प्रवेशिका - १६ ( swaatee_ambole - कशाची टोचणी नाही ... )

Submitted by kaaryashaaLaa on 2 October, 2008 - 23:55

कशाची टोचणी नाही, कुणाचा जाच नाही
चला! मेलोच असलो पाहिजे! शंकाच नाही!!

तुला मी पाहताना लाजुनी हसलीस तूही
पुढे हातात अपुल्या मामला उरलाच नाही!

अचानक कारणावाचून विस्कटतात स्वप्ने
असे रात्रीसही होते मला, दिवसाच नाही!

तुझ्यासाठीच जे होते, तुला देऊन झाले
कसे सांगू तुला - आयुष्य म्हणजे लाच नाही!

मलाही द्यायची होतीच कबुली पातकांची!
कुठे निष्पाप न्यायाधीश सापडलाच नाही!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वप्ने आणि पातकांची कबुली हे दोन्ही शेर आवडले.
आयुष्य म्हणजे लाच नाही! - हा ही मस्त!

छान प्रयत्न पण...

मधले ३ शेर हे एकाच जमीनीवर आधारीत वाटतात पण पहिला आणि अखेरचा शेर मात्र मधल्या ३ शेरांशी संबंधीत वाटत नाही. पहिला आणि अखेरचा शेरही वेगळ्या जमीनीवरचा वाटतो.

आशय, प्रवाह, शेर, शब्दरचना, शैली - सर्वांमि़ळून मी ६ गुण ठरविले आहेत.

ओ.....एकाच जमीनीवर नसती तर इथे आली असती का ही गझल?????????????????????

तुम्हाला विषय, असं काही म्हणायच असेल बहुतेक Uhoh

आत्तापर्यंत आलेल्या गझलांमधे सगळ्यात बाप गझल आहे ही. आणि अजून एक, इथे आलेला " च" न खटकणारा आहे.

त.टी. ही गझल माझी नाही.

श्यामली, एकाच जमीनीवरती म्हणजे एकाच विषयावरती. गजलच्या संदर्भात जमीन म्हणजे विषयाच ना? निदान मी तरी तोच अर्थ घेतला आहे. जमिन = विषय. मधले ३ शेर मला एकमेकांशी सुसंगत वाटलेत पण पहिला आणि शेवटचा नाही.

शिवाय प्रत्यकाची कवितेच्या बाबतीत चव न्यारी असते ना..

बी,

गझलच्या संदर्भात जमीन म्हणजे विषय नाही.

जमीन म्हणजे रदीफ, काफिया, अलामत आणि बेहेर (वृत्त) यांनी बनलेली चौकट, जी मतल्यामुळे ठरते आणि नंतरच्या सगळ्या शेरांना पाळावी लागते. कार्यशाळेत याबाबत चर्चा झाली आहे आधी.
(संदर्भासाठी
http://www.maayboli.com/node/3625
http://www.maayboli.com/node/3647
हे दुवे पहावेत.)

तसंच गझलचे शेर एका विषयावर वा एका मूडचे असावेत असं बंधन नसतं. पारंपारिक गझलमधे ते तसे नसतातही.
त्या अर्थी गझल हा एक सारखी जमीन पाळून लिहीलेल्या ५ किंवा अधिक स्वतंत्र कवितांचा समूह असतो असं म्हणता येऊ शकेल.

==
मज आयुष्याचा माझ्या, कळलेला आशय नाही
जगतो हा तर्कच आहे, आलेला प्रत्यय नाही

kaaryashaalaa08@maayboli.com

माझे ९ गुण या गझलेला.. आणि एक मोठ्ठा 'वाह वाह...'

१० गुण

मतला जीव घेऊन गेला .. (म्हणजे आता मीही मेलोच असलो पाहिजे!)

मामला - गोड!

स्वप्ने - डोक्यातून जात नाहीये हा शेर...

आयुष्य म्हणजे लाच नाही - शहारा आला वाचून....तुम्हाला सुचला तेव्हा काय झालं असेल?

न्यायाधीश - !!!

----------------------------------------------------------------------------------------------------------------------
अव्यक्ताचे धुके दाटता.....व्यक्त साठते दवबिंदूसम !

मतल्याने तोडलंच.....अतिशय सुंदर मांडणी..बाकी सर्व शेर ही मस्त!!!!

८ गुण

'मतला' छा गैलो री Happy
सगळेच शेर आवडले. झक्कास लय आहे आणि किती सहज आलेत शेर. मामला, रात्रीही - म्हणजे ज्याला tongue in cheek म्हणतात तसं?
'लाच' फिरसे छा गैलो री Happy
माझे ९
-----------------------------------------------------
वह सुबह का अहसान हो या मेरी कशिश हो
डूबा हुआ खुर्शीद सर्-ए-बाम तो आया

खल्लास... म्हणजे वाचक खल्लास....
काहीच शब्द नाहीत...

तुझ्यासाठीच जे होते, तुला देऊन झाले
कसे सांगू तुला - आयुष्य म्हणजे लाच नाही!
पुरता खल्लास....

