
चार कप बारिक रवा, दोन कप बारिक वाटलेले ओले खोबरे ( एका मध्यम नारळाचे एवढे होते)
एक कप तूप, तीन कप साखर, मोठी चिमूट केशर (किंवा हवा तो स्वाद ), बेदाणे व काजू
(आवडीप्रमाणे )
जाड बुडाच्या भांड्यात थोडे तूप घालून रवा भाजायला घ्या. फ़ार गुलाबी करायचा नाही.
शक्य असेल तर खोबरे वाटताना फ़क्त शुभ्र भाग घ्या (मी आळस केला ) रवा भाजत आला
कि त्यात खोबरे घाला. परतत रहा, रवा परत हाताला हलका लागला पाहिजे ( खोबर्याचा
ओलेपणा रहायला नको. ) लागेल तसे तूप घालत रहावे.
दुसर्या भांड्यात साखर आणि दिड कप पाणी घालून पाक करत ठेवा. सतत ढवळत रहा.
पाकातच केशर किंवा वापरत असाल तो स्वाद घाला. उकळी येउन फ़ेस आला कि गॅस मंद
करा. पाकातला चमचा वर काढून, थोडासा पाक अंगठा आणि पहिले बोट यांच्यामधे धरुन
बोटे हळूहळू लांब करा. एखादी तार दिसायला लागली कि गॅस बंद करा व अर्ध्या कपापेक्षा
थोडा जास्त पाक काढून ठेवा. मग पाकात रव्याचे मिश्रण घालून ढवळा.
दोन तीन तास झाकण न ठेवता मुरु द्या. मग लाडू वळायला घ्या. मिश्रण कोरडे वाटले तर
काढून ठेवलेला पाक कोमट करुन लागेल तसा मिसळा. (रवा किती जाड आहे, यावर किती
पाक लागेल, ते ठरते ) मिश्रण हाताला शिऱ्यापेक्षा थोडे घट्ट लागेल, इतका पाक घाला. लाडु
वळताना, हवे तसे बेदाणे व काजू वगैरे वापरा. (मी भाजलेला काजू लाडूच्या आत ठेवलाय, त्याने
लाडवाचा ओलावा कमी होतो. )
मला रव्याचे लाडू मऊसर आवडतात. (तसे नसले तर रांगोळीचा लाडू खाल्यासारखा वाटतो मला.)
हा लाडु मऊसर होतो. फ़ारसा टिकणार नाही, पण चवीला मस्त लागतो. (फ़्रीजमधे आठवडाभर
राहील. ) या प्रमाणात ५० ते ६० लाडू होतात. (कपाच्या आणि लाडवाच्या आकारावर अवलंबून )
दिनेशदा, हे लाडू यावेळी
दिनेशदा,
हे लाडू यावेळी गणपतीला प्रसाद म्हणून गावाला नेले. मस्त जमले. छोट्या जाऊबाई सुगरण आहेत अशी पावतीदेखील दिली सगळ्या वहिन्यांनी!
ह्या मस्त पाककृतीबद्द्ल तुम्हाला धन्यवाद.
~साक्षी.
दिनेशदा, मी खूप वेळा केलेत
दिनेशदा,
मी खूप वेळा केलेत असे लाडू. आणि छान जमलेत मला. असं मला वाटतं. निदान तुमच्या लाडूची चव घेइ पर्यन्त तरी असे वाटत राहील. (अज्ञानात आनंद)
वर काढून ठेवत आहे.
वर काढून ठेवत आहे.
व्वा.. रेसिपी वाचल्यावर
व्वा.. रेसिपी वाचल्यावर करावेसे वाटतायेत.. हे माझे सर्वात आवडते लाडू(एकमात्र!!)
डेसीकेटेड खोबरं वापरूनच करावे लागतील..
मलाही बेस्टेस्ट लक विश करा बरं... पाक करायच्या कल्पनेनंच बटरफ्लाईज आल्यात पोटात!!!
वर्षू, सहसा नाही बिघडत हे
वर्षू, सहसा नाही बिघडत हे लाडू.
या रविवारी आणखी एक प्रकार करून बघणार आहे. तो जमला तर लिहिनच. (म्हणजे करायला जमला तर लिहिन, लिहायला जमेलच !)
नुकतेच लाडुचे मिश्रण करुन
नुकतेच लाडुचे मिश्रण करुन ठेवलंय.. शिर्यासारखं दिसतंय.

देवा, लाडु चांगले होउदेत प्लीज! <फिंगर्स क्रॉस करुन स्वयंपाक करत असलेली बाहुली>
आता लागेलच म्हणून वर काढते
आता लागेलच म्हणून वर काढते आहे.
चिंगी बेश्टॉफ लक
चिंगी
बेश्टॉफ लक गं...
रैना..
सोमवारी आम्हाला नवीन पदार्थाचा फोटू नक्की मिळणारे.. दिनेश दा कडून
दिनेशदा, __/\__ कस्सले मस्त
दिनेशदा, __/\__
कस्सले मस्त दिसतायेत लाडू !!!
स्स्स्स्स्स्स्स्स मस्तच आहे
स्स्स्स्स्स्स्स्स मस्तच आहे
फोटो एकदम मस्त. आमची आई
फोटो एकदम मस्त. आमची आई वळायच्या आधी परत थोडेसे साजुक तुप घालते, त्याने तुम्ही म्हणता तसे ओलसर रहातात.
पण टिकत नाहीत हे खरे.:)
जमले हो जमले! मिश्रण जरा
जमले हो जमले!
