टोक्यो 'आऊटडोअर्स' गटग पार पडलं!

Submitted by ऋयाम on 10 October, 2010 - 08:52
ठिकाण/पत्ता: 
शिंज्युकु, टोक्यो. -- > शिनागावा, टोक्यो.

कोरिआ(द.) च्या महाराणी सौ. आडोबाई सोलकर यांचे "आध्यात्म" या विषयावरचे व्याख्यान शिंज्युकु, टोक्यो येथे
१६ ऑक्टोबर २०१० रोजी आयोजित केले जात आहे. उपासकांनी येऊन प्रवचनाचा लाभ घ्यावा.

हर हायनेस सौ. सोलकर वैनींचा (सध्या माहिती असलेला ) कार्यक्रम:
१. १४ ऑक्टो. क्षक्षक्ष येथे डेरेदाखल
--> क्षक्षक्ष जवळ असलेल्या भक्तांनी भेटुन घ्यावे.

२-१. १६ ऑक्टो. हहह येथे कोरिअन (द.) भोंडला.
* धष्टपुष्ट हत्ती हवे आहेत.
२-२. १६ ऑक्टो. शिंज्युकु येथे प्रवचन आणि अल्पोपहार.

३. १९ ऑक्टो. डेरा परत. (कोरिआ (द.) )

स्वयंसेवक :
मा. मंजिरी (१)
मा. महेश (१)
मा. सावली (१)
मा. एम्बी (?)
मा. कुसुमिता१२३ (?)
म. ऋयाम (२५)

शुभेच्छुकः
मा. वर्षा (१)
मा. रैना (१)
मा. नंद्या (१)
मा. कांदापोहे (१)
मा. अनीशा (१)
मा. राखी. (१)
आणि मा. सायो (१) इत्यादि.

* कार्यक्रमाच्या गडबडीत स्वयंसेवक अथवा शुभेच्छुकांची नावे द्यायची राहिली असल्यास निदर्शनास आणुन द्यावीत. (निदर्शन करु नये.)
* क्षक्षक्ष तसेच हहह ह्या जागा काही अपरिहार्य कारणांमुळे प्रसिद्ध करण्यात येत नाही आहेत.
* ही संधी पुनःपुन्हा येणार नसलेने, हजेरी लावुन भक्तगणांनी अगत्य येणेचे करावे.
* हार, पुष्पगुच्छ आणु नयेत. पैशाचे पाकिट चालेल.

अधिक माहितीसाठी, "watch this space!!!" Light 1

माहितीचा स्रोत: 
मायबोली, जपान बीबी.
प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंजिरी | 10 October, 2010 - 17:31
हाय लोक्स....
मला उमजलेला प्लॅन पुढील प्रमाणे :
१६ तारखेला सावलीकडे भोंडला. त्यासाठी स्त्रीवर्गाला आमंत्रण. पृश लोक आले तर हत्ती व्हावं लागणार, त्याची तयारी ठेवावी
भोंडुन झालं की स्त्री वर्ग सावलीच्या घरुन आणि पुरुष वर्ग आपापल्या उंडारायच्या ठिकाणाहुन ठरलेल्या जागी एकत्र भेटतील.
आत्ता तरी सगळ्यांची ठिकाणं बघता मला शिंजुकु ओक्के वाटतय. आम्हाला येताना सावलीच्या घरापासुन ...............
इकागा देश्यो का???? आपापले गोइकेन कळवते कुदासाय! ओमाचिशितेओरिमास! शित्सुरेइशिमस

रैना | 10 October, 2010 - 17:45
वा ! काय मस्त प्लॅन्स. हॅव फन
आदॉ- उरायमाशी.....

आऊटडोअर्स | 10 October, 2010 - 17:55
मंजिरी, माझा मुक्काम क्षक्षक्ष या गावात असणार आहे. मैत्रिणीशी मी बोललेय डिनरबद्दल, तर तिलाही चालणार आहे.

सावली, तुझा पत्ता मला मेल करशील कां ग?

