गाणी मनातली (आवडलेली मराठी गाणी)

Submitted by जिप्सी on 10 June, 2010 - 23:38

मराठी संगीत भावगीत, चित्रपटगीत, लोकगीत, नाट्यगीत अशा विविध दालनांनी सजले आहेत.
गीतकारांचे अर्थवाही शब्द, संगीतकारांनी बांधलेली सुयोग्य चाल आणि गायकांची कर्णमधुर कारागिरी, अशा अनेक गाण्यांचा खजिना मराठी गीतांमध्ये आहे.
इथे आपण आपल्याला आवडलेल्या मराठी भावगीत, चित्रपटगीत, नाटयसंगीत, लोकगीत, लावणी इ. गाण्यांची चर्चा करुया. यात नेमके तुम्हाला काय आवडले (शब्द, संगीत, आवाज की सगळेच) तेच सांगायचे आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पूर्वी पुणे केन्द्रावर पहाटे ऐकलेली पण नंतर फारशी न ऐकलेली गाणी कोठे मिळतील का?
विठ्ठला, समचरण तुझे धरिते (लता)>>>> फारएण्ड, माझ्याकडे हे एक गाणे आहे.

बाळ पार्टे नावाचे संगीतकार होते - घेऊ कसा उखाणा, पुनवेचा चंद्रमा आला वरी ही गाणी त्यांनी दिली. बाळ कर्वेंचा संगीताशी काही संबंध असल्याचे ऐकले नाही.
पु.लं.च्या गाण्याची ती यादी : शास्त्रीय /नाट्य संगीत गायकांनी गायलेले प्रत्येकी एकेक गाणे अशी केली होती. अर्थात गाण्यांनी अजीर्ण होत नाही..त्यामूले वाढवू तेवढे थोडेच.
मला स्वरस्म्राज्ञीमधली कीर्ती आणि लता यांची मैफल आठवते. लता शिलेदार त्यात एक नकचढी गायिका असते आणि जयमालाबाईंना दम देते की पेटी नीट वाजवा.
रे तुझ्या वाचून काही म्हणजे फुलराणीतला 'तुला शिकवीन चांगलाच धडा' ते इतक्या वेळा ऐकलेय की मुद्दाम आठवले जात नाही.

भरत मी ते नाटक ४ वेळा बघितलेय. त्याचा दोन ध्वनिफितींचा संग्रह आला होता.
लता (उर्फ दिप्ती भोगले) त्या मैफिलीत इंदिरा केदार नावाचा राग गायची,
बोल होते

करत जान कुर्बान, गाये गौहर जान.

रात्री संगीत विद्याहरण नाटकातल्या गाण्यांबद्दल लिहितो.

संगीत विद्याहरण नाटक मी बघितलेले नाही, पण मला वाटते ते कच देवयानी संबंधी असावे. पण त्यातली गाणी मात्र एकापेक्षा एक आहेत. बहुतेक सगळी कुठल्यातरी मूळ शास्त्रीय चीजेवर आहेत. माझ्याकडे जी गाणी आहेत ती, हिराबाई बडोदेकर, बाल गंधर्व, नीलाक्षी जूवेकर, मास्टर दामले, प्रभाकर कारेकर, प्रकाश घांग्रेकर, आदी थोर गायकांनी गायलेली आहेत. बालगंधर्वांचे, प्रेममया, बर्‍यापैकी द्रुतलयीत आहे.
मधुकर वनवन फिरत करी गुंजारवाला , हे पिया कर धर देखो, धडकत है मोरी छतिया या चीजेवर आधारीत आहे.
छब दिखलाजा रे बाँके सावरिया, यावर अधारीत, मधुमधुरा तव गिरा आहे.
विमला धर निकटी, हे बिहाग मधल्या, देखो मोरी रंग मे भिगोये डारी, या द्रुत बंदीशीवर आधारीत आहे.
शर लागला हे (बहुतेक) मियाँ मल्हार वर आहे, तर आता राग देई मला हे बागेश्रीवर आधारीत आहे.
सूरसुख खनी तू विमला, सगुणा कविबाला पण यातलेच.

