Submitted by जिप्सी on 10 June, 2010 - 23:38
मराठी संगीत भावगीत, चित्रपटगीत, लोकगीत, नाट्यगीत अशा विविध दालनांनी सजले आहेत.
गीतकारांचे अर्थवाही शब्द, संगीतकारांनी बांधलेली सुयोग्य चाल आणि गायकांची कर्णमधुर कारागिरी, अशा अनेक गाण्यांचा खजिना मराठी गीतांमध्ये आहे.
इथे आपण आपल्याला आवडलेल्या मराठी भावगीत, चित्रपटगीत, नाटयसंगीत, लोकगीत, लावणी इ. गाण्यांची चर्चा करुया. यात नेमके तुम्हाला काय आवडले (शब्द, संगीत, आवाज की सगळेच) तेच सांगायचे आहे.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
केदार हि चांगली बातमी आहे.
केदार हि चांगली बातमी आहे. वयात आल्याने त्याचा आवाज फूटला, अश्या अफवा मध्यंतरी कानावर आल्या होत्या.
त्याच खरं नाव आनंद भाटे हे
त्याच खरं नाव आनंद भाटे हे आहे.
जोहार मायबाप मंजुषा कुलकर्णी - पाटिल पण मस्त गाते. मला नंद्याने ह्या गायिकेची ओळख करुन दिली. त्यातले कोमल स्वर वगैरे तर अफलातून ! दुर्दैवाने युट्यूब वर तिचे खूप जास्त व्हिडीओ नाहीयेत. पण जे काही आहेत ते आवडले.
मंजूषा कुलकर्णी पाटील, ची
मंजूषा कुलकर्णी पाटील, ची सिडी आहे माझ्याकडे. आता बरेच नवे उभरते कलाकार येत आहेत, पण त्यांना योग्य तो वाव मिळत नाही.
दिनेश धन्यवाद. तुमच्यामुळे
दिनेश धन्यवाद. तुमच्यामुळे अतिशय छान माहिती मिळतेय. माझे बाबा नाटकांचे आणि नाट्यसंगिताचे शौकिन होते, त्यामुळे तुम्ही लिहिलेली बहुतेक गाणी मी ऐकलेली आहेत, काही नाटकेही पाहिलेली आहेत. आता असे वाटते की त्या काळचे लोक खरेच भाग्यवान होते, ज्यांनी हे सगळे पाहिले, ऐकले.
आताही गुणवत्ता आहे, पण आता कोणालाच वेळ नाही... सगळे झटपट झाले पाहिजे असा आग्रह. काही काही गोष्टी हळुहळू रुजतात, मुरतात आणि मगच त्यांची गोडी कळते, तिथे झटपटचा आग्रह धरुन चालत नाही...
वर उल्लेख झालाय की नाही आठवत नाही, पण आज येताना सुरेश भटांची, सुरेश वाडकरने गायलेली
दुभंगुन जाता जाता मी अभंग झालो
ही गजल ऐकली. आधीही ऐकलेली, पण तरीही दरवेळेला ऐकताना काहीतरी नविनच ऐकल्याचा भास होतो. चालही एकदम मस्त आहे.
"आता बरेच नवे उभरते कलाकार
"आता बरेच नवे उभरते कलाकार येत आहेत, पण त्यांना योग्य तो वाव मिळत नाही."
असे असले तरी कालच्यापेक्षा आजची स्थिती नवीन कलाकारांसाठी नक्कीच आशादायक आहे. सर्व प्रकारचे "प्रोज अँड कॉन्स" विचारात घेवूनसुध्दा झी "सारेगामा" ने जे व्यासपीठ नवोदितांना उपलब्ध करून दिले आहे त्याची व्याप्ती दिवसेदिवस वाढत चालली असल्याचे जे चित्र येत आहे ते मुलांमुलींना शास्त्रीय आणि नाट्यसंगीताकडे आकर्षित करत चालले आहे असे मी येथील संगीत विद्यालयात सातत्याने वाढत चाललेल्या गर्दीकडे पाहुन करीत आहे.
आज आमच्या सदनिकेतील ८ वर्षाची मुलगी ज्या सहजतेने "अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा" म्हणताना मी ऐकतो व पाहतो त्यावरून ही मुले काय तयारीची होत चालली आहेत याबद्दल खात्री वाटते. "लिटल चँम्प्स" मुळे निदान आजच्या पालकांना संगीताचे (त्यातही नाट्यसंगीताचे) महत्व पटत चालले आहे, हेही नसे थोडके.
(थोडेसे विषयांतर ~~ सध्या चालू असलेल्या "सारेगामा" च्या पर्वातील अपूर्वा गज्जला आणि अविनाश (की अभिषेक?) जोशी यांनी परवा सादर केलेले अप्रतिम द्वंद्वगीत "जमीं से हमे आसमां तक" हे अदालत मधील मोहवून टा़कणारे, ज्या ताकतीने सादर केले त्याला अक्षरशः तोड नाही. या मुलांच्या/तरूणाच्या संगीतातील प्रगतीचे हे गीत द्योतकच म्हणावे लागेल. अशाना या क्षेत्रात पुढे नक्की वाव मिळेल असे वाटते. )
भरत ने आठवण काढल्यावर कृष्णा
भरत ने आठवण काढल्यावर कृष्णा वर बेतलेले आणखी एक नाटक आठवले. योगिनी जोगळेकर बहुतेक लेखिका होत्या. नाटकाचे नाव रंगात रंगला श्रीरंग. त्यात त्यांच्याच आवाजात एक गाणे होते, उठा उठा हो श्रीरंगा. किर्तीने गायलेले (हो किर्ती माझी अत्यंत आवडीची गायिका आहे)
हे गाणे पण बहुदा त्यातलेच.
