मेथी, टोमॅटो, कोथिंबीर

Submitted by admin on 9 July, 2008 - 21:50

घरी भाज्यांची लागवड.
या अगोदरचं हितगुज इथे वाचा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी आजच, परसातला अळू ( अरवी लावली होती ) सरसो ( मोहरी फेकली होती ) कणसे ( रस्त्याच्या कडेला आपोआप उगवलेला ) भोपळा ( शेजारच्या शेतातून चोरला ) भोपळ्याची पाने ( शेजारच्या शेतातून चोरली ) राजगिर्‍याची पाने ( रस्त्याच्या कडेला उगवली होती ) इथे मिळणारा भला मोठा याम ( चक्क तीन फूट लांब सूरण असतो हा ) अशी सगळी मिक्स भाजी केली होती. त्यात मुळा, शेंगदाणे, शिराळी, रताळी, घेवडा, गवार असे बरेच काहिबाही घातले.
आणि सगळ्या मित्रमंडळीना (चोरीच्या ) पापात सहभागी करुन घेतले.

सगळ्यांना धन्यवाद.
श्या:!! मेथी वाढून ती बेचव निघणार शेवटी! Sad आता काही दिवसांनी काढून खाऊन बघेन. त्यावर ठरवीन दुसर्‍यांदा हा खटाटोप करायचा की नाही Happy

धन्यवाद सिंड्रेला, दिनेशदा, नलिनी !

शेतातल्या भाज्यांची चव न्यारीच .. आता मला कळते की माझी आई गावी गेली की जड होत असुनही(आणी २-३ तासांचा प्रवास) भरपुर भाज्या का घेउन यायची..... नलिनी तु लिहीतेस ना तेव्हा डोळ्यासमोर चित्र उभे रहाते Happy
<< आठवड्यातुन एकदा ह्याप्रमाणे पाणी द्यावे.>> अशाने पाणी कमी नाही का पडणार लसणाला?

सायुरी.. मी पण एवढीच मेथी वाढवुन मग वापरते.. नलिनी म्हणते त्याप्रमाणे कडवट लागते पण बेचव नाही ग!
खटाटोप Sad ... अग घरी आपण काहीतरी लावतो.. ते रुजते .. मोठे होते .. तेव्हा छान नाही का वाटत?.. आणी चुकलोच तर इथे जाणकार आहेतच माहितीसाठी!

अगं म्हणजे मला म्हणायचं होतं की जर शेवटी मनासारखी उपयोगास आली नाही तर दुसर्‍यांदा मेथी कशाला लावायची. त्याऐवजी मी दुसरं झाड लावीन. (त्याला मी खटाटोप नाही म्हणणार :)) अगदी खरं बोललीस, स्वतः लावून रुजलेलं रोप पाहून खरंच खूप आनंद होतो Happy

मजेत म्हणाले ग मी Proud

.

नलिनी, अळूची छान माहिती मिळाली. धन्यवाद. Happy

भोपळा (दुधी किंवा लाल) कसा लावायचा कुंडीत कोणी सांगु शकेल का?

आई गं कुंडीत का लावायचा आहे ? लावला तरी वेल नंतर जमिनीवर पसरेल असे बघा. भोपळे लागले की फार वजन होते त्यांचे. चांगला निबर वाढलेला भोपळा पूर्ण वाळवुन मग त्यातुन बिया काढुन लावता येतील. किंवा विकत आणुन लावता येतील. भारतात तरी उन्हाळ्याच्या शेवटी किंवा एक पाउस पडुन गेला की आम्ही बिया लावतो.

अग भोपळ्यावर भोपळे आले की वेल खुपच जड होतो. गावात तर तो घरावरच सोडतात वेल. त्याचा वेल पण खुपच वाढतो. कुंडीत लाउन नाही चालणार तो.

लिनास, भोपळा हा जर कुंडीत लावणे हाच एक पर्याय असेन तर मग वेलाला अधारासाठी Veggie Cage लावावी लागेल. पण हा पर्याय सुद्धा फक्त दुधीभोपळ्यासाठी योग्य वाटतोय. लाल भोपळ्याचा वेल हा जमिनीवरच पसरायला हवाय.

संदर्भः
Veggie Cage
१) http://images.google.com/images?q=Veggie%20Cage&rls=com.microsoft:en-us:...

२) http://www.veggiecage.com/tomato_support_uses.cfm

लाल भोपळा बाजारात मिळतो, त्यासोबतच त्याच्या बियापण येतात. त्याच सुकवून लावतात.
दुधी भोपळ्याचे बी मिळवण्यासाठी सिंड्रेलाला अनुमोदन.

मला घरी तुळस लावायची आहे. मी san Diego , california मधे राहते. summer मधे छान येते तुळस. पण winter आला की मरुन जाते. कुणी काही उपाय सांगेल का ?

