हिंदुत्व, हिंदुधर्म, हिंदुराष्ट्र आणि स्वातंत्र्यवीर सावरकर !

Submitted by विशाल कुलकर्णी on 12 October, 2009 - 07:16

स्वा. सावरकरांचे आजवर वाचलेले साहित्य, आंतरजालावर उपलब्ध माहिती आणि इतरही काही संदर्भ वापरुन हा लेख संकलीत केला होता. अर्थात त्यामुळे हा लेख मी लिहीलाय असे म्हणता येइल की नाही कुणास ठाऊक. पण स्वातंत्र्यवीरांचे विचार संकलित करण्याची मेहनत मी जरुर घेतली आहे. हा लेख माबोच्या दिवाळी अंकासाठीदेखील पाठवला होता. पण कुठल्याशा कारणाने (नियमात बसत नसल्याने असेल कदाचित) तो तिथुन साभार परत आला. तेव्हा तो इथे टाकत आहे. धन्यवाद.

..............................................................................................................................................

"आसिंधु सिंधु पर्यन्ता, यस्य भारतभूमिका ।
पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत: I I "

सिंधुस्थान ही ज्याची केवळ पितृभूमी नव्हे, तर पुण्यभूमीही आहे तो हिंदू! सिंधुपासुन सिंधुपर्यंत, अर्थात सिंधुनदीपासुन ते सिंधु म्हणजे सागरापर्यंत पसरलेली ही भुमी म्हणजे हिंदुभुमी आहे आणि प्रत्येक व्यक्ती ,जो कुणी या भुमीला केवळ आपली पितृभुमीच नव्हे तर पुण्यभुमीही मानतो तो हिंदु!मग तो कुठल्याही जाती धर्माचा असेना का! मुळात हिंदु हा केवळ एक धर्म नाहीच आहे, तर ती एक जिवनप्रणाली आहे. 'हिंदुधर्म' हे नाव कोणत्याही एका विशिष्ट धर्माचे वा पंथाचे विशेष नि अनन्य नाव नसून ज्या अनेक धर्मांची नि पंथांची ही भारतभूमी हीच पितृभूमी नि पुण्यभूमी आहे त्या सार्‍यांना समावेशिणार्‍या धर्मसंघाचे हिंदुधर्म हे सामुदायिक अभिधान आहे.!

हे आमचे एकजीवन आज ज्या एकाच शब्दात नवीन व्याख्येप्रमाणे व्यक्तविता येते तो अनन्य शब्द आहे 'हिंदू' ! या शब्दाच्या 'हिंदू' या दोन अक्षरांत अगस्तीच्या अंजलीत महासागर तसे तीस कोटी लोकांचे राष्ट्रचे राष्ट्र सामावलेले आहे.किती सार्थ आणि योग्य शब्दात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदु या शब्दाची महती, त्याचा योग्य अर्थ सांगितला आहे. हिंदु या संकल्पनेची व्यापकता, तिचा विस्तार केवढ्या समर्पक शब्दात मांडले गेल आहे इथे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मते आपल्या वंशाच्या मूळ पुरुषांनी आपल्या राष्ट्राला व आपल्या लोकांना देण्याकरिता जे पहिले आणि जवळ जवळ पाळण्यातले नाव निवडले ते सप्तसिंधू अथवा हप्त हिंधू आहे. सिधु नदीच्या समृद्ध खोर्‍यात राहणारे ते सिंधू. आणि इतर जगातील जवळ जवळ सर्व राष्ट्रे आपणांस ह्याच सिंधू किंवा हिंदू याच नावाने ओळखत असत. बर्‍याचदा असे म्हणले जाते की हिंदु हे नाव किंवा हा शब्द आपल्याला अरबांकडुन मिळाला. पण सावरकरांच्या मते हिंदू हा शब्द आपणांस अरबांनी दिलेला नाही. प्रेषित महंमदाच्या जन्मापूर्वी, नव्हे अरब हे एक 'लोक' म्हणून ओळखले जाण्यापूर्वीदेखील हे प्राचीन राष्ट्र आपणांकडून व इतरांकडून सिंधू वा हिंदू ह्या स्वाभिमानी नावाने ओळखले जात होते. अरबांनी सिंधू नदीचा शोध लावला हे म्हणणे जितके खरे तितके अरबांनी ह्या शब्दाचा शोध लावला हे म्हणणे आहे

हिंदुत्व, हिंदुधर्म, हिंदुजगत्

हिंदू चळवळीची विचारप्रणाली समजण्याकरिता ह्या तीन शब्दांचा अर्थ नीट समजावून घेणे अत्यावश्यक आहे. हिंदू या शब्दापासून इंग्रजीमध्ये 'हिंदुइझम' (हिंदुधर्म) हा शब्द बनविला आहे. त्याचा अर्थ हिंदू लोक ज्या धर्ममतांना वा मार्गांना अनुसरतात ती धर्ममते वा मार्ग. दुसरा शब्द हिंदुत्व हा त्यापेक्षा अधिक संग्राहक शब्द आहे. हिंदुधर्म ह्या शब्दाप्रमाणे हिंदूंच्या केवळ धार्मिक अंगाचा त्यात समावेश होत नसून त्यात हिंदूंच्या सांस्कृतिक, भाषिक, सामाजिक व राजकीय अंगांचाही समावेश होतो. 'Hindu Polity' ह्या इंग्रजी शब्दाशी तो जवळ जवळ समानार्थी शब्द आहे. त्याचे जवळ जवळ तंतोतंत भाषांतर Hinduness ह्या शब्दाने करता येईल. हिंदू जगत् Hindudom ह्या तिसर्‍या शब्दाचा अर्थ संकलितपणे हिंदू म्हणून संबोधिले जाणारे सर्व लोक. ज्याप्रमाणे इस्लामने मुसलमानी जगताचा किंवा ख्रिश्चनडम ह्या शब्दाने ख्रिस्ती जगताचा बोध होतो त्याप्रमाणे ह्या शब्दाने हिंदुजगताचा सामुदायिक बोध होतो.

स्वातंत्र्यवीर अगदी ठामपणे प्रतिपादन करतात की हिंदुत्व हा केवळ एक शब्द नव्हे, तर तो इतिहास आहे. ते मनापासुन समग्र हिंदु बांधवाना आवाहन करतात की अग्निहोत्री ब्राह्मण ज्याप्रमाणे यज्ञकुंडात अग्नी प्रज्वलित ठेवतो त्याप्रमाणे तुम्ही हिंदुत्वाच्या भावनेचे स्फुल्लिंग जतन करुन ठेवा. योग्य वेळ येताच त्याला फुंकर घालून भरतखंडभर हिंदुत्वाचा डोंब उसळून दिला की काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत हिंदुत्वाच्या भावनेने जनता भारली जाईल

हिंदुत्व का हवे? त्याचा आपल्याला काय फायदा होवु शकेल हे विषद करताना स्वातंत्र्यवीर सावरकर सांगतात कीं असा एक दिवस जरुर उगवेल किं समग्र मनुष्यजातीस ह्या शक्तीस (हिंदुत्व) तोंड द्यावे लागेल .हिंदुस्थानाला पितृभूमी व पुण्यभूमी मानणारे, असा इतिहास असणारे व समान रक्त व संस्कृती ह्यांनी बांधलेले कोट्यावधी लोक सर्व जगाला आपले म्हणणे अधिकारवाणीने सांगू शकतील. स्वातंत्र्यवीर एका आंतरिक अभिमानाने सांगतात की ज्यावेळी हिंदू लोक जगाला काही सांगण्याच्या स्थितीत असतात तेव्हा त्यांचे सांगणे गीतेच्या वा बुध्दाच्या उपदेशाहून फार वेगळे असत नाही हेही तितकेच खरे आहे. हिंदू जेव्हा हिंदू राहत नाही तेव्हा तो अत्यंत उत्कटपणे हिंदू असतो व शंकराप्रमाणे सर्व पृथ्वी वाराणसी मानतो. वाराणसी मेदिनी ! मानतो किंवा तुकारामाप्रमाणे 'आमुचा स्वदेश ! भुवनत्रयामध्ये वास ! ' असे उद्गारतो. हे बंधूंनो ! विश्वाच्या मर्यादा - तेथे माझ्या देशाच्या सीमा आहेत !

हिंदुस्थानात सुखाने नांदत असणार्‍या अनेक - नानाविध धर्मांविषयी बोलताना सावरकरांचा कंठ भरुन येत असे. त्यावेळी त्यांच्या चेहर्‍यावर एक अलौकीक असे तेज, एक समाधान पाहायला मिळे. विश्व हिंदु परिषदेच्या एका सभेत बोलताना स्वातंत्र्यवीर म्हणाले होते.

"बहुसंख्य हिंदूंच्या धर्माला सनातन धर्म किंवा श्रुति-स्मृति-पुराणोक्त धर्म अथवा वैदिक धर्म ह्या प्राचीन व मान्य संज्ञांनी संबोधिता येते. इतर हिंदूंच्या धर्मांना त्यांच्या त्यांच्या मान्य नावांनी जसे शीख धर्म किंवा आर्यधर्म किंवा जैन धर्म किंवा बुध्द धर्म संबोधिता येईल. जेव्हा ह्या सर्व धर्मांना एकत्रित नाव देण्याची आवश्यकता येईल तेव्हा हिंदुधर्म असे व्यापक नाव देणे उचित होईल. ह्यामुळे अर्थहानी होणार नाहीच, परंतु तो अधिक अचूक व नि:संदिग्ध होईल व आपल्या लहान समाजातील संशय व मोठया समाजातील राग दूर करुन आपला समान वंश व समान संस्कृती दर्शविणार्‍या आपल्या प्राचीन ध्वजाखाली पुन्हा एकदा सर्व हिंदूंना एकत्र करील..

