मदतपुस्तिका

Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54

मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.

मी सुद्धा तुमच्या ग्रुप मधे आले आहे.
तरी योग्य ती मदत करावी......

कलावे,

मला पुण्यामधे घर\ जागा आणी किंमती विशयी माहिति कुठे मिळेल ?
या विशयी प्रश्ण कुठे लिहिता येतील?
- मनी.

The strength of a nation derives from the integrity of the home.

रंगीबेरंगीत लेखन करण्यासाठी काय करावे लागेल व कसे?

आपला,

विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.

मला फक्त नाव बदलता येइल का?

शीतल, तुम्हाला कुठले नाव बदलायचे आहे?
जर मायबोलीवरचे लॉग इन नेम बदलायचे असेल ते बदलता येत नाही. दुसरे नवीन घ्यावे लागेल.
जर तुम्ही लिहीलेली वैयक्तीक माहिती बदलायची असेल तर डाव्या बाजुला असलेल्या दुव्यांमध्ये माझे सदस्यत्व मध्ये जावुन संपादन या टॅब मध्ये वैयक्तीक असा दुवा आहे तेथे ती बदलता येते.

आजच "काव्य्धारा" मध्ये चुकुन अपुर्ण कविता टाकली--
डिलीट करत येईल का लगेचच?
अनघावन
---------------------------------------

ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

लिहिलेली पोस्ट डिलीट कशी करायची?

prr,
एकदा टाकलेले पोस्ट काढुन टाकायचे असेल तर पोस्टच्या संपादन
मध्ये जावुन मजकुर काढुन टाकता येतो. पण रिकामी पोस्ट तशीच दिसते.
अनघा,
त्या कवितेच्या संपादन मध्ये जावुन मग सगळ्यात खाली preview, submit, delete असे ऑप्शन दिसतील त्यातले डीलीट वापरुन ती कविता काढुन टाकता येईल

सर्व मायबोलीकरांना एखादं सामाजिक आवाहन कसं करायचं?

नूतन,

आपण "ध्यासपंथी पाऊले" या ग्रुपचे सभासदत्व घेउन तिथे नवीन धाग्यामध्ये आपले आवाहन लिहू शकता.

http://www.maayboli.com/node/2863

मी अमित तासगावकर माज्या शालेच्या माजी विद्यार्थ्यंच स्नेह-सम्मलेन आयोजित केलेल आहे, तरी माला तुम्ही कृपया करून त्यासाठी एक भाषण किवा एखादा कार्यक्रम सादरीकरनासथी मराठी स्पीच (speech) तयार करून दोन दिवसात द्यावी अशी माझी विनंती.

Lol
मग कोण लिहायला घेतय ते स्पीच, दोनच दिवस आहेत फक्त. Proud

ओह........ मदत समिति अशी ही मदत करते हे माहीत नव्हते.... Lol

एखाद्या विषयावर मायबोलीवर आजपर्यंत काय कय लिहिलं गेलंय, किंवा लिहिलं गेलंय की नाही हे Search करता येतं का?
- नूतन

मला सगळ्या मायबोलीकरांना विचारायचंय की बांबू - जतन व वस्तूनिर्मिती या विषयावर मराठीतून (किंवा नाईलाजाने इंग्रजीतून) पुस्तक उपलब्ध आहेका? कोणतं? कुठे? पुण्यात कुठे मिळेल? कोणी व्यक्ती हेमलकशाला, डॉ. प्रकाश आमटेंच्या प्रकल्पातल्या आश्रमशाळेच्या मुला-मुलींना शिकवायला येईल का?
तर असं काय काय मायबोलीवर कुठे विचारता येतं?
- नूतन

नूतन,
तुम्हाला मायबोलीवर काही शोधायचे असेल तर प्रत्येक पानाच्या खाली जो सर्च ऑप्शन आहे तो वापरता येईल. तिथे गुगल किंवा मायबोली असे पर्याय आहेत त्यातला योग्य तो वापरुन शोधता येईल.
पुस्तकाबद्दल माहिती 'वाचू आनंदे' या गृपवर विचारु शकता.

