वेदकालीन संस्कृती भाग ४

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

राम कोण आणि कुठला होता, ह्यावर अनेक तर्क आणि वाद आहेत. राम नव्हताच इथपासून राम अयोध्येचा की भारतभू बाहेरचा अश्या अनेक थेअरी सध्या सापडतात. राम हा आर्यांच्या पूर्वेकडील (व भारतातील दक्षिणेकडील) आक्रमणाचे प्रतिनिधीत्व करतो व त्याने वैदिक संस्कृती लंकेपर्यंत नेली असे काही लोक मानतात.

राम प्रकरण मी थोडे सविस्तर मांडणार आहे. कारणे दोन. एक म्हणजे ऋग्वेदात ह्या सर्वांचा उल्लेख पहिल्या काही ऋचांमध्ये आहे, म्हणून ऋग्वेदकालाशी निगडित आहे. दुसरे म्हणजे रामायणातून बराच भूगोल लक्षात येतो. पुढे महाभारत युद्धात हा विस्तृतरितीने आहे, पण रामायणाला आधार मानून आपण रामाचे अस्तित्व दिसते का हे पाहू.

हल्लीच लंकेला जोडणारा रामसेतू पाडण्यास काँग्रेस सरकारने परवानगी दिली आहे. केंद्रसरकारने दाव्यात असे मांडले होते की राम अस्तित्वात असल्याच्या कुठलाही पुरावा नाही, तसेच हाच तो रामसेतू आहे ह्याला कुठलाही पुरावा नाही, पुराव्याअभावी हे पाडण्यात यावे. कारण त्यामुळे लंका व भारत ह्या दोन देशात नौकानयन सुखकर होईल. व्यावहारिकदृष्ट्या हे जरी बरोबर असले तरी भारतातील हिंदू जनतेच्या भावना ह्यामुळे निश्चितच दुखावल्या गेल्या.

वाल्मिकी रामायण हे एकुण २४,००० श्लोकांचे आहे. सात कांडात, एकुण ५०० प्रकरणांचा विस्तार एवढे साहित्य एका रामायणात आहे. विविध राजे, तत्कालिन संस्कृती, एकमेकांसोबतचे राजकारण, समाज, आचार विचार ह्यांचा समग्र समूह म्हणजे रामायण. राम खरा आहे की नाही, पुरावा आहे की नाही ह्यात मला रस नाही तर ह्या काव्यात रस आहे कारण त्यात तत्कालीन समाजाचे प्रतिबिंब उमटल्याशिवाय राहत नाही. भारतीय संस्कृती त्यातून पुरेपूर दिसते त्यामुळे रामायण हे वेदकालीन संस्कृती वा इ स पूर्व संस्कृती मधील फार मोठा मैलाचा दगड ठरते. बाल, अयोध्या, आरण्य, किष्किंधा, सुंदर, युद्ध आणि उत्तरकांड हे ते सात कांड आहेत. पैकी बाल व उत्तर हे मुळ लेखनाचा भाग नाहीत असे आता तज्ज्ञ मानतात.
रामायण हे वाल्मिकी ऋषींनी लिहीले व ते ह्यासर्वाचे साक्षीदार होते असे आपण मानतो. पण त्याच बरोबर वाल्याचा वाल्मिकी हे राम नाम उलटे जपल्यामुळे (मरा मरा) ऋषी झाले अशी कथाही आपल्याला सांगितली गेली. ते प्रस्तावनेत म्हणतात, " मी ब्राह्मण कुळात जन्माला आलो, पण किराताकडे* वाढलो, क्षुद्र कामे केल्यामुळे क्षुद्र झालो, क्षुद्र स्त्री सोबत विवाह केला, तिने माझे पाप नाकारले व त्यामुळे राम नामाच्या जपामुळे मी परत ब्राह्मण झालो." ह्यावरुन प्रश्न येतो की वाल्मिकी हे खरच समकालिन होते? का त्यांनी ही कथा होऊन गेलेल्या राजाबद्दल आपली कल्पनाशक्ती लढवून मांडली आहे? मुळात हा वाल्मिकी एक होता की अनेक? तैत्तरिय ब्राह्मण ज्याने लिहले त्याने वाल्मिकी हा व्याकरणकार होता असा उल्लेख केला आहे, तर महाभारतातील उद्योग पर्वात वाल्मिकीचा उल्लेख गरुडाचा वंशज म्हणून आलेला आहे, व त्याला सुपर्ण वाल्मिकी असे उल्लेखलेले आहे.

पूर्ण रामायण मी इथे उद्धॄत करणार नाही तर त्यातील काही भाग, त्या त्या विद्वानांचे मत खोडण्यासाठी मी लिहणार आहे.

दशरथाला पुत्र होत नव्हता म्हणून त्याने एक यज्ञ केला. त्यावेळी शॄंग ऋषी तिथे उपस्थीत होते. अश्वमेधानंतर (वधानंतर, अश्वमेध म्हणजे घोड्याचा राणीशी संग नव्हे तर मेलेल्या अश्वासोबत राणीने एक रात्र घालवायची असते, अश्वाच्या तोंडावर कपडा असतो व त्याच खोलीत राणीला थांबायचे असते.) मुख्य राणी कौसल्या हिने एक रात्र घालवली. मग दुसरे दिवशी पायसदान मिळाले यथावकाश चार पुत्र प्राप्त झाले.

डॉ बाबासाहेब आंबेडकर रिडल्स इन हिंदूइझिम ह्या पुस्तकात लिहतात, राम हा पायसदानाने नाही तर शृंग ऋषि पासून झालेला पुत्र आहे कारण कौसल्या एक रात्र घोड्यासोबत राहिली, तिथे हे ॠषी होते, त्यामुळे राम हा शृंगाचा मुलगा आहे असे ते माणतात. ह्यात तथ्य मानले तर बाकी तीन पुत्रांचे काय ह्यावर मात्र आंबेडकर मौन बाळगतात. नियोग पद्धत ती महाभारतात होती, तर त्यापूर्वीच्या रामायणकालात असेल असे गृहित धरुन चालले ह्यातून लगेच असे सिद्ध होते की तो कदाचित नियोग पद्धतीने झाला. म्हणजे स्त्री पुरूषातील संबंध पुत्रप्राप्ती ह्या विषयात प्रगत होते असे मानावयास जागा उरतेच! थोडक्यात एक खोडायला गेले तर त्यातून दुसरे दुर्लक्षीलेले पण तत्कालिन समाजास मागे न नेता पुढे नेणारे सत्य समोर येतेच. इतर हजारो प्रवाद लक्षात घेऊन इथे खोडण्यापेक्षा रिडल्स पुस्तकाप्रमाणे राम हा आर्य राजा, सिता त्याची बहिण आणि रावण हा बुद्ध राजा होता. बुद्ध रावणाला पराभूत करुन रावणाला ब्राह्मण म्हणून घोषित केले गेले वगैर वगैरे, थोडक्यात रामाचा काल हा बुद्धानंतरचा आहे असे लेखकाचे म्हणणे आहे. तसेच हे युद्ध राम रावण न होता त्याला वैदिक बुद्ध धर्म युद्ध अशी झालर लेखकाने दिली आहे. रामाची सिता बहिण असे ते म्हणतात पण ती बहिण कशी झाली ह्यावर मात्र कुठलाही प्रकाश टाकलेला नाही. हे मांडण्यासाठी त्यांनी दशरथ जातक कथा (नं ४६१, ५४० ) ह्याचा आधार घेतला आहे. मात्र वरील जातक कथांचा उल्लेख त्यांनी केलेला नाही पण त्यातील कथा भाग घेऊन ते हे पुस्तक लिहतात. वेगवेगळ्या जातक कथांमध्ये रामाचा उल्लेख आहे. पण ह्या सर्व कथांमध्ये रावणाने सीतेचे हरण केल्याचा व राम रावण युध्दाचा उल्लेख नाही. तो का नसावा हे उघड आहे कारण रावणाला बुद्ध राजा मानले गेले आहे. जातक कथा ह्या इसाप निती सारख्या कथा आहेत. त्या सर्वच खर्‍या नाहीत. तसेच सीतेशिवाय रामाच्या अनेक बायका होत्या असे आंबेडकर म्हणतात. पण त्या कोण व कशा ह्यावर काहीही प्रकाश त्यांनी टाकला नाही. .

रामाचा जन्म पायसदानाने झाला हे आपण मानतो. पायस ही पद्धत नियोग पकडली तरी तिला तत्कालिन समाजात मान्यता होती व तसे प्रकार रुढ होते. केवळ ह्यावरुन हिंदू देव चुकीचे व धर्मच कसा गंडलेला आहे हे रिडल्स ह्या पुस्तकात मांडले आहे. कृष्णाबद्दल तर त्याहून हिणकस भाषा वापरली आहे. इथे रामजन्म प्रकरण देणे भाग होते म्हणून ह्या थेअरीचा उल्लेख केला इतकेच. हे मत खोडण्यासाठी हा लेख नाही, तर असेही मत आहे व त्याचा इथे उल्लेख करणे आवश्यक होते इतकेच महत्व आंबेडकरांच्या त्या पुस्तकाला. आंबेडकरांच्या पुस्तकाला दुर्गाबाई भागवतांनी उत्तर दिले होते असे वाचण्यात आहे. त्यामुळे ह्या प्रकरणाला इथेच सोडून पुढे वळू.

ऋग्वेदात रामाचा, दशरथाचा व सीतेचा उल्लेख आहे, पण सीतेचा उल्लेख हा पत्नी म्हणून नाही, खरेतर सीतेचा उल्लेख व्यक्तीवाचक नाही, ती जमीनीला दिलेली उपमा पण आहे. पेरणी केलेल्या जमिनीसंबंधी हा उल्लेख आला आहे. ह्यावरुन काही लोकं राम आणि सीता एकमेकांशी संबंधित नव्हते असाही शोध लावतात. पण ऋग्वेदातील सीता व्यक्तीवाचक नसली तरी रामाची पत्नी नाही हे कसे सिद्ध होणार ह्याचा विसर मात्र पडलेला दिसतो. ऋग्वेदातील पहिल्या मंडलात अनेकदा रामाचा उल्लेख आढळतो.
रामायणात राम अनेक असुरांशी, राक्षसांशी लढतो व त्यांना पराजीत करतो. त्यांचे वर्णन करताना त्यांना असुर, दैत्य, दानव, राक्षस, यक्ष अशी नावं नेहमी आढळतात.

