हिंदुत्व, हिंदुधर्म, हिंदुराष्ट्र आणि स्वातंत्र्यवीर सावरकर !

Submitted by विशाल कुलकर्णी on 12 October, 2009 - 07:16

स्वा. सावरकरांचे आजवर वाचलेले साहित्य, आंतरजालावर उपलब्ध माहिती आणि इतरही काही संदर्भ वापरुन हा लेख संकलीत केला होता. अर्थात त्यामुळे हा लेख मी लिहीलाय असे म्हणता येइल की नाही कुणास ठाऊक. पण स्वातंत्र्यवीरांचे विचार संकलित करण्याची मेहनत मी जरुर घेतली आहे. हा लेख माबोच्या दिवाळी अंकासाठीदेखील पाठवला होता. पण कुठल्याशा कारणाने (नियमात बसत नसल्याने असेल कदाचित) तो तिथुन साभार परत आला. तेव्हा तो इथे टाकत आहे. धन्यवाद.

..............................................................................................................................................

"आसिंधु सिंधु पर्यन्ता, यस्य भारतभूमिका ।
पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत: I I "

सिंधुस्थान ही ज्याची केवळ पितृभूमी नव्हे, तर पुण्यभूमीही आहे तो हिंदू! सिंधुपासुन सिंधुपर्यंत, अर्थात सिंधुनदीपासुन ते सिंधु म्हणजे सागरापर्यंत पसरलेली ही भुमी म्हणजे हिंदुभुमी आहे आणि प्रत्येक व्यक्ती ,जो कुणी या भुमीला केवळ आपली पितृभुमीच नव्हे तर पुण्यभुमीही मानतो तो हिंदु!मग तो कुठल्याही जाती धर्माचा असेना का! मुळात हिंदु हा केवळ एक धर्म नाहीच आहे, तर ती एक जिवनप्रणाली आहे. 'हिंदुधर्म' हे नाव कोणत्याही एका विशिष्ट धर्माचे वा पंथाचे विशेष नि अनन्य नाव नसून ज्या अनेक धर्मांची नि पंथांची ही भारतभूमी हीच पितृभूमी नि पुण्यभूमी आहे त्या सार्‍यांना समावेशिणार्‍या धर्मसंघाचे हिंदुधर्म हे सामुदायिक अभिधान आहे.!

हे आमचे एकजीवन आज ज्या एकाच शब्दात नवीन व्याख्येप्रमाणे व्यक्तविता येते तो अनन्य शब्द आहे 'हिंदू' ! या शब्दाच्या 'हिंदू' या दोन अक्षरांत अगस्तीच्या अंजलीत महासागर तसे तीस कोटी लोकांचे राष्ट्रचे राष्ट्र सामावलेले आहे.किती सार्थ आणि योग्य शब्दात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदु या शब्दाची महती, त्याचा योग्य अर्थ सांगितला आहे. हिंदु या संकल्पनेची व्यापकता, तिचा विस्तार केवढ्या समर्पक शब्दात मांडले गेल आहे इथे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मते आपल्या वंशाच्या मूळ पुरुषांनी आपल्या राष्ट्राला व आपल्या लोकांना देण्याकरिता जे पहिले आणि जवळ जवळ पाळण्यातले नाव निवडले ते सप्तसिंधू अथवा हप्त हिंधू आहे. सिधु नदीच्या समृद्ध खोर्‍यात राहणारे ते सिंधू. आणि इतर जगातील जवळ जवळ सर्व राष्ट्रे आपणांस ह्याच सिंधू किंवा हिंदू याच नावाने ओळखत असत. बर्‍याचदा असे म्हणले जाते की हिंदु हे नाव किंवा हा शब्द आपल्याला अरबांकडुन मिळाला. पण सावरकरांच्या मते हिंदू हा शब्द आपणांस अरबांनी दिलेला नाही. प्रेषित महंमदाच्या जन्मापूर्वी, नव्हे अरब हे एक 'लोक' म्हणून ओळखले जाण्यापूर्वीदेखील हे प्राचीन राष्ट्र आपणांकडून व इतरांकडून सिंधू वा हिंदू ह्या स्वाभिमानी नावाने ओळखले जात होते. अरबांनी सिंधू नदीचा शोध लावला हे म्हणणे जितके खरे तितके अरबांनी ह्या शब्दाचा शोध लावला हे म्हणणे आहे

हिंदुत्व, हिंदुधर्म, हिंदुजगत्

हिंदू चळवळीची विचारप्रणाली समजण्याकरिता ह्या तीन शब्दांचा अर्थ नीट समजावून घेणे अत्यावश्यक आहे. हिंदू या शब्दापासून इंग्रजीमध्ये 'हिंदुइझम' (हिंदुधर्म) हा शब्द बनविला आहे. त्याचा अर्थ हिंदू लोक ज्या धर्ममतांना वा मार्गांना अनुसरतात ती धर्ममते वा मार्ग. दुसरा शब्द हिंदुत्व हा त्यापेक्षा अधिक संग्राहक शब्द आहे. हिंदुधर्म ह्या शब्दाप्रमाणे हिंदूंच्या केवळ धार्मिक अंगाचा त्यात समावेश होत नसून त्यात हिंदूंच्या सांस्कृतिक, भाषिक, सामाजिक व राजकीय अंगांचाही समावेश होतो. 'Hindu Polity' ह्या इंग्रजी शब्दाशी तो जवळ जवळ समानार्थी शब्द आहे. त्याचे जवळ जवळ तंतोतंत भाषांतर Hinduness ह्या शब्दाने करता येईल. हिंदू जगत् Hindudom ह्या तिसर्‍या शब्दाचा अर्थ संकलितपणे हिंदू म्हणून संबोधिले जाणारे सर्व लोक. ज्याप्रमाणे इस्लामने मुसलमानी जगताचा किंवा ख्रिश्चनडम ह्या शब्दाने ख्रिस्ती जगताचा बोध होतो त्याप्रमाणे ह्या शब्दाने हिंदुजगताचा सामुदायिक बोध होतो.

स्वातंत्र्यवीर अगदी ठामपणे प्रतिपादन करतात की हिंदुत्व हा केवळ एक शब्द नव्हे, तर तो इतिहास आहे. ते मनापासुन समग्र हिंदु बांधवाना आवाहन करतात की अग्निहोत्री ब्राह्मण ज्याप्रमाणे यज्ञकुंडात अग्नी प्रज्वलित ठेवतो त्याप्रमाणे तुम्ही हिंदुत्वाच्या भावनेचे स्फुल्लिंग जतन करुन ठेवा. योग्य वेळ येताच त्याला फुंकर घालून भरतखंडभर हिंदुत्वाचा डोंब उसळून दिला की काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत हिंदुत्वाच्या भावनेने जनता भारली जाईल

हिंदुत्व का हवे? त्याचा आपल्याला काय फायदा होवु शकेल हे विषद करताना स्वातंत्र्यवीर सावरकर सांगतात कीं असा एक दिवस जरुर उगवेल किं समग्र मनुष्यजातीस ह्या शक्तीस (हिंदुत्व) तोंड द्यावे लागेल .हिंदुस्थानाला पितृभूमी व पुण्यभूमी मानणारे, असा इतिहास असणारे व समान रक्त व संस्कृती ह्यांनी बांधलेले कोट्यावधी लोक सर्व जगाला आपले म्हणणे अधिकारवाणीने सांगू शकतील. स्वातंत्र्यवीर एका आंतरिक अभिमानाने सांगतात की ज्यावेळी हिंदू लोक जगाला काही सांगण्याच्या स्थितीत असतात तेव्हा त्यांचे सांगणे गीतेच्या वा बुध्दाच्या उपदेशाहून फार वेगळे असत नाही हेही तितकेच खरे आहे. हिंदू जेव्हा हिंदू राहत नाही तेव्हा तो अत्यंत उत्कटपणे हिंदू असतो व शंकराप्रमाणे सर्व पृथ्वी वाराणसी मानतो. वाराणसी मेदिनी ! मानतो किंवा तुकारामाप्रमाणे 'आमुचा स्वदेश ! भुवनत्रयामध्ये वास ! ' असे उद्गारतो. हे बंधूंनो ! विश्वाच्या मर्यादा - तेथे माझ्या देशाच्या सीमा आहेत !

