मेथी, टोमॅटो, कोथिंबीर

Submitted by admin on 9 July, 2008 - 21:50

घरी भाज्यांची लागवड.
या अगोदरचं हितगुज इथे वाचा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साधना, धन्यवाद. पण आम्ही भाड्याच्या घरात राहतो, त्यामुळे खुप खिळे वगैरे ठोकु शकत नाही.

मी मोठ्या हौसेने माती वगैरे आणुन वांगी, टोमॅटो लावले. नुसतेच रान वाढले. एक टोमॅटो किंवा वांगे लागले नाही. जिथे लावले तिथे उन जरा कमी मिळते.
त्यामानाने माझ्या गच्चीत लावलेल्या वांगी, टोमॅटो ला चांगली फळे धरली. आताही दोन वांगी आहेत झाडावर. उद्यापरवा काढुन भाजी करेन. टोमॅटो काढुन टाकला, त्याजागी मिरची पेरलीय. एक रोप आलेय...

दिनेश, माझ्याकडे सिताफळाचे रोप चांगले दिड फुट मोठे झालेय. ते मोठ्या कुंडीत लावले तर फळ धरेल काय? मला आशा वाटतेय खुप.. रोप अर्धाफुट होते तेव्हाच त्याला फुले येत होती.. Happy अर्थात फळॅ धरणार नाही मला माहीत होते, पण फुले बघुन खुप आश्चर्य वाटले. मी टाकलेल्या बियांमधुन हे रोप उगवलेय.. तिन फुट उंचीचे एक प्लॅस्टिक पिंप आहे माझ्याकडे. त्यात हे रोप लावायचा विचार करतेय. त्याआधी ताराला जाऊन गांडुळ विकत आणेन..

जागु, मी भेंडी लावलेली सहा महिन्यापुर्वी. पाचसहा रोपे होती. दोनदा पावपाव किलो भाजी मिळाली. नंतर मुंग्या लागल्या. Sad मग तिथे वांगे/टोमॅटो लावले. गवारीची रोपे आणी गवारही आली. पण एकदोनच रोपे त्यामुळे भाजी फारशी मिळाली नाही. बेलापुरला माती घेतली तर बहुतकरुन मुरुमच विकत मिळतो माती म्हणुन Sad

आता गच्चीतली शोभेची झाडे काढुन तिथे भाजी लावायचा उद्योग सुरू करणार आहे. ब-याच वर्षांपुर्वी गांडुळे आणुन मस्त झाडे बनवली होती. आता तो प्रयोग परत सुरू करायचा विचार करतेय. गेले ४-५ वर्षे बागकाम केलेच नाहीये...

साधना मुंग्या आल्या की किटक नाशकच फवारायच पण प्रमाण कमी घ्यायच किटक नाशकांच.

अग आणि सिताफळाच झाड तुला खाली जमिनीतच लावाव लागेल. कारण त्याची मुळ खाली जाऊन रोपही वाढत डाळींबासारख.

साधना, अगं एवढी गच्ची आहे तर गांडूळ खताचा पिंजरा ठेव की... स्वयंपाकघरातल्या कचर्‍याचं रुपांतर खतात करायचं..

साधना अग तु मासे आणलेस ना की ते धुतलेल पाणीही त्यांना घाल. ह्याचा चांगला प्रभाव पडतो.
तसच आपण कडधान्य भिजत घालतो त्याच पाणि, बटाटा उकडल्याच पाणी ह्याने सुद्धा झाडांचे पोषण होते.

अगं मी हे सगळे करायचे. भरपुर गांडूळे होती.. पण रिनोवेशन्च्या वेळी शेजा-याच्या बागेत जमिनीवर ठेवली आणी गांडूळे कुंड्या सोडुन पसार झाली. मग काही केलेच नाही ६-७ वर्षे. आता परत सुरू करते उद्योग. रिकामपणाची कामगिरी... Happy

अगं जिथे लावलेली भाजी ती जागा बेक्कार होती. मी दोन्-तिनदा फवारणी पण केली. पण मुळात उन कमी, मातीही खास नाही.. माझ्या कुंड्यांमध्ये जास्त चांगले रिझल्ट्स आले आहेत. त्यामुळॅ आता जमिनीचा नाद सोडला, आता परत कुंड्या झिंदाबाद...
जमिन नाहीय Happy सिताफ्ळ प्लॅस्टिक पिंपात लावायचा उद्योग करुन पाहते.... त्याला गांडूळखत घातले तर नक्कीच काहीतरी पॉजिटीव होईल. राणी बागेत पाहिलेय गांडूळखताचे परिणाम.. दोन दोन फुटी कुंड्यातल्या वेलींवर १०-१२ भोपळे.. Happy

वरच्या फोटोतली कीड म्हणजे मावा आहे. आभाळ भरून आले की हि किड हमकास पडते. झाडाची पानं अगदी चिकट आणि काळी पडतात ह्याने.