मध्यंतरी सारेगामा ने एकेक संगीत नाटकाच्या ध्वनिफिती काढल्या होत्या, त्यात हि सगळी गाणी आहेत.

कुणी जाल का सांगाल का सुचवाल का त्या कोकिळा >>> खुलवू नको अपुला गळा. Lol माझी मैत्रीन थोड्या भसाड्या आवाजात गाते, तिचा नवरा बर्‍यापैकी गातो, त्याला हे गाणे मी सांगीतले. तेंव्हापासून तो दर मैफिलीनंतर तिला हे सुनावतो.

वाटेवर काटे वेचित चाललो - वा क्या बात है. मस्त.

वसंतरावांनी जबरी गायलयं. त्यांचा आठवणीत एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत.

क्षणोक्षणी रात्रं-दिन, तुला आळविन... गायकः- चंद्रशेखर गाडगीळ, संगितकारः- बाळ बर्वे, गीतकारः सुधीर मोघे...आकाशवाणी व्यतिरिक्त कुठेच उपलब्ध होत नाही...>>>>भरत, हे गाणे नक्की "चंद्रशेखर गाडगीळ" यांनी गायले आहे??? माझ्याकडे हे गाणे आहे पण ते श्रीकांत पारगावकर यांनी गायलेले आहे. बाकी डिटेल्स सारख्याच आहेत. (चुभुद्याघ्या).

बादवे "तुजसी मी प्रीत सख्या आज करणार ना, मन माझे अदय प्रिया मुळी झुरणार ना" हे उषा मंगेशकर यांचे गाणे मिळाले. Happy

तू क्या रूंढे मोहे, एक दिन ऐसा होयेगा मै रूंढूंगी तोहे >> फारएंड ते 'तू क्या रोंदे मोहे, एक दिन ऐसा होयेगा मै रोंदूंगी तोहे' असे आहे.
रोंदना = तुडवणे, चिरडणे. संत कबीरांचा दोहा आहे तो.

क्षणोक्षणी रात्रं-दिन, तुला आळविन... गायकः- चंद्रशेखर गाडगीळ, संगितकारः- बाळ बर्वे
योगेश हे गाणे मी अद्याप ऐकलेले नाही. आणखी ओळी लिहिल्या तर कदाचित आठवेल.
गाण्याच्या शोधासाठी तुझा चाललेला प्रयास पाहिला मी महाजालवर. तुला दंडवत!
मी त्या गाण्याचे मूल बांग्ला गाणे मिळतेय का ते पहात होतो, पण नाही जमले.

भरत, हे गाणे नक्की "चंद्रशेखर गाडगीळ" यांनी गायले आहे??? >>विवेक देसाई यांनी दिलेल्या प्रतिसाद यात होते हे गाणे, मी चुकुन भरत लिहिले Sad क्षमा असावी.

आणखी ओळी लिहिल्या तर कदाचित आठवेल.>>>>

क्षणोक्षणी रात्रंदिन, तुला आठवीन,
तुला आठवीन, तुला आठवीन
क्षणोक्षणी रात्रंदिन . . . . . .

आकारात ओंकारात, सगुणात निर्गुणात
तुलाच पाहिन, तुलाच पाहिन
क्षणोक्षणी रात्रंदिन . . . . . .

सुशुप्तीत, जागृतीत, काळजाच्या स्पंदनात
तुलाच गायीन, तुलाच गायीन
क्षणोक्षणी रात्रंदिन . . . . . .

भेट होता उराउरी, प्राण तुझ्या पायावरी
वाहीन....वाहीन.....वाहीन
क्षणोक्षणी रात्रंदिन . . . . . .

भरत, गाण्याबद्दल अधिक माहिती असेल तर नक्की सांगा. Happy

तू पावसाची सर...
भेगाळल्या भुईवर,
तुझ्या स्पर्शाने स्पर्शाने,
कणाकणात अंकुर...

मायबोलीवर असणार्‍या जयवी -जयश्री अंबासकर यांनी लिहिलेलं अन सुरेश वाडकरांनी गायलेलं हे गाणं , खूप सुरेख आहे ऐकायला. अन ह्यातले बासरीचे संगित तर अगदी मनाला भुरळ घालून जाते. भुरभुर पावसात ऐकण्यासाठी एक तरल गाणं..