हिंदुस्थानात सुखाने नांदत असणार्‍या अनेक - नानाविध धर्मांविषयी बोलताना सावरकरांचा कंठ भरुन येत असे. त्यावेळी त्यांच्या चेहर्‍यावर एक अलौकीक असे तेज, एक समाधान पाहायला मिळे. विश्व हिंदु परिषदेच्या एका सभेत बोलताना स्वातंत्र्यवीर म्हणाले होते.

"बहुसंख्य हिंदूंच्या धर्माला सनातन धर्म किंवा श्रुति-स्मृति-पुराणोक्त धर्म अथवा वैदिक धर्म ह्या प्राचीन व मान्य संज्ञांनी संबोधिता येते. इतर हिंदूंच्या धर्मांना त्यांच्या त्यांच्या मान्य नावांनी जसे शीख धर्म किंवा आर्यधर्म किंवा जैन धर्म किंवा बुध्द धर्म संबोधिता येईल. जेव्हा ह्या सर्व धर्मांना एकत्रित नाव देण्याची आवश्यकता येईल तेव्हा हिंदुधर्म असे व्यापक नाव देणे उचित होईल. ह्यामुळे अर्थहानी होणार नाहीच, परंतु तो अधिक अचूक व नि:संदिग्ध होईल व आपल्या लहान समाजातील संशय व मोठया समाजातील राग दूर करुन आपला समान वंश व समान संस्कृती दर्शविणार्‍या आपल्या प्राचीन ध्वजाखाली पुन्हा एकदा सर्व हिंदूंना एकत्र करील..

इतर धर्मांप्रमाणे (उदा. मुस्लिम - कुराण, ईसाई- बायबल) हिंदुधर्माचे एक धर्मपुस्तक नाही हे चांगलेच आहे. कारण यामुळे आपला धर्मविकास थांबला नाही. आमचे धर्मतत्वही कोणत्या पुस्तकाच्या दोन पुठ्ठयात सामावू शकणार नाही. ह्या विश्वाच्या दोन पुठ्ठयांमध्ये जितके सत्य नि ज्ञान विस्तृत पसरलेले आहे तितके आमचे धर्मपुस्तक विस्तृत होईल.

हिंदुधर्म क्लैब्याची गाथा नाही. हिंदुधर्म नि:संशय सात्विक, क्षमाशील आहे. हिंदुधर्म क्रोधशीलही आहे. 'क्लैब्यं मा स्म गम: पार्थ' ही हिंदुधर्माची गर्जना आहे. 'अहिंसा परम धर्म:' ही ज्या हिंदुधर्माची व्याख्या आहे त्याच हिंदुधर्माची अगत्याची व तेजस्वी आज्ञा आहे की 'आततायिनमायान्तं हन्यादेवाविचारयन्' आणि त्या दोन्ही आज्ञांचा समन्वय, हिंदुधर्मच उत्तम प्रकारे लावू शकतो काही झाले तरी बुध्दिवादाच्या दृष्टीनेही एकंदरीत पाहता धर्मांत ग्राह्यतम धर्म असेल तर तो हिंदुधर्म होय !"

आपल्या हिंदुत्वाच्या कल्पनेबाबतीत सावरकर अतिशय स्पष्ट आहेत. योग्य ते बदल स्विकारण्याची त्यांची तयारी आहे. त्यासाठी प्रसंगी आपली रुढी-परंपरा यांच्या चौकटी मोडायला देखील ते तयार असत हे त्यांच्या आचार विचारातुन ठामपणे स्पष्ट होत असे. रत्नागिरीतील पतित पावन मंदीर हे याचे स्पष्ट उदाहरण आहे. मानवाच्या, मानव्याच्या भल्यासाठी आपल्या रुढी परंपरा मोडायची, चौकटी तोडायची त्यांची नेहेमीच तयारी असे. धर्म आणि राष्ट्रधर्म या संकल्पना स्पष्ट करताना सावरकर सांगतात किं हिंदीधर्म हा कुठल्याही रुढी परंपरांमध्ये, तथाकथीत चौकटीत अडकुन राहणारा नाही. बदलत्या समाजाला पोषक होइल अशा पद्धतीने आपले स्वरुप बदलत राहणे हा हिंदुधर्माचा स्वभावच आहे. पण फक्त तुम्ही आमच्याकडुनच जर बदलण्याची अपेक्षा करत असाल तर ते सर्वस्वी चुकीचे आहे. जर मुस्लिम , ख्रिश्चन वा इतर बांधव त्यांची मुसलमानत्व, ख्रिश्चनत्व इत्यादी 'त्वे' सोडीत असतील तर माझे हिंदुत्वही मानुषकेत विलय पावेल.
अगदी याच पद्धतीने माझे राष्ट्रीयत्वही - हिंदीपणही मानवराष्ट्रात तेव्हा विलय पावेल जेव्हा इंग्लिशपण, जर्मनपण इत्यादीपणा लुप्त होऊन फक्त मानवता, मनुष्यपणा तेवढा जगात, मनुष्यमात्रात सुखेनैव नांदू लागेल ! आज देखील जो खरा मनुष्यवादी (humanitarian) असेल त्याच्यापुरते त्याच्याशी देखील मी सर्व भेदभाव सोडून वागेन.

स्वातंत्रवीर सावरकरांनी भविष्यकाळाचाही विचार करुन ठेवलेला आहे. ते म्हणतात कि एखाद्या भविष्यकाळी हिंदू हा शब्द केवळ हिंदुस्थानचा नागरिक वाचक होऊ शकेल. जेव्हा सर्व सांस्कृतिक व धार्मिक दुराग्रह आक्रमक गर्विष्ठपणाशी वचनबध्द असलेल्या शक्तीचे विसर्जन करतील व धर्म 'वाद' म्हणून न राहता ज्या समान पायावर मानवी राज्य ऐश्वर्याने व दृढपणे उभे राहील अशा पायाच्या मुळाशी असलेल्या चिरंतन तत्वांचा केवळ समान संचय म्हणून राहतील, तेव्हा हा दिवस उगवेल. भक्तिभावाने इच्छा करावी अशा ह्या सिध्दीची पहिली रेखासुध्दा क्षितिजावर दिसत नसताना कठोर वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करणे मूर्खपणाचे ठरेल. जोपर्यंत धोकादायक युध्दघोषणांकडे झुकणार्‍या मतांचा त्याग इतर प्रत्येक वादाने केलेला नाही तोपर्यंत एकजीवता व सामर्थ्य निर्माण करणारी बंधने विशेषत: समान नाव व समान ध्वज ही बंधने शिथिल करणे कोणत्याही सांस्कृतिक वा राष्ट्रीय एकांकाला परवडणार नाही.

