वर्षाविहार २०१० : यू. के.' ज रिसॉर्ट (मुंबई/पुणे बस रुटच्या माहिती सह)

Submitted by ववि_संयोजक on 14 June, 2010 - 01:53

२६ मे : वर्षाविहाराच्या दवंडीची दवंडी आली आणि मायबोलीवर नव्याने आनंदाची लकेर उठली.

८ जून : प्रत्यक्ष दवंडी झाली, वर्षाविहाराचं ठिकाण जाहीर झालं आणि यू.के.’ज्‌ रिसॉर्ट हे नाव मायबोलीवर सर्वतोमुखी झालं.

... आणि आज हा वर्षाविहार-२०१०च्या सविस्तर माहितीचा धागा आलाय तुमची उत्सुकता शमवायला.
एखाद्या गोष्टीची खुमारी वाढवत न्यायची असेल तर ती अशी!

गेली सात वर्षं चालू असलेला हा वर्षाविहाराचा उपक्रम आहेच तसा नाविन्यपूर्ण, लज्जतदार, खुमासदार, हवाहवासा वाटणारा!
तर मंडळी, मायबोली घेऊन येत आहे वर्षाविहार-२०१०...
एक असा उपक्रम ज्यात मायबोलीवरचे सभासदच नव्हेत तर त्यांचे कुटुंबीयही सहभागी होऊ शकतात. मायबोलीवरचं लेखन, इतर अनेक उपक्रम, इथे चालणार्‍या गप्पा, चर्चा, चेष्टा-मस्करी (आणि क्वचित काही तात्विक मतभेद सुध्दा ;)) याबद्दल समस्त मायबोलीकरांचे कुटुंबीय रोज काही ना काही ऐकतच असतात. त्या गप्पा, ती धमाल त्यांना प्रत्यक्ष अनुभवायला मिळते ती वर्षाविहारादिवशी. वविदिवशी नवीन भेटीगाठी होतात, ओळखी होतात, आधीच्या ओळखींचं मैत्रीत रुपांतर होतं, मैत्रीचे नवीन धागेही विणले जातात.
यंदाचा हा मैत्रीचा सोहळा संपन्न होणार आहे १८ जुलै २०१० या दिवशी, खोपोली इथल्या यू.के.’ज्‌ रिसॉर्टच्या साथीनं. पाऊस तर दरवर्षी असतोच संगतीला.
पण मंडळी, तो दिवस साजरा करण्याची पूर्वतयारी म्हणून काही गोष्टी नियमानुसार आणि ठराविक दिवशी करणं गरजेचं आहे.

त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे वविला येणार्‍यांची नावनोंदणी.
वविला registered मायबोलीकर आणि त्यांचे कुटुंबिय (पति/पत्नी/मुले) येऊ शकतात. इच्छुक मायबोलीकरांनी त्यासाठी vavi@maayboli.com या पत्त्यावर ई-मेल करायची आहे.

नावनोंदणी करताना सभासदांनी खालील गोष्टींची माहिती देणे आवश्यक आहे.

१. नाव
२. मायबोलीचा user id
३. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक (भ्रमणध्वनी क्रमांक दिल्यास उत्तम)
४. कुठल्या शहरातून येणार (मुंब‌ई, पुणे इ.)
५. आपला नेहमी वापरात असलेला email id
६. सहभागी होणार्‍या एकूण व्यक्तींची संख्या (प्रौढ/ मुले).
७. लहान मुले (६ ते १० किंवा ३ ते ५ वयोगट) असल्यास त्यांचे वय
८. मायबोली गृपबरोबर बसने येणार की स्वतंत्र येणार?
९. पैसे कसे भरणार? प्रत्यक्ष की ऑनला‌ईन?

नावनोंदणीची अंतिम तारीख आहे ११ जुलै २०१०.

एकूण इच्छुकांच्या संख्येनुसार बसभाडे ठरवण्यास मदत होते. त्यामुळे लवकरात लवकर आपली नावनोंदणी करा.

