कोरिआ(द.) च्या महाराणी सौ. आडोबाई सोलकर यांचे "आध्यात्म" या विषयावरचे व्याख्यान शिंज्युकु, टोक्यो येथे
१६ ऑक्टोबर २०१० रोजी आयोजित केले जात आहे. उपासकांनी येऊन प्रवचनाचा लाभ घ्यावा.
हर हायनेस सौ. सोलकर वैनींचा (सध्या माहिती असलेला ) कार्यक्रम:
१. १४ ऑक्टो. क्षक्षक्ष येथे डेरेदाखल
--> क्षक्षक्ष जवळ असलेल्या भक्तांनी भेटुन घ्यावे.
२-१. १६ ऑक्टो. हहह येथे कोरिअन (द.) भोंडला.
* धष्टपुष्ट हत्ती हवे आहेत.
२-२. १६ ऑक्टो. शिंज्युकु येथे प्रवचन आणि अल्पोपहार.
३. १९ ऑक्टो. डेरा परत. (कोरिआ (द.) )
स्वयंसेवक :
मा. मंजिरी (१)
मा. महेश (१)
मा. सावली (१)
मा. एम्बी (?)
मा. कुसुमिता१२३ (?)
म. ऋयाम (२५)
शुभेच्छुकः
मा. वर्षा (१)
मा. रैना (१)
मा. नंद्या (१)
मा. कांदापोहे (१)
मा. अनीशा (१)
मा. राखी. (१)
आणि मा. सायो (१) इत्यादि.
* कार्यक्रमाच्या गडबडीत स्वयंसेवक अथवा शुभेच्छुकांची नावे द्यायची राहिली असल्यास निदर्शनास आणुन द्यावीत. (निदर्शन करु नये.)
* क्षक्षक्ष तसेच हहह ह्या जागा काही अपरिहार्य कारणांमुळे प्रसिद्ध करण्यात येत नाही आहेत.
* ही संधी पुनःपुन्हा येणार नसलेने, हजेरी लावुन भक्तगणांनी अगत्य येणेचे करावे.
* हार, पुष्पगुच्छ आणु नयेत. पैशाचे पाकिट चालेल.
अधिक माहितीसाठी, "watch this space!!!"
हम्म.. पुर्वीसारख्या एलप्या
हम्म.. पुर्वीसारख्या एलप्या येत नाहीत आता
पुर्वीच्या नाही हो अशा गंजायच्या!
पु.लं.चे साहित्य वाचायला
पु.लं.चे साहित्य वाचायला काढले की काय खुप दिवसांनी ?
पुर्वीसारखे पुणे राहिले नाही हे वाक्य शिशुशाळेपासुन पेन्शनर टेकडी पर्यंत कुठेही ऐकायला मिळते
सगळ्याच पोस्ट आली का आडो?
सगळ्याच पोस्ट
आली का आडो?
ऋयाम, एलपी? तुझ्यावेळेला
ऋयाम, एलपी?
तुझ्यावेळेला होत्या एलप्या?
आडो पोचली का?
गोंद्या आला रे च्या चालीवर
गोंद्या आला रे च्या चालीवर सगळे विचारत आहेत अगदी
हो ना. आमच्या वेळी असं नव्हतं
हो ना. आमच्या वेळी असं नव्हतं
एल्पी नाही बघितली कधी...
आत्ता शोधलं तर एलपी म्हणजे लाँग प्लेयिंग रेकॉर्ड
हो...
आडो इलो रे इलो!
हावको इलो रे इलो सारख काय
हावको इलो रे इलो सारख काय म्हणतोयस.
म.कांबळींचे नाटक आहे, पांडगो
म.कांबळींचे नाटक आहे, पांडगो इलो रे बा इलो.
बरोब्बर महेश! बहुतेक पांडबा
बरोब्बर महेश!
बहुतेक पांडबा इलो रे इलो आहे ना ?
पांडबा नाही पांडगो ! मी
पांडबा नाही पांडगो ! मी अनेकवेळा पाहिल आहे शिडीवर.
ऋयाम साण, मगाचच्या इंतकाम चा
ऋयाम साण, मगाचच्या इंतकाम चा अर्थ सांगा की?? की इंतजाम म्हणायचय तुम्हाला??
इंतकाम की आग अस काहीस नाव
इंतकाम की आग अस काहीस नाव असलेला एक पिक्चर होता.
खास आडोसाठी - कॉन्सुलेटला रोज
खास आडोसाठी -
कॉन्सुलेटला रोज एक चक्कर टाकून ही येई
बॅग भरायची नाही हिला मुळीच घाई
गटगचा बाफही सजला तिकीटच हाती नाई
आडो येणार येणार अशी उठली नुसतीच आवई
नूडल्सच्या साठ्यावर यांची नजर सारी
भोंडल्यासाठी गडबड उडलीये भारी
देवीला जायचं की नाही यावर मारामारी
रुमालांसकट आहे इथे जय्यत तयारी
आडो आऽऽली, सोलपुरीतून द्वारी!