मीना, मुळा आणि गाजरे वर शोनु ने माहिती दिली आहे-
प्राजक्त अन तुळस दोन्ही फ्रॉस्ट डेट च्या आतच घरात आत आणून ठेवायला लागणार. सगळ्यात जास्त उजेड मिळेल अशा जागी ठेवायला पाहिजे. अन एकदम थंड किंवा एकदम गरम ड्राफ्ट येइल अशा ठिकाणी ठेवू नये. मी कडिपत्ता, मोगरा, अबोली अन अनंत असेच सांभाळले आहेत वर्षानुवर्षे.

मी साधाराण थंडी पडायला लागल्यावर प्राजक्त, तुळस, झेंडु आणि एक रोपं घरात आणुन ठेवली. प्राजक्त माझ्या चुकीने जळाला Sad पण तुळस अजून तग धरुन आहे.

लॉनला युरिया घालतांना किती दिवसांच्या अंतराने घालावे???

आनेवाला पल जानेवाला हे

ईथे वचल्या प्रमाणे लसूण लावला आहे. पात यायला सुरुवात झाली आहे.

पात पिवळी झाली ते काढायचे का?

पात हिरवी असतानाच, पाती कापुन वापरायच्या. चटणी, ऑमलेट मधे चांगल्या लागतात त्या.

धन्यवाद दिनेश,

पात अगदी संपुर्ण काढायची का? पुन्हा नवी पात त्याच लसणीला येते का? (माझी अडाणी शंका आहे, पण मी अगदीच ग म भ न शिकतेय "घरच्या बागे बाबतीत" म्हणून विचारले)

आत्ता पर्यंत मी विकत आणली आहे ओली लसूण चटणी साठी, पण ती लसूण आणि पात अस एकत्रीत विकतात, तसच करायच का?

हो अगदी बाहेरच्या पाती खुडल्या तर नविन पाती येतील. आणि मूळासकट उपटला तरी चालेल. पण माझ्या मते पातीना जास्त स्वाद असतो.
आणि मीपण असच शिकलो की. आपल्या घरची अगदी एक पात असली तरी त्या चटणीला असा काहि स्वाद येतो ( निदान आपल्यामते तरी ) कि पंचपक्वान्न फिकी पडावीत.

दिनेशदा, घरची पात वापरुन चटणी केली, खुप वेगळ समाधान वाटल.

पण ह्या लसणींचा कांदा कसा तयार होतो?

कविता बरे झाले तु विचारलेस. मला पण वाटले होते की पात सुकल्याशिवाय काढायचे नाही.

पण ह्या लसणींचा कांदा कसा तयार होतो? >>>>> लसुण लावुन लसुण नाही का तयार होत? Uhoh

कृपया सगळ्या भाजांसाठी इथे एकाच धाग्यावर न लिहिता वर जाऊन(उजव्या कोपर्‍यात) नवीन लेखनाचा धागा सुरू करा.

नमस्कार
मला backyard मध्ये १-२ झाडे लावायची आहेत. प्रथमच प्रयोग करणार आहे,त्यामुळे कोणती ती समजत नहियेत. तसच हिवाळ्यात त्यान्ची कशी काळ्जी घ्यावी ते पण सुचवावे (आमच्याकडे भरपूर स्नो होतो). र्‍स्प्रिन्ग मध्ये लावून समर पर्यन्त उगवतील अशी कोणती झाडे आहेत का?

मला लेमन ग्रास पाति चहा लावायचा आहे. कोन सान्गेल का काहि माहिति?

कुणाला लेडीबग ला मराठीमधे काय म्हणतात ते आठवते आहे का?

मेथी, टोमॅटो, कोथिंबीर पैकी काहीच नाही Wink

वाटलेच माला कोणीतरी टिप्पणी करणारच म्हणुन. तू असशील असेही वाटले.

मी ह्यावेळी ९ टॉमेटो ची रोप लावली आहेत. मागच्यावेळी ३ टोमेटो च्या झाडांना मिळून ३ टोमेटो आले होते. Sad I hope ह्यावेळी तरी जरा जास्त येतील. माझी मागच्यावेळची झाडं बारीक होती. ती बिचारी एका टोमेटो मधेच वाकली. आता ९ तरी टोमेटो मिळतील अशी आशा आहे.

ह्या नविन हितगुज मधे लिहायला किति अवघड जातय

रचना tomato च्या झाडांसाठी tomato cage मिळतात. लोवेज किंवा HD मध्ये. झाड लावली कि लगेच घालायचे ते. म्हणजे झाड वाकत नाहीत.
(मला कुणीतरी Tomato हा शब्द कसा लिहायचा सांगेल का. म वर चंद्र कसा काढायचा)

Pages