असुर नावाची फोड केली असता असे दिसते.
सुराचा एक अर्थ देव म्हणजे जे देव नाहीत ते असुर.
सुराचा दुसरा अर्थ मद्य म्हणजे जे मद्य पीत नाहीत ते असुर. हा अर्थ काढताना मी थोडे वैचारिक स्वातंत्र्य घेत आहे, कारण अनेक यज्ञात सुरा अर्पण करताना सुरा कशी तयार करायची ह्याचे वर्णन आलेले आहे.
ऋग्वेदातील एका ऋचेत (१०|९३|१४) रामाचे वर्णन करताना रामाला असुर ही सज्ञा पण दिली आहे. इथे कदाचित मी जो अर्थ काढत आहे (मद्य न पिणारा) असे म्हणून त्याची सुस्ती केली असावी वा पहिल्या अर्था प्रमाणे जो देव नाही तो असुर राम.

हे असुर मोठे रंजक प्रकरण आहे असे दिसते. आता थोडे लक्ष दिले तर महाभारतात कृष्णाचा मामा, कंस तो असूर आहे. प्रल्हादाचा पिता हिरण्यकश्यपु हा देखील असूर म्हणवला गेला आहे. म्हणजे असूर आणि देव ह्यात नातेसंबंध आहे असा सरळ अर्थ निघतो बरेचदा तर पिता पुत्र, मामा-भाचा असेही हे नाते आहे. म्हणजे वैदिक विचारांना विरोध करणारी काही राजे असूर असा तिसरा भाषाशास्त्राशी संबंध न असणारा अर्थ मला जास्त बरोबर वाटतो.

हे असुर मानव होते का नाही ह्यात देखील विद्वानात मतभिन्नता आहे. डॉ स्टेन कोनो हे ते मानव नव्हते असे म्हणतात, F E Pargiter ह्यांना त्यांना कोण मानावे हे कळत नाही, तर भांडारकर म्हणतात असीरियन संस्कृतीमधील लोक म्हणजे असूर. वैदिक लोकांशी त्यांचे भांडणे होत होते आणि असुर हे पण मानवच होते, पण हे असूर अतिशय रानटी असल्याकारणाने वैदिक लोकांनी साहित्यात अजून थोडे भडक लिहले असण्याचा संभव मुळीच नाकरता येणार नाही.

मागील लेखाच्या एका प्रतिक्रियेत मी देव आणि असुर हे भाऊ होते असेही मांडले आहे. तांड्य ब्राह्मण आणि शतपथ ब्राह्मणाप्रमाणे देव आणि असूर हे प्रजापती पासून निर्माण झाले, देव लहान, असुर मोठे. ऋग्वेद, रामायण, महाभारत इ अनेक पुस्तकात देवासुरांचे युद्ध व त्यांचे वर्णन येतात, त्यावरुन काही तज्ञ असुर म्हणजेच हडप्पा, मोहंजदाडो, लोथल इ ठिकाणी राहणारे होते व त्यांचे ऋग्वेदिक लोकांशी लढे झाले असेही मानतात. पण ह्या सर्व थेअर्‍या आर्यन इन्वेजन झाले हे मानून आहे, व नविन इतिहास आता आर्यन इन्वेजन झाले नाही असे मांडू पाहत आहे.

आणखी एक महत्वाचा दाखला आर्य आणि असूर ह्यांचा संदर्भात आहे तो म्हणजे वैवस्वत मनुच्या ( इ स पूर्व ३२०० ) समकालिन असणारा असुर राजा वृषपर्व होता. त्याला शर्मिष्ठा नावाची मुलगी होती. तिने आर्य राजा ययातिशी लग्न केल्याची कथा सर्वांना माहित असावी. हा ययाति हा पुरुरव्याचा पणतू होता. त्याने देवयानी ह्या शुक्राचार्यांच्या मुलीशी पण लग्न केले आहे. शुक्राचार्य हे दानवांचे गुरु म्हणून प्रसिद्ध आहेत. ह्या ययातिला पाच मुलं झाली, पुरू, यदू, द्रह्यु, अनु आणि तुर्वसू. हे पाचही मुलं पुढे पाच नद्यांकाठी राहायला गेले. ह्या पाच नद्या म्हणजेच सिंधू संस्कृतीमधील पंचनद. म्हणजे ही मुल आर्य + असूर अश्या संगंमातून आलेली आहेत.

शतपथ ब्राह्मणातील एका ऋचेमुळे ज्यात म्लेंच्छ असा उल्लेख आहे. डॉ मिश्रा असे मांडतात अकिडियन साम्राज्यातील लोक सिंधूसंस्कॄतीला मेलूहा म्हणत. हे मेलूहा आणि म्लेंच्छ जवळ जाणारे आहे व मेलूहा म्हणजे हडप्पा असे ते मांडतात, त्यावरुन म्लेंच्छ म्हणजे हडप्पावासी असे ते मांडतात. त्यांचे व्यवहार मेलूहा, मेगन आणि दिलमान साम्राज्यांशी होते. मेगन म्हणजे आजचे ओमान, दिलमान म्हणजे बहारिन तर मेलूहा हे कुठेही सापडत नाही, म्हणून मेलूहा म्हणजेच हडप्पा असा त्यांचा कयास आहे. त्यांचा मताला अनुमोदन मालती शेंडगे ह्या "सिव्हिलाईज्ड डेमन्स" ह्या पुस्तकात देतात.

राक्षस हा शब्द रक्ष पासून तयार झाला असे काहींचे म्हणने आहे. रक्ष म्हणजे रक्षा करणे. समुद्र मंथनातून जे काही निर्माण झाले त्यांना असूर आणि देव ह्यांचात वाटण्या होण्याआधी ज्या लोकांना त्याची रक्षा करण्यास सांगीतले ते म्हणजे पण राक्षस असाही एक प्रवाह आहे.

रावणाला नेहमीच ब्राह्मण म्हणून पाहिले जाते. तो ब्रह्म कुळ उत्पन्न आहे असेही म्हणलेले आहे. ब्रह्म रक्ष कुळाचा रावण, त्याचा पुढे राक्षस झाला असण्याची शक्यता जास्त आहे. ह्याला पुष्टी म्हणून हा प्रसंग पाहा. हनुमान जेंव्हा लंकेत प्रवेश करतो तेंव्हा त्याला ब्रह्मघोष ऐकू येतो असा उल्लेख सुंदर कांडाच्या १८ व्या सर्गात आहे. ब्रह्मघोषाच्या उल्लेखामुळे ब्रह्म रक्ष म्हणजे कदाचित स्मृतींद्वारे (पठण) ब्रह्मसुत्रांचे रक्षण तो समुदाय करत असावा.

लंकेचे जे वर्णन रामायणात केले आहे, ओळीने घर, मोठ मोठ्या बागा, हमरस्ते, मोठी घर, वाडे वगैरे ह्यावरुन लक्षात येते की रावण हा एक प्रतिभाशाली, विचारवंत व श्रीमंत राजा होता. युद्धतंत्र त्या नगरीत विकसीत झाले होते, एक राजा व त्याचे राज्य म्हणून लंका निश्चीतच प्रगत होती, हे कुणाही अभ्यासकाला सहज लक्षात येते. ह्या नगरीचे वर्णन हडप्पा संस्कृतीशी मिळते जुळते आहे.

राजा राम, देव राम आणि भुगोल.

अ‍ॅलेक्झॅडंरच्या भारताच्या स्वारीचे वर्णन एरियन ह्या इतिकासकाराने लिहून ठेवले आहे. तो प्रत्यक्ष अ‍ॅलेक्झॅडंर बरोबर होता. पूर्ण रात्र वाळवटांतून प्रवास करुन आल्यावर अचानक त्याला नदिकाठी एक मोठे गाव दिसले. त्या गावाचे नाव होते रामबाकिया. एरियन लिहतो की अ‍ॅलेक्झॅडंरला वाटले की एकेकाळी हे खूप मोठे शहर असावे, त्या गावातून एक नदी वाहते, तिचे नाव अघोर नदी. त्या आजूबाजूचे लोक हे ओरिटेय नावाच्या टोळीचे होते असा उल्लेख आहे. गावात एक विहिर आहे, त्याचे नाव ""रामचन्द्र की कुप" असे आहे. बाजुलाच एक जुनी गुहा आहे. त्यातील एकात हिंगुला देवीचे तर दुसर्‍यात कालीचे मंदिर आहे. येथूनच रामाने वनवासाला जायला सुरुवात केली असे तिथे मानले जाते. राम आधी गोरख टॅन्कला गेला, तिथून पुढे टोंगाभेरा व तिथून पुढे हिंगुलजला गेला. आजही ह्या भागात रामाची जत्रा भरते. हिंगुलजला शक्ती पिठ आहे असे हिंदू लोक मानतात. हिंगुलज कराचीपासून उत्तरेस २०० किमी आहे. इ स पूर्व ३२६ मधिल राम वा राम कथा अस्तित्वात असल्याचा हा एक मोठा पुरावा आहे

प्रख्यात वैय्याकरणी पाणिनीचा काल हा इस पूर्व ३५० मानला गेला आहे. काहीजन इस पूर्व ५०० आहे असेही गृहित धरतात. पाणिनीने सिंधू, वर्णू, मधुमत, किष्किंधा, कंबोज, काश्मिर, सलवा, गांधार, उरसा, दरद आणी गंधिका ह्या स्थानांचा उल्लेख वेळोवेळी केला आहे. पैकी आपल्यासाठी महत्वाचे आहे ते किष्किंधा कारण रामायणात ह्या राज्याचा उल्लेख आहे. ह्या राज्याचा राजा वाली व नंतर सुग्रिव हे होते. काही इतिहासकार ह्या किष्किंधेचा शोध घेताना आजच्या बलुचीस्थानातील कलत हे गावं आहे असे मानतात. बलुचिस्थान हे आजच्या पाकीस्तानचे एक राज्य आहे. ह्यात गंमत एकच दिसते की जर कलत ते कराची असे अंतर घेतले तर ३०० किमी भरते म्हणजे रामबाग ते कलत हे अजून कमी भरणार. रामबाग जर रामाची जागा मानले तर कलत किष्किंधा म्हणजे केवळ १०० एक किलोमिटर मध्ये रामाला हनुमान भेटतो असे गणित येते. ह्या जागेलाच किष्किंधा का म्हणतात तर तिथे आजही हिंगोल नॅशनल पार्क आहे. किष्किंधेचे रामायणातील वर्णन ह्या जागेशी मिळते जुळते आहे. इच्छुकांनी कराची ते कलत गुगल मॅप्स वर बघावे. माझ्यामते हे अंतर फारच कमी भरते त्यामुळे राम येथील नाही असे अनुमान निघते. रामबाग कुठेही असू शकते, सिंकदराला जरी रामबाग हे गाव लागले तरी सिंकदर भारत पूर्ण उतरुन मध्ये आला नाही तो आजच्या अफगाण, पाक सीमेवरुनच परत गेला. पण त्या उल्लेखावरुन असेही अनुमान काढता येते की कदाचित राम त्या अघोर नदिच्या काठचा असावा.