हरीची ऐकताच मुरली, राधिका, राधिका न ऊरली
आसावरीचे फूल कोवळे, पहाटवारा पिओनी आले
घुसळण करता, हात थांबले
डेर्यामधल्या दह्यादूधातून यमुना अवतरली
वेड असे कैसे विसरावे, नभातूनी रंगा सोडावे
फुलातूनी रंगा वगळावे,
वेडी राधा, वेडा माधव, वेडी ती मुरली
तिच्याच आवाजात, आणखी एक गाणे होते, ते पण कदाचित याच नाटकातले असेल
सखे बाई सांगते मी, नवल घडले
गमते मना, मृदु भावना सखी जी शतजन्मीची गे
हीच प्रीत उमलतसे, माला मी गुंफीतसे
भक्ती ज्योती तेवतसे, तन हसे, मन हसे, मधुरसे
स्वप्नात सख्याशी प्रहर प्रहर बोलते
त्या मनोरथातुनी योजनभर विहरते...
असे काहीसे शब्द होते.
रामावर बेतलेली पण काहि नाटके होती. रामराज्यवियोग नाटकात, किर्ती, मंथरेची भुमिका करत असे. अगदी वेगळाच मेकप असे, आणि अगदी वेगळ्याच पट्टीत ती गात असे. रामाचे वर्णन करणारे हे पद पण बहुदा याच नाटकातले
नयने लाजवीत, बहुमोल रत्ना
नमवी पहा भुमी, जणू चालताना
(जो चालताना, प्रत्यक्ष भूमी, नमून त्याला वंदन करते )
सी. रामचंद्र यांनी पण नाटकाला संगीत दिले होते. (नाटकाचे नाव बहुतेक आतून किर्तन वरुन तमाशा)
विश्वनाथ बागुल यांनी गायलेले हे पद या नाटकात होते
मधुर मिलनी आज लाभला सुगंध सोन्याला
लावणी भुलली अभंगाला
अभंग, ओवी, भारुड, गवळण
तशी यावी लावणी बहरुन
माळ भक्तीची घेऊन भेटे
राधा कृष्णाला, लावणी भुलली अभंगाला
द्रोपदी वर बेतलेले, त्याच नावाचे एक नाटक होते. सुहासिनी मूळगांवकर यांनी गायलेले, लाजविले वैर्यांना, हे पद यातलेच.
बकुल पंडीत ने गायलेले, हे पद पण याच नाटकातले
धावत येई सख्या, यदुराया
नातर महिमा जाईल विलया
बघ आचरीला धर्म जगी मी
शिकविलास जो तूची कासया
मी वरती लिहिले होते, कि लाल शाल जोडी वरची छोटा गंधर्वांची छाया पूसता येणे कठीण आहे, पण हि किमया आणखी एका थोर कलाकाराने केली आहे. ती कलाकार म्हणजे आशा भोसले.
तिने हे गाणे एका चित्रपटासाठी गायले होते, चाल जरा वेगळी आहे. पण लक्षात राहण्याजोगी आहे. आशाच्या मर्मबंधातली ठेव, या सिडीत ते गाणे आहे. आणखीही काही अपरिचित नाट्यगीते आहेत त्यात.
नयने लाजवित मानापमानातले आहे
नयने लाजवित मानापमानातले आहे (ना?) माझ्याकडे कुमारांच्या अवाजात आहे, त्या ध्वनिफितीत आणखी ही गाणी आहेत:
करिन यदु मनी सदना, नाथ हा माझा,मम आत्मा गमला, सुजन कसा मन चोरी, तात करी दुहता विनाशा: स्वयंवर
मला मदन भासे हा, नयने लाजवित :मानापमान
कशि या त्यजु पदाला, प्रभु अजि गमला : एकच प्याला
नच पार नाद निधिला : तुळसीदास : गीत संगीत दोन्ही गोविंदराव टेंबे
अंध बिचारी मी जरी बाला :गीत गोविंदराव टेंबे , संगीत: कुमार गंधर्व(?)
सखे बाई सांगते मी, नवल घडले
गमते मना, मृदु भावना सखी जी शतजन्मीची गे
हे मला पण खुप आवडते विशेषतः स्वप्नात तयाशी प्रहर प्रहर बोलते त्या मनोरथातुन योजनभर विहरते या ओळी.
पण मला ध्रुवपद
सखे बाई सांगते मी नवनवल गे
गमते मना मृदु भावना हृदीची शतजन्मीची गे असेच ऐकू येते. (मला चुकीची ऐकु आलेली गाणी).
चित्रपटातली नाट्यगीते : लाल शाल जोडी -आशा माहीत नव्हते -आता मर्मबंधतली ठेव शोधतो.
मूर्तिंमंत भीती उभी हे शारदा चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायिले आहे ..चाल वेगळी. लबाड आकाशवाणी मुंबईने आतापर्यंत एकदाच वाजवलेले मे ऐकले. ते पण त्यांच्या आठवणीतली गाणी या कार्यक्रमात देवलांची गांणी घेऊन डायल इन कार्यक्रम होता तेव्हा. तिथले श्रीराम केळकर (तेच जे दूरदर्शन च्या बातम्यांत दर्शन देतात)कधी कधी अशी गाणी वाजवतात. ते पण तुमच्यासारखे चालताफिरता संगणक आहेत, मराठी गाण्यांचे, गायक गायिका, संगीतकार, कवी, अभिनेता सगळे ओठावर.
