वर्षाविहार २०१० : यू. के.' ज रिसॉर्ट (मुंबई/पुणे बस रुटच्या माहिती सह)

Submitted by ववि_संयोजक on 14 June, 2010 - 01:53

२६ मे : वर्षाविहाराच्या दवंडीची दवंडी आली आणि मायबोलीवर नव्याने आनंदाची लकेर उठली.

८ जून : प्रत्यक्ष दवंडी झाली, वर्षाविहाराचं ठिकाण जाहीर झालं आणि यू.के.’ज्‌ रिसॉर्ट हे नाव मायबोलीवर सर्वतोमुखी झालं.

... आणि आज हा वर्षाविहार-२०१०च्या सविस्तर माहितीचा धागा आलाय तुमची उत्सुकता शमवायला.
एखाद्या गोष्टीची खुमारी वाढवत न्यायची असेल तर ती अशी!

गेली सात वर्षं चालू असलेला हा वर्षाविहाराचा उपक्रम आहेच तसा नाविन्यपूर्ण, लज्जतदार, खुमासदार, हवाहवासा वाटणारा!
तर मंडळी, मायबोली घेऊन येत आहे वर्षाविहार-२०१०...
एक असा उपक्रम ज्यात मायबोलीवरचे सभासदच नव्हेत तर त्यांचे कुटुंबीयही सहभागी होऊ शकतात. मायबोलीवरचं लेखन, इतर अनेक उपक्रम, इथे चालणार्‍या गप्पा, चर्चा, चेष्टा-मस्करी (आणि क्वचित काही तात्विक मतभेद सुध्दा ;)) याबद्दल समस्त मायबोलीकरांचे कुटुंबीय रोज काही ना काही ऐकतच असतात. त्या गप्पा, ती धमाल त्यांना प्रत्यक्ष अनुभवायला मिळते ती वर्षाविहारादिवशी. वविदिवशी नवीन भेटीगाठी होतात, ओळखी होतात, आधीच्या ओळखींचं मैत्रीत रुपांतर होतं, मैत्रीचे नवीन धागेही विणले जातात.
यंदाचा हा मैत्रीचा सोहळा संपन्न होणार आहे १८ जुलै २०१० या दिवशी, खोपोली इथल्या यू.के.’ज्‌ रिसॉर्टच्या साथीनं. पाऊस तर दरवर्षी असतोच संगतीला.
पण मंडळी, तो दिवस साजरा करण्याची पूर्वतयारी म्हणून काही गोष्टी नियमानुसार आणि ठराविक दिवशी करणं गरजेचं आहे.

त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे वविला येणार्‍यांची नावनोंदणी.
वविला registered मायबोलीकर आणि त्यांचे कुटुंबिय (पति/पत्नी/मुले) येऊ शकतात. इच्छुक मायबोलीकरांनी त्यासाठी vavi@maayboli.com या पत्त्यावर ई-मेल करायची आहे.

नावनोंदणी करताना सभासदांनी खालील गोष्टींची माहिती देणे आवश्यक आहे.

१. नाव
२. मायबोलीचा user id
३. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक (भ्रमणध्वनी क्रमांक दिल्यास उत्तम)
४. कुठल्या शहरातून येणार (मुंब‌ई, पुणे इ.)
५. आपला नेहमी वापरात असलेला email id
६. सहभागी होणार्‍या एकूण व्यक्तींची संख्या (प्रौढ/ मुले).
७. लहान मुले (६ ते १० किंवा ३ ते ५ वयोगट) असल्यास त्यांचे वय
८. मायबोली गृपबरोबर बसने येणार की स्वतंत्र येणार?
९. पैसे कसे भरणार? प्रत्यक्ष की ऑनला‌ईन?

नावनोंदणीची अंतिम तारीख आहे ११ जुलै २०१०.

एकूण इच्छुकांच्या संख्येनुसार बसभाडे ठरवण्यास मदत होते. त्यामुळे लवकरात लवकर आपली नावनोंदणी करा.

नावनोंदणीचे काम पूर्ण झाले की पुढचे महत्त्वाचे काम म्हणजे पैसे जमा करणे.

