तिरामिसु (Tiramisu)

Submitted by रूनी पॉटर on 9 September, 2009 - 20:30
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

३ अंडी (पांढरा आणि पिवळा भाग वेगवेगळा करुन घेणे)
१/२ कप/११० ग्रॅम साखर.
८ औंस/२२५ ग्रॅम मस्करपोने चीज
१ मोठा मग तयार espresso coffee (साखर किंवा दूध न घालता).
२ टेबलस्पून Cognac किंवा Brandy (ऐच्छिक), काही जण रम वापरतात.
२०-२५ लेडीफिंगर बिस्कीटे किंवा १ पाकीट
२ टेबलस्पून कोको पावडर (वरुन सजवायला)

क्रमवार पाककृती: 

खर तर तिरामिसुची कृती फार सोपी आहे थोडक्यात सांगायचे तर कॉफीत बुडवलेली बिस्किटे आणि क्रीम यांचे एकावर एक आपल्याला हवे तेवढे थर दिले की झाले तिरामिसु तयार.. ह्याच्यापलीकडे का..ही नाही. पण असे सांगीतले तर लोकांना खर वाटत नाही, एवढा छान पदार्थ असा कसा पटकन होईल असे म्हटल्यावर काय करणार म्हणून ही घ्या कृती अगदी सविस्तर. Happy

१. एका मोठ्या भांड्यात अंड्यांचा पिवळा भाग, सगळी साखर, Cognac आणि १/२ टेबलस्पून तयार कॉफी एकत्र करा. नंतर (इलेक्टीकल) हँड मिक्सरने ते चांगले २-३ मिनीट फेटून घ्या.

२. आता वरच्या मिश्रणात सगळे मस्करपोने चीज टाकुन परत हँड मिक्सरने ३-५ मिनीटे फेटा. सगळे मिश्रण एकजीव व्हायला हवे (until consistency is smooth). हे भांडे बाजुला ठेवुन द्या.

३. आता दुसर्‍या एका मोठ्या भांड्यात अंड्यांचा पांढरा भाग आणि चिमुटभर साखर टाका आणि हँड मिक्सरने भरपुर फेटा. त्याचा मस्त पांढरा फेस (stiff peaks) व्हायला हवा. भांडे उलटे केले तरी हा फेस खाली पडणार नाही इतक्या वेळ फेटावे. माझा मिक्सर खूप पॉवरफुल नाहीये त्यामुळे मी १२-१४ मिनीटे फेटते. तुम्हाला कदाचित यापेक्षा जास्त किंवा कमी वेळ लागेल तुमच्या मिक्सरच्या क्षमतेप्रमाणे.

४. आता हा फेटलेला अंड्याचा पांढरा भाग हलक्या हाताने लाकडी चमचा वापरून दुसर्‍या (मस्करपोने असलेल्या भांड्यात) मिश्रणात मिसळा. मिसळतांना फोल्डींग मेथड वापरावी. हे अगदी हलक्या हाताने करावे.

५. आता एका पसरट भांड्यात/ताटलीत सगळी कॉफी ओतावी. कॉफी अगदी कडक गरम असू नये, कोमट किंवा त्यापेक्षा थोडी जास्त गरम असावी.

६. एक चौकोनी काचेचा कॅसरोल किंवा ज्या भांड्यात तिरामीसु करायचय ते भांडे घ्यावे. नंतर एक एक करुन लेडीफिंगर्स
आडवी धरुन कॉफीत बुडवावीत. बिस्कीट पूर्ण बुडायला हवे. ही बिस्कीटे फार नाजूक असतात त्यामुळे झटकन बाहेर काढावीत आणि लगेच कॅसरोलच्या तळाशी ठेवावीत. एका शेजारी एक असा बिस्किटांचा एक थर तयार झाला की त्यावर भांड्यातले अर्धे मिश्रण हलक्या हाताने ओतावे आणि ते लाकडी चमच्याने सगळीकडे सारखे पसरवावे (दुसरा थर).