सुरेश वाडकरांनी सुहास्य तुझे म्हटले (कृष्णार्जुन युद्ध?) संसार साठी. पण मला अभिषेकींचे आणि आशाचे ऐकल्यावर दुसरे काही नाही ऐकवत.
सुहासिनी मुळगावकर एकपात्री प्रयोग करायच्या संगीत नाटकातल्या नायिका घेऊन.
भरत, सखे बाई सांगते मी चे
भरत,
सखे बाई सांगते मी चे शब्द हे असू शकतील, युगे लोटली हे गाणे ऐकून.
नयने लाजवित, बद्दल मला शंका आहे, हे गाणे शोभेल असा प्रसंग आठवत नाही.
शारदा नावाचा मराठी सिनेमा होता, त्यात लताने हे गाणे गायले होते. तिच्या एका सीडी मधे आहे ते.
आशाच्या, मी मज हरपून बसले गं, वर सुहास्य तूझे ची दाट छाया आहे.
सुहासिनी बाईंचा प्रॉब्लेम वेगळाच होता. त्यांची उंची जरा जास्त होती, त्यामूळे त्यांच्यापेक्षा उंच नायक त्यांना मिळत नसे, म्हणून त्या एकपात्री प्रयोग करत असत.
नयने लाजवित, बद्दल मला शंका
नयने लाजवित, बद्दल मला शंका आहे, हे गाणे शोभेल असा प्रसंग आठवत नाही
एचेम व्ही ने हे गाणे मानापमान मधले असे दिलेय्...आणि कुमारांनी फक्त बालगंधर्वांचीच नाट्यपदे गायली ना ? (बाळ कोल्हटकरांची नाटके सोडली तर्)...रामराज्य वियोग बालगंधर्वांच्या काळात नव्हते बहुतेक.
सखी बाईचे तुम्ही सांगितलेले शब्द अर्थाला जास्त योग्य वाटताहेत.
कुमार, मला उमजलेले बालगंधर्व,
कुमार, मला उमजलेले बालगंधर्व, असा कार्यक्रम करत असत. त्यातलीच ही सर्व गाणी.
म्हणजे मानापमान मधलेच असावे. पण रामराज्यवियोग जूने नाटक आहे ---
-------
मी वर लिहिले होते कि जून्या चीजांवर बसवलेल्या, नाट्यगीतात
काव्य फ़ारसे नसायचे. पण ज्यावेळी शांता शेळकेंनी, हे बंध रेशमाचे
नाटक लिहिले, त्यावेळी त्यांनी उत्तम काव्य असलेली नाट्यपदे लिहिली.
हे नाटक हिंदु मुसलमान ऐक्यावर होते, असे मी वाचले, प्रत्यक्ष बघितले मात्र नाही.
पंथ जात धर्म किंवा नातेही ज्या न ठावे
ते जाणतात एक, प्रेमास प्रेम द्यावे
ह्रुदयात जागणार्या अतिगूढ संभ्रमाचे
तुटतील ना कधीही हे बंध रेशमाचे
विसरुन जाय जेव्हा माणूस माणसाला
जाळीत ये जगाला विक्राळ एक ज्वाला
पुसतात डाग तेही धर्मांध आक्रमाचे
तुटतील ना कधीही हे बंध रेशमाचे
क्षण एक पेटणारे हे युद्धवेड आहे
देहाहुनी निराळी रक्तास ओढ आहे
तीर्थाहुनी निराळे पावित्र्य संगमाचे
तुटतील ना कधीही हे बंध रेशमाचे
हे बंध रेशमाचे ठेवी जपून जीवा
धागा अतूट हाच प्राणात गुंतवावा
बळ हेच दुर्बळांना देती पराक्रमाचे
तुटतील ना कधीही हे बंध रेशमाचे
----------
काटा रुते कुणाला, आक्रंदतात कोणी
मज फ़ूलही रुतावे, हा दैवयोग आहे
सांगू कशी कुणाला, कळ आतल्या जिवाची
चिरदाह वेदनेचा मज शाप हाच आहे
काही करु पहाता, रुजतो अनर्थ तेथे
माझे अबोलणेही विपरीत होत आहे
हा स्नेह, वंचंना की, काहीच आकळेना
आयुष्य़ ओघळोनी, मी रिक्तहस्त आहे
---------------
वरची दोन्ही पंडीत अभिषेकिंनी गायली आहेत.
याशिवाय, बकुल पंडीत चे, का धरिला परदेस, विकल मन आज
क्षमा बाजीकरचे, दिवस आजचा असाच गेला.
ज्योत्स्ना मोहिलेचे, जायचे इथुन दूर,
वसंतराव देशपांडे यांचे, बहु छेडियला तारा
रामदास कामतचे, संगीत रस सुरस
याशिवाय, तूझा गे नितनूतन सहवास
अशी अनेक सुंदर पदे या नाटकात आहेत.
काटा रुते कुणाला साठी
काटा रुते कुणाला साठी अभिषेकींनी शांताबाईंना 'लोग काटोंकी शिकायत करते हैं, हमने तो फूलोंसे जख्म खाए हैं' हा शेर ऐकवला होता (शांता बाईंबद्द्ल जे जे मिळेल ते ऐकावे वाचावे, त्यांनी लिहिलेले तर नक्कीच्. हा वसा मी घेतलाय म्हणून माहित झाले).वसंतरावांचे 'छेडियल्या तारा' (बहु नाही पुस्तकात) आणि आज सुगंध आला लहरत अशी २ आहेत.रामदास कामतांचे दैव किती अविचारी ऊधो जीवनगतीही न्यारी, क्षमा बाजीकरचे 'मन पापी मानत नाही' हेही खूप छान आहे.