वर्षाविहार-२०१० साठी वर्गणी आहे :
प्रौढ : रु. ६५० प्रत्येकी. (रिसॉर्ट : रु. ४००, बस : रु. २००, इतर खर्च : रु. ५०)
मुले (वय ६ ते १० वर्षे) : रु. ४०० प्रत्येकी.
५ वर्षांपर्यंतच्या मुलांना काहीही शुल्क नाही.
(इतर खर्चामधे सांस्कृतिक कार्यक्रमासाठी लागणार्‍या खर्चाचा अंतर्भाव आहे.)

पुणे आणि मुंबई इथे ११ जुलै २०१० या एकाच दिवशी वविचे पैसे जमा केले जातील.

पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीशेजारील कट्टा. वेळ: ११ जुलै २०१०, सं. ५.३० ते ८.००

मुंबई - स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात. वेळ: ११ जुलै २०१०, सं. ५.३० ते ८.००

समजा पैसे भरून जर आयत्यावेळी काही कारणाने वविला येणं रद्द केलं तर बसचे भाडे वजा करून उरलेले पैसे परत करण्यात येतील.

स्वतंत्र येणार्‍यांनी बसभाडे देण्याची अर्थातच गरज नाही.

ऑनला‌ईन पैसे भरणार्‍यांना ज्या अका‌ऊंटमध्ये पैसे भरायचे आहेत त्याची सर्व माहिती ईमेलने कळविली जाईल.

मुंब‌ई आणि पुणे सोडुन इतर ठिकाणच्या तसेच भारताबाहेरील कोणालाही वर्षाविहारास येणे शक्य असेल तर त्यांनी जरूर यावे.

वर्षाविहार-२०१० संयोजन समिती :

पुणे -

प्रणव कवळे (प्रणव कवळे) फोन : ९७३००१८१२८
सचिन (सचिन_dixit) फोन : ९८९०८२०७००
राजेश जाधव (राज्या) फोन : ९८८१४९८१८९
मल्लीनाथ (MallinathK) फोन : ९९६०३६६५६६

मुंबई -

विनय भिडे (विनय भिडे) फोन : ९८२०२८४९६६
निलेश वेदक (नील वेद) फोन : ९७०२७२१२१२
कविता नवरे (कविता नवरे)
अमित देसाई (असुदे) फोन : ९३२१९१७२१५
प्रीति छत्रे (ललिता-प्रीति)
आनंद केळकर (आनंद्_सुजू): ९८२०००९८२२

http://uksresort.com/ या दुव्यावर यू. के.’ज्‌ रिसॉर्टची अधिक माहिती मिळू शकेल.
आपल्याला काही शंका असल्यास आपण इथे मेसेज टाकू शकता अथवा vavi@maayboli.com या ई-मेल आयडीवर संपर्क करु शकता.

गेल्या वर्षी मावळसृष्टी इथे पार पडलेल्या ववि-२००९ला मायबोलीकर आणि त्यांचे कुटुंबीय यांची विक्रमी उपस्थिती होती. तो विक्रम यंदा मोडला जावा अशी सर्वांचीच इच्छा आहे.

वविची रुपरेषा साधारण अशी असेल......

सकाळी ९.०० वाजेपर्यंत पुणे व मुंबईच्या बसेस रिसॉर्टवर पोहोचतील
सकाळी ९.३० ते १०.०० न्याहारी करुया
१०.०० ते १०.३० स्विमिंगपूलात उतरण्यासाठीचे चेंजिंग
१०.३० ते १२.३० स्विमिंग पूल व इतर उपलब्ध राईड्स/रेन डान्स मधे धम्माल मस्ती
१२.३० ते १.०० परत चेंजिंग
१.०० ते २.०० जेवण
२.३०-४.३० मनोरंजन
५.०० वाजता चहा व बिस्किट्स
५.३० वाजता जड अंत:करणाने आपापल्या शहरात नेणार्‍या बस मधून प्रयाण.

तेव्हा, भेटू या, २०१०च्या वविला!