इतर धर्मांप्रमाणे (उदा. मुस्लिम - कुराण, ईसाई- बायबल) हिंदुधर्माचे एक धर्मपुस्तक नाही हे चांगलेच आहे. कारण यामुळे आपला धर्मविकास थांबला नाही. आमचे धर्मतत्वही कोणत्या पुस्तकाच्या दोन पुठ्ठयात सामावू शकणार नाही. ह्या विश्वाच्या दोन पुठ्ठयांमध्ये जितके सत्य नि ज्ञान विस्तृत पसरलेले आहे तितके आमचे धर्मपुस्तक विस्तृत होईल.

हिंदुधर्म क्लैब्याची गाथा नाही. हिंदुधर्म नि:संशय सात्विक, क्षमाशील आहे. हिंदुधर्म क्रोधशीलही आहे. 'क्लैब्यं मा स्म गम: पार्थ' ही हिंदुधर्माची गर्जना आहे. 'अहिंसा परम धर्म:' ही ज्या हिंदुधर्माची व्याख्या आहे त्याच हिंदुधर्माची अगत्याची व तेजस्वी आज्ञा आहे की 'आततायिनमायान्तं हन्यादेवाविचारयन्' आणि त्या दोन्ही आज्ञांचा समन्वय, हिंदुधर्मच उत्तम प्रकारे लावू शकतो काही झाले तरी बुध्दिवादाच्या दृष्टीनेही एकंदरीत पाहता धर्मांत ग्राह्यतम धर्म असेल तर तो हिंदुधर्म होय !"

आपल्या हिंदुत्वाच्या कल्पनेबाबतीत सावरकर अतिशय स्पष्ट आहेत. योग्य ते बदल स्विकारण्याची त्यांची तयारी आहे. त्यासाठी प्रसंगी आपली रुढी-परंपरा यांच्या चौकटी मोडायला देखील ते तयार असत हे त्यांच्या आचार विचारातुन ठामपणे स्पष्ट होत असे. रत्नागिरीतील पतित पावन मंदीर हे याचे स्पष्ट उदाहरण आहे. मानवाच्या, मानव्याच्या भल्यासाठी आपल्या रुढी परंपरा मोडायची, चौकटी तोडायची त्यांची नेहेमीच तयारी असे. धर्म आणि राष्ट्रधर्म या संकल्पना स्पष्ट करताना सावरकर सांगतात किं हिंदीधर्म हा कुठल्याही रुढी परंपरांमध्ये, तथाकथीत चौकटीत अडकुन राहणारा नाही. बदलत्या समाजाला पोषक होइल अशा पद्धतीने आपले स्वरुप बदलत राहणे हा हिंदुधर्माचा स्वभावच आहे. पण फक्त तुम्ही आमच्याकडुनच जर बदलण्याची अपेक्षा करत असाल तर ते सर्वस्वी चुकीचे आहे. जर मुस्लिम , ख्रिश्चन वा इतर बांधव त्यांची मुसलमानत्व, ख्रिश्चनत्व इत्यादी 'त्वे' सोडीत असतील तर माझे हिंदुत्वही मानुषकेत विलय पावेल.
अगदी याच पद्धतीने माझे राष्ट्रीयत्वही - हिंदीपणही मानवराष्ट्रात तेव्हा विलय पावेल जेव्हा इंग्लिशपण, जर्मनपण इत्यादीपणा लुप्त होऊन फक्त मानवता, मनुष्यपणा तेवढा जगात, मनुष्यमात्रात सुखेनैव नांदू लागेल ! आज देखील जो खरा मनुष्यवादी (humanitarian) असेल त्याच्यापुरते त्याच्याशी देखील मी सर्व भेदभाव सोडून वागेन.

स्वातंत्रवीर सावरकरांनी भविष्यकाळाचाही विचार करुन ठेवलेला आहे. ते म्हणतात कि एखाद्या भविष्यकाळी हिंदू हा शब्द केवळ हिंदुस्थानचा नागरिक वाचक होऊ शकेल. जेव्हा सर्व सांस्कृतिक व धार्मिक दुराग्रह आक्रमक गर्विष्ठपणाशी वचनबध्द असलेल्या शक्तीचे विसर्जन करतील व धर्म 'वाद' म्हणून न राहता ज्या समान पायावर मानवी राज्य ऐश्वर्याने व दृढपणे उभे राहील अशा पायाच्या मुळाशी असलेल्या चिरंतन तत्वांचा केवळ समान संचय म्हणून राहतील, तेव्हा हा दिवस उगवेल. भक्तिभावाने इच्छा करावी अशा ह्या सिध्दीची पहिली रेखासुध्दा क्षितिजावर दिसत नसताना कठोर वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करणे मूर्खपणाचे ठरेल. जोपर्यंत धोकादायक युध्दघोषणांकडे झुकणार्‍या मतांचा त्याग इतर प्रत्येक वादाने केलेला नाही तोपर्यंत एकजीवता व सामर्थ्य निर्माण करणारी बंधने विशेषत: समान नाव व समान ध्वज ही बंधने शिथिल करणे कोणत्याही सांस्कृतिक वा राष्ट्रीय एकांकाला परवडणार नाही.

"हिंदुस्थान" या नावाबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकरांना अतिव आदर, अभिमान होता. ते अभिमानाने सांगत की आपल्या देशाचे सर्वात प्राचीन नाव, ज्याविषयी आपणापाशी आधार आहे, ते सप्तसिंधू वा सिंधू आहे. भारतवर्ष हे नावसुध्दा नंतरचे अभिधान आहे. आणि त्याचे आवाहन व्यक्तिविषयक आहे. मनुष्य कितीही महान् असो, जसजसा काळ जातो तसतसा त्याचा गौरव कमी कमी होत जातो.संस्कृतमधील सिंधू शब्दाने सिंधू नदीचाच नव्हे तर समुद्राचाही ,दक्षिण द्वीपकल्पाला परिवेष्टणार्‍या समुद्ररशनेचा बोध होत असल्यामुळे हा एक शब्द आपल्या देशाच्या जवळ जवळ सर्व सीमा दर्शवितो. हिंदुस्थान ह्या शब्दाने मुख्य राजकीय व सांस्कृतिक विधेय जितके वक्तृत्वपूर्णपणे प्रकट होते तितके आर्यावर्त, दक्षिणापथ, जंबुद्वीप आणि भारतवर्ष ह्या शब्दांनी होऊ शकत नव्हते.

आपल्या या पितृभुमीबद्दल सावरकर अतिव श्रद्धेने, आदराने स्पष्ट करतात की हिंदुस्थान आमची पितृभुमीच नव्हे तर पुण्यभूमी आहे. ही परम पावन भारतभूमी, हे सिंधुस्थान, सिंधूपासून सिंधूपर्यंतची ही भूमी आमची पुण्यभूमी आहे. ह्या भूमीत आमच्या धर्मविचारांच्या संस्थापकांना व ऋषींना वेदांचा साक्षात्कार झाला; वैदिक ऋषींपासून ते दयानंदापर्यंत, जिनापासून महावीरापर्यंत, बुध्दापासून नागसेनापर्यंत, नानकापासून गोविंदापर्यंत, बंदापासून बसवापर्यंत, चक्रधरापासून चैतन्यापर्यंत, रामदासापासून राममोहनापर्यंत आमच्या गुरुंनी व धार्मिक पुरुषांनी जन्म घेतला व ते वाढले. तिच्या मार्गातील धुळीत आमच्या प्रेषितांचे व गुरुंचे पदरव ऐकू येतात. तिच्या नद्या व तिची उपवने पवित्र आहेत. कारण चंद्रप्रकाशात त्यांच्या घाटावर किंवा सायंकाळच्या छायेत बुध्दाने किंवा शंकराने जीवन, मनुष्य, आत्मा, ईश्वर, ब्रह्म आणि माया ह्यांच्या गहन प्रश्नांवर वाद व चर्चा केली. प्रत्येक डोंगर व प्रत्येक वृक्षाच्छादित खोरे कपिलाच्या, व्यासाच्या, शंकराच्या व रामदासाच्या स्मृतीने भरलेले आहे. येथे भगीरथ राज्य करतो, येथे कुरुक्षेत्र आहे. वनवासाला जाताना रामचंद्राने पहिला विश्राम येथेच घेतला. तेथेच जानकीने सोनेरी हरिण पाहिला व त्याला मारण्याचा आपल्या प्रियकराशी प्रेमाने हट्ट घरला. ज्या बासरीने गोकुळातील प्रत्येक हृदय मोहनिद्रेत असल्याप्रमाणे एका लयीत नाचू लागेल अशी बासरी त्या दैवी गुराख्याने वाजविली. येथे बोधिवृक्ष आहे व येथे मृगवन आहे. येथेच महावीराला निर्वाण प्राप्त झाले. येथेच भक्तांच्या मेळाव्यात बसून 'गगन थाल रविचंद्र दीपक बने' ही नानकाने आपली आरती म्हटली. येथे गोपीचंद राजाने गोपीचंदजोगी होण्याची प्रतिज्ञा केली व भिक्षापात्र घेऊन मूठभर भिक्षेकरिता आपल्या बहिणीचे दार ठोठावले. येथेच हिंदू म्हणून मरण्याच्या अपराधाकरिता बंदा बहादुराच्या मुलाचे वडिलांच्या डोळयांसमोर तुकडे तुकडे करण्यात येऊन त्याचे हृदय वडीलांच्या तोंडात कोंबण्यात आले. येथील प्रत्येक दगड हौतात्म्याची कथा सांगू शकेल. हे माते ! तुझ्या भूमीचा प्रत्येक तसू यज्ञभूमी आहे. जेथे कृष्णसार सापडले तेथेच नव्हे तर काश्मीर ते सिंहल ही ज्ञानयज्ञाने पवित्र झालेली यज्ञीयभूमी आहे. म्हणून प्रत्येक हिंदूला, मग तो साधू असो वा संताळ ही भारतभूमी, हे हिंदुस्थान पितृभू आणि पुण्यभू आहे.