योगेश मी हे गाणे नक्कीच नाही ऐकलेले.
चंद्रशेखर गाडगीळ यांची झुंज या चित्रपटातली निसर्ग राजा आणि कोण होतास्/होतीस तू (मराठीतली आद्य कव्वाली?) ही गाणी आठवतात. चित्रपट नायकाला शोभेसा त्यांचा आवाज होता, तसेच रवींद्र साठे यांचा. सुधीर फडके, हृदयनाथ, कधी कधी सुरेश वाडकर यांचे आवाज भावगीत गायकाचे आहेत, चित्र्पट नायकाचे नाहीत. (असे लिहिल्याने मला कुणी मारायला येणार नाही ना?) जयवंत कुलकर्णी ग्रामीण नायकाला त्यातही दादांना आवाज दिल्यने बाकीच्या नायकांना वर्ज्य झाले होते का?
सूर्यकांत या देखण्या रांगड्या मराठी हिरोच्या वाट्याला कधी गाणी आलीच नाहीत का?

भरत मला वाटते आद्य कव्वाली ती नाही, मुक्काम पोस्ट ढेबेवाडी (खात्री नाही) मधे, हे काम न्या तडीला
हाजी मलंग बाबा, अशी एक कव्वाली होती. (चित्रपटाची खात्री नाही, पण कव्वालीच्या शब्दांची आहे.)

योगेश...
क्षमा मागण्या एवढा 'घोर' अपराध घडलेला नाही... विवेक ऐवजी भरत झाले तरी चालण्यासारखे आहे, कारण दोघेही तेवढेच आणि तसेच रसिक (गाण्यांच्या बाबतीत) आहोत...
क्षणोक्षणी रात्रंदिन... हे गाणं मी बर्‍याच वेळा 'पूणे' आकाशवाणी वरून ऐकलेलं आहे, आणि प्रत्येकवेळी गायक म्हणून 'चंद्रशेखर गाडगीळ' यांचं नाव सांगितलेलं आहे... कदचीत हल्लिच्या काळात तेच गाणं श्रीकांत पारगावकर यांच्या आवाजात पुनर्मुद्रीत झालं असेल तर कल्पना नाही...

फारेण्ड...
संगितकारः- बाळ बर्वे>>> हे गायक माधव भागवत (नक्षत्रांचे देणे फेम) यांचे सासरे...
बाळ कर्वे हे अभिनेते - 'गुंड्या भाऊ', यांचा आणि 'संगित' या विषयाचा, अभिनया व्यतिरिक्त काहिही संबंध नाही...

मला एकदा ठाण्याच्या फूटपाथवर नाट्यसंगीताची एम पी ३ मिळाली होती. अफाट कलेक्शन आहे. सुरेश वाडकर पासून सगळ्यांनी गायलेली नाट्यगीते आहेत. अनेक फोल्डर वर तर नावही नाही, साईड अ आणि साईड बी एवढेच, आणि काहि आवाज तर मलाही अनोळखी आहेत.
नाटयसंगीत हे अनेकदा ठुमरीवर बेतलेले असे. ठुमरीत चारच ओळी, त्यातली तिसरी ओळ एकदाच म्हणायची, पण त्या गाण्यातून बरेच काही सांगायचे. (जूनी नाट्यगीते पण अशी चार ओळींचीच असायची)
बिहागमधली एक चीज आहे,
लट उलझी सुलझा जा बालम, हाथोंमे मेहंदी रची
माथेकी बिंदीया बिखर गयी मोरी, अपने हाथ सजा जा

आता या एवढ्याच ओळीत किती अर्थ आहे बघा. माझीच बट जरा विस्कटलीय, ती नीट करुन दे, आता स्वतःचीच बट इतर कुणाला सावरायला सांगायचे, तर सबब नको का ? तर ती सबब म्हणजे हाताला मेहंदी लावलीय. आता कुणी बट सावरायला, जवळ आलेच, तर लगे हाथ, विस्कटलेले कुंकू पण नीट करुन दिले तर बरेच की. आणि कुणी हाताने कुंकू लावले, म्हणजे काय ?
असाच अर्थ नाट्यपदांतून काढायचा असतो.