अभिषेकींनी मराठी नाटकातल्या सर्वोत्कृष्ट ३ प्रार्थना गायल्यात :
हे बंध रेशमाचे, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, सर्वात्मका सर्वेश्वरा
एका लेखकाच्या नाटकात गाणी दुसर्याने लिहिलेली :
एकच प्याला -गडकरी/वि सी गुर्जर, हे बंध रेशमाचे - रणजित देसाई - शांताबाई,
धाडिला राम - द ग गोडसे -राजा बढे, स्वप्न वासवदत्ता - वसु भगत -शांताबाई.
स्वप्न मधले 'दशदिशांस पुसतो, पुसतो वेड्या नभा
ती कुठे राजसा माझी प्रियवल्लभा' : अरविंद पिळगावकर : हे एकच ऐकण्यात आलेय.
अभिषेकी-शांताबाई-सुहासिनी मुळगावकर : या त्रयीचे 'एक गंधमालिके,
दु:खभार साहता हासणार मी सुखे' हे यातलेच असावे, कधी ऐकले नाही.
आरती (rar) यांच्या बाबांनी
आरती (rar) यांच्या बाबांनी लिहिलेल्या लोकसत्ता वृत्तपत्रातील लेखांचा धागा.
नाटकाची आवड असणार्यांनी जरूर जरूर वाचावा असा.
नाटयविषयक लेखांची मालिका : 'तुम्हा तो सुखकर हो शंकर'
आरती, तुमचे मनापासुन आभार हे सगळे आमच्याबरोबर शेअर केल्याबद्दल
सर्व नाट्यसंगीत फॅन्ससाठी.
सर्व नाट्यसंगीत फॅन्ससाठी. पुण्यात डेक्कनला Rhythm House नावाचं दुकान आहे. दुकानदार उत्तम मराठी बोलतो आणि वाट्टेल ते दाखवायला तयार असतो (तो अर्थातच मराठी नाही :फिदी:)
तिथे 'मर्मबंधातली ठेव ही' चतुरंग रंगसंगीत नावाच्या ४ सीडींचा संच मिळाला (अलुरकर ची निर्मीती). पुलंदेशपांडेंचे निवेदन आणि गायक कलाकार : भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, माणिक वर्मा आणि भार्गवराम आचरेकर. १९७० मध्ये बालगंधर्व मध्ये सादर झालेला कार्यक्रम आहे हा. पुलंचे निवेदन आणि नाट्यसंगीतावरील भाष्य खरोखर अ प्र ति म आहे. आणि खास भीमसेन जोशींच्या आणि वसंतरावदेशपांड्यांच्या ताना एवढ्या दणदणीत की नुसते ऐकुन श्वास कोंडतोय. नॉईज खूप आहे, ध्वनीमुद्रण सदोष आहे, तरीही संग्राह्य ठेवलीच पाहीजे.
मस्त पोस्टस आहेत इथे. वाचते आहे. मजा येते आहे.
तो अर्थातच मराठी नाही >>
तो अर्थातच मराठी नाही >>
पाडगावकरांनी आणखी एक अप्रतिम गाणं लिहलयं. ( हे म्हणजे मी पाडगावरांच्या बहुतेक सर्वच गीतांना म्हणनार आहे.
) खळ्यांनी त्याला संगीत दिल आहे व गायलय भांजेराम सुरेश वाडकरांनी.
धरिला वृथा छंद
नव्हतेच जर फूल, कोठून मकरंद?
जरि जीव हो श्रांत
नाही तृषा शांत
जलशून्य आभास शोधित मृग अंध ------ क्या बात है !!
झाले तुझे भास
मी रोधिले श्वास
माझीच मज आस घाली असा बंध
पथ सर्व वैराण
पायी नुरे त्राण
माझेच घर आज झाले मला बंद
हे एकदम मनातलं.
वाडकरांची आठवण झालीच आहे तर आणखी एक जबरी गाणं म्हणजे ..
चिंब पावसानं रान झालं आबादानी
झाकू कशी पाठीवरली,
चांदन गोंदनी बाई,
बाई चांदन गोंदनी
लताबाई आणि वाडकरांनी काय गायलयं. एकदम बेष्ट. आणि ना धो महानोरांचे शब्द गंमत करुन जातात.
तुझ्या डोळ्यांच्यां सांदीत, सावल्यांची राणी
पाण्यामधे झिम्मा धरं, आभाळ आस्माणी वा! शब्दांची सुंदर गुंफण. एकदम महानोर टच.
ना धो आले आहेतच तर त्यांचे गडद जांभळ भरलं आभाळ कोण विसरेल. एक होता विदूषक ह्या पिक्चर मध्ये हे गाणं आहे. रविंद्र साठे, उत्तरा केळकर आणि एक गायक नेमके त्यांचे नाव विसरलो ते आहेत. ( त्यांनी जैत रे जैत मध्ये गाणी म्हणली आहेत)
गडद जांभळं भरलं आभाळ
मृगातल्या सावल्यांना बिलोरी भोवळ
खोलवरी चिंब बाई मातीला दरवळ.
शब्द पण कसे नेमके एकदम चित्र समोर उभे करणारे.
जैत रे जैत आठवले आहेच तर त्या मधिल एक अफाट गाणं कोण विसरेल?
गोर्या देहावरली कांती नागिनीची जात
येडे झालो आम्ही द्यावी एकादिच रात
असो एकातून एक गाणी आठवत चालली आहेत. अंताक्षरीसारखी. थांबावे.
रैना, मी त्याच संचाचा उल्लेख
रैना, मी त्याच संचाचा उल्लेख केला होता. पुलंचे निवेदन अगदी अस्पष्ट ऐकू येते, पण गाणी मात्र खासच आहेत. माणिक वर्मांचे बलसागर तूम्ही, आणि हि तव कुटील चतुराई, मस्त जमलेय.
