वेदकालीन संस्कृती भाग ४

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

राम कोण आणि कुठला होता, ह्यावर अनेक तर्क आणि वाद आहेत. राम नव्हताच इथपासून राम अयोध्येचा की भारतभू बाहेरचा अश्या अनेक थेअरी सध्या सापडतात. राम हा आर्यांच्या पूर्वेकडील (व भारतातील दक्षिणेकडील) आक्रमणाचे प्रतिनिधीत्व करतो व त्याने वैदिक संस्कृती लंकेपर्यंत नेली असे काही लोक मानतात.

राम प्रकरण मी थोडे सविस्तर मांडणार आहे. कारणे दोन. एक म्हणजे ऋग्वेदात ह्या सर्वांचा उल्लेख पहिल्या काही ऋचांमध्ये आहे, म्हणून ऋग्वेदकालाशी निगडित आहे. दुसरे म्हणजे रामायणातून बराच भूगोल लक्षात येतो. पुढे महाभारत युद्धात हा विस्तृतरितीने आहे, पण रामायणाला आधार मानून आपण रामाचे अस्तित्व दिसते का हे पाहू.

हल्लीच लंकेला जोडणारा रामसेतू पाडण्यास काँग्रेस सरकारने परवानगी दिली आहे. केंद्रसरकारने दाव्यात असे मांडले होते की राम अस्तित्वात असल्याच्या कुठलाही पुरावा नाही, तसेच हाच तो रामसेतू आहे ह्याला कुठलाही पुरावा नाही, पुराव्याअभावी हे पाडण्यात यावे. कारण त्यामुळे लंका व भारत ह्या दोन देशात नौकानयन सुखकर होईल. व्यावहारिकदृष्ट्या हे जरी बरोबर असले तरी भारतातील हिंदू जनतेच्या भावना ह्यामुळे निश्चितच दुखावल्या गेल्या.

वाल्मिकी रामायण हे एकुण २४,००० श्लोकांचे आहे. सात कांडात, एकुण ५०० प्रकरणांचा विस्तार एवढे साहित्य एका रामायणात आहे. विविध राजे, तत्कालिन संस्कृती, एकमेकांसोबतचे राजकारण, समाज, आचार विचार ह्यांचा समग्र समूह म्हणजे रामायण. राम खरा आहे की नाही, पुरावा आहे की नाही ह्यात मला रस नाही तर ह्या काव्यात रस आहे कारण त्यात तत्कालीन समाजाचे प्रतिबिंब उमटल्याशिवाय राहत नाही. भारतीय संस्कृती त्यातून पुरेपूर दिसते त्यामुळे रामायण हे वेदकालीन संस्कृती वा इ स पूर्व संस्कृती मधील फार मोठा मैलाचा दगड ठरते. बाल, अयोध्या, आरण्य, किष्किंधा, सुंदर, युद्ध आणि उत्तरकांड हे ते सात कांड आहेत. पैकी बाल व उत्तर हे मुळ लेखनाचा भाग नाहीत असे आता तज्ज्ञ मानतात.
रामायण हे वाल्मिकी ऋषींनी लिहीले व ते ह्यासर्वाचे साक्षीदार होते असे आपण मानतो. पण त्याच बरोबर वाल्याचा वाल्मिकी हे राम नाम उलटे जपल्यामुळे (मरा मरा) ऋषी झाले अशी कथाही आपल्याला सांगितली गेली. ते प्रस्तावनेत म्हणतात, " मी ब्राह्मण कुळात जन्माला आलो, पण किराताकडे* वाढलो, क्षुद्र कामे केल्यामुळे क्षुद्र झालो, क्षुद्र स्त्री सोबत विवाह केला, तिने माझे पाप नाकारले व त्यामुळे राम नामाच्या जपामुळे मी परत ब्राह्मण झालो." ह्यावरुन प्रश्न येतो की वाल्मिकी हे खरच समकालिन होते? का त्यांनी ही कथा होऊन गेलेल्या राजाबद्दल आपली कल्पनाशक्ती लढवून मांडली आहे? मुळात हा वाल्मिकी एक होता की अनेक? तैत्तरिय ब्राह्मण ज्याने लिहले त्याने वाल्मिकी हा व्याकरणकार होता असा उल्लेख केला आहे, तर महाभारतातील उद्योग पर्वात वाल्मिकीचा उल्लेख गरुडाचा वंशज म्हणून आलेला आहे, व त्याला सुपर्ण वाल्मिकी असे उल्लेखलेले आहे.

पूर्ण रामायण मी इथे उद्धॄत करणार नाही तर त्यातील काही भाग, त्या त्या विद्वानांचे मत खोडण्यासाठी मी लिहणार आहे.

दशरथाला पुत्र होत नव्हता म्हणून त्याने एक यज्ञ केला. त्यावेळी शॄंग ऋषी तिथे उपस्थीत होते. अश्वमेधानंतर (वधानंतर, अश्वमेध म्हणजे घोड्याचा राणीशी संग नव्हे तर मेलेल्या अश्वासोबत राणीने एक रात्र घालवायची असते, अश्वाच्या तोंडावर कपडा असतो व त्याच खोलीत राणीला थांबायचे असते.) मुख्य राणी कौसल्या हिने एक रात्र घालवली. मग दुसरे दिवशी पायसदान मिळाले यथावकाश चार पुत्र प्राप्त झाले.

डॉ बाबासाहेब आंबेडकर रिडल्स इन हिंदूइझिम ह्या पुस्तकात लिहतात, राम हा पायसदानाने नाही तर शृंग ऋषि पासून झालेला पुत्र आहे कारण कौसल्या एक रात्र घोड्यासोबत राहिली, तिथे हे ॠषी होते, त्यामुळे राम हा शृंगाचा मुलगा आहे असे ते माणतात. ह्यात तथ्य मानले तर बाकी तीन पुत्रांचे काय ह्यावर मात्र आंबेडकर मौन बाळगतात. नियोग पद्धत ती महाभारतात होती, तर त्यापूर्वीच्या रामायणकालात असेल असे गृहित धरुन चालले ह्यातून लगेच असे सिद्ध होते की तो कदाचित नियोग पद्धतीने झाला. म्हणजे स्त्री पुरूषातील संबंध पुत्रप्राप्ती ह्या विषयात प्रगत होते असे मानावयास जागा उरतेच! थोडक्यात एक खोडायला गेले तर त्यातून दुसरे दुर्लक्षीलेले पण तत्कालिन समाजास मागे न नेता पुढे नेणारे सत्य समोर येतेच. इतर हजारो प्रवाद लक्षात घेऊन इथे खोडण्यापेक्षा रिडल्स पुस्तकाप्रमाणे राम हा आर्य राजा, सिता त्याची बहिण आणि रावण हा बुद्ध राजा होता. बुद्ध रावणाला पराभूत करुन रावणाला ब्राह्मण म्हणून घोषित केले गेले वगैर वगैरे, थोडक्यात रामाचा काल हा बुद्धानंतरचा आहे असे लेखकाचे म्हणणे आहे. तसेच हे युद्ध राम रावण न होता त्याला वैदिक बुद्ध धर्म युद्ध अशी झालर लेखकाने दिली आहे. रामाची सिता बहिण असे ते म्हणतात पण ती बहिण कशी झाली ह्यावर मात्र कुठलाही प्रकाश टाकलेला नाही. हे मांडण्यासाठी त्यांनी दशरथ जातक कथा (नं ४६१, ५४० ) ह्याचा आधार घेतला आहे. मात्र वरील जातक कथांचा उल्लेख त्यांनी केलेला नाही पण त्यातील कथा भाग घेऊन ते हे पुस्तक लिहतात. वेगवेगळ्या जातक कथांमध्ये रामाचा उल्लेख आहे. पण ह्या सर्व कथांमध्ये रावणाने सीतेचे हरण केल्याचा व राम रावण युध्दाचा उल्लेख नाही. तो का नसावा हे उघड आहे कारण रावणाला बुद्ध राजा मानले गेले आहे. जातक कथा ह्या इसाप निती सारख्या कथा आहेत. त्या सर्वच खर्‍या नाहीत. तसेच सीतेशिवाय रामाच्या अनेक बायका होत्या असे आंबेडकर म्हणतात. पण त्या कोण व कशा ह्यावर काहीही प्रकाश त्यांनी टाकला नाही. .

रामाचा जन्म पायसदानाने झाला हे आपण मानतो. पायस ही पद्धत नियोग पकडली तरी तिला तत्कालिन समाजात मान्यता होती व तसे प्रकार रुढ होते. केवळ ह्यावरुन हिंदू देव चुकीचे व धर्मच कसा गंडलेला आहे हे रिडल्स ह्या पुस्तकात मांडले आहे. कृष्णाबद्दल तर त्याहून हिणकस भाषा वापरली आहे. इथे रामजन्म प्रकरण देणे भाग होते म्हणून ह्या थेअरीचा उल्लेख केला इतकेच. हे मत खोडण्यासाठी हा लेख नाही, तर असेही मत आहे व त्याचा इथे उल्लेख करणे आवश्यक होते इतकेच महत्व आंबेडकरांच्या त्या पुस्तकाला. आंबेडकरांच्या पुस्तकाला दुर्गाबाई भागवतांनी उत्तर दिले होते असे वाचण्यात आहे. त्यामुळे ह्या प्रकरणाला इथेच सोडून पुढे वळू.

ऋग्वेदात रामाचा, दशरथाचा व सीतेचा उल्लेख आहे, पण सीतेचा उल्लेख हा पत्नी म्हणून नाही, खरेतर सीतेचा उल्लेख व्यक्तीवाचक नाही, ती जमीनीला दिलेली उपमा पण आहे. पेरणी केलेल्या जमिनीसंबंधी हा उल्लेख आला आहे. ह्यावरुन काही लोकं राम आणि सीता एकमेकांशी संबंधित नव्हते असाही शोध लावतात. पण ऋग्वेदातील सीता व्यक्तीवाचक नसली तरी रामाची पत्नी नाही हे कसे सिद्ध होणार ह्याचा विसर मात्र पडलेला दिसतो. ऋग्वेदातील पहिल्या मंडलात अनेकदा रामाचा उल्लेख आढळतो.
रामायणात राम अनेक असुरांशी, राक्षसांशी लढतो व त्यांना पराजीत करतो. त्यांचे वर्णन करताना त्यांना असुर, दैत्य, दानव, राक्षस, यक्ष अशी नावं नेहमी आढळतात.