मॉड्स,नीड हेल्प नावाचा बाफ तयार करावा
----------------------
सरणार कधी रण प्रभू तरी, हे कुठवर साहू घाव शिरी|| दिसू लागले अभ्र सभोती, विदीर्ण झाली जरी ही छाती, अजून जळते आंतर ज्योती, कसा सावरु देह परी || होय तनूची केवळ चाळण , प्राण उडाया बघती त्यातून, मिटण्या झाले अधीर लोचन, खङग गळाले भूमीवरी

website ची लिन्क देता येत नाही आहे...
मजकूरात image किंवा link द्या.>> Link वर टिचकी मारली तरी पुर्ण URL दिसते.
कुठे चुकतेय?

prr,
लिंक देण्यासाठी खालील टेक्स्ट वापरा, फक्त मधल्या स्पेस काढुन टाका.
< a href="http://www.maayboli.com">Maayboli< / a>

अधिक माहिती साठी प्रत्येक प्रतिसादाच्या बॉक्स खाली More information about formatting options अशी लिंक आहे ती बघा.

माझ्या मित्राला मायबोलीवर सभासद व्हायच आहे. काही केल्या जमत नाही. आपली मदत हवी आहे. द्याल ना.

हेमंत पुराणिक
तुमच्या मित्राला सभासद होण्यात नक्की काय अडचण येतेय हे सांगु शकाल का? कदचित त्यांनी निवडलेले वापरायचे नाव (user login name) आधीच कोणी घेतले असेल तर त्यांना सभासद होण्यात अडचण येवु शकते.

मी माझा फोटो आय डी सोबतचा अपलोड केला, रीफ्रेश केला पण तरी बदलत नाहेये. Sad

मी पडित सातावळेकर यान्चे "रामायण ' कोथे विकत घेता येते का याचा शोध घेत आहे. कोणाला माहीती असल्यास जरुर कळ्वा.

LeanJedi,
तुम्ही हा प्रश्न "माहिती हवी आहे" या गृपवर विचारु शकता. हा घ्या त्याचा दूवा http://www.maayboli.com/node/4458
इथे प्रश्न विचारण्यासाठी तुम्हाला या गृपचे सदस्य व्हावे लागेल.

पल्ली,
कधी कधी असे होवु शकते. या आधीपण बर्‍याचजनांना हा अनुभव आलाय. यावर कधीकधी चालणारा उपाय म्हणजे लॉग आउट होऊन परत लॉग इन करणे, नवीन ब्राउसर उघडणे, कुकीज क्लिअर करणे इ.इ.

माझे युजर नेम बदलता येइल का? सध्या ते न्याति आहे पण मला 'ज्ञाती' हवे आहे. ( सुरुवातीला मला हे लिहिताच येत नव्हते). धन्यवाद.

जुन्या मायबोलीवरचं लेखन आपण इथे आणणार आहोत का? म्हणजे तसं लगेचच्या भविष्यात शक्य आहे का?
मी एक ललित लिहिलं होतं - भक्तासाठी. ती धृव कहाणी होती. ती इथे परत दिली तर चालेल? हा चुकीचा पायंडा होईल असं वाटलं तर नक्की नको.

दाद,
नजीकच्या भविष्यात तरी जुन्या हितगुजमधल्या गुलमोहरातलं साहित्य नवीन मायबोलीवर हलवण्याचा विचार नाही आहे. तसंही ते साहित्य तिथे उपलब्ध रहाणार आहे. तुम्हाला जर ते इथे आणायचं असेल तर आणू शकता.

मी अपलोड केलेला फोटो दिसत नाहीये माझ्या संपादनात Sad

पल्ली, 'अवलोकन' मध्ये दिसेल. 'संपादन' टॅबवर लिंक दिसेल फोटोची.

Pages