वर्षाविहार २०१० : यू. के.' ज रिसॉर्ट (मुंबई/पुणे बस रुटच्या माहिती सह)

Submitted by ववि_संयोजक on 14 June, 2010 - 01:53

२६ मे : वर्षाविहाराच्या दवंडीची दवंडी आली आणि मायबोलीवर नव्याने आनंदाची लकेर उठली.

८ जून : प्रत्यक्ष दवंडी झाली, वर्षाविहाराचं ठिकाण जाहीर झालं आणि यू.के.’ज्‌ रिसॉर्ट हे नाव मायबोलीवर सर्वतोमुखी झालं.

... आणि आज हा वर्षाविहार-२०१०च्या सविस्तर माहितीचा धागा आलाय तुमची उत्सुकता शमवायला.
एखाद्या गोष्टीची खुमारी वाढवत न्यायची असेल तर ती अशी!

गेली सात वर्षं चालू असलेला हा वर्षाविहाराचा उपक्रम आहेच तसा नाविन्यपूर्ण, लज्जतदार, खुमासदार, हवाहवासा वाटणारा!
तर मंडळी, मायबोली घेऊन येत आहे वर्षाविहार-२०१०...
एक असा उपक्रम ज्यात मायबोलीवरचे सभासदच नव्हेत तर त्यांचे कुटुंबीयही सहभागी होऊ शकतात. मायबोलीवरचं लेखन, इतर अनेक उपक्रम, इथे चालणार्‍या गप्पा, चर्चा, चेष्टा-मस्करी (आणि क्वचित काही तात्विक मतभेद सुध्दा ;)) याबद्दल समस्त मायबोलीकरांचे कुटुंबीय रोज काही ना काही ऐकतच असतात. त्या गप्पा, ती धमाल त्यांना प्रत्यक्ष अनुभवायला मिळते ती वर्षाविहारादिवशी. वविदिवशी नवीन भेटीगाठी होतात, ओळखी होतात, आधीच्या ओळखींचं मैत्रीत रुपांतर होतं, मैत्रीचे नवीन धागेही विणले जातात.
यंदाचा हा मैत्रीचा सोहळा संपन्न होणार आहे १८ जुलै २०१० या दिवशी, खोपोली इथल्या यू.के.’ज्‌ रिसॉर्टच्या साथीनं. पाऊस तर दरवर्षी असतोच संगतीला.
पण मंडळी, तो दिवस साजरा करण्याची पूर्वतयारी म्हणून काही गोष्टी नियमानुसार आणि ठराविक दिवशी करणं गरजेचं आहे.

त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे वविला येणार्‍यांची नावनोंदणी.
वविला registered मायबोलीकर आणि त्यांचे कुटुंबिय (पति/पत्नी/मुले) येऊ शकतात. इच्छुक मायबोलीकरांनी त्यासाठी vavi@maayboli.com या पत्त्यावर ई-मेल करायची आहे.

नावनोंदणी करताना सभासदांनी खालील गोष्टींची माहिती देणे आवश्यक आहे.

१. नाव
२. मायबोलीचा user id
३. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक (भ्रमणध्वनी क्रमांक दिल्यास उत्तम)
४. कुठल्या शहरातून येणार (मुंब‌ई, पुणे इ.)
५. आपला नेहमी वापरात असलेला email id
६. सहभागी होणार्‍या एकूण व्यक्तींची संख्या (प्रौढ/ मुले).
७. लहान मुले (६ ते १० किंवा ३ ते ५ वयोगट) असल्यास त्यांचे वय
८. मायबोली गृपबरोबर बसने येणार की स्वतंत्र येणार?
९. पैसे कसे भरणार? प्रत्यक्ष की ऑनला‌ईन?

नावनोंदणीची अंतिम तारीख आहे ११ जुलै २०१०.

एकूण इच्छुकांच्या संख्येनुसार बसभाडे ठरवण्यास मदत होते. त्यामुळे लवकरात लवकर आपली नावनोंदणी करा.

नावनोंदणीचे काम पूर्ण झाले की पुढचे महत्त्वाचे काम म्हणजे पैसे जमा करणे.

