एक हिंदु पेहराव घालणारेच या देशात रहावेत, त्यानी दाढ्या वाढवू नयेत., बायकानी नऊवारी वापरावी.. .. नागरिकत्वाच्या व्याख्येत असले चित्रविचित्र आग्रह धरणे म्हणजे मॉडर्न हिंदु फॅसिझमच झाला की ! म्हणूनच तर हिंदुत्व म्हटले की टीकेचा विषय होतो !>>
परत तेच, वरील वाक्य हे 'हिंदू कोण?' ह्यासंदर्भात आहे, निर्बंध (कायदा) काय ह्यासंदर्भात नाही.
खालील परिच्छेद तुम्ही नीट वाचलेला दिसत नाहीये..घ्या पुन्हा वाचा---
We are not condemning nor are we lamenting.
We are simply telling facts as they stand. We have tried to determine the essentials of Hindutva and in doing so we have discovered that the Bohras and such other Mohammedan or Christian communities possess all the essential qualifications of Hindutva but one and that is that they do not look upon India as their Holyland.
it's essentials of Hindutva & not essentials of BHARTIY (INDIAN) LAW
जामोप्या तुम्हाला हिंदूत्व
जामोप्या तुम्हाला हिंदूत्व विरोधाच्या भुताने जबरदस्त पछाडले आहे असे दिसते.
हिंदुत्वाचं भूत मानगुटीवर बसू नते हीच अपेक्षा.
अजून तरी ह्या देशात भावनांना
अजून तरी ह्या देशात भावनांना महत्व-मूल्य आहे. >>> जोग साहेब फक्त अल्पसंख्यांकाच्या भावनांनाच मुल्यं आहेत ओ! आपण त्यात नाही...आपण आपल्या भावनांना चिंबीरा देऊन गप्प बसवायचे.
<<हिंदुना धर्मशिक्षन घ्यायला
<<हिंदुना धर्मशिक्षन घ्यायला सरकारने कुठे आडकाठी केली आहे का? मी माझा धर्म, त्यातल्या उपासना पाळतो, देवळात जातो, घंटा बडवतो. कापूर जाळतो, मोदक करुन खातो, नदीत निर्माल्य सोडतो, दिवाळीला फटाके फोडतो, चकली खातो, महत्वाच्या सणाना सरकार सुट्टी देतं,, सगळं व्यवस्थीत सुरु आहे की! .. ! उगाच सरकारला कशाला नावे ठेवायची?>>
हे करणे म्हणजे धर्म नव्हे, आपला धर्म काय सांगतो, त्याचे तत्वज्ञान, अध्यात्मिकता ह्यासारखी वैशिष्ठ्ये समजावून सांगणे म्हणजे धर्मशिक्षण व त्याला शासकीय आडकाठी आहे असे कधी म्हणालो?? ते दिले जाते नाही कारण सेक्युलिरझमचा पगडा.
<<( * गीता फक्त न्यायालयात शपथ घेण्याच्या कामी मान्य आहे ! चातुर्वण्या मया सृष्टीं साठी नाही, हे ध्यानात आले असेलच ! )>>
ह्यातील वर्ण हा जन्माधिष्ठित नाही तो कर्मानुसार आहे.
Consequently their names and
Consequently their names and their outlook smack of a foreign origin ह्यात तुम्हाला द्वेष दिसला??
शर्ट-पॅन्ट नाही म्हणायचे तर धर्मानी सांगितलेले पेहराव त्याविषयी ते बोलत आहेत व ते धर्म येथे उगम पावलेले नाहीत म्हणून.
उद्या रामदेवबाबा भगव्या वेषात इंग्लंडला गेले तर त्याला भारतीय पेहरावच म्हणतील. त्याला पण तुम्ही द्वेष म्हणणार?? तो पेहराव भारतातून आला व त्यांनी तो स्विकारला तरी तो तिथून आला हे वास्तव बदलणार नाही.
