प्रवेशिका - १६ ( swaatee_ambole - कशाची टोचणी नाही ... )

Submitted by kaaryashaaLaa on 2 October, 2008 - 23:55

कशाची टोचणी नाही, कुणाचा जाच नाही
चला! मेलोच असलो पाहिजे! शंकाच नाही!!

तुला मी पाहताना लाजुनी हसलीस तूही
पुढे हातात अपुल्या मामला उरलाच नाही!

अचानक कारणावाचून विस्कटतात स्वप्ने
असे रात्रीसही होते मला, दिवसाच नाही!

तुझ्यासाठीच जे होते, तुला देऊन झाले
कसे सांगू तुला - आयुष्य म्हणजे लाच नाही!

मलाही द्यायची होतीच कबुली पातकांची!
कुठे निष्पाप न्यायाधीश सापडलाच नाही!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

केवळ अप्रतिम..!
माझे ८ गुण..!

प्रतिसादासाठी सर्वांचे मनापासून आभार! Happy

स्वाती, जबरी गझल आहे. खूप खूप आवडली.

Pages