असुर नावाची फोड केली असता असे दिसते.
सुराचा एक अर्थ देव म्हणजे जे देव नाहीत ते असुर.
सुराचा दुसरा अर्थ मद्य म्हणजे जे मद्य पीत नाहीत ते असुर. हा अर्थ काढताना मी थोडे वैचारिक स्वातंत्र्य घेत आहे, कारण अनेक यज्ञात सुरा अर्पण करताना सुरा कशी तयार करायची ह्याचे वर्णन आलेले आहे.
ऋग्वेदातील एका ऋचेत (१०|९३|१४) रामाचे वर्णन करताना रामाला असुर ही सज्ञा पण दिली आहे. इथे कदाचित मी जो अर्थ काढत आहे (मद्य न पिणारा) असे म्हणून त्याची सुस्ती केली असावी वा पहिल्या अर्था प्रमाणे जो देव नाही तो असुर राम.

हे असुर मोठे रंजक प्रकरण आहे असे दिसते. आता थोडे लक्ष दिले तर महाभारतात कृष्णाचा मामा, कंस तो असूर आहे. प्रल्हादाचा पिता हिरण्यकश्यपु हा देखील असूर म्हणवला गेला आहे. म्हणजे असूर आणि देव ह्यात नातेसंबंध आहे असा सरळ अर्थ निघतो बरेचदा तर पिता पुत्र, मामा-भाचा असेही हे नाते आहे. म्हणजे वैदिक विचारांना विरोध करणारी काही राजे असूर असा तिसरा भाषाशास्त्राशी संबंध न असणारा अर्थ मला जास्त बरोबर वाटतो.

हे असुर मानव होते का नाही ह्यात देखील विद्वानात मतभिन्नता आहे. डॉ स्टेन कोनो हे ते मानव नव्हते असे म्हणतात, F E Pargiter ह्यांना त्यांना कोण मानावे हे कळत नाही, तर भांडारकर म्हणतात असीरियन संस्कृतीमधील लोक म्हणजे असूर. वैदिक लोकांशी त्यांचे भांडणे होत होते आणि असुर हे पण मानवच होते, पण हे असूर अतिशय रानटी असल्याकारणाने वैदिक लोकांनी साहित्यात अजून थोडे भडक लिहले असण्याचा संभव मुळीच नाकरता येणार नाही.

मागील लेखाच्या एका प्रतिक्रियेत मी देव आणि असुर हे भाऊ होते असेही मांडले आहे. तांड्य ब्राह्मण आणि शतपथ ब्राह्मणाप्रमाणे देव आणि असूर हे प्रजापती पासून निर्माण झाले, देव लहान, असुर मोठे. ऋग्वेद, रामायण, महाभारत इ अनेक पुस्तकात देवासुरांचे युद्ध व त्यांचे वर्णन येतात, त्यावरुन काही तज्ञ असुर म्हणजेच हडप्पा, मोहंजदाडो, लोथल इ ठिकाणी राहणारे होते व त्यांचे ऋग्वेदिक लोकांशी लढे झाले असेही मानतात. पण ह्या सर्व थेअर्‍या आर्यन इन्वेजन झाले हे मानून आहे, व नविन इतिहास आता आर्यन इन्वेजन झाले नाही असे मांडू पाहत आहे.

आणखी एक महत्वाचा दाखला आर्य आणि असूर ह्यांचा संदर्भात आहे तो म्हणजे वैवस्वत मनुच्या ( इ स पूर्व ३२०० ) समकालिन असणारा असुर राजा वृषपर्व होता. त्याला शर्मिष्ठा नावाची मुलगी होती. तिने आर्य राजा ययातिशी लग्न केल्याची कथा सर्वांना माहित असावी. हा ययाति हा पुरुरव्याचा पणतू होता. त्याने देवयानी ह्या शुक्राचार्यांच्या मुलीशी पण लग्न केले आहे. शुक्राचार्य हे दानवांचे गुरु म्हणून प्रसिद्ध आहेत. ह्या ययातिला पाच मुलं झाली, पुरू, यदू, द्रह्यु, अनु आणि तुर्वसू. हे पाचही मुलं पुढे पाच नद्यांकाठी राहायला गेले. ह्या पाच नद्या म्हणजेच सिंधू संस्कृतीमधील पंचनद. म्हणजे ही मुल आर्य + असूर अश्या संगंमातून आलेली आहेत.

शतपथ ब्राह्मणातील एका ऋचेमुळे ज्यात म्लेंच्छ असा उल्लेख आहे. डॉ मिश्रा असे मांडतात अकिडियन साम्राज्यातील लोक सिंधूसंस्कॄतीला मेलूहा म्हणत. हे मेलूहा आणि म्लेंच्छ जवळ जाणारे आहे व मेलूहा म्हणजे हडप्पा असे ते मांडतात, त्यावरुन म्लेंच्छ म्हणजे हडप्पावासी असे ते मांडतात. त्यांचे व्यवहार मेलूहा, मेगन आणि दिलमान साम्राज्यांशी होते. मेगन म्हणजे आजचे ओमान, दिलमान म्हणजे बहारिन तर मेलूहा हे कुठेही सापडत नाही, म्हणून मेलूहा म्हणजेच हडप्पा असा त्यांचा कयास आहे. त्यांचा मताला अनुमोदन मालती शेंडगे ह्या "सिव्हिलाईज्ड डेमन्स" ह्या पुस्तकात देतात.

राक्षस हा शब्द रक्ष पासून तयार झाला असे काहींचे म्हणने आहे. रक्ष म्हणजे रक्षा करणे. समुद्र मंथनातून जे काही निर्माण झाले त्यांना असूर आणि देव ह्यांचात वाटण्या होण्याआधी ज्या लोकांना त्याची रक्षा करण्यास सांगीतले ते म्हणजे पण राक्षस असाही एक प्रवाह आहे.

रावणाला नेहमीच ब्राह्मण म्हणून पाहिले जाते. तो ब्रह्म कुळ उत्पन्न आहे असेही म्हणलेले आहे. ब्रह्म रक्ष कुळाचा रावण, त्याचा पुढे राक्षस झाला असण्याची शक्यता जास्त आहे. ह्याला पुष्टी म्हणून हा प्रसंग पाहा. हनुमान जेंव्हा लंकेत प्रवेश करतो तेंव्हा त्याला ब्रह्मघोष ऐकू येतो असा उल्लेख सुंदर कांडाच्या १८ व्या सर्गात आहे. ब्रह्मघोषाच्या उल्लेखामुळे ब्रह्म रक्ष म्हणजे कदाचित स्मृतींद्वारे (पठण) ब्रह्मसुत्रांचे रक्षण तो समुदाय करत असावा.

लंकेचे जे वर्णन रामायणात केले आहे, ओळीने घर, मोठ मोठ्या बागा, हमरस्ते, मोठी घर, वाडे वगैरे ह्यावरुन लक्षात येते की रावण हा एक प्रतिभाशाली, विचारवंत व श्रीमंत राजा होता. युद्धतंत्र त्या नगरीत विकसीत झाले होते, एक राजा व त्याचे राज्य म्हणून लंका निश्चीतच प्रगत होती, हे कुणाही अभ्यासकाला सहज लक्षात येते. ह्या नगरीचे वर्णन हडप्पा संस्कृतीशी मिळते जुळते आहे.

राजा राम, देव राम आणि भुगोल.

अ‍ॅलेक्झॅडंरच्या भारताच्या स्वारीचे वर्णन एरियन ह्या इतिकासकाराने लिहून ठेवले आहे. तो प्रत्यक्ष अ‍ॅलेक्झॅडंर बरोबर होता. पूर्ण रात्र वाळवटांतून प्रवास करुन आल्यावर अचानक त्याला नदिकाठी एक मोठे गाव दिसले. त्या गावाचे नाव होते रामबाकिया. एरियन लिहतो की अ‍ॅलेक्झॅडंरला वाटले की एकेकाळी हे खूप मोठे शहर असावे, त्या गावातून एक नदी वाहते, तिचे नाव अघोर नदी. त्या आजूबाजूचे लोक हे ओरिटेय नावाच्या टोळीचे होते असा उल्लेख आहे. गावात एक विहिर आहे, त्याचे नाव ""रामचन्द्र की कुप" असे आहे. बाजुलाच एक जुनी गुहा आहे. त्यातील एकात हिंगुला देवीचे तर दुसर्‍यात कालीचे मंदिर आहे. येथूनच रामाने वनवासाला जायला सुरुवात केली असे तिथे मानले जाते. राम आधी गोरख टॅन्कला गेला, तिथून पुढे टोंगाभेरा व तिथून पुढे हिंगुलजला गेला. आजही ह्या भागात रामाची जत्रा भरते. हिंगुलजला शक्ती पिठ आहे असे हिंदू लोक मानतात. हिंगुलज कराचीपासून उत्तरेस २०० किमी आहे. इ स पूर्व ३२६ मधिल राम वा राम कथा अस्तित्वात असल्याचा हा एक मोठा पुरावा आहे

प्रख्यात वैय्याकरणी पाणिनीचा काल हा इस पूर्व ३५० मानला गेला आहे. काहीजन इस पूर्व ५०० आहे असेही गृहित धरतात. पाणिनीने सिंधू, वर्णू, मधुमत, किष्किंधा, कंबोज, काश्मिर, सलवा, गांधार, उरसा, दरद आणी गंधिका ह्या स्थानांचा उल्लेख वेळोवेळी केला आहे. पैकी आपल्यासाठी महत्वाचे आहे ते किष्किंधा कारण रामायणात ह्या राज्याचा उल्लेख आहे. ह्या राज्याचा राजा वाली व नंतर सुग्रिव हे होते. काही इतिहासकार ह्या किष्किंधेचा शोध घेताना आजच्या बलुचीस्थानातील कलत हे गावं आहे असे मानतात. बलुचिस्थान हे आजच्या पाकीस्तानचे एक राज्य आहे. ह्यात गंमत एकच दिसते की जर कलत ते कराची असे अंतर घेतले तर ३०० किमी भरते म्हणजे रामबाग ते कलत हे अजून कमी भरणार. रामबाग जर रामाची जागा मानले तर कलत किष्किंधा म्हणजे केवळ १०० एक किलोमिटर मध्ये रामाला हनुमान भेटतो असे गणित येते. ह्या जागेलाच किष्किंधा का म्हणतात तर तिथे आजही हिंगोल नॅशनल पार्क आहे. किष्किंधेचे रामायणातील वर्णन ह्या जागेशी मिळते जुळते आहे. इच्छुकांनी कराची ते कलत गुगल मॅप्स वर बघावे. माझ्यामते हे अंतर फारच कमी भरते त्यामुळे राम येथील नाही असे अनुमान निघते. रामबाग कुठेही असू शकते, सिंकदराला जरी रामबाग हे गाव लागले तरी सिंकदर भारत पूर्ण उतरुन मध्ये आला नाही तो आजच्या अफगाण, पाक सीमेवरुनच परत गेला. पण त्या उल्लेखावरुन असेही अनुमान काढता येते की कदाचित राम त्या अघोर नदिच्या काठचा असावा.