नावनोंदणीचे काम पूर्ण झाले की पुढचे महत्त्वाचे काम म्हणजे पैसे जमा करणे.

वर्षाविहार-२०१० साठी वर्गणी आहे :
प्रौढ : रु. ६५० प्रत्येकी. (रिसॉर्ट : रु. ४००, बस : रु. २००, इतर खर्च : रु. ५०)
मुले (वय ६ ते १० वर्षे) : रु. ४०० प्रत्येकी.
५ वर्षांपर्यंतच्या मुलांना काहीही शुल्क नाही.
(इतर खर्चामधे सांस्कृतिक कार्यक्रमासाठी लागणार्‍या खर्चाचा अंतर्भाव आहे.)

पुणे आणि मुंबई इथे ११ जुलै २०१० या एकाच दिवशी वविचे पैसे जमा केले जातील.

पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीशेजारील कट्टा. वेळ: ११ जुलै २०१०, सं. ५.३० ते ८.००

मुंबई - स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात. वेळ: ११ जुलै २०१०, सं. ५.३० ते ८.००

समजा पैसे भरून जर आयत्यावेळी काही कारणाने वविला येणं रद्द केलं तर बसचे भाडे वजा करून उरलेले पैसे परत करण्यात येतील.

स्वतंत्र येणार्‍यांनी बसभाडे देण्याची अर्थातच गरज नाही.

ऑनला‌ईन पैसे भरणार्‍यांना ज्या अका‌ऊंटमध्ये पैसे भरायचे आहेत त्याची सर्व माहिती ईमेलने कळविली जाईल.

मुंब‌ई आणि पुणे सोडुन इतर ठिकाणच्या तसेच भारताबाहेरील कोणालाही वर्षाविहारास येणे शक्य असेल तर त्यांनी जरूर यावे.

वर्षाविहार-२०१० संयोजन समिती :

पुणे -

प्रणव कवळे (प्रणव कवळे) फोन : ९७३००१८१२८
सचिन (सचिन_dixit) फोन : ९८९०८२०७००
राजेश जाधव (राज्या) फोन : ९८८१४९८१८९
मल्लीनाथ (MallinathK) फोन : ९९६०३६६५६६

मुंबई -

विनय भिडे (विनय भिडे) फोन : ९८२०२८४९६६
निलेश वेदक (नील वेद) फोन : ९७०२७२१२१२
कविता नवरे (कविता नवरे)
अमित देसाई (असुदे) फोन : ९३२१९१७२१५
प्रीति छत्रे (ललिता-प्रीति)
आनंद केळकर (आनंद्_सुजू): ९८२०००९८२२

http://uksresort.com/ या दुव्यावर यू. के.’ज्‌ रिसॉर्टची अधिक माहिती मिळू शकेल.
आपल्याला काही शंका असल्यास आपण इथे मेसेज टाकू शकता अथवा vavi@maayboli.com या ई-मेल आयडीवर संपर्क करु शकता.

गेल्या वर्षी मावळसृष्टी इथे पार पडलेल्या ववि-२००९ला मायबोलीकर आणि त्यांचे कुटुंबीय यांची विक्रमी उपस्थिती होती. तो विक्रम यंदा मोडला जावा अशी सर्वांचीच इच्छा आहे.

वविची रुपरेषा साधारण अशी असेल......

सकाळी ९.०० वाजेपर्यंत पुणे व मुंबईच्या बसेस रिसॉर्टवर पोहोचतील
सकाळी ९.३० ते १०.०० न्याहारी करुया
१०.०० ते १०.३० स्विमिंगपूलात उतरण्यासाठीचे चेंजिंग
१०.३० ते १२.३० स्विमिंग पूल व इतर उपलब्ध राईड्स/रेन डान्स मधे धम्माल मस्ती
१२.३० ते १.०० परत चेंजिंग
१.०० ते २.०० जेवण
२.३०-४.३० मनोरंजन
५.०० वाजता चहा व बिस्किट्स
५.३० वाजता जड अंत:करणाने आपापल्या शहरात नेणार्‍या बस मधून प्रयाण.

