गाणी मनातली (आवडलेली मराठी गाणी)

Submitted by जिप्सी on 10 June, 2010 - 23:38

मराठी संगीत भावगीत, चित्रपटगीत, लोकगीत, नाट्यगीत अशा विविध दालनांनी सजले आहेत.
गीतकारांचे अर्थवाही शब्द, संगीतकारांनी बांधलेली सुयोग्य चाल आणि गायकांची कर्णमधुर कारागिरी, अशा अनेक गाण्यांचा खजिना मराठी गीतांमध्ये आहे.
इथे आपण आपल्याला आवडलेल्या मराठी भावगीत, चित्रपटगीत, नाटयसंगीत, लोकगीत, लावणी इ. गाण्यांची चर्चा करुया. यात नेमके तुम्हाला काय आवडले (शब्द, संगीत, आवाज की सगळेच) तेच सांगायचे आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

योगेश, आता जाऊ देवाचिया गावा ऐकतेय. मी वर सखुबाई म्हटले पण तुकारामांचा अभंग आहे. इतके शांत वाटतेय तो अभंग ऐकताना. त्यात एकसारखे मागे जे वाद्य वाजतेय त्याची लय खुप गोड आहे. अण्णा जोशी यांचे संगीत आहे या गाण्याला. शब्दांच्या पलिकडले मध्ये बरेचदा त्यांना बघितले होते. वेगवेगळी वाद्ये अगदी सुरेख वाजवत.

फैयाज यांची 'चार होत्या पक्षीणी त्या' हे गाणेही आठवतेय मला. अजुन एक 'स्मरशील राधा' असे काहीतरी पण आता नीट स्मरत नाही.

त्यांचे नाट्यसंगीतही ऐकलेय

भरत Happy

रात्र काळी घागर काळी
यमुनाजळे ती काळी वो माय
गुंथ काळी बिलवर काळी
गळा मोति येकावळी काळी वो माय

मी काळी काचोळी काळी
कांस कासोलिचे काळी वो माय
गुंथ ....

एकली पाण्याला नव जाय साजणी
सवे पाठवा मुर्ति सावळी वो माय
गुंथ ....

विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी
कृष्ण्मुर्ति बहु काळी वो माय
गुंथ काळी बिलवर काळी
गळा मोति येकावळी काळी वो माय

मी अजुन ऐकले नाहीये हे गाणे. Sad

आणि नाट्यपदांबद्दल मला डिवचू नका रे, आवरणे कठीण होईल मला >> दिनेशराव सुरुवात करा. आम्ही वाचू. अन आमच्याही आवडी टाकत राहू. मी मुद्दामच नाट्यसंगीत लिस्ट लिहली आहे. Happy

हे श्यामसुंदर राजसा- वा!!

थोडे(च) विषयांतर ... अगदीच राहवत नाही.

पण किशोरी आमोनकरांची रागदारी ऐकने हा त्याहून सुंदर अनुभव. Happy जसराज ह्यांचे अडाना मधिल माई सांवरे रंग राची आणि दुसरे श्याम मुरारी बनवारी गिरिधारी (राग विसरलो) हे म्हणजे थोर !!

गाडी परत मराठी गाण्याकडे ..

लावनी मध्ये

कळीदार कपुरी पानं कोवळं छान - अहाहा. त्यातली सुलोचना बाईंची "घ्या रंगत" केवळ जिवघेनी आहे. तसेच पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा शोभा गुर्टूंची लावनी
पिंजरा मधील नका सोडून जाऊ रंगमहाल ह्या केवळ उच्च आहेत.

रात्र काळी घागर काळी, यमुनाजळे ती काळी वो माय हे गाणे गोविंद पोवळे (सोबतीला कोरस आहे) यांनी गायले आहे.

गोविंद पोवळे यांचेच "माती सांगे कुंभाराला पायी मज तुडविसी " हे एक सुंदर गाणे आहे. किती सुंदर शब्द आणि गायलंयही सुंदर.