वर्षाविहार-२०१० साठी वर्गणी आहे :
प्रौढ : रु. ६५० प्रत्येकी. (रिसॉर्ट : रु. ४००, बस : रु. २००, इतर खर्च : रु. ५०)
मुले (वय ६ ते १० वर्षे) : रु. ४०० प्रत्येकी.
५ वर्षांपर्यंतच्या मुलांना काहीही शुल्क नाही.
(इतर खर्चामधे सांस्कृतिक कार्यक्रमासाठी लागणार्‍या खर्चाचा अंतर्भाव आहे.)

पुणे आणि मुंबई इथे ११ जुलै २०१० या एकाच दिवशी वविचे पैसे जमा केले जातील.

पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीशेजारील कट्टा. वेळ: ११ जुलै २०१०, सं. ५.३० ते ८.००

मुंबई - स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात. वेळ: ११ जुलै २०१०, सं. ५.३० ते ८.००

समजा पैसे भरून जर आयत्यावेळी काही कारणाने वविला येणं रद्द केलं तर बसचे भाडे वजा करून उरलेले पैसे परत करण्यात येतील.

स्वतंत्र येणार्‍यांनी बसभाडे देण्याची अर्थातच गरज नाही.

ऑनला‌ईन पैसे भरणार्‍यांना ज्या अका‌ऊंटमध्ये पैसे भरायचे आहेत त्याची सर्व माहिती ईमेलने कळविली जाईल.

मुंब‌ई आणि पुणे सोडुन इतर ठिकाणच्या तसेच भारताबाहेरील कोणालाही वर्षाविहारास येणे शक्य असेल तर त्यांनी जरूर यावे.

वर्षाविहार-२०१० संयोजन समिती :

पुणे -

प्रणव कवळे (प्रणव कवळे) फोन : ९७३००१८१२८
सचिन (सचिन_dixit) फोन : ९८९०८२०७००
राजेश जाधव (राज्या) फोन : ९८८१४९८१८९
मल्लीनाथ (MallinathK) फोन : ९९६०३६६५६६

मुंबई -

विनय भिडे (विनय भिडे) फोन : ९८२०२८४९६६
निलेश वेदक (नील वेद) फोन : ९७०२७२१२१२
कविता नवरे (कविता नवरे)
अमित देसाई (असुदे) फोन : ९३२१९१७२१५
प्रीति छत्रे (ललिता-प्रीति)
आनंद केळकर (आनंद्_सुजू): ९८२०००९८२२

http://uksresort.com/ या दुव्यावर यू. के.’ज्‌ रिसॉर्टची अधिक माहिती मिळू शकेल.
आपल्याला काही शंका असल्यास आपण इथे मेसेज टाकू शकता अथवा vavi@maayboli.com या ई-मेल आयडीवर संपर्क करु शकता.

गेल्या वर्षी मावळसृष्टी इथे पार पडलेल्या ववि-२००९ला मायबोलीकर आणि त्यांचे कुटुंबीय यांची विक्रमी उपस्थिती होती. तो विक्रम यंदा मोडला जावा अशी सर्वांचीच इच्छा आहे.

वविची रुपरेषा साधारण अशी असेल......

सकाळी ९.०० वाजेपर्यंत पुणे व मुंबईच्या बसेस रिसॉर्टवर पोहोचतील
सकाळी ९.३० ते १०.०० न्याहारी करुया
१०.०० ते १०.३० स्विमिंगपूलात उतरण्यासाठीचे चेंजिंग
१०.३० ते १२.३० स्विमिंग पूल व इतर उपलब्ध राईड्स/रेन डान्स मधे धम्माल मस्ती
१२.३० ते १.०० परत चेंजिंग
१.०० ते २.०० जेवण
२.३०-४.३० मनोरंजन
५.०० वाजता चहा व बिस्किट्स
५.३० वाजता जड अंत:करणाने आपापल्या शहरात नेणार्‍या बस मधून प्रयाण.

तेव्हा, भेटू या, २०१०च्या वविला!