रामाचे नाव घ्यायचे तर एक मजेशीर उल्लेख बघा. रामल्लाह नावाचे नाव आजच्या पॅलेस्टाईन मध्ये पण आहे.* ह्यावरुन राम पॅलेस्टाईन मध्ये होता असेही उद्या कोणी म्हणाले तर मला आश्चर्य वाटणार नाही. ह्यावरुन मी असा अंदाज बांधेन की राम हा राजा अन त्याची कथा तत्कालिन लोकात फार प्रसिद्ध होती व रामाला देव मानून त्याचे नाव भरपूर जागांना दिले गेल. थोडक्यात महाराष्टात प्रत्येक शहरात शिवाजी नगर व महात्मा गांधी रोड असे भाग दिसतात तेवढेच महत्व.

आणखी एक उल्लेख म्हणजे राम सिन नावाचा मेसोपोटेमियन राजा. वयाच्या तेराव्या वर्षी तो राज्यावर आला व त्याने बबिल म्हणजे बाबिलायन राजे ह्यांना हारवले. बबिल लोकांकडून दहा राजे लढत होते. एका थेअरी प्रमाणे राम सिन ह्याने त्या दहा राजांना हारवले. पर्यायाने दशानन रावण अशी जोड ते लावतात.

प्रख्यात भाषातज्ज्ञ डेव्हिड मॅकअल्पिन असे मांडतात की मेडिटरेनीयन समुद्राच्या आजूबाजूला असलेल्या झग्रोस येथील शेती आणि आजच्या पाकिस्तान येथील शेतीचा प्रकार सारखाच आहे, तत्कालिन इलाम राज्यातिल भाषा इलेमाईट ही द्रविडीयन डायलेक्टशी मिळती जुळती आहे. आणि कदाचित हेच इलेमाईट भारताच्या दक्षिण भागात पसरले. हा मला थोडा ओढून ताणून आणलेला संबंध वाटला कारण रामाला इतर थेअरीज आर्य म्हणतात, पण इथे द्रविड म्हणले जाईल. कलत (वर पाहा) येथील भाषा पण द्रविडीयन होती व नंतर देवनागरी झाले असे म्हणले गेले म्हणजे हा राम मध्यपूर्वेतून सरकून आजच्या हिंगोल नॅशलल पार्कात वनवास कालावधी घालवतो असा कयास मांडला तर थोडे अशक्यप्राय वाटते कारण मध्ये खूप मोठे वाळवंट आहे. रामायणात कुठेही इतके मोठे वाळवंट आलेले नाही. अफगाणिस्तानला आजचे नाव इ स १७४७ नंतर मिळाले आहे. त्या आधी त्याला भारतीय नावाने संबोधले जात होते कारण अफगाण, पाक हा भारतभू चा भाग होता. त्या आधी त्याचे गांधार, मद्र, बाल्हिक, अरट्ट असे भूभाग (विविध राज्य) होते. अ‍ॅलेक्झॅडंरच्या वरच्या उल्लेखात पण त्याने मोठे वाळवंट पार केल्याचा उल्लेख आहे. म्हणजे ही थेअरी पण परत एकदा थोडी कच्चीच ठरते असा निष्कर्ष मी काढत आहे.

राम हा धनुर्धारी राजा होता. त्याचे मुख्य शस्त्र हे धनुष्यबाण हे होते. वैदिक देव इंद्र, वरुण इ हे धनुष्य बाण चालवणारे देव नाहीत तर त्यांचे वेगवेगळे शस्त्र आहे. मेसोपोटेमिया व इजिप्त येथे सापडलेल्या खुणांवरून व चित्रांमध्ये बाणाचे चिन्ह पण आहे, तो पण अर्धचंद्राकृती असेलेला बाण. असे बाण सिथियन, बाबिलोन आणि मेडस ह्यांनी असिरियन्सच्या विरुद्ध केलेल्या युद्धात वापरले आहेत. त्यामुळे तो इराणी वा सुमेरियन संस्कृतीचा भाग आहे असे आणखी काही लोकं मानतात. रामानन अशी सज्ञा त्याला दिली आहे. हित्ताईत लोकांचा एक योद्धा म्हणून पण रामानन पुढे आला आहे. त्याने आर्यांना पंजाब पर्यंत नेले असा एक उल्लेख आहे. मित्तनी लोकांच्या मध्ये पण वैदिक कालीन नावे आहेत जसे सुबंधू, तुषरता, अर्तसुमरा इ ह्यातील तुषरता म्हणजेच दशरथ असे काहींचे म्हणने आहे.

वैदिक नद्या व भूगोल

रामायणात शरयू नदीचा उल्लेख वारंवार आढळतो व वैदिक साहित्यामध्ये सरस्वती ही नदी प्रामुख्याने आढळते. रामायणासंबंधी ह्या दोन नद्या बघूयात.

राम हा इश्वाकु वंशातील राजा आहे. कालिदासाने रघूवंश लिहला आहे, त्यात तो इश्वाकु वंश हा उत्तर कोसलामधील आहे असे लिहीतो. हे उत्तर कोसला म्हणजेच इराण असे काही लोक म्हणतात, तर काही उत्तर कोसला म्हणजे आजचा अफगाण असेही मानतात. अफगानिस्तानातील होरायू नदी म्हणजे शरयू नदी असा त्यांचा कयास आहे. उत्तर कोसला हे इराण होऊ शकत नाही हे मी खाली दिलेल्या नकाशावरुन लक्षात येईल. कोसलाच्यावरचा भाग घेतला तर फार तर अफगाण वा अगदी उत्तरेकडचे अफगाण. इराण कसे होते हे अजूनही कळले नाही. अफगाण हा भारताचा भूभाग असल्यामुळे राम आजच्या पाकिस्थानातील हिंगोल नॅशनल पार्क मध्ये गेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण इराण पकडले तर मध्ये पूर्ण वाळवंट आहे, मग त्याचा नी रामायणाचा संबंध कसा लावणार?
तसेच लंका हे द्विप आहे. राम जर उत्तर कोसलाचा असेल तर मग तो लंकेपर्यंत कसा गेला? की आपण जी लंका मानतो ती लंका नसून दुसरेच कुठले तरी द्विप हे लंका होय हा प्रश्न पडणे साहजीक आहे. ह्यावर काही विद्वान उत्तर देतात ते मोंहजंदाडो म्हणजे लंका असण्याचे. हेच का? तर मोंहजंदाडो मधील एका सिलावर कृत्तिकेचे चित्र आहे. कृत्तिका हे आपण नक्षत्र माणतो. इ स पूर्व ३१०२ मध्ये एका बुधवारी जेंव्हा सूर्य कृत्तिका नक्षत्रात होता तेंव्हा कलियुग सुरु झाले असे ते सील सांगते. त्यावरुन लंका, जिथे रावण हा बुद्धीमान, शक्तीशाली राजा राहत होता, तिथेच असे खगोलशास्त्र निर्माण होऊ शकते असे त्यांचे म्हणने आहे.

आर्यभट्ट, ब्रह्मसुक्त, सूर्य सिद्धांत हे सर्व असे मानतात की ब्रह्मकुल हे खगोलशास्त्र शिकण्याचे अतिप्राचिन ठिकाण आहे. हे सर्व विद्वान त्या बुधवारी कलियुग सुरु झाले हे ही मानतात. मग एकतर आर्यभट्ट बरोबर असावा (युगाचा कल्पनेत) किंवा मॅक्समुलर तरी. माझे वैयक्तीक मत आर्यभट्ट बरोबर असावा असे आहे. इथे मला जरा गंमत वाटते कलियुग हे जर आधी चार व नंतर त्यात बदल करुन ५ वर्षांचे ठरवले गेले तर ह्या सीलाला काय अर्थ उरतो? सत्य, द्वापार, त्रेता आणि कली हे चार युग एकानंतर एक येतात तर त्या बुधवारी केवळ कलीयुग सुरु झाले व चार वर्षांनी संपले इतकेच काय तो अर्थ होऊ शकतो. मग मॅक्स मुलर आर्यांचा काळ इ स पूर्व १५०० च्या आधीचा नाही असे लिहतो त्याचा मेळ ह्या पूर्ण थेअरीशी लागत नाही. तसेच ऋग्वेद व रामायण हे एकाच काळात होते हा कयास ह्यांची पण जोड अजिबात लागत नाही.

बरं ह्या सर्व विद्वानांत राम कोण हे युद्ध लागलेले असताना ते सीतेला काही अंशी दुर्लक्षित ठेवतात. जनकाचा उल्लेख अनेकदा वाजसनेयी साहित्यात आला आहे. याज्ञवल्काला उपदेश जनक राजा देतो व जनकाचा दरबारात याज्ञवल्क उपनिषदांवर अनेकदा बोलतो, चर्चा करतो असे कित्येक उल्लेख आहेत. जनक हा विदेह ह्या जनपदाचा राजा. विदेह हे जनपद आजच्या उत्तर भारतात येते. हा भूगोल लक्षात घेता ह्या विद्वानांनी एकतर राम सीता लग्न झाले नाही असे तरी म्हणावे वा सीता हा भाग प्रक्षिप्त ( व पर्यायाने संपूर्ण रामायणच प्रक्षिप्त आहे) असे तरी मांडावे. पण त्यात थोडी मेख अशी आहे की रामायणात वर्णन केलेली मिथीला नगरी कुठे आहे ते लक्षात येत नाही. शतपथ ब्राह्मणात गंडकी नदी ही कोसला आणि विदेह ह्यांची सीमारेषा असे आले आहे. कोसला मध्ये जर राम होता असे मानून चालले तर तीन रात्री प्रवास केल्यावर मिथिलानगरी यायला पाहिजे, पण तसे होत नाही. तसेच जनकनगरही सापडत नाही, पण महाभारतातही मिथिलेचा उल्लेख आहे. म्हणजेच एकतर एखादे मोठे शहर तिथे निर्माण झाले वा तेथील लोक दुसरीकडे गेले. असे होण्याची शक्यता माझ्यामते जास्त आहे कारण बुद्धकालात पण वैशाली राज्यातील लोकांना विदेही म्हणत. उदाहरणार्थ अजातशत्रूला वैदेही असे म्हणले गेले आहे तसेच सीतेला वैदेही म्हणले गेले. विदेह इथे जनकाने राज्य केले, हा भाग जुळून येतो. म्हणजेच वैशालीतच कुठेतरी मिथिलानगर असावे.