<<जोग साहेब फक्त
<<जोग साहेब फक्त अल्पसंख्यांकाच्या भावनांनाच मुल्यं आहेत ओ! आपण त्यात नाही...आपण आपल्या भावनांना चिंबीरा देऊन गप्प बसवायचे.>>
म्हणून तर हिंदुस्थान शब्दावर टिका होते.
>>>मी माझा धर्म, त्यातल्या
>>>मी माझा धर्म, त्यातल्या उपासना पाळतो, देवळात जातो, घंटा बडवतो. कापूर जाळतो, मोदक करुन खातो, नदीत निर्माल्य सोडतो, दिवाळीला फटाके फोडतो, चकली खातो, महत्वाच्या सणाना सरकार सुट्टी देतं,, सगळं व्यवस्थीत सुरु आहे की! .. ! उगाच सरकारला कशाला नावे ठेवायची? <<<<
मग त्यावर इतकी आगपाखड का करताय? 
) "फळे" बघुन नवल नै वाटले! गम्मत वाटली!
हे वाचून हसावं की रडावं ते कळेना झालय! हे इतकच म्हणजे हिन्दू धर्म का? फारच सोप्पा हे की तो, तेवढ त्यात सोमरसप्राशनाच घालायला विसरलाहात तेवढ घातल की झालच काम तमाम!
एकन्दरीत, १९२० पासुनच्या कम्युनिझम-समाजवादी व नन्तरच्या कॉन्ग्रेसी निधर्मीवादाच्या शिकवणूकीला आता इतक्या वर्षान्नी आलेली ही (तुरळक
बा ज्ञानोबातुकारामा, पान्डुरन्गानारायणा, आता तूच झेल रे ही "फळे"!
>>> विष्णुपुराणात भारत असा
>>> विष्णुपुराणात भारत असा उल्लेख आहेच की तसेच इतर ग्रंथात आर्यावर्त, जंबुद्वीप असेही उल्लेख आहेत, एकच उल्लेख सर्व ठिकाणी नाहीत कारण त्यावेळी सेक्युलर लोक कमी असतील बहुतेक.

>>> आपण कितीही शिवाजी महाराज, मराठे, जाट, शीख ह्या लढवय्यांना सेक्युलर ठरवायचा प्रयत्न केला तरी पाकिस्तानच्या पुस्तकात त्यांचा उल्लेख हिंदू म्हणून व ते लढले हिंदुपदपादशाहीसाठी असाच असतो.
बरोबर. गांधीजींनी आयुष्यभर मुस्लिम अनुनयाचा आटापीटा केला. इंग्रजांनी तुर्कस्तानमधली खिलाफत बरखास्त केल्यावर त्याविरोधात, जिथे त्या तुर्कस्तानच्या खलिफाचा काहिही संबंध नव्हता, त्या भारतात मुस्लिमांच्या बरोबरीने आंदोलन केले. १९४७ साली स्वातंत्र्याच्या वाटाघाटी सुरू असताना जिनाला पंतप्रधान करायची त्यांची तयारी होती. ज्या पाकिस्तानने भस्मासुराप्रमाणे जन्मत:च काही महिन्यातच भारतावर हल्ला केला, त्या पाकिस्तानला धाकटा भाऊ संबोधून त्याला ५५ कोटी रूपये द्यावेत यासाठी उपोषण केले, फाळणीमुळे भारतात आलेल्या निर्वासित हिंदूंना डिसेंबर-जानेवारीच्या थंडीत मोकळ्या पडलेल्या दिल्लीतल्या मशिदीत तात्पुरती व्यवस्था करायला विरोध केला . . . त्याच गांधीजींनी आपल्या मरणोत्तर आपल्या देहाची रक्षा सर्व देशांमधल्या मातीत टाकावी अशी इच्छा व्यक्त केली होती व १९४८ मध्ये गांधीवधानंतर जेव्हा नेहरूंनी गांधीजींची रक्षा पाकिस्तानमध्ये टाकण्यासाठी पाकिस्तानशी बोलणी केली, तेव्हा, "गांधीजी हे हिंदूंचे नेते होते व ते मुस्लिमविरोधी होते" असे सांगून पाकिस्तानने त्यांची रक्षा आपल्या पाक देशात येऊन दिली नाही.
