२६ मे : वर्षाविहाराच्या दवंडीची दवंडी आली आणि मायबोलीवर नव्याने आनंदाची लकेर उठली.
८ जून : प्रत्यक्ष दवंडी झाली, वर्षाविहाराचं ठिकाण जाहीर झालं आणि यू.के.’ज् रिसॉर्ट हे नाव मायबोलीवर सर्वतोमुखी झालं.
... आणि आज हा वर्षाविहार-२०१०च्या सविस्तर माहितीचा धागा आलाय तुमची उत्सुकता शमवायला.
एखाद्या गोष्टीची खुमारी वाढवत न्यायची असेल तर ती अशी!
गेली सात वर्षं चालू असलेला हा वर्षाविहाराचा उपक्रम आहेच तसा नाविन्यपूर्ण, लज्जतदार, खुमासदार, हवाहवासा वाटणारा!
तर मंडळी, मायबोली घेऊन येत आहे वर्षाविहार-२०१०...
एक असा उपक्रम ज्यात मायबोलीवरचे सभासदच नव्हेत तर त्यांचे कुटुंबीयही सहभागी होऊ शकतात. मायबोलीवरचं लेखन, इतर अनेक उपक्रम, इथे चालणार्या गप्पा, चर्चा, चेष्टा-मस्करी (आणि क्वचित काही तात्विक मतभेद सुध्दा ;)) याबद्दल समस्त मायबोलीकरांचे कुटुंबीय रोज काही ना काही ऐकतच असतात. त्या गप्पा, ती धमाल त्यांना प्रत्यक्ष अनुभवायला मिळते ती वर्षाविहारादिवशी. वविदिवशी नवीन भेटीगाठी होतात, ओळखी होतात, आधीच्या ओळखींचं मैत्रीत रुपांतर होतं, मैत्रीचे नवीन धागेही विणले जातात.
यंदाचा हा मैत्रीचा सोहळा संपन्न होणार आहे १८ जुलै २०१० या दिवशी, खोपोली इथल्या यू.के.’ज् रिसॉर्टच्या साथीनं. पाऊस तर दरवर्षी असतोच संगतीला.
पण मंडळी, तो दिवस साजरा करण्याची पूर्वतयारी म्हणून काही गोष्टी नियमानुसार आणि ठराविक दिवशी करणं गरजेचं आहे.
त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे वविला येणार्यांची नावनोंदणी.
वविला registered मायबोलीकर आणि त्यांचे कुटुंबिय (पति/पत्नी/मुले) येऊ शकतात. इच्छुक मायबोलीकरांनी त्यासाठी vavi@maayboli.com या पत्त्यावर ई-मेल करायची आहे.
नावनोंदणी करताना सभासदांनी खालील गोष्टींची माहिती देणे आवश्यक आहे.
१. नाव
२. मायबोलीचा user id
३. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक (भ्रमणध्वनी क्रमांक दिल्यास उत्तम)
४. कुठल्या शहरातून येणार (मुंबई, पुणे इ.)
५. आपला नेहमी वापरात असलेला email id
६. सहभागी होणार्या एकूण व्यक्तींची संख्या (प्रौढ/ मुले).
७. लहान मुले (६ ते १० किंवा ३ ते ५ वयोगट) असल्यास त्यांचे वय
८. मायबोली गृपबरोबर बसने येणार की स्वतंत्र येणार?
९. पैसे कसे भरणार? प्रत्यक्ष की ऑनलाईन?
नावनोंदणीची अंतिम तारीख आहे ११ जुलै २०१०.
एकूण इच्छुकांच्या संख्येनुसार बसभाडे ठरवण्यास मदत होते. त्यामुळे लवकरात लवकर आपली नावनोंदणी करा.
नावनोंदणीचे काम पूर्ण झाले की पुढचे महत्त्वाचे काम म्हणजे पैसे जमा करणे.
वर्षाविहार-२०१० साठी वर्गणी आहे :
प्रौढ : रु. ६५० प्रत्येकी. (रिसॉर्ट : रु. ४००, बस : रु. २००, इतर खर्च : रु. ५०)
मुले (वय ६ ते १० वर्षे) : रु. ४०० प्रत्येकी.