"हिंदुस्थान" या नावाबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकरांना अतिव आदर, अभिमान होता. ते अभिमानाने सांगत की आपल्या देशाचे सर्वात प्राचीन नाव, ज्याविषयी आपणापाशी आधार आहे, ते सप्तसिंधू वा सिंधू आहे. भारतवर्ष हे नावसुध्दा नंतरचे अभिधान आहे. आणि त्याचे आवाहन व्यक्तिविषयक आहे. मनुष्य कितीही महान् असो, जसजसा काळ जातो तसतसा त्याचा गौरव कमी कमी होत जातो.संस्कृतमधील सिंधू शब्दाने सिंधू नदीचाच नव्हे तर समुद्राचाही ,दक्षिण द्वीपकल्पाला परिवेष्टणार्‍या समुद्ररशनेचा बोध होत असल्यामुळे हा एक शब्द आपल्या देशाच्या जवळ जवळ सर्व सीमा दर्शवितो. हिंदुस्थान ह्या शब्दाने मुख्य राजकीय व सांस्कृतिक विधेय जितके वक्तृत्वपूर्णपणे प्रकट होते तितके आर्यावर्त, दक्षिणापथ, जंबुद्वीप आणि भारतवर्ष ह्या शब्दांनी होऊ शकत नव्हते.

आपल्या या पितृभुमीबद्दल सावरकर अतिव श्रद्धेने, आदराने स्पष्ट करतात की हिंदुस्थान आमची पितृभुमीच नव्हे तर पुण्यभूमी आहे. ही परम पावन भारतभूमी, हे सिंधुस्थान, सिंधूपासून सिंधूपर्यंतची ही भूमी आमची पुण्यभूमी आहे. ह्या भूमीत आमच्या धर्मविचारांच्या संस्थापकांना व ऋषींना वेदांचा साक्षात्कार झाला; वैदिक ऋषींपासून ते दयानंदापर्यंत, जिनापासून महावीरापर्यंत, बुध्दापासून नागसेनापर्यंत, नानकापासून गोविंदापर्यंत, बंदापासून बसवापर्यंत, चक्रधरापासून चैतन्यापर्यंत, रामदासापासून राममोहनापर्यंत आमच्या गुरुंनी व धार्मिक पुरुषांनी जन्म घेतला व ते वाढले. तिच्या मार्गातील धुळीत आमच्या प्रेषितांचे व गुरुंचे पदरव ऐकू येतात. तिच्या नद्या व तिची उपवने पवित्र आहेत. कारण चंद्रप्रकाशात त्यांच्या घाटावर किंवा सायंकाळच्या छायेत बुध्दाने किंवा शंकराने जीवन, मनुष्य, आत्मा, ईश्वर, ब्रह्म आणि माया ह्यांच्या गहन प्रश्नांवर वाद व चर्चा केली. प्रत्येक डोंगर व प्रत्येक वृक्षाच्छादित खोरे कपिलाच्या, व्यासाच्या, शंकराच्या व रामदासाच्या स्मृतीने भरलेले आहे. येथे भगीरथ राज्य करतो, येथे कुरुक्षेत्र आहे. वनवासाला जाताना रामचंद्राने पहिला विश्राम येथेच घेतला. तेथेच जानकीने सोनेरी हरिण पाहिला व त्याला मारण्याचा आपल्या प्रियकराशी प्रेमाने हट्ट घरला. ज्या बासरीने गोकुळातील प्रत्येक हृदय मोहनिद्रेत असल्याप्रमाणे एका लयीत नाचू लागेल अशी बासरी त्या दैवी गुराख्याने वाजविली. येथे बोधिवृक्ष आहे व येथे मृगवन आहे. येथेच महावीराला निर्वाण प्राप्त झाले. येथेच भक्तांच्या मेळाव्यात बसून 'गगन थाल रविचंद्र दीपक बने' ही नानकाने आपली आरती म्हटली. येथे गोपीचंद राजाने गोपीचंदजोगी होण्याची प्रतिज्ञा केली व भिक्षापात्र घेऊन मूठभर भिक्षेकरिता आपल्या बहिणीचे दार ठोठावले. येथेच हिंदू म्हणून मरण्याच्या अपराधाकरिता बंदा बहादुराच्या मुलाचे वडिलांच्या डोळयांसमोर तुकडे तुकडे करण्यात येऊन त्याचे हृदय वडीलांच्या तोंडात कोंबण्यात आले. येथील प्रत्येक दगड हौतात्म्याची कथा सांगू शकेल. हे माते ! तुझ्या भूमीचा प्रत्येक तसू यज्ञभूमी आहे. जेथे कृष्णसार सापडले तेथेच नव्हे तर काश्मीर ते सिंहल ही ज्ञानयज्ञाने पवित्र झालेली यज्ञीयभूमी आहे. म्हणून प्रत्येक हिंदूला, मग तो साधू असो वा संताळ ही भारतभूमी, हे हिंदुस्थान पितृभू आणि पुण्यभू आहे.

आपली हिंदुत्वाची व्यापक संकल्पना मांडल्यावर ते ठामपणे सांगतात की हिंदुस्थान हा हिंदूंचाच देश आहे. वस्तुत: जो समाज देशात बहुसंख्य असतो त्यांचाच तो देश मानला जाण्याची प्रथा सर्व जगात आहे. या नात्याने तर हिंदुस्थान हिंदूंचा आहेच; पण त्याशिवायही तो हिंदूंचा असल्याचे आणखी एक निश्चित गमक सांगता येईल. ते म्हणजे हिंदुस्थानच्या उध्दाराचा प्रयत्न कोणी केला ते पाहणे, हे होय. या देशाच्या स्वातंत्र्याच्या १८५७ पासून सुरु झालेल्या लढयात कोणी खरा त्याग केला ? - हिंदूंनी का मुसलमानांनी ?

ते पुढे स्पष्ट करतात की हिंदुस्थान ह्या नावाने अहिंदू बांधवांची मानहानी होत नाही, काही नुकसान होत नाही. चीनमध्ये कोटयावधी मुसलमान आहेत. ग्रीस, पॅलेस्टाईन इतकेच काय पण हंगेरी, पोलंडमध्येही त्यांच्या राष्ट्रघटकांत हजारो मुसलमान आहेत पण तेथे ते अल्पसंख्य, केवळ एक जाती आहेत. आणि त्या देशांना त्यांतील मोठया बहुसंख्येने असलेल्या वंशाची वसाहतस्थाने म्हणून रुढ असलेली प्राचीन नावे बदलण्यासाठी तेथे कोणी अल्पसंख्य जातीच्या अस्तित्वाचे कारण पुढे करीत नाही. तेथील मुसलमानांनी ही नावे विकृत केली नाहीत वा करण्यास धजले नाहीत. प्रसंग येताच पोलिश मुसलमान, ग्रीक मुसलमान , किंवा चिनी मुसलमान अशा नावांनी संबोधिले जाण्यात समाधान मानतात. त्याचप्रमाणे आपल्या मुसलमान देशबंधूंनी राष्ट्रीय किंवा प्रादेशिक दृष्टया आपला निर्देश करताना हिंदुस्थानी मुसलमान म्हणून करावा. तसे करण्यात त्यांच्या धार्मिक वा सांस्कृतिक स्वतंत्र अस्तित्वास बाधा येत नाही.

हिंदुस्थान ह्या आपल्या मातृभूमीच्या रुढ नावाने ऋग्वेद काळातील सिंधूपासून आपल्या पिढीतील हिंदू शब्दापर्यंत जी अखंड परंपरा व्यक्त होते तिचा उच्छेद वा तिच्याशी प्रतारणा हिंदूंनी करु नये. जर्मनांचा देश जसा जर्मनी, इंग्रजांचा इंग्लंड, तुर्कांचा तुर्कस्थान नि अफगाणांचा अफगाणिस्थान, त्याचप्रमाणे हिंदूंचा देश म्हणून हिंदुस्थान ह्या नावानेच आपले स्थान जगाच्या नकाशात चिरंतन खोदून ठेविले पाहिजे

आपल्या साहित्यातुन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी "राष्ट्र आणि हिंदुराष्ट्र" याबद्दलचे आपले विचारही खुप समर्पकपणे आणि पर्खडपणे मांडले आहेत. ते म्हणतात....