रामाचे नाव घ्यायचे तर एक मजेशीर उल्लेख बघा. रामल्लाह नावाचे नाव आजच्या पॅलेस्टाईन मध्ये पण आहे.* ह्यावरुन राम पॅलेस्टाईन मध्ये होता असेही उद्या कोणी म्हणाले तर मला आश्चर्य वाटणार नाही. ह्यावरुन मी असा अंदाज बांधेन की राम हा राजा अन त्याची कथा तत्कालिन लोकात फार प्रसिद्ध होती व रामाला देव मानून त्याचे नाव भरपूर जागांना दिले गेल. थोडक्यात महाराष्टात प्रत्येक शहरात शिवाजी नगर व महात्मा गांधी रोड असे भाग दिसतात तेवढेच महत्व.

आणखी एक उल्लेख म्हणजे राम सिन नावाचा मेसोपोटेमियन राजा. वयाच्या तेराव्या वर्षी तो राज्यावर आला व त्याने बबिल म्हणजे बाबिलायन राजे ह्यांना हारवले. बबिल लोकांकडून दहा राजे लढत होते. एका थेअरी प्रमाणे राम सिन ह्याने त्या दहा राजांना हारवले. पर्यायाने दशानन रावण अशी जोड ते लावतात.

प्रख्यात भाषातज्ज्ञ डेव्हिड मॅकअल्पिन असे मांडतात की मेडिटरेनीयन समुद्राच्या आजूबाजूला असलेल्या झग्रोस येथील शेती आणि आजच्या पाकिस्तान येथील शेतीचा प्रकार सारखाच आहे, तत्कालिन इलाम राज्यातिल भाषा इलेमाईट ही द्रविडीयन डायलेक्टशी मिळती जुळती आहे. आणि कदाचित हेच इलेमाईट भारताच्या दक्षिण भागात पसरले. हा मला थोडा ओढून ताणून आणलेला संबंध वाटला कारण रामाला इतर थेअरीज आर्य म्हणतात, पण इथे द्रविड म्हणले जाईल. कलत (वर पाहा) येथील भाषा पण द्रविडीयन होती व नंतर देवनागरी झाले असे म्हणले गेले म्हणजे हा राम मध्यपूर्वेतून सरकून आजच्या हिंगोल नॅशलल पार्कात वनवास कालावधी घालवतो असा कयास मांडला तर थोडे अशक्यप्राय वाटते कारण मध्ये खूप मोठे वाळवंट आहे. रामायणात कुठेही इतके मोठे वाळवंट आलेले नाही. अफगाणिस्तानला आजचे नाव इ स १७४७ नंतर मिळाले आहे. त्या आधी त्याला भारतीय नावाने संबोधले जात होते कारण अफगाण, पाक हा भारतभू चा भाग होता. त्या आधी त्याचे गांधार, मद्र, बाल्हिक, अरट्ट असे भूभाग (विविध राज्य) होते. अ‍ॅलेक्झॅडंरच्या वरच्या उल्लेखात पण त्याने मोठे वाळवंट पार केल्याचा उल्लेख आहे. म्हणजे ही थेअरी पण परत एकदा थोडी कच्चीच ठरते असा निष्कर्ष मी काढत आहे.

राम हा धनुर्धारी राजा होता. त्याचे मुख्य शस्त्र हे धनुष्यबाण हे होते. वैदिक देव इंद्र, वरुण इ हे धनुष्य बाण चालवणारे देव नाहीत तर त्यांचे वेगवेगळे शस्त्र आहे. मेसोपोटेमिया व इजिप्त येथे सापडलेल्या खुणांवरून व चित्रांमध्ये बाणाचे चिन्ह पण आहे, तो पण अर्धचंद्राकृती असेलेला बाण. असे बाण सिथियन, बाबिलोन आणि मेडस ह्यांनी असिरियन्सच्या विरुद्ध केलेल्या युद्धात वापरले आहेत. त्यामुळे तो इराणी वा सुमेरियन संस्कृतीचा भाग आहे असे आणखी काही लोकं मानतात. रामानन अशी सज्ञा त्याला दिली आहे. हित्ताईत लोकांचा एक योद्धा म्हणून पण रामानन पुढे आला आहे. त्याने आर्यांना पंजाब पर्यंत नेले असा एक उल्लेख आहे. मित्तनी लोकांच्या मध्ये पण वैदिक कालीन नावे आहेत जसे सुबंधू, तुषरता, अर्तसुमरा इ ह्यातील तुषरता म्हणजेच दशरथ असे काहींचे म्हणने आहे.

वैदिक नद्या व भूगोल

रामायणात शरयू नदीचा उल्लेख वारंवार आढळतो व वैदिक साहित्यामध्ये सरस्वती ही नदी प्रामुख्याने आढळते. रामायणासंबंधी ह्या दोन नद्या बघूयात.

राम हा इश्वाकु वंशातील राजा आहे. कालिदासाने रघूवंश लिहला आहे, त्यात तो इश्वाकु वंश हा उत्तर कोसलामधील आहे असे लिहीतो. हे उत्तर कोसला म्हणजेच इराण असे काही लोक म्हणतात, तर काही उत्तर कोसला म्हणजे आजचा अफगाण असेही मानतात. अफगानिस्तानातील होरायू नदी म्हणजे शरयू नदी असा त्यांचा कयास आहे. उत्तर कोसला हे इराण होऊ शकत नाही हे मी खाली दिलेल्या नकाशावरुन लक्षात येईल. कोसलाच्यावरचा भाग घेतला तर फार तर अफगाण वा अगदी उत्तरेकडचे अफगाण. इराण कसे होते हे अजूनही कळले नाही. अफगाण हा भारताचा भूभाग असल्यामुळे राम आजच्या पाकिस्थानातील हिंगोल नॅशनल पार्क मध्ये गेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण इराण पकडले तर मध्ये पूर्ण वाळवंट आहे, मग त्याचा नी रामायणाचा संबंध कसा लावणार?
तसेच लंका हे द्विप आहे. राम जर उत्तर कोसलाचा असेल तर मग तो लंकेपर्यंत कसा गेला? की आपण जी लंका मानतो ती लंका नसून दुसरेच कुठले तरी द्विप हे लंका होय हा प्रश्न पडणे साहजीक आहे. ह्यावर काही विद्वान उत्तर देतात ते मोंहजंदाडो म्हणजे लंका असण्याचे. हेच का? तर मोंहजंदाडो मधील एका सिलावर कृत्तिकेचे चित्र आहे. कृत्तिका हे आपण नक्षत्र माणतो. इ स पूर्व ३१०२ मध्ये एका बुधवारी जेंव्हा सूर्य कृत्तिका नक्षत्रात होता तेंव्हा कलियुग सुरु झाले असे ते सील सांगते. त्यावरुन लंका, जिथे रावण हा बुद्धीमान, शक्तीशाली राजा राहत होता, तिथेच असे खगोलशास्त्र निर्माण होऊ शकते असे त्यांचे म्हणने आहे.

आर्यभट्ट, ब्रह्मसुक्त, सूर्य सिद्धांत हे सर्व असे मानतात की ब्रह्मकुल हे खगोलशास्त्र शिकण्याचे अतिप्राचिन ठिकाण आहे. हे सर्व विद्वान त्या बुधवारी कलियुग सुरु झाले हे ही मानतात. मग एकतर आर्यभट्ट बरोबर असावा (युगाचा कल्पनेत) किंवा मॅक्समुलर तरी. माझे वैयक्तीक मत आर्यभट्ट बरोबर असावा असे आहे. इथे मला जरा गंमत वाटते कलियुग हे जर आधी चार व नंतर त्यात बदल करुन ५ वर्षांचे ठरवले गेले तर ह्या सीलाला काय अर्थ उरतो? सत्य, द्वापार, त्रेता आणि कली हे चार युग एकानंतर एक येतात तर त्या बुधवारी केवळ कलीयुग सुरु झाले व चार वर्षांनी संपले इतकेच काय तो अर्थ होऊ शकतो. मग मॅक्स मुलर आर्यांचा काळ इ स पूर्व १५०० च्या आधीचा नाही असे लिहतो त्याचा मेळ ह्या पूर्ण थेअरीशी लागत नाही. तसेच ऋग्वेद व रामायण हे एकाच काळात होते हा कयास ह्यांची पण जोड अजिबात लागत नाही.

बरं ह्या सर्व विद्वानांत राम कोण हे युद्ध लागलेले असताना ते सीतेला काही अंशी दुर्लक्षित ठेवतात. जनकाचा उल्लेख अनेकदा वाजसनेयी साहित्यात आला आहे. याज्ञवल्काला उपदेश जनक राजा देतो व जनकाचा दरबारात याज्ञवल्क उपनिषदांवर अनेकदा बोलतो, चर्चा करतो असे कित्येक उल्लेख आहेत. जनक हा विदेह ह्या जनपदाचा राजा. विदेह हे जनपद आजच्या उत्तर भारतात येते. हा भूगोल लक्षात घेता ह्या विद्वानांनी एकतर राम सीता लग्न झाले नाही असे तरी म्हणावे वा सीता हा भाग प्रक्षिप्त ( व पर्यायाने संपूर्ण रामायणच प्रक्षिप्त आहे) असे तरी मांडावे. पण त्यात थोडी मेख अशी आहे की रामायणात वर्णन केलेली मिथीला नगरी कुठे आहे ते लक्षात येत नाही. शतपथ ब्राह्मणात गंडकी नदी ही कोसला आणि विदेह ह्यांची सीमारेषा असे आले आहे. कोसला मध्ये जर राम होता असे मानून चालले तर तीन रात्री प्रवास केल्यावर मिथिलानगरी यायला पाहिजे, पण तसे होत नाही. तसेच जनकनगरही सापडत नाही, पण महाभारतातही मिथिलेचा उल्लेख आहे. म्हणजेच एकतर एखादे मोठे शहर तिथे निर्माण झाले वा तेथील लोक दुसरीकडे गेले. असे होण्याची शक्यता माझ्यामते जास्त आहे कारण बुद्धकालात पण वैशाली राज्यातील लोकांना विदेही म्हणत. उदाहरणार्थ अजातशत्रूला वैदेही असे म्हणले गेले आहे तसेच सीतेला वैदेही म्हणले गेले. विदेह इथे जनकाने राज्य केले, हा भाग जुळून येतो. म्हणजेच वैशालीतच कुठेतरी मिथिलानगर असावे.