ते भार्गवराम आचरेकर, म्हणजे माझ्या मावसआजीचे दिर. त्यांचा पण मस्त आवाज लागलाय.
नाट्यगीत गायक गायिका, हे
नाट्यगीत गायक गायिका, हे उत्तम शास्त्रीय संगीत गायक असत. जशी नाट्यपदे मूळ चीजांवर आधारीत होती, तश्या काही हिंदी चीजा पण नाटकात होत्या.
उदा, मंदारमाला नाटकात, बसंत कि बहार आयी, अशी एक चीज आहे. (या नाटकात शास्त्रीय नृत्य पण आहे. माया जाधवने हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आणले होते.) याच नाटकात
सोहम हर डमरु बाजे
डमरु ओंकार नाद
परमेश्वर का प्रसाद
उसकेहि महिमापर
भुवन सब जागे
अशी चीज आहे.
स्वरसम्राज्ञी मधल्या बाकिच्या चीजांचा उल्लेख मी केलाच आहे, पण माझी अत्यंत आवडती चीज दूर्गा मल्हार रागात आहे. शब्द खुपच सुंदर आहेत
बलमा आये रंगिले, बादल सावनके
नटखट चंचल नाचे, बिजुरिया
गीत खुषीके गाये नदीया
हरियाला आँचल लहरे, आये रंगिले
भीगीभीगी रातमे रसिया
मीठीमिठी किजे बतियाँ
कूंज कूंज महके, आये रंगिले
कट्यार काळजात घुसली, मधे
सुरत पियाकी न छीन बिसराये
हर हरदम उनकी याद आये
नैननमे न कोऊ और समाये
तरपत हू बिलखत रैन निभावे
अखिया असुवन नीर झर लाये
साजन बिन मोहे कछु ना सुहावे
बिगरी को मेरे कौन बनाये
हसनरंग असू जी बहलावे
अशी द्रुत चीज आहे (शब्द कदाचित इकडेतिकडे झाले असतील.) अभिषेकींनी यातले प्रत्येक कडवे वेगळ्या तालात बांधले आहे, पण नाटकात आणखी एक कडवे गातात,
आणि शिवाय हेही आहेच.
लागी करेजवा कटार
सावरीयासे नैना हो गये चार
बूंद ना गिरी एक लहू की
ना रहि कछू निसानी
मन घायल पर तन पे छायी
मिठी पिस सुहानी
सखी री मै तो सुधबुध बैठि बिसार
प्रीत कि रित सखी ना जानू
जीत हुई या हार ना मानू
जियरा करे इकरार अब मोर
केदार, धन्यवाद "एक होता
केदार, धन्यवाद "एक होता विदुषक"ची आठवण करून दिल्याबद्दल.
एक होता विदूषक ह्या पिक्चर मध्ये हे गाणं आहे. रविंद्र साठे, उत्तरा केळकर आणि एक गायक नेमके त्यांचे नाव विसरलो ते आहेत. ( त्यांनी जैत रे जैत मध्ये गाणी म्हणली आहेत)>>>> केदार, गडद जांभळ भरलं आभाळ हे गाणे रविंद्र साठे, उत्तरा केळकर आणि मिलिंद इंगळे या त्रयींनी गायले आहे. जैत रे जैत मधील गाणी बहुतेक "चंद्रकांत काळे" आणि रविंद्र साठे यांनी गायली आहेत. एक होता विदुषक मधील "लाल पैठणी रंग माझ्या चोळीला" या गाण्याला आशा भोसले आणि चंद्रकांत
काळे यांचा आवाज आहे.
ना.धो. महानोर यांना प्रत्यक्ष भेटण्याचा आणि त्यांची गाणी रविंद्र साठे, उत्तरा केळकर, जयश्री शिवराम यांच्या स्वरात ऐकण्याचा योग मला झी मराठी यांच्या "नक्षत्रांचे देणे - ना. धो. महानोर." या कार्यक्रमामुळे मिळाला होता.
आता एक होता विदुषकचा विषय निघाला आहेच म्हणुन. जब्बार पटेल यांच्या या चित्रपटातील सगळीच गाणी सुंदर आहेत. बहुतेक लावण्या आहे. याच चित्रपटातील सर्व गाणी रानकवी ना.धो.महानोरांची. संगीत आनंद मोडक यांचे. यात आनंद मोडक यांनी एकच लावणी
भरलं आभाळ पावसाळी पाहुणा ग
बाई, श्रावणाचं ऊन मला झेपेना
पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना
बाई, श्रावणाचं ऊन मला झेपेना
आशा भोसले आणि देवकी पंडित यांच्या आवाजात (वेगवेगळी) गाऊन घेतली आहे. (देवकी पंडित यांच्या आवाजतली बहुदा हि पहिलीच लावणी असावी.)
याच चित्रपटातील "मी गाताना गीत तुला लडिवाळा, हा कंठ दाटुनी आला" हि अप्रतिम अंगाई आशा भोसले आणि रविंद्र साठे यांच्या आवाजात आहे. या चित्रपटातील सगळी गाणी आनंद मोडक यांनी "आशा भोसले, रविंद्र साठे, चंद्रकांत काळे, उत्तरा केळकर, जयश्री शिवराम, देवकी पंडित, अरूण इंगळे, प्रभंजन मराठे इ. दिग्गजांकडुन गाऊन घेतली आहे.
कुठेतरी असे वाचनात आले होते कि या चित्रपटाच्या अपयशामुळे लक्ष्मीकांत बेर्डे खचुन गेले होते (या चित्रपटाबद्दल त्यांना खुप अपेक्षा होत्या).