५ वर्षांपर्यंतच्या मुलांना काहीही शुल्क नाही.
(इतर खर्चामधे सांस्कृतिक कार्यक्रमासाठी लागणार्या खर्चाचा अंतर्भाव आहे.)
पुणे आणि मुंबई इथे ११ जुलै २०१० या एकाच दिवशी वविचे पैसे जमा केले जातील.
पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीशेजारील कट्टा. वेळ: ११ जुलै २०१०, सं. ५.३० ते ८.००
मुंबई - स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात. वेळ: ११ जुलै २०१०, सं. ५.३० ते ८.००
समजा पैसे भरून जर आयत्यावेळी काही कारणाने वविला येणं रद्द केलं तर बसचे भाडे वजा करून उरलेले पैसे परत करण्यात येतील.
स्वतंत्र येणार्यांनी बसभाडे देण्याची अर्थातच गरज नाही.
ऑनलाईन पैसे भरणार्यांना ज्या अकाऊंटमध्ये पैसे भरायचे आहेत त्याची सर्व माहिती ईमेलने कळविली जाईल.
मुंबई आणि पुणे सोडुन इतर ठिकाणच्या तसेच भारताबाहेरील कोणालाही वर्षाविहारास येणे शक्य असेल तर त्यांनी जरूर यावे.
वर्षाविहार-२०१० संयोजन समिती :
पुणे -
प्रणव कवळे (प्रणव कवळे) फोन : ९७३००१८१२८
सचिन (सचिन_dixit) फोन : ९८९०८२०७००
राजेश जाधव (राज्या) फोन : ९८८१४९८१८९
मल्लीनाथ (MallinathK) फोन : ९९६०३६६५६६
मुंबई -
विनय भिडे (विनय भिडे) फोन : ९८२०२८४९६६
निलेश वेदक (नील वेद) फोन : ९७०२७२१२१२
कविता नवरे (कविता नवरे)
अमित देसाई (असुदे) फोन : ९३२१९१७२१५
प्रीति छत्रे (ललिता-प्रीति)
आनंद केळकर (आनंद्_सुजू): ९८२०००९८२२
http://uksresort.com/ या दुव्यावर यू. के.’ज् रिसॉर्टची अधिक माहिती मिळू शकेल.
आपल्याला काही शंका असल्यास आपण इथे मेसेज टाकू शकता अथवा vavi@maayboli.com या ई-मेल आयडीवर संपर्क करु शकता.
गेल्या वर्षी मावळसृष्टी इथे पार पडलेल्या ववि-२००९ला मायबोलीकर आणि त्यांचे कुटुंबीय यांची विक्रमी उपस्थिती होती. तो विक्रम यंदा मोडला जावा अशी सर्वांचीच इच्छा आहे.
वविची रुपरेषा साधारण अशी असेल......
सकाळी ९.०० वाजेपर्यंत पुणे व मुंबईच्या बसेस रिसॉर्टवर पोहोचतील
सकाळी ९.३० ते १०.०० न्याहारी करुया
१०.०० ते १०.३० स्विमिंगपूलात उतरण्यासाठीचे चेंजिंग
१०.३० ते १२.३० स्विमिंग पूल व इतर उपलब्ध राईड्स/रेन डान्स मधे धम्माल मस्ती
१२.३० ते १.०० परत चेंजिंग
१.०० ते २.०० जेवण
२.३०-४.३० मनोरंजन
५.०० वाजता चहा व बिस्किट्स
५.३० वाजता जड अंत:करणाने आपापल्या शहरात नेणार्या बस मधून प्रयाण.
तेव्हा, भेटू या, २०१०च्या वविला!