माती सांगे कुंभाराला पायी मज तुडविसी,
तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाशी

मला फिरविसी तू चाकावर
घट मातीचे घडवी सुंदर
लग्नमंडपी कधी असे मी कधी शवापाशी

वीर धुरंधर आले गेले
पायी माझ्या इथे झोपले
कुब्जा अथवा मोहक युवती अंती मजपाशी

गर्वाने का ताठ राहसी
भाग्य कशाला उगा नाससी
तुझ्या ललाटी अखेर लिहिले आहे मीलन माझ्याशी

फैयाज ने वीज म्हणाली धरतीला, या नाटकात दोन पदे गायली होती

स्मरशील गोकूळ सारे
स्मरशील यमुना, स्मरशील राधा
स्मरेल का पण, कुरुप गौळण
तूज मी बन्सीधरा रे..

आणि

चार होत्या पक्षीणी त्या,
एक होती सावली
चार कंठी बांधलेली
एक होती साखळी.

फैयाजने काही मोजक्यात नाटकात भुमिका केल्या. संगीत नाटक तर दूसरे आठवत नाही.
वेट अनटील डार्क, या सिनेमावर आधारीत, अंधार माझा सोबती, मधे डॉ काशिनाथ घाणेकरांसोबत फैयाज असे. जबरदस्त संवाद फेक
जाणता राजा मधे जिजाबाई, केवळ आवाजाने साकारलीय तिने.

योगेश, माती सांगे कुंभाराला, मी सुलोचना चव्हाण यांच्या तोंडून ऐकलय बहुतेक.
उषाचे आणखी एक गाणे आठवले

वेळ झाली भर माध्यान्ही, माथ्यावर तळपे ऊन
नको जाऊ कोमेजून, माझ्या प्रितीच्या फूला
तप्त दिशा झाल्या चारी, भाजतसे प्रुथ्वी सारी
कसा तरी जीव धरी, ...

उषा मंगेशकरांचे 'तू नसता मजसंगे' हे गाणेही छान आहे. रिअ‍ॅलिटी शोज मधून गाताना दिसत नाही फारसे कुणी !

फैयाज यांची मला आठवलेली आणि आवडलेली (वर न आलेली)गाणी
१) या बाइ या बघा बघा कशी माझी बसली बया , साधना घाणेकर्(सरगम) सोबत
२) देवा तुझे किती सुंदर आकाश.(दोन्ही शालेय पुस्तकातल्या कविता)
३) लागी करेजवा कटार हे कट्यार मधले ..याची ध्वनिफीत नाही..पण यांच्या मुलाखतीत त्या नेहमी गातात...पं वसंतराव देशपांडेंनी ठुमरीची अदा त्यांना शिकवली आणि बेगम अख्तरची भेटही घडवून आणली या नाटकाच्या निमित्ताने.

रात्र काळी घागर काळी -गोविंद पोवळेंचे- आकाशवाणीकडेही नाही बहुधा. झी मराठीच्या नक्षत्रांचे देणे मधे ते समूहस्वरात गायले गेले होते.

योगेश, माती सांगे कुंभाराला, मी सुलोचना चव्हाण यांच्या तोंडून ऐकलय बहुतेक.>>>दा, माझ्याकडे आहे ते गोविंद पोवळे यांच्या आवाजात आहे.

रात्र काळी घागर काळी -गोविंद पोवळेंचे- आकाशवाणीकडेही नाही बहुधा. >>>>> नशिबाने माझ्याकडे वरील दोन्ही गाणी ओरिजनल आहे Happy

अगो, "तू नसता मजसंगे वाट ही उन्हाची,संगतीस एकाकी वेदना मनाची" हे गाणे का? नेहमीप्रमाणेच मस्त गायलंय उषाताईंनी. हेही लिहिलंय आपल्या शांता शेळके यांनीच. Happy

दिनेशराव सुरुवात करा. आम्ही वाचू. अन आमच्याही आवडी टाकत राहू. मी मुद्दामच नाट्यसंगीत लिस्ट लिहली आहे>>>>> केदारला मोदक Happy

कळीदार कपुरी पानं कोवळं छान - अहाहा. त्यातली सुलोचना बाईंची "घ्या रंगत" केवळ जिवघेनी आहे. >>>>>अगदी अगदी

भरत, फैयाज यांच्या गाण्यांची अधिक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

तू नसता मजसंगे
वाट ही उन्हाची

हे गाणे
सुरसुखखनी, तू विमला
सगुणा कविबाला, या नाट्यगीतावर अवलंबून आहे.