चित्रपटातील गाणी:
१. भरलं आभाळ पावसाळी पाहुणा गं - आशा भोसले
२. कुटं तुमी गेला होता सांगा कारभारी - आशा भोसले
३. मी गाताना गीत तुला लडिवाळा - रविंद्र साठे
४. गच्च लखलख बोरं तुवा लुटली - आशा भोसले
५. लाल पैठणी रंग माझ्या चोळीला - आशा भोसले, चंद्रकांत काळे
६. गच्च लखलख बोरं तुवा लुटली - उत्तरा केळकर
७. पूरबी सुर्य उदयला जी - आशा भोसले
८. उजळ उजळल्या राजमंदिरी - रविंद्र साठे, जयश्री शिवराम
९. मोठ्यांसाठी खोटे हासु - रविंद्र साठे
१०. राधे, यमुनेच्या काठावर दोरवा - रविंद्र साठे, देवकी पंडित
११. भर तारूण्याचा मळा - आशा भोसले, रविंद्र साठे
१२. शब्दांचा हा खेळ मांडला - रविंद्र साठे, मुकुंद फणसळकर, प्रभंजन मराठे, चंद्रकांत काळे
१३. मी गाताना गीत तुला लडिवाळा - आशा भोसले
१४. लाल पैठणी रंग माझ्या चोळीला - देवकी पंडित, रविंद्र साठे
१५. कुणाची ग माडी - आशा भोसले
१६. गडद जांभळ, भरलं आभाळ - रविंद्र साठे, उत्तरा केळकर आणि मिलिंद इंगळे
१७. भरलं आभाळ पावसाळी पाहुणा - देवकी पंडित
१८. सूर्यनारायण नित नेमाने उगवा - देवकी पंडित
१९. काडीवरती माडी - रविंद्र साठे
२०. उजळ -उ़जळल्या - जयश्री शिवराम
२१. तुम्ही जाऊ नका - आशा भोसले, देवकी पंडीत
वरीलपैकी बहुतेक गाणी दोन वेगवेगळ्या गायकांनी गायली आहेत. रसिक श्रोत्यांना हा संच म्हणजे मेजवानी आहे.
मी गाताना गीत तुला लडिवाळा
हा कंठ दाटुनी आला
मी दुःखाच्या बांधुनी पदरी गाठी
जपले तुज ओटी-पोटी
कधी डोळ्यांना काजळ तूज भरताना
गलबला जीव होताना
खोप्यात जिथे चिमणी रोज पिलांना
सांगते गोष्ट नीजताना
ते ऐकुनी का मन तडफड होई
पाळणा म्हणे अंगाई
आयुष्याला नको सावली काळी
इश्वरा तूच सांभाळी
झुलता झोका जावो आकाशाला
धरतीचा टिळा भाळाला
मराठी संगीतक्षेत्रात अमराठी
मराठी संगीतक्षेत्रात अमराठी गायकांचाही फार मोठा वाटा आहे.
एक असेच मराठी गाणे जे गायलं आहे थोर गायिका गीता दत्त यांनी आपल्या सगळ्यांच्या लाडक्या गणरायाचे. मानस मुखर्जी यांच्या संगीताप्रमाणेच याही गाण्यात बंगाली संगीताचा प्रभाव जाणवतो. हे गाणे बर्याच वेळा ऐकले होते पण ओरीजनल ते नव्हते.
आंतरजालावर शोधले असता खालील माहिती मिळाली. (गीत पुन्हा एकदा आपल्या शांताबाईंचेच)
चित्रपटः स्वप्न तेच लोचनी
गायिका: गीता दत्त आणि कोरस
गीतकारः शांता शेळके
संगीतकारः आदिल अहमद
गणपती बाप्पा मोरया
पुढल्या वर्षी लवकर या........
इवले इवले डोळे तुमचे मोठे मोठे कान
एव्हढे मोठे डोके कसे पेलते तरी मान
गोरा गोरा पान रंग मऊ नितळ छान अंग
मोठ्या तुमच्या पोटामध्ये मोठी माया
हे गणपती बाप्पा मोरया
पुढल्या वर्षी लवकर या........
मोठ्या थोरल्या पोटावरी वाकडी वळे सोंड
सोंडेखाली लपुन बसे देवा तुमचे तोंड
दोनावरी दोन हात, एकच कसा तुमचा दात
अजब वाटे रूप असे बघावया
हे गणपती बाप्पा मोरया
पुढल्या वर्षी लवकर या........
उंदरावरी बसुन कशी डुलत येते स्वारी
गोड गोड मोदकांची आवड तुम्हा भारी
शोभिवंत मखर त्यात पुजेचा थाटमाट
आरतीला टाळ झांज वाजवाया
हे गणपती बाप्पा मोरया
पुढल्या वर्षी लवकर या........
पाव्हणं तुम्ही येता घरी मौज होते भारी
खिरापत खाऊ मिळे, मिळे आम्हा सुट्टी
खिलापत खाऊ मिले मिले आम्हा सुत्ती
पुन्हा पुन्हा तुम्ही यावे विद्यादान आम्हा द्यावे
मनोभावे वंदु तुम्हा गणराया
हे गणपती बाप्पा मोरया
पुढल्या वर्षी लवकर या........
बादवे, माझ्याकडे लता मंगेशकर यांनी गायलेले "मोगरा फुलला"चे बंगाली वर्जन आहे. जर कुणाला ऐकायचे असेल तर नक्कि सांगा. मी मेल करेन.