मुंबईच्या बस रुटची माहिती खालील प्रमाणे
१) बस बोरिवली नॅशनल पार्कहून सुटेल वेळ ५.४५ am (ह्या स्टॉपकरता श्री. विनय भिडे ह्यांच्याशी संपर्क साधावा)
२) जोगेश्वरी हायवे (जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड कॉर्नर) - ६.२० am
३) दीनदयाळ नगर मुलूंड (पुर्व) ६.२५ am (ह्या स्टॉपकरता श्री. आनंद केळकर ह्यांच्याशी संपर्क साधावा)
४) ऐरोली ब्रिज ७.१० am
५) ऐरोली सेक्टर ५: ७.१५ am
६) वाशी ७.३० am
७) कळंबोली मॅकडोनल्ड (एक्स्प्रेस हायवेचा स्टार्ट) ८.०० am
मुंबई रुट संदर्भात काही शंका असल्यास कृपया १० जुलै पर्यंत इमेल करा किंवा ११ जुलै रोजी संध्याकाळी ५.३० ते ७.३० ह्या वेळेत श्री विनय भिडे ह्यांना शिवाजी पार्क येथे प्रत्यक्ष भेटून किंवा फोन करुन संपर्क साधावा.
पुणे बस रुटची माहिती खालील प्रमाणे
बस नंबर - MH12 FC 3344
बसचा रंग - पांढरा / केशरी - (अंबिका ट्रॅव्हस)
१) बस सावरकर भवनहून (बाल गंधर्वच्या पाठीमागे) सुटेल वेळ - ६.१५ am (६ ते ६.१५ पर्यंत बस तिथे थांबेल)
२) डेक्कन - ६.३० am (बसस्टॉप समोर)
३) राजाराम पुल - ६.४५ am (सिंहगड रोड्-व्यंकटेस्वरा हॅचरीज)
४) कोथरुड (किमया हॉटेल) - ७.०० am
प्रत्तेकाने वेळेपुर्वी तेथे उपस्थित रहाणे आवश्यक आहे.
पिंपरी-चिंचवडहुन येणार्यांनी कृपया मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या फाट्याजवळ थांबावे, त्यांना तिथुन पिक केले जाईल.
नोंदणी केलेल्या सर्वांनी कृपया आपला थांबा आणि बरोबर येणार्या मंडळींची नाव इमेल करुन कळवावी, ही माहिती वहातूक कंत्राटदाराला परवान्यासाठी लागणार आहे. ज्या मेंबर्सनी थांबा कळवला नसेल तर ते कोथरूड येथे बसणार आहेत असे ग्रूहीत धरले जाईल.
सुचना: रिसॉर्ट मधे पाण्यात उतरताना पोहोण्याचा पोषाख असणे आवश्यक आहे. (महिलांसाठी: पोहोण्याचा पोषाख नसल्यास टेरिकॉट्/नायलॉन मटेरिअलचे लेगिंग्ज आणि टि शर्ट चालतील) पाण्यात उतरताना शक्यतो कॉटनचे कपडे/ जीन्स वगैरे गोष्टी टाळाव्यात)
धन्यवाद.
लोकहो मुंबईची ५१ सीटर बस फुल
लोकहो मुंबईची ५१ सीटर बस फुल झाली आहे...
पुण्याला अजुन जागा आहेत , लवकर नोंदणी करा...
नै दक्षे, तस नै करणार मी मी
नै दक्षे, तस नै करणार मी
मी बाईकवरुन बशीच्या मागे जाऊन उभारणार अन बाईक बशीला दोरीने बान्धून टाकणार! बशिच कॉन्ट्रीब्युशन वाचेल, पेट्रोलचा खर्चही वाचेल! शिवाय पत्ता चूकणार नाही..... है की नै आयडीया?
>>> मुंबईची ५१ सीटर बस फुल
>>> मुंबईची ५१ सीटर बस फुल झाली आहे...
आयला, यन्दा मुम्बैची मेजॉरिटी की काय? पुणेकर्स, बघतांय ना?
पुणेकर्स, बघतांय ना? >>
पुणेकर्स, बघतांय ना? >> लिंब्या पुन्हा चूक, तु असं म्हणल्यावर पुणेकर नुसतंच
बघतील, कायतरी करायला सांग त्यांना.. बुकिंग वगैरे..
बशिच कॉन्ट्रीब्युशन वाचेल,
बशिच कॉन्ट्रीब्युशन वाचेल, पेट्रोलचा खर्चही वाचेल! शिवाय पत्ता चूकणार नाही..... है की नै आयडीया?