आणि कढीलिंबावरही येते ही किड

माझ्या कढीपत्त्यावर फुलपाखरे अळ्या घालतात, मग त्याचे आधी चिमणीच्या शिटीसारखे बारिक केसाळ किडे आणि मग एक-दिड इंच लांबीचे हिरवेगार लांब किडे होतात... आणि पाने खायचा काय स्पीड असतो त्यांचा. वा.. अगदी भसाभसा कढीपत्ता खातात... आणि ह्या हिरव्याकार किडी दिसतही नाहीत पानांतुन. मी पानांसकट त्याना काढते झाडावरुन आणि कावळ्यांना खायला घालते.. माझ्याकडे सकाळी खानावळ उघडलेली असते.. कावळे, कबुतरे, चिमण्या, टिटव्या आणि मांजरे... यांना कशाचेही वावडे नाही. आणि मी जर दिले नाही तर एवढा कलकलाट करतात की वैतागुन त्यांची तोंडे बंद करण्यासाठी द्यावेच लागते खायला..

सनबर्डस येतात तेव्हा मात्र मी अगदी लपुन बघते त्यांना. जराही चाहुल लागली की पळतात ते. पण ते मानवनिर्मित काही खात नाहीत. फुलातला रस चोखायचा आणि पळायचे.....

आज भरली वांगी केली. बाजारची चार आणि घरची दोन. इतके बरे वाटले आपली वांगी तोडून आणताना. परत सगळे सुरू करायचा उत्साह दुणावला. आता रविवारी कर्नाळ्यावर स्वारी करते आणि येताना तारागावातुन गांडूळ आणुन शुभस्य शीघ्रम करते.. सिताफळ इतके छान वाढलेय की त्याला वाया घालवायला जीवावर आलेय. पिंपात लावून जगवणारच आता.. Happy

थोड्याच पानांवर किड पडली असेल तर पाने काढुन टाकता येतात. अर्थात थोडीच झाडे असतील तर ही मात्रा लागु पडते. नाहीतर मग औषध फवारावेच लागते...

मेधा लिंकबद्दल धन्यवाद.

या महिन्यातल्या 'ग्राहक'च्या यादीत 'बायोकल्चरचे' पण वाटप दिले आहे. इच्छुकांनी अवश्य लाभ घ्यावा.

('ग्राहक' ही मुंबई ग्राहक पंचायतीची घरगुती सामान 'ना नफा ना तोटा' या तत्त्वावर उपलब्ध करून देणारी शाखा आहे.)

साधना सिताफळ जमिनीत लावावे लागेल, फूले आली तरी फळे धरणे कठीण आहे. पण सिताफळाला जनावरे खात नसली, तरी पांढर्‍या ढेकणांचा त्रास होतो.
ते वरच्या फोटोतले किडे आहेत, त्यांचा संभाळ मूंग्या करतात (अगदी काळजी घेतात. ) म्हणुन तिचा बंदोबस्त वेळीच करावा लागतो.
साधना, त्या फूलपाखरांच्या अळ्या हिरव्या झाल्या कि कोष करतात. सात आठ दिवसानी, अगदी सकाळी तो हिरवा कोष काळा होतो. मग त्यातून फुलपाखरू बाहेर येते. आधी पंख गुंडाळलेले आणि ओले असतात. ते फुलपाखरु चालत ऊन लागेल अश्या जागी येते. हळु हळु पंख सुकतात. उलगड्तात. मग ते फडफड करुन आणखी वाळवते. आणि मग उडून जाते. हि सगळी प्रोसेस एकदातरी बघण्यासारखी असते.
मी येताना बिया आणतोच आणतोच आहे, सगळ्यांचीच मागणी आहे.

दुधी भोपळ्याचे वेल बराच वाढलाय, बरेच छोटे दुधी लागलेत. पण अगदी छोटे असतानाच पिवळे पडत आहेत Sad
दररोज पाणी घालतो,तरी असं कशामुळे होत असेल?

भाग्य, ते दुधी होण्यास उत्सुक असलेले मादी फुल असेल, त्याच्यावर परागसिंचन झाले नाही की मग पिवळे पडुन गळुन जातात. मागे दिनेशनी लिहिलेय तसे नरफुलातले पू़ंकेसर बारिक पेंटब्रशने ह्या फुलावर शिंपडून बघ काही फायदा होतो का?? मी एकदा करुन बघितलेले, आणि फळे धरलेली Happy

गवारीच्या बीयांपासुन guar gum काढतात जो ब-याच ठिकाणी वापरला जातो..