रामायणातील अयोध्येचे वर्णन असे आहे. - अयोध्या नगरी ही शरयू नदीच्या तिरी असून सात योजने लांब व तीन योजने रुंद आहे. विशाल असे रस्ते ह्या नगरीतून जातात. नगरीतील वसाहती वेगवेगळ्या प्रकारच्या असून सात मजले असणारी घरं पण ह्या नगरीत आहे. पण नेमके आजच्या अयोध्येला ही मापं लागू होत नाही. ती केवळ अर्धीच भरतात. म्हणजे एकतर नगरीचे मोठेपण सांगण्यासाठी आकड्यांचा विपर्यास केला असावा किंवा ही नगरी मोठी होती व नंतर कालौघात ती लहान झाली असे म्हणावे. कुषान सम्राट कणिष्काने ह्या नगरीवर राज्य केले. त्याने इ स पूर्व मध्ये अयोध्या नगरीचे नाव बदलून साकेत हे ठेवल्याचे व परत नंतर ते अयोध्या झाल्याचे अनेक संदर्भ बौद्ध व हिंदू साहित्यात आढळतात.
महाभारताचा भूगोल म्हणजेच आजच्या भारताचा भूगोल. पुरातत्वखात्याने बी बी लाल ह्यांचावर उत्खननाची जबाबदारी सोपवली. महाभारतातील शहरे म्हणजे हस्तिनापूर इथे त्यांचा टीमने उत्खनन केले असता त्यांना इ स पूर्व ११०० ते ८०० असणारी अनेक भांडी सापडली, जर महाभारताच्या शहरात काही सापडू शकते तर रामायणाच्या का नाही? म्हणून १९७५ च्या आसपास अयोध्येचा आजूबाजूच्या १५ ठिकाणी उत्खनन सुरु झाले तिथे ह्यापेक्षा जुने काही सापडले नाही. जी काही भांडी सापडली ती महाभारतकालीनच होती. लाल एके ठिकाणी म्हणतात पृथ्वीने आम्हाला रामायणकालीन एकही वस्तू सापडू दिली नाही, कदाचित तिची ती इच्छाच नाही. रामायणात शिवधनुष्याचे व एका रथाचे वर्णन आहे. त्यानुसार त्या रथावर ते धनुष्य ठेवले होते. प्रत्येक बाजूला आठ चाक असणारा तो लोखंडी रथ होता. तो वजनाला खूप जड असल्याकारणाने ओढण्यास अत्यंत जड होता. उत्खनना दरम्यान त्यांना अशा रथाचा एखादा अवयव मिळेल असे वाटले होते. पण तसे काही झाले नाही. ते म्हणतात "कदाचित खरी कथा छोटी असेल, पण प्रत्येक शतकानंतर ही कथा वाढतच गेली व त्यात अनेक गोष्टी घुसडल्या गेल्या असाव्यात." ह्याच लाल ह्यांनी सरस्वती आहे ह्याचे उत्खनन केले आहे व सरस्वती नव्हती हे खोडून काढले आहे.

बरेच जण राम ही केवळ कल्पना वा वाल्मिकीच्या डोक्यातील एक पात्र आहे असे लिहतात पण त्यास काही अर्थ नाही हे वालीवधावरुन दिसून येते, रामाला फक्त चांगला पुरुष असे दाखवायचे असते तर वालीवध झाला नसता, वाली किष्किंधापर्वात रामाला म्हणतो, तू क्षत्रिय आहे तरी असे का केलेस? मग जर रामाला सगळे चांगलेच दाखवायचे असले असते तर वाल्मिकींनी हा प्रसंगच आणला नसता. इतर ठिकाणी महान दाखवून इथे कमी दाखवणे ह्याचे प्रयोजन काय? म्हणून राम खरा असावा. तसेच दुसरे उदाहरण म्हणजे राम जेंव्हा सीतेला शोधत किंष्किंधेत येतो तेंव्हा सुग्रीव त्याला सांगतो की वाली हा इंद्रपुत्र आहे. पुढे जैमिनीय ब्राह्मणात इंद्र, इंद्राणी (पत्नी) व तिचे मुल वॄषाकपि असा उल्लेख आहे. मी माझ्या दुसर्‍या लेखात वॄषाकपिचा उल्लेख हनुमानाबद्दल केला होता. पण जैमिनीय ब्राह्मण वालीला पण वॄषाकपि म्हणते. मोठा, महाकाय शक्तीशाली वानर असा अर्थ अभिप्रेत असावा. कदाचित अनार्य देवांना आर्यांनी तेंव्हा आपले मानायला सुरुवात केली होती. दुसर्‍या लेखातील माझी शबर नावाच्या पुत्राची कथा, तश्याच पद्धतीचा एक पुत्र म्हणून वॄषाकपि असण्याशी शक्यता आहे. तसे दुसर्‍या लेखात मी हनुमानाला पण वृषाकपि मानले गेले आहे असेही लिहीले. ह्या तिन्हीचा संदर्भ लावला तर राम होता ह्याच निष्कर्षाप्रत मी येतो. पुरावे नाहीत. उत्खनन चालू आहे, काहीतरी निश्चितच मिळेल.

अशातच हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ ह्या पुस्तकाचे लेखक श्री नेमाडे ह्यांची मुलाखत वाचली, ते म्हणतात हिंदूंना कृष्ण कोण आहे हेच माहीत नाही, कारण एकूण तीन कृष्णांचा उल्लेख आहे. पहिला उल्लेख छांदोग्य उपनिषदात कॄष्णाला अंगीरसाचा शिष्य म्हणून आहे, दुसरा, विश्विकाचा मुलगा ऋषी कृष्ण, तर तिसरा यमुनेच्या किनार्‍यावरील कृष्ण. केवळ छांदोग्यात कृष्णाचा उल्लेख झाला म्हणून नेमाडे कृष्णाबद्दल भरपूर बोलतात. तो फक्त एक सारथी होता असे त्यांचे म्हणने आहे. वस्तूस्थितीत जर तो खरच सारथी असेल तर नेमाडे विसरतात तो एक मुद्दा मी मांडू इच्छितो. हा सारथी कृष्ण, महाभारतातील गीता सांगून, महाभारत घडवून आणू शकतो म्हणजे तत्कालिन वैदिक संस्कृतीत जातीला महत्व नव्हते हे लगेच लक्षात येते. कृष्णाचा मुद्दा मी इथे आणला कारण रामाच्या बाबतीत देखील परिटाची अशीच एक कथा. एक धोबी एका राज्याचा व त्याचा पत्नीच्या शीलावर संशय घेऊ शकत होता म्हणजे परत एकदा जात समान होत्या, तर परिट हे त्याचे कर्म होते असा निष्कर्ष निघतो, तसेच तत्कालिन समाजात काही राज्यात लोकशाहीला महत्व होते असा एक उपनिष्कर्षही त्यातून पैदा होतो.

कृष्णाची कथा इथे आणण्याचे दुसरे कारण म्हणजे याज्ञवल्काचा जनकासोबत संवाद चालताना (बृहदारण्यक उपनिषद) जनक, याज्ञवल्काला विचारतो, "परिक्षित कुठे गेला?" गमंत अशी ही आपण रामायण हे महाभारतापेक्षा जुने असे मानतो, तर मग जनकाला हा प्रश्नच का पडावा? कारण परिक्षित हा अभिमन्यूचा मुलगा, अर्जूनाचा नातू. इथे थोडी कालगणनेमध्ये गफलत दिसते. मग बी बी लाल ह्यांना आणखी जुने पुरावे कसे सापडतील? कारण परिक्षित ते राजा जनक असे ४ पिढ्यांचे साधारण १०० ते १२० वर्ष अंतर मानले तर अयोध्येत सापडलेली महाभारतकालीन भांडी बरोबर ठरतील व रामायण हे महाभारतानंतरचे आहे असा निष्कर्ष निघेल. बुद्धकालीन विदेही म्हणणे मग बरोबर लागू पडते. कारण तो काल ६७५ बि सी होईल व बुद्ध लगेच त्या नंतरचा म्हणून ती संबोधने लागू होतील. पण मग असे झाले तर ऋग्वेदात महाभारताचे उल्लेख का नाहीत? कारण महाभारत आधी झाले असले तर उल्लेख, कथा यायला हव्या, ह्याचे उत्तर सापडत नाही.

एक गमतीशीर पुरावा किंवा पुराव्याकडे नेणारे साधन म्हणजे हनुमान जी अंगठी सीतेला दाखवतो ती. त्यावर राम हे नाम कोरले आहे. त्या काळात सर्व अंगठ्या ह्या केवळ गोल असायच्या, उत्खननात ज्या ज्या गोष्टी अंगठ्यासदृष्य म्हणून सापडल्या आहेत त्या सर्व गोल वेढ आहेत, फक्त हडप्पाला सापडलेली अंगठी ही आजकाल खडा घालायला जी जागा असते तशी सापडली आहे. त्यावर नाव लिहता येते.
सीता वनवासात जाते तेंव्हा राम, लक्ष्मण वल्कलं नेसतात पण सीता तिचे रेशमी वस्त्र तसेच ठेवते असा उल्लेख आहे. रावण सीतेला पळवून नेताना देखील तिने पिवळे रेशमी वस्त्र घातल्याचा उल्लेख आहे. रावण दहनाच्या वेळी रावणाला रेशमी वस्त्र घातल्याचा उल्लेख आहे. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात ह्या रेशमी वस्त्राचा उल्लेख चिनापट्ट असा आहे, म्हणजे चिन मधून आयात केलेले वस्त्र. म्हणजे एकतर रामायणकाळी चीनशी व्यवहार होता असे तरी मानावे लागेल (महाभारतकाळी होताच) वा ह्या वस्त्राच्या कथा (रेशमी कारण राजाचे म्हणून) ह्या प्रक्षिप्त आहेत असे तरी मानावे लागेल. माझा कल ही वस्त्र कथा प्रक्षिप्त असावी असा आहे.

वाल्मिकीने ह्या कथा ऐकून मग लिहीले असा विचार केला किंवा कोणी विद्वान मांडतात तसे एकापेक्षा जास्त लोकांनी रामायण लिहीले असे मानले तर मात्र ह्या विविध कथा, हे वस्त्र, अंगठी इ. गोष्टी प्रक्षिप्त असण्याचा संभव व थोडा काल्पनिक असण्याचा संभव नाकारता येत नाही. तसेच बाल कांड व उत्तर कांड हे नंतरचे लेखन आहे हे आता मानले गेले आहे त्यामुळे मूळ रामायण कथेतही अश्या अनेक गोष्टी येऊ शकतात. शिवाजी केवळ ३०० वर्षांपूर्वी होऊन गेला, पण त्याचा बाबतीतही दंतकथा आहेत, येशूच्या बाबतीतही अनेक दंतकथा आहे त्या रामाचा बाबतीतही होऊ शकतात.

वरील मते माझी आहेत असे नाही तर ते विविध मतप्रवाह आहेत. वर दिलेल्या मतप्रवाहांपेक्षा आणखी किती तरी मतप्रवाह आहेत. जिथे खोडण्याजोगे वाटले तिथे मी माझी टिप्पणी पण केली आहे. लेखाचा कॅनव्हॉस खूपच मोठा आहे. अजूनही मी ह्यावर मिळेल ते साहित्य वाचत असतो, इथे ते सर्वच देणे शक्य नाही. हा लेख आधीच खूप मोठा होत चालला आहे त्यामुळे इथे थांबतो.