सखये अनसूये, थांब की बाई
येते मी, अशी का घाई
रुतला दर्भांकूर, माझ्या पायी

शकुंतलेला दुष्यंताला बघण्यासाठी रेंगाळायचे आहे, म्हणून सखीला विनवण्या, पायतला काटा हे केवळ निमित्त.

माडिवरी चल गं गडे, जाऊ झडकरी
पाहु सदय दानशूर, मुर्ती ती बरी
होईल सुख मजसी तया, पाहिल्यावरी

म्हणजे वसंतसेनेला फक्त माडीवर जाऊन फक्त चारुदत्ताला बघायचे आहे, कारण काय तर तो म्हणे दानशूर आहे, एवढाच अर्थ आहे का ?

अरसिक किती हा शेला, त्या सुंदर तनूला
सोडून आला, -- दुर्मिळ जे स्थळ मजला
ते सहज मिळूनिया दुर्भाग्याला, तेथून का हा ढळला
मज दृष्टीस न लगे, निष्ठूर मेला, कोंडून ठेवीन याला

आता हे काय, शेल्याला उद्देशून आहे का ?

नाट्यपदांची मजा, हि तो प्रसंग समजावून, घेतला तर जास्त येते.

वा दिनेश सही पोस्ट आहे.

माझ्याकडे पण एक नाट्यसंगीताची सिडी आहे. १४५ नाट्यगीते आहेत त्यात. Happy

दिनेशदा असेच एक गाणे : दूती नसे ही माला, सवतची भासे मला. (सौभद्र?)
भेटू न दे ह्रुदयाला असेही काही आहे पुढे.

दूती नसे हि माला
सवतची भासे मला
नच एकांती सोडी नाथा
भेटू न दे ह्रूदयाला

म्हणजे जवळ गेले तर हि फूलांची माळ आमच्या दोघांच्या मधे येते. नायिका हे थेट नायकाला न सांगता, सखीला सांगतेय. याची मूळ ठुमरी पण अशीच अर्थपुर्ण आणि सूचक आहे

मोरे सैंया किवडीया खोलो
रस कि बूंद पडे
जोबन मेरा भिग पडे है
और तूम मोसे रुठ खडे हो

लिंबोनीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई
आज माझ्या पाडसाला झोप का गं येत नाही

मला हे गाण पुर्ण हवं आहे mp3 असेल तरी चालेल

पौराणिक नाटकातली विशेषतः सौभद्रातली गाणी ऐकली की मला नेहमी एक गंमत आठवते. आकाशवाणी मुंबईवर आठवणीतली गाणी हा एक तासाचा डायल इन कार्यक्रम असायचा. यात मल्मली तारुण्य हे गाणे लागले रे लागले की एक आजोबा लगेच ते कसे अश्लील आहे ते सांगायचे, ते पांघरावेच्या ऐवजी नुसते पहावे असे करा असे त्यांचे म्हणणे. तरुण आहे रात्र अजुनी लागल्यावर काय कराय्चे माहीत नाही, त्यांच्या धाकानेच ते गाणे वाजवीत नसावेत.
सौभद्रातले अज नच सुंदरी हे १०० वर्षांपूर्वी लिहिलेले गाणे आहे आणि त्यात कृष्णाने रुक्मिणीला काय काय शिक्षा तू मला कर असे सांगितले आहे. दंतव्रण करी गाला...वगैरे वगैरे...तसेच वसंतरावांचे लाविली थंड उटी वाळ्याची....(शाकुंतल्?)..

एक उनाड दिवस .. सम्राट अशोक सराफ यांनी अभिनय केलेला एक मस्त मराठी चित्रपट. त्या चित्रपटातली "हुरहुर असते तीच उरी.. हुरहुर असती तीच उरी.. दिवस बरा की रात्र बरी... " हे गाणं खूप आवडतं मला. अगदी अर्थपुर्ण असं एक गाणं.