गांधीजींच्या आयुष्यभर केलेल्या मुस्लिम अनुनयाचा सर्वात मोठा पराभव मुस्लिमांनीच केला. तसे आपण शिवाजी महाराज व इतर काही जणांना कितीही सेक्युलर, निधर्मी, सर्वधर्मसमभावी अशी विशेषणे चिकटवली तरी इतरत्र त्यांना "हिंदू"च समजले जाते.
>>> इथे 'धर्माधिष्ठीत' राज आणायचे व ते तालिबान किंवा खोमेनीने आणले त्या पद्धतीचे आणायचे हीच तुमची आंतरिक ऊर्मी. यालाच लोक 'हिडन अजेंडा' म्हणतात.
सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली सच्चर आयोग नेमून मुस्लिमांना राखीव जागा, शिष्यवृत्त्या, हाजयात्रेला अनुदान, वेगळे अन्यायकारक व्यक्तिगत कायदे, मुस्लिम अतिरेक्यांना सहानुभूती दाखविणे व त्यानिमित्ताने आपली मतपेढी बळकट करणे हाच खरा "हिडन अजेंडा" आहे. भारतात "सर्वनागरिक समभाव" असण्याची आवश्यकता आहे. सध्या असलेला "सर्वधर्मसमभाव" ही निव्वळ फसवणूक आहे.
>>> समजा, शाहबानो प्रकरणी काँग्रेसने खाल्ले शेण. तर वाजपेयीजींनी भाजपाच्या कारकिर्दीत का त्या तमाम घटनादुरुस्त्या केल्या नाहीत हो? ज्या नेहेमी डांगोरा पिटून सांगितल्या जातात - विशेषतः काश्मिर बाबत? हात बांधून ठेवले होते का?>>
राजीव गांधीच्या काळात काँग्रेसला लोकसभा व राज्यसभा या दोन्ही संस्थांमध्ये दोन तृतीयांशाहून अधिक बहुमत होते. त्याचा गैरफायदा घेऊन त्यांना वाटेल ते अन्यायकारक कायदे करणे शक्य झाले. वाजपेयींच्या काळात भाजपला दोन्ही सभागृहात साधे बहुमत सुध्दा नव्हते, तसेच एनडीएला लोकसभेत साधे बहुमत होते, पण राज्यसभेत ते अल्पमतात होते. त्यामुळे असे कोणतेही कायदे करणे त्यांना अशक्य होते.
>>> <<हे असे संकलित लेख वाचून नवख्याचे विचार अत्यंत प्रतिगामी, धर्मांध अन फॅसिस्ट बनायला मदत होऊ शकते. वरून जोग साहेबांसारख्या व्यक्ती या विचारास खतपाणी घालण्याचा प्रयत्न करतात..
हे असले लेख न वाचून सुध्दा किंवा वाचून व त्याला पूर्ण विरोध करूनसुध्दा अनेक नवख्यांचे व अनुभवींचे विचार अत्यंत प्रतिगामी, धर्मांध अन फॅसिस्ट आहेत, त्याचं काय?
>>> <<<उरलेल्या प्रांतातील लोकानी कुठे जायचे, कुठे रहायचे हे सावरकरानी किंवा गोडसेबुवानी ठरवायचे नसते, ते त्या त्या लोकानी ठरवायचे असते. >>>
हे गांधीजींनी सुध्दा ठरवायचे नसते. तरीसुध्दा संपूर्ण अदलाबदलीच्या मागणीला गांधीजींनी का विरोध केला होता?
>>> कारण आजचे जग हे स्टँडर्डायजेशनचे जग आहे. कुणी कुठल्या श्लोकात भारत म्हणेल, कुणी कुठल्या कवितेत जंबुद्वीप म्हणेल, असे आज चालत नाही..
या देशाला "इन्डिया" व "भारत" अशी दोन वेगळी नावे का? ते चालते ना? कुठलेतरी एकच ठेवा म्हणजे स्टँडर्डायजेशन होईल.