गीता दत्त यांनी सीतेचे एक गीत
गीता दत्त यांनी सीतेचे एक गीत गायिले आहे : जा सांग लक्ष्मणा सांग रामरायाला
समजला म्हणावे न्याय तुझा सीतेला. गीत वसांत बापट
गणपतीबाप्पा मोरया इतक्या वेळा ऐकले पण गीता दत्त हे नाव कधी लक्षातच आले नाही योगेश.
सलिल कुलकर्णीच नवीन गाण आहे
सलिल कुलकर्णीच नवीन गाण आहे ना... देते कोण देते कोण...मस्त आहे ते पण. त्याचे शब्द मिळतील का?
शरददा आत्ता विविधभारतीवर
शरददा आत्ता विविधभारतीवर कीर्ती शिलेदार यांनी सादर केलेला विशेष गीतगंगा हा पुनःप्रक्षेपित कार्यक्रम ऐकला, आणि तुमची आठवण झाली!
त्यात जयराम शिलेदार - रामजोशी -हटातटाने(किती स्पष्ट शब्दोच्चार), प्रमिला जाधव - खरा तो प्रेमा (खडीसाखरेसारखा आवाज आणि गायकी), लता शिलेदार - चमकला ध्रुवाचा तारा मधले उधळीन प्रलयाचा अंगार (नक्की शब्द हेच आहेत का?) मजला कोण रोखु शकणार, कीर्ती शिलेदार - कशी केलीस माझी दैना आणि बालगंधर्व - आम्ही जातो अपुल्या गावा ही गाणी वाजली.
नाट्यगीत गाताना गायकाला जराही अवकाश नसतो, नाही? चित्रपट किंवा भावगीतात दोन ओळींमधे, दोन कडव्यांत किमान ५-१० सेकंद अवकाश असतो.
लता शिलेदार यांनी मानापमानातली धैर्यधराची भूमिकाही साकारली होती.
प्रमिला जाधव या नावानेही काही गाणीही आंतर्जालावर उपलब्ध आहेत.
दूरदर्शनवर खूप वर्षांपुर्वी,
दूरदर्शनवर खूप वर्षांपुर्वी, शिलेदार मंडळीनी एक छान कार्यक्रम सादर केला होता. त्यात हि सर्व गाणी होती. कार्यक्रमात शेवटी, किर्तीने, शंकराभरणम, हे तेलगू गाणे गायले होते. ते इतके सुंदर गायले होते, कि तिला त्याची ध्वनिफीत काढावी लागली होती.
त्यात तिने, रामनील मेधश्यामा कोदंड रामा, असे एक कन्नड गाणे गायले होते, पण त्याबरोबर इतर अप्रतिम अभंग गायले होते.
१)सुख देवासी मागावे, दु:ख देवाला सांगावे (मला वाटते हा अभंग सुधीर फडक्यांच्या आवाजात पण आहे, चाल वेगळी आहे)
२) अगा वैकुंठिच्या राया, अगा विठ्ठल सखया
३) अवघाची संसार, सुखाचा करीन
४) आवडीने भावे, हरी नाम घेसी, तूझी चिंता त्यासी सर्व आहे
आणखी २ अभंग आहेत.
अवघाची संसार, हे कान्होपात्रा नाटकात आहे. त्यातली एकेक ओळ इतकी सुंदर आळवली आहे कि बस. भेटेन माहेरा, किंवा बापरखुमा देवीवरु, या जागा तर मन तृप्त करतात. हि ध्वनिफित आता बाजारातून गायब झालीय.
गीता ला आणखी मराठी गाणी, खास
गीता ला आणखी मराठी गाणी, खास करुन जोगवा गायचा होता. पण तिच्या सगळ्याच इच्छेप्रमाणे ही पण अपूर्ण राहिली.
उषा तिमोथी, म्हणून एक अमराठी गायिका, आमच्या कॉलनीत रहात असे. ( हिमालय कि गोदमे, या सिनेमात तिने रफीबरोबर एक द्वंद्वगीत गायले आहे. ) आमच्या कॉलनीचा गणेशोत्सवात ती आवर्जून मराठी गाणी गात असे. आशाचे जिवलगा राहिले रे, छान म्हणत असे ती. तिच्या आवाजात एक लावणी पण रेकॉर्ड झाली होती, तयांना काळीज नाही कसे, असे काहिसे शब्द होते.
अमराठी गायकांत मन्ना डे नी पण बरीच मराठी गाणी गायलीत.
घन घन माला नभी दाटल्या, अ आ आई अशी काही गाणी आहेत. लता बरोबर, प्रीत रंगली गं, कशी राजहंसी हे पण आहे.
तलत मेहमूद ने पण एक गाणे गायल्याचे आठवतेय.
सुख देवासी मागावे दःख देवासी
सुख देवासी मागावे दःख देवासी सांगावे : शेवग्याच्या शेंगा या चित्रपटासाठी सुधीर फडके -लता मंगेशकर यांनी गायिले. य दोघांचे एकत्र हे एकच गाणे असावे.
शंकराभरणम् मी पण ऐकले होते...खूपच छान होते.
तलत मेहमूद-आशा भोसले : हसले आधी कुणी तू का मी
तलत मेहमूद-आशा भोसले : हसले
तलत मेहमूद-आशा भोसले : हसले आधी कुणी तू का मी
तलत ने गायलेय हे?? मला माहितच नव्हते... अतिशय गोड गाणे आहे. पडद्यावर रमेश-सीमा ही गोड जोडी आहे
http://www.youtube.com/watch?v=EzRHFOnTL-A
किर्तीचे शंकराभरणम मीही
किर्तीचे शंकराभरणम मीही ऐकलेले दुरदर्शनवर. तिने अतिशय सुंदर गायलेले...