७. आता परत त्या मिश्रणाच्या थरावर वर कॉफीत बुडवलेल्या बिस्किटांचा थर द्यावा (तिसरा थर). बिस्कीटे अगदी शेजारी शेजारी चिटकून ठेवावीत थर लावतांना आणि मग त्या थरावर उरलेले सगळे मिश्रण ओतावे (चौथा थर). काहीजण यावर बिस्कीटांचा अजून एक थर (पाचवा) पण देतात आणि त्यावर परत क्रीमचा (सहावा) पण माझ्याकडचे भांडे एवढे खोल नाही त्यामुळे मी एकुण चारच थर देते. तिरामिसु करतांना सगळ्यात खालचा थर नेहमी लेडीफिंगर बिस्कीटांचा तर सगळ्यात वरचा थर नेहमी क्रीमचा असावा

८. आता कॅसरोल किमान ४-५ तास तरी फ्रीजमध्ये ठेवावा. सर्व्ह करायच्या आधी चाळणीने त्यावर कोको पावडर टाकायची आणि मग सगळ्यांना तिरमिसु सर्व्ह करायचे. माझ्याकडे आत्ता फोटो नाहीये पुढच्यावेळी केले की काढेन आणि टाकेन.

वाढणी/प्रमाण: 
४-६ लोकांना किंवा खाल तसे.
अधिक टिपा: 

१. लेडीफिंगर्स आणि मस्करपोने चीज शक्य असेल तर इटालिअन ब्रँडचेच वापरावे. इटालीयन ग्रोसरीच्या दुकानात मिळते. लेडीफिंगर हे बिस्किटाच्या प्रकाराचे नाव आहे ब्रँडचे नाही. मी होल फुड्स मधून लेडीफिंगर्स आणले होते ३६५ की अश्याच कुठल्यातरी ब्रँडचे, अजिबात आवडले नाही.
२. एस्प्रेसो कॉफी करणे शक्य नसेल तर साधी काळी कॉफी वापरता येईल पण चवीत फरक पडतो.
३. काही जण लेडीफिंगर्स ऐवजी पाउंड केकच्या पातळ चौकोनी चकत्या वापरतात. चवीतला बदल मला फारसा आवडला नाही म्हणून मी लेडीफिंगर्सच वापरते.
४. मी वापरलेला कप मेजरींग कप होता.
५. पार्टीसाठी करतांना हा प्रकार मी आदल्या दिवशीच करुन फ्रीज मध्ये ठवते, जितका जास्त वेळ तो फ्रीज मध्ये रहातो तितकी चव चांगली येते.
६. अंड्याचा पांढरा भाग १२-१४ मिनीटे फेटणे हा भाग कधी कधी कंटाळवाणा होवू शकतो तो नवर्‍याला किंवा दुसर्‍या कोणालातरी करायला द्यावा :). माझ्यामते तिरामिसु इतकी सोपी आणि हमखास यशस्वी होणारी कुठलीच कृती नाही.

माहितीचा स्रोत: 
इटालीयन रुममेट
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पराग,
मैत्रेयी म्हणतेय ते खरय, स्टीफ पेक्स येण्यासाठी मिक्सरला पर्याय नाही. हाताने कितीही फेटले तरी हे शक्य होत नाही मिश्रण पातळच रहाते आणि हात मात्र खूप दुखतात.
आपण कपडे धुण्याची पावडर पाण्यात घातल्यावर जसा भरपूर फेस करतो पांढराशुभ्र तसा हा अंड्याचा फेस अंडी फेटल्यावर दिसतो. उपमा फारच विचित्र झाली का Proud

रुनि तू नेक्स्ट टाइम तिरामिसु करशील तेव्हा स्टेप बाय स्टेप फोटू टाक म्हणजे कसल्या उपमांची गरज नाही Happy

रुनी,
तिरामिसू एकदम मस्त झाला होता.सगळ्यांना खूप आवडला.थँक्यू Happy
आज मुरल्यावर तर फारच सुरेख लागत आहे.तुझी तोंडात विरघळण्याची टेस्ट पास झाला Happy

