बे एरिया दणक्यात गटग : १०-१०-१० सकाळी ११:३० वाजता

Submitted by राखी on 30 September, 2010 - 16:29

स्थळ : महागुरुंचे घर
३४३८ ब्राउनटेल वे, सॅन रमोन

पॉटलकसाठी मेनु पण इथे ठरवायचा आहे.

सध्याचे मेंबर:

महागुरू : पोळ्या, बार्बेक्यु, राईस (२ मोठे + १ लहान)
सशल : सॅलड + श्रीखंड (२ मोठे +१ लहान)
राखी : मेथी मटर मलई ( २ मोठे + २ लहान)
सायलीमी : चिकन ग्रेव्ही + बार्बेक्यु करता मॅरिनेटेड (२ मोठे + २ लहान)
फारेंड : चीज पिझ्झा (२ मोठे + २ लहान)
भाग्य : मिक्स भाजी / उसळ (२ मोठे)
रमा : चीजकेक (२ मोठे + १ लहान)
पेशवा : काहीतरी गोड (१)
फुलपाखरु : अ‍ॅपेटायझर ?
सुयोग : टोमॅटो सूप (२ मोठे + १ लहान)
मिनोती : ?
rar

दक्षिण कॅलिफोर्नीयातिल माबोकरांना आग्रहाचे निमंत्रण.
बाराकरांना पेशल बस करून इथे येण्याचे आग्रहाचे निमंत्रण (शिट्टी, डि.सी., फिली कर बाराच्या बशीतून येतील असे गृहित धरले आहे)
अटलांटावासियांना कधीतरी जरा वेगळ्या ठिकाणी गटग करता आग्रहाचे निमंत्रण.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वांना मायबोलीच्या संपर्कसुविधेमधुन पत्ता आणि फोन नंबर कळवतो.>> आम्हाला नाही मिळाला अजुन. Happy

येईल हो भाई, आधी तुम्ही बस करून निघा तर खरं .. तुम्ही इथे पोहोचेपर्यंत संपर्काची इमेल नक्की पोहोचलेली असेल! Happy

किती टाळकी ... शाकाहारी/मासांहारी किती त्याचा आकडा कळवला नाही अजुन?

बार्बेक्यू आहे ना? >> दोन्ही राहु दे Happy
चिकन बार्बेक्यूसाठी आणू ना? >> .. चालेल . मॅरिनेटवगैरे सोपस्कर करुन ना? मी व्हेजी ग्रिलची तयारी करुन ठेवतो.

अरे वा जोरदार तयारी चालु आहे.
चिकन बार्बेक्यूसाठी आणू ना? >>> कोंबडी बिचारी कशी पुरेल , अख्खा बोकड लागेल Proud Light 1

मी BBQ चिकन (मॅरिनेट करून )
चिकन ग्रेव्ही आणते
महागुरू राईस करणार आहेत Happy
सशल तू व्हेजी आणते आहेस ना?

फुपा, सुयोग, रार तुम्ही पण कळवा Happy

केला केला बदल, आधी लक्षात नाही आलं Happy पण वेळ आधे सांगितली तिच बर्का, ही आत्ता नावात आहे ती आपली उगाच सिमेट्री करता Happy

अरे वा वा थोड्या अजून बाता मारा आपलं गप्पा मारा तर २०० होतील. लगे रहो.

भाई, शिट्टीत इश्टॉप घ्या बर्का Proud

गटगला शुभेच्छा !!! मजा करा Happy

आज एकदाचं लिहायला वेळ होतोय. उशीराबद्दल क्षमस्व !
मी येत असल्याची पूर्वकल्पना दिल्याबद्दल अमोल, धन्यवाद Happy
माझ्या 'रंगीबेरंगी' पानाची सुरुवातच माझ्या स्वयंपाकाच्या अनुभवांनी आहे Happy
त्यात आता खूपच सुधारणा झाली असली तरी सध्या मी अजून transition मधे असल्याने माझ्याकडे घर वगैरे काही नाही. त्यामुळे मी काही cooking करुन आणणं शक्य नाही होणार Sad
पण तयार, विकत काही घेउन यायचं असेल तर please please सांगा... I will get that Happy

Pages