मुंबईच्या बस रुटची माहिती खालील प्रमाणे

१) बस बोरिवली नॅशनल पार्कहून सुटेल वेळ ५.४५ am (ह्या स्टॉपकरता श्री. विनय भिडे ह्यांच्याशी संपर्क साधावा)
२) जोगेश्वरी हायवे (जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड कॉर्नर) - ६.२० am
३) दीनदयाळ नगर मुलूंड (पुर्व) ६.२५ am (ह्या स्टॉपकरता श्री. आनंद केळकर ह्यांच्याशी संपर्क साधावा)
४) ऐरोली ब्रिज ७.१० am
५) ऐरोली सेक्टर ५: ७.१५ am
६) वाशी ७.३० am
७) कळंबोली मॅकडोनल्ड (एक्स्प्रेस हायवेचा स्टार्ट) ८.०० am

मुंबई रुट संदर्भात काही शंका असल्यास कृपया १० जुलै पर्यंत इमेल करा किंवा ११ जुलै रोजी संध्याकाळी ५.३० ते ७.३० ह्या वेळेत श्री विनय भिडे ह्यांना शिवाजी पार्क येथे प्रत्यक्ष भेटून किंवा फोन करुन संपर्क साधावा.

पुणे बस रुटची माहिती खालील प्रमाणे
बस नंबर - MH12 FC 3344
बसचा रंग - पांढरा / केशरी - (अंबिका ट्रॅव्हस)

१) बस सावरकर भवनहून (बाल गंधर्वच्या पाठीमागे) सुटेल वेळ - ६.१५ am (६ ते ६.१५ पर्यंत बस तिथे थांबेल)
२) डेक्कन - ६.३० am (बसस्टॉप समोर)
३) राजाराम पुल - ६.४५ am (सिंहगड रोड्-व्यंकटेस्वरा हॅचरीज)
४) कोथरुड (किमया हॉटेल) - ७.०० am

प्रत्तेकाने वेळेपुर्वी तेथे उपस्थित रहाणे आवश्यक आहे.

पिंपरी-चिंचवडहुन येणार्‍यांनी कृपया मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या फाट्याजवळ थांबावे, त्यांना तिथुन पिक केले जाईल.

नोंदणी केलेल्या सर्वांनी कृपया आपला थांबा आणि बरोबर येणार्‍या मंडळींची नाव इमेल करुन कळवावी, ही माहिती वहातूक कंत्राटदाराला परवान्यासाठी लागणार आहे. ज्या मेंबर्सनी थांबा कळवला नसेल तर ते कोथरूड येथे बसणार आहेत असे ग्रूहीत धरले जाईल.

सुचना: रिसॉर्ट मधे पाण्यात उतरताना पोहोण्याचा पोषाख असणे आवश्यक आहे. (महिलांसाठी: पोहोण्याचा पोषाख नसल्यास टेरिकॉट्/नायलॉन मटेरिअलचे लेगिंग्ज आणि टि शर्ट चालतील) पाण्यात उतरताना शक्यतो कॉटनचे कपडे/ जीन्स वगैरे गोष्टी टाळाव्यात)
धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>> पिंपरी-चिंचवडहुन येणार्‍यांनी कृपया मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या फाट्याजवळ थांबावे, त्यांना तिथुन पिक केले जाईल. <<<<
ओ भाऊ, नेमका कुठला फाटा?
डान्गे चौक?
की हिन्जवडी चौक?
की वाकडचा पुलाचा चौक?
या व्यतिरिक्तदेखिल बरेच "फाटे" आहेत, कोणता तरी एक फाटा सान्गा बोवा!
वरील पुणेबसच्या रुटप्रमाणे असे "जाणवतय" की बस चान्दणी चौकातुन पुढे कात्रज-देहू बायपासने मुम्बईकडे जाऊ लागेल व शेवटी एक्स्प्रेस वेला वळेल. जर हे बरोबर असेल तर बालेवाडी नन्तरचा वाकडचा चौक तसेच त्यापुढील डान्गेचौक-->हिन्जवडी रस्तावरील ओव्हरब्रीज अशी दोन ठिकाणे असू शकतील.
तेव्हा कृपया विस्कटून सान्गावेत ही विनन्ती Happy

संयोजक, दत्तवाडी म्हणजे नक्की कुठे? सिंहगड रोडच्या बाजूने का म्हात्रे पुलाच्या? बस पुढे कोथरुडात जाणार आहे म्हणून विचारले.

डान्गे चौक? >>> हा चौक एक्स्प्रेस वे वर नाहीये
की हिन्जवडी चौक?
की वाकडचा पुलाचा चौक?

अरे लिम्ब्या चिंता नसावी ह्या सगळ्या फाट्यांवर काही मायबोलीकर आहेतच. वैयक्तीक संपर्कातून त्यांना मार्गदर्शन केले जाईलच.

