मेथी, टोमॅटो, कोथिंबीर

Submitted by admin on 9 July, 2008 - 21:50

घरी भाज्यांची लागवड.
या अगोदरचं हितगुज इथे वाचा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी मेथी लावली आहे आणि त्याला शेंग येते आहे. त्यामुळे झाड खुप खाली झुकते आहे. काय करु? बाकिची मेथीची झाडे अजुन लहान आहेत.
बेसील, भोपळी मिरची, टॉमटो आणि मेथी मस्त वाढत आहेत. तुम्हा सर्वाची पोस्ट वाचले आणि प्रयत्न केला.
139047.jpg139048.jpg139049.jpg

prr
तुल समुद्र मेथी म्हणतेस का आपली रोजची मेथीची?
मी मेथीचे दाणे लावल्यावर समुद्र मेथी येते जी नैका छोटी छोटी जुडी करून विकतात मुंबईत तशी.
पण मला ती मोठी मेथी हवीय.
कुणाला माहीतीय ती कशी उगवायची?

prr हलक्या हाताने दोरीने बांध कुठे तरी वर. म्हणजे झाडाला, शेंगेला आधार मिळेल.

झाडे चांगली उगवलीत पण मला टॉमेटोचे देठ लवचिक आणि कमजोर वाटताहेत. बहुतेक पुरेसे उन मिळत नसावे. मेथीला थोडी थंडी हवी. शेंग आल्यावर झाड वाढणार नाही. फुले आलीच तर शेंडे खुडावे लागतील.

टॉमेटो अन मिरच्यांची कुंडी पण फार लहान वाटते. कमीतकमी चार ते पाच गॅलन ची कुंडी हवी टॉमेटोला. मिरची ला अन बेसिल ला दोन-तीन गॅलनची पुरेल. भरपूर उन लागणार सर्वांना!

मनुस्वीनी...
मला समुद्र मेथी नाही माहित ग. इथे फार्म्रर्स मार्केट मध्ये मोठ्या जाड देठाची, मोठ्या पानांची मेथी मिळते.
पन माझ्या कुंडीत आलेली मेथीचा देठ, पाने लहान आहेत. ते टॉमेटोच्या कुंडीत दिसतेय ना एकच झाड मेथीचे तसे आहे.

चिनु ...
अग आता तरी एकच झाडाला शेंग आली आहे. पण अजुन १५-२० झाडे आहेत त्यांना पण काही दिवसांनी शेंग येईल असे वाटतेय.
तेव्हा काय करायचे? Happy

दिनेशदा ...
बरोबर ओळखलेत.... ऊन ४-५ तासच मिळतेय. पण टॉमेटोचे झाड खुपच वेगाने वाढतेय.
थंडी ...पुढ्च्या महिन्यापासुन चालु होईलच. आता पण आमच्या इथे तसे थंडच आहे. मेथीला थोड थंड वातावरण लागते माहीत नव्हते.
हो ...मेथीला पांढरे फुल आले आणी मग शेंग आली. हे खुडायचे म्हणजे नक्की काय करायचे? फुल आणी आजुबाजुची पाने काढुन टाकायची का?

शोनो...
हो ग कुंड्या(आईस्क्रिमचे डब्बे आहेत :P) लहान आहेतच. २ गॅलनच्या आहेत. मी आपले इथले वाचुन बिया टाकल्या आणी त्या रुजल्या. वाटले नव्हते एवढी पटापट मोठी होतील झाडे.
ऊन :(.... घरासमोर एवढी मोठी झाडे आहेत ना की फ्क्त दुपारीच येते ऊन.

समुद्रि मेथी खास मुंबईचीच. फक्त रेतीमधे ती छान होते. मेथी पेरुन तिला फक्त दोनच पाने आली असता खुडतात. खरे तर मूळापासून उपटतात. आणि त्याची भाजी फारच छान लागते. हवा पाणी कसेही असले तरी हि मेथी उगवते. साधारण चार दिवसात तयार होते.
शेंग येणारी झाडे खुडुन त्याची पाने वरणात आमटीत तशीच कच्ची टाकायची.

अच्छा!.....
शेंग आलेल्या झाडाची पाने पिवळी होत आहेत. बाकिच्या मेथीच्या झाडांना फुले आली कि लगेच खुडले तर झाड वाढत राहिल ना?

हो नक्किच वाढेल. चण्याच्या झाडाना पण असेच करावे लागते.

बाकिच्या सर्व मेथीच्या झाडांना फुले आल्यावर लगेच खुडले आहे. धन्यवाद!

नमस्कार!
मी पण घरच्या घरी काही झाडं लावलीयेत. त्यातल्या टोमॅटोच्या झाडाला ३ टोमॅटो लागलेत. Happy बेसिलच पण झाड मस्त वाढलय. मिरचीची रोप पण वाढतायत!
कोथिंबीरीला मात्र फुल येउन ती फारशी वाढत नाहीये. काय करावे?