"जगातील मानवांनी एक व्हावे हीच आमची सदिच्छा आहे. जगातील मानवांनी एक होऊन त्यांचे एक मानवी राष्ट्र व्हावे असे आम्हांसही वाटते. आमचा वेदान्त तर याही पुढे जाऊन दगड नि मनुष्य हे सारखेच असल्याचे सांगतो. पण आपण परिस्थितीनुरुप व्यवहार केला पाहिजे. राष्ट्रवाद कालबाह्य नाही ,राष्ट्रवाद पाचशे वर्षे तरी जिवंत राहणार आहे. त्यानंतर काय होईल ते सांगता येत नाही. त्यानंतर पृथ्वी एक राष्ट्र होऊन मंगळ हे दुसरे राष्ट्र होईल. सिंधू ह्या शब्दाने व्यक्त होणारी कल्पना राष्ट्रवाचक आहे, केवळ भौगोलिक नाही

'हिंदू'शब्द मूलत: देशवाचक, राष्ट्रवाचक आहे. याचे मुख्य अधिष्ठान आसिंधु सिंधू अशी ही भारतभूमिका आहे. 'आसिंधु सिंधू' अशा त्या भारतभूमिकेत अत्यंत प्राचीन काळापासून ज्यांचे पूर्वज परंपरेने निवसत आले, ज्या राष्ट्रात प्रचलित असलेली सांघिक संस्कृती, घडलेला इतिहास, बोललेल्या भाषा, अनुसरलेले धर्म; ज्यांचे संस्कृती, इतिहास, भाषा, धर्म आहेत ते सारे हिंदु होत. त्या हिंदुराष्ट्राचे घटक होत. -

हिंदू हे केवळ एक राष्ट्र नसून ती एक जाती आहे. उत्पत्ती करणे ह्या अर्थाच्या जन धातूपासून जाती हा शब्द सिध्द झाला असून त्याचा अर्थ बंधुभाव, समान रक्त अंगात खेळत असलेला, एक उगम असलेला वंश असा होतो सप्तसिंधूतील लोक जसजसे हिंदुस्थानभर पसरत गेले तसतसे त्यांच्यात विविध वंशाचे मिश्रण, अनुलोम-प्रतिलोम विवाह इत्यादीमुळे झाले. जाती हा शब्द ह्या अर्थी वापरलेला आहे.राष्ट्रीय व वांशिक दृष्टिकोनातून पाहिले तर आपली तीर्थे सर्व हिंदू जातीचा समान वारसा आहे आपले सण, उत्सव, संस्कार व आचार समान असहेत. हिंदु कोठेही असो मग तो शीख, जैन, ब्राह्मण वा पंचम असे तो दसरा, दिवाळी, रक्षाबंधन आणि होळी ह्यांचे स्वागत करतो.ज्या तीर्थांचे, पर्वतांचे, नगरांचे व नद्यांचे स्मरण हिंदू करतात ती कोणाही एक प्रांतातील नाहीत. तर ती अखिल हिंदुस्थानातील आहेत.शीखांचे अमृतसर, वैदिकांची काशी, बौध्दांची गया ही सारी आम्ही हिंदूंची सामायिक नि सारखीच पुण्यक्षेत्रे होत कलाकृती वा वास्तू, मग त्या वैदिक वा अवैदिक विचारांच्या प्रतिनिधी असोत, आपल्या वंशाचा समान वारसा आहे हिंदू निर्बंध व त्यांची आधारभूत तत्वे ह्यांतील तपशिलांत वा आदेशांत काही ठिकाणी परस्पर विरोध भासत असले तरी त्यांचा इतका एकावयवी विकास झालेला आहे की काल व देश ह्या स्थितीतून ही त्यांची वैशिष्टये टिकून राहिली आहेत

हिंदु धर्मामधील विविध समाजरचना, तसेच वैचित्र्यांबद्दल बोलताना ते विशद करतात......

कोणताही समाज वा राष्ट्र एकजीव होऊन जे जगते आणि त्यांच्याव्यतिरिक्त एतर समाजांशी होणार्‍या संघर्षातुनही तग धरते त्या लोकांमध्ये आपसात वैषम्य असे मुळीच नसते म्हणून नव्हे. कारण कुटुंब म्हटले की कुटुंबात व्यक्तिवैचित्र्य नि मतभिन्नता असतेच. मग कोटी कोटी व्यक्तींच्या एकजीवी समाजाची वा राष्ट्राची गोष्टच बोलणे नको. एका साच्यात पाडलेल्या गणपतीच्या मूर्तीप्रमाणे त्या कोटी कोटी व्यक्ती एकसाची असणे अशक्यच. परंतु त्या समाजातील पक्षोपक्षांची ही अंतर्गत विषमता इतर कोणत्याही समाजाशी असलेल्या त्यांच्या विषमतेहून अगदी कमी असते. आणि त्या समाजातील अनेक पक्षांना एकजीव करणारी महत्वाची बंधने दुसर्‍या समाजाशी असणार्‍या त्यांच्या संबंधांपेक्षा आत्यंतिक आकर्षक नि बळकट असतात म्हणून ते समाज वा राष्ट्र तसे पृथक नि एकजीव राहू शकते.

हिंदुराष्ट्रातील विविध विभागांचे परस्पर धोरण काय असावे ? यावरही सावरकरांची मते खुप उद्बोधक आणि क्रांतिकारक आहेत.

संख्येचे, भौगोलिक किंवा वांशिक लाभ निसर्गत: व ऐतिहासिक दृष्टया ज्यांना लाभलेले नाहीत असे लोक इतरांबरोबर देवाण घेवाण करण्याचे प्रयत्न करीत आहेत. जन्मसिध्द अधिकारांनी प्राप्त झालेले लाभ ज्यांना माहीत नाहीत व त्याहूनही वाईट म्हणजे त्यांचाच तिरस्कार करतात अशांचा सत्यानाश होवो ! कागदाच्या कपटयांतून किंवा अडचणीत उत्पन्न झालेल्या बंधंनांनी नव्हे तर रक्ताच्या, जातीच्या, संस्कृतीच्या बंधनांनी झालेल्या प्राचीन, नैसर्गिक व एकजीवी एकीकरणापासून फुटणे व त्यालाच नाशिणे हे तुमच्यापैकी जैन समाजी, सनातनी , शीख वा कोणत्याही उपविभागाला परवडणार आहे का? असलेले बंध दृढ करा. ज्या भिंतीची उपयुक्ततता संपली आहे अशा भिंती, जाती, रुढी, विभाग मोडून टाका.आमच्या वैदिक, जैन, बुध्द, शीख, लिंगायत प्रभृती यच्चयावत् हिंदू बंधूंनी आपले मतभेद धार्मिक क्षेत्रापुरते काय ते ठेवून आपणा सर्वांना जी अनेकविध सामाजिक जीवनाची प्रिय बंधने आणि नात्यागोत्याचे स्नेहसंबंध आज शतकोशतके एकजीवी असे एक महान् राष्ट्र बनवीत आले आहेत, त्या स्नेहसंबंधांनाच शक्यतो जोपासीत राहावे, यातच आपल्या सगळयांचे कल्याण आहे