ही वेबसाईट पहा. मला ही पाहुन खुप आशा वाटायला लागलीय, माझ्या गच्चीतही सिताफळे लागतील म्हणुन. हे लोक दर रविवारी सकाळी ७.३० ला माहिम नेचर पार्कमध्ये भेटतात, मी काल जाणार होते, पण आयत्या वेळी कर्नाळ्यावर जायचा प्लॅन बनला आणि मग हा प्लॅन पुढच्या रविवारसाठी ठेवला. आता थेट २५ जुलैलाच जाता येईल मला..

http://natuecocityfarming.blogspot.com/2010/04/fruits.html

दिनेश ती प्रोसेस मी पाहिली नाही कधी.. पण फुलपाखरे उडुन गेल्यावरती रिकामे राहिलेले कोष पाहिलेत झाडांवर Happy

इथे डिसेंबरात पांढ-या ढेकणांचा खुप त्रास होतो. नक्की ढेकुण का काय्माहित नाही, पण हे किटक उडतात. पेरुच्या पानांमागे, सिताफळाच्या पानांमागे, आणि इतर्ही ब-याच झाडांवर ही पांढरी पुड अगदी भरपुर पसरलेली असते आणि वर सगळ्या वातावरणात भरुन उडत असते.... Sad

भाग्य दुधीचा वेल जमीनीत आहे की कुंडीत ? जर कुंडीत असेल तर कुंडी मोठी हवी. जमीनीत असेल तर खत व किटकनाशक फवारा.
दिनेशदा त्या फुलपाखरांच्या आळ्यांना आम्ही सुरवंट म्हणतो. इतके भयानक दिसतात ते केसाळ किडे पण नंतर त्यापासुन सुंदर फुलपाखर तयार होतात. माझ्या आईकडे कृष्णकमळाचा वेल होता त्याचे पान अन पान ह्या अळ्या खायच्या. आम्हाला त्या वेलीजवळ जायला पण भिती वाटायची.

साधना, सिंड्रेला आणि जागु धन्यवाद!
जागु, वेल जमिनीतच आहे. घरी तयार करत असलेले काँपोस्ट घालतो. वेलाची पानं तजेलदार आहेत, कीड दिसत नाही, म्हणून किटकनाशक फवारायला नको वाटतं.
सिंड्रेला, अगं ईथे सध्या खूप ऊन असतं दिवसभर, म्हणून रोज पाणी घालतो. पण आता एक दिवसाआड घालून बघते फरक पडतो का ते.
साधना, तु सुचवलेला उपाय करुन बघते Happy

जागू, फूलपाखराच्या अनेक प्रकारच्या अळ्या असतात. साधना म्हणतेय त्या कडीपत्ता आणि लिंबावर वाढतात, त्यांच्या अंगावर केस नसतात. (साधना आता फोटो काढायला पाहिजे)
गवार गम, र्‍हुदयासाठी चांगला. बिस्किटे मधे वगैरे वापरातात.
साधना धारावीचा नेचर पार्क ना (धारावी बेस्ट डेपोच्या समोर आहे. मस्त जागा आहे. आत गेल्यावर आपण मुंबईमधे आहोत असे वाटतच नाही.)

हो दिनेश.. तिथे जायचे मी गेले ८ वर्षे नुसते ठरवतेयच.. आता प्रत्यक्षात येईल... २५ जुलै ला जाणार आहे.. Happy

आता अळी तयार झाली की टाकते फोटू.. आता मौसम नाहीये.. ऑक्ट. नोव्हेंबरला येतील परत फुलपाखरे अंडी घालायला. ती अळी फक्त कडीपत्ता/ लिंब वगैरेवरच वाढते.

अळीचा फोटो नाहीये, पण त्याच्या आईचा तो टाकते आज रात्री.. Happy त्या हिरव्या अळ्या मस्त आहेत तशा दिसायला. नाकावर एक बारिक लाल ठिपका असतो. मी काडीने अळीला त्रास दिला की तो ठिपका रागाने अजुनच लाल होतो Happy

माझ्या कुंडीतल्या वांग्याला काय वांगी लगडताहेत... आतापर्यंत ६-७ वांगी काढुन झाली, काल बघितले तर अजुन ३ वांगी in the making.. फोटो टाकला असता पण घरच्या कॉम्प मध्ये भरपुर वायरस घुसलेत म्हणुन भाऊ कॅमेरा जोडायला देत नाहीये Sad

साधना, मस्तच गं कुंडीत वांगी म्हणजे ! केवढ्या मोठ्या कुंडीत लावलंयस रोप?
गवार, टॉमेटो येतात का कुंडीत?

अश्विनी अग गवार, टोमॅटो, मिरची, वांगी सहज होतात कुंडीत. कारण ह्यांची मुळ जास्त पसरत नाहीत. पण गवार दोन तिन कंडीत किंवा एखाद्या ट्रे मध्ये लावावी लागेल. एक भाजीएवढी एकावेळी होण्यासाठी.
दिनेशदा, साधना छान माहीती.

Pages