आपली हिंदुत्वाची व्यापक संकल्पना मांडल्यावर ते ठामपणे सांगतात की हिंदुस्थान हा हिंदूंचाच देश आहे. वस्तुत: जो समाज देशात बहुसंख्य असतो त्यांचाच तो देश मानला जाण्याची प्रथा सर्व जगात आहे. या नात्याने तर हिंदुस्थान हिंदूंचा आहेच; पण त्याशिवायही तो हिंदूंचा असल्याचे आणखी एक निश्चित गमक सांगता येईल. ते म्हणजे हिंदुस्थानच्या उध्दाराचा प्रयत्न कोणी केला ते पाहणे, हे होय. या देशाच्या स्वातंत्र्याच्या १८५७ पासून सुरु झालेल्या लढयात कोणी खरा त्याग केला ? - हिंदूंनी का मुसलमानांनी ?

ते पुढे स्पष्ट करतात की हिंदुस्थान ह्या नावाने अहिंदू बांधवांची मानहानी होत नाही, काही नुकसान होत नाही. चीनमध्ये कोटयावधी मुसलमान आहेत. ग्रीस, पॅलेस्टाईन इतकेच काय पण हंगेरी, पोलंडमध्येही त्यांच्या राष्ट्रघटकांत हजारो मुसलमान आहेत पण तेथे ते अल्पसंख्य, केवळ एक जाती आहेत. आणि त्या देशांना त्यांतील मोठया बहुसंख्येने असलेल्या वंशाची वसाहतस्थाने म्हणून रुढ असलेली प्राचीन नावे बदलण्यासाठी तेथे कोणी अल्पसंख्य जातीच्या अस्तित्वाचे कारण पुढे करीत नाही. तेथील मुसलमानांनी ही नावे विकृत केली नाहीत वा करण्यास धजले नाहीत. प्रसंग येताच पोलिश मुसलमान, ग्रीक मुसलमान , किंवा चिनी मुसलमान अशा नावांनी संबोधिले जाण्यात समाधान मानतात. त्याचप्रमाणे आपल्या मुसलमान देशबंधूंनी राष्ट्रीय किंवा प्रादेशिक दृष्टया आपला निर्देश करताना हिंदुस्थानी मुसलमान म्हणून करावा. तसे करण्यात त्यांच्या धार्मिक वा सांस्कृतिक स्वतंत्र अस्तित्वास बाधा येत नाही.

हिंदुस्थान ह्या आपल्या मातृभूमीच्या रुढ नावाने ऋग्वेद काळातील सिंधूपासून आपल्या पिढीतील हिंदू शब्दापर्यंत जी अखंड परंपरा व्यक्त होते तिचा उच्छेद वा तिच्याशी प्रतारणा हिंदूंनी करु नये. जर्मनांचा देश जसा जर्मनी, इंग्रजांचा इंग्लंड, तुर्कांचा तुर्कस्थान नि अफगाणांचा अफगाणिस्थान, त्याचप्रमाणे हिंदूंचा देश म्हणून हिंदुस्थान ह्या नावानेच आपले स्थान जगाच्या नकाशात चिरंतन खोदून ठेविले पाहिजे

आपल्या साहित्यातुन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी "राष्ट्र आणि हिंदुराष्ट्र" याबद्दलचे आपले विचारही खुप समर्पकपणे आणि पर्खडपणे मांडले आहेत. ते म्हणतात....

"जगातील मानवांनी एक व्हावे हीच आमची सदिच्छा आहे. जगातील मानवांनी एक होऊन त्यांचे एक मानवी राष्ट्र व्हावे असे आम्हांसही वाटते. आमचा वेदान्त तर याही पुढे जाऊन दगड नि मनुष्य हे सारखेच असल्याचे सांगतो. पण आपण परिस्थितीनुरुप व्यवहार केला पाहिजे. राष्ट्रवाद कालबाह्य नाही ,राष्ट्रवाद पाचशे वर्षे तरी जिवंत राहणार आहे. त्यानंतर काय होईल ते सांगता येत नाही. त्यानंतर पृथ्वी एक राष्ट्र होऊन मंगळ हे दुसरे राष्ट्र होईल. सिंधू ह्या शब्दाने व्यक्त होणारी कल्पना राष्ट्रवाचक आहे, केवळ भौगोलिक नाही

'हिंदू'शब्द मूलत: देशवाचक, राष्ट्रवाचक आहे. याचे मुख्य अधिष्ठान आसिंधु सिंधू अशी ही भारतभूमिका आहे. 'आसिंधु सिंधू' अशा त्या भारतभूमिकेत अत्यंत प्राचीन काळापासून ज्यांचे पूर्वज परंपरेने निवसत आले, ज्या राष्ट्रात प्रचलित असलेली सांघिक संस्कृती, घडलेला इतिहास, बोललेल्या भाषा, अनुसरलेले धर्म; ज्यांचे संस्कृती, इतिहास, भाषा, धर्म आहेत ते सारे हिंदु होत. त्या हिंदुराष्ट्राचे घटक होत. -

हिंदू हे केवळ एक राष्ट्र नसून ती एक जाती आहे. उत्पत्ती करणे ह्या अर्थाच्या जन धातूपासून जाती हा शब्द सिध्द झाला असून त्याचा अर्थ बंधुभाव, समान रक्त अंगात खेळत असलेला, एक उगम असलेला वंश असा होतो सप्तसिंधूतील लोक जसजसे हिंदुस्थानभर पसरत गेले तसतसे त्यांच्यात विविध वंशाचे मिश्रण, अनुलोम-प्रतिलोम विवाह इत्यादीमुळे झाले. जाती हा शब्द ह्या अर्थी वापरलेला आहे.राष्ट्रीय व वांशिक दृष्टिकोनातून पाहिले तर आपली तीर्थे सर्व हिंदू जातीचा समान वारसा आहे आपले सण, उत्सव, संस्कार व आचार समान असहेत. हिंदु कोठेही असो मग तो शीख, जैन, ब्राह्मण वा पंचम असे तो दसरा, दिवाळी, रक्षाबंधन आणि होळी ह्यांचे स्वागत करतो.ज्या तीर्थांचे, पर्वतांचे, नगरांचे व नद्यांचे स्मरण हिंदू करतात ती कोणाही एक प्रांतातील नाहीत. तर ती अखिल हिंदुस्थानातील आहेत.शीखांचे अमृतसर, वैदिकांची काशी, बौध्दांची गया ही सारी आम्ही हिंदूंची सामायिक नि सारखीच पुण्यक्षेत्रे होत कलाकृती वा वास्तू, मग त्या वैदिक वा अवैदिक विचारांच्या प्रतिनिधी असोत, आपल्या वंशाचा समान वारसा आहे हिंदू निर्बंध व त्यांची आधारभूत तत्वे ह्यांतील तपशिलांत वा आदेशांत काही ठिकाणी परस्पर विरोध भासत असले तरी त्यांचा इतका एकावयवी विकास झालेला आहे की काल व देश ह्या स्थितीतून ही त्यांची वैशिष्टये टिकून राहिली आहेत

हिंदु धर्मामधील विविध समाजरचना, तसेच वैचित्र्यांबद्दल बोलताना ते विशद करतात......

कोणताही समाज वा राष्ट्र एकजीव होऊन जे जगते आणि त्यांच्याव्यतिरिक्त एतर समाजांशी होणार्‍या संघर्षातुनही तग धरते त्या लोकांमध्ये आपसात वैषम्य असे मुळीच नसते म्हणून नव्हे. कारण कुटुंब म्हटले की कुटुंबात व्यक्तिवैचित्र्य नि मतभिन्नता असतेच. मग कोटी कोटी व्यक्तींच्या एकजीवी समाजाची वा राष्ट्राची गोष्टच बोलणे नको. एका साच्यात पाडलेल्या गणपतीच्या मूर्तीप्रमाणे त्या कोटी कोटी व्यक्ती एकसाची असणे अशक्यच. परंतु त्या समाजातील पक्षोपक्षांची ही अंतर्गत विषमता इतर कोणत्याही समाजाशी असलेल्या त्यांच्या विषमतेहून अगदी कमी असते. आणि त्या समाजातील अनेक पक्षांना एकजीव करणारी महत्वाची बंधने दुसर्‍या समाजाशी असणार्‍या त्यांच्या संबंधांपेक्षा आत्यंतिक आकर्षक नि बळकट असतात म्हणून ते समाज वा राष्ट्र तसे पृथक नि एकजीव राहू शकते.

