रुपयाची नवी ओळख

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

भारतीय रुपयाला आता नवी ओळख मिळाली आहे. अमेरिकन डॉलर, ब्रिटिश पाउंड, युरो आणि जपानी येनप्रमाणे आता रुपयाला नवीन संकेतचिन्ह मिळालं आहे.

indian-rupee-symbol.jpg

भारत सरकारनं हे चिन्ह रेखाटण्यासाठी एक स्पर्धा घेतली होती, व आयआयटीतून पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या डी. उदय कुमार यांनी रेखाटलेलं संकेतचिन्ह आज केंद्र सरकारनं निवडलं. येत्या काही महिन्यांत हे चिन्ह आपल्या संगणकावर उमटू शकेल, व या चिन्हाचा सार्वत्रिक वापर सुरू होईल.

रुपयाला मिळालेल्या या नव्या ओळखीचं स्वागत!!!

याबद्दलची अधिक माहिती इथे वाचता येईल - http://business.rediff.com/slide-show/2010/jul/15/slide-show-1-iit-ians-...

प्रकार: 

Soni said it would also help in distinguishing the Indian currency from rupee or rupiah of countries like Pakistan, Nepal, Sri Lanka and Indonesia.

Currently, the abbreviation of the Indian Rupee, 'Re' or 'Rs' is also used by Pakistan, Nepal and Sri Lanka.
>>>> हे त्या वर दिलेल्या लिंक मधे वाचलं. हे कारण असावं Rs. सोडून वेगळा असा युनिक सिंबॉल निवडण्यामागे

मस्तच ! छान आहे चिन्ह. ते रुपया रुपया रुपी वगैरे लिहिण्यापेक्षा मस्त वाटतंय. वाचताना तर आपण रुपयेच म्हणणार आहोत Happy अगदी पाऊंड, डॉलरच्या लायनीत बसल्यासारखं वाटलं.

it would also help in distinguishing the Indian currency from rupee or rupiah of countries like Pakistan, Nepal, Sri Lanka and Indonesia.
>>>> हेच म्हणायचं होतं मला.

अरे बेस्टच की.. कधी जाहीर झाले निकाल? काहीच दिवसांपुर्वी सगळ्या वर्तमानपत्रात ५-६ शॉर्टलिस्टेड सिम्बॉल्स आले होते..

छान आहे चिन्ह. आता रुपयाला वजन पण मिळो. परदेशात कुठलेच व्यवहार रुपयात होताना दिसत नाहीत, ते बघायचे भाग्य, या आयूष्यात लाभो.

आता BUCK (डॉलर), QUID (पाउंड) प्रमाणे एक नवीन शब्द शोधा. भारतात बरेच लोक रुपयाला BUCKS म्हणतात पण ते चूक आहे..
(आपण काळवीट म्हणू शकतो) Happy

आणि अमेरीकेत देसी लोक डॉलर्सना रुपये म्हणतात.

साध्या टेक्स्टमध्ये भारतीय रुपये वेगळे दाखवायवे असल्यास INR असे लिहिले जाते (अमेरीकन डॉलर करत जसे USD तसे).

टण्या, शॉर्टलिस्टेड चिन्हे पहायला नक्कीच आवडतील.

छान! ''र'' आणि R ह्या दोन्ही अक्षरांशी साधर्म्य असल्याने अगदी परिचित वाटत आहे हे चिन्ह!

Pages