तेव्हा, भेटू या, २०१०च्या वविला!

मुंबईच्या बस रुटची माहिती खालील प्रमाणे

१) बस बोरिवली नॅशनल पार्कहून सुटेल वेळ ५.४५ am (ह्या स्टॉपकरता श्री. विनय भिडे ह्यांच्याशी संपर्क साधावा)
२) जोगेश्वरी हायवे (जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड कॉर्नर) - ६.२० am
३) दीनदयाळ नगर मुलूंड (पुर्व) ६.२५ am (ह्या स्टॉपकरता श्री. आनंद केळकर ह्यांच्याशी संपर्क साधावा)
४) ऐरोली ब्रिज ७.१० am
५) ऐरोली सेक्टर ५: ७.१५ am
६) वाशी ७.३० am
७) कळंबोली मॅकडोनल्ड (एक्स्प्रेस हायवेचा स्टार्ट) ८.०० am

मुंबई रुट संदर्भात काही शंका असल्यास कृपया १० जुलै पर्यंत इमेल करा किंवा ११ जुलै रोजी संध्याकाळी ५.३० ते ७.३० ह्या वेळेत श्री विनय भिडे ह्यांना शिवाजी पार्क येथे प्रत्यक्ष भेटून किंवा फोन करुन संपर्क साधावा.

पुणे बस रुटची माहिती खालील प्रमाणे
बस नंबर - MH12 FC 3344
बसचा रंग - पांढरा / केशरी - (अंबिका ट्रॅव्हस)

१) बस सावरकर भवनहून (बाल गंधर्वच्या पाठीमागे) सुटेल वेळ - ६.१५ am (६ ते ६.१५ पर्यंत बस तिथे थांबेल)
२) डेक्कन - ६.३० am (बसस्टॉप समोर)
३) राजाराम पुल - ६.४५ am (सिंहगड रोड्-व्यंकटेस्वरा हॅचरीज)
४) कोथरुड (किमया हॉटेल) - ७.०० am

प्रत्तेकाने वेळेपुर्वी तेथे उपस्थित रहाणे आवश्यक आहे.

पिंपरी-चिंचवडहुन येणार्‍यांनी कृपया मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या फाट्याजवळ थांबावे, त्यांना तिथुन पिक केले जाईल.

नोंदणी केलेल्या सर्वांनी कृपया आपला थांबा आणि बरोबर येणार्‍या मंडळींची नाव इमेल करुन कळवावी, ही माहिती वहातूक कंत्राटदाराला परवान्यासाठी लागणार आहे. ज्या मेंबर्सनी थांबा कळवला नसेल तर ते कोथरूड येथे बसणार आहेत असे ग्रूहीत धरले जाईल.

सुचना: रिसॉर्ट मधे पाण्यात उतरताना पोहोण्याचा पोषाख असणे आवश्यक आहे. (महिलांसाठी: पोहोण्याचा पोषाख नसल्यास टेरिकॉट्/नायलॉन मटेरिअलचे लेगिंग्ज आणि टि शर्ट चालतील) पाण्यात उतरताना शक्यतो कॉटनचे कपडे/ जीन्स वगैरे गोष्टी टाळाव्यात)
धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जाम जळजळ होतेय रे!!!
दंगा करणार सगळे....

बर संयोजक फेकाफेकी करायच्या पुलात 'ड्रेस कोड' आहे का काही?
बर्‍याच ठिकाणी स्विमिंग पुलात ठराविक कपडेच अलाउ करतात म्हणून विचारलं.

