रुपयाची नवी ओळख

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

भारतीय रुपयाला आता नवी ओळख मिळाली आहे. अमेरिकन डॉलर, ब्रिटिश पाउंड, युरो आणि जपानी येनप्रमाणे आता रुपयाला नवीन संकेतचिन्ह मिळालं आहे.

indian-rupee-symbol.jpg

भारत सरकारनं हे चिन्ह रेखाटण्यासाठी एक स्पर्धा घेतली होती, व आयआयटीतून पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या डी. उदय कुमार यांनी रेखाटलेलं संकेतचिन्ह आज केंद्र सरकारनं निवडलं. येत्या काही महिन्यांत हे चिन्ह आपल्या संगणकावर उमटू शकेल, व या चिन्हाचा सार्वत्रिक वापर सुरू होईल.

रुपयाला मिळालेल्या या नव्या ओळखीचं स्वागत!!!

याबद्दलची अधिक माहिती इथे वाचता येईल - http://business.rediff.com/slide-show/2010/jul/15/slide-show-1-iit-ians-...

प्रकार: 

सायो मला पण ४थ्च आवडल होत.
पण हेहि छान आहे. मुळात चिन्ह ठरवल हेच किति छान.
आम्हिपण येनला रुपयेच म्हणतो घरात. Wink

मला चिन्हापेक्षा आपल्या रुपयाला नवीन ओळख मिळाली त्याचाच आनंद झाला.

रच्याकने, एक भा.प्र. ही चिन्ह कोणत्या बेसिसवर शॉर्टलिस्ट केलीयेत याबद्दल कोणाला काही माहिती असेल तर ती जाणून घ्यायला आवडेल.

परदेशात कुठलेच व्यवहार रुपयात होताना दिसत नाहीत, ते बघायचे भाग्य, या आयूष्यात लाभो.>>>>>>>> ते स्वर्गीय प्रमोद महाजनांचे स्वप्न होत. अधुरंच राहिलं!

एक अट अशी होती, कि ते चिन्ह प्रचलित की बोर्ड वर टायीप करता यायला हवे. पण निवडलेले चिन्ह त्यात बसत नाही. हे कसे?

छान आहे चिन्ह. मलापण आवडले.

पण चिन्मय तू वर दिलेले चिन्ह आणि त्या रेडिफवरच्या चिन्हामध्ये फरक वाटतो. तो 'र' 'R' सारखा काढलाय तिथे. तू दिलेल्या चित्रातला र एकदम स्टायलिश आहे.

कालच टीव्हीला ही बातमी पाहिली. छान वाटलं. देवनागरी र आणि इंग्लिश आर ही दोन्ही अक्षरं दिसताहेत. शॉर्टलिस्टेड इतर चिन्हंही दाखवत होते काल टीव्हीला.

इथे दिलेले रूपया चे चिन्ह आणि निवडलेले चिन्ह यात थोडा फरक आहे.
http://timesofindia.indiatimes.com/Biz/India-Business/Cabinet-approves-n...

टिव्ही वरच्या मुलाखतीत डी उदयकुमार यानी सांगितल्या प्रमाणे
१.वरच्या दोन आडव्या रेषा भारताचा तीरंगा, equal to (बरोबर), आणि स्थैर्य यांचे रीप्रेझेन्टेशन आहे
२. आणि र आणि R यांचे मिश्रण आहे

मस्त चिन्ह !
आता BUCK (डॉलर), QUID (पाउंड) प्रमाणे एक नवीन शब्द शोधा. भारतात बरेच लोक रुपयाला BUCKS म्हणतात पण ते चूक आहे.. >>>> परदेसाई , भारतात खोका , पेटी पण म्हणतात . Proud

त्या व्हिडियोमधे (वरती दिलेल्या लिंकवर) पण कुणालातरी तमीळतेलगू मंडळींचा पुळका आला...
(त्यांना आवडेल का असा प्रश्न होता). * * * * * *

लोको,

हे चिन्ह टायपण्यासाठी Rupee_Foradian.ttf हा नवीन फाँट आलाय.
स्टेप्स येणेप्रमाणे:

१) Save the font file (Rupee_Foradian.ttf ) to Control panel -> Fonts

२) Open MS office file (word/excel/powerpoint) and press the below indicated key. (The key just above the TAB button on your key board.)

Tilda.JPG

३) Select the character that appears on the page and select the Rupee Foradian font from the fonts drop down of your application (word/excel/powerpoint)

शॉर्टलिस्ट च्या लिंकवरचे एकही चिह्न मला आवडले नाही. खरतर टॉप ५ पर्यंत ही पोचलीच कशी असा मला प्रश्न पडला आहे. आणि त्यात सिलेक्ट झालेले चिह्न कसे नाही?

सिलेक्ट झालेले चिह्न खूपच चांगले आहे पण मधल्या दांडीला थोडा खालच्या बाजूला उजवीकडे बाक असायला हवा होता त्याने ते R नि र बरोबरच रु सारखे सुद्धा वाटले असते!

ह्या स्पर्धा कधी नि कुठे घेतात ते त्याचे निकाल जाहीर झाल्यावरच कळते Happy

असो. आणखी म्हणजे आता १०० रु ला १ युनिट धरायला पाहिजे म्हणजे "सबसे बडा रुपैया" होऊन जाईल Happy

Pages