फैयाजने महानंदा चित्रपट तसेच नाटक दोघांतही काम केलेय. नाटकात काशिनाथ घाणेकर आणि चित्रपटात विक्रम गोखले आहेत. हे बंध रेशमाचे मध्येही बहुतेक फैयाज होती. (चुभुद्याघ्या Happy ) तिचे कट्यार मी प्रत्यक्ष आणि टीवीवर पाहिलेय.

साधना घाणेकरची आठवण निघाली आहेच. तिची शांताबाईंनी मुलांसाठी लिहिलेल्या गाण्यांची एक कॅसेट निघाली होती. मुलगी लहान असताना मी दोनदा विकत घेतलेली ती कॅसेट (पहिली मुलीने वाजवुन खराब केलेली) कॅसेटबरोबर पुस्तक पण मिळालेले. अजुनही मी जपुन ठेवलेय ते पुस्तक. अजुनही पुस्तक काढुन दोघी गात असतो त्यातली गाणी.. Happy

एक तरी मैत्रिण हवी
सखुबाई सखुबाई चाललात कुठे
आणि अजुन खुप छान छान गाणी होती, तिच्या आवाजात अजुन सुरेख वाटलेली.

साधना माझ्याच कॉलेजात होती. मला तीन वर्षे सिनीअर. ती आरोही किंवा इतर दुरदर्शन कार्यक्रमात असली की कॉलेजात हमखास बोर्डावर लिहिलेले असायचे....

गुंतता हूदय हे, मधे आशा काळे असायची, फैयाजने पण नंतर केले का ते ?
हे बंध रेशमाचे मधे बकुल पंडित, क्षमा बाजीकर आणि ज्योत्स्ना मोहिले असायच्या. (त्यातली गाणी हा एक वेगळाच विषय आहे.)
डॉ वसंतराव देशपांडे गेल्यानंतर फैयाजने पुढाकर घेऊन, कट्यार चे प्रयोग करायला लावले होते.
शाम बेनेगलच्या, भारत एक खोज मधे तिने काहि गाणी गायली होती.

गुंतता हूदय हे, मधे आशा काळे असायची, फैयाजने पण नंतर केले का ते ?
हे बंध रेशमाचे मधे बकुल पंडित, क्षमा बाजीकर आणि ज्योत्स्ना मोहिले असायच्या. (त्यातली गाणी हा एक वेगळाच विषय आहे.)

माझी आठवण बहुतेक दगा देतेय.. आशा काळेच होती त्यात..

जे तुझ्याचसाठी होते केवळ फुलले
वाटेत तुझ्या मी फुल ठेऊनी गेले

रथ ऐश्वर्याचा या वाटेने गेला
जयघोष तुझा मग सर्व जगाने केला
मी दुर एकटी माझे डोळे ओले
वाटेत तुझ्या मी फुल ठेऊनी गेले

त्या फुलासारखी अबोल माझी प्रीत
ती अबोल पुजा या माझ्या हृदयात
नच ओठावरती नाव तुझे कधी आले
वाटेत तुझ्या मी फुल ठेऊनी गेले

तुज कसे कळावे? देवा नाही कळले
मी दुर अलक्षीत तुजसाठी तळमळले
त्या फुलात माझे हृदय ठेऊनी गेले

मगासपासुन किती वेळा ऐकले माहित नाही Sad इतक्यांदा ऐकुनही दरवेळेस डोळे पाणावताहेत.