>>> दोन पुठ्ठे हा आजचा नियम आहे. कुठली तरी सहा पाने, पुराणाचे अर्धवट भूर्जपत्र, शिलालेख यावर आज देश चालत नाही!
हा मोठा गैरसमज आहे. कुराण या एका अत्यंत जुन्या पुस्तकावर आधारित भारतातल्या एका मोठ्या समूहाचे कायदे बसवलेले आहेत.
>>> देशात भारतीय म्हणून प्रेमाने रहा, मग तुम्ही महाभारत वाचताय का इलियड वाचताय, याच्याशी या देशाच्या कायद्याला काही देणं घेणं नसते. .
तुम्ही महाभारत वाचताय का याच्याशी या देशाच्या कायद्याला अजिबात देणं घेणं नाही. पण तुम्ही कुराण वाचता का हे कायदा नक्कीच बघतो.
सोमरसप्राशनाच घालायला
सोमरसप्राशनाच घालायला विसरलाहात तेवढ घातल की झालच काम तमाम!
आम्ही कायदे पाळतो बुवा.. आमच्याकडे सोमरसाचं पर्मिट नाही.. त्यामुळं प्राशनाचा प्रश्न येत नाही !
महेश | 27 September, 2011 -
महेश | 27 September, 2011 - 23:11
वरचा मेसेज लिहिताना तुम्ही लिहिलात तो धर्मांतराचा मुद्दा माझ्या मनात पण नव्हता. खरेतर मतपेटीचे राजकारण आणि त्यासाठी अल्पसंख्यांकांचे अतिरिक्त लाड हा खरा कळीचा मुद्दा आहे.
मागे मी एका धाग्यावर लिहिले होते, बौद्ध, जैन आणि शिख हे वेगळे धर्म नसुन हिंदू धर्माचाच भाग आहेत.
हिंदु धर्मात यज्ञात बळी दिले जात. आजही कितीतरी देवताना प्राण्यांचे बळी दिले जातात. स्वतः श्रीकृष्णानीही युद्धामधील हिंसा मान्य केली आहे. पण जैन धर्म मात्र कोणत्याच हिंसेला मान्यता देत नाही.. मग असे असेल तर जैन धर्म हा हिंदु धर्माचा भाग कसा? अहिंसा परमो धर्मः हे जैनांचे तत्व आहे, हिंदुंचे नव्हे!
हिंदु धर्म आस्तिक आहे, देव वेद दोघानाही मानणारा.. पण बौद्ध धर्म हा नास्तिक आहे. मग बौद्ध धर्म हा हिंदु धर्माच्याच तत्वावर आहे, तो वेगळा नाही, हे कसे काय बुवा? आणि बौद्ध धर्म जर वेगळा नव्हता हिंदु धर्माचाच भाग होता, तर शंकराचार्यानी बौद्ध धर्म प्रसार कमी करण्यासाठी मंडनमिश्राशी वाद का घातला?
बुद्धाला विष्णूचा अवतार करणं हा कुटील राजनीतीचा भाग होता... भारत वगळता अजून बर्याच देशात बौद्ध धर्म आहे, तिथे कुणीही बुद्धाला विष्णूचा अवतार मानत नाहीत आणि बौद्ध धर्म हा एक स्वतंत्र धर्म मानला जातो. आज भारतातही तसेच आहे. हिंदुना बुद्ध हा विष्णूचा खरोखरच अवतार मानायचा असता तर एकतरी बुद्धाचे देऊळ हिंदुनी बांधायला हवे होते की! कुठल्या तरी हिंदुंचा बुद्ध हा कुलदैवत असायला हवा होता, पण हिंदु उपासनेत बुद्धाला कोणतेही स्थान नाही. निव्वळ कुटील राजकारण, दुसरं काय! हिंदुंपेक्षा जैनांचं आणि बौद्धांचं तत्वज्ञान नक्कीच उजवं आणि माणुसकीला धरुन आहे. हिंदुत्ववाल्यानी स्वतःच्या धर्माला तर राजकारणात ओढलच , पण अहिंसेच्या मार्गावर असलेल्य दुसर्या धर्मानाही सोडलं नाही.. 