राम आहे का नाही, होता का नव्हता, इ स पूर्व का नंतर ह्यामुळे फरक पडू नये. तत्वज्ञानात इश्वराचे रुप सांगितले आहे. सर्वच माणसं इश्वर असल्यावर राम कुठलाका असो, तो राम आहे इतकेच माझ्यासाठी पुरे आहे.

महाभारतकालिन भारत नकाशा.

Mahajanapadas.jpg

* किरात ह्यांचा उल्लेख वेदात अनेकदा एक जमात म्हणून आला आहे. किरात म्हणजे नेपाळी.
*http://en.wikipedia.org/wiki/Ramallah

वेदकालीन संस्कृती भाग १
वेदकालीन संस्कृती भाग २
वेदकालीन संस्कृती भाग ३
वेदकालीन संस्कृती भाग 5

प्रकार: 

भरततिल सर्व blood bank चे रिपोर्ट तपासा , आणि युरोप देशातूनही रिपोर्ट मागवावे. आजही युरोपात बी + सहज मिळत नाही. आणि आपल्या देशात ओ मिळत नाही हि वास्तुस्तीथी आहे....आता या वर काय सांगू ?

माझ्याकडे इतिहास व धर्मावर आधारित ५००० हून अधिक दुर्मिळ पुस्तके आहेत कोणाला पाहिजे आसेल तर[वाचायला] संपर्क करा >>>
मला हवी आहेत. उदा मनु स्मृती सारख्या इतर १६ स्मृती आपण द्याल का? तसेच मराठीत अभ्यंकर शास्त्र्यांची काही पुस्तके रुपांतरीत आहेत. मला खूप दिवसांपासून वाचायची आहेत, ती येथील लायब्ररीमध्ये मिळत नाहीत.

मी तुम्हास कसा संपर्क करायचा, आपण कुठे राहता? तसेच इतकी पुस्तके ( ५००० हुन जास्त दुर्मिळ ) आपण जतन कशी करता ह्यावर एखादा लेख लिहून माहिती द्या ही विनंती मात्र करेन. कारण धुळ, पुर, पाणी झालचतर घरातील सदस्यांचा राग Happy ह्या वर इतर अनेक गोष्टींपासून आपण रक्षण करत आहात तर कोणते व कसे इंडेक्सिक, कुठले सॉफ्टवेअर, ठेवण्याची पद्धत ह्या सर्वांवर आपल्याकडून मोलाची माहिती मिळेल ह्यात वाद नाही.

>>> उद्या ... हनुमान व राम यांचा संबंध

अमरसाहेब,

आपण श्रीराम व श्रीहनुमान यांच्यावर लिहीणार आहात म्हणून आपले लेखन प्रसिध्द करण्याआधी माझी एक कळकळीची व नम्र विनंती आहे. आपल्या लिखाणातून आपण कोणाच्याही धार्मिक श्रध्दा व भावना दुखावल्या जाऊ नयेत याची काळजी घ्यावी.

मास्तुरे श्रद्धा इतक्या तोकड्या असतात का? की त्या कोणी काही लिहले म्हणून दुखावल्या जातात? त्यामुळे तुमच्यादृष्टीने अश्रद्ध लिहले तरी फरक पडून नये.

शिवाय अमरसाहेब मधुकर सारखे लेखकु नाहीत. ते संशोधक आहेत. ५००० पुस्तकांची चळत त्यांचाकडे आहे तर त्यातून ते अभ्यासपूर्वक असेच काही लिहतील असे वाटते. त्यांची काही प्रसिद्ध (जनमानसात असलेली) मी त्यांना विचारली आहेत, ती ते इथे लिहतीलच. शेवटी संशोधकाचे लिखान आणि पुस्तकं वाचून केलेले लिखान ह्यात फरक असावाच.

प्रिय केदार, यांसी ...
नमस्कार मी संशोधक नाही मी ३६ वर्षाचा आहे, माझा बिल्डिंगचा व्यवसाय आहे परंतु मला वाचनाची आवड आहे , विशेषकरून संत साहित्याचा अभ्यास करणे मला फार आवडते ,
संत साहित्यावर माझी ४ पुस्तके आहेत आता नवीन 'उभारिले देवालय ' हे ६०० पाणी लवकरच येईल ..
पुढे
पुरातन वस्तुसंशोधन शास्त्राच्या आधारे असे दाखविता येते कि मृत मानसांना पुरून त्यावर तांबड्या रेतीचे ढीग करणाऱ्या लोकांची संस्कृती.[कुर्गन] रज्जू-मुद्रित मृत्पात्रे निर्माण करणारी संस्कृती आणि त्रीपोलजेसंस्कृती या तीन संस्कृतीशी मूळ आर्यांचा संबंध आला होता.त्या ख्रिस्तपूर्व चौथ्या सहस्त्रकाच्या पहिल्या अर्थात उरल-अल्ताय प्रदेशाच्या आजूबाजूला अस्तित्वात असल्याचा पुरावा पुरांवास्तुसंशोधन शास्त्राने सिद्ध केला आहे. कुर्गन संस्कृती मुलता आर्यांची आहे असा भक्कम पुरावा आहे. मूळ आर्यांत प्रेत पुरण्याची पध्दत होती.वेगवेगळया मानासांना वेगवेगळा खड्डा खणून त्यात देह पुरायचा,वर मातीचा ढीग रचून त्या भोवती लाकडी कुंपण घालायची.अशी पध्धत होती . याचा उल्लेख ऋग्वेदात आहे [ ऋ. १०. १८. ४,१३ ].
किरघीज प्रदेशात अशी मृतांची थडगी किंवा कुर्गन आढळतात .हे नावाश्म युगातील आहेत.मूळ युरो भारतीय भाशिकांचे युध्ध्परशु उत्तर किर्घीज प्रदेशात उत्खननात सापडले आहे . तात्पर्य मूळ आर्य भाषेला विशिष्ट स्वरूप प्राप्त झाले ते उत्तर किर्घीज प्रदेशात.म्हणजेच वैदिक लोकांचा संबंध ज्यांच्यापर्यंत पोचू शकतो त्यांच्या सांस्कृतिक पूर्वजांचे वसती स्थान असे आपण म्हणू शकतो .
पुढे उत्तर किर्घीज प्रदेशातून बल्ख प्रदेशाकडे प्रयाण या टोळ्यांनी केले . हेच पुर्वार्य होय.पुढे हे तीन विभागात विभागले, मितानी , हुरीयान,इ.लोकांचे पूर्वज मध्याशियात गेले.प्राचीन इरानींचे पूर्वज इराणकडे आणि वैदिक भारतीयांचे पूर्वजांनी वृत्रहा आणि पुरंधर अशा इंद्राच्या नेतृत्वाखाली सप्त सिंधू प्रदेशावर विजयाक्रमण केले.
सैंधव संस्कृती हि वैदिक आर्याहून भिन्न होती.त्या लाकांतील मूर्तीपूजा , लेखनकला,त्यांच्या संस्कृतीतील दिसणारा अश्व यांचा अभाव महत्वाचा पुरावा म्हणून मांडता येतो.आर्य जर मूळ भारतीय असतील तर हडप्पा संस्कृतीचे लोक कोठून आले ?उत्खानातून त्यांच्या प्रदीर्घ रहिवासाची कल्पना येत.मग त्या काळी आर्य काठून आले? वेद वाड.मयात हाडप्पियन संस्कृतीचा व नगर संस्कृतीचा उल्लेख नाही.
संदर्भ = १
[ आर्यांचे मूळ वसतीस्थान_- डॉ.रा.ना.दांडेकर, पुणे विद्यापीठ पत्रिका(ज्ञानखंड),१९५८;ऋ.आ. सं.वि ]

भारतीय चरित्र कोश

भारतीय संस्कृतीकोश

ऋग्वेद मराठी भाषांतर

विश्वकोश

[ इं.इ.;हि.ध. ; हि. वि. को.]

नक्की , मास्तुरे
धार्मिक भावना दुखणार नाहीत उलट त्या अधिक लोकाभिमुख होऊन सत्य जगापुढे येईल याची काळजी घेतली जाईल .....धन्यवाद .
आपण सारे समजदार भारतीय आहोत हीच आपली स्वताची ओळख असली पाहिजे. जनमानसातील ओळख अहंकाराचा पारा वाढवून मानवाला मोहित करत असते ....

सत्य असत्यासी मन केले ग्याही !
मानियेले नाही बहुमता !! संत तुकाराम

संत साहित्यावर माझी ४ पुस्तके आहेत आता नवीन 'उभारिले देवालय ' हे ६०० पाणी लवकरच येईल >> वा वा अभिनंदन अमरसाहेब. आपले इतर चारही पुस्तके व हे नविन पण आपण मायबोलीच्या विक्री विभागात विक्रीस ठेवावेत हा माझा आग्रह कारण संपूर्ण जगात (मराठीजनात) प्रसिद्धी व विक्री दोन्ही होईल.

मी संशोधक नाही वाचनाची आवड आहे >> हे वाचून दिलासा भेटला कारण मग चर्चा आता दोन वाचकात (अभ्यासकात) होईल व माझे मुद्दे मांडताना मला अवघडल्यासारखे होणार नाही.

आता मुद्द्याचे.

१. BMAC भागातील प्रेतांसारखी काही प्रेते भारतात पण सापडली आहेत हे मान्य, पण काही प्रेतं सापडली म्हणून सर्व गृहितक बदलतात का? BMAC मध्ये एक डोके कापलेला घोडाही पुरलेल्या अवस्थेत मिळाला आहे. ( अश्वमेध?) पण त्याच वेळेस तिथे मिळणारी पॉटरी ही भारतात मिळणार्‍या वस्तूंपेक्षा कालावधीत नविन आहे. इंद्राचे आपले उदा. थोडे बरोबर करतो, इन्द्राला पुरन्धर हे विशेषन मिळालेले आहे, पुरांचा ध्वंस केल्यामुळे. सिव्हिलाईज्ड डेमन्स ह्या पुस्तकात मालती शेंडगे वरील भुमिका मांडतात, तसेच रोमिला थापरही बर्‍यापैकी ह्याच मताचा आहेत.

२. हे आर्य कोणत्या काळी भारतात आले? सनावली वगैरे मिळेल का?

३. ऋग्वेदात सरस्वतीचा उल्लेख आहे. बाल्ख किंवा आपण म्हणता त्या प्रदेशात पण सरस्वती नदी आहे का? असल्यास कुठे होती? की सरस्वती हा भाग वेदात नंतर घुसाडला व तिला भारतीय बनवले?
आणि महत्वाचे
४. एकाच भुगागात दोन वेगळ्या संस्कृती नांदू शकत नाहीत का? नांदल्या तर त्या एकमेकांपासून भिन्न असू शकतात का? हे सो कॉल्ड आर्य व मोंहजदाडो, हडप्पावासी एकमेकांपासून भिन्न असू शकतात का?
हा प्रश्न तुमच्यासाठी आहे पण माझ्या बाजूचे उदाहरण म्हणून मी आजची भारतातील गाव व शहरातील संस्कृती व काही अदिवासी भाग जीथे आजही स्त्रिया अर्धनग्न असतात व आजही आपण सर्व (ते अदिवासी व आपण) भारतात राहतो, हे मांडू इच्छितो.