रामायणातील अयोध्येचे वर्णन असे आहे. - अयोध्या नगरी ही शरयू नदीच्या तिरी असून सात योजने लांब व तीन योजने रुंद आहे. विशाल असे रस्ते ह्या नगरीतून जातात. नगरीतील वसाहती वेगवेगळ्या प्रकारच्या असून सात मजले असणारी घरं पण ह्या नगरीत आहे. पण नेमके आजच्या अयोध्येला ही मापं लागू होत नाही. ती केवळ अर्धीच भरतात. म्हणजे एकतर नगरीचे मोठेपण सांगण्यासाठी आकड्यांचा विपर्यास केला असावा किंवा ही नगरी मोठी होती व नंतर कालौघात ती लहान झाली असे म्हणावे. कुषान सम्राट कणिष्काने ह्या नगरीवर राज्य केले. त्याने इ स पूर्व मध्ये अयोध्या नगरीचे नाव बदलून साकेत हे ठेवल्याचे व परत नंतर ते अयोध्या झाल्याचे अनेक संदर्भ बौद्ध व हिंदू साहित्यात आढळतात.
महाभारताचा भूगोल म्हणजेच आजच्या भारताचा भूगोल. पुरातत्वखात्याने बी बी लाल ह्यांचावर उत्खननाची जबाबदारी सोपवली. महाभारतातील शहरे म्हणजे हस्तिनापूर इथे त्यांचा टीमने उत्खनन केले असता त्यांना इ स पूर्व ११०० ते ८०० असणारी अनेक भांडी सापडली, जर महाभारताच्या शहरात काही सापडू शकते तर रामायणाच्या का नाही? म्हणून १९७५ च्या आसपास अयोध्येचा आजूबाजूच्या १५ ठिकाणी उत्खनन सुरु झाले तिथे ह्यापेक्षा जुने काही सापडले नाही. जी काही भांडी सापडली ती महाभारतकालीनच होती. लाल एके ठिकाणी म्हणतात पृथ्वीने आम्हाला रामायणकालीन एकही वस्तू सापडू दिली नाही, कदाचित तिची ती इच्छाच नाही. रामायणात शिवधनुष्याचे व एका रथाचे वर्णन आहे. त्यानुसार त्या रथावर ते धनुष्य ठेवले होते. प्रत्येक बाजूला आठ चाक असणारा तो लोखंडी रथ होता. तो वजनाला खूप जड असल्याकारणाने ओढण्यास अत्यंत जड होता. उत्खनना दरम्यान त्यांना अशा रथाचा एखादा अवयव मिळेल असे वाटले होते. पण तसे काही झाले नाही. ते म्हणतात "कदाचित खरी कथा छोटी असेल, पण प्रत्येक शतकानंतर ही कथा वाढतच गेली व त्यात अनेक गोष्टी घुसडल्या गेल्या असाव्यात." ह्याच लाल ह्यांनी सरस्वती आहे ह्याचे उत्खनन केले आहे व सरस्वती नव्हती हे खोडून काढले आहे.

बरेच जण राम ही केवळ कल्पना वा वाल्मिकीच्या डोक्यातील एक पात्र आहे असे लिहतात पण त्यास काही अर्थ नाही हे वालीवधावरुन दिसून येते, रामाला फक्त चांगला पुरुष असे दाखवायचे असते तर वालीवध झाला नसता, वाली किष्किंधापर्वात रामाला म्हणतो, तू क्षत्रिय आहे तरी असे का केलेस? मग जर रामाला सगळे चांगलेच दाखवायचे असले असते तर वाल्मिकींनी हा प्रसंगच आणला नसता. इतर ठिकाणी महान दाखवून इथे कमी दाखवणे ह्याचे प्रयोजन काय? म्हणून राम खरा असावा. तसेच दुसरे उदाहरण म्हणजे राम जेंव्हा सीतेला शोधत किंष्किंधेत येतो तेंव्हा सुग्रीव त्याला सांगतो की वाली हा इंद्रपुत्र आहे. पुढे जैमिनीय ब्राह्मणात इंद्र, इंद्राणी (पत्नी) व तिचे मुल वॄषाकपि असा उल्लेख आहे. मी माझ्या दुसर्‍या लेखात वॄषाकपिचा उल्लेख हनुमानाबद्दल केला होता. पण जैमिनीय ब्राह्मण वालीला पण वॄषाकपि म्हणते. मोठा, महाकाय शक्तीशाली वानर असा अर्थ अभिप्रेत असावा. कदाचित अनार्य देवांना आर्यांनी तेंव्हा आपले मानायला सुरुवात केली होती. दुसर्‍या लेखातील माझी शबर नावाच्या पुत्राची कथा, तश्याच पद्धतीचा एक पुत्र म्हणून वॄषाकपि असण्याशी शक्यता आहे. तसे दुसर्‍या लेखात मी हनुमानाला पण वृषाकपि मानले गेले आहे असेही लिहीले. ह्या तिन्हीचा संदर्भ लावला तर राम होता ह्याच निष्कर्षाप्रत मी येतो. पुरावे नाहीत. उत्खनन चालू आहे, काहीतरी निश्चितच मिळेल.

अशातच हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ ह्या पुस्तकाचे लेखक श्री नेमाडे ह्यांची मुलाखत वाचली, ते म्हणतात हिंदूंना कृष्ण कोण आहे हेच माहीत नाही, कारण एकूण तीन कृष्णांचा उल्लेख आहे. पहिला उल्लेख छांदोग्य उपनिषदात कॄष्णाला अंगीरसाचा शिष्य म्हणून आहे, दुसरा, विश्विकाचा मुलगा ऋषी कृष्ण, तर तिसरा यमुनेच्या किनार्‍यावरील कृष्ण. केवळ छांदोग्यात कृष्णाचा उल्लेख झाला म्हणून नेमाडे कृष्णाबद्दल भरपूर बोलतात. तो फक्त एक सारथी होता असे त्यांचे म्हणने आहे. वस्तूस्थितीत जर तो खरच सारथी असेल तर नेमाडे विसरतात तो एक मुद्दा मी मांडू इच्छितो. हा सारथी कृष्ण, महाभारतातील गीता सांगून, महाभारत घडवून आणू शकतो म्हणजे तत्कालिन वैदिक संस्कृतीत जातीला महत्व नव्हते हे लगेच लक्षात येते. कृष्णाचा मुद्दा मी इथे आणला कारण रामाच्या बाबतीत देखील परिटाची अशीच एक कथा. एक धोबी एका राज्याचा व त्याचा पत्नीच्या शीलावर संशय घेऊ शकत होता म्हणजे परत एकदा जात समान होत्या, तर परिट हे त्याचे कर्म होते असा निष्कर्ष निघतो, तसेच तत्कालिन समाजात काही राज्यात लोकशाहीला महत्व होते असा एक उपनिष्कर्षही त्यातून पैदा होतो.

कृष्णाची कथा इथे आणण्याचे दुसरे कारण म्हणजे याज्ञवल्काचा जनकासोबत संवाद चालताना (बृहदारण्यक उपनिषद) जनक, याज्ञवल्काला विचारतो, "परिक्षित कुठे गेला?" गमंत अशी ही आपण रामायण हे महाभारतापेक्षा जुने असे मानतो, तर मग जनकाला हा प्रश्नच का पडावा? कारण परिक्षित हा अभिमन्यूचा मुलगा, अर्जूनाचा नातू. इथे थोडी कालगणनेमध्ये गफलत दिसते. मग बी बी लाल ह्यांना आणखी जुने पुरावे कसे सापडतील? कारण परिक्षित ते राजा जनक असे ४ पिढ्यांचे साधारण १०० ते १२० वर्ष अंतर मानले तर अयोध्येत सापडलेली महाभारतकालीन भांडी बरोबर ठरतील व रामायण हे महाभारतानंतरचे आहे असा निष्कर्ष निघेल. बुद्धकालीन विदेही म्हणणे मग बरोबर लागू पडते. कारण तो काल ६७५ बि सी होईल व बुद्ध लगेच त्या नंतरचा म्हणून ती संबोधने लागू होतील. पण मग असे झाले तर ऋग्वेदात महाभारताचे उल्लेख का नाहीत? कारण महाभारत आधी झाले असले तर उल्लेख, कथा यायला हव्या, ह्याचे उत्तर सापडत नाही.

एक गमतीशीर पुरावा किंवा पुराव्याकडे नेणारे साधन म्हणजे हनुमान जी अंगठी सीतेला दाखवतो ती. त्यावर राम हे नाम कोरले आहे. त्या काळात सर्व अंगठ्या ह्या केवळ गोल असायच्या, उत्खननात ज्या ज्या गोष्टी अंगठ्यासदृष्य म्हणून सापडल्या आहेत त्या सर्व गोल वेढ आहेत, फक्त हडप्पाला सापडलेली अंगठी ही आजकाल खडा घालायला जी जागा असते तशी सापडली आहे. त्यावर नाव लिहता येते.
सीता वनवासात जाते तेंव्हा राम, लक्ष्मण वल्कलं नेसतात पण सीता तिचे रेशमी वस्त्र तसेच ठेवते असा उल्लेख आहे. रावण सीतेला पळवून नेताना देखील तिने पिवळे रेशमी वस्त्र घातल्याचा उल्लेख आहे. रावण दहनाच्या वेळी रावणाला रेशमी वस्त्र घातल्याचा उल्लेख आहे. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात ह्या रेशमी वस्त्राचा उल्लेख चिनापट्ट असा आहे, म्हणजे चिन मधून आयात केलेले वस्त्र. म्हणजे एकतर रामायणकाळी चीनशी व्यवहार होता असे तरी मानावे लागेल (महाभारतकाळी होताच) वा ह्या वस्त्राच्या कथा (रेशमी कारण राजाचे म्हणून) ह्या प्रक्षिप्त आहेत असे तरी मानावे लागेल. माझा कल ही वस्त्र कथा प्रक्षिप्त असावी असा आहे.

वाल्मिकीने ह्या कथा ऐकून मग लिहीले असा विचार केला किंवा कोणी विद्वान मांडतात तसे एकापेक्षा जास्त लोकांनी रामायण लिहीले असे मानले तर मात्र ह्या विविध कथा, हे वस्त्र, अंगठी इ. गोष्टी प्रक्षिप्त असण्याचा संभव व थोडा काल्पनिक असण्याचा संभव नाकारता येत नाही. तसेच बाल कांड व उत्तर कांड हे नंतरचे लेखन आहे हे आता मानले गेले आहे त्यामुळे मूळ रामायण कथेतही अश्या अनेक गोष्टी येऊ शकतात. शिवाजी केवळ ३०० वर्षांपूर्वी होऊन गेला, पण त्याचा बाबतीतही दंतकथा आहेत, येशूच्या बाबतीतही अनेक दंतकथा आहे त्या रामाचा बाबतीतही होऊ शकतात.