ही सोपी रेसिपी पण बिघडवलेली मी एकटीच असेन बहुधा! पण इन केस कुणाचे तसे झाले तर म्हणून टिप्स लिहितेय:
गेल्या वेळी एकदा ट्राय केले तेव्हा ते स्टिफ पीक्स चे तंत्र अज्जिबात जमले नव्हते. पीक्स जाउ देत पण नॉट इव्हन क्लोज!!थोडासुद्धा फेस येत नव्हता. मग सरळ त्याचे ऑम्लेट केले अन पोरांना दिले Lol
नंतर माकाचु म्हणून नेट वर शोधा शोध केली तेव्हा लक्षात आले काय चुकले ते.
अंड्याचा पांढरा भाग फेटून ते पीक्स तयार होणे ही एक केमिकल रिएक्शन अहे. जर त्यात प्रोटीन/फॅट चे जरा जरी अंश असतील तर तो फेस /पीक्स येत नाहीत. मी अंडी फोडून घेताना अंड्याच्या पिवळ्या भागाचे काही ट्रेसेस पांढर्‍यात राहिले. शिवाय आधी क्रीम + अंड्याचे पिवळे फेटलेल्या मिक्सी च्या पात्यावर पण काही ट्रेसेस होतेच, मी ते फक्त हाताने अन पेपर ने पुसून वापरले होते. या सगळ्यामुळे प्रोटीन अन फॅट भरपूर मिक्स झाले अन पीक्स अर्थातच अजिबात आले नाहीत!!तेव्हा पिवळे/पांढरे वेगळे करताना काळजी घ्यावी.
नेट वर यासठी अजून पण टिप्स आहेत त्या म्हणजे अंडी रूम टेंपरेचर ला असावीत , भांडे मेटल चे असले तर जास्त बरे, इ.
असो. पुढच्या वेळी ही काळजी घेतल्यावर मस्त जमला तिरामिसु.

रुनी तो ३६५ म्हणजे होल फुड्स चे स्वतःचे प्रॉडक्शन आहे अशी माहिती परवा तिथेच मिळाली.

आत्ताच इना गार्टनची रेसिपी प्रात्यक्षिकासकट पाहिली, मला करायचेय (एकदा). वर दिलेले प्रमाणात किती सर्विंग तयार होते?

मी या कृतीने तिरामिसु करुन पाहिले.
दोन चुका झाल्याच, एक म्हणजे चॉकोलेट फ्लेवर चीज आणले, शिवाय त्यात साखरही होती. तिरामिसु जास्तच गोड झाले.
अंड्याच्या योकचे ट्रेसेस पांढर्‍या भागात गेले, काही केल्या फेस होइना, मग ते टाकून दिले आणि आणखी तीन अंडी घेतली. तोवर मैत्रेयीची पोस्ट वाचून शहाणी झाले Happy
बाकी मस्त झाले होते, आता पुन्हापुन्हा करणार. बाहेरुन तिरामिसु आणले जाणार नाहीच. धन्यवाद रुनी!!

ही क्रुती करुन पहाणार पण कधी जमेल माहित नाही. बाहेर असं चांगलं तिरामिसू खायचं असेल तर कुठे मिळेल? बर्‍याच ठिकाणी ट्राय केलंय पण कोरडं असतं. ऑफिसच्या पार्टीच्या वेळी फ्लॉरिडात एका रेस्टॉरंट मधे खाल्लं होतं प्रचंड सुंदर तिरामिसू. तसं अजून कुठे मिळेल?

बाहेर असं चांगलं तिरामिसू खायचं असेल तर कुठे मिळेल? >>>
माझ्याकडे ये. Happy
बर्‍याच लोकांना चीज केक फॅक्टरीतले तिरामिसू आवडते (म्हणे!). मी हे तिरामिसू शिकल्यापासून बाहेरचे कुठलेच फारसे आवडीने खात नाही. हे वरच्या कृतीने एकदा केल्यावर कळते की आपण उगीच फार बाऊ करत होतो या कृतीचा खर तर किती सोपी आहे.

