Submitted by admin on 9 July, 2008 - 21:50
घरी भाज्यांची लागवड.
या अगोदरचं हितगुज इथे वाचा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
घरी भाज्यांची लागवड.
या अगोदरचं हितगुज इथे वाचा.
प्राची तंबाखु की तंबाखुचं
प्राची तंबाखु की तंबाखुचं पाणी, पण वापरतात पण कुठल्या झाडांना घालावी वगैरे डिटेल्स मला माहित नाही..शोधून पहा. आणि जर तुम्हाला खतच वापरायचे असेल तर मग ते जिकडून रोपे वगैरे घेत असाल तिथे माहिती मिळेल. मी घरगुती झाडांना शक्यतो मिरॅकल ग्रो वगैरे वापरत नाही.
धन्यवाद वेका .... बघते आता
धन्यवाद वेका .... बघते आता तंबाखु कुठे मिळेल ते ... नाहीतर सरळ रोपे आणली तिकडे विचारेन... मला पण जरा घरच्या झाडांना केमिकल्स वापरायची नाही आहेत.... पण चांगली वाढलेली झाडे डोळ्यासमोर खराब होताना बघवत नाही...
तंबाखूचे पाणी वापरणार असाल तर
तंबाखूचे पाणी वापरणार असाल तर सोलॅनेसी फॅमिलीतील झाडांना ( टोमॅटो, मिरच्या, बटाटे वगैरे) वापरु नका. टोबॅको मोझाइक वायरस चा प्रादुर्भाव होऊ शकतो.
थंडी पडली म्हणून कढीपत्त्याचं
थंडी पडली म्हणून कढीपत्त्याचं कुंडीतलं रोप घरात आणलं आणि त्याला कीड लागली.सगळ्या फांद्या गळून गेल्या.आता फक्त हिरवं खोड शिल्लक आहे.ते पण काळं पडू लागलंय.प्रयोग म्हणून थोडं मीठाचं पाणी पण फवारलं होतं पण उपयोग झाला नाही.अजूनही काही करता येईल का गेलं ते झाड?
मला हे सगळंच आवडलं. त्याचं
मला हे सगळंच आवडलं.
त्याचं काय झालं. आमच्या इथे आता सफाई कर्मचारी यायचे बंदच झालेत. मग कचर्याची विल्हेवाट आपल्यालाच लावायला पाहिजे. म्हणून कचर्यापासून कॉम्पोस्ट खत कसे बनवावे ते शोधत होतो. सगळ्या पोस्ट एकदा निवांतपणे वाचून काढतो.
Sharad, you can try
Sharad, you can try contacting 9765999500 or swachcoop@gmail.com.
I have only this much info...
Please post your experience after you contact them.
Can't type in Devnagari... sorry...
Contact person of "Swach" for
Contact person of "Swach" for Pune - Mr. Kiran Jadhav - 9765999540.
their office is inside kothrud kachara depot.
हेल्लो मी १ फूट व्यासाच्या
हेल्लो
मी १ फूट व्यासाच्या कुंडीत दोडक्याची वेल लावली आहे.
त्याला खुप फुले येतात ..
लहान लहान फले येतात २-३ इन्चच वाढतात, पन सुकुन जातात .... ब्रशने त्याचे परागीभवन सुद्धा केले....
पन काही फरक नाही.....
प्लीज कोनी उपाय सुचवेल का?
वेल आणखी जोमदार वाढायला हवा.
वेल आणखी जोमदार वाढायला हवा. वरती दोरीवर वगैरे चढवता आला तर छान. फुलांपैकी बरीच फुले नरफुले असणार. थोडेफार जैविक खत देता आले तर छान.
मी लावलेल्या टोमॅटो च्या
मी लावलेल्या टोमॅटो च्या रोपावरची पहिली कळी उमलली आज.. खूप आनंद झाला
१०० ग्राम मेथीच्या बिया
१०० ग्राम मेथीच्या बिया वापरून मी हैड्रोपॉनिक्स तंत्राद्वारे घरी अवघ्या ७ दिवसात बनवली ८५० ग्राम भाजी
_____________________________
दिवस १ला - रात्रभर भिजत घालून मोड़ आलेली मेथी ट्रे मध्ये ठेवली
___________
पुढील २ दिवसात झालेली वाढ -
आणि ही ५व्या दिवशी असलेली स्थिती -
_______________
७व्या दिवशी ट्रे मधून काढण्यापूर्वी -
____________________
आणि ही झाली ४ जणांना पुरेल इतकी मस्त सकस कोवळी भाजी (वजन ८५० ग्राम)
ह्याच्या नंतर सहज प्रयोग
ह्याच्या नंतर सहज प्रयोग म्हणून हरभरासुद्धा करून पाहिला. त्याला मात्र पाला मिळेल इतक्या वाढीसाठी १० दिवस लागले -

ह्याचीही लुसलुशीत पानांची भाजी खुप टेस्टी लागली.
खूप छान आलीये मेथी आणि
खूप छान आलीये मेथी आणि हरभऱ्याची भाजी
<हैड्रोपॉनिक्स तंत्राद्वारे >> ही खूप भारी टेक्निक आहे. Microgreens साठी उपयुक्त. एकदा ट्राय करायची आहे. सध्या सगळ soil medium मध्येच सुरू आहे.
हाइड्रोपॉनिक्स = मातीवीना
हाइड्रोपॉनिक्स = मातीवीना शेती
एकदम मस्त तंत्रज्ञान आहे
सहज आणि सोप्पे
@श्रद्धा - नक्की वापरून पहा.