वरील मते माझी आहेत असे नाही तर ते विविध मतप्रवाह आहेत. वर दिलेल्या मतप्रवाहांपेक्षा आणखी किती तरी मतप्रवाह आहेत. जिथे खोडण्याजोगे वाटले तिथे मी माझी टिप्पणी पण केली आहे. लेखाचा कॅनव्हॉस खूपच मोठा आहे. अजूनही मी ह्यावर मिळेल ते साहित्य वाचत असतो, इथे ते सर्वच देणे शक्य नाही. हा लेख आधीच खूप मोठा होत चालला आहे त्यामुळे इथे थांबतो.

राम आहे का नाही, होता का नव्हता, इ स पूर्व का नंतर ह्यामुळे फरक पडू नये. तत्वज्ञानात इश्वराचे रुप सांगितले आहे. सर्वच माणसं इश्वर असल्यावर राम कुठलाका असो, तो राम आहे इतकेच माझ्यासाठी पुरे आहे.

महाभारतकालिन भारत नकाशा.

Mahajanapadas.jpg

* किरात ह्यांचा उल्लेख वेदात अनेकदा एक जमात म्हणून आला आहे. किरात म्हणजे नेपाळी.
*http://en.wikipedia.org/wiki/Ramallah

वेदकालीन संस्कृती भाग १
वेदकालीन संस्कृती भाग २
वेदकालीन संस्कृती भाग ३
वेदकालीन संस्कृती भाग 5

प्रकार: 

रावन ~ वानर खुप जवळचे शब्द वाट्तात
देव ~ वेद खुप जवळचे शब्द वाट्तात
यातुन हे शब्द रचणार्यांना काहीतरी सुचवाय्चे होते असे नाही वाटत तुम्हाला >>

हं इन्ट्रेस्टींग Happy हा विचार नाही केला. ह्यावर काही साहित्य तुम्हाला माहित आहे का? सुचवाल का?

चंपा किंवा इतर मंदिराबाबत -

शिव ही मुख्य देवता आधी होती, नंतर महत्व कमी झाले. व परत जुने देव आपण पुजू लागलो हे मी दुसर्‍या लेखात मांडले आहेच.
लिंग पुजा वा तत्सम आकाराची पुजा ही अनेक संस्कृतीमध्ये रुढ आहे. अगदी मुसलमानात पण! काबाचा ब्लॅक स्टोनचा आकार पिंडी सारखा आहे. पु ना ओकांनी हे आधी मांडले, पण पुना ओकी इतिहास म्हणून लोकांनी अव्हेर केला. तेंव्हा विकि नव्हते. आज आहे. काबा वरुन ब्लॅक स्टोन पाहिले तर तो आकार पिंडी सदृष्य येतो. मी पुनाओकी फॅन नाही, पण त्यांनी मांडलेल्या काही थेअरीज आज विकी वरुन प्रत्येक जन पाहू शकतो. खरे तर मुसलमानी लोक मूर्तीपुजा मानत नाहीत तरी ते ह्या दगडाला मात्र माणतात. प्रत्येक जुन्या संस्कृतीत ही दगड पुजा आहे. मुसलमान धर्म जरी नविन असला तरी तो धर्म जिथे निर्माण झाला तो भाग जुन्या संस्कृतीशी रिलेटेड आहे, त्यामुळे ही पुजा त्यांनी स्विकारली.

आणखी एका मंगोल देशात शिव पुजा प्रसिद्ध आहे. नेमके ती लिंक मला सापडत नाही. ह्यावरुन मला असे वाटते की व्यापारात सिंधूसंस्कॄतीचा ( वा आता सरस्वती संस्कृती असे नाव आपले लोक देऊ पाह्त आहेत, व जे मलाही योग्य वाटते) संबंध अनेक देशांशी आला. तिथे जाऊन सेटल होणारे सेटलर्स ह्यांनी आपले देव नेले.

ह्याला पुष्टी म्हणून मी आजचे उदाहरण देतो. आज अमेरिकेत अनेक ठिकानी हिंदू मंदिरे आहेत, फिलीतल्या बालाजी मंदिराचा मान तिरुपती नंतर आहे असे अमेरिके हिंदूंकडून ऐकले. (मजेतका होईना) तर हे काय दाखवते? आपण आपली संस्कृती (निदान वैयक्तीक रित्या का होईना) इतर देशात नेतो. त्यामुळे ही मंदिर अनेक देशात आढळतात, पण ह्याचा उलट आढळत नाही, म्हणजे येथील देवांना पुजणारे एखादे जुने १०००, १५०० वर्षांपूर्वीचे चर्च, (अपवाद गोवा, तिथे जुनी चर्च आहेत) मंदिर, अवेस्ता मधिल पारश्यांचे दफणभुमी ह्या भारतात प्रत्येक ठिकाणी आढळत नाहीत, पण प्रत्येक ठिकाणी आपल्या जुना देवांची पुजा मात्र आहे. ही अशी मंदिर अनेक संख्येत इतर देशात आढळत नाही, अगदी तुरळक आढळतात. त्यामुळे माझा कल तरी हे देव भारतातलेच आहेत असा होतो. चुकीचा असण्याची शक्यता आहेच पण सापडलेल्या सरस्वतीमुळे हे शक्य असावे असे वाटते. सरस्वतीची व्याप्ती अमेरिकेतेली आजच्या ग्रेट लेक सारखी होती, त्यातून व्यापार उदिम पण होत होता.

मोगल, हबशी आले व त्यांनी साम्राज्य स्थापन केले हे मान्य पण त्यामुळे त्यांचे देव, साहित्य इथे आले नाही. धर्मांतरानंतर काही लोकांनी ते स्विकारले पण उरलेल्या लोकांच्या तत्कालिन संस्कृतीने त्यांचाशी जमवून घेत थोड्याफार रुढी बदलल्या, बाह्य संस्कृती बदलली, कर्मकांडात बदल आला पण आपला मुख्य प्रवाह कायम ठेवला हे दिसते. रिसर्च करण्यासाठी हा एक मोठाच विषय ठरावा. अगदी हे कुशान सम्राट कनिष्काला पण लागू होते. त्याने बौद्ध धर्म स्विकारला व मुळ बौद्ध धर्मात बदल घडवून आणला. मागे मी रानडे व आपटे ह्यांचे एक पुस्तक वाचले होते. त्याचे नाव आत्ता आठवत नाही, पण त्यात त्यांनी फार मस्त आढावा घेतला व आक्रमकांना पुरुन कसे उरले हे दाखविले आहे.

कुठल्याही देशात असे कडबोळे दिसत नाही. भारतात मात्र दिसते. विविधतेत एकता. Happy

wow
काबा च्या शिवलिंगा सार्ख्या दगडा बद्दल माहित नव्हते. घोरीने सोमनाथचे शिवलिंग पळवुन ते
मक्केला पाठ्विलेले असे ऐकलेले पण काबाचा दगड जुना दिसतो
http://en.wikipedia.org/wiki/Kiswah
हे खुपच interesting आहे.
मी पुर्वी Xi (क्सि) याचे translation करताना झालेल्या गोंधळाविषयी लिहिले होते.
Xi हे सि, सिक, किस असे translate झाल्याचे म्हट्ले होते.
Kiswa हे Xiwa सहज होते. जरा अतिरेकी वाट्ते पण Kiswa नाव हे eva वरुन पण येउ शकते.

त्यामुळे ही मंदिर अनेक देशात आढळतात, पण ह्याचा उलट आढळत नाही, ही अशी मंदिर अनेक संख्येत इतर देशात आढळत नाही, अगदी तुरळक आढळतात. त्यामुळे माझा कल तरी हे देव भारतातलेच आहेत असा होतो.

हे तपासताना timeline महत्वाची आहे. मंगोल, अमेरिका , थायलंड येथिल मंदिरे १०० ते १५०० वर्षापुर्वीची आहेत पण Egyptian Ramesys हा ३१०० वर्षापुर्वीचा आहे तो संक्रुतीचा उगम challenge करु शकतो.

इंद्रा (Hind-Ra) हा देव भारतात्लाच आहे पण त्याला नाव देण्याची पद्धत Egyptian वाटते.
Egyptians सर्वात जास्त सुर्याला मानीत व त्या खालोखाल Nile ला. यामुळे ईन्द्रा ही Indus आणि Ra याची composite देवता असावी असे वाटते.
Egyptian राजे स्वतःला सुर्याचा अवतार मानायचे

Amarna corpus of 380+ letters counters the conventional view that Akhenaten neglected Egypt's foreign territories in favour of his internal reforms. There are several letters from Egyptian vassals notifying Pharaoh that the king's instructions have been followed:

To the king, my lord, my god, my Sun, the Sun from the sky: Message of Yapahu, the ruler of Gazru, your servant, the dirt at your feet. I indeed prostrate myself at the feet of the king, my lord, my god, my Sun...7 times and 7 times, on the stomach and on the back. I am indeed guarding the place of the king, my lord, the Sun of the sky, where I am, and all the things the king, my lord, has written me,

Hittites आणि Egyptians यात रोटी-बेटी व्यवहार होत असत.

Hittite मितन्नी राजा Tushratta याने आपली मुलगी Tadukhepa हिचे लग्न pharoh Amenhotep III नंतर Akhenaten शी केले होते.

Amarna letter EA 27 preserves a complaint by Tushratta for not getting bride price to Akhenaten about the situation:

"I...asked your father, Mimmureya (pharoh Amenhotep III चे नाव) , for statues of solid cast gold, one of myself and a second statue, a statue of Tadu-Heba (Tadukhepa), my daughter, and your father said, "Don't talk of giving statues just of solid cast gold. I will give you ones made also of lapis lazuli. I will give you, too, along with the statues, much additional gold and (other) goods beyond measure." Every one of my messengers that were staying in Egypt ...

या Hittites आणि Egyptians यांच्या संकरा पासुन Magian /Median साम्राज्य झाले या साम्राज्याचे शेवटी
Greek, Indian, Iranian असे भाग झाले असावेत.

केदार हा भाग काल वाचून झाला होता. प्रतिसाद द्यायचा राहिला होता.
खूप धन्यवाद ही माहिती देतो आहेत त्याबद्दल !!