हिंदुराष्ट्रातील विविध विभागांचे परस्पर धोरण काय असावे ? यावरही सावरकरांची मते खुप उद्बोधक आणि क्रांतिकारक आहेत.

संख्येचे, भौगोलिक किंवा वांशिक लाभ निसर्गत: व ऐतिहासिक दृष्टया ज्यांना लाभलेले नाहीत असे लोक इतरांबरोबर देवाण घेवाण करण्याचे प्रयत्न करीत आहेत. जन्मसिध्द अधिकारांनी प्राप्त झालेले लाभ ज्यांना माहीत नाहीत व त्याहूनही वाईट म्हणजे त्यांचाच तिरस्कार करतात अशांचा सत्यानाश होवो ! कागदाच्या कपटयांतून किंवा अडचणीत उत्पन्न झालेल्या बंधंनांनी नव्हे तर रक्ताच्या, जातीच्या, संस्कृतीच्या बंधनांनी झालेल्या प्राचीन, नैसर्गिक व एकजीवी एकीकरणापासून फुटणे व त्यालाच नाशिणे हे तुमच्यापैकी जैन समाजी, सनातनी , शीख वा कोणत्याही उपविभागाला परवडणार आहे का? असलेले बंध दृढ करा. ज्या भिंतीची उपयुक्ततता संपली आहे अशा भिंती, जाती, रुढी, विभाग मोडून टाका.आमच्या वैदिक, जैन, बुध्द, शीख, लिंगायत प्रभृती यच्चयावत् हिंदू बंधूंनी आपले मतभेद धार्मिक क्षेत्रापुरते काय ते ठेवून आपणा सर्वांना जी अनेकविध सामाजिक जीवनाची प्रिय बंधने आणि नात्यागोत्याचे स्नेहसंबंध आज शतकोशतके एकजीवी असे एक महान् राष्ट्र बनवीत आले आहेत, त्या स्नेहसंबंधांनाच शक्यतो जोपासीत राहावे, यातच आपल्या सगळयांचे कल्याण आहे

त्यांच्यामते हिंदुस्थानात हिंदू ही 'जात' होऊ शकत नाही. हिंदुस्थानात आम्हांस एक जाती म्हणणे मूर्खपणाचे आहे. जर्मनीत 'जर्मन' हे राष्ट्र आहे आणि ज्यू एक जात आहे. तुर्कस्थानात तुर्क हे एक राष्ट्र आहे. व अरब वा आर्मेनियन अल्पसंख्य जाती आहेत. त्याचप्रमाणे हिंदुस्थानात हिंदू एक राष्ट्र आहेत व अल्पसंख्य मुसलमान वा ख्रिश्चन या एक जाती आहेत

वैदिक काळापासून निदान पाच सहस्त्र वर्षे तरी आपले पूर्वज आपल्या लोकांचा धार्मिक, वांशिक, सांस्कृतिक नि राजकीय दृष्टया एकात्म असा गट घडवून आणीत होते. त्या क्रियेला स्वाभाविकपणे विकास पावता जे फळ आले ते म्हणजेच वैदिक काळातील त्या सिंधूचेच आज सबंध हिंदुस्थानभर पसरलेले आणि हिंदुस्थानालाच आपली एकमेव पितृभू नि पुण्यभू मानीत असलेले असे हिंदुराष्ट्र होय. कदाचित चिनी राष्ट्र वर्ज्य केल्यास जगातील दुसर्‍या कोणत्याही राष्ट्राला आपल्या हिंदुराष्ट्रासारख्या आपल्या जीवनाच्या नि विकासाच्या अखंड सातत्यावर अधिकार सांगता येणार नाही. हिंदुराष्ट्र हे काही पावसाळयातल्या कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे उगवलेले नाही. ते एखाद्या तहातून उत्पन्न झालेले नाही. ते निव्वळ कागदी खेळणे नाही. किंवा ते एखाद्या मागणीप्रमाणे घडविलेले नाही. अथवा ती एखादी चालचलाऊ सोय नाही. ते ह्याच भूमीतून वर आलेले आहे नि ह्या भूमीतच त्याची मुळे खोल नि दूरवर पसरलेली आहेत. मुसलमानांचा किंवा जगातील अन्य कोणाचा द्वेष करण्याकरिता म्हणून काही तरी लावलेला शोध नाही. तर आपली उत्तर सीमा सांभाळणार्‍या हिमालयाप्रमाणे ते एक भक्कम आणि प्रचंड सत्य आहे.

आपल्या आचारातुन, विचारातुन आपल्या साहित्यातुन स्वा. विनायक दामोदर सावरकर सर्वे हिंदुस्थानवासीयांना एक हृद्य आवाहन करतात.....

"आपल्या पितामहांनी मराठा व शीख हिंदु साम्राज्याच्या पतनाच्या वेळी जो तेथेच सोडून दिला तो आपल्या राष्ट्रीय जीवनाचा धागा आपण हिंदूंनी पुन्हा उचलून हाती धरावा. आत्मविस्मृतीमुळे क्षय झालेल्या आपल्या हिंदुराष्ट्राच्या जीवनाचे आणि विकासाचे आपण पुनरुज्जीवन केले पाहिजे, त्याला समाधीतून पुन्हा उठविले पाहिजे प्रामाणिक व भोळसट अशा हिंदूंच्या हे स्पष्ट ध्यानात आले पाहिजे की सर्वसामान्य राष्ट्रीय जीवनाशी मुसलमानांनी समरस होण्याचे नाकारले म्हणजे नकारात्मक दृष्टीने सुध्दा हिंदूंचे एक राष्ट्र उरते.

राष्ट्राचा मोठेपणा त्याच्या ध्येयातून व्यक्त होतो. राष्ट्राचे स्वरुप त्याने आपल्यापुढे ठेवलेल्या ध्येयावर अवलंबून असते. संकुचित ध्येयाच्या राष्ट्रांनी भूतकाळात चिरंतन मोठेपणा प्राप्त केलेला नाही. राष्ट्राला महानता व वैभव प्राप्त करुन देण्याकरिता उदात्त ध्येय असणे आवश्यक आहे...

माझा हा वारसा मी तुम्हांस देत आहे

वटवृक्षाचे बीज मोहरीहून लहान असते पण त्या बीजात जी स्फूर्ती असते, जी वल्गना असते ती वाढता वाढता तिचा प्रचंड वटवृक्ष बनून त्याखाली गाईची खिल्लारे विसावा घेतात, उन्हाने श्रांत झालेल्यांना तो वटवृक्ष सावली देतो.

मलाही वल्गना करु द्या ! माझे गाणे मला गाऊ द्या !

या जगात आपणाला जर हिंदुत्वाचे मानाचे राष्ट्र म्हणून जगावयाचे असेल तर तसा आपला अधिकार आहे आणि ते राष्ट्र हिंदुध्वजाखालीच स्थापन झाले पाहिजे. या नाही तरी पुढल्या पिढीत ही वल्गना खरी ठरेल.

माझी वल्गना खोटी ठरली तर मी वेडा ठरेन. माझी ही वल्गना खरी ठरली तर मी प्रॉफेट ठरेन. माझा हा वारसा मी तुम्हाला देत आहे!

त्या महान द्वेष्ट्या समाजसुधारकाला, महान तत्वचिंतकाला, हिंदुत्वाचा खरा खुरा अर्थ समजलेल्या त्या महान देशभक्ताला माझे लाखो प्रणाम!

जय हिंद !

विशाल कुलकर्णी

संदर्भ : १. सहा सोनेरी पाने : स्वा. सावरकर
२. हिंदुत्व : स्वा. सावरकर
३. Savarkar & Hindutva : The Godse Connection by A.G. Durrani
४. www.savarkar.org

Groups audience: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

विशाल छान अभ्यासपूर्ण लेखन. एक प्रश्न आहे......मला स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्धल नितांत आदर आहे. पण हा लेख वाचतान अएक गोष्ट जाणवली ती विचारते आहे. कोणताही वाद चालू करण्याचा हेतू आजीबात नाही.

प्रश्नः संपूर्ण लेखात जिथे जिथे हिंदूस्थान किंवा भारतीय भूमीचा उल्लेख आला आहे तिथे तिथे तू किंवा स्वा. सावरकरांनी मातृभूमी हा शब्द न वापरता पितृभूमी हा शब्द वापरला आहे. सामान्यतः मी हिंदूस्थानला किंवा भारतभूमीला मातृभूमी संबोधल्याचेच वाचले, ऐकले आणि पाहिले आहे. पितृभूमी हे मी पहिल्यांदाच वाचते आहे. (टीपः मला जरी स्वा. सावरकरांबद्धल नितांत आदर असला तरी त्यांनी लिहीलेल्या साहित्याचं फारसं वाचन मी केलेलं नाही.) या बद्धल काही प्रकाश टाकता येईल का?