५. मी अवेस्ता पूर्ण वाचली नाही, प्रथम चरण वाचले आहे. त्यात अहुरा माझदा नावाचे योद्धे आहेत. अवेस्ता इराणात लिहली गेली, जर आर्य देव इन्द्र, वरुण वगैरे तिथूनच आले तर ते अहुरा माझदांचे शत्रू का? तिथून पळून वगैरे आले का?

ढीग करणाऱ्या लोकांची संस्कृती.[कुर्गन] रज्जू-मुद्रित मृत्पात्रे निर्माण करणारी संस्कृती आणि त्रीपोलजेसंस्कृती या तीन संस्कृतीशी मूळ आर्यांचा संबंध आला होता.त्या ख्रिस्तपूर्व चौथ्या सहस्त्रकाच्या पहिल्या अर्थात उरल-अल्ताय प्रदेशाच्या आजूबाजूला अस्तित्वात असल्याचा पुरावा पुरांवास्तुसंशोधन शास्त्राने सिद्ध केला आहे. >>>>

म्हणजे मुळ आर्य ख्रिस्तपूर्व साधारण चौथ्या शतकाच्या नंतर भारतात्(पूर्ण) मायग्रेट वा इन्वेजन व्हायला सुरुवात झाली असे आपणास म्हणायचे आहे का? पुरावे मिळतील काय? माझ्यामते तो पर्यंत भारतात महाजनपद निर्माण झाली होती, हे शक्य दिसत नाही. बौद्ध पण तो पर्यंत (ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकात) होऊन गेला होता.

केदार, interesting लेख!

खरे तर मला अजुनही राम खरेच होता काय की कल्पना होती असेच वाटते.
मी वाचलेले की south indians हे द्रविड आहेत व आर्य हे नॉर्थ मध्ये सेट्ल झाले. पुस्तकाचे नाव नाही आठवत.

अमर,

रक्ताबद्दल म्हणाल तर कधीचा रिपोर्ट आहे हा? म्हणजे वर्षे? O Rh + इतकेही कमी नाहीयेत असे मी २००५ च्या एका डोनर बॅकेचा रीपोर्ट वाचलेला. कमी आहे ती AB+ असे वाचल्याचे आठवतेय.

केदार जी , आपले मुद्दे खुलासे करतो
मुद्दा १ प्रेत सापडले म्हणजे भारतीय आर्यपूर्वज ते होते,हे गृहीत धरायला जागा आहे. गृहीत बदलत नाही तर द्रविड हे आर्य पूर्वीचे भारतीय आहेत का हे पाहायचे आहे.
मुद्दा २ राम केव्हा नासिकला आला ? तारीख सांगता का ? हे प्रश्न विषय वळवणारे आहेत .
मुद्दा ३ भारतात येण्या आगोदर बल्ख प्रदेशात मार्गक्रमण केल्याचे मी म्हटले आहे . सरस्वती नदी बद्दल मी काही लिहिलेच नाही.
मुद्दा ४ मुळात वेद अपौरुषेय नाही हे आता जगातील अभ्यासक अभ्यासून सांगत आहे. ऋग्वेदाचा रचना काळ आर्य सिंधू नदीच्या परिसत आपली वस्ती करण्याच्या कालखंडातील आहे.आपण ज्या प्रमाणे श्रीरामचंद्रास अजूनही आठवतो त्या प्रमाणे ऋग्वेदाच्या काळात आर्य बाल्ख प्रदेशातील पूर्वजांच्या आठवणी विसारतील का ??
मुद्दा ५ [अ] मी तेच म्हणतो हाडप्पियन, मोहोन्जोदोडो संस्कृती हि आर्य पूर्वीची भारतीय आहे.शिवाय आचार, विचा,, कला , साहित्य हि वेगळे आहे... [ ब ] दोन भिन्न संस्कृती नांदत नाही म्हणूनतर आर्य अनार्याचे युद्ध होत होते, ऋग्वेदाच्या सुरवातीला युद्ध वर्णनावरतीच ऋचा अधिक आहेत...
मुद्दा ६ आजची संस्कृती हि आर्य अनार्य मिश्रीत संस्कृती आहे. नसेल तर वेद, ब्राह्मणग्रंथ,या मध्ये देवता व उपासना भिन्न का ? त्यात राम कृष्ण का नाहीत. आहेत तर अग्निपुजा इंद्रपुजा होम हवन इ.
मुद्दा ७ आदिवासी भागात आजही गणेश,हनुमान,म्हस्कोबा,भैरोबा.हे वेशीवर पुजले जातात. आजही हनुमानाची शेंदरी दगडी प्रतिमा रामाशिवाय स्वतंत्र पुजली जाते.
मुद्दा ८ जत्रा,उत्सव, उरूस,यात्रा अशा चालीरीती ब्राह्मण अथवा वेदात आहेत का ??
मुद्दा ९ मला सांगा टिळक अनुयाही आणि गांधी अनुयाही एकमेकांचे शत्रू का ??? आहो शत्रुत्त्व हे भावा - भावातच जास्त दिसून येईल.
मुद्दा १० स्थलांतर अनेक कारनांनी होत असते .
मुद्दा ११ उरल-अल्ताय प्रदेशातून भारतात ख्रिस्तपूर्व १५०० ते ३००० कालावधी पकडला भारतात आल्यावर त्या संस्कृतीचे विकासाचे टप्पे चालू झाले .तसे इराण इ ठीकानीही विकास झाला असणार . १००% स्थलांतर कधीच होत नाही. नाहीतर पाकिस्थानात सर्वच मुसलमान स्थाईक झाले असते. मुद्दा असा आहे . कितीही विकास झाला तरी प्राचीन परंपरेची छाप असतेच ना ? या नियमाने बाल्ख , इराण ,भारत इ ठिकाणी सापडलेले उत्खननातील वस्तू व वेद ब्राह्मणग्रंथ या मधील वर्णन्केलेळूं वस्तू यांमध्ये अनेक साम्य आहेत. अग्नी,सोम ,देवता उपासना, होम हवन सामुग्री इ. हे सर्व हाडप्पियन मावहोन्जोदाडो येथे सापडले नाही..
मुद्दा १२ अहो उत्खननात संपलेले अवशेष ख्रिस्पूर्व ४०० असे मी म्हटलो ,त्याआधी बुद्ध होऊन गेला तर काय फरक पडतो . आर्य तर अगोदरच आले होते . अवशेष सापडले ते त्यांच्याही पूर्वजांचे जे तेथेच स्थिरावले होते.
मुद्दा १३ आर्य सपाट प्रदेशांमध्ये वस्त्या करत आणि मूळ भारतीय उंच डोंगरात [ दस्यूपुरांमध्ये ] प्रदेशात राहत होते. शिवाय बाल्ख, इराण इ.ठिकाणांच्या उत्खानातील अवशेष हे सपाट प्रदेशातीलच आहे. कारण उत्खनन हे सपाटप्रदेशातील आहे.

एकाच भुगागात दोन वेगळ्या संस्कृती नांदू शकत नाहीत का?>> विचार करण्याजोगे आहे. ते ही गोडीगुलाबीने नांदतात. प्रत्यक्ष पाहिलेले आहे. आज पेपर मध्ये बातमी आहे कि दक्षिण सायबेरिया मध्ये
कझाकिस्तान च्या जवळ ४००० वर्षे जुनी आर्यन वसाहत - त्याचे अवशेष सापड्ले आहेत. जाणकार माहिती द्या.

प्रिय, केदारजी
माझी पुस्तके मी कधीही विकली नाहीत ती पंढरपूर वारीत वारकऱ्यांना मोफत वाटली.सुमारे ४ पुस्तकांच्या २०००० प्रती..... कारण त्या अभंग व पसायदान यावर विश्लेषण होते.
उभारिले देवालय . हे सामाजिक दृष्टीकोतून लिहिले आहे. ते पण मोफत देण्याचा प्रयत्न करीन. आम्ही सर्व स्वताच्या पायावर नीट उभे असणारे २३ जन मिळून हे कार्य करतो .. महाराष्ट्रातील २७३ खेडेगावांना आम्ही भेट देवून प्रबोधनाचे काम केले आहे. याची माहिती व माझ्या ५००० पुस्तकांची सूची मी facebook ------ [ amar.dangat ] वर देईल कारण मायबोलीवर एवढे फोटो लोडिंग होत नाही ...

धन्यवाद ,

अमर दांगट

आजची संस्कृती हि आर्य अनार्य मिश्रीत संस्कृती आहे. >> अहो हे व वर लिहलेले इतर मुद्दे तर मी ही लेखात मांडले आहे आहे. मागील चार लेखात दस्यु, हनुमान, शिव, कृष्ण ह्या देवांबद्दल बर्‍यापैकी उहापोह केला आहे. मालिकेची सुरवात करतानाच मी देखील आजची संस्कृती ही परिवर्तन झालेली संस्कृती आहे, परिवर्तन नसेल तर कुठलाही समाज मृत होतो असे लिहले आहे. शिवाय मोंहजदाडो, लोथल, कालिबंगन अनेक बाबतीत प्रगत होते हे तर मी ही म्हणत आहेच.

संस्कृती मिश्रन आहे हे तर गृहित आहेच, पण आर्य कोण हा प्रश्न उरतोच असे नाही का वाटत?

अग्नी,सोम ,देवता उपासना, होम हवन सामुग्री इ. हे सर्व हाडप्पियन मावहोन्जोदाडो येथे सापडले नाही..
>> शिवलिंगासदृष्य मूर्ती , योगा करणारा पुरुष हे मात्र सापडले आहेत,
कालिबंगन, राखिगरकी इथे होम करण्याच्या साईटस मिळाल्या आहेत. आपण नविन संशोधन वाचावे. राखीगरकी, भिरन्ना ह्या वैदिक सरस्वती साईटस आहेत.

आणखी एक मुद्दा माझ्याकडून
माझ्या मते मुख्य पुरावा कुंकू लावलेली स्त्री व बांगड्या घातलेली स्त्री हा मुख्य पुरावा आहे. जो मी दिलेला आहे. जर ही संस्कृती आर्यांच्या बाहेरुक आक्रमनाची असली असती तर आजही हिंदू स्त्रिया कुंकू लावताना दिसल्या नसत्या. आक्रमकांनी समुळ नाश केला (माउंड ऑफ डेड) तर मग त्यांनी ही संस्कृती (कुंकू लावने) का स्विकारली असती? हा प्रश्न उरतो असे तुम्हाला वाटते का?

