मेथी, टोमॅटो, कोथिंबीर

Submitted by admin on 9 July, 2008 - 21:50

घरी भाज्यांची लागवड.
या अगोदरचं हितगुज इथे वाचा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या घराला तीन लहान खिड्क्या आहेत. मला मेथि लावायची आहे. अजुन कुठली झाड नीट वाढ्तील?

I read all pages on this subject. It is not so hard to grow tree at home.

I have grown more than 120 types of trees/bushes in my balcony. I have photographs of all these trees arranged in a pdf file with marathi names of all. which i can send to them with procedure what I do to grow them.

If any body is interested in HOW TO GROW can mail me on jaivikfertiz@live.com

अगदी कमी जागेत भाज्या वाढवता येतात का?
माझ्या बाल्कनीच्या बाहेरच्या ग्रिलबॉक्समधे जागा आहे, तेवढीच. पण कुठेसं वाचलं होतं, त्याप्रमाणे ओल्या कचर्‍यात कल्चर टाकून, त्यातच झाडं लावली तर पुष्कळ जागा वाचते म्हणे. त्याबद्दल कुणाला काही माहिती आहे का? दुवा वगैरे मिळेल का?

इथे बघ. आरती अशा भाज्या लावत असते. पालेभाज्या लावल्याचं ऐकलं नाही कधी पण फळभाज्या आणि फळझाडं लावते. तिला विचार (किंवा ती येइलच इथे थोड्या वेळाने :))

हाय हो मी इथे पण Happy
एक माहिती हवी आहे.

माझ्याकडे तीन छोट्या क्युट मेट्ल च्या कुंड्या आहेत त्या खिड्कीत ठेवून त्यात काहीतरी पेरायचे आहे. काय पेरावे? फार्मविल ला पाठवू नका.

दुसरे, आमचे आगावू शेजारी त्यांची गार्बेजबिन आमच्या साइड्ला ढकलतात. ते आक्रमण थांबविण्यासाठी
३ - ४ मोठ्या गमल्यात झाडे लावावीत व दारात ठेवावीत असा प्ल्यान आहे. त्यामुळे आमच्या घराचे प्रवेश द्वारही चांगले दिसेल. तर ती कुठ्ली झाडे लावू?

मी १०-१५ दिवसांपूर्वी होम डेपोमधून एक गुलाबाचे झाड आणले आहे.घरातल्या सनरूममध्ये एका हँगींग कुंडीत लावले आहे.घरी आणाले तेव्हा त्याला ६-७ फुले,३-४ कळ्या होत्या.पण हळूहळू एक एक फुल आणि कळी सुकून गेली.
आमच्या सनरूममध्ये ऊन येत नाही पण भरपूर उजेड असतो. हा विचार करुनच मी इनडोअर सेक्शनमधले झाड घेतले.उन्हाव्यतिरिक्त काय कारण असावे?

मामी
त्या बारक्या कुंड्यांमधे लावायला
अस्पॅरगस, बेबीज टीअर्स, मेडन हेअर फर्न, बॉस्टन फर्न, पेपरोमिया च्या व्हरायटी हे शोभतील. नाजूक पानांची झाडं आहेत ही.

दारापाशी गमल्यामधे लावायला रंगीबेरंगी क्रोटन ( वर्षभर रंग राहील ) , उभे वाढणारे जास्वंद हे सोपे, सहज मिळणारे ऑप्शन्स आहेत. गुलाब देखील लावता येतिल पण त्याला देखभाल चिकार लागते.

तुळशी वृदावनच लावलेत तर अतिक्रमण एकदम थांबेल बहुतेक.

आर्च , माझ्याकडे गेली दोन वर्षे बिया रुजतात पण ऑक्टोबर पर्यन्त रोपं सुकुन गेलीत. मी बिया पेरल्यापासून कुंडी घरातच ठेवते पण साधारण फ्रॉस्ट पडायला लागलं की झाडं मान टाकतात. काही कारण कळलं नाही. यावर्षी स्वातीने दिलेया बिया पेरुन पहाणार आहे काही फरक पडतो का .