तो तुसरता बद्दलच दशरथ असल्याचे काहिंना वाटते असे वर लिहले आहे. पण आपल्या इतिहासात दशरथाला मुलगी नाही तसेच बहिणही नाही. त्याने ज्या शहरांवर आक्रमण केली ती सगळी मध्यपूर्वेतली आहेत व आजही ते आहेत. आपल्या शहरांकडे तो आला असता तर नक्कीच त्याचा इतिहासात नोंद झाली असती. निदान इजिप्शियन इतिहासात तिमिध्वज व राजा दानू (जे दानव समजला गेले) ही दशरथाची मोठी युद्धे यायला पाहिजेत ती नाहीत. त्यामुळे ती थेअरी कितपत टिकाव धरते त्या बद्दल शंका आहे.
इजिप्त इतिहास मी फारसा वाचला नाही, जो काही वाचला तो भारत संदर्भात. अजून वाचायला हवा.

टाईम लाईन महत्वाची आहे आणि म्हणूनच सरस्वती संशोधन महत्वाचे ठरते. बहुतांश थेअर्‍या ह्या १९०० ते १९२० मधील इंग्रजी पुस्तकांवर आधारित आहेत आणि त्यात मॅक्स मुलरचा व आर्यन इन्वेजनाचा उदो उदो झाला. पण आता चित्र बदलत आहे.

पूर्वी जसे विल्स मुलर, रॉय ह्यांनी विरोधी मांडले तसे आता बरेच गोरे लोक भारतीय संस्कृती बद्दल चांगल लिहत आहेत. डेव्हिड फॉवे, स्टिव्हन नॅप आणि बरीच मंडळी वेदांवर अभ्यास करतात व त्यातील काही संशोधक आहेत.

बस्के, अनिता, मो, पराग धन्यवाद. Happy

निलिमा, काही शंका -

१. या वरुन असे वाटते की हे आर्य केंव्हा तरी Egyptians शी संकरीत झाले >> ज्या आर्याना सर्वश्रेष्ठ जमात असा मान दिला जातो तशी जमात खरोखर अस्तित्वात होती का? कोणत्या संस्कृतीच्या साहित्यात (लिखीत अथवा लोककथा) आर्य असा उल्लेख आहे? दुसरे असे की सर्व प्रगत संस्कृतींच्या मूळ प्रदेशाबाबत संशोधकांत एकवाक्यता आहे जसे की सरस्वती संस्कृती - भारतातला पंचनद प्रदेश, मेसिपोटीआ - इजिप्त, माया - द. अमेरीका ई. मग जर आर्य ही एक प्रगत संस्कृती होती तर मग त्यांच्या मूळ प्रदेशाबद्दल काहीच खात्रीलायक माहिती कशी आढळत नाही?

२. राम (Egyptians राजे "रा" या सुर्यदेवाला सर्वश्रेष्ठ आणि राजाला त्याचा प्रुथ्वी वरील अवतार मानत) >> हे मेसिपोटीअन संस्कृतीला मध्यवर्ती धरून केलेले अनुमान झाले. अशा अनेक शब्दांची फोड (derivations) पु.ना.ओकांनी भारतीय संस्कृतीला मध्यवर्ती धरून केली आहे उदा. मुसलमान = मुसलाने (अण्वस्त्र अथवा ब्रह्मास्त्र. आजही मिसाईलचा शेप तसाच असतो) प्रभावग्रस्त (affected) मानव समुह. पण हे केवळ तर्क होतात.

३. कधी कधी असे देखिल वाट्ते की रामायण अर्धी काल्पनिक गोष्ट ही असेल >> असेलही. पण मग इतर संस्कृतींच्या साहित्याला पण हाच न्याय लागू नाही का होणार?

४. Egyptians सर्वात जास्त सुर्याला मानीत व त्या खालोखाल Nile ला. यामुळे ईन्द्रा ही Indus आणि Ra याची composite देवता असावी असे वाटते. >> इंद्र हा देवश्रेष्ठ आहे आणि सरस्वती ही वेदकाळातली सर्वात श्रेष्ठ नदी. मग तो शब्द 'इंद्र' ऐवजी 'सरस्वत्र' असा काहिसा हवा होता.

तुझ्या मेहनतीला सलाम
लेख आणि प्रतिक्रिया दोन्ही जबरदस्त.
राम खरा आहे की नाही, पुरावा आहे की नाही ह्यात मला रस नाही तर ह्या काव्यात रस आहे कारण त्यात तत्कालीन समाजाचे प्रतिबिंब उमटल्याशिवाय राहत नाही.>>> या वाक्यासाठी आणि पुनाओकी नसल्याबद्दल धन्यवाद!!!
माझ्या मते रामायण हा एका भागातील संस्कृती, मूल्ये आणि नैतिकतेच्या कल्पना दुरवरच्या भागात पोहोचण्याचा इतिहास आहे. तो अनेक लेखकांनी, वेगवेगळ्या काळात आपपल्या परीने वाढवत नेला. त्यामुळे त्याच्यातील काही गोष्टी मूळ स्वरुपापेक्षा बदलल्या असणारच.
राम ही खरीच एक व्यक्ती होती असे जरी उद्या सिद्ध झाले तरी त्याने ज्या मूल्यांचा पुरस्कार केला त्यावर श्रद्धा असली तरी पुरेसे आहे.

धन्यवाद. नेमके तेच मी माडंतोय.

पण वैयक्तीक रित्या राम काल्पनिक नाही ह्या कडे माझा जोरदार कल आहे. वालीची कथा मांडली आहेच. इतरही काही गोष्टी पुढे मांडेन. पुरावा भांड्यांच्या स्वरुपात सापडला नाही पण तर्क लावला (जसे एक मत खोडताना मी विदेह (वैदेही) ), हिंगोल शक्तीपीठ इ इ तर हे जुळून येऊ शकते असे वाटते.

काही वर्षांपूर्वी कृष्ण पण कथा आहे अशी वंदता होती पण अचानक घग्गर बेसीन मध्ये द्वारका सापडली, जीचे वर्णन एकदम मॅच झाले आणि कृष्ण होता, महाभारत झाले असे घुमजाव तज्ज्ञांनी केले तसेच रामाच्या बाबतीत होणार ह्या बद्दल माझ्या मनात संदेह नाही कारण चांगली कथा काही काळ आवडणे हे मान्य व शतकोनशतके ती मान्य होणे व त्या कथेतील काही स्थान सापडने हा योगायोग वाटत नाही. ऑफकोर्स रोमिला थापरांसारखे लोक राम आहे ह्यावर जोरदार आक्षेप घेउन जुनीच मत मांडत बसतात.

केदार,
तुमच्याप्रमाणेच राम हा खरा होता असे माझेही मत आहे आणि नसला तरी त्या स्वरुपाची व्यक्तीरेखा असावी. मागे तुम्ही एकदा विचारले होते की उत्तरेकडुन आर्यांचे दक्शिणेला move होण्याचे कारण काय असावे?
परवा National Geographic मध्ये सहारा वर documentry होती.
त्यात त्यान्नी conclusions सांगितले.
१) सहारा चा जन्म ३ मिलियन वर्षांपुर्वी झाला.
२) सहारा १ मिलियन वर्षांपुर्वी आजच्या सारखे वाळवंट झाले.
३) दर २०००० वर्षांनी सहारा आणि भारतावरील स्तेप, मंगोलिया हे हिरवेगार होतात मग परत वाळवंट
होतात (this happens due to cyclical wobbling of earths axis). ७००० वर्षापुर्वी सहाराच्या मध्यी माणसे fishing करतानाची चित्र सापडली आहेत.
last cycle त्यांच्या मते ३००० BC चालु झाले. जस जसे सहारा वाळवंट होउ लागले तसतसे माणसे Egypt, Arabia इथे move झझाली.

याच न्यायाने मध्य Asia मधुन आर्य ईराण / हिंद इथे migrate झाले असु शकतील.
खुप अभ्यास नाही. पण विचार करायला घेईन.

केदार, अनेक अनेक धन्यवाद ! खूप छान लिहिताय. खरंच हे सगळं वाचतांना जाणवतंय की आपलीच आपल्याला किती कमी माहिती आहे ! खरोखर हे सगळं शाळांमधून शिकवायला हवं. काही मदरसे होणार नाहीत. शिकवणार्‍यानी शिकवतांना वैचारिक दृष्टीकोन ठेवला पाहिजे मात्र !

१. ऋग्वेदात राम कुठे आहे? एखादी ऋचा देऊ शकाल का?

२. सीता ही रावणाची मुलगी होती असे काही लोक सांगतात. रावणाला एका अप्सरेने शाप दिला होता की तुला मुलगी होईल ती तुझा नाश करेल.. ( शाप का दिला हा प्रश्न विचारण्याची गरज पडू नये.. Happy ) .. पुढे मुलगी झाल्यावर रावणाने तिला घाबरून पेटीत घालून पुरले, तीच सीता..

या फ्लॅश बॅक बाबत आपले काय मत आहे?

जा मो प्या, ह्याबाबत मी वाचलेली कथा अशी आहे, एका ब्राम्हणाने एकदा आपल्या पोटी परमेश्वराने कन्येच्या रुपाने अवतार घ्यावा म्हणून तपश्चर्या केली. भगवान विष्णूंनी प्रसन्न होऊन त्याला लक्ष्मीची प्रार्थना करण्यास सांगितले. पुढे त्या ब्राह्मणाला अतिशय दिव्य आणि सुंदर कन्या झाली. तिचे नाव वेदवती . तिने मोठेपणी श्री विष्णूंच्या प्राप्तीसाठी तप सुरु केले.
एक दिवस रावण त्या मार्गाने जात असतांना त्याने वेदवतीला पाहिले आणि (naturaly ) तिचे हरण करण्याचा प्रयत्न केला. संतापून वेदवतीने रावणाला, 'मी तुझ्या सर्वनाशाला कारण होईन ' असा शाप दिला आणि नंतर त्याचा स्पर्श झाला म्हणून अग्नीत उडी घेतली. पुढे बर्‍याच वर्षांनी पुन्हा तिथून जात असतांना रावणाला त्या जागी एक अत्यंत तेजस्वी रत्न सापडले. ते त्याने एका पेटीत ठेवून मंदोदरीला भेट दिले. पण मंदोदरीने जेव्हा ती पेटी उघडून पाहिली तेव्हा तिला त्यात रत्नाऐवजी तान्ही मुलगी दिसली. रावणाला वेदवतीच्या शापाची आठवण येऊन त्याने त्या मुलीसकट ती पेटी पूर्वी होती तेथे नेऊन जमिनीत पुरुन टाकली.
हीच पेटी पुढे जनकाला सापडली. पेटीतली ती मुलगी म्हणजेच सीता !

