अव्हाकाडो सॅलड

Submitted by मेधा on 22 August, 2010 - 11:39
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

भिजवून, मीठ घालून शिजवलेले काबुली चणे वाटीभर ( गार्बान्झो बीन्स ) .
एक मध्यम लाल कांदा, बारीक गोल चकत्या कापून
एक अव्हाकाडो - गराचे १/२ इंच चौकोनी तुकडे करून
४-६ काड्या कोथिंबीर बारीक चिरून.
एक थाय बर्ड ( किंवा इतर तिखट ) मिरची अगदी बारीक चिरून
एका लिंबाचा रस
मीठ,
एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल

क्रमवार पाककृती: 

अव्हाकाडो च्या तुकड्यांवर थोडा लिंबाचा रस शिंपडुन हलक्या हाताने मिक्स करावे.
कांदा, चणे, मिरची, कोथिंबीर एकत्र करून त्यावर उरलेला लिंबाचा रस घालावा. ऑ ऑ व मीठ घालावे. शेवटी आव्हाकाडो चे तुकडे घालावेत.

वाढणी/प्रमाण: 
२-३ लोक
अधिक टिपा: 

यात आपल्या आवडीप्रमाणे बरेच घटक घालता येतील. मी कधी कधी शिजवलेले चिकन चे तुकडे घालते. कोथिंबीरीऐवजी पुदिना घालते. ऑऑ वगळून वसाबी मेयोनेज + रेड वाइन व्हिनेगर घालते.
तसेच राजमा , व्हाइट बीन्स, एडामामे बीन्स , लिमा बीन्स यातलं काही घालते.

माहितीचा स्रोत: 
स्वत:चे प्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users