>>>
स्वा. सावरकरांचे आजवर वाचलेले साहित्य, आंतरजालावर उपलब्ध माहिती आणि इतरही काही संदर्भ वापरुन हा लेख संकलीत केला होता. अर्थात त्यामुळे हा लेख मी लिहीलाय असे म्हणता येइल की नाही कुणास ठाऊक. पण स्वातंत्र्यवीरांचे विचार संकलित करण्याची मेहनत मी जरुर घेतली आहे.
>>>>

चांगले संकलन.
तुम्ही लिहीला आहे असे नक्कीच म्हणत येणार नाही. टंकिला आहे असे म्हणू वाटल्यास.
नुसतेच संकलन असल्याने त्यावर दुसरी चर्चा करण्यासारखे काही नाही. मांडलेल्या विचारांचा वाद / प्रतिवाद करावयाचा असल्यास तुमच्याशी करून उपयोग नाही कारण हे तुमचे नसून स्वा. सावरकरांचे विचार आहेत.

>>>हा लेख माबोच्या दिवाळी अंकासाठीदेखील पाठवला होता. पण कुठल्याशा कारणाने (नियमात बसत नसल्याने असेल कदाचित) तो तिथुन साभार परत आला. तेव्हा तो इथे टाकत आहे. धन्यवाद.
>>>
अतीशय सुंदर निर्णयाबद्दल दिवाळी अंक संपादकांचे अभिनंदन.

----

हिंदुत्वाविषयी सांगोपांग चर्चा. असा बाफ इकडे आहे. त्यावरची चर्चा (कथ्याकूट) मला वाटते अपुरी झाली असावी, किंवा तो धागा हरवावा अन दुसरीकडे नवी चर्चा सुरु व्हावी अशा विचाराने हा बाफ सुरू झाला असावा.

----

@ झक्कीकाका,
तुम्ही मला व्यक्तिशः लिहीले नाहीत, पण हा अश्या प्रकारचा युक्तिवाद फार वेळा ऐकला आहे -->>
की त्यांनी काही महिने पाकीस्तानात जाऊन रहावे. तिथे त्यांना ब्राह्मण किंवा हिंदू यांचा त्रास होणार नाही. तिथे त्यांना सांगा की हा देश मुसलमानांचा नाही, इतर कुणाचा होता, नि खोटे लिहून तुम्ही फसवणूक करता आहात्. मग तिथून जर जिवंत पर आलात तर - (तुम्हाला पटेल की ब्राह्मणी असले तरी तुम्हाला जिवंत सामावून घेण्याइतके चांगले लोक आहेत इथे. त्यांना मदत करा, तुमचे मत सांगा, बरोबर वाटले तर घेऊच विचारात.)
<<<

या युक्तिवादाबद्दल थोडेसे विचारतो :
वरच्या बाफ वर मी सांगितल्याप्रमाणे 'हिंदुस्थान' हा शब्द या देशाच्या घटनेत नाही. तो (खलिस्तान वगैरें शब्दांसारखा) 'कोटिकोटि मनामनात' बसलेला शब्द आहे. तरिही, तुम्ही(तथाकथित 'हिंदुत्ववादी') या देशाच्या घटने विरुद्ध तुमचा देश हिंदुस्थान असे लिहून / बोलूनही 'भारतीय' लोक तुम्हाला कधी काही करत नाहीत, हा 'भारताचा' मोठेपणा नव्हे काय? उगा पाकिस्तानात जाऊन रहा, अरबस्तानात जाउन रहा कशाला बोलावे?

त्या एका बाबतीत मुस्लिम धर्मातील माथेफिरूंच्या वागण्याशी तुलना का करावी वाटते तुम्हाला? तुम्ही हिंदूधर्मातील माथेफिरू बनायचा प्रयत्न करणार का?

इथे बसून मुस्लिम धर्म वाईट / माथेफिरू असे लिहितांना / सूचित करतांना आपणही तेच करीत आहोत की नाही? पाकिस्तानी नागरिक शत्रूत्वाने वागतो, त्याला शिव्या द्या ना! मीपण येतो सोबत. नुसत्या शिव्या नाही, बाकी पण सगळे करू. पण म्हणून प्रत्येक मुसलमान, अगदी तुमच्या शेजारी जन्मल्यापासून राहतो तो पण वाईट? का? तो शेजारचा भारतीय मुसलमान वाईट हे सिद्ध केले तरच 'हिंदू' व्होटबँक भाजपा ला मते देईल असे वाटते का? त्यासाठीच जर हा सगळा प्रचार असेल, तर हे या देशाचे दुर्दैव मोठे आहे. २ च मोठे पक्ष -काँग्रेस अन भाजपा- अन दोघेही जाती/धर्माची व्होटबँक बनवून देशास बुडवायला निघालेत.

हिंदू धर्म अन भारताचे देशप्रेम यांचे "संकरित हायब्रिड" तयार करू नका हो कृपा करून.

असो.

ता.क. :
(तुम्हाला पटेल की ब्राह्मणी असले तरी तुम्हाला जिवंत सामावून घेण्याइतके चांगले लोक आहेत इथे. त्यांना मदत करा, तुमचे मत सांगा, बरोबर वाटले तर घेऊच विचारात.)
या 'डायलॉगवर' मुद्दाम काहीच बोललेलो नाहिये. कित्ती चांगले लोक आहेत, मला किंवा कुणाला जिवंत ठेवण्याची कॄपा करणारे!!!! वाचलो बुवा मी. मेलोच असतो..

हिंदू धर्म अन भारताचे देशप्रेम यांचे "संकरित हायब्रिड" तयार करू नका हो कृपा करून.

तेवढं समजलं अस्तं तर हिंदुत्वाचे एवढे ढीगभर धागे निघाले अस्ते का?

आमचा वेदान्त तर याही पुढे जाऊन दगड नि मनुष्य हे सारखेच असल्याचे सांगतो.

आणि एवढा वेदांत शिकूनही काही धर्माना वगळून वेगळ्या हिंदुत्वाची व्याख्या करावीशी वाटते, म्हणजे आश्चर्यच नै का? हिंदुस्तान या नावाचा देश आज जगात कुठेही नाही.. आज आपला देश भारत आहे. आपण सारे भारतीय

या देशाच्या स्वातंत्र्याच्या १८५७ पासून सुरु झालेल्या लढयात कोणी खरा त्याग केला ? - हिंदूंनी का मुसलमानांनी ?>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

आता हे नेमके कसे ठरवले?

जागोमोहनप्यारे | 24 September, 2011 - 20:58 नवीन

या देशाच्या स्वातंत्र्याच्या १८५७ पासून सुरु झालेल्या लढयात कोणी खरा त्याग केला ? - हिंदूंनी का मुसलमानांनी ?>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

आता हे नेमके कसे ठरवले?

>>
त्याचा अर्थ असा असावा की या देशाच्या नागरिकांनी केला. तिथे धर्माचे लेबल नव्हते. जातांना ते 'मायबाप' ब्रिटिश 'फोडा अन झोडा' करून भांडणं लावून गेले. मग आपण अजून भांडत बसलोय.

जन्मसिध्द अधिकारांनी प्राप्त झालेले लाभ ज्यांना माहीत नाहीत व त्याहूनही वाईट म्हणजे त्यांचाच तिरस्कार करतात अशांचा सत्यानाश होवो

बहुतांश सगळे भारतीय नागरिक जन्माने भारतीयच असतात, कोणत्याही धर्माचे असले तरी... त्यामुळे मुसलमानाना आणि ख्रिस्चनाना जन्म्सिद्ध अधिकार नसतात, हे म्हणणे चुकीचे आहे.

हिंदू धर्म अन भारताचे देशप्रेम यांचे "संकरित हायब्रिड" तयार करू नका हो कृपा करून.

हे बरोबर आहे असे वाटते. तसे बर्‍याच गोष्टी बरोबर आहेत वगैरे पटते, पण प्रत्यक्षात तसे आचरण होत नाही. गेल्या हजारो वर्षापासून मनात बसलेली कल्पना अशी एकदम जात नाही. कळते, पटते की दारू पिणे वाईट, पण दुर्दैवाने जर सवय लागली असेल, तर लगेच सुटत नाही.

श्री. इब्लिस,
हिंदू धर्म अन भारताचे देशप्रेम यांचे "संकरित हायब्रिड" तयार करू नका हो कृपा करून.

हे तुमचे मत, इतरांचे मत वेगळेच!!
पण एकंदरीतच मला तुमचे लिहीलेले काही समजत नाही. विशेषतः कुणाच्या लिखाणातून काय सूचित केले आहे हे तुम्हाला जसे वाटते तसे सर्वांनाच वाटत नाही. उदा. माझ्या कुठल्या लिखाणातून हिंदू व्होटबँक, भाजपला मते वगैरे तुम्हाला कसे जाणवले ते कळत नाही. या दोन्ही गोष्टींशी माझा गेली चाळीस वर्षे अजिबात संबंध नाही. येऊ नये अशी तीव्र इच्छा, माहिती तर अजिबात नाही. अश्या परिस्थितीत जे माझ्या मनाला शिवत सुद्धा नाही, ते तुम्हाला माझ्या लिखाणात कसे दिसले?