>>> हिंदुना धर्मशिक्षन
>>> हिंदुना धर्मशिक्षन घ्यायला सरकारने कुठे आडकाठी केली आहे का?
एखाद्या शाळेने योगासने शिकविणे, गीता शिकविणे किंवा सरस्वती वंदना शिकविण्याची नुसती घोषणा केली की निधर्मांध लगेच "घटनेला पायदळी तुडविले", "सर्वधर्मसमभावाचा अपमान", अशी कोल्हेकुई करून ती घोषणा हाणून पाडतात.
>>> विशिष्ट एक हिंदु पेहराव घालणारेच या देशात रहावेत, त्यानी दाढ्या वाढवू नयेत., बायकानी नऊवारी वापरावी.. .. नागरिकत्वाच्या व्याख्येत असले चित्रविचित्र आग्रह धरणे म्हणजे मॉडर्न हिंदु फॅसिझमच झाला की !
उगाच खोटे आरोप करू नका. असा आग्रह कोणत्या आणि किती हिंदूंनी धरला याची काही आकडेवारी आणि पुरावे द्याल का? नसेल आकडेवारी व पुरावे तर निराधार व खोटे आरोप करणे थांबवा.
याउलट, आमच्या धर्माच्या आज्ञेनुसार विमानतळावर सुध्दा आम्ही डोक्यावरची पगडी काढणार नाही, विमानात व लोकसभेत सुध्दा आम्ही कृपाण घेऊन जाणार कारण कृपाण वापरणे ही आमच्या धर्माची आज्ञा आहे, विमानतळावर आम्ही इमिग्रेशन चेकिंगमध्ये बुरखा काढून चेहरा दाखविणार नाही कारण ते आमच्या धर्माविरूध्द आहे (हे चोचले फक्त भारतात चालतात कारण इथे बुरखा काढला तर धर्म बुडतो. इतर देशात निमूट सगळे नियम पाळावे लागतात. तिथे धर्म बुडत नाही. नाही पाळले तर त्याच परतीच्या विमानाने परत पाठवतील.), मतदान करताना आम्ही ओळख पटविण्यासाठी चेहर्यावरचा बुरखा काढणार नाही कारण तसे केले तर धर्म बुडेल . . . असे चित्रविचित्र आग्रह हाच खरा फॅसिझम आहे. अर्थात हा फॅसिझम आहे हे निधर्मांधांना मान्य होईल का?
>>> म्हणूनच तर हिंदुत्व म्हटले की टीकेचा विषय होतो !
तुमच्या दृष्टीने असेल कारण तुम्हाला "हिंदू" ह्या शब्दाचीच व तदनुषंगिक "हिंदूंशी" संबंधित सर्व विषयांची अॅलर्जी आहे.
>>> <<एखाद्या प्रांतातईल बहुसंख्य लोकानी स्वतंत्र राज्य/ राष्ट्र यांची मागणी करणं यातही काही चूक नाही आणि त्यांची इच्छा पुरवली जाणं यातही काही चूक नाही. ते लोकशाहीला धरुनच आहे/होते.>>
ही अत्यंत चुकीची विचारसरणी आहे. कोणताही देश अशा मागणीवर विचार करताना केवळ त्या भागातील लोकभावनेचा नव्हे तर त्या मागणीचा उर्वरीत देशावर काय परिणाम होईल ते पाहतो व नंतरच त्या मागणीवर विचार करतो. उद्या काश्मिरमधल्या काही मूठभरांना वेगळा देश हवा असेल किंवा पाकिस्तानमध्ये जायचे असेल तर कोणतेही भारतीय सरकार ती मागणी कधीही पुरी करणे अशक्य आहे. काश्मिरमधल्या लष्करीदृष्ट्या अत्यंत महत्वाच्या असलेल्या विशिष्ट भौगोलिक स्थानांचा ताबा भारत कधीही सोडणार नाही. तसे करणे म्हणजे मोक्याची स्थाने शत्रूच्या ताब्यात दिल्यासारखे होईल. तसेच त्यामुळे पूर्वभारतातल्या काही राज्यात फुटीरतावादी चळवळ वाढायला लागेल. एखाद्या विशिष्ट भागातील लोकांचा लोकशाहीच्या तत्वानुसार विचार करताना त्याचे उर्वरीत भागावर काय दूरगामी परिणाम होतील हे पाहणे गरजेचे आहे व परिणाम वाईट होणार असतील, तर अशी मागणी पूर्ण करणे अयोग्य ठरेल.