मुंबईच्या बस रुटची माहिती खालील प्रमाणे

१) बस बोरिवली नॅशनल पार्कहून सुटेल वेळ ५.४५ am (ह्या स्टॉपकरता श्री. विनय भिडे ह्यांच्याशी संपर्क साधावा)
२) जोगेश्वरी हायवे (जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड कॉर्नर) - ६.२० am
३) दीनदयाळ नगर मुलूंड (पुर्व) ६.२५ am (ह्या स्टॉपकरता श्री. आनंद केळकर ह्यांच्याशी संपर्क साधावा)
४) ऐरोली ब्रिज ७.१० am
५) ऐरोली सेक्टर ५: ७.१५ am
६) वाशी ७.३० am
७) कळंबोली मॅकडोनल्ड (एक्स्प्रेस हायवेचा स्टार्ट) ८.०० am

मुंबई रुट संदर्भात काही शंका असल्यास कृपया १० जुलै पर्यंत इमेल करा किंवा ११ जुलै रोजी संध्याकाळी ५.३० ते ७.३० ह्या वेळेत श्री विनय भिडे ह्यांना शिवाजी पार्क येथे प्रत्यक्ष भेटून किंवा फोन करुन संपर्क साधावा.

पुणे बस रुटची माहिती खालील प्रमाणे
बस नंबर - MH12 FC 3344
बसचा रंग - पांढरा / केशरी - (अंबिका ट्रॅव्हस)

१) बस सावरकर भवनहून (बाल गंधर्वच्या पाठीमागे) सुटेल वेळ - ६.१५ am (६ ते ६.१५ पर्यंत बस तिथे थांबेल)
२) डेक्कन - ६.३० am (बसस्टॉप समोर)
३) राजाराम पुल - ६.४५ am (सिंहगड रोड्-व्यंकटेस्वरा हॅचरीज)
४) कोथरुड (किमया हॉटेल) - ७.०० am

प्रत्तेकाने वेळेपुर्वी तेथे उपस्थित रहाणे आवश्यक आहे.

पिंपरी-चिंचवडहुन येणार्‍यांनी कृपया मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या फाट्याजवळ थांबावे, त्यांना तिथुन पिक केले जाईल.

नोंदणी केलेल्या सर्वांनी कृपया आपला थांबा आणि बरोबर येणार्‍या मंडळींची नाव इमेल करुन कळवावी, ही माहिती वहातूक कंत्राटदाराला परवान्यासाठी लागणार आहे. ज्या मेंबर्सनी थांबा कळवला नसेल तर ते कोथरूड येथे बसणार आहेत असे ग्रूहीत धरले जाईल.

सुचना: रिसॉर्ट मधे पाण्यात उतरताना पोहोण्याचा पोषाख असणे आवश्यक आहे. (महिलांसाठी: पोहोण्याचा पोषाख नसल्यास टेरिकॉट्/नायलॉन मटेरिअलचे लेगिंग्ज आणि टि शर्ट चालतील) पाण्यात उतरताना शक्यतो कॉटनचे कपडे/ जीन्स वगैरे गोष्टी टाळाव्यात)
धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यो, गुब्बी चिंता नसावी.
या वेळेस प्रवास तसा कमी आहे, आणि परतीचा प्रवास ५.३० ला चालू करणार आहोत, त्यामुळे वेळेतच घरी पोहोचू...

रीना बाई येणार आहेत का यंदा?

त्या येणार अस्तील तर ऐरोली गावातला स्टॉपची वेळ (जरा) वाढवायला लागेल!!! Proud

हिम्स...
स्पॉट कोणता जवळ पडेल तिकडे, आणि किती जण आहेत ते कळवाल का? कारण अजुन कोणीच पिक अप स्पॉट बद्दल मेल केली नाही.

अरे, मी कालच विचारलं होतं ना, राजाराम पुलापाशी ठेवा पिकप. बरेच जण आहेत. हे अजून फायनल नव्हतं म्हणून मेल केला नाही...

मल्ली,मी सचिनशी सिंहगड बस थांब्याविषयी काल चर्चा केली आहे.. तू त्याच्याशी बोलुन घे.. सिंहगड रोड आणि आसपासचे १० एक जण तरी असतीलच... ज्यांना सिंहगडरोडवर बस स्टॉप ठेवला तर सोयीचे होईल..

सिंहगड रोड आणि आसपासचे १० एक जण तरी असतीलच...>>

१) मधुकर
२) आशुडी
३) हिम्सकुल

सिरफ तिन ? और थांबा मांग रहे है, ये नाइन्साफी है......... अरे है कोई ? और है कोई, जो इधरका थांबा मांगता है.