कॉस्ट्को मध्ये पण आता तिरामिसू मिळायला लागले आहे. चांगले असते.
माझे पण स्टिफ पीक्स येत नव्हते. मी तेव्हापासून एग व्हाईट्चे एक डबडं आणतो.
योक आणि पांढरे सेपरेट करायची भानगडच नको.

ही कृती वाचून मागे बर्‍याच जनांनी मुंबईत मस्करपोने चीज कुठे मिळेल विचारले होते. सीमाने दिलेल्या फुड ब्लॉगवर ही मुंबईतल्या ठिकाणांची आणि मिळणार्‍या वस्तूंची एकत्रित यादी मिळाली. http://purplefoodie.com/baking-in-bombay/
त्यात Crawford Market (Eram’s, Shop no. 123) इथे हे चीज आणि इतर बरेच काही मिळत असल्याचे लिहीलय. थोडक्यात क्रॉफर्डमध्ये बेकींग, कुकींग साठी लागणार्‍या बर्‍याच अभारतीय गोष्टी मिळतात असे दिसतय.

रुनी, हे करून बघायचा विचार आहे ..

पण एग व्हाईट्स चे स्टिफ पीक्स् , फोल्डींग मेथड वगैरे असलेल्या रेसिपी ला तू "सोपी" का म्हणतेस?

इस्पेशली "फोल्डींग मेथड" तर तुमचं स्किल (पक्षी: हलकेपणा वगैरे) तर पणास लावणारी असते ना ..

सशल वाचतांना शब्द अवघड वाट्त असले तरी प्रत्यक्षात कृती तशी सोपीच आहे. कृती अवघड वाट्त असेल तर तो माझ्या लिहीण्यातला दोष समज. मी तिरामिसु शिकतांना इटालियन मैत्रीणीचे बघून करायला शिकले त्यामुळे असेल पण मला कधी कठीण वाटले नाही.

>> यशस्वी झाला तर फोटो टाकेनच
यशस्वी झाला तर 'इथे' फोटो टाकेन म्हण. नाही झाला तर मग मलईबहारवर वगैरे व्हेरिएशन/मॉडिफिकेशन म्हणून. Proud

Lol

मी आधीच डिक्लेअर करते की ह्या रेसिपीत कसल्याही प्रकारचं मॉडिफिकेशन न करता करण्याचा इरादा आहे .. येणार्‍या पाहुण्यांत बच्चे कंपनी आहे त्यामुळे ब्रँडी /कॉन्यॅक /रम बद्दल मी अजूनही थोडीशी साशंक आहे पण बहुतेक तेही घालेनच .. Happy Lol

येणार्‍या पाहुण्यांत बच्चे कंपनी आहे त्यामुळे ब्रँडी /कॉन्यॅक /रम बद्दल मी अजूनही थोडीशी साशंक आहे पण बहुतेक तेही घालेनच >> घालच कारण फार लहान मुलांना तिरामिसु चं काही कौतुक नसतं. मोठ्यांनच जास्त कौतुक असतं. ही रेसिपी मी आत्तापर्यंत ३ वेळा केली आहे. छान होते.
सशल डरना मत.

शूम्पी माझा हुरूप वाढला आहे ..

तू लेडीफिंगर आणि मस्कारपोने गुरमे इटालियन शॉप मधून घेतलंस की सेफवे / होल फूड्स / क्रोगर / अ‍ॅल्बर्ट्सन्स् / रँडल्स् (हे डॅलस ला आहे की नाही कल्पना नाही) असल्या जेनेरीक ग्रोसरी स्टोर मधून?

लेडी फिंगर आमच्या इथे एक स्प्राउट्स नावचं ग्रोसरी स्टोर आहे तिथून. ते गोरमे आहे पण एकदम हाय एंड नाही.

मस्कारपोने क्रोगर नावाच्या जेनेरिक ग्रोसरी स्टोर मधून.

यू ट्यूबर सर्च मार तिथे एक छान व्हिडिओ पण आहे त्यामुळे तुला प्रत्यक्श बघितल्याने अजून हुरुप येइल.

Pages