मामी दरवाजा पॅसेज्मध्ये उघ्डत असेल तर तिथे उजेड नसेल फारसा. क्रोटॉन्स, मॉस स्टीकवर चढवलेले मनीप्लँट, रबर प्लँट असे लाऊ शकतात. थोडा जास्त उजेड असेल तर पाम्स सुंदर दिसतील.

छोट्या कुंडीत लावयला मेधाने वर सांगितलेले 'बेबीज टीअर्स' माझी पहिली पसंती. एक पात्या-पात्यांचं ऑर्कीड येते - काळजी घ्यायला अगदी सोपे. गणेशवेल पण खीडकीच्या ग्रीलवर चढवू शकता.

धन्यवाद. करून बघते. सध्या छोट्या कुंड्यातन चमचे ठेवलेत डायनिन्ग टेबलावर. मला घराचे प्रवेश द्वार सुशोभित करायचे आहे पार मेकोव्हर. Happy आता करतेच. दार फक्त हॉल मधे उघड्ते बॉस. अपार्ट्मेन्ट आहे. मला बाग व कुत्र्यांसाठी तरी अमेरिकेतील मोठे घर असावे असे फार वाट्ते. असावा सुन्दर उसगावात बंगला. चंदेरी सोनेरी चमचमता चांगला.

पूर्वा गुलाबाचे झाड इनडोर प्लान्ट्स मध्ये येतच नाही. माझ्या मते तरी गुलाबाच्या झाडाला डायरेक्ट सुर्यप्रकाश लागतो. भर्पुर पाणी आणी व्यवस्थीत प्रमाणात खत.
खुपच लाड करावे लागतात त्याचे. ह्यांगीग न ठेवता जमिनीत लाउन बघ. कळे सुकले असतिल तर कैचीने पानापर्र्यंत कापुन टाक. म्हणजे नवीन पालवी येइल.

मामी घरातल्या छोट्या कुंड्यांसाठी सहज मिळत असतील तर थाईम, मार्जोरम ( म्हणजे आपला मरवा, तोच शालू हिरवा बरोबर तिपेडी वेणीत असणारा ), बेसिल, रोझमेरी, सेज, ओरेगानो असे हर्ब्ज लावता येतील. स्वैपाकात वापर जरी नाही झाला तरी पानं नाजूक, सुंदर दिसतात अन वास पण छान येतो.

मामी, मेटलच्या कुंड्या उन्हात गरम होतील, व झाडाना अपाय होईल.
तसेच आपल्याकडे लावायला, सबजा (याच्या पानाना आणि तूर्‍याना खासच सुगंध येतो.) अळिव चांगले आहेत. यांचीहि पाने उपयोगी पडतात. गाजर, बीट, शलजम, मुळा यांचे वरचे काप लावले तर सहज रुजतात. मोहरी, बडीशेप पण उगवते. पुदिना पण लावता येतो.
ओडोमॉस नावाचे एक झाड असते, त्याने डास येत नाहीत. कोरफड पण लावता येते. अननसाच्या वरचा शेंडा लावला तर तोही रुजतो.
आर्च भारतात तरी (आणि आफ्रिकेत देखील) झाडाच्या मंजिर्‍या खाली ताकत गेले, कि आपोआप तुळशीचे रोपे येतात. फोटोतल्या प्रमाणे. पण बिया आणून, टाकल्या तर उगवण फारच कमी येते.

मी फोटो घेऊन टाकते. काय प्रकार आहे माहित आहे का? दुपार पासून ते साडे सहा परेन्त त्या खिडकीतून मस्त उन्हे येतात. तिथेच जेवायचे टेबल आहे. व हा संगणक. घरातील सेंट्रल जागा आहे. माझा मेन प्लान त्या खिड्कीला घराचा एक फोकल पॉईंट बनवायचा आहे. तीन काचांवर ग्लास पेंट्स ने रंगवायचे. म्हण्जे उन्हे पड्लीकी सुंदर दिसेल व रंगच रंग येतील. मग खिड्कीत ब्लॅक ग्रनाइट ची पट्टी आहे त्यावर हे प्रीटी गमले ठेवायचे व त्यात प्रीटी हिरवाई. - आपला समर प्रोजेकट हो. तुम्ही सांगितल्या प्रमाणे झाडे आणते. मेन दारावर
ते वारली चित्रे असतात ना तशी चित्रे पण सुन्दर दिसतील की नाही व गमल्यांच्या पायात मार्बल चे चिप्स टाकायचे.