त्यांच्यामते हिंदुस्थानात हिंदू ही 'जात' होऊ शकत नाही. हिंदुस्थानात आम्हांस एक जाती म्हणणे मूर्खपणाचे आहे. जर्मनीत 'जर्मन' हे राष्ट्र आहे आणि ज्यू एक जात आहे. तुर्कस्थानात तुर्क हे एक राष्ट्र आहे. व अरब वा आर्मेनियन अल्पसंख्य जाती आहेत. त्याचप्रमाणे हिंदुस्थानात हिंदू एक राष्ट्र आहेत व अल्पसंख्य मुसलमान वा ख्रिश्चन या एक जाती आहेत

वैदिक काळापासून निदान पाच सहस्त्र वर्षे तरी आपले पूर्वज आपल्या लोकांचा धार्मिक, वांशिक, सांस्कृतिक नि राजकीय दृष्टया एकात्म असा गट घडवून आणीत होते. त्या क्रियेला स्वाभाविकपणे विकास पावता जे फळ आले ते म्हणजेच वैदिक काळातील त्या सिंधूचेच आज सबंध हिंदुस्थानभर पसरलेले आणि हिंदुस्थानालाच आपली एकमेव पितृभू नि पुण्यभू मानीत असलेले असे हिंदुराष्ट्र होय. कदाचित चिनी राष्ट्र वर्ज्य केल्यास जगातील दुसर्‍या कोणत्याही राष्ट्राला आपल्या हिंदुराष्ट्रासारख्या आपल्या जीवनाच्या नि विकासाच्या अखंड सातत्यावर अधिकार सांगता येणार नाही. हिंदुराष्ट्र हे काही पावसाळयातल्या कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे उगवलेले नाही. ते एखाद्या तहातून उत्पन्न झालेले नाही. ते निव्वळ कागदी खेळणे नाही. किंवा ते एखाद्या मागणीप्रमाणे घडविलेले नाही. अथवा ती एखादी चालचलाऊ सोय नाही. ते ह्याच भूमीतून वर आलेले आहे नि ह्या भूमीतच त्याची मुळे खोल नि दूरवर पसरलेली आहेत. मुसलमानांचा किंवा जगातील अन्य कोणाचा द्वेष करण्याकरिता म्हणून काही तरी लावलेला शोध नाही. तर आपली उत्तर सीमा सांभाळणार्‍या हिमालयाप्रमाणे ते एक भक्कम आणि प्रचंड सत्य आहे.

आपल्या आचारातुन, विचारातुन आपल्या साहित्यातुन स्वा. विनायक दामोदर सावरकर सर्वे हिंदुस्थानवासीयांना एक हृद्य आवाहन करतात.....

"आपल्या पितामहांनी मराठा व शीख हिंदु साम्राज्याच्या पतनाच्या वेळी जो तेथेच सोडून दिला तो आपल्या राष्ट्रीय जीवनाचा धागा आपण हिंदूंनी पुन्हा उचलून हाती धरावा. आत्मविस्मृतीमुळे क्षय झालेल्या आपल्या हिंदुराष्ट्राच्या जीवनाचे आणि विकासाचे आपण पुनरुज्जीवन केले पाहिजे, त्याला समाधीतून पुन्हा उठविले पाहिजे प्रामाणिक व भोळसट अशा हिंदूंच्या हे स्पष्ट ध्यानात आले पाहिजे की सर्वसामान्य राष्ट्रीय जीवनाशी मुसलमानांनी समरस होण्याचे नाकारले म्हणजे नकारात्मक दृष्टीने सुध्दा हिंदूंचे एक राष्ट्र उरते.

राष्ट्राचा मोठेपणा त्याच्या ध्येयातून व्यक्त होतो. राष्ट्राचे स्वरुप त्याने आपल्यापुढे ठेवलेल्या ध्येयावर अवलंबून असते. संकुचित ध्येयाच्या राष्ट्रांनी भूतकाळात चिरंतन मोठेपणा प्राप्त केलेला नाही. राष्ट्राला महानता व वैभव प्राप्त करुन देण्याकरिता उदात्त ध्येय असणे आवश्यक आहे...

माझा हा वारसा मी तुम्हांस देत आहे

वटवृक्षाचे बीज मोहरीहून लहान असते पण त्या बीजात जी स्फूर्ती असते, जी वल्गना असते ती वाढता वाढता तिचा प्रचंड वटवृक्ष बनून त्याखाली गाईची खिल्लारे विसावा घेतात, उन्हाने श्रांत झालेल्यांना तो वटवृक्ष सावली देतो.

मलाही वल्गना करु द्या ! माझे गाणे मला गाऊ द्या !

या जगात आपणाला जर हिंदुत्वाचे मानाचे राष्ट्र म्हणून जगावयाचे असेल तर तसा आपला अधिकार आहे आणि ते राष्ट्र हिंदुध्वजाखालीच स्थापन झाले पाहिजे. या नाही तरी पुढल्या पिढीत ही वल्गना खरी ठरेल.

माझी वल्गना खोटी ठरली तर मी वेडा ठरेन. माझी ही वल्गना खरी ठरली तर मी प्रॉफेट ठरेन. माझा हा वारसा मी तुम्हाला देत आहे!

त्या महान द्वेष्ट्या समाजसुधारकाला, महान तत्वचिंतकाला, हिंदुत्वाचा खरा खुरा अर्थ समजलेल्या त्या महान देशभक्ताला माझे लाखो प्रणाम!

जय हिंद !

विशाल कुलकर्णी

संदर्भ : १. सहा सोनेरी पाने : स्वा. सावरकर
२. हिंदुत्व : स्वा. सावरकर
३. Savarkar & Hindutva : The Godse Connection by A.G. Durrani
४. www.savarkar.org

Groups audience: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

उद्या हिंदु धर्म सोडला तर मी भारतीय राहत नाही, मी राष्ट्रांतर केले असा असा त्याचा अर्थ होतो.' ... जर सावरकरांचा हा मुद्दा असेल तर सावरकर आज जिवंत नाहीत हे त्यांचे नशीबच समजायचे.. नाही तर मी त्याना पुन्हा काळ्या पाण्यावर आनंदाने पाठवले असते ! मी कोणता धर्म पाळायचा हा माझा खाजगी प्रश्न आहे. >>>>>

धार्मिक आधारावर फाळणीची (पाक) मागणी मुस्लीम लीगने केली. तेव्हा सावरकरांनी धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर असा सिद्धांत मांडला हे जामोप्या नावाच्या विद्वानाला ठावूक नसावे त्यामुळे परत काळ्या पाण्याला पाठवेन अशा गमजा. उचलली जीभ चे उदाहरण. आणखी काय? असो आपण डॉक्टर आहात, सुज्ञ आहात की नाहीत ते तुम्हीच ठरवा कारण ह्या लेखाचा कालावधी, परिस्थिती तुम्हास माहित नाही असे तरी आहे किंवा समजावून घेण्याची वृत्त्ती नाही कारण परिस्थितीचे आकलन नाही. चार शब्द मायबोलीवर उमटवायला काय लागते? अक्कल? अजिबात नाही. म्हणून त्यांचे प्रत्येक लेख वाचताना कालावधी लक्षात घ्या असा चांगला पण तुमच्या दृष्टीने अनाहुत सल्ला मात्र देतो.

मात्र तुमचे बाफ वाचायला मजा येते. कारण मनोरंजन हाच निखळ हेतू.

सौदीतील भारतीय राजदूत कोण-कोण होते ते बघा

सौदी बाबत काही कल्पना नाही. पण मालदीव मुस्लीम राष्ट्र असूनही तिथे कितीतरी राजदूत हिंदुच होते/आहेत ...