फुले आलेली कोथिंबीर आणखी वाढणार नाही. हवी तर आताच वापरावी नाहीतर कोवळे धणे लागले कि ते खावेत. खुप गोड लागतात.

पण मग कोथिंबीर वाढवायची असेल तर काय करावे लागेल? त्याची पण फुले खुडुन टाकावीत का?

मेथी आणि कोथिंबीर फुलं लागल्यानंतर वाढत नाहित. शेंगा आलेली मेथी चवीला कडू लागते म्हणुन ती फुलं येण्यापुर्वीच वापरावी.

नलिनी
लॉन्ग टाइम नो सी? कशी आहेस ? आता येत जा वरचे वर

मला कढीलिंब लावायचा आहे. कुंडीत जमेल का? काय करायच? मिरच्या कुंडीत लावता येतात? कश्या?

कढीलिंब खुप वाढतो. म्हणुन तु छोटा असेपर्यंत कुंडीत ठेव. मोठा झाला की जमीनीत लावायला लागेल.
मिरच्यांची दोन रोपे कुंडीत चांगली वाढतिल.
सुकलेली मिरची चे बी काढुन कुंडीत लाव.

पण तो कुंडीत कसा लावायचा? कोणाकडून काडी घ्यावी लागेल का? आणी सुकलेली मिरची हिरवीच ना? की लाल चालेल?
अजून एक, लसूण ओलसर पेरला तर पात येईल?

सुरभी, कडीलिंबाचे रोप लावावे लागेल किंवा बी. कोणाकडे कडीलिंब लावला असेल तर त्याच झाडाच्या आजुबाजुला रोपे उतरतात. ते रोप नीट मुळापासुन उपटुन लावले तर तग धरते. तुम्ही कुठे आहात ? भारतात कडीलिंबाची रोपे नर्सरीत मिळतात.

मी लसणाच्या काड्या सुट्या करुन साल न काढता लावल्या होत्या, ओल्याच. चांगली पात आली होती. पुढे त्याला लसुण येतो की नाही कल्पना नाही कारण मी पातीसाठीच लावला होता.

मी भारतातच आहे. कडीलिंब नर्सरीत मिळतो माहीत नव्हते. एक स्नेही काडी देणार आहेत, लावून बघते. आमच्या इथे खारी आहेत २/३ त्या झाडे खावून टाकतात म्हणून लावली नव्हती. आता घरी असते तर लावू शकते.
लसुण मला पाती साठीच हवा होता.

अग सिंन्ड्रेला मला नाही समजले लसुण पातीचे ... नक्की काय लावायचे...काड्या की लसणाच्या पाकळ्या?

लसणाच्या पाकळ्या साल काढुन लावायच्या. साधारण २ सेंमी वर एक अशा उभ्या-आडव्या रेषेत लावायच्या.

लसणीची पाकळी पेरली तर त्याला फूल येते. मग त्यातल्या बिया पेरल्या तर लसणीचा गड्डा तयार होतो. लसणीच्या पातीचे सांडगे, चटणी व ऑम्लेट चांगले होते. उंधियुसाठी ती लागतेच.

आणखी सहज उगवणारी गुणी मंडळी
अळिव, याची पाने कोथिंबीरीसारखी वापरता येतात.
कारळे, सुंदर पिवळी फुले येतात.
मोहरी, पानांची भाजी होते.
रताळे, कोंब आलेला तुकडा पेरायचा. पानांची भाजी होते. पाने तव्यावर शेकुन घ्यावी लागतात.
कोनफळ, सुंदर वेल असतो.
पॅशनफ्रुट, बिया रुजतात. सुंदर फुले येतात (कृष्ण्कमळासारखी )
अरवी, अळुची पाने, भाजीसाठी वापरता येतात.
लाल भोपळा, फळ नाही लागले तरी पानान्ची भाजी होते. वेल खुप पसरतो. बिया सहज रुजतात.
गाजराचे वरचे कोंब. छान पाने व फूले येतात. बिया खाऊ नयेत.
बीटचे वरचे कोंब. पानांची भाजी होते.

हळद राहिली की या यादीत. ओली हळद पेरली की छान उगवते. पानं तूप कढवताना किंवा माशाच्या आमटीत घालता येतात. पातोळे करायला तर हळदीच पान लागतंच.

091017_Methi-1.jpg091017_Methi-2.jpg

इथे मेथी कधीकधी फारच वाईट मिळते. म्हणून घरी प्रयोग म्हणून मेथी लावून बघितली. एका महिन्यात एव्हढी झाली आहे. अजून वाढू शकेल का ती? कुंडी लहान पडेल की काय असं वाटतंय...(कुठेतरी वाचलं मेथीची पूर्ण वाढ व्हायला ४ महिने लागतात)
बाकी कीड वगैरे त्रास नाहीये (अजून तरी) पण कुंडीत चिलटांसारखं काहीतरी उडत असतं...त्यावर काही उपाय आहे का?

अळू कोणी लावलाय का? अरवी पेरल्यावर येईल? भाजीचा आणि वड्यांचा अळू यातला फरक कसा ओळखायचा?

