"एका पेक्षा एक" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक २

Submitted by संयोजक on 21 August, 2009 - 00:00

नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!

--------------------------------------------------------------------------------------
zabbu_flower_macro.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

3.jpg

व्हॅली ऑफ फ्लॉवर्सच्या ट्रेकवर जाताना गोविंदघाटाच्या मार्गावर ही ओरिजिनल ब्रह्मकमळाची फुले फुलतात. पूर्ण फुललेल्या ब्रह्मकमळाचा आकार अर्धोन्मिलित नेत्रासारखा दिसतो. तलम, झिरझिरित बटर सिल्कच्या टेक्स्चरची ही फुले अप्रतिम देखणी दिसतात. हिमालयात फक्त ह्याच भागात उमलत असणारी ही फुले दुर्मिळ वर्गात असल्याने तोडायला अर्थातच बंदी आहे. माझ्याकडे उमललेल्या फुलाचाही फोटो आहे. रिसाईझ करुन टाकीन. व्हॅली ऑफ फ्लॉवर्समधे सामोर्‍या आलेल्या लाखो फुलांपेक्षा ही वाटेमधे खूप शोधल्यावर भेटलेली (मोजून आठ किंवा दहा संख्येत) फुलेच मला जास्त आवडली. तिथले घोडेस्वार अगदी थांबून ही फुले शोधायला किंवा त्यांचे नीट फोटो घ्यायला मदत करतात.

पांढरी लिली :

मनुस्विनी, झब्बू नावाचा पत्यांचा खेळ आहे. सगळा खेळ इथे लिहायचा म्हणजे फार वेळ लागेल....

अर्रे वा काय एकसे एक झब्बू आहेत !
असामी, आय्_अ‍ॅम्_सॅम, रुनी आय्टी अन कराडकर - कस्ली कांपोझीशन्स आहेत.

Picture 062.jpg

माझ्याकडुन ट्यूलिप्सचा अख्खा ताटवाच...:)

हा फोटो कॅनबरात दर सप्टेंबर मधे होणार्‍या फ्लोरिआड फ्लॉवर फेस्टिव्हल मधला आहे...

मस्त झब्बु देत आहेत सगळेजण.
अफलातुन फोटो आहेत काहि काहि. Happy
हे फोटु मायबोलीच्या खाजगी जागेत अपलोड करुन देत आहात का तुम्ही??
मला ते पिकासा किन्वा फ्लिकर वरुन देता येतील का?
मायबोलीत फोटो अपलोड करण हे मला अवघड जात. Sad
म्हणुन मी झब्बुच नाय देवु शकलो.

जबरदस्त.. पारणे फिटले डोळ्यांचे.. एक से बढकर एक आहेत सगळेच.

झकासराव या लिंक वर जाउन पहा.. http://www.maayboli.com/node/1556
पिकासा आणि फ्लिकर ची पण लिंक्स देता येतात

केदार जपान धन्यवाद.
बघतो प्रयत्न करुन.
केपी मायबोलीवरच अपलोड करुन ट्राय करतो रे मग तुलाहि दिसेल. Happy

Pages