पण ह्या गोष्टीवरून मला काही प्रश्न पडतात. पहिलं म्हणजे 'अशा' emergencies ना सोपं जावं म्हणून वेदवती कायम आग पेटवून ठेवत असे का ? दुसरे म्हणजे मंदोदरीला रत्न भेट देतांना रावणाने छोटं बाळ मावेल एवढ्या मोठ्या पेटीत का दिलं ? सीताहरणाच्या वेळी रावणाचे वय काय असेल ?

जामोप्या,

भद्रो भद्रया सचमान: आगात, स्वसारं जारो अभ्येति पश्चात्।
सुप्रकेतैर्द्युभिरग्निर्वितिष्ठन, रूशद्र्भिर्वर्णेरभि राममस्थात्॥ (ऋग्वेद 10-3-3)

फ्लॅश बॅक
तुमच्या दुसर्‍या शंके बद्दल मी काही लिहू शकत नाही, (कथा माहिती असली तरी) कारण त्या कथेला आधारभूत असणारे अजून काही मी वाचले नाही. ( थोडक्यात माझे वाचन लिमिटेड आहे, दुसरीकडे कुठे तरी नक्कीच कोणी तरी ह्या बद्दल लिहले असणार. मिळाले तर पुढे नक्कीच लिहेन.)

अस्मानी मला वाटतं अनेक कथा पुरक म्हणून आहेत. म्हणजे एखादे मत परत परत भासवून देण्यासाठीच्या. रावण जर तसाच राहिला असता तर मग रावणाने सीतेच्या मर्यांदांचा भंग केला नसता का? केला असताच पण तसे झाले नाही मग ह्याला पुरक म्हणून काहीतरी मांडणे आले. म्हणून अग्निकन्या असेही असू शकते. तरच मग रावण स्त्री वेडा होता हे ही सिद्ध होते. पण निदान माझ्यातरी वाचनात रावण तसाच होता हे कुठे नाही.

एक नमुद करु इच्छितो की ..

मी रामायणावर काय वैयक्तीक जीवनातल्याही कुठल्याच विषयावर अजिबात अधिकारी नाही. त्यामुळे प्रत्येक कथा व त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा माझा वैयक्तीक होतो व तो अजिबात ग्राह्य धरण्यात येऊ नये. पण मी लेखात जे मांडत असतो, ते केवळ पुराव्यात असले तरच. तिथे कल्पनाविलास नाही. उदा रामायणाचा ऋग्वेदातील श्लोक.

निलिमा सरस्वतीच्या माझ्या लेखात, त्याकाळातील भारतातील व मध्यपूर्व व युरोपमधील जमिनीची जडणघडण मांडण्याच्या विचार आहे, त्यामुळे इथे प्रतिक्रिया न देता त्या लेखात काही मुद्दे मांडतो.

दक्षिण भारतातील रामायण कथेत रावण-सीता फ्लॅश्बॅक आहे. वाल्मिकी रामयणात याचा उल्लेख नाही... नाहीतरी दक्षिणी संकल्पना वेगळ्याच असतात.. दक्षिणेत गणपती हा ब्रह्मचारी आणि कार्तिकस्वामी (म्हणजेच मुरुगन, सुब्रमण्यम) हा रिद्धी सिद्धीचा पती मानतात, म्हणे... (मी असे ऐकले आहे. खात्री केल्याशिवाय हे मत ग्राह्य मानू नये. )

सुप्रकेतैर्द्युभिरग्निर्वितिष्ठन, रूशद्र्भिर्वर्णेरभि राममस्थात्॥

चित्रावशास्त्रींचे भाषांतर आणि विनोबांचे भाषांतर पाहिले.. या ऋचेचा देव अग्नि आहे... प्रभातकाळी उषेसमवेत येणार्‍या अग्नीचे ( सूर्याचे) वर्णन आहे... भाषांतरात रमणीय असा शब्द आहे, तो रामम्स्थात चा अर्थ असेल का? .... त्यामुळे चित्रावांनी दिलेला अर्थ योग्य वाटतो...

नमस्कार माधव,

तुमचा प्रतिसाद उशिरा वाचला त्याबद्दल क्षमस्व.

१.A] या वरुन असे वाटते की हे आर्य केंव्हा तरी Egyptians शी संकरीत झाले >> ज्या आर्याना सर्वश्रेष्ठ जमात असा मान दिला जातो तशी जमात खरोखर अस्तित्वात होती का? कोणत्या संस्कृतीच्या साहित्यात (लिखीत अथवा लोककथा) आर्य असा उल्लेख आहे?

ईतिहास संशोधकांमध्ये निश्चितपणे आर्य ही समकालीन जमातीत सर्वश्रेष्ठ जमात अजिबात मानली जात नाही. मला इतर काही गोष्टींविषयी शंका असली तरी याबाबत नाही. Egyptians हे अक्ख्या जगात १००० BC पर्यंत सर्वात प्रगत निर्विवाद उच्च संस्क्रुती होती. उदाहरण द्याय्चे झाले तर amarnaa चे मंदीर किंवा सर्वात छोटा pyramid याइत्पत कलाक्रुती ११०० AD म्हणजे Ankorwaat (२५०० वर्षांनी) बांधे पर्यंत झाली नाही. Egypt मध्ये ५०० BC पर्यंत जेवढे शिलालेख कलाक्रुती उत्खनन झाल्या त्याच्या १/१०० गोष्टी देखिल भारत, युरोप मध्ये combine मिळालेल्या नाहीत. त्यामुळे या आर्याना सर्वश्रेष्ठ जमात १००० BC सर्वश्रेष्ठ जमात असे मानण्याचा कोणताच भौतिक पुरावा नाही.

१.B] दुसरे असे की सर्व प्रगत संस्कृतींच्या मूळ प्रदेशाबाबत संशोधकांत एकवाक्यता आहे जसे की सरस्वती संस्कृती - भारतातला पंचनद प्रदेश, मेसिपोटीआ - इजिप्त, माया - द. अमेरीका ई. मग जर आर्य ही एक प्रगत संस्कृती होती तर मग त्यांच्या मूळ प्रदेशाबद्दल काहीच खात्रीलायक माहिती कशी आढळत नाही?

exactly त्यांच्या मूळ प्रदेशाबद्दल काहीच खात्रीलायक माहिती आढळत नाही कारण त्यांचे मुळ दुसर्या संस्क्रुतीत होते.
Egyptians च्या समकालीन Hittites यांच्या आधी Hurrians ज्यांचा उच्चार (अर्रिअन्स किंवा S for H सुरिअन्स ) असा होतो ते काही जण आर्य शब्दाचे उगमस्थान मानतात. आर्यांची भुमी पंचनद नसुन सप्त सिंधु होती. हिच्या ७०० BC मधल्या अवेस्थातील (Hapta Hindu) उल्लेखा बद्दल मी म्हटले आहे.

२. राम (Egyptians राजे "रा" या सुर्यदेवाला सर्वश्रेष्ठ आणि राजाला त्याचा प्रुथ्वी वरील अवतार मानत) >> हे मेसिपोटीअन संस्कृतीला मध्यवर्ती धरून केलेले अनुमान झाले. अशा अनेक शब्दांची फोड (derivations) पु.ना.ओकांनी भारतीय संस्कृतीला मध्यवर्ती धरून केली आहे उदा. मुसलमान = मुसलाने (अण्वस्त्र अथवा ब्रह्मास्त्र. आजही मिसाईलचा शेप तसाच असतो) प्रभावग्रस्त (affected) मानव समुह. पण हे केवळ तर्क होतात.

हो हे तर्कच आहेत पण पु.ना.ओकांनी भारतीय संस्कृतीला मध्यवर्ती धरून केलेले तर्क अतिरेकी आहेत कारण त्याला इतर साधर्म्य दाख्विणारी उदाहरणे नाहीत.
उ.दा
अरिअन भुमी वरुन ईरान हा शब्द आला हे सर्वमान्य आहे. म्हणुनच आर्यांना (ईन्दो-ईराणिअन) संक्रुतीचे जनक समजतात.
मेसापोटिआत आमुन आणि रा ची composite देवता आमुन्-रा यांचे पुजक अस्ल्याचा उल्लेख आहे. हे composite देवतांचे cult का आले व यातुन Egypt मध्ये कशी यादवी माजली यावर मग लिहिन.
similarly पार्शी लोकांची अहुरा (S for H asu-raa) ही देवता ही आहे.
अग्नि म्हणजे अर्ट्-रा अर्ट चे जुन्या पार्शी मध्ये meaning "अर्थ"
अर्ट्-रा म्हणजे "अर्थ" वा सत्य जाणणारा म्हणुन पार्शी अग्निदिव्य कराय्ला लावीत.
अजुन असे इत्के शब्द एकाच प्रकारे (स चा ह) करुन किंवा रा लावुन वापरले आहेत.
http://en.wikipedia.org/wiki/Proto-Indo-Iranian_religion

३. कधी कधी असे देखिल वाट्ते की रामायण अर्धी काल्पनिक गोष्ट ही असेल >> असेलही. पण मग इतर संस्कृतींच्या साहित्याला पण हाच न्याय लागू नाही का होणार?

हो संस्कृतींच्या साहित्याला पण हाच न्याय लागू होतो. त्यादेखिल बर्याच्शा काल्पनिक आणि थोड्या सत्य आहेत. जसे रामायणाबद्द्ल असु शकते पण रामायणात भारत भुमीचे वर्णन बरेचसे अचुक आहे.त्यामुळे त्यात सत्याचा अंश जास्त असावा असे वाटते.

४. Egyptians सर्वात जास्त सुर्याला मानीत व त्या खालोखाल Nile ला. यामुळे ईन्द्रा ही Indus आणि Ra याची composite देवता असावी असे वाटते. >> इंद्र हा देवश्रेष्ठ आहे आणि सरस्वती ही वेदकाळातली सर्वात श्रेष्ठ नदी. मग तो शब्द 'इंद्र' ऐवजी 'सरस्वत्र' असा काहिसा हवा होता.