विटामिन इ भरपूर असलेला गव्हांकुर ज्यूस आरोग्य वर्धक असल्याने मी ह्या टेक्निकने गव्हांकुर बनवतो ७ दिवसाचे रोटेशन सायकल
आणि भाजीसाठी मटकी, चवळी, हिरवा मुग, मेथी आणि हरभरा करतो.
मुळा, बिट आणि रताळ्यासाठी अक्वापॉनिक्स द्वारे प्रयास सुरु आहेत.
श्रद्धा - नक्की वापरून पहा.>>
श्रद्धा - नक्की वापरून पहा.>> मेथी पासून सुरवात करतेय भिजवल्या बिया आताच.
पालक साठी बहुतेक उपयोगी नाही ही पद्धत.
अंबज्ञ, खूप छान वाटले असेल ना
अंबज्ञ, खूप छान वाटले असेल ना!
रच्याकने ही मेथीची टोपली घरातच ठेवलीत की बाहेर उन्हामधे ठेवलीत?
देवकी ह्या टेक्निकला उन नसले
देवकी - हो
खुप भारी वाटते स्वत: पिकवलेली ऑर्गेनिक भाजी खाताना !
हाइड्रो पॉनिक्स टेक्निकला उन नसले तरी चालते त्यामुळे इन डोअर पिक घेता येते हां सर्वात मोठ्ठा फायदा आहे.
७ ते ९ दिवसासाठी उन नसले तरी चालते. हरभरा नक्की किती दिवसात मोठा होईल ते पहिल्या खेपेत अंदाज नव्हता म्हणून ८व्या दिवशी त्याचा ट्रे सकाळी ७ ते ११ मी खिड़कीत कोवळ्या उनात ठेवलेला.
श्रद्धा - पालक , कोथिंबीर वगैरेसाठी एक्वा पॉनिक्स तंत्रज्ञान वापरावे लागेल.
हैड्रोपॉनिक्स म्हणजे नक्की
हैड्रोपॉनिक्स म्हणजे नक्की काय घालता तुम्ही अंबज्ञ ? डिटेल्स सांगा की. तुमची शेती छान आहे.
नुसते पाणी आहे त्या खालच्या
नुसते पाणी आहे त्या खालच्या परातीमध्ये, बाकी काहीच एडिशनल घालावे लागत नाही, हां ह्या टेक्निकचा अजुन एक फायदा !
फक्त ते पाणी वरच्या ट्रे पासून २ बोटे खाली असायला हवे नाहीतर अगदी चिकटुन ठेवले की देठाकडे फंगस/बुरशी होते (जे अर्थातच हानीकारक आहे) आणि मग भाजीला विचित्र वास येतो. हाइड्रो पॉनिक्ससाठी पहिले ३ दिवस दिवसातून ३ ते ४ वेळा सलूनमध्ये पाण्यासाठी स्प्रे असतो तश्या स्प्रेने पाणी फवारावे लागते. (कमर्शियल लार्ज स्केल टेक्निक मध्ये हे टाइमर लावून ऑटोमेटिक होत राहते)
धन्यवाद. माझ्याकडे सॅलड
धन्यवाद. माझ्याकडे सॅलड फिरवून स्वच्छ करायचं भांडं आहे. त्यात प्रयत्न करून पाहते.
कुणी वरच्या प्रमाणे मेथी
कुणी वरच्या प्रमाणे मेथी करून पाहिली आहे का? माझ्या मेथीला मोड आले आहेत, अगदी छोटी पाने पण. एकच आहे, कितीही नीट rinse / drain केले तरी थोडा चिकट पणा जाणवतो आहे. कोणी सांगू शकेल का काय करायचे ते?
टोमॅटो च्या रोपाला भरभरून
टोमॅटो च्या रोपाला भरभरून फुलं येतायेत पण ३-४ दिवसांत सगळी सूकून गळून पडतायेत.
काय करू ? Is it normal ???
हे नॉर्मल नाही. माझ्या मते
हे नॉर्मल नाही. माझ्या मते potassium कमी पडते आहे.
पिकलेले केळ सालीसकट मातीत खड्डे करून द्या. वर मातीचा चांगला जाड थर असुदे नाहीतर अळ्या होतील.
नुसती साल २-३ दिवस पाण्यात भिजवून ते पाणी दिले तरी चालेल.
कुंडी किती मोठी आहे? की जमिनीत आहे?
झाडाची जमिनिजवळची पाने काढून टाका. तशीच खूप मोठी झालेली पानेपण. कधी कधी बेचक्यातून फांद्या मोठ्या होतात. त्या काढाव्यात. त्या पाण्यात ठेवल्या तर मुळे फुटून नवीन रोप तयार होते. या फांद्या आणि पाने झाडाची energy घेतात. त्यामुळे फळ धरत नाही.
या फांद्या आणि पाने झाडाची
या फांद्या आणि पाने झाडाची energy घेतात. त्यामुळे फळ धरत नाही.>>>> अच्छा! तरीच मिरचीला फक्त १ किंवा २ मिरची आली. नंतर फुले येऊन गळून जात आहेत.
या सीझनमध्ये आल्याचा,डोळे असलेला एखादा तुकडा पेरा.बीटाचाव्खालचा भाग एक दिवस पाण्यात ठेऊन दुसर्या दिवशी पेरला तरी छान पाने येतात.
Thanks chioo. .
Thanks chioo. .
कुंडीत नाही . मी प्लास्टिक च्या पिशवी त लावले आहे. नंतर फोटो डकवेन .
श्रीखंडाचा डबा , मग छोटी बादली आता पिशवी.
Lockdown 2 पासून सुरुवात केली होती. रोप छान वाढले आहे.
जून्या फांद्या , पानं मी नियमित काढते.
केळ्याची साल टाकून पहाते
Pages