टोक्यो 'आऊटडोअर्स' गटग पार पडलं!

Submitted by ऋयाम on 10 October, 2010 - 08:52
ठिकाण/पत्ता: 
शिंज्युकु, टोक्यो. -- > शिनागावा, टोक्यो.

कोरिआ(द.) च्या महाराणी सौ. आडोबाई सोलकर यांचे "आध्यात्म" या विषयावरचे व्याख्यान शिंज्युकु, टोक्यो येथे
१६ ऑक्टोबर २०१० रोजी आयोजित केले जात आहे. उपासकांनी येऊन प्रवचनाचा लाभ घ्यावा.

हर हायनेस सौ. सोलकर वैनींचा (सध्या माहिती असलेला ) कार्यक्रम:
१. १४ ऑक्टो. क्षक्षक्ष येथे डेरेदाखल
--> क्षक्षक्ष जवळ असलेल्या भक्तांनी भेटुन घ्यावे.

२-१. १६ ऑक्टो. हहह येथे कोरिअन (द.) भोंडला.
* धष्टपुष्ट हत्ती हवे आहेत.
२-२. १६ ऑक्टो. शिंज्युकु येथे प्रवचन आणि अल्पोपहार.

३. १९ ऑक्टो. डेरा परत. (कोरिआ (द.) )

स्वयंसेवक :
मा. मंजिरी (१)
मा. महेश (१)
मा. सावली (१)
मा. एम्बी (?)
मा. कुसुमिता१२३ (?)
म. ऋयाम (२५)

शुभेच्छुकः
मा. वर्षा (१)
मा. रैना (१)
मा. नंद्या (१)
मा. कांदापोहे (१)
मा. अनीशा (१)
मा. राखी. (१)
आणि मा. सायो (१) इत्यादि.

* कार्यक्रमाच्या गडबडीत स्वयंसेवक अथवा शुभेच्छुकांची नावे द्यायची राहिली असल्यास निदर्शनास आणुन द्यावीत. (निदर्शन करु नये.)
* क्षक्षक्ष तसेच हहह ह्या जागा काही अपरिहार्य कारणांमुळे प्रसिद्ध करण्यात येत नाही आहेत.
* ही संधी पुनःपुन्हा येणार नसलेने, हजेरी लावुन भक्तगणांनी अगत्य येणेचे करावे.
* हार, पुष्पगुच्छ आणु नयेत. पैशाचे पाकिट चालेल.

अधिक माहितीसाठी, "watch this space!!!" Light 1

माहितीचा स्रोत: 
मायबोली, जपान बीबी.
प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धष्टपुष्ट हत्ती हवे आहेत.>>>> महेश आणि ऋयाम हे हत्ती कसे चालणार मग?>>>
म्हणुनच ऋयामाने कंसात २५ लिहीलय का? २५ हत्तींचे बळ असलेला ऋयाम की २५ ऋयाम मिळुन एक हत्ती? Happy

बाकी शिनागावा देवी झकास आहे. Happy

अरे वा, माझा पण हातभार पोष्टी वाढवायला.
मला पण तोच प्रश्न पडला, ऋयामच्या समोर कंसात २५ का आहे? इतक्या लोकांना आणणार आहेस तू?
का ते वय आहे (तुझं कायम २५ असणार आहे ना वय), मग बाकीचे सगळे १ वर्षाचे स्वयंसेवक Happy
बाकी, सोलकर बाईंचा ईसा झाला की न्हाय? ढोलकी वाला मिळाला नाही तर ऋयामला बसवा Happy

अरेरे टीक्का बिरयानी न आवडणारे बरेच आहेत वाटतं.
त्याच्या बिर्यानी चांगल्या वाटल्या आम्हाला. पण व्हेज ऑप्शन कदचित कमी असतील. देवी ठीकच आहे म्हणजे इतर इंडीयन रेस्टॉरंट सारखच आहे.

बर, मला लेकीला घेऊनच याव लागणार आहे. नवर्‍याचा मित्र असणारे त्यामुळे ते दोघे बाहेरच जातील.

हो हो शोध ना. बरेच आहेत खरतर इंडियन सोडले तर. पण व्हेज मेनु बघायला पाहिजे.
सिंगापुर फूड फेस्टीवल ला गेलीयेस का कधी तिथल्या? एकदम सही क्रॅब्स आहेत. पण नो व्हेज. Sad

त्यांना पण जमलं असतं तर बर झालं असतं गं Sad

महेश शिनागावाला भेटायच ठरतय. माझी लेकपण असेल बरोबर ना, फार उशीर झाला तर ती झोपाळते आणि मग चिडचिड करते. मंजिरीची लेक असल्याने फार त्रास नाही देणार म्हणा , ताईशी खेळायला आवडतं Happy

देवी धाबा, देवी इंडिया आणि देवी कॉर्नर अशी ३ ठिकाणं आहेत का शिनागावात? जाणकारांनी प्रकाश टाकावा

देवी धाबा सापडलं.
साउथ इंडियन फुड आहे. य्म्मी Happy
http://devi-group.com/news/?p=34

DEVI DHABA : South-Indian restaurant

2nd Fl., PAL Shinagawa Bldg., 3-26-33, Takanawa, Minato-ku, Tokyo 108-0074

Tel/Fax: 03-3441-5892 Open : 11:30-23:00 (Sunday closed)

(same floor as DEVI INDIA)

कॉल करुन बघायचा का बुकिंग साठी?

मला देवी कॉर्नर माहिती आहे असंख्य वेळा गेलोय तिकडे. ताकानावा देगुचीला बाहेर पडून उजवीकडे आहे. पण ते फार छोटे आहे आणि बरेचवेळा माचीजिकान पण जास्त असतो.

महेश हे देवी कॉर्नर वेगळ आहे. ते नेहेमी सारखच पंजाबी फूड वाल आहे.
देवी धाबा चांगल आहे अस ऐकलय दोन तीन जणांकडुन.

हर हायनेस सौ. सोलकर वैनींचं परवाना पत्र आलेलं आहे हो!!!!!!
चला, ढोल ताशे वाजवायला घ्या... स्वागताच्या तयारीला लागा Happy

आता आडो च आडनाव खरच सोलकर झालय अस वाटायला लागलय. Happy
अभिनंदन आडो. आम्ही सगळे तुझ्या वाटेवर आईस ठेवुन आहोत. Wink

Pages