ओक्के फदी, मग काळजी नाही Happy काये की यावर्षीदेखिल पुणेकरान्ची गाडी उशिरा आली असे नको व्हायला, नै का? आपल कस हव? आधी तिथे पोचून नाश्टा वगैरे उरकुन मग मुबैकरान्ची वाट बघायची!

नमस्कार,
पुण्यातुन कोणी यू.के.’ज्‌ रिसॉर्ट ला डायरेक्ट जाणारे असल्यास limbkarshree@gmail.com या ई-मेल वर संपर्क करा. म्हणजे बरोबर जात येईल.

-- श्रीवर्धन

मल्ल्या, अरे गम्मत नाय सान्गत, मागल्या महिन्यात भान्डूपला गेलेलो ना लग्नाला, तर सगळ्यात आधी आम्ही अन फोटोग्राफर हजर, आमच्या नन्तर भटजी आले, मग नवरी मुलीकडचे तासाने उगवले, त्यान्च्या नन्तर अर्ध्यातासाने नवर्‍यामुलाकडचे!
मीन टाईम नाष्टा वाटायला सुरुवात झाली होती! आम्हि लग्गेच पहिला नम्बर लावुन हादडून घेतल!
हो ना! अशा मोठमोठ्या कार्यात की नै, खूप गर्दी होते, लायनित उभाराव लागत, अन बरेचदा तुम्चा नम्बर येईस्तोवर पातेल खडाडखुडूम आवाज करु लागलेल अस्त! तेव्हा कस? आधी हाजिर तो वजिर! Proud
त्यातुन मला तर बोवा भूक अज्जिबात निभावत नाही.
आता ही सां.स. किती वेळ पाण्यात बुचकळवत ठेवणार काय की! Biggrin दुपारच्या जेवणाची वेळ काय आहे हो? माहित आहे का कुणाला? Happy

ठरलंय का नाही मग यस्जी रोडचा थांबा कुठं करायचा ते? Uhoh
दरवर्षी प्रमाणं व्यंकटेश्वरा हॅचरिज च्या बाहेर थांबवा बस, तिथून पुढे एलबी एस रोड, सेनादत्त पोलिसचौकी, म्हात्रेपुलावरून जाऊंदे किमया ला. कारण राजाराम ब्रिजावरून बसला जाऊ देणार नाहीत आणि दत्तवाडीतून सुद्धा.. क्रुपया नोंद घ्यावी.

बसचा रूट थोडा अपडेट केला आहे.

नोंदणी केलेल्या सर्वांनी कृपया आपला थांबा आणि बरोबर येणार्‍या मंडळींची नाव इमेल करुन कळवावी, ही माहिती वहातूक कंत्राटदाराला परवान्यासाठी लागणार आहे. ज्या मेंबर्सनी थांबा कळवला नसेल तर ते कोथरूड येथे बसणार आहेत असे ग्रूहीत धरले जाईल.

असे आतमधे थांबाअयला परावानग्ती मिळाते का व्यंकटेश्वरा हॅचरिज मधे

मला पण यायचे होते पण बाहेरगावी गेलो होतो तेव्हा राहून गेले. आता पुढच्या वेळेस नक्की

मी ठरवलेले थांबे होतेच की पण तुम्हा लोकांचीच सोय पहाण्याची मोठी घोडचुक केली त्यामुळेच हा विलंब Sad

पर्‍या तू तरी कळवला आहेस का रे तुझा pickup point Proud

दक्षे, माझ काय बी म्हणणं नाय! मी नुस्ताच सुचनापटू (सन्सदपटू च्या धर्तीवर) Wink
काये ना की ऐनवेळेस "घोळ" होऊ नये म्हणुन "दक्षता" घ्यायला सुचविले!