या वर्षी जमेल असे वाटतेय
स्विमिंग पूल आणि मिनी वॉटर पार्क >> तिथे जाच करणार्‍याना बुडवायचा प्लान आहे काय ? Proud

सचिन Lol

बर्‍याच ठिकाणी स्विमिंग पुलात ठराविक कपडेच अलाउ करतात म्हणून विचारलं. >>>
अस काही नाहिये तिथे नी ,चालतील साधे कपडे पण, पण शक्यतो स्विमिंग आणि पाण्यात योग्य असे कपडे आणा सगळ्यांनी ,बर पडेल.

मुंबईची बस कुठऊन सुठणार? नवी मुंबईला पिकअप पाईंट कुठे आहे >>> रुट ठरला की सगळ्यांना कळवण्यात येइलच, पण वाशीला बाहेरगावच्या गाड्या सुटतात तिथेच.

३ फुटात बरेच काही बुडु शकते >>>मग काय तर , गुढघा तरी बुडेल की ? Lol

ही सहल साधारण किती वाजता सुरू होऊन किती वाजता सम्पेल??
मी सध्या चेन्नई मधे आहे आणि १७-१८ जुलै ला पुण्यात असणार आहे. किती वाजता घरी परत येउ हे समजलं तर त्या प्रमाणे चेन्नई ला परतायचं ठरवता येइल..

सायंकाळी सहा वाजता खोपोली सोडले तरी, संध्याकाळी असणारी वहातूकीचा किती जाच होतो ते आत्ता सांगता येणे कठीण आहे तरी १८ ला पुण्यामधे पोहोचायला साधारणापणे ९ वाजतील. Happy

रु. ६५० वर्गनी मधे जेवन असनार आहे का?
त्याची काय सोय आहे का?
तीथे रिसॉर्ट मधे मिळेल का?? तसेच स्नेक्स व कोड्रिन्क्स रिसॉर्ट मधे मिळेल का?? नाहितर सोबत घ्यवे लागेल का?

नितीन, सकाळचा चहा नाष्ता, दुपारच जेवण बुफे आहे आणि संध्याकाळी चहा या पैशात समाविष्ट आहे. Happy

पुण्यातून निघणार किती वाजता?<< सकाळी ६ वाजता. कोठुन निघणार किंवा पिक-अप स्पॉट काय असतील याचा तपशील लवकरच जाहीर करण्यात येईल

युकेज रिसॉर्टची लिन्क असेल तर द्या की Happy म्हणजे म्याप बघुन रस्ता ठरविता येईल
जमल्यास गुगल अर्थ वरुन "स्थळाची" हवाई पहाणी देखिल करता येईल, नै का? Proud

तो सॉफ्ट ड्रिंक्सचा कॅन तू बनवलास का रे निल?? ज्याने बनवला त्याने धम्माल बनवला आहे.. मजा करा वविकर..

मी माझे वविचे बुकिंग केले आहे, कृपया कळवाल का मिळाले का ते?
नसेल तर पुन्हा पाठवते... पोचपावती पण द्या प्लिज. Happy

मी पण नोन्दणीची इमेल पाठवली आहे, पोहोच मिळेल काय?
(देवनागरीतील इमेल वाचता आली की नाही हे समजण्यात मला जास्त इन्टरेस्ट आहे)

बोम्बलायला आमच्या इथे http://uksresort.com/ ही लिन्क ब्यान हे Sad
आता मी नेमके ठिकाण कसे शोधू? म्याप कसा तयार करू? म्याप टाका रे कोणतरी

ठीके, गुगल अर्थवर बघतो काही मिळते का ते

>>> पोचा असेल, <<< Lol Lol Lol
दक्षे, बाकी बाता नकोत क्षालनाच्या, नकाशा पाठव मला, नैतर मी "पोचू" कसा?

लिंब्या इथे बशीचं वेळापत्रक पडलं की जवळच्या श्टॉपावर जाऊन उभा रहा,
मग त्या बशितून तु आपोआप पोचशील वविच्या ठिकाणी. पण बस माबोचीच पकड हो.. Proud

Pages