मी पण स्वत इथील सजेशन प्रमाणे मेथी लावली शेवटी. ती पण थोडीफार एवढीच वाढली नी मी ती कापून पराठ्यात घातली. मला एवढी घाई ना खावून बघायची. पण त्यातील एक कुंडी मधली तशीच वाढली तर मला त्याची चव तेवढी ठीक नाही वाटली काय माहीती नाही मातीचा कस कमी झाला की काय एका महिन्यात पण ठीक लागली. तेव्हा कोणाला माझ्यासारखाच अनुभव असेल तर ज्यास्त वाढलेली मेथी चांगली लागत नाही?

वरच्या यादीत आलं राहीलेच ना. Happy

मेथीला नीट वाढायला थंडी लागते. घरची मेथी दोन पाने आली कि वापरली तर चांगली लागते, मग चरबट होत जाते.
कसूरी मेथी बर्‍याच वेळा एक चांगला पर्याय ठरते.
आल्याची पाळे पण चांगली रुजतात. त्या पानाना छान वास येतो, पण कुठल्या पदार्थात ती वापरल्याचे ऐकिवात नाही.
मेथी व मोहरी न पेरता छान लांब मोड येऊ द्यावेत. त्याची भाजी छान लागते.
अरवी ताजी असली तर नक्कीच रुजते. अरवी बघुन अळु कसा असेल ते सांगता येत नाही. पाने व देठ बघूनच ठरवता येते. वडीच्या पानांची चर्चा इथे हल्लीच झाली होती.

खरंतर कुंडीतल्या मेथीला शेतातल्या मेथीची सर कशी येणार? आपण मात्र आपली तहान कुंडीतल्या मेथीवरच भागवायची.

सयुरी, छान वाढलिय तुझ्याकडची मेथी.
...(कुठेतरी वाचलं मेथीची पूर्ण वाढ व्हायला ४ महिने लागतात)... चार महिन्यात मेथीदाणे तयार होतात.
महिन्या-दिड महिन्यात मेथी भाजीसाठी योग्य होते. फुलं यायला लागले की मेथी कडवट व्ह्यायला लागते.

अळू लावताना तो जास्त पाण्याच्या जागी लावतात. बर्‍याच ठिकाणी अळू हा सांडपाण्याच्या (धुण्याभांड्याच्या)जागी लावलेला आढळतो. तसेच ज्या पाण्याच्या दंडाला नेहमीचे वाहते पाणी असते तिथेही लावतात. अळू लावताना आळू मुळासकट (अरवीसह) डेर्‍यातून उपटून काढायचा. त्याला नुकताच फुटलेला कोंब सोडून ईतर पानं मुळापासून काही अंतर ठेवुन कापुन टाकयची. तर ही अशी रोप एक्-एक विताच्या अंतरावर जमिनीत मुळं बुजतील अशी लावयची. आजुबाजूची माती सगळीकडून ओढुन साधारण खड्ड्याचा आकार द्यायचा. त्यात भरपुर पाणी सोडायचे. ह्याच खड्डावजा जागेला अळूचा डेरा म्हणतात. ह्याला दररोज किंवा दिवसाआड पाणी देता येईल अशी व्यवस्था करावी. बघता बघता ५-६ रोपांपासुन केलेला डेरा वाढत जातो. मग आल्या गेलेल्यांना आपल्या परसातली अळूची पाने वानवळा म्हणून देता येतात.
कुंडीत लावयचा झाल्यास मध्यम आकाराच्या कुंडीत एक-दोन अळू लावता येतील.

लसूण लावताना पाकळ्या वेगळ्या करुन घ्यायच्या. त्या सोलायची गरज नसते. जमिनीत चिरी पाडून साधारण ३-४ बोटांच्या अंतराने त्यात ह्या पाकळ्या ठेवायच्या. त्याच्याच शेजारी ३ बोटांच्या अंतरावर दुसरी चिरी घ्यायची. हि चिरी घेत असताना पहिल्या चिरीवर आपोआप माती लोटली जाते. पहिल्याप्रमाणेच ह्यात पाकळ्या ठेवायच्या. लावलेल्या पाकळ्या पुर्णपणे जमिनीखाली राहतील अश्या बेताने लावयचे. पहिल्यांदा पाणी घालताना शिंपुन घालवे म्हणजे लावलेला असुन माती बाजुला सरकुन उघडा पडणार नाही. आठवड्यातुन एकदा ह्याप्रमाणे पाणी द्यावे.
सुरवातीला कोवळी पात येतान दिसू लागते. पुढे ती वाढत जाऊन रंगानेही गर्द होत जाते. खाली लसूण पुर्ण वाढला हे समजायची खुण म्हणजे पातिचा रंग पिवळसर व्ह्यायला लागतो व पात अंग टाकायला सुरवात करते.

सवडीने कांद्याबद्दल लिहिन. (ह्यापुर्वी लिहिलेय का पहायला हवे.)

Pages