>>> लिंबुकाका __/\__
बशिच कॉन्ट्रीब्युशन वाचेल,
बशिच कॉन्ट्रीब्युशन वाचेल, पेट्रोलचा खर्चही वाचेल! शिवाय पत्ता चूकणार नाही..... है की नै आयडीया? फिदीफिदी>> लिंबु, तुमच्या बाईकवर मागच्या सिटवर मी रुमाल टाकला बरं का!
अरे मधुकरा, माझी बाईक म्हण्जे
अरे मधुकरा, माझी बाईक म्हण्जे काय तुला कुडकेल्ली बुद्रुक व्हाया भामरागड जाणार्या यष्टीचा लाल डब्बा वाटला का?
की टाकला रुमाल, पकडली सीट!
अरे मधुकरा, माझी बाईक म्हण्जे
अरे मधुकरा, माझी बाईक म्हण्जे काय तुला कुडकेल्ली बुद्रुक व्हाया भामरागड जाणार्या यष्टीचा लाल डब्बा वाटला का? खो खो की टाकला रुमाल, पकडली सीट!>> लिंब्या मेरा दिल दुखाया तुमने. तुझी गाडी पंक्चर होवो. बांधलेली दोरी तुटो.
>>>>> तुझी गाडी पंक्चर होवो.
>>>>> तुझी गाडी पंक्चर होवो. बांधलेली दोरी तुटो.

पुणे बस रुटची माहिती खालील
पुणे बस रुटची माहिती खालील प्रमाणे
१) बस सावरकर भवनहून (बाल गंधर्वच्या पाठीमागे) सुटेल वेळ ६.१५ am
२) डेक्कन - ६.३० am
३) कोथरुड (किमया हॉटेल) ६.४५ am
ओ सन्योजक, युकेजरिसॉर्ट सकाळी
ओ सन्योजक, युकेजरिसॉर्ट सकाळी किती वाजता उघडत?
तिथे किती वाजेस्तोवर पोचायच आहे?
पुणे बस रुटची माहिती खालील
पुणे बस रुटची माहिती खालील प्रमाणे
१) बस सावरकर भवनहून (बाल गंधर्वच्या पाठीमागे) सुटेल वेळ ६.१५ am
२) डेक्कन - ६.३० am
३) कोथरुड (किमया हॉटेल) ६.४५ am
पिंपरी-चिंचवडहुन येणार्यांनी कृपया मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या फाट्याजवळ थांबावे, त्यांना तिथुन पिक केले जाईल.
कोणता फाटा ते कृपया स्पष्ट करावे.
या रस्त्यावर बरेच फाटे आहेत यामुळे हि विनंती.
लिम्ब्या, माझ्या संपर्कात रहा
लिम्ब्या, माझ्या संपर्कात रहा मी तिथे ८:३० पर्यंत पोहचेल.
नसत्या चौकश्या..
लिंबू तू तिथे परवा बालगंधर्वला आला होतास ना.. मी तुझी सुमो शोधत होतो.
पिंपरी चिंचवडच्या लोकांसाठी
पिंपरी चिंचवडच्या लोकांसाठी साई पेट्रोलपंप, पुणे - बँगलोर हायवे हा बसथांबा योग्य राहील, फाट्यावर उभे राहील्याने थोडासा अडथळा येवू शकतो.
अरे तसा नाय सुर्या, म्हणजे
अरे तसा नाय सुर्या, म्हणजे तस किती "भल्या पहाटे" उठाव लागेल ते ठरवायला नको?
सुमो सध्या ठाणबन्द करुन ठेवली हे रे भो!
पुणे वविसंयोजक,बस डिटेल्स
पुणे वविसंयोजक,बस डिटेल्स (उदा. बस नं., रंग वगैरे) कधी देणार आहात?
लिंबू दा रिसॉर्ट ९ वाजता सुरु
लिंबू दा रिसॉर्ट ९ वाजता सुरु होइल आपल्या सेवेसाठी , मुंबई , पुणे दोन्ही बस साधरण त्याच वेळेस पोहोचतील... ९.३० ला नाष्ता असेल.