Harahvaiti (S for H सरस्वती) सारस्वत हा शब्द अस्तित्वात आहेच. Indus काठी उत्खननात बर्याच गोश्टी सापड्ल्या त्यामुळे सिंधु जयावरुन हिंदु (हा खरा परकीय शब्द आहे जो आपण मग आत्मसात केला) पण जास्त महत्वाची नदी नक्किच होती. सरस्वती, गंगा या नद्या पण महत्वाच्या पण मुळ प्रदेश
सिंधु, झेलम, रावी, आमु दर्या हा असावा. आता आपण वाराणसीला, काशी म्हणतो पण original काशी
ही सिंधु च्या जवळ चीन मध्यी आहे. http://www.orientaltravel.com/province/city/Kashi_City.htm
म्हणुन आर्यांच्या पुर्व कालखंडात सिंधु जास्त महत्वाची आणि म्हणुन
Ind-Ra ह्या शब्दाची फोड same असावी असे वाटते.
the-indus-river0.gif (9.84 KB)

रा लागुन होणारे अजुन काही शब्द.

मुळ Hindian Iranian
मित-रा मित्रा मिथरा
मंत्-रा मंतरा मंथरा (ह्याचा अवेस्थात अर्थ प्रार्थना ही कैकयी ची दासीचे नाव असावे )
सुरा सुरा हुरा
v rtra व्रत्रा व्रथेरा (obstacle)
v rtra हा मला खुप interesting वाट्तो कारण या शब्दात rtra उलट आला आहे artra (ज्यावरुन English मध्ये atar आहे) तो अग्नि. ज्याचा अग्नि (yasna) सर्वात जुना तो श्रेष्ठ. अग्निला अडथळा आणणारा
v rtra. ही संकल्पना आणि शब्दरचना परिपुर्ण वाटते.

यावरुन Ind-Ra हे खरे असावे असे वाटते. आणि जर अशी देवता असेल तर Egyptians शेवटी रा लाउन
composite देवता बनवित याचा ढळढळीत पुरावा आमुन्-रा , अतुन्-रा च्या रुपाने अमार्णा च्या मंदिरात आहेच.

मात्-रा
पित-रा
भ्रात्-रा
: संस्क्रुत मध्ये पाणिनी नंतर आला हे लक्शात घेतले तर खुप शब्द सापड्तील कारण आपल्या पुर्वजांना
देव सर्वत्र दिसायचा. Happy

संस्क्रुत मध्ये देव कसा चालवतात हे तुम्हाला माहित आहेच.
अवेस्थन मध्ये अहुरा असा चालवतात.
http://www.avesta.org/alang.htm

"normal" endings stems in a: (m.n.)
Sg. Du. Pl. Sg. Du. Pl.
N -s -â -ô (-as), â -ô (ahur-ô) -a (ahur-a) -a (-ahura)
A -em -â -ô (-as, -ns), -â -em (ahurem) -a (vîa) -ã (haomã)
I -â -byâ -bîsh -a (ahura) -aêibya (vîraêibya) -âish (yasn-âish)
D -ê -byâ -byô (-byas) -âi (ahurâi) -aêibya (vîraêibya) -aêibyô (-yasn--aêibyô)
Abl -at -byâ -aêibyô -ât (yasn-ât) -aêibya (vîraêibya) -aêibyô (-yasn--aêibyô)
G -ô (-as) -å -ãm -ahe (ahurahe) -ayå (vîr-ayå) -anãm (yasn-anãm)
L -i -ô, -yô -su, -hu, -shva -e (yesn-e) -ayô (zastayô) -aêshu (vîraêshu), -aêshva
V - -â -ô (-as), â -a (ahura) -a (vîr-a) -a (-yasna), -ånghô

अजुन एक interesting शब्द
अस्त्रा
Indian astra = divine weapon.
Iranian ustra = divine light, star
Greek stre = star
English star
marathi tara = star

जबरीच रे.. जरा ऊशीराने वाचला, पण सलग वाचून काढायला वेळ मिळाला.
कॅनव्हास खूपच मोठा आहे त्यामानाने लेख अतीशय उत्क्रुष्ट अन एकसूत्री जमलाय. काही काही परिच्छेद मात्र दोनदा वाचल्यावर कळले. Happy
पुन्हा एकदा, तुझ्या अभ्यास अन मेहेनतीचे कौतूक. स्वताचा अमूल्य वेळ काढून ईथे फुकटात आम्हाला ऊपलब्ध करून देण्याच्या तुझ्या परोपकारी व्रुत्तीला मोठ्ठा सलाम!
वेळ मिळेल तसे अजून येवू देत... आमची भूक काही संपत नाही.
*****************************************************
हळहळ वाटते की आपला दैदीप्यमान ईतीहास अशाच प्रकारे सर्वांगाने का शिकवला गेला नाही? बरेच गैरसमज अन डिस्टॉर्शन्स टळले असते. ब्रिटीशांन्नी स्वार्थासाठी अन आता आपल्या माहाभाग राज्यकर्त्यांन्नी खुर्चीसाठी दूषित अन गढूळ इतीहास किती वर्षानुवर्षे आपल्याला पाजला- तोही संस्कारक्षम वयात. अन आता आयुष्याची अर्धी संपत आली, नाण्याच्या दोन्ही बाजू तपासून घेण्याची वृत्ती जागी झाली तेव्हा हा गढूळ इतीहास मात्र "कधीच बदलता येणार नाही" फक्त एव्हडी खंत करू शकतो. ईतकेच काय आपल्याच हयातीत, शिवाजी महाराज, भगतसींग वगैरेंबद्दल धादांत खोटा द्वेषकारक ईतीहास छपला जातो- अन हतबलपणे आपण फक्त पहात बसतो. कुठून कुठे पोचलो!)

नाही जागोमोहनप्यारे
या प्रकारे कुत्रा पण होइल.
फक्त वेद्कालीन शब्द्च निवडले आहेत जे बर्याच संस्क्रुतीत दिसतात.
जसे स्तोत्रा, सुत्रा हे सर्व शब्द आर्य हे रा वा अत्रा म्हणजे Iranians चे colonial cousins अस्ल्याचे दर्शवितात.

नाही जागोमोहनप्यारे
या प्रकारे कुत्रा पण होइल.
फक्त वेद्कालीन शब्द्च निवडले आहेत जे बर्याच संस्क्रुतीत दिसतात.
जसे स्तोत्रा, सुत्रा हे सर्व शब्द आर्य हे रा वा अत्रा म्हणजे Iranians चे colonial cousins अस्ल्याचे दर्शवितात.

निलिमा,

मी अवेस्ता मधिल काही भाग देतो. मजेशीर आहे.

1. Ashem Vohu (1 & 3).
I profess myself a Mazda-worshipper and a Zoroastrian, opposing the Daevas, accepting the Ahuric doctrine

१३.I announce (and) carry out (this Yasna) for the Bounteous Manthra, the Asha-sanctified and effective, the revelation given against the Daevas; the Zoroastrian revelation, and for the long descent ['The long tradition;' so Spiegel.] of the good Mazdayasnian Faith

23. I would confess myself a Mazda-worshipper, of Zarathushtra's order, a foe to the Daevas, devoted to the lore of Ahura

हे Daevas म्हणजे देव ह्या वैदिक संस्कृती जवळ जाणारे आहे. ( no known Iranian dialect attests clearly and certainly the survival of a positive sense for [Old Iranian] *daiva-."[2] This "fundamental fact of Iranian linguistics" is "impossible" to reconcile with the testimony of the Gathas, where the daevas, though rejected, were still evidently gods that continued to have a following

हे Ahuric म्हणजे अहुर म्हणजे ह चा स लावून असुरच्या जवळ जाणारे आहे.

Zoroaster चा काळ इ स पूर्व १७५० ते १५०० असा आहे, फक्त भारतीय झोराष्ट्रीयन शाखा ६००० च्या आधीचा आहे असे म्हणते. ज्याला कुठलेही पुरावे सापडले नाहीत. देव हे ज्या जमातीचे शत्रू होते, त्यांचा देव अहुरा माझदा आहे. उलट भारतात मात्र खूप जुने पुरावे उपलब्ध झालेत.

म्हण्जे असे नक्कीच अनुमान निघते की भारतीय देव (वैदिक प्रजा) अन अहुरा माझदा ह्यांचे युद्ध झाले, व वैदिक देवांचा विजय झाला. अफगाण भागात सिंधू संस्कृती होती, तर अप्पर अफगाण, लोअर मिडल इस्ट मध्ये हे युद्ध शक्य आहे. आणि ते ही Zoroaster च्या जन्मानंतर. आपली हडप्पा, मोहंजदाडो ही संस्कृती Zoroaster पेक्षा जुनी आहे, ह्याचे पुरावे आहेतच. त्यामुळे अवेस्ता मधून वेदांना बघण्या ऐवजी वेदांकडून अवेस्ताला बघने उचित राहिल. तसेच आपल्या कडे जे आजचे झोराष्ट्रीयन आले ते बर्‍याच उशीरा आलेले आहेत, इ स पूर्व कालात नाही हे देखील लक्षात घेतले पाहिजे.

मी येत्या लेखात प्रि हडप्पन संस्कृती, ते पण आजच्या भारताचा भागात असलेली, विथ आर्टिफेक्ट देईल. त्याचा कालावधी अजून जुना आहे. एकंदरीत इन्ट्रेस्टिंग प्रकरण आहे. Happy

>.उलट भारतात मात्र खूप जुने पुरावे उपलब्ध झालेत.
जुने पुरावे कशाचे आहेत केदार? कसल्या स्वरुपात आहेत?

घोड्याच्या हाडा पासून, कानातल्या रिंगा, योगा करत असेलेली चित्रे, रंगकला, मातीकाम ते नदिच्या बाजूची शहरे. पुढच्या लेखात टाकतो.

>>>म्हण्जे असे नक्कीच अनुमान निघते की भारतीय देव (वैदिक प्रजा) अन अहुरा माझदा ह्यांचे युद्ध झाले, व वैदिक देवांचा विजय झाला.

exactly मलाही असेच वाटते. देव आणि असुर एकाच वेळी असावेत. मला असे वाटते की
Egyptians च्या मध्य काळात १५०० BC , Hurrians आणि पुर्व प्रांतातले लोक अग्नि आणि इतर देवांची पुजा करु लागले. यांच्याच २ जमाती देव आणि असुर असाव्यात.

zoroster हे ग्रीक नाव आहे.
त्याचे वैदिक नाव आहे झरतुष्ट्र.
zaratustra = zara-tustra
ustra म्हणजे पार्शीत तारा.
Zara म्हणजे काय ह्याबद्दल विवाद आहेत पण ditto झरतारी या शब्दासर्खे ते नाव वाट्ते.

>> अप्पर अफगाण, लोअर मिडल इस्ट मध्ये हे युद्ध शक्य आहे. आणि ते ही Zoroaster च्या जन्मानंतर.

बरोबर इथेच इन्द्र आणि असुरांची अनेक युद्ध झाली असावीत. पण त्यांच्यात रोटी-बेटी व्यवहार पण होते.

Pages