तसेच रामाची डेट नाही, आर्यांची. मी आपल्या "आर्य बाहेरुन आले" ह्या मुद्यावर बोलत आहे. राम कुठला, कोण हे वरिल लेखात मांडले आहे. रामाबद्दल नाही तर एकुणच आर्यांबद्दल चर्चा चालू आहे असे मला वाटले. (आपल्या प्रतिसादावरुन) कारण तुम्ही मुळ आर्य व लोकल ह्यांचा संगम ख्रिस्तपूर्व ४०० मध्ये आले असे लिहले आहे, जे मला पटले नाही. त्याचे कारण वर दिले आहे.

सरस्वती नदी बद्दल मी काही लिहिलेच नाही. >> ऋग्वेद अभ्यास करताना सरस्वतीला ओलांडून पुढे कसे जाता येईल? कारण एकुण ५० वेळापेक्षा जास्त ऋग्वेदात सरस्वतीचा उल्लेख आहे. आर्यन इन्वेजन झाले तर सरस्वती कुठली हा मुख्य प्रश्न उरतो, जर त्याचे उत्तर मिळाले नाही, देता आले नाही तर कुठलीही थेअरी ही परत थेअरी राहते. मी माझ्या लेखात सरस्वतीबद्दल विसृत मांडून पुरावे दिले आहेत. जर आपल्या दृष्टिने आर्य बाहेरुन आले असतील तर आपल्याला सरस्वती बाहेरची आहे हे सिद्ध करावे लागेल असे वाटते. जे अजूनही रोमिला थापर खूप प्रयत्नानंतर पण करु शकल्या नाहीत. तसेच दुसर्‍या एका नदिच्या उत्खननात आणखी काही संशोधक काय म्हणाले ह्याचे पुरावे देखील मी दिले आहेत. (अर्थात मी संशोधक नसल्यामुळे इतर पुस्तके वाचून) आणि त्यामुळे इथे मी सरस्वती मुद्दा उपस्थित केला आहे. (वेद बाहेरुन आलेल्या आर्यांनी लिहून आणले / लिहले तर सरस्वती, सिंधू कुठली हे प्रश्न आपोआप उत्पन्न होतात.)

ऋग्वेद अपौरुषेय नसले तरी काही फरक पडत नसावा. तसेच पुरुष ह्या शब्दाचा अर्थ आपण इथे घेता तसा वेदांमध्ये वा वैदिक साहित्यात अभिप्रेत नाही. पुरुष शब्दाबद्दल विवेचन मागे प्रतिक्रियांमध्ये झालेले आहे.

आर्य सपाट प्रदेशांमध्ये वस्त्या करत आणि मूळ भारतीय उंच डोंगरात [ दस्यूपुरांमध्ये ] प्रदेशात राहत होते. >> हडाप्पा वगैरे हे सपाट प्रदेशच होते. पण तेथील संस्कृती आर्यांची नव्हती हे तुम्हाला पण मान्य आहे.

त्या प्रमाणे ऋग्वेदाच्या काळात आर्य बाल्ख प्रदेशातील पूर्वजांच्या आठवणी विसारतील का ?? >> अजीबातच विसरणार नाहीत. मग जर वेद हे आर्यांचे साहित्य मानले तर त्यात त्या आठवणी कुठे आहेत? ज्या लोकांनी वेद निर्मीले त्यांनी एवढे मोठे स्थलांतर, एवढा मोठा प्रवास, आपली मूळ भूमी यांचे वर्णन नक्कीच केले असते. तसे ते कुठे आढळत नाही.

अग्नी,सोम ,देवता उपासना, होम हवन सामुग्री इ. हे सर्व हाडप्पियन मावहोन्जोदाडो येथे सापडले नाही. >> मुंबैच्या राजा छत्रपती संग्रहालयात त्या उत्खननात यज्ञकुंडे सापडल्याची नोंद आहे.

वैदिक / पूर्ववैदीक कालात भारतावर आक्र्मणे झाली नाहीत, वांशीक सरमिसळ झालीच नाही असे कोणीच म्हणत नाहिये. पण भारतावर एका प्रगत संस्कृतीने, जीचे नाव आर्य होते, आक्रमण करून येथील मागास संस्कृतीवर विजय मिळवला. ह्या तथाकथीत आर्य संस्कृतीने वेदांची निर्मीती केली आणि तिचे मूळ स्थान युरोपात होते. त्यामुळे युरोपीय हे आद्य प्रगत मानव ठरतात - हा जो सिध्दांत आहे त्याला आक्षेप आहे. हा सिध्दांत माझ्या सारख्या अनेकांना शालेय इतिहासात शिकवला गेला आणि माझ्यासकट अनेकांनी तो अनेक वर्षे खरा मानला. पण आज उपलब्ध असलेले अनेक पुरावे त्या सिध्दांताला छेद देतात. त्यामुळे ह्या सिध्दांतातली हवा पार निघून गेली आहे.

प्रिय, केदार
सरस्वतीच्या खोऱ्यात आजवरच्या अन्वेशनावरून तिच्या काठी अतिप्राचीन मानव असल्याचा पुरावा उपलब्द झाला आहे.तो खालील प्रमाणे......
१ हाक्र किंवा रावि संस्कृती [इ.पु.३८००-३२००]
२ पूर्व सिंधू [३२००-२६५०]
३ नागरी सिंधू[[२६५०-२२००]
४ उत्तर सिंधू [२०००-१४००]
या पाच सांस्कृतिक कालखंडापैकी हक्रा आणि पूर्व सिंधू लोकांजवळ घोडा नव्हता .त्यामुळे वैदिक आर्यांचा संबंध नाही.नागरी सिंधू संस्कृती हि आर्यांची असणे शक्य नाही.कारण आर्य संस्कृती ग्रामीण होती. राखी खापरे वापरणाऱ्या लोकांजवळ लोखंड होते.तेव्हा ती ऋग्वेदकालीन नव्हती.एकंदरीत उत्तर सिंधू हीच ऋग्वेदकालीन आर्य संस्कृती असण्याची शक्यता जोर पकडते.आणि ती ग्रामीण असून त्यांच्या जवळ घोडा , रथ आणि आरयाची चाके होती.
आर-३७ हि नागरी तर 'एच ;उत्तरर्सिंधू काळातील संस्कृती पैकी .'एच" दफन भूमी प्रकारची खापरे पंजाब हरियानात अने सरस्वतीच्या खोऱ्यात आजवरच्या अन्वेशनावरून तिच्या काठी अतिप्राचीन मानव असल्याचा पुरावा उपलब्द झाला आहे.तो खालील प्रमाणे......
१ हाक्र किंवा रावि संस्कृती [इ.पु.३८००-३२००]
२ पूर्व सिंधू [३२००-२६५०]
३ नागरी सिंधू[[२६५०-२२००]
४ उत्तर सिंधू [२०००-१४००]
या पाच सांस्कृतिक कालखंडापैकी हक्रा आणि पूर्व सिंधू लोकांजवळ घोडा नव्हता .त्यामुळे वैदिक आर्यांचा संबंध नाही.नागरी सिंधू संस्कृती हि आर्यांची असणे शक्य नाही.कारण आर्य संस्कृती ग्रामीण होती. राखी खापरे वापरणाऱ्या लोकांजवळ लोखंड होते.तेव्हा ती ऋग्वेदकालीन नव्हती.एकंदरीत उत्तर सिंधू हीच ऋग्वेदकालीन आर्य संस्कृती असण्याची शक्यता जोर पकडते.आणि ती ग्रामीण असून त्यांच्या जवळ घोडा , रथ आणि आरयाची चाके होती.
आर-३७ हि नागरी तर 'एच ;उत्तरर्सिंधू काळातील संस्कृती पैकी .'एच" दफन भूमी प्रकारची खापरे पंजाब हरियानात अनेक ठिकाणी सापडले.हि संस्कृती उत्तर सिंधू हे सिद्ध झाले आहे.अलीकडे हडप्पा येथे अमेरिकेतल्या क्यालिफोर्निया विद्यापीठाने दीर्घकाळ अत्यंत शास्त्रशुद्ध उत्खनन केले.त्यांना आढळलेले कालखंड
१ पूर्व सिंधू [३२५०-२६५०]
२ नागरी सिंधूची सुरवात [२६५०-२६ ००]
३ नागरी सिंधू [२६००-२२०० ]
४ नागरी सिंधूचा ऱ्हास [२२००-२००० ]
५ एच,दफनभूमी संस्कृती ]२०००-१७००]
वरील संस्कृतीचा कालनिर्णय अत्यन्त काळजीपुर्वक रेडिओ-कार्बन पद्धतीने केकेला आहे.प्रत्येक कालखंडातील कोळश्याचे नमुने घेऊन त्यांच्या तारखा पाठवण्यात आल्या आहेत.त्यामुळे आज जगभरात हा कालखंड प्रमाण मानला जातो. एकंदर पुराव्याने असे सांगता येते इ.पु. २२००-२००० च्या दरम्यान मध्य आशियातून किंवा इराण अफगानातून माणसाळलेला घोडा भारतात आला असावा.उत्तर सिंधू काळात तो सर्वत्र आढळू लागला.घोडा हा भारतीय प्राणी नाही .आजही घोडे बाहेरून आयात केले जातात.नागरी सिंधू काळात घोडा आसतातर तो मुद्रांकित,झाला आसता.सिंधू मुद्रांवर सर्वच प्राणी दिसतात फक्त घोडा सोडून .काही म्हणतात भारतातील घोडा व युरोपातील यात फरक आहे.भारतीय घोड्याला १७ बरगड्या आणि युरोपाती घोड्याला १८ असतात.साक्ष म्हणून ऋ.१.१६२.१८ या ऋचेचा देतात त्यात ३४ फसल्या असल्याचा उल्लेख आहे . परंतु नुकतेच आपल्याकडे रेससाठी अर्जेन्टीनावरून आयात केलेल्या घोड्यांना अशा १७ फासल्यांच्या जोड्या असे वृत्त आहे. क ठिकाणी सापडले.हि संस्कृती उत्तर सिंधू हे सिद्ध झाले आहे.अलीकडे हडप्पा येथे अमेरिकेतल्या क्यालिफोर्निया विद्यापीठाने दीर्घकाळ अत्यंत शास्त्रशुद्ध उत्खनन केले.त्यांना आढळलेले कालखंड
१ पूर्व सिंधू [३२५०-२६५०]
२ नागरी सिंधूची सुरवात [२६५०-२६ ००]
३ नागरी सिंधू [२६००-२२०० ]
४ नागरी सिंधूचा ऱ्हास [२२००-२००० ]
५ एच,दफनभूमी संस्कृती ]२०००-१७००]
वरील संस्कृतीचा कालनिर्णय अत्यन्त काळजीपुर्वक रेडिओ-कार्बन पद्धतीने केकेला आहे.प्रत्येक कालखंडातील कोळश्याचे नमुने घेऊन त्यांच्या तारखा पाठवण्यात आल्या आहेत.त्यामुळे आज जगभरात हा कालखंड प्रमाण मानला जातो. एकंदर पुराव्याने असे सांगता येते इ.पु. २२००-२००० च्या दरम्यान मध्य आशियातून किंवा इराण अफगानातून माणसाळलेला घोडा भारतात आला असावा.उत्तर सिंधू काळात तो सर्वत्र आढळू लागला.घोडा हा भारतीय प्राणी नाही .आजही घोडे बाहेरून आयात केले जातात.नागरी सिंधू काळात घोडा आसतातर तो मुद्रांकित,झाला आसता.सिंधू मुद्रांवर सर्वच प्राणी दिसतात फक्त घोडा सोडून .काही म्हणतात भारतातील घोडा व युरोपातील यात फरक आहे.भारतीय घोड्याला १७ बरगड्या आणि युरोपाती घोड्याला १८ असतात.साक्ष म्हणून ऋ.१.१६२.१८ या ऋचेचा देतात त्यात ३४ फसल्या असल्याचा उल्लेख आहे . परंतु नुकतेच आपल्याकडे रेससाठी अर्जेन्टीनावरून आयात केलेल्या घोड्यांना अशा १७ फासल्यांच्या जोड्या असे वृत्त आहे.