आणि हो एक राहिलंच, गांधी हत्या त्या गोडश्याने केली, तो एक हिंदू होता, बाह्मण होता. त्यावरून तुमच्या सारखे भंपक / दांभीक लोक सर्व हिंदू म्हणवून घेणार्‍यांना वेठीस धरतात आणि अनेक हिंदूंनीच ब्राह्मणांची हत्या केल्याचे विसरातात ते पाहून तुमच्या अगाध असलेल्या ज्ञानाची गंमत वाटते.

दाऊ शुड आयसोलेट अ‍ॅण्ड सी. गोडसे हा व्यक्ती पण होता. त्याला चुक वाटले, त्याने मारले. सर्व हिंदू तसाच विचार करतात असे मात्र तुमच्यासारखी पिलावळ जाता येता घोकत असते.

बास करा हे हिंदू पुराण आता. मुद्दे अजिबात नाही पण भंकस मात्र करायची आवड. वेळ जात नाही का?

धार्मिक आधारावर फाळणीची (पाक) मागणी मुस्लीम लीगने केली. तेव्हा सावरकरांनी धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर असा सिद्धांत मांडला हे जामोप्या नावाच्या विद्वानाला ठावूक नसावे

मला हे चांगलेच ठाऊक आहे. पण हिंदुत्ववादी विद्वान ते सूत्र आज लागू करतात, तेंव्हा त्यामागचा उद्देश निश्चितच चांगला नसतो.

सावरकरांचा हा मुद्दा असेल तर >>>> असेल???? म्हणजे तुम्ही लेख वाचलेलाच नाही. उगाच कायपण लिहायचे आणि मोठेपणा मारायचा. तुमचा आणि इब्लिस या आयडीचा (दोघेही डॉक्टरच, आणि दोघानाही काही खास विषयातच लिहिण्यात इंटरेस्ट!!) इतिहास, धर्म आणि संस्कृती या विषयात शून्य गती आहे, हे आजवर सिद्ध झालेलेच आहे. त्यामुळे तुम्ही जे काय लिहिता त्याला "किंमत" काहीच नाही.

मायबोलीवर कितीतरी अभ्यासू लोक आहेत, ते इथे लिहत नाहीत हे नशिब समजा, केदार अथवा समीर कोराणे सारखे लोक इथे लिहू लागले तर पळता भुई थोडी होइल तुम्हा दोघाची.

जर सावरकरांचा हा मुद्दा असेल तर सावरकर आज जिवंत नाहीत हे त्यांचे नशीबच समजायचे.. नाही तर मी त्याना पुन्हा काळ्या पाण्यावर आनंदाने पाठवले असते>>>>
मी हिंदुत्त्ववादी नाही, सावरकर याची विशेष भक्त आहे असेही नाही, तरीदेखील संपूर्ण जगाला वंदनीय ठरलेल्या अशा महापुरूषाबद्दल काढलेल्या वरील उद्गाराचा जाहीर निषेध.

अ‍ॅडमिन, या आयडीवर कारवाई होइल का?

तुम्ही कोणता धर्म पाळायचा हा संपूर्णपणे खाजगी प्रश्न आहे, त्याचबरोबर समोरच्याने स्वतःचा धर्म कशा रीतीने पाळायचा हा त्यांचा खाजगी प्रश्न आहे.

मला हे चांगलेच ठाऊक आहे. >>> मग परत काळ्या पाण्याला पाठवतो म्हणन्याचा उपहास का? सावरकर तुम्हाला कळू शकत नाहीत. मन आणि डोळ्यांशिवाय बुद्धि देखील उघडी असावी लागते, तो काळ तपासून पाहावा लागतो असो चालूदेत मनोरंजन.

मला आणखी लिहायचे आहे....तरी...सध्या..या वाक्याशी सहमत आहे....

<<<बाकी चालुद्या. तुम्च्या निमित्ते मला अक्षय/मास्तुरे इत्यादिक लोकान्च्या अभ्यासपूर्ण पोस्ट्स तरी वाचायला मिळताहेत, त्याबद्दल तुम्हाला धन्यवादच द्यायला हवेत! >>>>>

घ्या.. हिंदुत्ववाल्यांची आणखी एक पळवाट... जुनं कुठलेतरी आजच्या काळाला लागू करायचं आणि ते फसतय म्हटले की हे सर्व आजच्या काळाला लागू नाही, जुन्या संदर्भात होते, म्हणून पळ काढायचा...

हा देश भारत आहे आणि भारतीयांचा आहे.. त्यापलीकडे कोणताही धार्मिक रंग कुणी देत असेल तर त्याचा निषेध हा झालाच पाहिजे.

येथे सावरकरांबद्दल जे काही लिहिले आहे ते पुर्णपणे निषेधार्ह आहे. कृपया आपले लिखाण संपादित करावे.

ते विधान संपादीत केलेले आहे.. नाहीतरी सावरकरांशी आपले काही वैर नाही..

( सावरकरांचा हा मुद्दा जुन्या काळात योग्य असेलही, पण आज असे विधान कुणी करेल तर शासन त्याला नक्कीच आनंदाने काळ्या पाण्यावर पाठवेल.!)

सौदी बाबत काही कल्पना नाही. पण मालदीव मुस्लीम राष्ट्र असूनही तिथे कितीतरी राजदूत हिंदुच होते/आहेत ...
>> ही तुमची जागतिक राजकारणाबद्दलची समज. मालदीव आणि सौदी हे दोन्ही "मुस्लिम राष्ट्रे" म्हणून तुमची ही तुलना! जागतिक राजकारणामधे सौदीची भूमिका काय आहे आणि तिथल्या राजदूताचे नक्की काय काम आहे ते माहित नसताना उगाच लिहायचे म्हणून मालदीवचे उदाहरण दिलय.

ज्या विषयामधे आपण लिहत आहोत त्यामधे काहीच अक्कल नसली की असलीच यडपट उदाहरणे सुचतात लोकाना.

राजदूत म्हणून कुणाला पाठवायचं हे शासन ठरवतं.. आणि पात्र व्यक्तीला पाठवतं... पण हिंदुत्ववाल्याना त्यातही धर्म दिसतो.. विश्वाच्या अंतापर्यंत एखाद्या मुस्लीम देशात आपल्या सरकारनं मुस्लीमच राजदूत पाठवला आणि तो जर व्यवस्थीत काम करत असेल तर आम्हाला त्याच्या मुस्लीम असण्याशी देणंघेणं नाही.. तो भारतीय आहे, एवढंच महत्वाचं...

>>> अ‍ॅडमिन, कृपया लक्ष द्याल का? विनाकारण ह्या आयडीने "समजावून" हा शब्द दोन तीनदा असा विकृतपणे लिहिलाय.

या डुआयचा प्रत्येक खोडसाळ मुद्दा अक्षय जोग व इतर अनेकांनी यथार्थ व सोदाहरण खोडून काढला आहे. आता या डुआयकडे लिहिण्यासारखे काहीच शिल्लक राहिलेले नाही. त्यामुळे पातळी घसरून या आयडीकडून खालील प्रकारची घृणास्पद वाक्ये लिहिली जातात.

" (आता खुदा म्हटलं मग पट्कन माझं नाव इब्लिसखान वगैरे करा, मग इब्लिस शब्दाचा अर्थ सम-झवून सांगतो) "
"तुम्हाला काहीच/कधीच लाज वाटत / वाटली नाहीये का, . . . ."

