बे एरिया दणक्यात गटग : १०-१०-१० सकाळी ११:३० वाजता

Submitted by राखी on 30 September, 2010 - 16:29

स्थळ : महागुरुंचे घर
३४३८ ब्राउनटेल वे, सॅन रमोन

पॉटलकसाठी मेनु पण इथे ठरवायचा आहे.

सध्याचे मेंबर:

महागुरू : पोळ्या, बार्बेक्यु, राईस (२ मोठे + १ लहान)
सशल : सॅलड + श्रीखंड (२ मोठे +१ लहान)
राखी : मेथी मटर मलई ( २ मोठे + २ लहान)
सायलीमी : चिकन ग्रेव्ही + बार्बेक्यु करता मॅरिनेटेड (२ मोठे + २ लहान)
फारेंड : चीज पिझ्झा (२ मोठे + २ लहान)
भाग्य : मिक्स भाजी / उसळ (२ मोठे)
रमा : चीजकेक (२ मोठे + १ लहान)
पेशवा : काहीतरी गोड (१)
फुलपाखरु : अ‍ॅपेटायझर ?
सुयोग : टोमॅटो सूप (२ मोठे + १ लहान)
मिनोती : ?
rar

दक्षिण कॅलिफोर्नीयातिल माबोकरांना आग्रहाचे निमंत्रण.
बाराकरांना पेशल बस करून इथे येण्याचे आग्रहाचे निमंत्रण (शिट्टी, डि.सी., फिली कर बाराच्या बशीतून येतील असे गृहित धरले आहे)
अटलांटावासियांना कधीतरी जरा वेगळ्या ठिकाणी गटग करता आग्रहाचे निमंत्रण.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दणक्यात होणार्‍या गटगसाठी शुभेच्छा. Happy
आमची आठवण काढल्याबद्दल धन्यवाद. पुढच्या वेळी दणका जर अ‍ॅडव्हान्समध्ये द्या, म्हणजे आम्ही प्लॅन करू Happy

नंद्याला बोलवा, त्याला काहि फार लांब नाही बहुतेक Happy

विड्याची पानं , केळफुलाची भाजी, कुरडया, जेवायला केळीची पानं कोण आणणारे ?

नाही नाही म्हणता ६० पोष्ट पडली की.
चला आता करमणुकीचे कार्यक्रम ठरवायला घ्या बघु.
केराओकी वगैरे कोणी म्हणणार आहे का?. चला सीडी बनवायला घ्या.
विनोद जमा करा. मायबोलीकरांवर चे असतील तर एकदम बेष्ट. Happy

अरे वा, खरंच दणक्यात दिसत आहे बे एरियाच्या रे़कॉर्ड प्रमाणे. जिटिजी ला शुभेच्छा!! टीआरपी वाढवून तीन आकडी तरी पोस्टी होउ देत आता Happy

महागुरुच्या घरी आहे तर छानच होइल जीटीजी प्रसाद-सीमा छान होस्ट करतात:).
खरच बरीच गर्दी आहे आपल्याकडे झालेल्या इतर जीटीजी बघता , एन्जॉय !
महागुरु,
LA बीबी डेड आहे, तिथे आमंत्रण देउन काही उपयोग नाही Proud

क्ष नावाचा आयडी कुठे गायब झाला काय माहिती. गटग म्हटले की त्याने बनवलेल्या उकडीच्या मोदकाची खास आठवण येते.

अनिलभाई, तुम्ही ह्या गटगचे Facilitator आहात का?>> अगदी. खास आमंत्रणावरुन.. Happy

ती लिस्ट परत पुढे आणा. गप्पा गोष्टी होतीलच. आमचीही आठवण काढा. Happy

अजून २८ पोस्टी पाडल्या की शतक गाठाल. चला पटापटा पोस्टी टाका.