१) मधुकर
२) आशुडी
३) हिम्सकुल
४) मयुरेश
५) पौर्णिमा
६) श्यामली
७) साजीरा
८) दक्षिणा
९)

आता ठिक आहे.

आणि आयडी एकच असला, तरी त्यांच्याबरोबर लोकही आहेत, त्यामुळे लिहिलेले ९ अधिक अजून किमान ६ तरी लोक आहेत, त्यामुळे १५ लोक आहेत राजाराम पूलाला तो स्टॉप केला तर.

अरे एवढे जण आहेत तर मेल का नाही केलात.... वर सांगितलेलं ना तसं. ते थांबे ठरवण्यासाठीच तर मेल करायला सांगितलेले... Uhoh

१) मधुकर
२) आशुडी
३) हिम्सकुल
४) मयुरेश
५) पौर्णिमा
६) श्यामली
७) साजीरा
८) स्वाती
तुम्ही एवढे सगळेजण एस्जी रोडला राहता कुणीच कस बोलल नाही मला Uhoh

धन्यवाद संयोजक. गुब्बी, हा बसथांबा इतर थांब्यांपेक्षा सोयीचा आहे फक्त, याचा अर्थ असा नाही की हे सारे तिथे राहतात. Happy

गुब्बी, ह्यातले प्रत्यक्ष सिंहगड रोड वर १,२,३,४,८ हे रहातात... बाकीच्यांना इथून बस पकडणे सोपे आहे..

गुब्बी, हा बसथांबा इतर थांब्यांपेक्षा सोयीचा आहे फक्त, याचा अर्थ असा नाही की हे सारे तिथे राहतात. - अस आहेका मी आपल उगीचच हरकुन गेले कळपात प्राणी वाढले म्हणुन Sad

>>>>> तुम्ही एवढे सगळेजण एस्जी रोडला राहता कुणीच कस बोलल नाही मला <<< Lol Lol Lol
काय करणार? आदतसे मजबुर! (या मजबुरीसे आदत... व्हॉट्टेव्हर...! ) Proud

गुब्बी, ह्यातले प्रत्यक्ष सिंहगड रोड वर १,२,३,४,८ हे रहातात - म्हणजे तू पण तिथेच राहतोस की पण नक्की कुठे रे??

>>>> मी विचार करत होते रे एस्जी रोडकरांच गटग करायच का
गुब्बे, अग मग ववि कुणाचा होतोय अस वाटल तुला? आजी/माजी यस्जीरोडकरान्चाच की!
इकडून हे, अन तिकडून ते म्हमईवाले Happy
तुमच्या रिअल पत्यान्चा सम्बन्ध फक्त बस पकडण्यापुरता (अन उद्योजग ग्रुपपुरता), बाकी तुमची ओळख तुम्ही मूळचे कुठल्या बीबीवरचे, सध्या कुठल्या बीबीवर वावरता यावरच ठरते! Happy

बापरे !!
आज नाय यायला जमले तर केवढा भडिमार इथे..

नोंदणी केलेल्या सर्वांनी कृपया आपला थांबा आणि बरोबर येणार्‍या मंडळींची नाव इमेल करुन कळवावी.
ट्रान्स्पोर्टर ला आज संध्याकाळी नावे द्यायची आहेत

vavi@maayboli.com

मोबाईल संदेश बस थांब्याचे नियोजन / फेरबदल करण्याच्या अनुषंगानेच पाठवले होते तसेच कोणत्या बस थांब्यावर कोण बसमधे बसणार हे आमच्या लक्षात येणार आहे,

बस त्या थांब्यावरून सुटली तर मग तुमचीच पळापळ होणार आणि प्रवासाच्या वेळापत्रकावर सुद्धा त्याचा परिणाम होईल.

तरी ज्या लोकांनी उत्तर पाठवले नाहीत त्यानी ते लवकर पाठवावेत. ज्यांना संदेशच मिळाले नाहीत त्यांनी खालील प्रमाणॅ संदेस पाठवावेत.

माझा मोबाईल नं. ९८९०८२०७००

<मायबोली id>_<तुम्ही निवडलेला बसथांबा>

Pages