>>> हालांकि बाद में अर्जुन सिंह ने संसद में कह दिया कि गीत गाना किसी के लिए आवश्यक नहीं किया गया है, जिसे गाना हो गाए, न गाना हो, न गाए।

जामोप्या,

अर्जुन सिंहासारख्या व्यक्तीची साक्ष काढण्याची तुमच्यावर वेळ आली? Biggrin

आता पुढच्या प्रतिसादात दिग्विजय सिंह, लालू, रामदास आठवले इ. च्या वाक्यांचे संदर्भ द्याल. Light 1

विश्वाच्या अंतापर्यंत एखाद्या मुस्लीम देशात आपल्या सरकारनं मुस्लीमच राजदूत पाठवला आणि तो जर व्यवस्थीत काम करत असेल तर आम्हाला त्याच्या मुस्लीम असण्याशी देणंघेणं नाही.. तो भारतीय आहे, एवढंच महत्वाचं...
---- सर्व प्रथम एखादा देश मुस्लिम असतो हे तुम्ही मान्य करत आहात.... अभिनंदन.
आता भारताने राजदुत पाठवतांना रेसियल प्रोफायलिंग केलेले तुम्हाला कसे चालते? आजवर पाठवलेले सर्वच राजदुत मुस्लिम असतिल तर अमुस्लिम भारतियांवर कायाद्याच्या भाषेत अन्याय नाही का होणार? मुस्लिम नसलेले पण भारतिय असतांत राव. Happy

उद्या हिंदु धर्म सोडला तर मी भारतीय राहत नाही, मी राष्ट्रांतर केले असा असा त्याचा अर्थ होतो.' ... जर सावरकरांचा हा मुद्दा असेल तर सावरकर आज जिवंत नाहीत हे त्यांचे नशीबच समजायचे..
----- हिंदू धर्मात दोन विवाह करता येत नाही म्हणुन काही अत्यंत गरजू लोकांनी धर्माचा त्याग केला आणि दुसरा धर्म स्विकारला कारण कायद्याच्या कचाट्यत अडकायला नको..... आता कायद्याच्या भाषेत असे करता येते :स्मितः आणि त्याची उदाहरणे पण आहेत. सावरकरांना असे धर्मांतर अपेक्षीत नसावे किंवा ते त्यांच्या कल्पनाशक्तीत बसलेही नसेल.

>>> हिंदू धर्मात दोन विवाह करता येत नाही म्हणुन काही अत्यंत गरजू लोकांनी धर्माचा त्याग केला आणि दुसरा धर्म स्विकारला कारण कायद्याच्या कचाट्यत अडकायला नको

महेश भट, चंद्रमोहन (भजनलालचा मुलगा) . . . हे अत्यंत गरजू? Biggrin

नाहीतरी सावरकरांशी आपले काही वैर नाही..
---- खुप चांगले झाले हे जाहिर करुन... अन्यथा सुर्याकडे बघुन कुणी थुंकते का?

( सावरकरांचा हा मुद्दा जुन्या काळात योग्य असेलही, पण आज असे विधान कुणी करेल तर शासन त्याला नक्कीच आनंदाने काळ्या पाण्यावर पाठवेल.!)
---- आपले मापबाप सरकार निरपराधी, निशस्त्र "भारतियांची" हत्या करणार्‍यां श्री. कसाब यांना काळ्यापाण्यातही चमचमीत बिर्याणी खायला देते आणि तेच शासन दिल्ली येथे अण्णा हजारेंसारख्या गांधी वाद्याला १० दिवस उपाशी ठेवते, अटक करुन तिहार मधे डांबते.

वर आम्ही २ ऑक्टोबर तेव्हढ्याच जोशात त्याच दिल्लीत साजरी करतो... कारण आम्हीच केवळ गांधी भक्त आहोत :स्मित:.

<<<वंदे मातरम हे हिंदु लोक जरी देशाचे गीत म्हणत असले तरी ते दुर्गा देवीवर लिहिलेले गीत आहे.>>>

यानंतर खालील प्रतिसादात 'वंदे मातरम' च्या खालील ओळी देण्याचे कारण कळले नाही.

त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणी
कमला कमलदल विहारिणी
वाणी विद्यादायिनी, नमामि त्वाम्
नमामि कमलां अमलां अतुलाम्
सुजलां सुफलां मातरम्॥
श्यामलां सरलां सुस्मितां भूषिताम्
धरणीं भरणीं मातरम्॥

हे गीत दुर्गा देवीवर लिहीलेले गीत आहे असा निष्कर्ष तुम्ही या वरील ओळींवरून काढला आहे असा अर्थ घ्यायचा का? तसे नसेल तर उत्तमच आहे. पण तसे असेल तर मात्र माफ करा पण मला तुमची दया येतेय. Wink

*आजवर पाठवलेले सर्वच राजदुत मुस्लिम असतिल तर अमुस्लिम भारतियांवर कायाद्याच्या भाषेत अन्याय नाही का होणार

कसला अन्याय? आय एफ एस पास होणार्‍या उमेदवाराला सरकारनं काही लिहून दिलेलं नसतं की प्रत्येकाला सौदीमध्येच पाठवू म्हणून.. सर्वाना त्यांच्या रँक्नुसार काम दिले जाते की.. का मुसलमानाला ( तेही १ किंवा २) सौदीत पाठवल्यावर बाकी इतर लोकाना सरकार तसेच घरात बसवते का?

मळमळ्मळ्मळ...!!! हिंदुत्ववाल्याना मुसलमान, ख्रिश्चन नको आहेत.. हेच तर कारण.. आणखी काय?

आमच्या हातात सत्ता नाही, म्हनून हिंदुंच्या हिताचे कायदे केले नाहीत असे हिंदुत्ववाले कोकलत असतात.... त्यातच तर सगळे आले.... Proud पन्नास वर्षे येऊन गेली, अजून याना देशात सत्ता मिळवता आली नाही.. एकदा मिळवली तर तीही टिकवता आली नाही....

अर्जुन सिंहासारख्या व्यक्तीची साक्ष काढण्याची तुमच्यावर वेळ आली?

त्यातील संसद हा शब्द जास्त महत्वाचा आहे.. मग अर्जुन सिंगाऐवजी अडवानीनी डिक्लेअर केले असते तरी त्याचा अर्थ तोच राहिला असता ना? Proud

हे गीत दुर्गा देवीवर लिहीलेले गीत आहे असा निष्कर्ष तुम्ही या वरील ओळींवरून काढला आहे असा अर्थ घ्यायचा का? तसे नसेल तर उत्तमच आहे. पण तसे असेल तर मात्र माफ करा पण मला तुमची दया येतेय.

मलाच तुमची दया येते.. हे गीत संपूर्ण काय आहे हेही तुम्हाला माहीत नाही.. अरेरे! पण त्यात काही विषेष नाही.. हिंदुत्ववाले अर्धवट संदर्भ स्वतःच्या सोयीसाठी वापरत असतात, हे सर्वाना माहीत आहे.. म्हणून तर हिंदुत्व सत्तेवर येऊ शकत नाही.. मुसलमान आणि ख्रिस्चन १००० वर्षे झाली येऊन.. त्यापूर्वी तर देशात सगळेच हिंदु होते... हिंदुत्व होते... पण जातीभेद विसरून समाज अखंड करणे हे याना जमले नाही.. आणि आज असा पीडीत समाज बौद्ध, मुसलमान, ख्रिस्चन धर्मात चालला तर त्या धर्मानाच नावे ठेवणे हा हिंदुत्ववाल्यांचा एकमेव अजेंडा झाला आहे.... Proud

मलाच तुमची दया येते.. हे गीत संपूर्ण काय आहे हेही तुम्हाला माहीत नाही.. अरेरे!>>>>

मला वाटते, तुम्ही ते गीत पुन्हा एकदा नीट वाचावे आणि नंतर बोलावे. उगाच उचलली जिभ लावली टाळ्याला असे करु नये. राहता राहीली संपुर्ण गीताची गोष्ट तर मला हे गीत चांगलेच माहीत आहे , त्याचा अर्थही माहीत आहे.