केदार
ऋग्वेदात रामचंद्रांचा उल्लेख आहे, असे तुम्ही म्हणता आहे हे अत्यंत खोटे आहे.
सीता जर जमिनिची उपमा आसेल तर रामाची पत्नी जमीन का ? मग लक्षुमनने आखलेली रेखा ओलांडल्यावर रावणाने हरण केलेली सीता कोण ??
परीट याने सीतेच्या चरित्रावर आक्षेप घेतल्यावर,' जात समान होती असा आपण निष्कर्ष कसा लाविला ??
त्याकाळी जात जर समान आसेल तर शबरीची बोरे रामाने खाल्ली परंतु लक्षुन आदी समाज तर विरोधाच करत होता .राम त्यांस अपवाद होता म्हणून जात-पात समान होती समजायचे काहीच कारण नाही. आपण काय ब्राह्मणांना केलेल्या दुष्कृत्यातून वाचवण्याचा प्रयत्न करता का ?? मागचे लेख आपले दुसऱ्यांच्या आधारावर टिकले परंतु पुढे आपण आपले विचार मांडताना डगमगताना दिसत आहे.. शेवटी आपण आपलेच मत खरे करणार ते पण पुराव्या अभावी , नाही तर ऋग्वेदातील रामाच्या संदर्भातील ऋचा दाखवाच ..मलाही इतिहास संशोधकांपुढे नवा विषय मांडता येईल,कि रामाचे वर्णन आता ऋग्वेदात सुद्धा आहे..
तुका म्हणे १८ हि पुराने ! नाश केली शब्दज्ञाने !!

>>ऋग्वेदात रामचंद्रांचा उल्लेख आहे, असे तुम्ही म्हणता आहे हे अत्यंत खोटे आहे.
मग खरे काय आहे, तुमच्यामते?

एक राष्ट्रपुरुषाला देवाची उपमा देवून वैदिक धर्मात ओढणे दुसरे काय ?? ऋग्वेदात कोठेही रामाचा उल्लेख नाही मी १६ वेळा त्याचे अध्ययन केले आहे.

माझे सोडा ज्याने अभ्यास केला त्याला विचारा, ऋग्वेदात कोठे राम कृष्ण उल्लेख आहे.
श्री रामचंद्र सर्व भारतीयांची देवता आहे. ती वैदिक देवता नव्हे .

एखादा विषय राष्ट्रप्रेमी होताच तो वैदिक कालखंडात नेऊन वैदिक बनवायचा आणि इतिहासाची पाने श्रद्धेवर सोडायची, म्हणजे तर्क वितर्क सुरु......

>> ऋग्वेदात कोठेही रामाचा उल्लेख नाही मी १६ वेळा त्याचे अध्ययन केले आहे.
>> माझे सोडा ज्याने अभ्यास केला त्याला विचारा

Uhoh

आजची बाबासाहेब आंबेडकर चळवळ त्याचाच पुरोगामी परिणाम आहे.
नाहीतर रामायणात क्षत्रिय कुलाचे व ब्राह्मण यज्ञ यागाचे एवढे वर्णन कशासाठी ????

>> ज्याने अभ्यास केला त्याला विचारा,
म्हणूनच तुम्हाला विचारले. आता तुम्हीच असे म्हणत असाल तर मग
>>१६ वेळा त्याचे अध्ययन केले आहे.
याला काय अर्थ उरतो?

मुद्द्यांची गल्लत करत आहात असे वाटते आहे. केदारचा लेख हा ऐतिहासिक मागोवा स्वरुपाचा आहे.
तुम्ही कर्मकांडांविषयी बोलत आहात.

पटत नसेल तर सोडा काय फरक पडतो आजच्या समाजाला ?
१८६० मध्ये ब्रिटिशांनी पीनल कोड आणून कायदा एका चौकटीत आणला त्यामुळे वैदिक पंडितांचे भयं वाटण्याचे कारण नाही ,कारण त्यांना कायदा हातात घेऊन ज्ञाय देता येत नाही . जो संत ज्ञानेश्वरांच्या बाबतीत दिला होता.[आई वडिलानला देहांत प्रायश्चित देऊन ]...

ऋग्वेदात रामचंद्रांचा उल्लेख आहे, असे तुम्ही म्हणता आहे हे अत्यंत खोटे आहे.
>> शक्य आहे साहेब आपण म्हणता त्याप्रमाणे माझे खोटे असण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण मी हा श्लोक इथेच दिला होता.

भद्रो भद्रया सचमान: आगात, स्वसारं जारो अभ्येति पश्चात्।
सुप्रकेतैर्द्युभिरग्निर्वितिष्ठन, रूशद्र्भिर्वर्णेरभि राममस्थात्॥ (ऋग्वेद 10-3-3)

सीता जर जमिनिची उपमा आसेल तर रामाची पत्नी जमीन का ? मग लक्षुमनने आखलेली रेखा ओलांडल्यावर रावणाने हरण केलेली सीता कोण ?? >> अहो तुम्ही लेख पुन्हा एकदा नीट वाचा हो. प्रस्तुत लेखात मीच "पण ऋग्वेदातील सीता व्यक्तीवाचक नसली तरी रामाची पत्नी नाही हे कसे सिद्ध होणार ह्याचा विसर मात्र पडलेला दिसतो" हे लिहले आहे ह्याकडे आपण दुर्लक्ष केले असे दिसते.

खरे तर राम कोण आहे ह्याबाबत असलेला गोंधळ मी मांडलेला आहे. ही अनेकविधमत माझी नाहीत. Happy तसे तर्कतिर्थांची तर अजिबात नाहीत.

आपण काय ब्राह्मणांना केलेल्या दुष्कृत्यातून वाचवण्याचा प्रयत्न करता का ? >> ब्राह्मणांचा काय संबंध? आणि कसा? ब्राह्मण इथे मध्येच कुठून आले. आपल्या मनातून का? की माझ्या जोशी आडनावावरुन आपण हे विधान केले?

रामाबद्दल आपण अधिकारी आहात काय? असल्यास एक वेगळा, सविस्तर लेख येउदेत. निदान राम होता, सीता होती हे तरी इतर जनतेला कळेल आणि मला अत्यंत आनंद होईल , मी आपलं राम एत्तदेशीय होतो हे मनात गृहित धरुन प्रुव्ह करण्याच्या मागे होतो, तेवढाच आपला हातभार ह्या विषयाला.

मागचे लेख आपले दुसऱ्यांच्या आधारावर टिकले परंतु पुढे आपण आपले विचार मांडताना डगमगताना दिसत आहे >>> Lol अहो इतिहास लेखन हेच मुळात दुसर्‍यांचे आधार घेउन केले जाते असे नाही का वाटत? अन्यथा मी कुठे गेलो आहे ऋग्वेदाच्या काळात किंवा लुप्त सरस्वतीच्या शोधात.

बाकी आत्ता पर्यंत आपण एकही ठोस पुरावा दिला नाही, केवळ शाब्दिक करामती. आता आपण पुरावे द्यावेत. आपणाकडे विपुल ग्रंथसंपदा असल्यामुळे पुरावे, पुस्तके, लिंका, चित्रे देण्यास काहीच अडचण नसावी.
बायदवे आपण सरस्वती वरचा माझा लेख वाचलात का? हे पाहा इथे आहे .. http://www.maayboli.com/node/18762

आणि मी मांडलेल्या मुद्यांचे काय झाले, त्यावर सविस्तर उत्तर (अर्थात पुराव्याने) देणार का? नविन मुद्दा उपस्थित (रामाचा) करण्या आधी आपण त्यावरील उत्तर द्याल का?

राम वैदिक होता हे तुमच्या मनात आहे ते तुम्ही मांडत आहात. मी लिहलेले नीट वाचा.

काहींना एकाचे पटत नाही त्यांना अनेकांचे पटते ... मझ्या अध्यानाला या समाजात काय महत्व ?
कारण मी धर्मवेडा केवळ शब्दावर विश्वास ठेवणारा नाही. शिवाय काहींना आपला बाप जरी दारू मास खाताना दिसला तरी तो देवच वाटतो.ते दुसऱ्याच्या शब्दावर का विश्वास ठेवणार ??

आपण १६ वेळा कशाचे अध्ययन केले? आणि अध्ययन केले असेल तर ते प्रतिक्रियेतून का दिसत नाही? खरेतर आपल्यासारख्या संतसाहित्याच्या अभ्यासकास असे रागात येणे उचित नाही असे वाटत नाही का? मग कशाला सतांची वचने इकडे तिकडे लिहिता.

आपण इथ भरपुर मी युं मी त्युं लिहले पण मग दिसत का नाही?

आजची बाबासाहेब आंबेडकर चळवळ त्याचाच पुरोगामी परिणाम आहे. >> Lol त्याचा प्रस्तुतलेखाशी अन आर्यांशी काय संबंध?
बाबासाहेब आंबेडकर रामाबद्दल काय वदले आहेत हे मी वर लेखात लिहलेले वाचले का? तरी थोडक्यात आटोपले, अन्यथा पूर्ण पुस्तक मराठीत कॉपी पेस्ट करायचा विचार होता. Proud

आपल्याला वैदिकांचा त्रास दिसतोय. थोडं अवघडचं आहे हे दुखनं. काय करणार.

मीही पुरावे दिले आहेत तेही नीट तपासून पहा. ऋ १०.३.३ हा श्लोक रमणीय आर्थी आहे तो राम या आर्थी नाही .कारण रुग्वेद्कालात रामायण घडले नाही .... हे तर समजून घ्या .

Pages