अप्रतिम...
माझे गुण... १०

*********************
वयाबरोबर वाढत जावी तुझी नि माझी मैत्री
मनाबरोबर वयात यावी तुझी नि माझी मैत्री ||

क्या बात है!
असे उद्गार सहज उमटले अशी या कार्यशाळेत मला वाटलेली पहिली गजल.
माझ्या मते ९ गुण. एकसे बढकर एक - मतल्या पासून शेवटच्या शेरापर्यंत. वाह!

स्वप्नांचा शेर आणि निष्पाप न्यायाधीशाचा शेर मला फारच आवडले. खूपच छान!
खरं तर १० गुणच, पण याहून चांगली नंतर आली तर, म्हणून तेवढा एक ठेवलाय. Happy

-सतीश

सुभान अल्लाह! सही रे!!
मतल्यानेच गारद झालो. Happy
पूर्ण गजलच आवडली.

खरंच! काय मस्त जमली आहे ही गजल! अगदी आवडली. Happy
मतलाच असा काही आहे की बास! आणि पुढचे सगळेच शेर एकसे बढकर एक!
९ गुण!

--------------------------------
जलो, मगर दीप जैसे!

मस्त गझल .. आवडली. त्यातही मतल्याचा लहजा सुंदर. मक्ताही सुंदर.

८/१०
~~~~~~~~~
~~~~~~~~~
Happy

जबरदस्त.
मी याला पण गुण देरान.. ९ Happy
( तीट लावायचं म्हणून : लाच चा अर्थ बाकीच्यांइतका लख्ख नाही समजला.)

एकदम खल्लास....... Happy

कशाची टोचणी नाही, कुणाचा जाच नाही
चला! मेलोच असलो पाहिजे! शंकाच नाही!!


तुला मी पाहताना लाजुनी हसलीस तूही
पुढे हातात अपुल्या मामला उरलाच नाही!

वाव्वा!! दोन्ही शेर शेर अगदी लगेच दाद घेऊन गेले. फार सुरेख! क्या बात है.

दिवसाच नाही हा शेर वाचताना मजा आली. विधानात्मक असला तरी शेर कसा खुलू शकतो ह्याचे चांगले उदाहरण.
लाचेचा शेर चांगला वाटतो आहे. पण शेराचा अर्थ अधिक स्पष्ट झाल्यास उत्तम.
न्यायाधीशाचा शेरही छान.
आतापर्यंतच्या गझलांपेक्षा फार फार सरस गझल.

----------------------------
गझल कार्यशाळेला भरघोस शुभेच्छा!!!!
तसंच गझलचे शेर एका विषयावर वा एका मूडचे असावेत असं बंधन नसतं. पारंपारिक गझलमधे ते तसे नसतातही.

कार्यशाळा, हे विधान स्पष्ट नाही. पारंपरिक गझलेत एका मूडचे शेर नसतात असे म्हणायचे आहे काय की असतात असे म्हणायचे आहे?

वाचताना आपसूकच वाह !! निघाला
सुर्रेख असली पाहिजे, शंकाच नाही.

अगदी कुर्ता फाडके आहे ही गजल!
मतला जबरीच पण स्वप्नांच्या शेरातला दिवस-रात्रीचा उलटफेर अगदी भिडला!!
मतला आणि हा शेर अगदी आउट ऑफ दी बॉक्स वाटले!
_________________________
-A hand that erases past can create a new begining.

वाहवा...क्या बात है! लाजवाब! अप्रतीम! सुसाट! भन्नाट.
अजुन बरंच काही....माझ्याकडुन १० गुण.

झकास गझल!

मतला आवडला. मार्क वगैरे देण्याची माझी पात्रता नाही त्यामुळे ते टाळतो.

दुसर्‍या शेरात 'अपुल्या' शब्दाचा वापर अनावश्यक वाटला... अपुल्या ऐवजी माझ्या केलं तर अपुल्या टाळता येईल असे वाटते.

तुला मी पाहताना लाजुनी हसलीस तूही
पुढे हातात माझ्या मामला उरलाच नाही!

गझलचा तिसरा शेर थोडा कमी आवडला. बाकी सगळे शेर झकास...!

सारंग अर्थ बदलतोय की तसं केलं तर. एकदा लाजून हसल्यावर आता पुढचं सगळं दोघांचं बाबा. नुसतं माझ्या म्हणून कसं भागेल? Happy

ये तो कोई मंझा हुवा कलाकार है.
९ गुण द्यायलाच हवेत.
- अनिलभाई

मला आवडलेली कार्यशाळेतली आत्तापर्यंतची सर्वात छान गझल.
मतला आणि प्रत्येक शेर खासच.
पहिला शेर वाचला की वाह ! निघतेच. दुसर्‍याला वाह् वाह्! आणि प्रत्येक शेरागणिक वाह् चा हा फ्लो वाढतच जातो.
पाच शेरांवरच का थांबलात हो? अजूनही वाचायला आवडलं असतं Happy

मतल्यातली कल्पना, अर्थ छान आहे. पण दुसरी ओळ वाचताना सरळसोट वाक्यासारखी वाटली. cbdg.
यातही 'च च' आहे पण तेवढं खटकत नाही. Happy
'लाच' चा अर्थ मला तरी असा वाटला - सगळं आयुष्य तुलाच वाहिलं कारण ते तुझ्यासाठीच होतं. ती 'लाच' नव्हती. पुन्हा cbdg.

आवडली. ७ गुण.

Pages