तसेच त्या दुसर्‍या धाग्यावर श्री. योग यांच्या लिखाणातून तुम्हाला "बादवे, अरबस्तानातील धर्म तुमचा आदर्श वगैरे आहे का? तसेच आपण वागावे असे तुमचे म्हणणे आहे का?" असे कसे एकदम वाटले? मी विचारले होते, पण तुम्ही उत्तर दिले नाहीत.
तुमच्या कुशाग्र बुद्धिमत्तेसमोर काही लिहीण्याची चोरी! कशातन काय अर्थ काढाल?? गंमतच आहे न् काय? विनोद करता का?

नि "शेजारचा मुसलमान" वगैरे युक्तिवाद जुना झाला. कुणि फसणार नाही. सर्वांना माहित आहे इथे जेंव्हा मुसलमानांबद्दल वाईट लिहीतात ते फक्त अतिरेकी, वाईट वर्तन करणार्‍यांबद्दल बोलतात, शेजारच्या मुसलमानाबद्दल नाही! मुद्दामून काहीतरी लोकांची दिशाभूल करायचा प्रयत्न करायचा!!! का हाहि विनोद??

जातांना ते 'मायबाप' ब्रिटिश 'फोडा अन झोडा' करून भांडणं लावून गेले. मग आपण अजून भांडत बसलोय.

ब्रिटिशानी हिंदु मुस्लिम वाद नेमका कसा जन्माला घातला?

@ झक्की काका,

तुम्हाला पटेल की ब्राह्मणी असले तरी तुम्हाला जिवंत सामावून घेण्याइतके चांगले लोक आहेत इथे. त्यांना मदत करा, तुमचे मत सांगा, बरोबर वाटले तर घेऊच विचारात.

याची टीप्पणी वाचली की समजेल काय बोलतोय? दिशाभूल कशी ते ही समजेल. रच्याकने, तुम्ही भारतात की बाहेर? रहायला?

@ जा.मो.प्या.
ब्रिटिशानी हिंदु मुस्लिम वाद नेमका कसा जन्माला घातला?
>>
काय हे?
डॉक्टर ना तुम्ही?
मग जन्माला येण्यापूर्वी गर्भधारणा, त्या आधी/नंतर काय काय ते सगळं समझवून सांगू काय? क्अमाले तुमची.
ब्रिटिषांना 'जालाय' तो. त्यांनी जन्माला घातलाय.
i mean त्यांनाच विचारू यात का, नवीन बाफ उघडून?

@ झक्की काका

>>>
तसेच त्या दुसर्‍या धाग्यावर श्री. योग यांच्या लिखाणातून तुम्हाला "बादवे, अरबस्तानातील धर्म तुमचा आदर्श वगैरे आहे का? तसेच आपण वागावे असे तुमचे म्हणणे आहे का?" असे कसे एकदम वाटले? मी विचारले होते, पण तुम्ही उत्तर दिले नाहीत.<<<

त्या 'योग' यांनी पण मला तेच सांगितले होते हो काका, कि अरबस्तानात या (अन मुसल्मानांना शिव्या द्या. तिथे 'हिंदूस्थानात' राहून 'हिंदू(त्ववाद्या)ना' शिव्या देताहात तर?) मग 'जिवंत' परत जाता का पाहू?

the exact same thing you said here, and extended it here, saying, that 'brahmins are keeping you alive' QUOTE की ब्राह्मणी असले तरी तुम्हाला जिवंत सामावून घेण्याइतके UNQUOTE

यात अमक्याने मला (तुमच्या विरोधी मत मांडणार्‍यास) जिवंत ठेवलेय, असले जर तमक्यांच्या बाबत कराल, तर तमका मारील, असे "implication" येत नाही का?

बोलती बंद झाली, की "तुमच्या कुशाग्र बुद्धिमत्तेसमोर काही लिहीण्याची चोरी! कशातन काय अर्थ काढाल?? गंमतच आहे न् काय? विनोद करता का?" हे असे बोलावे लागते.

कोण कुणास जिवंत ठेवितो हो? पैलतिरी नेत्र असू द्यावे...

नि "शेजारचा मुसलमान" वगैरे युक्तिवाद जुना झाला.
काका,
तो युक्तिवाद जुना नाही, बिनतोड आहे. म्हणून त्याला अनुल्लेखाने किंवा इतर मार्गाने मारावे लागते. जुना झाला वगैरे म्हणून. वेद जुने झालेत ना? मग जुने म्हणून जाआआआस्त भारी नैत का? सगळेच जुने सोडायचे का??

हे तुमच्याशी पर्सनल भांडण नाही मांडले. हे त्या तत्वज्ञानाशी भांडण आहे, जे तत्वज्ञान तुम्हाला बोलते करते आहे.

...
एकवेळ हे तुमचे मनापासूनचे मत म्हणून खरे समजून बोलतो.

"सर्वांना माहित आहे इथे जेंव्हा मुसलमानांबद्दल वाईट लिहीतात ते फक्त अतिरेकी, वाईट वर्तन करणार्‍यांबद्दल बोलतात, शेजारच्या मुसलमानाबद्दल नाही! मुद्दामून काहीतरी लोकांची दिशाभूल करायचा प्रयत्न करायचा!!! का हाहि विनोद??"

काका,
आज, या देशात, जेव्हा जेव्हा हिंदू/मुस्लिम दंगे होतात - आपली 'यंग' जनरेशन याला एचेम म्हणते. - h-m -
तेव्हा तुम्ही/मी करतो तो तात्विक विचार करित नाही. हे दंगे 'घडवून' आणले जातात. त्यातले गुन्हेगार यच्चयावत (सगळे. काय जे स्पेलिंग असेल ते) कोर्टात सुटतात. नंतर अन आधी पण दोन्ही जातींचे पुढारी गळ्यात गळे घालतांना दिसतात. कुणाचे काय 'धंदे' ते सर्वांना माहिती असतात.

इथे येणारे सगळेच आप्णा इतके विचारी नाहीत. ते वर-वर वाचतात.

वरचा प्रस्तावना लेख हा 'भडकाऊ' प्रकारात मोडतो कारण त्याची 'काँटेक्स्ट' ऋषितुल्य सावरकरांची विचारसरणी. यावर विचार करता येईल इतका IQ किती लोकांचा आहे? किती लोकांनी वाचला आहे सावरकर? अन सावरकर / विवेकानंद वाचून झाल्यावर बाकी इतरही वाचले? सारासार विचार न करता लिहिणारेच जास्त.
सावरकर असोत
कि आणिक गांधी असोत
या सगळ्यांची टाईम काँटेक्स्ट हे तरूण विसरताहेत. ठीक आहे.
स्वातंत्र्यवीर बोलले, वागले तेंव्हा ही मातृभूमी 'आंग्लभूमीभयभीता' होती. ब्रिटिशांनी पेरलेले विष उगवत होते, मुस्लिम लीग च्या रूपाने. त्या वेळी त्यांनी सांगितले, 'हिंदू'नो जागे व्हा. आज नक्कीच ते बोलले असते, 'भारतियांनो' जागे व्हा.
हा विचार ज्येष्ठ श्रेष्ठांनी करून तो या देशातील तरूणांपर्यंत पोहोचवायला नको?
अरे,
तो चीन या देशाचा मोठा 'फायनान्शिअल' शत्रू, आज तो पाकिस्तान त्या अमेरिकेच्या हाताखालून निघून तिकडे गेला. चायना च्या वस्तू तुमची वाट लावताहेत. पाक चा अणूबाँब कुठून मिळाला? हे सोडा, अन आपण बसू अमुक मोठे अन तमुक करत.
कमाआआआआआआल आहे!!!

इब्लिस महाराजांच्या पोस्टी विचार करायला लावणार्‍या आहेत...

ब्रिटिशांना किती दिवस दोष देणार?

इब्लिस,

तुम्ही म्हणालात की हिंदू धर्म अन भारताचे देशप्रेम यांचे "संकरित हायब्रिड" ... करू नका म्हणून.

पण त्याचं काय आहे की हिंदू धर्म हा मुळात वैदिक आहे. आणि अथर्ववेदातल्या भूमिसूक्तात स्पष्टपणे म्हंटलंय की माता भूमि: पुत्रो अहं पृथिव्या. मग हिंदू धर्म (= वैदिक परंपरा) आणि देशप्रेम याचं हायब्रीड वगैरे करायचा प्रश्न येतोच कुठे? दोन्ही एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

केवळ राजकारणी लोक गैरफायदा घेतात म्हणून आम्ही (=हिंदूंनी=भारतप्रेमींनी) देशप्रेम आणि हिंदू धर्म यांची फारकत करावी का? की राजकारण्यांना सरळ करावे? उदा. अण्णा हजारे स्टायलीत?

आ.न.,
-गा.पै.

की राजकारण्यांना सरळ करावे? उदा. अण्णा हजारे स्टायलीत?
----- सरळ लोकांनी राजकारणांत का जाऊ नये? सरळ असलेले लोकांतील औदासिन्य चिंताजनक आहे. तसे केले तर अण्णांची कामे कमी होतील.

