बे एरिया दणक्यात गटग : १०-१०-१० सकाळी ११:३० वाजता

Submitted by राखी on 30 September, 2010 - 16:29

स्थळ : महागुरुंचे घर
३४३८ ब्राउनटेल वे, सॅन रमोन

पॉटलकसाठी मेनु पण इथे ठरवायचा आहे.

सध्याचे मेंबर:

महागुरू : पोळ्या, बार्बेक्यु, राईस (२ मोठे + १ लहान)
सशल : सॅलड + श्रीखंड (२ मोठे +१ लहान)
राखी : मेथी मटर मलई ( २ मोठे + २ लहान)
सायलीमी : चिकन ग्रेव्ही + बार्बेक्यु करता मॅरिनेटेड (२ मोठे + २ लहान)
फारेंड : चीज पिझ्झा (२ मोठे + २ लहान)
भाग्य : मिक्स भाजी / उसळ (२ मोठे)
रमा : चीजकेक (२ मोठे + १ लहान)
पेशवा : काहीतरी गोड (१)
फुलपाखरु : अ‍ॅपेटायझर ?
सुयोग : टोमॅटो सूप (२ मोठे + १ लहान)
मिनोती : ?
rar

दक्षिण कॅलिफोर्नीयातिल माबोकरांना आग्रहाचे निमंत्रण.
बाराकरांना पेशल बस करून इथे येण्याचे आग्रहाचे निमंत्रण (शिट्टी, डि.सी., फिली कर बाराच्या बशीतून येतील असे गृहित धरले आहे)
अटलांटावासियांना कधीतरी जरा वेगळ्या ठिकाणी गटग करता आग्रहाचे निमंत्रण.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बोनलेस चिकन व्हेज असतं ? ऐ ते न च Uhoh

केल्याशिवाय अनुभव कसा मिळणार ? फार्फार तर जळेल, कच्च राहील. तसं झालं तर लगेच पुढच्या गटगची तारीख घ्यायची. प्र्याक्टिस मेक्स गटगकर पर्र्फेक्ट Proud

आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे काय >>
अनेक गहन विषयावर परिसंवाद होतील उदा. रागोवच्या चित्रपटातील भावलेल्या पंचकन्या आणि रामसेच्या चित्रपटात भोगलेले पंचभुते ह्यातील अधिक सुसह्य कोण, चारोळ्या नको पण त्यानंतरच्या आरोळ्या आवर, मायबोलीवरील रिक्षा इ.
CWG च्या निमित्ताने क्रिडास्पर्धा पण आहेत. जगातील प्रत्येक जाती धर्मानुसार एक mii बनवला जाईल. त्यांच्यात wii वर boxing matches आयोजित करण्यात येतील. मेगा फायनल म्हणुन हिंदु-मुस्लिम अशी मॅच होईल. अर्थात त्यांच्या समर्थकांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे या मॅचनंतर गटग ची सांगता होइल.
कुणाला गाणी, कविता म्हणायची असतील तर स्वतःच्या जबाबदारीवर म्हणावे तसेच इतर मायबोलीकरांच्या(आणि शेजार्‍यांच्या) टिकेला उत्तर द्यायला तयार रहावे. टिकेला उत्तर देताना कवितेच्या विषयापासुन भारत्-अमेरीका ह्या सर्वविषयांवरील प्रश्नांवर चर्चाकरायची तयारी ठेवुन यावी.
Light 1 Happy

स्टो, लिंबोणी, रंगी , हेम्स या जुन्या बेकरांना पण बोलवा कोणीतरी . मिनोती तुझ्याकडे असतील ना यांचे पत्ते ?

थोड्यावेळासाठी येऊन जायला जमेल का रमा? बघ ट्राय कर. ज्या गटगला तू असतेस, तेंव्हा मी नसते, त्यामुळे आपण अजून भेटलोच नाही.

>> चिजकेक (२ मोठे + १ लहान)
हे वाचून मी बराच वेळ बुचकळ्यात पडले होते. Proud

(नीट स्प्रेडशीट करायला काय होतं! :P)

२ मोठे आणि १ लहान चिजकेकच आणणार होती ती, १ मोठा तर मलाच पुरेल फक्त Proud रमा आली नाहीस तर तुझ्यावर उधार राहीले, त्यापेक्षा येच्च, उधारी ठेऊ नये Happy

ज्या गटगला तू असतेस, तेंव्हा मी नसते, त्यामुळे आपण अजून भेटलोच नाही.
<<<
रमा,
तु गेली नाहीस तर रमा आणि राखी एकाच व्यक्तीचे २ आयडीज आहेत असा अर्थ घेउ , तेंव्हा जा च ! Proud

बाय नी काय होतय .. 'त्यांना' बाय ट्राय नाही पुरत, मल्टिपोलर आयडीज लागतात Proud (यालाच स्प्लिट पर्सनॅलिटी म्हणावे का?)

रमा,
अगं मयुरेश ला जर जमत नसेल जीटीजीच तर आमच्या बरोबर ये.
रच्याकने, साऊथ बे वाले कारपूल करु शकतो.

Pages