ओक्के मालक, म्हणजे मी सहा
ओक्के मालक, म्हणजे मी सहा वाजता निघालो तरी दोन तासात ९ पर्यन्त आरामात पोहोचू शकतो, (प्रोव्हायडेद, मुसळधार पाऊस नसेल तर)
तु बसने नाही येणारेस ? आणि
तु बसने नाही येणारेस ? आणि सहा + दोन = ९ , काहितरी चुकतय बुवा..
मालक, यन्दा नाही जमणार
मालक, यन्दा नाही जमणार सगळ्यान्ना आणायला!
मी अन मुलान्पैकी कोणतरी एक येईल बरोबर
तसा बाईकने त्रासच होतो, खास करुन परतीच्या प्रवासात! पण माझा नाईलाज हे!
अन काये ना, अजुन शक्य होतय बाईक चालविणे तोवर येणार बाईकने!
असो.
अजुन शक्य होतय बाईक चालविणे
अजुन शक्य होतय बाईक चालविणे तोवर येणार बाईकने! तसा बाईकने त्रासच होतो, खास करुन परतीच्या प्रवासात! >>> हो रे ! जाताना मस्त वाटत, मग परतीला कंटाळा येतो..
राजाराम पुलाचा स्टॉप नाहीये
राजाराम पुलाचा स्टॉप नाहीये का यंदा?
राजाराम पुलाचा स्टॉप का
राजाराम पुलाचा स्टॉप का नाहीये यंदा?
ए आता मला कुणीतरी सांगा आपण
ए आता मला कुणीतरी सांगा आपण रिसॉर्टहुन किती वाजता निघणार आहोत??
मी स्वतंत्र येणार आहे.
मी स्वतंत्र येणार आहे. लिम्ब्या मी सकाळी ७.३० ते ८ पर्यंत निघेन. आणि पोचू तिकडे ९.३० पर्यंत. तुझी लेकुरे घेउन ये म्हणजे मला अडचण येणार नै.
हो ना? किती वाजता परत निघणार
हो ना? किती वाजता परत निघणार आपण. मागच्यावेळी खुपच उशीर झाला होता ना??(म्हणुनच मी स्वतंत्र येतिये म्हणजे कधिही निघता येइल)
माझी लेकुरे?????? आँ?????
माझी लेकुरे?????? आँ????? (दचकलेला चेहरा)
आताशा चारपाच फुटी "घोड्यान्ना" लेकुरे नाय ग म्हणवत
अरे कुणी मला एक सान्गा, ऐनवेळेस युकेज मधे बुकिन्ग होऊ शकते का? त्यान्ची साईट ब्यान हे इथे म्हणून इथे विचारतोय
की अॅडव्हान्स बुकिन्गच हवे लागते दोनचार जणान्साठी?
>>> पुणे वविसंयोजक,बस डिटेल्स
>>> पुणे वविसंयोजक,बस डिटेल्स (उदा. बस नं., रंग वगैरे) कधी देणार आहात?
बसचा रंग देऊन काहि फायदा असतो का मयुरेश..
सावरकर भवन समोर ये आणि जशी सावरकरांनी उडी मारली होती तशी तू बसमध्ये मार.. की अजुन काही 'किमया' करणार आहेस??
लिम्ब्या अगदी 'मनसे' जा.. युकेवाल्यांचीच काय.. कोणा भारतीयाची तुला अडवण्याची हिम्मत???
पुण्यातील ववि ला येणार्या
पुण्यातील ववि ला येणार्या मायबोलीकरांना मोबाईल संदेश पाठवले आहेत त्यानी मागवलेली माहीती लवकर द्यावी ही विनंती.
ज्यांना मोबाईल संदेश मिळाले नाहित त्यांनी मला विपू द्वारे खालील माहिती द्या...
१)आपले ज्या भागात आहे त्या एरियाचे नांव २) तुम्ही निवडलेला बसथांबा
यो, गुब्बी चिंता नसावी. या
यो, गुब्बी चिंता नसावी.
या वेळेस प्रवास तसा कमी आहे, आणि परतीचा प्रवास ५.३० ला चालू करणार आहोत, त्यामुळे वेळेतच घरी पोहोचू...
Pages