<<<क्रूपया, खोट्या गोष्टीचा प्रचार करु नका. ही हिंदुंची भुमी नाही, तर उत्तर भारत गोंडाची भुमी आहे व दक्षिण भारत द्रविडांची. राहिला प्रश्न सिंधुसंस्क्रुतिचा ती स्वतंत्र संस्क्रुती होती, हिंदुच्या हजारो वर्षा आधी होती. आणी आर्य लोकानी सिंधूसंस्क्रुतीमधुन काही गोष्टी वेदीक संस्क्रुतीमधे बळजबरीने घुसविल्या, हे पुराव्यानीशि सिद्द झालेलं आहे.>>

क्रुपया पुरावा दिला तर बर होईल, सरस्वती नदीचा शोध लागल्यावर हे सिद्ध झाले आहे की आर्य हे मूळचे येथीलच. 'Artic home in Vedas' लिहिणार्‍या टिळकांनीही हनुमान पोद्दार यांच्या चरित्रात आपले मत बदलले असा उल्लेख मिळतो.

डॉ. वर्हाडपांडे यांना असे वाटते की, दास, दस्यू इत्यादी हिंदुस्थानचे मूळचे रहिवासी होते व त्यांना मारणारा इंद्र बाहेरून आला होता असे दाखवणारे एकही अक्षर ऋग्वेदात नाही. याचा अर्थ तसा संघर्ष नव्हता. ज्या सिंधू संस्कृतीचा आधार उत्तर ध्रुव मतधारक घेतात ती संस्कृती पुरामुळे अथवा जलप्रलयामुळे नष्ट झाली असा निष्कर्ष हिंदुस्थानच्या केंद्रीय पुरातत्व विभागाने काढून 1981मध्ये प्रकाशित केला आहे. स्वामी विवेकानंदांनी चालू केलेल्या ब्रह्मवादिनचे पुनर्मुद्रण 1972ला झाले असून त्यावरून ती हिंदू वैदिक संस्कृतीच होती असे मांडण्यात आले. बाळशास्त्री हरदासांनी सिंधू संस्कृती उत्खननात सापडलेल्या वस्तू वेदातील वर्णनाशी जुळणार्या आहेत असे ‘वेदातील राष्ट्रदर्शन’ या ग्रंथात मांडले. अमेरिकेच्या नायजेराचे वर्णन अनेक मराठी ग्रंथांत सापडते, पण त्यामुळे मराठी समाज तेथे राहत होता हे जसे सिद्ध होत नाही. त्याप्रमाणे उष:सूक्ताबाबतही म्हणता येईल. तो एखाद्याचा अनुभव असू शकेल, पण सार्या समाजाचा तो अनुभव आहे असे म्हणता येत नाही.

शिवाय आता कल्याणरामन यांनी उत्खननाच्या आधारावर हे सिद्ध केले की, ‘सरस्वती संस्कृती वैदिकच होती व ती सिंधू संस्कृतीपूर्वी सुमारे इ. स. पू. सात हजारांच्या सुमारास हिंदुस्थानात नांदत होती. आता त्याचे सात खंड भारतीय इतिहास संकलन योजनेने प्रकाशित केले आहेत.

मराठी व्युत्पत्ती कोशात प्रा. कृ. पा. कुलकर्णी यांनी हे मांडले की, कांजीवरमच्या राजांना इ. स. 400च्या सुमारास द्रविड म्हणत. कारण द्रमिळू किंवा दयाळू या शब्दातून तो शब्द तयार झाला आहे. द्रव, द्रविण ही त्याची संस्कृत रूपे असून त्यातून तो शब्द वेदकालानंतर कैक शतकांनी तयार झाला आहे. म्हणून द्रविड-आर्य हा संघर्ष संभवतच नाही. त्यामुळे राष्ट्रीय एकतेकरिता हा वाद कायमचा संपवावा हीच आजची गरज आहे.

अधिक माहिती साठी KOENRAAD ELST ह्यांचे पुस्तक वाचा
http://voiceofdharma.org/books/ait/

तसेच N S Rajaram, David Frawley व डॉ. वर्हाडपांडे ह्यांची पुस्तके वाचू शकता.

संदर्भः http://www.saamana.com/2011/May/10/stambhalekh.htm

<<राहीला प्रश्न सावरकरांचा, त्यांच्या कविता वाचुन तर वाटते की ते देशभक्त होते. पण देशातिल कुठल्या नागरिकांसाठी ते स्वातंत्र्याची मागणी करत होते याचा पण विचार/चर्चा झाली पाहीजे. सावरकारानी जेंव्हा जेंव्हा मात्रुभुमी म्हटले तेंव्हा तेंव्हा हिंदु हे शब्द न चुकता उच्छारले आहे, त्या मुळे त्याना नुसते देशभक्त म्हणुन चालणार नाही तर हिंदुत्ववादी देश भक्त असे म्हणने जास्त शोभेल.>>

जर अहिंदू ह्या भूमीला माता म्हणायला तयार नसतील तर त्यांचा उल्लेख करायचा अट्टाहास का?
'वंदे मातरम' वाद आठवा.

देशभक्त हा देशभक्त असतो त्यात हिंदुत्ववादी, धर्मनिरपेक्ष, निधर्मी, साम्यवादी, समाजवादी असा भेद कसा करणार? आता डांगे हे देशभक्त होते त्यांना तुम्ही साम्यवादी देशभक्त व गोरे समाजवादी म्हणून समाजवादी देशभक्त म्हणणार का? विचारसरणी व भक्ती ह्यांची गल्लत करू नका. समाजवादी गोरे, साम्यवादी राज कपूर व हिंदुत्ववादी टिळक गणपतीची भक्ती करायचे त्यांना तुम्ही समाजवादी गणेशभक्त, साम्यवादी गणेशभक्त व हिंदुत्ववादी गणेशभक्त म्हणणार का?
भेदभाव करू नका म्हणता 'हिंदुत्ववादी देश भक्त' म्हणून भेदभावाची सुरूवात करता??

<<हा देश हिंदुंच्या मालकीची जागीर आहे असा त्यांचा समज होता हे त्यांच्या प्रत्येक लेख व कवितांतुन उघड दिसते.>>
आता जर ते सत्य असेल तर तसे म्हणण्यात काय चूक आहे?? हा देश हिंदूंचा आहे तर आहे, इतरांनी त्याला आपले म्हणू नका असे तर ते म्हणाले नाहीत ना? किंवा इतरांना इथून हकला, कापा असेही नाही म्हणाले.
हिंदुमहासभेची घटना वाचा म्हणजे कळेल की त्यात अहिंदू/अल्पसंख्यांकांना स्थान होते, समान अधिकार होते मात्र विशेष अधिकार नव्हते व विशेषतः लांगूलचालन नव्हते. सावरकरांना अहिंदू मादाम कामा, फिरोजशहा मेहता, भगिनी निवेदिता, अनी बेझंट ह्यांच्या देशभक्तीविषयी आदर होता.

<<ज्या माणसाची देशभक्ती एक विशिष्ट धर्माभोवति फिरते, तीला देशभक्ति म्हणताना आपल्याला खरंतर लाज वाटायला पाहीजे. देशभक्ती ही व्यापक व सर्वसामावेशक असावी, ती फक्त महात्मागांधी व नेताजी (मार्ग जरी वेगळा होता)यांची होती. >>
आता त्यावेळी इतर धर्मीय ह्या देशाची फाळणी मागत होते व त्यासाठी Direct action करत होते. तरही सावरकर त्यांना म्हणाले,"याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्याशिवाय व विरोध कराल तर तो विरोध मोडून हिंदू आपले स्वातंत्र्य मिळवतीलच." असे आवाहन केले होते, पण ते आले नाहीत ह्यात सावरकरांचा काय दोष?
एका शाळेत २० मुले आहेत पण वर्गात केवळ ५ मुलांची उपस्थिती आहे, तर ते आलेत म्हणून मास्तर त्यांना शिकवत आहे तर तुम्ही असे म्हणाल का की त्यांची मास्तरकी केवळ ५ मुलांभोवती फिरते??

<<तुमच्या भावना दुखवायची इच्छा नाही, पण जे सत्य ते सत्य.

तसे भारताला त्यानी "हिंदभुमी" म्हणून आपलि पहिली फसवणुक केलीच आहे.>>

वास्तव म्हणजे फसवणूक नव्हे.

<<इतर हिंदूंच्या धर्मांना त्यांच्या त्यांच्या मान्य नावांनी जसे शीख धर्म किंवा आर्यधर्म किंवा जैन धर्म किंवा बुध्द धर्म संबोधिता येईल. जेव्हा ह्या सर्व धर्मांना एकत्रित नाव देण्याची आवश्यकता येईल तेव्हा हिंदुधर्म असे व्यापक नाव देणे उचित होईल.>>
<<<हा सावरकरांचा बामणी कावा नाहीतर काय म्हणायचे याला. आज ते जिंवत नाहीत, नाही तर या कारणावरुन त्यान परत तुरूंगात डांबता आले असते. कसले हे त्यांचे विचार! म्हणे देशभक्त.
अहो बामण भक्त म्हणा बामण भक्त.>>>>

आहो पण बाबासाहेब आंबेडकरांनी जे 'हिंदू कोङ बिल' लिहिले व पास होऊन उपयोगात आहे त्यानुसार ते 'हिंदू' कोड बिल केवळ हिंदू, शीख, जैन, बौद्ध, लिंगायात, आर्य समाजी ह्यांनाच केवळ लागू आहे, ते पारशी, मुसलमान, ख्रिश्चन, ज्यूंना लागू नाही...हि तर सावरकरांच्या हिंदुत्वाच्या व्याख्येची अप्रत्यक्ष पण निर्बंधान्वये (by law) मान्यता आहे, आता तुम्ही आंबेडकरांना सुद्धा बामणी कावा म्हणणार का????