निषेध, आमचा उल्लेख नाहीये
निषेध, आमचा उल्लेख नाहीये कवितेत
>आडो आऽऽली, सोलपुरीतून
>आडो आऽऽली, सोलपुरीतून द्वारी!
वाह वाह वा!
>पांडगो
ओक्के. मला पांडबा वाटलं होतं.
>ऋयाम साण, मगाचच्या इंतकाम चा अर्थ सांगा की?? की इंतजाम म्हणायचय तुम्हाला?
तो एक फ्लॉप झालेला विनोद होता.
* काय लोक आहेत. एक विनोद फ्लॉप झाला, तर पत्र पाठवुन विचारतील.. 'ओ ~ हसु का? '
महेश आता आडो सोडून कुणाचाच
महेश आता आडो सोडून कुणाचाच उल्लेख नाहीये.

ऋयाम, पेठेतले असतील तर सांगतील 'का खिदळतयस उगाच? गप र्हा.'
महेशा तू उल्लेखनीय काहीतरी कर
महेशा तू उल्लेखनीय काहीतरी कर की आधी.
बापरे आडोवर पण कविता होत आहेत. आडोश्याला जाऊन रडुन यावे आता.
ओ हे घ्या ओ. सगळ्या बाफांना
ओ हे घ्या ओ.
सगळ्या बाफांना चक्कर टाकून.. आले महेश भाई..
गटगची वेळ जवळ आली, पिलान फिक्सच न्हाई!
आत्ताच शुक्रवार, चालु झालाय पण रंपाचा संशय येई.
रात्रीचं ठिके, सक्काळ सक्काळ पण 'नामा'चं बरं न्हाई.
महेश भा~ई.... हलके घ्या हलके महेश भाई...
हलके घ्या हलके महेश भा~~~ई... ||धृ||
अनीशा... जबरा आहे एकदम
अनीशा... जबरा आहे एकदम
फ्लॉप झालेला विनोद होय.. मग हरकत नाही. नाहीतर म्हटलं कुठली ड्युटी दिली मला, आणि ती पार नाही पाडली, असं नको व्हायला
ऋयामा भाई म्हणताना तुझा आवाज
ऋयामा भाई म्हणताना तुझा आवाज एवढा थरथरतोय की तू पण 'नामा'च्या गजरात तान लावत आहेस असा मला संशय येतोय.
ऋयाम भा~~~ई, धन्यवाद.
ऋयाम भा~~~ई, धन्यवाद. शिघ्रकवी ऋयाम
अनीशा, ऋयाम, इंतकाम म्हणजे
अनीशा,


ऋयाम, इंतकाम म्हणजे सूड ना
एलपी म्हणजे मला लाडीक पिपाणी वाटलं
सायो... लाडीक पिपाणी!!
सायो... लाडीक पिपाणी!!

उद्याचा सगळा वृत्तांत कळेलच तुला. उद्या ह्या टायमाला आम्ही देवी मधे असु
चला मंडळी उठा..... आवरायला
चला मंडळी उठा..... आवरायला घ्या
लांबचा पल्ला गाठायचाय!
उठा.. मी फक्त गटग ला...
उठा..
मी फक्त गटग ला... मेम्न्दोकुसाइ कारा
नमस्कार मंडळी, काल जपानात
नमस्कार मंडळी,
काल जपानात सुखरूप पोचले (काही कटकट, अडचण न येता). मंजिरी तुला थोड्यावेळाने फोन करते. सायो तुलाही फोन करणार होतो, पण मग रात्री करतो तुला.
मीच करेन तुमच्या गटगनंतर.
मीच करेन तुमच्या गटगनंतर. फक्त मला नंबर मेल कर.
अरे गटगनंतर तुम्हां लोकांची
अरे गटगनंतर तुम्हां लोकांची बोलतीच बंद झाली. काय झालं तरी काय?

काय सांगायचं आता तुम्हाला! वा
काय सांगायचं आता तुम्हाला! वा वा! प्रवचनानी कान आणि मन अगदी तृप्त झालं बघा
मास्तर त्याचं निरुपण करतीलच नंतर रसाळ लेखणीतुन!
मी आत्ता ड्रायविंग लायसण रिन्यु करायला आल्ये. लेक्चर चालु होईपर्यंत टिपी करत्ये
सुपर डुपर हिट ! ऑपरेशन गटग
सुपर डुपर हिट ! ऑपरेशन गटग सक्सेसफुल !!
(कोणत्या तरी चित्रपटात जॉनी लिव्हर शारूखच्या डोळ्यावर ऑपरेशन करून ओरडत येतो त्या चालीवर)
Pages