या गाण्यामागे काही गोष्ट आहे का? एखाद्या गोष्टीवर आधारीत गाणे आहे का हे?? असल्यास सांगा.

घाई नको बाई अशी आले रे बकुळफुला
देते जलसंजीवन बंधुजीव व्याकुळला

हे धाडिला राम तिने का वनी या नाटकातले पद लिहिले राजा बढे यांनी , संगीत जितेंद्र अभिषेकी आणि गायिका आशा खाडिलकर..
त्यातलेच 'लेउ कशी वल्कला ते जुळे न बाइ मला'
ही दोन्ही सीतेची.
कैकयीचे रजनी जोशी यांनी गायलेले अवमानिता मी झाले.
बकुल पंडित यांची २ गाणी : विकल मन आज झुरत असहाय आणि का धरिला परदेश. त्यांचेच नाव अलकनंदा वाडेकर.

जे तुझ्याचसाठी होते केवळ फुलले मधली भावना प्रत्येक सामान्य व्यक्तीला कधी ना कधी अनुभवास येतेच ना. कुणातरी आपल्या भोवतालच्या ग्रेट व्यक्तीवर क्रश असावा आणि त्याला त्याचा पत्ता नसावा, कधीच लागणार नाही..
अगदी असेच एक गाणे एकटी या चित्रटात आहे...तिथेही फूल आहे
एक फुलले फूल आणि फुलुन नुसते राहिले
त्या कुणी ना पाहिले त्या कुणी ना पाहिले (आशा भोसले)
एकटी हा चित्रपट आईचा असला तरी त्याची मूळ कथा मात्र नायकाच्या बालमैत्रिणीची आहे (इंदू मुक्यानेच मेली) जिचे प्रेम नायकाला कधीच कळत नाही, असे मी ऐकले होते.

एकटी हा चित्रपट आईचा असला तरी त्याची मूळ कथा मात्र नायकाच्या बालमैत्रिणीची आहे (इंदू मुक्यानेच मेली) जिचे प्रेम नायकाला कधीच कळत नाही, असे मी ऐकले होते.

मूळ कथा म्हणता येईल की नाही माहित नाही, पण बालमैत्रिणीची उपकथा आहे त्यात. नायकाच्या आईलाही ती आवडत असते, पण नायक गाढव निघतो Happy

साधना मूळ कथा म्हणजे ज्या लिखित कथेवरून हा चित्रपट बेतला ती बहुधा य गो जोशींची कथा. अर्थात मराठी चित्रपट आईवर फोकस ठेवून होता.
हे काय नव्या गाण्यांचा ओघ का थांबला? एवढीच गाणी का आवडीची?
नाट्यसंगीताचा विषय आला आहे तर....
छोटा गंधर्वांची लडिवाळ गाणी खूप आवडीची
१) अज नच सुंदरी करू कोपा
२) प्रिये पहा रात्रीचा समय सरुनी येत उषःकाल हा
३) कोण तुजसम सांग मज गुरुराया
४) लाल शाल जोडी जरतारी
५) तेचि पुरुष दैवाचे
पहिली ४ सौभद्रातली - कृष्णाचे खोडकरपण शब्दातही कसे नेमके उतरले आहे.
पाचवे मृच्छकटिकातले.-अंगे भिजली जलधारांनी ऐशा ललना स्वये येउनी या सुप्रसिद्ध ओळी याच गाण्यातल्या.

.

नाट्यसंगीताचा विषय आला आहे तर....>>
माझ्याकडे मत्स्यगंधा ते महानंदा नावाचा अल्बम आहे त्यातली काहि आवडती Happy

गर्द सभोती रान साजणी तु तर चाफेकळी (आशालता वाबगावकर ??)
आनंदसुधा बरसे
देवाघरचे ज्ञात कुणाला
हे सुरांनो चंद्र व्हा (हे अतिशय आवडीचे :))
का धरीला परदेस
कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर
काटा रूते कुणाला
सुरत पियाकी

आणि केदारने उल्लेख केलेली सगळीच Happy

Pages