सावरकरांची व्याख्या व भारतीय
सावरकरांची व्याख्या व भारतीय राज्यघटना
सन १९५६ मध्ये हिंदुवारसा निर्बंधात जे संशोधन केले गेले त्यात भारत शासनाने जी चर्चा केली ती अशी-
१. जो हिंदुधर्मास कोणत्याही स्वरुपात मानतो तो हिंदू. यार वीर शैव,लिंगायत,ब्राम्हसमाजी,प्रार्थना समाजी,आर्यसमाजी यांचा समावेश होतो.
२.बौद्ध,जैन व शीख यांचाही हिंदू शब्दात समावेश आहे.
३.हा निर्बंध जे भारताच्या प्रमाणित क्षेत्रात अधिकइत नागरिक आहेत त्यांनाच लागू आहे.
४.मात्र यातून मुसलमान,पारशी, ख्रिस्ती आणि यहुदी यांना वगळण्यात आले आहे.
यात वर्णन केले जे लोक आहेत ते सावरकरांनी वर्णन केलेल्या हिंदू लोकांशी मिळतेजुळते आहेत. पुण्यभू व पितृभू हे शब्द न घेता त्याच अर्थाने स्वीकारण्यात आली आहे हे उघड दिसते. तेव्हा नैर्बंधिक दृष्ट्या हिंदू कोण याची सर्वमान्य व्याख्या होऊन गेली असून सावरकरांचे नाव न घेता त्यांची व्याख्या स्वीकारली गेली आहे.घटनेतील या व्याख्येशी हिंदुत्ववादी व गैर हिंदुत्ववादी सहमत आहेत. नसल्यास ते घटनेविरोधी ठरेल किंवा घटनेत दुरुस्ती तरी करावी लागेल.
>>> हिंदुना धर्मशिक्षन
>>> हिंदुना धर्मशिक्षन घ्यायला सरकारने कुठे आडकाठी केली आहे का?
एखाद्या शाळेने योगासने शिकविणे, गीता शिकविणे किंवा सरस्वती वंदना शिकविण्याची नुसती घोषणा केली की निधर्मांध लगेच "घटनेला पायदळी तुडविले", "सर्वधर्मसमभावाचा अपमान", अशी कोल्हेकुई करून ती घोषणा हाणून पाडतात.
होयच, त्यात काय चुकीचे आहे? मुस्लीम आणि ख्रिश्चन आपापले धर्म शिक्षण स्वतंत्र शाळेत देतात, जिथे सर्वासाठी इतर व्यावहारिक शिक्षण खुले आहे, अशा शाळेत देत नाहीत. हिंदुनीही स्वतंत्र धर्म शाळा काढाव्यात की.. हिंदुंच्या धर्म शिक्षण शाळेत फक्त ब्राह्मणानाच पिढीजात शिक्षण दिले जाते/ जात होते. मग सरकार अशा शाळेला कशाला मान्यता आणि अनुदान देईल? हिंदुनी जातीभेद सोडून सर्वाना धर्म शिक्षण खुले केले असते, तर सरकारही अनुदान द्यायला कचरले नसते. हिंदुंच्या ( आणि विशेषतः ब्राह्मणाम्च्या) अधोगतीला फक्त तेच जबाबदार आहेत.
हिंदुंचे काही कायदे इतर धर्मियाना लागू आहेत याचा अर्थ ते धर्म हिंदु धर्माचे घटक आहेत आणि त्याना हिंदुत्वात समाविष्ट करा अशी त्यांची किंवा सरकारची मान्यता आहे, असा होत नाही..
Pages