आम्हाला पण आता गटग म्हंटले की झक्कींनी आणलेल्या उकडीच्या मोदकांची आठवण येइल Happy

आम्हाला पण आता गटग म्हंटले की झक्कींनी आणलेल्या उकडीच्या मोदकांची आठवण येइल
<<
आम्हाला अजुनही बे एरीआ 'गटग '= 'गेला तो गंडला' च आठवतं Proud
(कॉपी राइटः मीपुणेकर चा नवरा)
असो, पण त्याची कसर भरून काढली माहगुरु कडच्या नेक्स्ट जीटीजीनी :).

सुप्रभात मंडळी !
तंगडीवाले (नॉन्-व्हेज) किती लोक आहेत. त्या प्रमाणे व्यवस्था करतो. मी ग्रिलचि व्यवस्था करतो पण मला मॅरिनेशन ते ग्रिलींग मधला अनुभव नाही, तेव्हा त्याची कोणी जबाबदारी घेणार असेल तर सांगा. ग्रिल आणि इतर सामान आणुन ठेवतो.
लहान मुलांसाठी काही वेगळा मेनु असेल तर सांगा, त्याची व्यवस्था पण करुन ठेवतो.
रंपाची व्यवस्था करायची आहे का? काही स्पेशल असेल तर सांगा. ह्या क्षेत्रात पण मला फारसे ज्ञान नाही.

मॅरिनेशन ते ग्रिलींग मधला अनुभव नाही >>> हरकत नाही कोंबडी(च्या तंगडी)ला विचारा. त्यांच्या पिढ्यानपिढ्या ह्यातच गेल्यात Proud

हो सॅन लुईस ओबिस्पोला पुढचे करू संयुक्त कॅलिफोर्नियाचे Happy नाहीतर फ्रेस्नो जवळच्या त्या नॅशनल पार्क मधे.

आम्ही प्युअर व्हेज मोड मधे रविवारी.

तंगड्या साफ करुन त्याला हळद मिरची, आले, लसुण लावुन मॅरीनेट करा. मग ग्रील वर ठेवुन भाजा. थोड्या थोड्या वेळाने फिरवत रहा. वर कॅचप टाका. हा. का. ना. का. Happy

त्या अनिलभाईंचं काही ऐकु नका BBQ च्या बबातीत Proud
झकींकडच्या एका जीटीजीला BBQ च्या नावाखाली नुसती वांगी भाजत होते आणि कबाब ऐवजी अर्धवट भाजलेल्या वांग्यांचे लठ्ठ च्या स्लायसेस वाटत होते, मीठही नसलेले Biggrin Light 1

ग्रिल नवं होतं पण तुम्ही आणि झक्की तर जुने ( आय मिन कुक) आहात ना Proud
जरा साहित्त्य तरी नीट आणायच, झकींच्या सौं नी केलेल्या इडली सांबारानी वाचवलं नाही तर असे पदार्थ भाजले होते कि यातल नक्की काय खावं/खातात असा प्रश्नं पडावा Proud

ग्रिल करायचं असेल तर कॉर्न, अस्परॅगस, हिरवी चटणी लावलेले पनीरचे क्युब्स , भोपळी मिरच्यांचे तुकडे, मश्रुम्स हे पण ग्रिल करता येतील. चिकन करणार असाल तर थाय पीसेस आणा - हिरवी चटणी, शानचा तंदुरी मसाला, थोडं दही असं लावून ठेवा १०-१२ तास फ्रीजमधे. मग ग्रिल करा एकेका साइडला ४-५ मिनिटे लागतील. लिंबू पिळून खा! हा का नी ना का !

अरे बेकर्स पैकी कोणीच काही लिहित नाही.

व्हेज वाले आणि नॉन व्हेज वाले किती? व्हेज ग्रिल पण करता येईल पण कोणी उत्सुक असेल तर.

आमच्याकडचे दोन मेंबर सगळं खाणारे आणि मी बोनलेस चिकन आणि भाज्या, पनीर असं व्हेज कॅटेगरी मध्ये मोडणारं सगळं ..

ग्रिलींग चा अनुभव मिनीमल ..

पण ग्रिल करायचं तर व्हेदर कसं असणार आहे?

डिजे, जीटीजीबद्दल सांगितल्यावर नवर्‍याने 'गेला तो गंडला' ची लगेच आठवण काढली Proud

Pages