कसला अन्याय? आय एफ एस पास होणार्‍या उमेदवाराला सरकारनं काही लिहून दिलेलं नसतं की प्रत्येकाला सौदीमध्येच पाठवू म्हणून..
----- लिहून दिलेले नाही हे येथे महत्वाचे नाही.... पाठवणार्‍याचा धर्म महत्वाचा आहे व तो क्रायटेरिया आहे. आता ते एका देशाबद्दल होत असेल वा १०... होते आहे हे नाकारता येत नाही. तुमच्यातील भारतिय माणसाला पटते का?

मला वाटते, तुम्ही ते गीत पुन्हा एकदा नीट वाचावे आणि नंतर बोलावे.
---- विशालजी तुम्ही सांगायचे धाडस केलेत... Happy असे पाणि अजुन निर्माण व्हायचे आहे जे घड्यात शिरेल. घडा पालथा नाही आहे :स्मित:.

पाणिनीय व्याकरणातील सूत्रांनुसार संस्क्रुत मध्ये 'स' चे 'ह' होते,

हे कुठले हूत्र? ( म्हणजे सूत्र हो! तुम्हीच म्हटलात स चं ह होतं म्हणून .... Proud ) रामाच्या बायकोचे नाव पाणिनीला विचारले तर तो हिता म्हणेल की सीता? Proud तसे असते तर संस्कृतचे हंस्कृत झाले नसते का? Rofl उगाच काहीतरी संस्कृतमध्ये बडबडून लोकाना गंडवायचं हिंदुत्ववाल्यानी सोडून द्यावं.. काळ बदलला आहे.. लोकाना आजच्या प्रचलित भाषेत लिहिलेलं लागतं...

<<आँ ????? हा धर्म शब्द कुठून काढलात बुवा? तुम्हा हिंदुत्ववाल्यांचं काही समजत नाही बुवा.. कधी हिंदु हा धर्म म्हणताय, कधी हिंदु हा नागरिकत्वाला कॉमन शब्द आहे, हिंदुत्व हा काही धर्म नाही असेही म्हणताय... स्वतःच्या स्वार्थासाठी हिंदुत्वाच्या नावाखाली हिंदु धर्माचं घोडं दामटावायचं आणि अंगलट आलं की आम्ही धर्माबद्दल बोलत नव्हतोच मुळी , हिंदुत्व म्हणजे जीवनशैली असे म्हणून पळ काढायचा... !>>

अवघड आहे तुमच, आहो तुम्ही काय लिहिल आहे व मी कुठल्या पोस्टला उत्तर दिल आहे हे तर नीट वाचा. तुम्ही धर्मांतरावर लिहिलेल्या मुद्द्याला मी उत्तर दिलय व इतर धर्म म्हणजे इस्लाम, ख्रिश्च्नन, ज्यू, पारशी वगैरे. मी हिंदुत्वावर बोलतच नाही त्या मुद्द्यात, आता पळ कोण काढतय??

<<भारत देशाने हिंदु धर्माची कुठेही गळचेपी केलेली नाही.. आम्ही आमचा धर्म पाळायला स्वतंत्र आहोत.>>

जरा नियोगी रिपोर्ट, सच्चर समिती अहवाल वाचा मग कळेल.

<<वंदे मातरम हे हिंदु लोक जरी देशाचे गीत म्हणत असले तरी ते दुर्गा देवीवर लिहिलेले गीत आहे.. त्यामुळे अहिंदु लोकानी ते गीत गायला विरोध केला तर तो काही गुन्हा ठरू शकत नाही. प्रचलित राष्ट्रगीताचा योग्य तो आदर राखला म्हणजे झालं.>>

कोणी सांगितल की वंदे मातरम हे संविधानान्वये देशाचे गीत आहे?? ते राष्ट्रगान आहे, राष्ट्र्गीत नाही. गान व गीत म्हणजे Anthem & song...माहीती करा व मग बोला.
आम्ही हिंदुस्थान म्हटल की ते संविधानविरोधी मग त्याला इतिहास असला तरीही व वंदे मातरम संविधानान्वये राष्ट्र्गान असताना विरोध केला की ते न्याय्य??? मुख्य म्हणजे भारतीय पारशी व ज्यूंनी कधीही वंदे मातरम विरोध केलेला नाहीये. त्यामुळे सगळे अहिंदू त्यात येत नाहीत.

अक्षय जोग, बास करा आता. या आयडीचा किती "अभ्यास" आहे समजलं असेलच तुम्हाला

कुठले हूत्र? ( म्हणजे सूत्र हो! तुम्हीच म्हटलात स चं ह होतं म्हणून .... ) रामाच्या बायकोचे नाव पाणिनीला विचारले तर तो हिता म्हणेल की सीता? इतकी बिन्डोक विधानं लिहिणार्‍या माणसाला का म्हणून कुणी उत्तरं द्यायची? त्याच्या पोस्टची दखल तरी का घ्यायची? नुसता इकडून तिकडे शब्दछल केला की आपण फार मोठं काहीतरी विद्वानासारखं लिहिल्यासारखं वाटतं या दोघाना.

लक्ष्य मधे अमिताभ बच्चनच्या तोंडी एक "मराठी" डायलॉग आहे, जो इथे चपखल लागू होतो Happy

<<हे कुठले हूत्र? ( म्हणजे सूत्र हो! तुम्हीच म्हटलात स चं ह होतं म्हणून .... ) रामाच्या बायकोचे नाव पाणिनीला विचारले तर तो हिता म्हणेल की सीता? तसे असते तर संस्कृतचे हंस्कृत झाले नसते का? उगाच काहीतरी संस्कृतमध्ये बडबडून लोकाना गंडवायचं हिंदुत्ववाल्यानी सोडून द्यावं.. काळ बदलला आहे.. लोकाना आजच्या प्रचलित भाषेत लिहिलेलं लागतं...>>

आहो पाणिनी चा काळ पहा, रामायणाचा काळ पहा व तेव्हा पाणिनी व्याकरण उपयोगात होत का तेही पहा, सुत्रानुसार कधी स चे ह होते तेही पहा, मग कळेल सीता व संस्क्रुत का ते??
बघा तुम्हीच म्हणता की काळ बदलला व त्यानुसार सूत्रही बदलली, कोण म्हणाल की आज स चे ह करा म्हणून?? तो पोस्ट हिंदू व्युत्पत्तीविषयी होता....कुठलाही संदर्भ कुठेही लिहून लोकांची दिशाभूल करणे सेक्युलरवाल्यांनी सोडून दावे

मी कुठे म्हटले की ते राष्ट्रगीत आहे म्हणूण? प्रचलित राष्ट्रगीताचा ( म्हणजे जनगनमनचा!) योग्य तो आदर ( सर्वानी म्हणजे मुसलमानानीही ) राखला म्हणजे झालं. वंदे मातरम म्हटले नाही की तो काही गुन्हा होत नाही, हे संसदेत सांगितले गेले आहे, तरीही हिंदुत्ववाले वंदे मातरम सर्वांच्या उरावर ढकलायला पहात असतात... मराठी लिवलेलं समजेना.. आणि चाल्ले हंस्कृत्मध्ये स चं ह करायला ! Proud

>>>---- विशालजी तुम्ही सांगायचे धाडस केलेत... असे पाणि अजुन निर्माण व्हायचे आहे जे घड्यात शिरेल. घडा पालथा नाही आहे .<<<
जोरदार अनुमोदन

Pages