<<<प्रश्नः संपूर्ण लेखात जिथे जिथे हिंदूस्थान किंवा भारतीय भूमीचा उल्लेख आला आहे तिथे तिथे तू किंवा स्वा. सावरकरांनी मातृभूमी हा शब्द न वापरता पितृभूमी हा शब्द वापरला आहे. सामान्यतः मी हिंदूस्थानला किंवा भारतभूमीला मातृभूमी संबोधल्याचेच वाचले, ऐकले आणि पाहिले आहे. पितृभूमी हे मी पहिल्यांदाच वाचते आहे.>>>

नाही, तिथे 'पितृभूमी' हाच उल्लेख आहे कारण आपण आपल्या पूर्वजांविषयी बोलताना नेहमी माझ्या वाड-वडिलांची/पितरांची भूमी, संपत्ती, वारसा असाच उल्लेख करतो, हिंदुत्व हा प्रबंध वाचा म्हणजे अर्थ लक्षात येईल.

<<<मी सांगितल्याप्रमाणे 'हिंदुस्थान' हा शब्द या देशाच्या घटनेत नाही. तो (खलिस्तान वगैरें शब्दांसारखा) 'कोटिकोटि मनामनात' बसलेला शब्द आहे. तरिही, तुम्ही(तथाकथित 'हिंदुत्ववादी') या देशाच्या घटने विरुद्ध तुमचा देश हिंदुस्थान असे लिहून / बोलूनही 'भारतीय' लोक तुम्हाला कधी काही करत नाहीत, हा 'भारताचा' मोठेपणा नव्हे काय? उगा पाकिस्तानात जाऊन रहा, अरबस्तानात जाउन रहा कशाला बोलावे?>>

'महात्मा गांधी ह्या देशाचे राष्ट्रपिता आहेत' असाही उल्लेख घटनेत नाही तरी त्यांचा 'राष्ट्रपिता' असा उल्लेख केला जातोच ना? का केला जातो कारण तशी भावना आहे, श्रद्धा आहे म्हणून. हा जर ते राष्ट्रपिता नसतील तर तसे सिद्ध करा पण तसे म्हणणे म्हणजे काही घटनाविरोध नाही.
'हिंदुस्थान' हा तर प्राचीन उल्लेख आहे, त्याला पुरावे आहेत. हिंदूची तशी श्रद्धा आहे व ह्यामुळे कोणाला काही अपाय तर पोचत नाही ना?
पाकिस्तानी अजूनही आपल्या देशाचा उल्लेख 'हिंदुस्थान' असाच करतात, क्रिकेट समालोचन किंवा इतर वक्तव्ये एका म्हणजे कळेल.

<<हिंदुस्थान असे लिहून / बोलूनही 'भारतीय' लोक तुम्हाला कधी काही करत नाहीत, हा 'भारताचा' मोठेपणा नव्हे काय? उगा पाकिस्तानात जाऊन रहा, अरबस्तानात जाउन रहा कशाला बोलावे?>>

आहो हिंदुस्थान लिहिण्या/बोलण्यात वावग/घटनाविरोधी काही नाही व हिंदू बहुसंख्य आहेत म्हणून.
आहो इथे शाहबानो सारख्या प्रकरणात घटना बदलणारे लोक आहेत पाकिस्तानात हिंदूसाठी घटना बदलली असती??

वाह अक्षय तुस्सी महान हो...
कुठे गेले ते भलतेसलते वाद घालणारे आयडी ? आता बोला...

अक्षय जोग, तुम्ही ज्या आय डी ची मते खोडत आहात तो आय्डी मायबोलीने कधीच खोडून टाकला आहे. ( अशाच एका धार्मिक वादाचे निमित्त झाले..) तुमच्या प्रश्नाना आता कोण उत्तरे देणार? Proud

पाकिस्तानी अजूनही आपल्या देशाचा उल्लेख 'हिंदुस्थान' असाच करतात, क्रिकेट समालोचन किंवा इतर वक्तव्ये एका म्हणजे कळेल.

भारतातले लोकही सिलोनला रावणाची लंका म्हणतात.. म्हणून त्यानीही त्यांच्या देशाचे तेच नाव ठेवायचे का?

ते 'हिंदू' कोड बिल केवळ हिंदू, शीख, जैन, बौद्ध, लिंगायात, आर्य समाजी ह्यांनाच केवळ लागू आहे,

त्याचे एकत्रित नाव हिंदु बिल असले तरी त्यात विविध पोटकलमे आहेत, ती ज्या त्या धर्माला स्वतंत्रपणे लागू आहेत.

<<<आणि एवढा वेदांत शिकूनही काही धर्माना वगळून वेगळ्या हिंदुत्वाची व्याख्या करावीशी वाटते, म्हणजे आश्चर्यच नै का? हिंदुस्तान या नावाचा देश आज जगात कुठेही नाही.. आज आपला देश भारत आहे. आपण सारे भारतीय>>

दोन्हीकडून बोलायचे. वेद मानले असते तर म्हणाले असते वेद कालबाह्य, बामणी कावा आहे वगैरे.
पण सावरकरांनी वेदातील कालबाह्य गोष्टी टाकून दिल्या व चांगले ते घेतले.

त्यांनी काही धर्मांना वगळले आहेच पण का वगळले तेही सांगितले आहे, पुण्यभू व पित्रुभू ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात. बर त्यात आमचा अंर्तभाव करा अशी मागणी त्यांनी का केली नाही ह्याचाही विचार आवश्यक आहे.
त्यांना ती व्याख्या करावीशी वाटली त्याला कारणेही आहेत-- भारतावर झालेली आक्रमण, त्यावेळची परिस्थिती म्हणजे मोपल्यांचे बंड, त्यांची विशेषाधिकाराची मागणी, दंगली, अत्याचार, लांगूलचालन इत्यादी. म्हणजे त्यांनी संशोधनाने, अभ्यासाने,मननाने, चिंतनाने, इतिहासमीमांसेने व्याख्या केली आहे की ज्याला भूत व वर्तमानाचे पुरावे आहेत. बर व्याख्या करताना 'direct action' व छळछावणीचे आदेश दिले नव्हते.
सावरकरांनी हिंदुत्वाची व्याख्या केली व सांगितले की हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व व एक वेळ अशी येईल की हिंदुत्व हा शव्द ह्या देशाचा नागरिक ह्या अर्थाने उपयोगात आणला जाईल...म्हणजे त्यांची व्याख्या प्रवाही होती. ते भविष्याविषयी आशावादी होते.

एक वेळ अशी येईल की हिंदुत्व हा शव्द ह्या देशाचा नागरिक ह्या अर्थाने उपयोगात आणला जाईल.

लई आशावादे आहात राव तुम्ही ! तुम्हाला शुभेच्छा.. Proud ज्या दिवशी असं होईल त्या दिवशी पासपोर्टवर नागरिकत्व म्हणूण हिंदुत्व असे आम्ही आनंदाने लिहून घेऊ..

पण तोपर्यंत तरी आम्ही भारतीयच रहाणार. जगात इंडियन म्हणून ओळखले जाणार.

त्यांनी काही धर्मांना वगळले आहेच पण का वगळले तेही सांगितले आहे, पुण्यभू व पित्रुभू ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात

काही समजले नाही.. म्हणजे वगळलेल्या धर्मातील लोकांचे पितर या देशाचे नव्हते का? वगळलेल्या धर्मातील लोक कुणी आयात केले नव्हते.. ते एकेकाळचे हिंदुच.. एखाद्दुसरे मुघल परकीय असतील , किंवा काही ख्रिश्चन मूळचे ब्रिटिश असतील.. पण त्या धर्मातील इतर लोक मूळचे इथलेच आणि धर्मांतरीत आहेत...

मुघलाच्या काळात एखाद्याचा धर्म जबरदस्तीने किंवा आपखुशीने बदलला गेला असेल , तर आज त्याच्या खापर पणतूला तु मुस्लीम आहेस, हिंदु नाहीस म्हणजे ही तुझी पिट्रुभूमी नाही, असे साम्गणे, हा मूर्खपणा नाही का? आज १० मुस्लीम किंवा १० ख्रिस्चन घेतले तर त्यातल्यांचे किती जणांचे पूर्वज खरोखरच बाहेरुन आले आणि किती लोक मूळचे इथलेच पण धर्मांतरीत आहेत, हे खुद्द सावरकर तरी साम्गू शकतील का? मग असं असताना त्याना समाजप्रवाहापासून वगळणं हा अधिकार सावरकराना किंवा गोडसेबुवाना कुणी दिला?

आणि समजा, एखाद्याचे पूर्वज या देशातील नाहीत , तरी आज ती व्यक्ती कायद्यानुसार भारतीय आहे म्हटल्यावर तिला इथल्या देशाचा नागरिक म्हणवून घ्यायचा पूर्ण अधिकार आहे.

Pages