सचिन, उगी उगी, आता दोनच दिवस तर राहिलेत, (सहन करायचे Proud ) पार पडतील

>>> बस रुटला तरी बक्ष दे मेरे भाई ! <<<
हो हो, या वर्षी बक्षलच की, बसने न येऊन Wink

लेको नशिब चान्गल्हे समजा तुमच, नैतर लोकं की नै, बसचा नम्बर कोणता, बसचा रन्ग कोणता, ड्रायव्हर कोणता, ड्रायव्हरचा रन्ग कोणता, त्याच्या कपड्यान्चा रन्ग कोणता, तो टोपी घालतो की नै, तो कोणत्या भाषेत बोलतो, त्याला रस्ता ठाऊके का, ड्रायव्हरचा मोबाईल नम्बर काय, त्याला भल्या पहाटे उठवणार कोण, बस कुठल्या ग्यारेज मधुन येणार, बसच्या चाकातली हवा कोण तपासणार, खिडक्यान्ना काचा अहेत की नाही, काचा असल्यास पडदे आहेत की नाही की घरुनच रुमाल/टॉवेल आणू, बसला स्टेफनी आहे का, कुणी बघितलिये, बसमधे फर्स्टएड बॉक्स आहे का, कुणी बघितलाय, घण्टी वाजवायला कण्डक्टर कोण बनणारे इत्यादी अनेक प्रश्नान्च्या फैरी झाडतात.... बघा बोवा, होमवर्क करुन उतारुन्ना द्यायची उत्तरे आधीच तयार ठेवा! Proud
माझ आपल (वडीलकीच्या? नात्याने) सान्गायच काम! ते मी इमानेइतबारे करतोच दरवर्षी! Happy

लिम्ब्या मला कायबी सहन वगैरे करायची गरज नाय पडणार मी बस च्या पहिल्या थांब्यावर जाऊन बसणार अन् ठरलेल्या टायमाल बस रेटत कोथरूड पर्यंत नेणार तिथे फारतर धा मिनिटे वाट पहायची आणि पुढचा प्रवास सुरू करायचा. नाहितर पुढे वाट पहाणार्‍यांचा तिथे पुतळा होयला नको

घोडचूक काय? एकच तर थांबा वाढवला, तेही तिथे अनेक लोक आहेत म्हणून, एकादोघासाठी नाही! Uhoh ट्रान्स्पोर्टरचे कळले नाही, त्याला प्रत्येक माणसाचे नाव कशाला पाहिजे? बरोबर मायबोली आयडीव्यतिरिक्तही काही आयडी प्रूफ ठेवायचे आहे की काय? Happy

ईमेल केली आहे.

पौर्णिमा, मोटर वाहन कायद्यानुसार, सार्वजनिक वाहतुकीव्यतिरीक्त प्रत्येकवेळी वाहतूकदाराकडे प्रत्येक प्रवाशाचे नाव व वय यांची माहिती असणे बंधनकारक आहे.

ट्रान्सपोर्टरला प्रत्येक माणसाचे नाव द्यावे लागते पण ते तर वविसंयोजकांकडे असेलच की.. कोण कुठून बसणार ह्याचा ट्रान्सपोर्टरशी काही संबंध नाही... ते वविसंयोजकांच्या सोयीसाठी गरजेचे आहे..

कोठुन बसनार हे तुमच्या सोई साठी विचारलेले. स्पॉट वरुन निघताना आम्हाला क्रॉसचेक करायला सोईस्कर होईल. अन्यथा तुम्ही बस गेल्यावरही वाट पाहत उभेराहनार असाल तर आम्हाला काही हरकत नाही. Happy
आणि ट्रान्स्पोर्टर बद्दल असुदेनी योग्य ती माहीती दिली आहेच.

ट्रान्सपोर्टरला प्रत्येक माणसाचे नाव द्यावे लागते पण ते तर वविसंयोजकांकडे असेलच की.. >>> संयोजकांकडे ज्या माबोकरांनी नोंदणी केलेय त्यांचे नाव आहे पण त्यांच्या बरोबर त्यांच्या कुटूंबातील कोणी येत असेल तर त्यांची नावे नाही आहेत (अपवाद वगळता) म्हणून येणार्‍या सगळ्यांची नावे इमेल करायला सांगितली.

कॄपया नोंद घ्यावी, ट्रान्सपोर्टरला प्रवाशांच्या नावाची आणि वयाची यादी परमिटसाठी कंपल्सरी द्यावीच लागते. अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे बोलू नये पण अपघात वगैरे झाला तर नावांची यादी लागते.

ववि व्हायच्या आधीच वविसंयोजक वैताग जाहिर करू लागले तर कसं चालेल बरं? >>>>
मंजु काही जन स्पष्ट बोलतात , काही जण नाही ...एव्हढाच फरक आहे...:स्मित:
आणि ववी झाल्यावर वैताग जाहीर करायची पद्धत आहे का काय ??? Uhoh

Pages