मंजिरी | 10 October, 2010 - 17:59
क्षक्षक्ष होय! मग तुला पन एकदम कनविनियंट आहे. ओएदो सेन मधे बसलीस की २० मिनिटाच्या आत पोचशील अर्थात बरोबर मैत्रिण आहे तर काही मोन्दाइ नाही
आता बघु बाकीचे काय म्हणतात ते. आणि मग फाइनारु अन्सा ठरवुयात.

सावली | 10 October, 2010 - 18:04
मंजिरी प्लॅन एकदम करेक्ट
शिंजुकू चे बघ फक्त. सगळ्यांना सोयीच आहे का ते. माझ्या घरापासुन बस आहे. १५ मिनीट लागतात. तो ऑप्शन पण बघ गरज असल्यास.

आडो , मंजिरी पत्ता इमेल करतेय.

सावली | 10 October, 2010 - 18:16
इमेल केलय दोघीना.

रैना तु पण ये गं

मंजिरी | 10 October, 2010 - 18:20

हरकत नाही.
शिंजुकुचे जेवणाचे ऑप्शन्स मी सांगु शकते, पण शिनागावा नो आयडिया. ते तुलाच बघावं लागेल

सावली | 10 October, 2010 - 18:26

शिनागावा मधेच जायच असेल देवी आहे, टीक्का बिर्याणी आहे.

मंजिरी | 10 October, 2010 - 18:30
चालेल. ठिकाण नंतरच फायनल करुयात आपण.
समस्त पुरुषवर्गहो, स्त्रीवर्गाच्या सोयीनुसार तुम्हाला ठिकाण कळवलं जाईल

आऊटडोअर्स | 10 October, 2010 - 18:35
गुड प्लॅन. तुम्ही ठरवाल ते मला चालेल

धष्टपुष्ट हत्ती हवे आहेत.>>>> महेश आणि ऋयाम हे हत्ती कसे चालणार मग? दोघेही तसे रोडावलेलेच आहेत. Proud
पुढच्या आठवड्यापर्यंत इथे किमान १५० पोस्टी पडतील ह्याची काळजी घ्या.

>धष्टपुष्ट हत्ती हवे आहेत.>>>> महेश आणि ऋयाम हे हत्ती कसे चालणार मग? दोघेही तसे रोडावलेलेच आहेत.
काय कराचं? Sad आजकाल पुर्वीसारखी सुड्रा मिळत नाही.. आमच्या वेळी असं ...

>पुढच्या आठवड्यापर्यंत इथे किमान १५० पोस्टी पडतील ह्याची काळजी घ्या.
घ्या. टीआरपी साठी नावात बदल Wink
बघुया आता... पुर्वीपेक्षा १०-२० पोष्टी तर जास्त येतीलच. Wink

>>दोघेही तसे रोडावलेलेच आहेत.
म्हणुन तर दोघांना बोलावलय. एक से भले दो. तुका म्हणे त्यातल्या त्यात Wink
चला, मा.सायोताईंच्या आग्रहानुसार टी आर पी वाढवायला पहिली पोस्ट माझी Happy

अरे वा! आडोदेवी येतायत जपान मधे! सहीच!!!!
मला आवडेल भेटायला..पण नेक्स्ट वीक ला आमचा क्योतो चा प्लॅन चालू आहे..मी दोन-तीन दिवसात नक्की सांगते! आडो तुझा मुक्काम खुपच कमी आहे ग !

हो ना मंजिरी. तु तुझ्या मैत्रिणींना विचारणार होतीस ना. काही ठरल का कोणाच?

अजुन कोण माहित आहे का जपान मधले ? त्यांना पण आमंत्रण द्यायला हवे.
Happy

एका मैत्रिणिला विचारलय. पण तिचं हो/नाही अगदी आयत्यावेळी ठरेल (घरी पाहुणे आहेत!). म्हणुन सद्ध्या काही जाहीर केलं नाही मी Happy

सद्ध्याची लोकं
आडो (१)
आडोची मैत्रिण (१+१)
मंजिरी (१+१*)
सावली (१+१*)
महेश (१)
ऋयाम (१ + ???)
एम्बी (?)
कुसुमिता१२३ (?)
*+१ ची उपस्थिती त्यांच्या ओतोओसान च्या प्लॅन वर अवलंबुन.