"हुरहुर असते तीच उरी.. हुरहुर असती तीच उरी.. दिवस बरा की रात्र बरी... ">>> हे एक खरंच सुंदर गाणे, माझ्याही आवडीचे. Happy शुभा जोशी यांनी गायलेले आणि फैयाज/अशोक सराफ यांच्यावर चित्रीत झालेले गाणे आहे.

अतिशय उत्तम बीबी. माबो वर असल्याचे सार्थक झाले. पुण्यात माझे वडील घाटे संगीत विद्यालय चालवत असत व संगीत घरात कायमच होते. आज वाचून ते दिवस परत आले असे वाट्ले. मी या नाटकांच्या पुस्तकांची पारायणे केली आहेत. बाबांनी कॉलेजात शिकविताना मानापमान संगीत नाट्क पूर्ण बसविले होते.
सर्व पोस्टे अतिशय मनःपूर्वक लिहीलेली आहेत. कितीतरी गाणी एकदम सापड्ली. सवडीने परत वाचणार.

माझ्या आवडीची गाणी:

दिसते मजला सुख चित्र नवे मी संसार माझा रेखिते अष्ट विनायक सिनेमातील.
मीमज हरपून बसले ग. आशा
मर्मबंधातली ठेव ही.
शुक्र तारा मंद वारा
तिन्ही सांजा सखे मिळाल्या.
अजून खूप आहेत.

कळत नकळत सीरीअल चे टायट्ल साँग ही मस्त आहे. जरूर ऐका.

अश्विनी, आम्ही भरून पावलो.
मी वर लिहिल्याप्रमाणे आधीच लोकप्रिय असलेल्या चीजांवर नाट्यपदे अक्षरशः रचली गेली. त्यात काव्य फारसे नसायचेच.
अन्यथा, तन मन धन वारी जाऊ, या मूळ चीजेवर, प्रभु मजवरी कोपला, असे शब्द कसे बसवता आले असते ?
हिंदीच नव्हे तर इतर भाषांतल्या चीजा पण वापरल्या गेल्या
तेंडेरे नाल वसैया, या पंजाबी ठुमरीवर काय शब्द बसवणार ?

तरीपण प्रयत्न पूर्वक बसवले ते असे

स्वकुल तारक सूता, सुवरा
वधुनी वाढवी वंशवनिता
सुखविला नच जनक न माता
ऐसी कांता नर करता

अगदी प्रत्येक शब्दाचा अर्थ कळला, तरी संदर्भ लक्षात येत नाही, त्यासाठी संगीत स्वयंवर नाटक बघावे लागते.
मग कळते कि रुक्मीणी कृष्णाला म्हणतेय, कि या स्वयंवरात लढाई झाली, तर माझाच भाऊ, रुक्मि मारला जाणार. जो माझ्या कुलाचा तारक आहे. आणि त्याचा वधाला कारणीभूत झालेली, अशी मी, माझ्याशी लग्न करुन, तू तूझा वंशविस्तार करणार का ? त्याने आईबाबा सुखी होणार आहेत का ?

मग सर्वच गाण्यांचा अर्थ लागतो, रुक्मीणी कृष्णाला म्हणतेय, कि मी तूला हिर्‍यामाणकांचे वाडे बाधून देईन, त्यावर कृष्ण म्हणतो, की मला असे वाडे दिलेस, तर तू कुठे राहशील, तर रुक्मीणी म्हणते, कि असे रत्नांनी सजवलेले वाडे बायकांना मूळी शोभतच नाहीत, मी तर तूझ्याच मनात वास करुन राहेन. आणि ती म्हणते

करीन यदुमनी सदना, रुचिर सदन पतिमन सतीला
अशुभ मणिमय भुवन अबलांना, करीन यदुमनी सदना.

अतिशय अभ्यासपूर्ण चर्चा चालल्याचे प्रतीत होत आहे आणि ही बाब फार आनंददायक आहे, विशेषत: या धकाधकीच्या नित्य कार्यक्रमात. सर्वश्री दिनेशदा, केदार, विवेक आदी आणि खुद्द धागाधारक श्री.योगेश यांचे या विषयातील योगदान बहुमोलाचे आहे असेच म्हटले पाहिजे.