तुम्हासर्वांना बागकामाची किती माहिती आहे वा वा. ग्रेट

मेधा, मरवा मिळाला ना तर स्वर्ग. कारण आमच्या परफ्युमरीत मरव्याला अगदी उच्च स्थान आहे. अगदी
मोहक नादावणारा गंध असतो नाहीका त्याचा.

दिनेशदा तुमची सजेशन बरोबर आहे. आत छोट्या मातीच्या कुंड्या घेते. very thought ful of you. Our summer is horrible. even people wilt.

मामी , मरवा मिळायला हवा हैदराबादेत. माझ्या सासू बाई म्हणत होत्या की मरव्याचं बी हजारो रुपये पर पाउंड असतं अन बरेच लोक त्याची कमर्शियल लागवड करत आहेत म्हणून.

मी मिळवीन की. आमच्या कंपनीत एक शेतीविभाग आहे. व सुवासिक झाडांवर संशोधन चालू अस्ते. मी वेडी आहे मरव्याची. मधे एकदा दुरून एक गजरा मरवा+ अबोली+ मोगरा असा दिसला तो धावत जावून घेतला
पण तो मरवा नव्हताच काहीतरी बडी मेथी सारखी निर्वासिक भाजी होती. वासातल्या माण्साला ते निर्वासिक
काही घेऊन हिंडायचे म्हणजे मानसिक त्रासच होतो. लै राग आला मला. माझा दुसरा आवड्ता सुवास म्हण्जे सायली. ( संदर्भः पुणे. प्रभातरोड गल्ल्या, पहाटे सायलीने लगड्लेल्या) आता ते बघायलाही मिळत नाही. मी
कुत्रे संडे ला सकाळी घेऊन जाते ना अगदी सायली सायली करत जाते. व एखादेच फूल मिळाले तरी तो होतो सायली संडे.

मरव्याच्या जोडीने दवणा असे नाव ऐकलंय. पण हे झाड कसं दिसतं ते काहीच माहित नाही. कोणाला माहित आहे का ? त्याचं सायंटिफिक नाव काय आहे ?

पण साधारण फ्रॉस्ट पडायला लागलं की झाडं मान टाकतात. काही कारण कळलं नाही.>>>>
तुळस self seeding Annual आहे. त्यामुळ फ्रॉल सुरु झाला कि मरणारच. आत आणुन ठेवली तरी सुद्धा जगवण या कोल्ड टेंप मध्ये कठीणच.

किती मस्त माहिती दिलीत.. आम्ही ३ वर्ष खूप मजा केली.. घरासमोर भाज्या लावायाला खूप जागा होती.. टोमाटो , मेथी, मटार पण लावला होता पण तो इथला स्वीट पी होता तरीही थोडे जास्त दिवस ठेवून मग पोर आणि मी बसून कच्चेच खायचो.. शिमला मिर्च छान लागली होती .काकड्या खूप आल्या होत्या . टोमाटो चा एखादा जात इथली सांगा न कोणी तरी जी छान असते.. मी सगळे प्रकार लावले पण ते हिरवेच राहतात..लाल होईपर्यंत थंडी चलू होते मग काही केल्या येत नाही .. मग काय हिरव्या टोम्यातोची भाजी किवा चटणी इतके लागले होते कि वाटेव लागले..

आणि हो भारताचे वांगे ची रोप कधी लावायची साधारण ६० दिवस लागतात म्हणजे मिनेसोटा चा उन्हाळ संपून वारा सुटे पर्यंत वांगी तर येतात पण मोठी होत नाही.. शी मागच्या वर्षी का नाही बघितला माबो असो ..