खिरापत ओळखायची असते ! इथे तुम्ही इ-खिरापत ओळखा Happy भोंडला झाल्यावर आम्ही सांगु Wink

तशी अजुन काय करायच ते ठरल नाहीए. आधी विचार करत होते ते डिनर प्लॅन मुळे बदलाव लागेल Happy

@ आभार्स Happy

ऋयाम (१ + ० ).

अरेरे कुसुमिता १२३...
क्योतो एन्जॉया, पण सोलकर बाईंचं प्रवचन असं पुन्हा पुन्हा मिळणार नाही हो. एरवी त्या सदैव कोरिअन हिमालयात आऊटडोअर्स असतात. आपलं नशीब थोर म्हणुन त्या इथे येत आहेत. आणि भोंडला शिबीर म्हणजे तर 'चिजीमीवर तुप!'

>हत्ती
सोलकर बाईंच्या पॅकेजमधे हत्तीचं इन्क्लुडेड असतं. त्यांना तशी विनंती केली आहे. अगदीच नाही मिळाला, तर म्हटलं एक कोरिअन हत्त्ती आणा. डोळे बारिक असले, तरी चालतील.

सावली तै, डन डना डन डन.

मिनोती तै, आभार्स! Happy

आडोबाई,
'तमाशातुन आध्यात्म' हाच तुमचा व्याख्यानाचा विषय आहे. विसरलात ? Wink

वातावरण णिर्मितीसाठी एखादा सुविचार अर्थात 'टीझर' द्या कुणीतरी.

* अरे हो.. रुमालांची सोय मा. मंजिरी यांजकडे आहे.

'तमाशातुन आध्यात्म' ??? मला वाटत होतं की भोंडल्यातुन आध्यात्म Happy अर्रर्र... गृहपाठ चुकला असता न माझा आणि रुमालांचा टाईप पण. बरं झालं वेळेवर कळलं ते Happy

बाफ काढून एक दिवस झाला आणि फक्त २३ पोस्टी. शो ना हो.
सावली, आडो, मंजिरी - पोस्टींचा धावफलक हलता ठेवा. Proud

अनीशा, माझ्या नावाने मास्तर बाफ काढून मोकळे झालेत आणि माझ्या मात्र व्हिसाचा अजून काहीच पत्ता नाही. Proud

सावली म्हणतेय खिरापत सरप्राईज आहे, मग मी म्हणते चर्चा करावी तर कशावर?

काय सरप्राईज असु शकत त्यावर चर्चा करुयात.

आणि बाकी अध्यात्मिक काय असणारे हे पण बोलुयात ना Happy

विसा मिळेलच गं. डोन्ट वरी.
आज सुट्टी आहे म्हणुन इथे काही पोस्टि नाहीएत. उद्या येतीलच Happy

\विषय लावण्यांचा आहे अहो...

आडोदेवींच्या लावण्या: -

सध्या 'किमची' रसातल्या लावण्या बघु.

१. मला हो म्हणत्यात लवंगी 'किमची'
२. 'किम-ची माझी'... सांडली गं~~
३. इष्काची किमची

पुढचा रस कोण देतो बघु.... Light 1

>बाफ काढून एक दिवस झाला आणि फक्त २३ पोस्टी. शो ना हो.
>सावली, आडो, मंजिरी - पोस्टींचा धावफलक हलता ठेवा.
अनीशा, शोनाहो.

एवढा तुमच्या नावाचा समावेष केला 'पाठिंबा' फल्कात आणि तुम्ही प्रतिसाद द्यायचा सोडुन तिसरंच.... Sad

मंडळी जेवायला कुठे जायचं त्याच्यावर पोष्टी पाडुयात आता थोड्या.
टिक्का बिर्याणीला मी एकदाच गेल्ये पण खास नाही वाटलं Sad
देवीमधे गेले नाहीये अजुन मी. लोकांचे गोइकेन सांगते कुदासाय

Pages