मिश्रण जरा कोरडं झालं होतं म्हणुन गरम दुधाचा हबका मारुन लाडु वळले..मस्त झाले आहेत!
धन्यवाद!
जमले हो जमले!>> मला पण,
जमले हो जमले!>> मला पण, दिनेशदा धन्यवाद, एकदम झकास लाडू, मी स्वतःवरच खुष!!
माझे दोन वर्षापूर्वी खूप मस्त
माझे दोन वर्षापूर्वी खूप मस्त झालेले, मऊसर ,पण या वेळेस काय झाले काय माहीत, बिघडले :(. मिश्रण फार कोरडे झाले आहे. नुसता भुगा भुगा
रामाचा प्रसाद/ पंचखाद्य खाल्ल्यासारखं लागतय. कसं दुरुस्त करू? अजून पाक घातला तर जास्ती गोड होतील.
थोडे गरम दूध शिंपडून बघता
थोडे गरम दूध शिंपडून बघता येईल.
किंवा थोडे मिश्रण हवाबंद डब्यात ठेवून वाफवताही येईल.
गरम दूध शिंपडून मस्त झाले.
गरम दूध शिंपडून मस्त झाले. धन्स.
अर्र इथे लिहायचेच
अर्र इथे लिहायचेच राहिले.
पुन्हा एकदा धन्यवाद दिनेशदा. यावर्षीही केले. सुरेख झाले.
आता गरज पडेलच म्हणुन धागा वर
आता गरज पडेलच म्हणुन धागा वर काढतेय..
दिनेशदा, छान लाडू जमले .
दिनेशदा, छान लाडू जमले . धन्यवाद
माझे या वर्षीपण छान झाले,
माझे या वर्षीपण छान झाले, धन्यवाद दिनेशदा. उद्या परत करणार आहे
दिनेशदादा, मी हे लाडू काल
दिनेशदादा, मी हे लाडू काल करून पाहिले. लाडू करायला घेतले आणि मग लक्षात आले की तूप शिल्लक नाही. तूप न घालताच केलेत, तरीही मस्त झालेत म्हणजे तूप घातल्याने आणखीच छान होणार.
छानच जमलेत, नले. तुळशीच्या
छानच जमलेत, नले. तुळशीच्या लग्नाला केले होतेस काय ?
मी हे लाडू केले पण करता करताच
मी हे लाडू केले पण करता करताच वळायला झाले. नंतर फेकून मारता येतील एवढे कडक पण झाले..मला कोणी पाकाचा अजून चांगला डिटेलवार अंदाज देईल काय?
नलिनी तो.पा.सु., मस्त झालेत.
नलिनी तो.पा.सु., मस्त झालेत.
ही कृती अगदी तंतोतंत पाळून
ही कृती अगदी तंतोतंत पाळून काल लाडू केलेत. अप्रतिम झालेत. दिवाळीपर्यंत उरणार नाहीयेत, पुन्हा १-२ दा करावे लागणार
वेलची पूड आणि केशर घालून पाक केला होता. आता बाजूला काढलेल्या पाकाचे काय करावे?
एक्दम तोंपासू!! सगळ्यांचे
एक्दम तोंपासू!! सगळ्यांचे लाडवांचे फोटो भारी आलेत.
ज्ञाती, तो पाक इतर पदार्थात
ज्ञाती, तो पाक इतर पदार्थात वापरता येईल. किंवा त्यात थोडा लिंबूरस घालून सुधारस करता येईल.
(तसे नसले तर रांगोळीचा लाडू
(तसे नसले तर रांगोळीचा लाडू खाल्यासारखा वाटतो मला.)>>>>>>>>>>. दिनेश काका....मी खुप लहान असताना ( साडेपाच - सहा वर्षे ) मला रव्याचे लाडु ( पाकातले नव्हेत ) रांगोळीचे असतात म्हणुन आजोबांनी मस्करीत सांगितलं होतं...म्हणून मी एकदा स्वता लाडु बनवायला गेले..रांगोळीत पाणी घालुन आणि साखर आणुन ( किचन मधुन चोरुन ) घातली आणि लाडु काही झाले नाही .....म्हणुन तसच खाल्लं...... आणि अर्थातच ते खराब लागलं म्हणुन उलटी करुन बाहेर काढलं आणि खोकायला चालु केलं....काय झालं म्हणुन मम्मी बाहेर आली आणि माझा पराक्रम बघुन आधी चिडली आणि तिथल्या झाडुने माझा महिन्याचा पगार केला...आणि मन शांत झाल्यावर तिचा राग गेला आणि हसायला लागली आणि सर्वांना हा किस्सा पण चवी चवी ने सांगितला.......
आणि हो.....लाडु खुप मस्त दिसत आहेत.....सुंदर....चविलाही मस्तच असणार....:)
अनिश्का, मी पण लहानपणी
अनिश्का, मी पण लहानपणी रांगोळी खाल्ली होती. म्हणून तर उपमा सुचली !
यावर्षी पण काहीतरी फराळाचे करीनच.
अरे वा! मस्त दिसताहेत लाडू
अरे वा! मस्त दिसताहेत लाडू दिनेशदा!
माझेही आजच झाले. घरचा नारळ घातला. आणि मी हे ओल्या नारळाचं खोबरं मिक्सरमधून काढते. त्यामुळे नारळ छान मिक्स होतो लाडवात. आणि मी याप्रकारच्या(रवा+नारळ) लाडवात रोझ इसेन्स घालते. बाकीच्या लाडवात वेल्दोडा.
Pages