शांता शेळके यांनी 'डॉ.वसंत
शांता शेळके यांनी 'डॉ.वसंत अवसरे' या नावाने लिहिलेले एक गाणे तलत मेहमूदच्या आवाजात होते असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.
"स्वप्ने मनातली का वार्यावरी विरावी?
का प्रीतीच्याच नशिबी ताटातुट असावी?"
(नक्की शब्द हेच असतील याची खात्री नाही, पण गाण्याची सुरुवात मात्र "स्वप्ने मनातली" हीच होती.)
विवेक आणि जीवनकला अभिनित "पुत्र व्हावा ऐसा" यातील हे गीत ~~ जरी फार गाजले नसले तरी यातीलच "जिथे सागरा धरणी मिळते, तिथे तुझी मी वाट पाहते...." हे सुमनताईंचे अतिशय सुंदर गीत आजही तितकेच मोहवून टाकते.
भरत, सुधीर फडके आणि लता चे एक
भरत, सुधीर फडके आणि लता चे एक गाणे कीचकवध मधे पण आहे. असा डोईत माळून मरवा, असे शब्द आहेत. (पडद्यावर गोपीकृष्ण आणि हेलन. हेच गाणे, याच दोघांच्या आवाजात, याच चालीवर पण हिंदी भाषेत पण आहे )
वसंत निनावे यांची आणखी गाणी आहेत, तलत मेहमूदच्या आवाजात.
महेंद्र कपूर ने दादा कोंडके यांच्यासाठी गायच्या पुर्वी, बरीच मराठी गाणी गायली होती
सूर तेच छेडीता, गीत उमटले नवे
आज राणी लाभले, सौख्य जे मला हवे
झटकून टाक जीवा, दुबळेपणा मनाचा
फूलला पहा सभोवती, आनंद जीवनाचा (मधुचंद्र)
मधु इथे अन चंद्र तिथे, झुरतो अंधारात
अजब ही मधुचंद्राची रात (मधुचंद्र)
हे चिंचेचे झाड दिसे मज, चिनार वृक्षापरी
दिससी तू नवतरुणी काश्मिरी (मधुचंद्र)
काय करु मी ते सांगा, अगा पांडुरंगा ( संत ज्ञानेश्वर )
सुर तेच छेडीता साठी महेंद्र
सुर तेच छेडीता साठी महेंद्र कपुरला काही पुरस्कारही मिळाला होता असे त्याच्या एका मुलाखतीत ऐकल्याचे स्मरते.. हा चित्रपटही सुंदर होता. नाव आठवत नाही आता, पण रमेश, सीमा आणि इंद्राणी मुखर्जी होते. सीमाचा निगेटिव रोल आहे यात. तिने असा रोल करावा हे तेव्हा लोकांना अजीबात आवडले नव्हते हे सीमाने मुलाखतीत एकदा सांगितले होते
किचकवधातले ते गाणे युटुबवर आहे का कुठे?? मी शोधले पण सापडले नाही. 'किचकवध' म्हणुन शोधल्यावर फक्त 'धुंद मधुमती'च सापडते. त्या गाण्याची कोरीओग्राफी अतिशय सुंदर आहे, दोघेही अतिशय सुंदर नाचलेत.
सुधीर फडके आणि लता चे एक गाणे
सुधीर फडके आणि लता चे एक गाणे कीचकवध मधे पण आहे. असा डोईत माळून मरवा, असे शब्द आहेत.>>>>>> दा, तुम्ही खालील गाण्याबद्दल बोलत आहात का? जर तेच असेल तर मी खरंच याच गाण्याबद्दल विचारणार होतो या आठवड्यात. मला खुप आवडते हे गाणे. माझ्या मोबाईल प्लेलिस्टमध्येपण आहे. आता तेच ऐकुन संपूर्ण गाणे टाईप केले :).
पण हे कोणत्या चित्रपटातील्/अल्बम मधील आहे ते माहित नव्हते (infact कधी शोधायचा प्रयत्नपण केला नाही :(). किचकवधमधील फक्त "धुंद मधुमती...." हेच गाणे माहित होते.
मस्त युगलगीत आहे
असा नेसुन शालु हिरवा अन वेणीत खुंटुन मरवा
जाते कुणीकडे, कुणाकडे, सखे सांग ना
का बघतेस मागे पुढे
असा नेसुन शालू हिरवा
आणि वेणीत खुंटुन मरवा
जाते कुणिकडे, कोणाकडे सखे सांग ना
का गं बघतेस मागे पुढे
का रे वाटेत गाठुन पुसशी
का रे निलाजर्या तू हसशी
जाते सख्याकडे, प्रियाकडे तुला सांगते
त्याची माझी रे प्रीत जडे
तुजपरी गोरी गोरी चाफ्यावाणी सुकुमारी
दुपारचे पार उन जळते गं वर उन जळते
टकमक बघु नको
जाऊ नको तिच्या वाटे
सारी उठाठेव तिला कळते
रे तिची तिला कळ्ते
का गं आला असा फणकारा
कंकणाच्या करीत झणकारा.
जाते कुणिकडे, कोणाकडे सखे सांग ना
का गं बघतेस मागे पुढे
दूर डोंगरी घुमते बासरी
चैत्र बहरला वनामधी, रे वनामधी
पदर फडफडत, ऊर धडधडत
प्रीत उधळते मनामधी, बघ मनामधी
हो हो हो .....मी भल्या घरातील युवती
लोक फिरतात अवती भवती
जाते सख्याकडे, प्रियाकडे खरं सांगते
म्हणुन बघते रे मागे पुढे
Pages