आता मात्र कुंडीत लावावे लागणार आहेत असा वाटता.. नवीन घरात कुठेच जागा नाही .. पाटीयो ला लटकणाऱ्या पसरत कुंड्या आणून एकात मेथी लावावी असा विचार करते.. लसणाची आयडिया मस्त आहे

मी नेहमी बियांपासुनच तुळशीची झाडं लावली आहेत.
अमेरिकेत माझी तुळस मी एका खिडकीजवळ व हीटर जवळ होती. छान राहीलेली.

मेधा, दवण्याचे botanical name - Artemisia pallens Wall असे आहे (सौजन्य गूगल). पण दवणा आणि मरवा हे फक्त ऐकलेलेच शब्द आहेत, बघायचा आणि सुगंध घ्यायचा योग काही आला नाही अजून.

नागरमोथा (नाव बहुतेक बरोबर लिहिलेय) नावाचे झाड मला एकदा मित्राने आणून दिले होते पण ते काही जगले नव्ह्ते माझ्याकडे. ते पण fragrant herb मध्येच येते असे तो म्हणाला होता. काय करतात त्याचे?

मेधा, हैद्राबादेत दौना सहज मिळायचा. मोगर्‍याच्या गजरेत, आमच्या बागेत, शेंवतीच्या फुलांची वेणी घालताना तर हमखास त्या फुलावर एक पाकळी लाल गुलाबाची व दौन्याची एक पाकळी घालुन. पायातला हार करुन त्याची वेणी घालायची व स्टुडिअओमध्ये जाउन एक फोटो काढायलाच हवा. प्रत्येक मुलीचा एक तरी असा फोटो असायलाच पाहिजे. Happy
मला आजपर्यंत दौना आणि मरवा एकच वाटायचा. आणि हो दौन्याबरोबरच एक पप्पू दौनापण असायचा तो बिन वासाचा.
मामी घराचे झांडासहित फोटो इथे लावायला विसरु नको. Happy

दिनेशदा,
मरव्याचा फोटो आणी माहीती द्या ना. मला काहीच माहीती नाही. मुबंईत कुठे मिळेल?

मामी,
तुम्हाला मिळालं बी तर मला द्याल थोडं?

कुंडितल्या झाडांबद्द्ल,
माझ्याकडे किचनच्या आणी बेडरुमच्या खिड्कीत दोन गुलाब, एक टर्बुज, वांगी, लसुण, कार्ली पुदिना आणी कोरफड आहे. आणी अजुन एका खिडकीत तुळस आहे.

टर्बुजाला तीन टर्बुज लागली आहेत. पण एकच नीट वाढलं. आजुन पिकलं नाहि. एक छोटं कार्ल आहे.

माझा प्रश्न हा आहे की आता खतं वगैरे घालायला हवं का? कसं आनी कुठलं घालु?

शोनूतै, दवणम ची पानं कायम हिरवीच पाहिलीत मी. सुवास थोडा mild असतो(/जवळजवळ नसतोच!) मरव्यापेक्षा. चुभुद्याघ्या. मीही बरेच दिवस दवणमच मरवा समजत होत्ये.

आमच्या आजुबाजुच्या घरांमधे गुलाबाची झाडं एखाद्या गुच्छाच्या आकारात छाटली होती (कधी ते कळाल नाही).
त्यामुळे आता भरपूर फुलं झाडांवर आलेली असताना, असे छान मोठ्या आकारांचे, वेगवेगळ्या रंगांचे गुलाबांचे गुच्छ अतिशय सुंदर दिसतात.
आमची गुलाबाची झाडे बरीच अस्ताव्यस्त वाढली आहेत आणि सध्या खूप फुलांनी लगडली आहेत, त्यामुळे छाटता येत नाहीत. तर ईथे कॅलीफोर्निया मधे गुलाबाच्या झाडांची छाटणी साधारण कधी करावी? आणी काही टीप्स?

स्प्रिंग सुरु व्हायच्या थोडे दिवस अगोदर किंवा स्प्रिंग च्या पहिल्या आठवड्यात गुलाबाची मोठी छाटणी करायची असते.
फुलांच्या पाकळ्या गळल्यावर जरी थोड थोड कट करीत राहिला तरी आणखी फुल येत रहातील आणि झाड सतत फुलांनी डवरलेल राहिल.

Pages