ज्या कलाकारांची (विशेषतः नाट्यसंगीतसंबंधीत) नावे मी इथे वाचली तीत श्री.रामदास कामत यांचे नाव मला कुठे आढळले नाही. फार विस्मरणात गेले आहे हे नाव. "मत्स्यगंधा" नाटकाच्या यशात श्री.रामदास कामत यांच्या गायकीचा सिंहाचा वाटा होता असे माझ्या घरातील वरिष्ठ सांगतात. त्यांनी गायिलेले 'देवा घरचे ज्ञात कुणाला' आजही ऐकले जाते.

श्री.रामदास कामत यांच्या अन्य गाण्यांविषयी कुणाकडे काही माहिती आहे काय?

रामदास कामत मस्यगंधा तसेच हे बंध रेशमाचे मधे पण भुमिका करत असत. मला वाटते कट्यार मधे पण ते होते. होनाजी बाळा मधे पण आधी ते असत. (श्रीरंगा कमलाकांता, हरी पदराते सोड, हि त्यांची गाजलेली गौळण पण ती आधी, महाराष्ट्र गंधर्व सुरेश हळदणकर यांनी गाजवली होती.) पण ऐन उमेदीत असताना त्यांची परदेशी बदली झाली. आणि त्यांना नाटक सोडावे लागले. प्रथम तूज पाहता, (राग कलावती) हे मुंबईचा जावई मधले गाणे पण त्यांचेच.
त्यांच्या काही ध्वनिफीती उपलब्ध आहेत. यू ट्यूब वर काहि गाणी आहेत.

दिनेशदा पुन्हा एकदा सिक्सर. असेच लिहित रहा (अर्थात तुम्हाला जेंव्हा कधी वेळ असेल तेंव्हा :))

धन्यवाद प्रतिक Happy

श्री.रामदास कामत यांच्या अन्य गाण्यांविषयी कुणाकडे काही माहिती आहे काय?>>>>> माझ्याकडे असलेल्या रामदास कामत यांच्या गाण्याची हि यादी.

१. हरी ओम, हरी ओम....प्रणव ओंकार शिवा, हृदयांत उजळू दे सूर्यदेवा (रामदास कामत यांनी गायलेले माझे सर्वात आवडते गाणे)
२. अंबरातल्या निळ्या घराची, शपथ तुला आहे, मयुरा फुलवित ये रे पिसारा
३. देवा तुझा मी सोनार
४. सांग प्रिये, सांग प्रिये....घन भरून आले
५. हरी मी गौळण रे
६. हे आदिमा, हे अंतिमा, जे वांछिलें, ते तू दिलें कल्पद्रुमा
७. हे शिवशंकर गिरीजा तनया गणनायका प्रभुवरा
८. हे गणनायक सिद्धीविनायक, वंदन पहिले तुला गणेशा
९. हे करुणाकरा ईश्वरा, कृपादान मज देई
१०. मन माझे भुलले वनराईच्या पानामधुनी, काल तुला पाहिले
११. ना साहवे विरानी, सौख्यात गायलेली
१२. निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे
१३. पूर्वेच्या देवा, तुझे सूर्यदेव नाव, प्रभातीस येशी सारा जागवीत गाव
१४. सखी सांज उगवली
१५. शिर्डी पंढरपुर माझे, साईरूपे जगन्नाथ गुरु विठ्ठल येथ विराजे (एक अजुन एक आवडते :))
१६. तेजाचा पसारा घेऊन निघाला
१७. त्या क्रुर लाल ज्वाळा
१८. वाटे भल्या पहाटे यावे
१९. वायुसंगे येई श्रावणा, जलधारांची छेडित वीणा
२०. विनायका हो सिद्धगणेशा
२१. या विराट गगनाखाली मी तृणात निजलो आहे
२२. आकाशी फुलला चांदण्याचा मळा
२३. जन विजन झालें आम्हा

मग हे आणखी एक अ‍ॅड कर,
तम निशेचा सरला, अरुण कमल प्राचीवर फूलले
परिंमल या गगनी, भरला, तम निशेचा सरला.

शिवाय,
संगीत रस सुरस, मम जीवनाधार, हे आहेच.

भेटशील त्यावेळी, माझ्याकडची सगळी गाणी कॉपी करुन देईन.

Pages