टोक्यो 'आऊटडोअर्स' गटग पार पडलं!

Submitted by ऋयाम on 10 October, 2010 - 08:52
ठिकाण/पत्ता: 
शिंज्युकु, टोक्यो. -- > शिनागावा, टोक्यो.

कोरिआ(द.) च्या महाराणी सौ. आडोबाई सोलकर यांचे "आध्यात्म" या विषयावरचे व्याख्यान शिंज्युकु, टोक्यो येथे
१६ ऑक्टोबर २०१० रोजी आयोजित केले जात आहे. उपासकांनी येऊन प्रवचनाचा लाभ घ्यावा.

हर हायनेस सौ. सोलकर वैनींचा (सध्या माहिती असलेला ) कार्यक्रम:
१. १४ ऑक्टो. क्षक्षक्ष येथे डेरेदाखल
--> क्षक्षक्ष जवळ असलेल्या भक्तांनी भेटुन घ्यावे.

२-१. १६ ऑक्टो. हहह येथे कोरिअन (द.) भोंडला.
* धष्टपुष्ट हत्ती हवे आहेत.
२-२. १६ ऑक्टो. शिंज्युकु येथे प्रवचन आणि अल्पोपहार.

३. १९ ऑक्टो. डेरा परत. (कोरिआ (द.) )

स्वयंसेवक :
मा. मंजिरी (१)
मा. महेश (१)
मा. सावली (१)
मा. एम्बी (?)
मा. कुसुमिता१२३ (?)
म. ऋयाम (२५)

शुभेच्छुकः
मा. वर्षा (१)
मा. रैना (१)
मा. नंद्या (१)
मा. कांदापोहे (१)
मा. अनीशा (१)
मा. राखी. (१)
आणि मा. सायो (१) इत्यादि.

* कार्यक्रमाच्या गडबडीत स्वयंसेवक अथवा शुभेच्छुकांची नावे द्यायची राहिली असल्यास निदर्शनास आणुन द्यावीत. (निदर्शन करु नये.)
* क्षक्षक्ष तसेच हहह ह्या जागा काही अपरिहार्य कारणांमुळे प्रसिद्ध करण्यात येत नाही आहेत.
* ही संधी पुनःपुन्हा येणार नसलेने, हजेरी लावुन भक्तगणांनी अगत्य येणेचे करावे.
* हार, पुष्पगुच्छ आणु नयेत. पैशाचे पाकिट चालेल.

अधिक माहितीसाठी, "watch this space!!!" Light 1

माहितीचा स्रोत: 
मायबोली, जपान बीबी.
प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओके मग ७ चं करु का?? नक्की या तुम्ही दोघं वेळेत. नाहीतर सगळी मिसे बंद होतील आणि त वरुन ताकभात खावा लागेल त्रुयाक किंवा तहेशच्या घरी जाउन!

येस्स. ७.
आणि आम्ही नक्की ७.१५ ला येऊच. ६:३० ला तिथुन निघणार म्हणजे निघणार.

होय किनई महेश राव??

हाहा

पीसीच्याच आडोश्यात...

ओल्ड मंक आणि चांगलं मन तेवढं नाहीये.. नाहीतर मीही जाऊ शकतो त्या गोष्टीत.

लोक्स..... डन डनाडनडन!!! योयाकु झालेलं आहे यात्तो Happy
शिनागावा : देवी धाबा : शिचि-जी कारा ~

अरे त्या विकेन्डर्सवाल्यांनी लवकर चालू केला प्रोग्राम तर बर आहें. नाही तर आपल्याला फक्त गणगौळण ऐकून निघाव लागेल.

नाही अनिशा, त्यांच्या नशिबात माझं गाणं नाही बहुतेक. मी गटगला असेन ना गं, ही मंडळी वेगळ्या गाण्याची गोष्ट करतायत.

केपीना विचारावं का, जपानात सुड कसा उगवावा?
...त्या सातोइमो प्रमाणे सुडाचं देखिल माहित अस्सवं ना? Wink :दिवः

तेच तर. तुमचं गाणं सोडून कशाला दुसरीकडे? Proud
सूड घेईन सूड दुर्गे.. असं म्हणणार आहेस का ऋयामा?

बघा त्रुयाम साण, तुम्ही एवढे तिथले स्वयंसेवक आणि तिथल्या वेळा पण तुम्हाला माहित नाहित! काय हे??? असं होतं दोन्हीकडचं स्वयंसेवक पद घेतलं की!

Lol
आयला. सुड कसा उग्वावा सांगाय्चं सोडुन तुम्ही लोक कोट्या कर्ताय? Angry
रडायचं तरी कुणापाशी? आडोसा न येतील, रडुन घ्यावं का इचार करत होतो. जाउद्या.

सल्लागार म्हणुन अनीशा आल्या म्हणुन तेंच्या गावी, पुण्यात गटग करावं का? बाफ काढु ? Wink
क्लबाच्या नावासाठी \प्रतिथयश \लेखक कोण ? नाव घ्या Wink

>>क्लबाच्या नावासाठी \प्रतिथयश \लेखक कोण ? नाव घ्या
ह्म्म्म्म हा आपला पराकोटीचा विनम्रपणा समजावा काय ? Uhoh

Pages